Bhutachi Gosht In Marathi |
गार वारा सुटला होता,,,,,,,पाऊसाचे दिवस होते,,,,,,,! आभाळ दाटून येत होतं,,,,,, जोरदार पावसाचा आकार होता,,,,,! अश्यात ते दोन मित्र गाडीला धक्का मारून रस्त्याच्या बाजूला घेत होते,,,,,!रस्ता चांगलाच खडतर होता,,,,,,दोहू बाजू जंगलाने वेढलेल्या होत्या,,,,,,!गाडी अचानक रस्त्यातच बंद पडल्याने त्यांनी ती रस्त्याच्या बाजूला लावली,,,,,,,मदत मिळण्याची चिन्हे नव्हती,,,,,,,आता करायचं काय,,,,हा प्रश्न त्यांना पडला,,,,,कोणती गाडी ही येताना दिसत नव्हती,,,,,,,!
आपसात बोलत असता वरुण राजे बरसायला सुरुवात झाली,,,,,,,! तुफान,,,! गाडीत जाऊन बसण्या खेरीज त्यांच्याकडे पर्याय नव्हता,,,,,,! गाडी चांगली बंद करून ते आत बसले,,,,त्यांना ठाऊक होतं की हा पाऊस इतक्यात थांबणार नाही,,,,,,मात्र नाईलाज होता,,,,,,!
दोघे मित्र नवीनच कंपनीत नौकरीला लागले होते,,,,,,कंपनीने सरावा करीता त्यांना दुसऱ्या शहरात चार दिवस पाठवले होते,,,,,,! आणि जात असताना त्यांना अडचणी मुळे रस्त्यातच अडकावे लागले होते,,,,,,!
दोघेही हताश होऊन गाडीत बसले होते,,,,,,बाहेरचं काही दिसतच नव्हते,,,,,,! फक्त धो धो बरसणाऱ्या पावसाचा आवाज,,,,आणि विजांचा कानठळ्या बसवणारा भेदक आवाज,,,,,,,! थंडी ही चांगलीच वाढली,,,,,त्यांनी बॅग मधून शाल वैगरे काढून अंगावर घेतल्या,,,,,,! मोबाईल पाहिले असता नेटवर्क गेलेलं,,,,,! त्यातला एक जण जरा जास्तच बैचेन झाला होता,,,,,,! सारखा गाडीच्या काचेतून बाहेर डोकावत होता,,,,,,! दुसऱ्या मित्राने विचारले असता त्याने काही नाही असे मान हलवून उत्तर दिले बस,,,,,,,! मात्र त्याच्या मित्राने ओळखले की हा थोडा घाबरला आहे,,,नक्कीच काही तरी झालेलं असावं,,,,,,त्याने त्याला बोलतं केलं,,,,,,,! तो सांगू लागला,,,,,,!
अरे साधारण वीस वर्षांपूर्वीची घटना असावी,इथं एक भयंकर अपघात झाला होता,,,,ज्यात एक स्त्री आणि तिचा सहा वर्षांचा मुलगा मृत झाले होते,,,,,,,!तिचा पती अपघातात बचावला मात्र पत्नी व मुलाचे मृतदेह समोर पाहून त्याला इतका धक्का बसला की त्यानेही इथेच जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली,,,,,,,,! मी खूप वेळ ह्या मार्गाने आलो आहे,,,,,कारण माझ्या गावाकडे जाण्याचा हाच मार्ग आहे,,,,,! माझ्या आजीने मला ही घटना कथन केली होती,,,,,, इथे कधी थांबलो नाही,,,,,,मात्र आज गाडी बंद पडल्याने आपल्याला इथं अडकाव लागलं,,,,,म्हणून जरा अस्वस्थ झालो,,,,,,,,! त्याने त्याची भीती बोलून दाखवली,,,,,,! दुसरा मित्र बोलला,,,अरे तो एक अपघात होता,,,,,रोज कितीतरी अपघात घडतात,,,,,लोकांचे जीव जातात,,,,,! इतकं मनावर घेऊ नकोस,,,,,घाबरू नको,,,,,पाऊस थांबला की आपण करू काहीतरी व्यवस्था,,,,,,! तर तो बोलला,,,,मित्रा तो अपघात होता हे माहीत होतं मला,,,,,पण जिथं तो अपघात घडला होता ती हीच जागा आहे जिथं आपण थांबलो आहोत,,,,,,,,आणि माझ्या भीतीचे कारण हे आहे की,,,,,,,,,,,ती स्त्री आणि तिचा मुलगा अजून ही इथे भटकत आहेत,,,,,,,,! बऱ्याच लोकांना ते इथे दिसले आहेत,,,,,,,,,!
