सासूमाँ
"माँ नको ग....पोट भरलंय माझं"
दोन्ही हाताला मेहंदी लावलेली निशा बोलली
"पिल्लू.. मार देईन हा तुला इतकं संपव....मग बस" तिच्या तोंडात घास भरवत सुजाता बोलल्या...ताटातील जेवण झाल्यावर त्यांनी निशाला आपल्या हातांनी ग्लास ने पाणी पाजलं
समोरच्या टेबलावर बसलेला सचिन आणि बाळासाहेब हे सर्व बघत होते...बाळासाहेबांच्या कडे बघत सचिन बोलला
"पप्पा...आजच्या काळात हे दृश्य बघितलंय का कधी...म्हणजे आपल्या घरात आता सासू सुनेचे सिरीयल चालू केले पाहिजेत...नाहीतर ह्या दोघींच्या प्रेमात आपल्या खायचे वांदे व्हायचे"
हे ऐकून पाण्याचा ग्लास तोंडाजवळ नेत असलेले बाळासाहेब थांबले आणि त्यांनी तो ग्लास खाली ठेऊन सचिनला टाळी दिली दोघेही हसत राहिले...सुजातांनी त्यांच्याकडे रागाने बघितलं आणि त्यांनी आपलं हसू आवरलं....त्यानी आपल्या पदराने निशाचे तोंड पुसले...तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या प्रेमाने म्हणाल्या
"जा पिल्या झोप जा...उद्या दिवाळी आहे ना उठायचं लवकर"
तशी निशा उठली आणि आपल्या बेडरूम मध्ये गेली...सचिन आणि बाळासाहेब सोफ्यावर बोलत बसले....
"पप्पा...आजच्या काळात हे दृश्य बघितलंय का कधी...म्हणजे आपल्या घरात आता सासू सुनेचे सिरीयल चालू केले पाहिजेत...नाहीतर ह्या दोघींच्या प्रेमात आपल्या खायचे वांदे व्हायचे"
हे ऐकून पाण्याचा ग्लास तोंडाजवळ नेत असलेले बाळासाहेब थांबले आणि त्यांनी तो ग्लास खाली ठेऊन सचिनला टाळी दिली दोघेही हसत राहिले...सुजातांनी त्यांच्याकडे रागाने बघितलं आणि त्यांनी आपलं हसू आवरलं....त्यानी आपल्या पदराने निशाचे तोंड पुसले...तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या प्रेमाने म्हणाल्या
"जा पिल्या झोप जा...उद्या दिवाळी आहे ना उठायचं लवकर"
तशी निशा उठली आणि आपल्या बेडरूम मध्ये गेली...सचिन आणि बाळासाहेब सोफ्यावर बोलत बसले....
6 महिन्यांपूर्वी सचिनचे लग्न झालं होतं...निशा तशी त्याच्याच कंपनीत अकौंटनट म्हणून काम करत होती...अगदी मनमिळाऊ आणि मेहनती स्वभावाची निशा त्या वर्षीची बेस्ट एम्प्लॉई होती....कमी वेळात तिने सगळ्यांची मनं जिंकली होती...अगदी सचिनचं सुद्धा....सचिन मनोमन तिला प्रेम करू लागला...आपलेच बॉस असलेले त्याचे बाबा म्हणजे बाळासाहेब ह्यांना आपली इच्छा बोलून दाखवली....बाळासाहेबांना सुद्धा निशाचा स्वभाव आवडायचा.......त्यांनी लगेच पसंती दर्शवली...एकदा ऑफिस मध्ये तिला बोलावून घेऊन बाळासाहेबांनी सचिन समोर ही इच्छा बोलून दाखवली....तिला धक्काच बसला...कारण ती तशी गरीब कुटुंबातली..लहानपणीच तिची आई गेली होती...पाठोपाठ वडील सुद्धा गेले...पण तिच्या काकांनी तिला सांभाळली होती....बाळासाहेबांना हे कळलं आणि त्यांनी निशाचा काकाला बोलावून सचिन बद्दल निशाला मागणी घातली....शहरातील प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेबांशी सोयरीक म्हंटल्यावर निशाचे काका पटकन तयार झाले....सगळं व्यवस्तीत चालू होतं....सचिन आणि निशाच्या भेटीगाठी...भावी आयुष्याबद्दल रंगवलेली स्वप्न....आता प्रश्न होता तो घरच्या होम मिनिस्टर म्हणजे सुजाता यांना तयार करायचा....बाळासाहेब आणि सचीन मोठ्या चिंतेत होते....कारण सुजातांनी सांगून टाकलं होतं "माझी सून मीच निवडणार" सुजाताला कसं समजाववे हा प्रश्न आता बापलेका पुढे होता....शेवटी एक दिवस गाडी त्यांच्या घरी आलीच...सचिन बाळासाहेब सोबत निशा...सचिनने निशाची ओळख करून दिली....आणि आपल्या मनातील गोष्ट सांगितली...
