मी शाळेत असताना आम्ही कुटुंब मुंबईत मानखुर्द मधे आगरवाडी नावाच्या गावात चाळीत रहात होतो. ते दिवस छान होते. पाचवी नंतर माझी व ताईची शाळा सकाळी सातची असे म्हणून नेहमी आम्ही रात्रीचं जेवण उरकून साधारण नऊ दहा वाजता झोपत असू. पण कधी कधी म्हणजे शनिवारी रात्री किंवा सुटीमधे रात्री संपूर्ण कुटुंब गप्पा मारत बसायचो, रात्र सरकत जायची. कधीतरी शेजारचा बबन, बेबी, वाणीमामी, वैशाली, नितिन चौगुले, कल्पना ताई , आई, आप्पा(वडील), ताई, लहान भाऊ, मी असे सर्वच जण चाळीतल्या दारात ओट्यावर मस्त बसायचो. वेळ सरकती झाल्यावर कुणीतरी भूताची गोष्ट सांगा ना असं आप्पांकडे हट्ट धरायचे. ते सहजपणे सांगत नसत, तुम्ही घाबराल म्हणून टाळाटाळ करायचे. भुताची खरीखुरी कोकणातली गोष्ट कदाचित ऐकायला मिळणार म्हणून आम्ही सर्व जण कान टवकारून बसायचे. एके रात्री मला वाटतं ती मे महिन्याची सुट्टी होती तेव्हा असेच सगळे जमलो, रात्रीचे एक वाजत आले होते, कल्पना ताई सर्वात मोठी. तिनं आप्पांना सागितलं की आप्पा आज भुताची गावची गोष्ट ऐकल्याशिवाय आम्ही इथून हलणारच नाही. आज मात्र आप्पांनी सुद्धा गोष्ट सांगयचं मनावर घेतलं. ते म्हणाले मी गोष्ट सांगतो पण लक्षात ठेवा ही फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि गावी वडखळ जवळ असलेल्या धरमतरच्या खाडीतली गोष्ट आहे आणि प्रकार पूर्वी गावी होत असत इकडे मुंबईत तसे काहीच नाही, त्यामुळे घाबरणार नसाल तरच सांगतो.
लगेच आम्ही सगळेच, सांगा ना असं म्हणून आप्पांना बोलतं केलं. तर गोष्ट आप्पांच्या मामांच्या मित्राची आहे. विठोबामामांचे मित्र गणूमामा त्यांचं नाव.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वडखळ नाक्यावरुन दोन किलोमीटरवर बेणेघाट नावाचं गाव आहे ,तिथे गणूमामा रहात असत. त्यावेळी म्हणजे १९५५-१९६० साली मेट्रीक पास (एस. एस. सी पास) म्हणजे खूप शिक्षण. तर ते मामा मेट्रीक होऊन पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करत होते आणि सुविधा नसलेल्या गावात म्हणजे अगदी राॅकेलच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागे. गावाशेजारीच खाडी. कधी कधी ते गावातल्या मित्रांबरोबर धरमतरच्या खाडीत मासे पकडायलाही जात असत. गावापासून जवळच धरमतरच्या खाडीतून फुटलेली एक छोटी खाडीही होती. कधी कधी त्या खाडीतही जात असत. खाडीत एकटे जायचे नाही असे प्रत्येकालाच घरुन ताकीद असे, तरीही कुणीतरी सोबत घेऊन मामा आणि मित्र मंडळी मासेमारीस जायचे. कधी मासे कमी मिळत तर कधी भरपूर. पण एकादशीला एक विशिष्ठ योग जुळून आल्याने नेहमी मासे जास्त मिळत. या जास्त मासे मिळण्याच्या तिथीस तिथे "उधवण" असे म्हणतात.
एके संध्याकाळी गणूमामा व त्यांच्या घराजवळच रहाणारे गजानन मामा असे दोघेजण छोट्या खाडीत मासे पकडायला गेले होते पण त्यांना कमी मासे मिळाले होते म्हणून ते नाराज होते. गावापासून दूरवरून कांड्यावरुन( शेतातल्या मातीच्या बांधावरुन) घरी येत असताना ते दोघे आपापसात गप्पा मारत होते. त्यांना मागून कुणीतरी चालतंय असा भास होई, दिवाबत्तीची वेळ. अंधाराचं सावट. मिणमिणत्या चंद्र प्रकाशाची वाट. ते चालताहेत. मध्येच "ह्म्म्म्म" "ह्म्म्म्म" असा विचित्र आवाज! अंगावर काटा यावा असा भास. गजानन मामांनी गणूमामांना खुणावलं की, "काय आहे मागे"?
गणूमामा तसे बिनधास्त स्वभावाचे. त्यांनी "कुठे काय " ," काही नाही " असं म्हणत वेळ ढकलून दिली आणि क्षणार्धात माघारी वळले. आणि जोरात ओरडले,