आता दुसरा मित्र ही घाबरला होता,,,,,,,,!अपघातात मृत्यू पावलेला परिवाराशी आपला संबंध नाही मात्र मृत्यू होऊन देखील ते इथं भटकत आहेत ही बाब भीतीदायक होती,,,,,,,,! आता दोघेही घाबरून बाहेर पाहत होते,,,,,,! पाऊसाने आपले बरसने चालूच ठेवले होते,,,,,,,अगदी बेफाम,,,,,,!
वेळ लवकर जात नव्हती,,,,,,फोन चे नेटवर्क तर नव्हतेच, फोन मध्ये वेळ पाहिली असता रात्रीचे साडे अकरा वाजले होते,,,,,! कोण जाणे पाऊस कधी थांबणार आणि थांबला तरी अश्या भयाण अंधारात कोठे मदत मिळणार,,,,,! असे विचार चालू असताना गाडीच्या बोनेट वर कोणीतरी धाडकन आपटलेलं त्यांना जाणवलं,,,,,,,,!! दोघेही भेदरले,,,,,,,,बाहेर जाऊन पहायची हिम्मत होईना,,,,,,थोडाच वेळ गेला,,,,दोघेही पुढच्या सीट वर बसले होते,,,,कोणती हालचाल जाणवत नव्हती,,,,,,,मात्र आता कोणीतरी मोठ्याने श्वास घेतोय,गुरकतोय असा आवाज त्यांच्या कानात घुमू लागला,,,,,,आणि,,,,,,,,,तो आवाज,,,,,,,,,त्यांच्या मागिल सीटवरून येतोय हे त्यांच्या लक्षात आले,,,,,,,,दोघांनी एकमेकांचे हात घट्ट दाबले,,,,,आणि हळूच मागे पाहिले,,,,,,,,,,! तर,,,,,,,एक स्त्री चेहऱ्यावर पदर ओढून बसलेली,,,,,,,! क्षणात ती मोठ्याने ओरडली,,,,,,,मला माझं मुलं पाहिजे,,,,! तिचा आवाज अमानवीय होता,,,,,,भेदरा होता,,,,,,इतका भेदरा होता की दोघे गाडीचा दरवाजा उघडून भर पावसात खाली उतरले आणि रस्त्याने पळू लागले,,,,,,,,त्यांच्या मागे पायातल्या पट्ट्या चा आवाज येऊ लागला,,,,,अर्थात ती स्त्री त्यांच्या मागेच होती,,,,,,,,! दोघे जिवाच्या आकांताने पळत होते,,,,,,धो धो बरसणाऱ्या पावसात त्यांना त्यांच्या समोर एक लहान बालकाची आकृती दिसली,,,दोघे जागीच स्तब्ध झाले,,,,,,पट्ट्या चा छमछम आवाज देखील थांबला,,,,,,,! त्यांनी मागे पाहिले असता पदर ओढलेली ती स्त्री त्यांच्या मागेच उभी होती,,,,,,,मात्र ती पुढे येत नव्हती,,,,,,,तिच्या तोंडावरील पदर हळूहळू सरकला असता तिचा चेहरा रक्ताने संपूर्ण माखलेला होता,,चेहऱ्यावर मांस लोंबले होते,,,,,विजेच्या कडकडणाऱ्या प्रकाशात त्यांना ते स्पष्ट दिसले,,,,,दोघेही भयंकर आक्रोश करू लागले,,,,,आपला मृत्यू निश्चित आहे ह्या भावनेनं त्यांना हेलावून टाकलं,,,,,,,,,! त्यांनी त्या मुलाकडे पाहिलं असता त्याने जंगलाच्या दिशेने बोट केलं,,,,,कदाचित त्यांना तो जंगलाच्या दिशेने जाण्याचा इशारा देत होता,,,,,,,,! दोघेही जंगलाच्या दिशेने पळाले,,,,,,,,,!! मागे वळून पाहिले असता न तो मुलगा तिथं होता न ती स्त्री,,,,,,,!