"निशा" हे नाव ऐकून सुजाता ह्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले....त्यांनी तिला आपल्या जवळ बोलावले ती तिच्याकडे एकटक पाहत होती....निशा थोडी बावरली...इकडं तिकडं च्या चर्चा झाल्यावर सुजातांनी निशाला तिची जन्मतारीख विचारली....तिने आपली जन्मतारीख सांगताच सुजातांनी निशाला मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले...निशा आणि सचिन गोंधळले...निशाने सुजाताला धीर दिला...सचिनच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थी भाव होते...त्याने हावभाव करून ह्या बाबत आपल्या बाबांना विचारले
"निशा" हे नाव ऐकून सुजाता ह्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले....त्यांनी तिला आपल्या जवळ बोलावले ती तिच्याकडे एकटक पाहत होती....निशा थोडी बावरली...इकडं तिकडं च्या चर्चा झाल्यावर सुजातांनी निशाला तिची जन्मतारीख विचारली....तिने आपली जन्मतारीख सांगताच सुजातांनी निशाला मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले...निशा आणि सचिन गोंधळले...निशाने सुजाताला धीर दिला...सचिनच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थी भाव होते...त्याने हावभाव करून ह्या बाबत आपल्या बाबांना विचारले
"निशा तुझी लहान बहीण होती...गोंडस गोजिरी...सुजाताचा खूप जीव तिच्यावर...ती सोबत असली की दोघी सुद्धा सगळं जग विसरून एकमेकांत हरवून जायच्या....पण एक दिवस अनपेक्षित पणे ती गेली....आपल्या घरामागे जी विहीर आहे ना...तिथे आत्महत्या केली तिने...कारण कुणालाच माहीत नाही...5 वर्षाची चिमुरडी ती...तिला काय माहीत दुनियादारी?? पण तिच्या आत्महत्येने माझी सुजाता मात्र पार खचून गेली आपल्या पालन पोषणात काही चूक राहिली नाही ना??हीच चिंता तिला असायची...कश्यात लक्ष नसायचं तिचं....खूप प्रयत्नांनी सावरलं तिला आजही ती झोपेत बडबडत असते...तिला अजून तिच्या पिल्लुची आठवण येते...आणि काय योगायोग बघ...तू पसंद केलेल्या मुलीचं नाव सुद्धा निशा आणि तिची जन्मतारीख आणि तुझ्या वारलेल्या लहान बहिणीची जन्मतारीख एकच आहे.....(निशाकडे बघत) plz मुली माझ्या बायकोच्या कृत्याचे वाईट नको वाटून घेऊ...तिने तुझ्यात आपली पिल्लू बघितली असेल"
हे ऐकून निशा च्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले तिने सुजाताचे अश्रू पुसले "मी लहान असताना माझी आई गेली...आईचं प्रेम काय असत ह्याची मला जरा सुद्धा कल्पना नाही...तुमच्या सारखी प्रेमळ माणसं मिळाली की मला आनंदच होईल...."