" कोन हाय रं? "
मागे कुणीच नव्हतं. गजानन मामांच्या जीवात जीव आला. ते शांत झाले आणि घरच्या वाटेला लागले. आलेला आवाज विसरुन पुढची वाट आणि विषय चालू झाला. गणू मामा म्हणाले , " आरं उद्या उधवन हाय नै? "
गजा मामा म्हणाले " हो "
"मग कोंबरा आरवनी निंगू पागाला " गणू मामा बोलते झाले. ( *कोबरा आरवनी= भल्या पहाटे, *पागाला = मासे पकडायला ).
गजा मामांना आज मिळालेले मासे कमीच होते त्यांनाही पुन्हा यायची इच्छा होतीच. शिवाय उधवन आहे म्हणजे पहाटे पहाटे गेल्यावर चांगले मासे मिळण्याच्या आशेने ते "हो" म्हणाले.
ठरले तर !
पहाटे पागायला (मासे पकडायला) जायचा बेत फिक्स झाला. त्यावेळी आलार्मचे घड्याळ वगेरे नव्हते, घरची परिस्थिती सगळ्यांची तशीच, गरीबीची. दरवर्षी वर्षातून एकदा गावकीचे पैसे काढून पार्टीसारखा कार्यक्रम करण्याचा मटणाचा बेत या तालुक्यात असायचा , या वर्षातून एकदाच्या कार्यक्रमास "खाद" असे म्हणत.

गजामामा म्हणाले , " कोंबरा आरवनी जावाचा "
" पून, उठवील कोन? " , " आईस उठवाची नाय मना, किकलंल "
(पण, कोण उठवेल? आई उठवणार नाही, ती ओरडेल) ..
गणू मामांच्या घरीही नेमका हाच प्रॉब्लेम होता. तेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्या मधला जो पण लवकर उठेल तो उठवायला येईल, मग आपण जाऊ. दोघांनीही सहमती दर्शवली.
रात्रीचं जेवण आटपून दोघेही आपापल्या कुडाच्या घरात शांत झोपले.. संध्याकाळी खाडीवरुन परत येत असताना त्यांचं बोलणं कुणीतरी ऐकत होतं कदाचित...

गजामामांच्या दारावर थाप पडली, " गज्या उठ " , " थप थप थप "
" ए गज्या उठ " , " थप थप थप थप थप "
" कोन हाय रं? " गजामामाची आईने विचारलं.
" तारा आक्कू, मी गणू "
" य्ये गज्जा , मोरक्या, आरं तो गनू आलाय बग "
गजामामा ताडकन उठले, " आयला, निंगूत तं निजलू " ( आता तर झोपलो होतो )
" काय रं, कोन हाय " गजामामा म्हणाले.
" आरं मी, गणू, पागाला जावाचा हाय नै "
" आलू आलू " म्हणत गजामामा पटापट पाग घेऊन ( मासे पकडायचे जाळे घेऊन) दार उघडत होते. , दारात खांद्यावर पाग घेऊन गणूमामा उभे.
तसे गजामामा बाहेर आले आणि बाहेर पहाट झाल्यासारखं वाटलं. दोघेही कांड्यावरून गावच्या जुन्या खाडीच्या दिशेने चालू लागले. गावापासून खूप लांब दूरवर आल्यावर गजामामा म्हणाले, " गणू , या वांझल्यांच्या खारीन कला चालवलास मना ? " ( अरे गणू, या खारफुटीच्या खाडीत कशाला घेऊन चालला आहेस मला? )