जंगलातला चिखल तुडवत दोघे पळत होते,,,,,,,शरीर दमले होते,,,,,,,,,एव्हाना पाऊस ओसरू लागला होता,,,,,,,! दोघेही आडोसा पाहून थांबले,,,,,,, पाऊस ओसरल्याने थोडा धीर आला होता,,,,,,,,! मागून आवाज आला,,,,,,,,आता तुम्हाला कसलीच भीती नाही,,,,,,,,! दचकून मागे पाहिले तर एक अर्धवयस्क माणूस त्यांच्या जवळ येत होता,,,,,,,,,! प्रथम त्याने त्यांना धीर दिला,,,,,,दोघांच्या जीवात जीव आला,,,,,,,,,,! तो व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन बसला,,,,,,आणि पुन्हा त्याने ते वाक्य उद्गारले,,,,, आता तुम्हाला कसलीच भीती नाही,,,,,,,,,!
काका हे काय घडतंय आम्हाला कळू द्या,,,,ह्या सर्वाशी आमचा काहीही संबंध नाही,,,,,,,,!
तुम्ही जे पाहिलत ते सत्य आहे,,,,,,,! ती स्त्री मागील काही वर्षांपासून इथे भटकत आहे,,,,,,,,तिची थोडक्यात माहिती अशी आहे की,,,एक सभ्य गृहस्थ आपल्या पत्नी आणि छोट्या मुलासोबत आनंदात राहत होता,,,,,,,,त्यांचा मुलगा हा दैवी योगात जन्मला होता,,,,,! तो तीन वर्षांचा असताना त्याच्या आईचे आजार पणात निधन झाले,,,,,,तो गृहस्थ एकाकी पडला,,,,,,तान्हे लेकरू घेऊन कसं जगायचं ह्या विचाराने तो अस्वस्थ बनला,,,,,त्याच्या काही मित्रांनी त्याला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला,,,,,,अर्थात तो फायद्याचा होता त्याच्या साठी आणि त्या लहान मुलासाठी,,,,,,,! त्याने सहा महिने जाऊ दिले,,,,,,आणि लग्न केलं,,,,,,मुलगी कोणाच्या परिचित नव्हती,,,,,! विवाह नोंदणी केंद्रात त्याने नाव नोंदवले होते आणि हे स्थळ त्याला आले होते,,,,,,,,मुलीला आई वडील नव्हते काही नातलग होते,,,,,,,,त्याने कसलीही चौकशी न करता तिच्याशी साध्या पद्धतीने लग्न केलं,,,,,,! त्याने तिला त्याचा सर्व भूतकाळ सांगितला होता,,,,,,,!मात्र तिचा भूतकाळ विचारला नाही,,,,! तिलाही हरकत नव्हती,,,,,,,,! लग्न करून तो तिला घेऊन घरी आला,,,,,मात्र मुलाला पाहिल्यावर ती थोडी ओशाळली,,,,,,, का कोणास ठाऊक त्याने ते पाहिले मात्र त्याच्या ध्यानात आले नाही,,,,,,,! थोडेफार दिवस गेले असतील,,त्याचा मुलगा कृश बनत चालला,,,,,,,मुलाची अशी अवस्था पाहून तो चिंतीत झाला,,,,,एक बाब त्याच्या निदर्शनास आली ती म्हणजे त्याच्या मुलाच्या जवळ त्याची बायको येत नव्हती,,,,,तो समोर जरी आला तरी ती घाबरून तेथून निघून जाई,,,,,,! असं का होतंय ह्या विचार चक्रात तो फिरू लागला,,,,,मात्र त्या बाबत तिच्याशी तो बोलला नाही,,,,,,,! कामावर थोड्या दिवस रजा टाकून तो घरी राहीला,,,,,,,,! एक दिवस ती भाजीपाला आणायचा म्हणून बाजारात गेली,,,,,त्याच्या काहीतरी मनात आलं म्हणून त्याने तिची सुटकेस उघडली तर काही जुने फोटो त्यात होते,,,,,,लहान मुलाचे,,,,,,,!
काही बाहुल्या,,,,,सुकलेली लिंब,मिरच्या,,,,,!