हे ऐकून दोघीही आनंदित झाल्या...सुजाताचा आनंद तर गगनात मावेना....सचिन आणि निशाचे लग्न झालं....पण आता निशा मात्र सचिनची न होता सुजातांची झाली होती..."माँ..माँ करत ती सुजताच्या आसपास असायची...नेहमी चिंताग्रस्त आणि काळजीत बुडालेली सुजाता निशाच्या येण्याने सगळं विसरून गेली होती...तिचे लाड करण्यात तिला दिवस पूर्ण पडत नव्हता....आपल्या बायकोला खुश बघून बाळासाहेब एका वेगळ्याच दुनियेत होते....निशारूपी मुलगी सारखी सून मिळाली हे ते आपले भाग्य समजत होते....निशा आणि सुजाताचे घरातले वर्तन बघितलं की त्यांना आपली मुलगी निशा आणि त्या जुन्या सुजाताची आठवण व्हायची...."दृष्ट लागण्या जोगे सारे" चालू होतं
दुसऱ्या दिवशी दिवाळी...निशा फराळाचे पदार्थ बनवून थकून झोपी गेली...इकडे बाळासाहेब आणि सचिन बिझनेस चर्चा करत बाहेर बसले...त्यांना एक आवाज आला
"बाळ्या हाराम्या...माझी प्रॉपर्टी लुटून बसलास व्हय..तुला सोडणार नाही बघ...नाही तुला रडवलं तर नावाचा सुनील नाही मी"
दारूची बाटली तोंडाला लावत बाळासाहेबांच्या दारात त्यांचा छोटा भाऊ सुनील उभा होता...आपल्या बाबांच्या बद्दल असे शब्द ऐकून सचिन चवताळला आणि शिव्या देत त्या दिशेने जाऊ लागला...बाळासाहेबांनी त्याच्या दंडाला धरलं आणि
"सचिन जाऊ दे त्याला...पिलाय तो...आपल्या कर्माची फळ भोगत आहेत ते"
"देसाई बिल्डर्स" शहरात नावाजलेली कम्पनी...त्या उद्योगमहर्षी सर्जेराव देसाईंची दोन मुलं मोठे बाळासाहेब आणि धाकटे सुनील....बाळासाहेब लहानपणापासून हुशार आणि मेहनती...तिकडे सुनील मात्र आपल्या मस्तीत मस्त....सर्जेरावांचा बिझनेस बाळासाहेबांनी बऱ्यापैकी सावरला होता...सुनील मात्र चैनीत गुंतलेला....बाळासाहेबांचं लग्न झालं....सुजाता घरी आली...तिने घराला घरपण दिलं...अचानक एका दिवशी सुनील एका बाईला घरात घेऊन आला...ममता तिचं नाव....ती आली ती गरोदर पोटानेच....सर्जेरावांचा धक्काच बसला....सुनील ह्या पातळी पर्यंत जाईल ह्याची त्यांना कल्पना सुद्धा नव्हती पण शेवटी सुजाताचे मध्यस्थी करून तिला घरात घेतली...कोण कुठली बंगाली बाई...नाव,गाव पत्ता काहीच माहीत नाही....सुनीलला एका डान्सबार मध्ये भेटली आणि त्याने तिला घरात घेतली.....काही दिवसात तिने आपले रंग दाखवायला सुरवात केली...तिचे ते मोठे डोळे त्यात भरलेलं काळंमिट्ट काजल...कपाळावर भलंमोठं कुंकू...आणि कुठल्यातरी अघोरी देवीची साधना...बाळासाहेब आणि सर्जेरावांना न पटण्यासारखी होती.....पण सुनीलकडे बघून त्यांनी आतापर्यंत शांतपणे राहण्याची भूमिका घेतली होती....पण ते दोघे आता अति करू लागले होते....रात्री अपरात्री दोघे दारू पिऊन यायचे...