" इकरं कोन यय नाय, इकरं तो गिरा आसतं नै ? "
( इकडे कोणी येत नाही, इकडे गिरा नावाचा भुत असतो ना? )

आता गणू मामा फक्त चालत होते, एक शब्दही बोलत नव्हते, गजामामांना काहीतरी गडबड जाणवू लागली पण ते खूपच लांब आले होते. सहज म्हणून त्यांची नजर गणूमामाच्या पायाकडे गेली....
गजामामांचा विश्वास बसेना, आता काय करू? पळू तर कुठे?
त्यांना थरकाप भरला. डोकं काम करेनासं झालं. पाय लटपटू लागले. पण घाबरून
चालणार नव्हतं. चक्कर येऊन पडायच्या आत त्यांनी धीर धरला. स्वतःला सावरलं.
आयवच्या (आजीच्या) तोंडून ऐकलेला गिरा व त्याच्या गोष्टी गजामामांच्या डोळ्यात
फिरु लागल्या. गि-यापासून कसं वाचून पळ काढावा हे विचारसत्र त्यांच्या डोक्यात सुरु होतं आणि लांबच्या खाडीत ( गि-याच्या जागेत ) आपण आलो आहोत याचं त्यांना पुरेपूर भान होतं. आता पळता येणं शक्य होणार नाही.
ते शांतपणे त्याच्या मागून चालत राहिले.

गजा मामांनी गणू मामांचे पाय "उलटे" पाहिले होते. तेवढ्यात गजा मामा म्हणाले " मी घरा जाऊन यव काय? " आवाजात थरथर होती.
गि-याने आवाजाची थरकाप ओळखली, स्वतःच्या जागेत आल्याची खात्री होताच गि-याने स्वतः निर्माण केलेला "पहाटेचा" भास निष्फळ केला...
गजाला आपले खरे रुप समजले आहे हे गि-याने हेरले... तो स्वतःच्या मूळ रूपात आला.
८ फुट उंची, गुडघ्याच्या खालपर्यंत पोहोचलेले हात , केसांच्या घाणेरड्या गुठल्या, किडलेले दात, कानात मोठ्ठाल्या रिंगा, उघडा बंब देह, शरीराचा घाणेरडा कुजकट वास, डोळे बाहेर आलेले... " यर्रर्रर्र। , यर्रर्रर्र। " असा निघत असलेला त्याचा विचित्र आवाज....