आता तो समजून चुकला की हा प्रकार अनैसर्गिक आहे,,,,,! आपली दुसरी पत्नी ठीक स्त्री नाही ह्याची त्याला खात्री झाली,,,,,,,! त्यानं ठरवलं की उद्या मुलाला त्याच्या बहिणीकडे सोडवायचे आणि ह्या प्रकरणाचा संपूर्ण छडा लावायचा,,,,,! रात्री त्याने सांगितले की आपल्याला माझ्या बहिणीकडे जायचे आहे,,,,,एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी परत येऊ,,,,ती ही तयार झाली,,,,,! दुसऱ्या दिवशी ते निघाले,,,,,मात्र आज काळाच्या मनात काहीतरी वेगळं होतं,,,,,,, विचित्र घटनेची चाहूल त्याला लागली होती,,,,,,,,! ते दिवस देखील पावसाचे होते,,,,, ह्याच रस्त्याने ते येत असताना गाडीवरील ताबा सुटून गाडी झाडावर जाऊन आदळली,,,,,मुलगा मागच्या सीटवर झोपला होता,,,, गाडी आदळली त्यामुळे तो खाली पडला त्याला बरीच दुखापत झाली,,,,,! दोघे पुढे बसले असल्याने तेही समोर आदळले,,,,त्याच्या डोक्याला मार लागून तो बेशुद्ध झाला,,,,,तिला जास्त काही लागले नाही,,,,,,,,! तो बेशुद्ध होता आणि मुलगा वेदनेने रडत होता ,,,,,,त्या चेटकीण बाईने त्याचा चेहरा दिसू नये म्हणून स्वतःच्या चेहऱ्यावर पदर ओढला आणि त्या मुलाला उचलून पावसात टाकून दिलं,,,,,,,!तो रडत राहिला,,,,रडत राहिला,,,,,,आणि शांत झाला,,,,,,कायमचा......!
तो शुद्धीवर आला असता त्याने मागे पाहिले असता मुलगा नव्हता आणि ती ही नव्हती,,,,पाऊस थांबला होता,,,,,तो विव्हळत उठून बाहेर आला तर मुलगा रस्त्यावर निपचित पडलेला,,,,,,त्याने जवळ जाऊन त्याला उचलले तर त्याचं श्वास घेणं केव्हाच थांबलं होतं,,,,,! त्याला छातीशी धरून त्याने टाहो फोडला,,,,,,,! त्या चेटकीनीने त्याच्या मुलाचा जीव घेतला होता,,,,,,! मुलाचा कोवळा देह गाडीत ठेऊन तो तिला शोधू लागला,,,,,! जंगलाच्या दिशेने त्याला थोडा उजेड दिसला तो तडक तिकडे निघाला,,,,,तेथे पोहचला असता ती खाली बसली होती,,,शेकोटी पेटवून,,,,! तोंडाने काही मंत्रोच्चार चालू होते,,,,,,त्याने कसलाही विचार न करता दगड उचलून तिच्या डोक्यात घातला,,,,,,!
मोठ्याने ओरडून ती जमिनीवर पडली,,,,,,,! जीव मात्र तिचा गेला नव्हता,,,रक्ताळलेल्या चेहऱ्याने ती त्याच्याकडे पाहू लागली,,,,,,! तोंडाने पुटपुटली,,,,माझा मुलगा,,,,,,,,! तो तिच्या जवळ गेला आणि भरल्या डोळ्याने तिला विचारलं ,,,,,,,तुझा मुलगा,,,,,,,आणि तूच जीव घेतला,,,,,,,,,??
तर तिने धक्कादायक गोष्ट त्याला सांगितली की ती आधीच विवाहित होती,,,,,, ती गरोदर असताना तिचा नवरा मृत झाला होता तिची प्रसूती झाली तिला मुलगा झाला मात्र आजार पणात त्याचाही मृत्यू झाला,,,,,,मुलाचा विरह सहन झाला नाही,,,,ती वेडसर होत चालली,,,,,कोण्या मांत्रिकाने तिला अमानवीय सल्ला दिला की तुझे मुल तुला हवे असेल तर त्याबदल्यात तुला एका मुलाचाच बळी द्यावा लागेल,,,,,,,,! ती त्या शोधात राहू लागली,,,,,! तिला तिच्या काही नातेवाईकांनी लग्न करायचा सल्ला दिला,विवाह नोंदणी कार्यालयात काम करीत असलेल्या तिच्या एका मैत्रिणीने तिला सल्ला दिला की एक विधुर व्यक्ती आहे त्याला एक मूल आहे,,,त्याला लग्न करायचे आहे.