पार्ट्या करायचे...सर्जेरावांना आता हे अनावर झाल होतं...एक मुलगा आणि त्याची बायको घर टाकावं म्हणून रात्रंदिवस राबत आहेत आणि दुसरा मुलगा आणि त्याची बायको मात्र दारू पीत पार्ट्या करत फिरत आहेत....ही उधळपट्टी म्हणजे बाळासाहेबांच्या मेहनतीवर पाणी फेरण्यासारखी होती....त्यामुळे सर्जेरावांनी वाटणीचा निर्णय घेतला....वाटणी झाली शहरापासून थोड्या अंतरावर एका टेकडीवर जिथून सर्व शहर दिसत अश्या निसर्ग रम्य ठिकाणी सर्जेरावांनी दोन बंगले बांधले...एक बाळासाहेबांच्या साठी दुसरा सुनील साठी....आपल्या कंपनीत सुद्धा दोघांना समान वाटणी दिली...इकडे बाळासाहेब कष्ट करून आपला मिळालेला हिस्सा वाढवत होते तिकडे सुनील मात्र ममता ला घेऊन मौजमजा करत फिरत होते....सुनीलच्या कम्पनी डबघाईला आली पण बाळासाहेबांनी मात्र एकाच्या तीन कंपन्या उभ्या केल्या.....पण सुनील कर्जबाजारी झाला होता...त्याची कम्पनी बंद पडली सोबत चैन्या सुद्धा....आता त्याचा डोळा बाळासाहेबांच्या इस्टेटवर आला...."माझ्या बापाची कमाई आहे...मला ह्यात सुद्धा हिस्सा पाहिजे" अश्या बाता सुनील करू लागला....पण सर्जेरावांनी त्याला फटकारल....एक दिवस भांडण विकोपाला गेलं...अगदी दोघा भावंडात हाणामारी सुद्धा झाली.....ममता मात्र ह्या प्रकाराने जाम चिडली तिने आपल्या हातातील लिंबू सर्जेरावांच्या दिशेने फेकला.....तिची ती काळी नजर बाळासाहेबाकडे रागाने बघत होती....बंगाली भाषेत काही तरी मंत्र म्हणत होती....."बुढे तू मरेगा...मरेगा तू" अशी सरळ सरळ धमकी ममताने सर्जेरावांना दिली
दुसऱ्या दिवशी सुनीलच्या घरातुन कसला तरी धूर आणि ममताचे विचित्र आवाजातील ओरडणे ऐकू येऊ लागले...तिकडे सर्जेरावांची तब्बेत अचानक बिघडली आणि ह्रदयविकाराच्या एका झटक्याने ते गेले...पण सुनीलला कसलेच दुःख नव्हते त्याची नजर अजूनही प्रॉपर्टी वर होती....सर्जेरावांच्या मृत्यू नंतर काही दिवसात बाळासाहेबांच्या दारात वकील आले...सुनीलने संपत्तीवर दावा दाखवला होता...बाळासाहेब प्रचंड चिडले आणि त्यांनी आपली एक कम्पनी लगेच सुनीलच्या नावे केली....त्यानंतर परत ममता आणि सुनीलचा चैनीचा प्रवास चालू झाला...काही वर्ष्यात परत ते कंगाल झाले....पण बाळासाहेब मात्र शहरातील नंबर एकचे उद्योगपती होतेच.....आता परत सुनील कर्जबाजारी झाला...त्याची नजर आता हक्क नसलेल्या बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीवर गेली.....काळ्या नजरेची आणि काळ्या जादूची ममता होतीच त्यांच्या सोबत...अचानक बाळासाहेबांना व्यापारात नुकसान होऊ लागलं.....त्यांची प्रकृती खालावली...सगळं वाईट घडत होतं....