कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -6
कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन
लेझक :- मंदार साखरकर
भाग :- ६
सूरेखा काय बोलते आहे.
चल आले शालिनीचे घर. आताच सांगते अचानक काही तरी करू नको काय धसका लागतो मला.
....
गिरीजा सूरेखाकडे बघत अदृश्य होत. शालिनीला संपून परत गाडीत येत बोलते चल ताई. संपली शालिनी जाऊ घरी.
...
सूरेखा रागात गिरीजाला बोलते हो जा ना मग मी कुठे अडवले आहे. तूला हे असे करायचे आहे तर माझी काय गरज तुला.
थांब आली मी काय अवस्था केली आहे ते बघून येते आणि बस इथेच हलायचे नाही अजिबात.
सूरेखा शालिनीला बघते तर अचंबित होते. तिच्या गळ्यावर ब्लेड मारून, तिच्या शरीराला सेलूटेपचे आवरण घातले होते. जने करून तिला गुदमरूनच मारायचे होते,. सूरेखा बोलते काय मुलगी आहे ही, काही भावनाच नाही आहे हिच्या मनात.
...
सूरेखा जरा वेळाने येऊन गाडी स्टार्ट करत गाडी बदलापूरच्या दिशेने नेत एका वळणावर बोलते. तुला काही वाटले नाही असे कोण मारते का कोणाला किती तडपडून मारले हिला तू श्वास पण घ्यायला पण दिला नाही. बोल आता, गप्प का बसलीस आहे.
...
गिरीजा एवढे तास गप्प बसली होती, तिचा तोंडाचा पट्टा चालू होता.
माझी काय चुकी मला पण तिने असेच माझ्या नाका, तोंडावर स्वतःच्या हाताने दाबून ठेवले होते मला. श्वास पण मला घेता येत नव्हते, म्हणून मी पण तिला तसेच मारले. मला बोलते तुला कसे काही वाटले नाही चल आता घरी.
...
सूरेखा बोलते अग पण आता पोलीस चौकशी चालू होईल.
...
गिरीजा बोलते होउदे कोणाला कळणार आहे.
...
आज माधव, जोसेफ, मोनिका ह्या तिघांना संपवणार.
...
सूरेखा बोलते ठीक आहे आणि गाडी गोवा ला नेत बोलते राघवला नाही का.
....
गिरीजा बोलते त्याला तू संपवणार.
...
सूरेखा बोलते तू वेडी झाली का मी का.
....
गिरीजा बोलते गाडी साईडला लाव आणि तुझ्या शक्तीचा प्रयोग कर ना मग कळेल तुला का मी असे बोलते.
....
सूरेखा बोलते ते नंतर बघुया पहिले ह्यांना संपव.
.....
संध्याकाळी ६.०० च्या सुमारास दोघेही गोवाला येत सूरेखा एक रूम बुक करते.
.....
गिरीजा बोलते च्यायला मजा आहे माझी पुणे, गोवा. एक ना ह्यांना मारल्या नंतर दोन दिवस गोवाला राहूया ना.
....
सूरेखा बोलते हो ना राहूया ना पैसै कोण देणार तू. बोल आता गप्प का तू. चल मी फ्रेश होऊन येते.
......
गिरीजा बोलते चल मी पण येते आणि हो एक विचारायचे होते तुला, ही मुग्धा कोण ग.
...
सूरेखा बोलते ए भूत कुठे येते. बस गप्प चूप इथे म्हणे मी पण येते. तू काय नाव घेतलस.
....
गिरीजा बोलते मुग्धा.
....
सूरेखा बोलते अग बाई ही पण आली आता. गिरीजकडे बघत बोलते तुझे काम कर. फुकटच्या चौकशी करू नको. कोण पहिले टार्गेट.
...
गिरीजा बोलते जोसेफ, त्याला तर मुंडी फिरून मारणार माझी मान फिरुऊ का विचारात होता.
नंतर मोनिका तिचे पहिले केस कापून तिचे पाय तोडणार, मग मारणार तिला.
माधवला तर डोक्यात खिळा मारून मारणार, माझ्या डोक्यात पाठून बांबू मारून बेशुद्ध केले होते.
...
सूरेखा बोलते वा चांगले आहे. राघवला.
...
गिरीजा बोलते मी सांगितले ना तू मारणार त्याला.
...
सूरेखा बोलते गप्प बस मी मारणार नाही त्याला तुझे तू बघ. मी फक्त तुला मदत करते आहे.
...
गिरीजा बोलते हो का राघवला मारल्या शिवाय मी जाऊ शकते का. त्याला मारायचे असते तर मी पहिलेच त्याला नाही संपवले असते का.
...
सूरेखा फ्रेश होऊन येत गिरीजाला बोलते चल स्टेप बाय स्टेप संपवा आणि मला फ्री कर.
...
गिरीजा सगळ्यांना मारून बोलते राहिला राघव आता सूरेखाकडे बघून बोलते.