मूल म्हणल्यावर तिच्या डोक्यात त्या मांत्रिकाने भरवलेल्या सैतानी विचाराने उफळी घेतली,,,,,,,! आणि अशाप्रकारे तिने लग्न केले,,,,,तिला मुलाचा बळी द्यायचा होता,,,,,,,,!
स्वतःच्या उदरातून जन्म घेतलेल्या आणि मृत झालेल्या मुलाला जिवंत करण्यासाठी दुसऱ्या मुलाचा बळी द्यायला ती अघोरी झाली,,,,,,! त्या मांत्रिकाने तिला अघोरी करून टाकले होते,,,,,,,! मात्र हा मुलगा दैवी योगात जन्मला असल्याने त्याच्यावर वाईट प्रयोग चालत नव्हते,,,तिने त्याचा चेहरा पाहिला की ती थरथर कापत असे,,,,हेच कारण होते की त्याला ती जवळ घेत नसे,,,,,,! मात्र ह्या अपघाताने तिला मार्ग सापडला होता,,,,थोडी इजा झालेल्या बालकाला तिने भर पावसात त्याला टाकून दिले होते,,,,,! तिच्याच हाताने त्याचा मृत्यू झाला आणि मांत्रिकाने सांगितल्या प्रमाणे ती पुढील विधी करत होती,,,,,,,! इतकं सांगून ती थांबली होती,,,,,,,म्हणाली,,,,माझा मुलगा मला आज भेटला असता,,,,,,,!
चिडलेल्या त्या व्यक्तीने अजून रागात येऊन पुन्हा तोच दगड उचलून डोक्यात घातला,,,, ती गतप्राण झाली,,,,,,! कारण तिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता,,,,,,,!
ते दोघेही धीरगंभीर होऊन त्या व्यक्तीचे बोलणे ऐकत होते,,,,,,,,! ती चेटकीण आज ही इथेच भटकंती करत आहे,,,,,लोकांचे जीव घेत आहे,,,,,,ती कोणालाच सोडत नाही,,,,,,,! तिला पाहणारा व्यक्ती जिवंत राहत नाही,,,,,,,,!
काका नशीब आम्ही वाचलो,,,,! तो गृहस्थ हसला आणि म्हणाला आता ती तुम्हाला त्रास नाही देऊ शकत,,,,,,इतकं बोलून तो तेथून जाऊ लागला,,,,,,,,! त्यांनी विचारले काका तुम्हाला ही घटना कशी माहीत पडली,,,,,,?
हे समोरील झाड पाहत आहात ना,,,,,,,? मी इथेच गळफास घेऊन आत्महत्या केली होती,,,,,,,,,,! इतक्यात तो लहान मुलगा तेथे आला,,,,आणि वडिलांचे बोट धरले,,,,,,आणि दोघे तेथून निघून गेले,,,,,,,त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे हे दोघे पाहताच राहिले,,,,,,!
विजांचा कडकडाट झाला,,,,, सगळी घटना त्यांना समजली होती,,,,,,,! दोघेही अचंबित झाले होते,,,,,,! आपण थोडक्यात वाचलो ही बाब थोडी सुखावह वाटली त्यांना,,,, ,एकप्रकारे त्या मुलाने आणि त्याच्या वडिलांनी आपले रक्षण केलं हे त्यांना कळलं होतं,,,,,,! हलका पाऊस पडायला लागला होता,,,,,,,मोठे झाड पाहून त्यांनी आधार घेतला,,,त्यांची भीती गेली होती,,,,,,! डोळे उघडले तर उजाडले होते,,,,,आभाळाने काळी छाया झटकून प्रकाशाची उधळण केली होती,,,,,,,! दोघेही उठून गाडीकडे निघाले,,,,,,! शांत चालले होते,,,,,,त्यांची गाडी त्यांना समोर दिसली,,,,,,गाडी भोवती गर्दी दिसत होती,,,,,,,,! ते जवळ गेले,,,,,,,,,! लोकांनी गाडीतून दोन तरुणांचे मृतदेह बाहेर काढले होते,,,,,,!,,,,,!
हो,,,,,,,,,! ती कोणालाच सोडत नाही,,,,,,,,,तिला पाहणारा कोणीच जिवंत वाचत नाही,,,,,,,!.
(वरील घटना कल्पनेतून साकारली आहे.आवडल्यास नक्की अभिप्राय द्या.काही चुका असल्यास क्षमस्व.)
गणेश कदम.