तो डोळे वटारुन गजा मामाला वरुन खालून न्याहाळत होता. ( गिरा हे भूत खाडीजन्य प्रदेशात असते अशी जुनी आख्यायिका आहे, हा गिरा माणसाला फसवून त्याच्या जागेत नेतो व शरीराचे माप घेऊन त्याच आकाराचा खड्डा करुन त्या माणसाला त्या खड्यात पुरून मारून टाकतो, खड्याचे माप चुकल्यास तो पुन्हा नवीन खड्डा करतो व त्यात माणसाला पुरतो आणि सूर्यप्रकाश येताच मात्र त्याचं काही चालत नाही मग तो काही करु शकत नाही एवढंच गजामामांना माहित होतं)
" कसा मिललास, मासली व्हया? "काळ्या कुट्ट अंधारात तो बोलत होता... त्याच्या भल्या मोठ्या हातांनी गि-याने गजामामाचं माप घ्यायला सुरुवात केली, गजामामा थरथरत होते.
तो किंचाळला , " हुर्रर्, खाशा बोवा कुट्टा "
नीट उभा रहा असं म्हणाला असेल असं समजून गजामामा सरळ उभे राहीले, आत्तापर्यंत दहावेळा गजामामांची चड्डी ओली झाली होती.. त्याने माप घेऊन तो खड्डा खणायला गेला.
तो खड्डा खणत होता... पळू की काय असा विचार सारखा मनात येत होता.
गजामामाला आयवने सागितलेली गोष्ट आठवली, गि-यानं माप घेतलं की तो खड्डा खणेपर्यंत शरीराचं माप बदलावं....
गजामामानं हळुवारपणे आकार बदलला आणि गप्प राहीला. गि-याचं खणून झालं होतं तो
गजामामाला उचलून खड्ड्यात घालण्यासाठी आला, त्याने पुन्हा एकदा माप घेतलं तर मापात फरक दिसला , गि-याने नवीन माप घेतलं आणि तो पुन्हा खड्डा खणायला गेला, रात्रीचे दोन वगेरे वाजले असतील.. दुसरा खड्डा खणत असताना गजामामानं पुन्हा शरीराचा आकार बदलला.. रात्रीचे दोन वाजल्यापासून हा प्रकार चालू होता. कित्येकदा गि-याने गजामामाच्या शरीराचं माप घेऊन शंभर एक खड्डे खणले असतील, आता पहाट व्हायची चिन्ह दिसू लागली पण गिरा काही गजामामाला सोडेना.
गजामामाची आई पहाट होताच लेक कुठे गेला ते शोधायला निघाली, पहाटे गणू बरोबर गेलाय म्हणून ती गणूच्या घरी गेली तर गणूमामा पाग घेऊन खाडीत जायला निघाले होते. ताराक्कूने झाली हकिकत सांगितली... म्हणजे गणूमामांचं रुप घेऊन गिरा आला होता ही खबर कानोकान गावात पसरली, पंधरा मिनिटाच्या आत गावाच्या वेशीवर अख्खा गाव जमला, वेगवेगळ्या दिशेने सगळे गेले...
पांडुरंग आण्णांच्या बरोबर चार जण होते, असे दहा पंधरा ग्रुप खाडीवर गेले.
पांडुरंग आण्णा गावातले वयस्कर बाबा, ते वांझल्यांच्या दिशेने निघाले... २०- २० फुटांवर एक असे पांडुरंग आण्णांच्या ग्रुपमधील लोक धावत होते. सर्वात पुढे पाडुरंग आण्णा.

आणि पाडुरंग आण्णांना गिरा आणि विचित्र वाकड्या अवस्थेत उभा असलेला गजा दिसला.
त्यांनी क्षणार्धात मागच्या माणसाला खुण केली, मागच्यानं मागच्याला असं करत बातमी गावात व इतर लोकांपर्यंत पोहोचली, दहा मिनिटांत अख्खा गाव तिथपर्यंत आला, सूर्यप्रकाश आला नव्हता, आणि शंभर एक माणसं घोळक्यानं गि-याच्या दिशेने आरडाओरडा करत कूच केली, गि-यानं एवढे लोक पाहून लगेच खाडीत अद्दृश्य झाला. लोकांना पाहून गजामामा जागेवरच बेशुद्धावस्थेत गेले.
घरी आणल्यावर गजामामांना तीन दिवस फणफणून ताप होता... आता पहाटेचं पागायला कोणीच जात नाही. आणि गि-यांची जागा आजही प्रसिद्ध आहे.

आम्ही सारे अंगावर काटा घेऊन आपापल्या घरी आलो आणि आप्पांकडे उद्या अजून एक गोष्ट सांगायची अट घालून डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपी गेलो.
(कोकणातल्या भूतकथा क्रमशः)
(कोकणातल्या भूतकथा क्रमशः)