त्यांच्या दारात लिंबू पडायचे कधी आमवश्या दिवशी त्यांचे उंबरे पुजले जायचे....तिकडे सुनीलची मात्र प्रगती होत होती....बाळासाहेबांनी हे ओळखलं आणि काही दैवी उपचार करून आपल्या घरावर आलेली लागलेली बाधा उलटवली...ते आता पूर्णपणे देवाच्या अधीन गेले होते....तिकडे सुजाताच्या शंकराच्या भक्ती पुढे तिच्या उपासतापासापुढे वाईट शक्ती हरल्या....कालानंतराने बाळासाहेब व्यवसायात परत उभे राहिले....ते परत प्रगती करू लागले
इकडे सुनीलवर मात्र वाईट दिवस आले....तो परत कर्जबाजारी झाला...काळ्या पायाची ती ममता आता काळ्या रोगाने म्हणजे कँसर ने पीडित होती...सुनील कायम दारूच्या नशेत असायचा....अचानक ममता घरात दिसेनाशी झाली...दोघांना एक मुलगी झाली ती सुद्धा एका पायाने अपंग जन्मली...."ममता अचानक कुठे गेली" हा प्रश्न अनेकांना पडला...पण बाळासाहेब "ती मला सोडून निघून गेलीआपल्या मूळ गावी" अस सांगून नेहमी सारवासारव करायचे...सुनीलवर आता हालाकीचे दिवस आले होते...बाळासाहेब घर खर्चासाठी काही पैसे देत होते "हिची बायको काळ्या पायाची...ह्यात माझ्या भावाचा दोष काय...ती गेली सोडून आता"असा विचार त्यांचा असायचा....
पण सुनीलच्या घरातील ममतेने घातलेला धिंगाणा तिने केलेले काळे प्रयोग अजून त्या घराला भयाण बनवून होते...त्या टेकडीवर दोन बंगले होते एक बाळासाहेबांचा दुसरा सुनीलचा...
बाळासाहेबांचा बांगला आसपास फुलांनी नटलेला...सर्वत्र हिरवळ असलेला...सतत देवाचे आरती चे सूर आणि घरातील प्रसन्न वातावरण सोबत आता नवीन सून निशाची सुरू झालेली किलबिल...तिचे लाड करणारी तिची सासू सुजाता....सगळंच कसं स्वर्ग सुंदर वातावरण होतं
तर दुसरीकडे...एखादी पुराणी हवेली टाइप वर्षानुवर्षे रंग सुद्धा न बदललेला...जागोजागी चिरा पडलेला...समोरचा बगीचा आता जंगल झाला होता...त्यात तो किर्रर्रर्र आवाज...भयाण वातावरण....असा तो सुनीलचा बंगला...तिथे दारू पिऊन एकटाच कुणाशी तरी बडबडणारा सुनील आणि सोबत त्याचा स्वभाव न पटणारी ममता आणि सुनीलची मुलगी स्वाती....अस हे सुनीलच्या घरचं वातावरण...अनेक वर्षांपासून त्या घराला पाहुण्याच्या पायाचा स्पर्श सुद्धा झाला नव्हता...स्वाती मात्र बाळासाहेबांच्या कृपेने एका कॉलेज मध्ये शिक्षण घेत आपल्या दारुड्या बापाला दोन वेळच जेवण करून घालत होती
अस सगळं चालू असताना....जवळपास 20 वर्षे बाळासाहेबापुढे हाथ पसरून पैसे मागणारा सुनील...आज अचानक पूर्वीचा सुनील कसा झाला...आणि त्याची ती धमकी...त्याचा अर्थ काय??...काही संकट तर आपल्या कुटुंबावर येणार नाही ना? असे अनेक प्रश्न बाळासाहेबांच्या डोक्यात थैमान घालत होते...................(क्रमशः)
© शशांक_सुर्वे©