....
दोघी हॉटेल रूममध्ये येत सूरेखा बोलते चल मी आराम करते जा तू गोवा बघून ये.
रात्रीचे ३.०० वाजले असतील सूरेखा झोपेतून जागी होत बोलते हे कसे शक्य आहे,
राघव रघुनातचा मुलगा आहे. म्हणून ती बोलते आहे मला त्याला तू संपव. ही कुठे गेली मेली अडचणीत टाकले मला.
...
गिरिजा ओरडत बोलते काय ग झोपेत दचकून का उठलीस तू. मी तर इथेच आहे कुठे गेली नाही. अग तू बिना मेकूपकची भूत दिसतेस आहे मीच घाबरली की.
....
सूरेखा बोलते गप्प बस तुला माहिते होते ना राघव कोणाचा मुलगा आहे. त्याचे वडील कोण आणि काय आहेत ते. मग मला का नाही सांगितले.
...
गिरीजा बोलते मी तुला सांगितले होते. तूच बोललीस नंतर बघू ना.
...
सूरेखा कपाळावर हात मारत बोलते. मार मला माझीच चुकी झाली.
...
गिरीजा उठून सूरेखाला कानाखाली मारत बोलते बस मारले.
...
सूरेखा गालावर हात ठेवत बोलते ऐ मारले का.
....
गिरीजा बोलते तूच तर बोललीस ना मार मला. मी मारले तुला बस.
.....
सुरेखा बोलते ऐ बाई कुठल्या कर्माची फळे की हिला बोलली मी मदत करते.
आता शांत बस तिथे एकदम शांत ना हालचाल ना आवाज. बाजूला पण भटकायचं नाही बोलून डोळे बंद करून ध्यानात जाते.
....
गिरीजा पायाचा आवाज न करता सूरेखा जवळ जात तसे तिला कोणी तरी पकडल्याचा भास होतो. तशी ती पाठी वळून बघते तर तिथे एक मुलगी ओठावर बोट ठेऊन तिला गप्प बसायचा इशारा करते. तशी गिरीजा गप्प आपल्या जागेवर बसते.
...
ती मुलगी सुरेखाच्या जवळ जात तिचा चेहरा निरखून बघत असते तेवड्यात तिच्या गालावर झोरात एक चमात पडते.
...
आजुण पाहीजे का बोल देते तुला सांगितले ना ऐका जागेवर बस.
...
तशी ती गाळ चोळत आपल्या जागेवर बसत बोलते मला का मारले मी मदत करते आहे तर मलाच नमसकार दिला.
...
सूरेखा तो आवाज ऐकून डोळे उघडत बोलते तू काय करते इथे. कुठली मदत करते आहे तू.
....
गिरीजा हाताने खुणावत असते.
....
सूरेखा बोलते बोल बाई.
...
गिरीजा एक दीर्घ श्वास घेत बोलते. गुडमरायला झाले होते ग. ही कोण आहे आता.
....
सूरेखा एक लागवून देऊ का हिला नाही ओळखत तू. मगाशी काय नाव घेतले होते.
पहिली तू बोल काय करते आहेस इथे.
....
गिरीजा बोलते आठवलं मुग्धा,
.....
सूरेखा बोलते बोल तू.
....
मुग्धा काही नाही कंटाळा आला म्हणून मी आली दोनदा.
मदत ही की तो कोण राघव. इथेच येतो आहे गोवात आता ही त्याला मारू शकते.
त्याच्या घरी जाऊ शकत नाही. ही काय आणि मी पण ते रघुनाथ मांत्रिकाने बंदीस्त केले असते ना. त्यांनी सगळ्यांना बंदीस्त केले आहे.
ही राघवला पण मारू शकत नव्हती कारण त्याच्या गळ्यात ताईत होता म्हणून. आता मारू शकते ही का तर तो मी काढला आहे कसे ते विचारू नका सीक्रेट आहे ते.
...
सूरेखा बोलते कोणाला बंदीस्त केले आहे.
ताईत कसा काढला तू जरा बोल.
...
मुग्धा हळू आवाजात बोलते आई. हिने ज्यांना मारले त्यांचे आत्मा आणि आता तो प्रयत्न करतो आहे त्यांचे शरीर मिळवायचा.
...
गिरीजा बोलते चल ताई त्याला खलास करूया.
...
सूरेखा बोलते काय आई ने मदत केली.
ऐ भूत नंतर मार त्या राघवला पहिले. ते सगळे शरीर नष्ट करावे लागतील.
तू जा परत आईला बोल मी नीट आहे आणि बोल गावच्या घरी येण्यास मी पण तिकडे निघते. आजून एक काम कर सगळ्या बॉडी ला आग लाव बोल.
....
मुग्धा बोलते समजले आईला आणि खुशीला.
....
सूरेखा बोलते जाते का पहिली तू म्हणे आणि आईला सांगायचे ताईला नाही समजले का. च्यायला दोघींचे बॉयफ्रेंड एकाच कॉलेजमध्ये.
.....
मला काही तरी कराचे लागेल, बोलून स्वातीला फोन लावत सगळे समजावून सांगत. ए भूत चल तयार हो निघायचे आहे.
...
गिरीजा काय बोलते आहे तू. पहिले तू मेकअप कर स्वतःहा भूत दिसते आहे. मी तर तयार आहे.
...
जरा वेळाने दोघीही गाडीत बसून कोकणात निघतात.
सूरेखा बोलते म्हणजे रघु, अनिता, शालिनी ऐ तुला आता काही बदल जाणवतो आहे का.
तेवढ्यात स्वातीचा फ़ोन येत बोलते आई, बाबा तयार झाले आहे तीची बहीण नाटक करत ते आहे.
सूरेखा बोलते इंजेकॅशन दे आजून काय आणि घाल गाडीत मी येते ११.०० वाजे पर्यंत तू येशील दुपारी ठीक
...
दुसऱ्या दिवशी सूरेखा आपल्या गावच्या घरी येत बोलते गिरिजा बाहेर ये चल.
...
गिरीजा बाहेर येत बोलते. आता किती मस्त वाटते आहे कोकणात आल्यावर.
..
सूरेखा घरात येत बोलते हो का. एका खोली कडे बोट दाखवत बोलते जा त्या रूममध्ये आणि शांत बसायचे बाहेर कुठे जायचे नाही समजले.
..
स्वाती तुझी आई,बाबा आणि रुपाली येतील दुपार पर्यंत आणि मेन तुझी बॉडी पण येत आहे. मी तयारी करते.
...
गिरीजा बोलते तू आहेस तरी कोण. तूच मला कशी बघू शकते बाकीचे का नाही. तुझ्या बाबतीत सांग मला सुरेखा. कॉलेजच काय करणार आभि उत्तर काय देणार तू. माझी बॉडी म्हणजे मी जिवंत आहे. मी तर मेली आहे ना.
....
सूरेखा बोलते नंतर सगळे सांगते मी कोण आहे. मी काय करते धीर धर जरा. पहिले हा घोंदल घातला आहे तो निपटूया. काही तरी रघुनाथची साजीस असेल.
सहजा सहजी राघव गळ्यातले टाईट कसे काढले आणि तो गोवालाच कसा आला.
...
दुपारी अँबूलन्स घरा समोर उभी राहत बॉडी आणत नर्स फुल सेटअप करत. सुरेखाला बोलतात मॅम ही घ्या हिची केस फाईल तुम्ही सांगितल्या प्रमाणे.
....
जरा वेळात आई येत बोलते. कशी आहेस बसा सगळे मी चहा बनवून आणते. ती कुठे आहे ग.
....
स्वाती बोलते ही घ्या लिस्ट मॅम तुम्ही सांगितल्या प्रमाणे. सगळे ठेवले जागेवर त्या मुग्धाच काय.
....
सूरेखा बोलते ते गीताला सांगितले आहे. मुग्धाच्या आईला पैसे दिले का तू आणि तिला समजून सांगितले ना.
....
आई बोलते हे घ्या सगळ्यांना चहा आणि पाहे.
.....
सूरेखा बोलते हे सगळे कधी भरले ग सामान आई आणि ताई कशी आहे.
तिला कुठली धाड बसली आहे. रात्री आता मस्त झोपते कंबरडे पकडत नाही.
सूरेखा आईला बोलते तिच्या आई, वडलांना काही कमी पडू देऊ नको. अग रुपाली कुठे आहे ग बोलावं तिला. सांग मी बोलवले आहे. आई तू कोणाशी बोलते आहेस ग.
...
मुग्धा बोलते मी आहे ग.
....
सूरेखा बोलते तू का आलीस जा पहिले. आई हिला का आणले बरोबर.
....
आई बोलते राहूदे हिची काळजी तू नको करू मी आहे.
...
रुपाली येत सुरेखाला बोलते मला बोलवले का.
...
सूरेखा बोलते हो. ह्यापद्धतीने तिच्यावर लक्ष द्यायचे आहे तुला. ही आहे तुला मदत करायला. स्वाती हिला समजून सांग कसे हँडल करायचे ते जा घेऊन हिला.
....
भूत दिसत नाही आहे. ती कुठे गेली सांगितले होते तिला.
...
गिरीजा बोलते मी पाठीच आहे तुझ्या. आई बाबांना बघून वाईट वाटते ग. खरच मी त्यांच्या कडे दुर्लक्ष करायला पाहिजे होते.
...
आई पाठून येत बोलते हीच काय ती गिरीजा. दिसते तशी नाही दिसत आहे ग. जरा थांब बोलून तिच्या कपाळावर अंगठा ठेवत एक मंत्र बोलते तसे तिच्या चेहर्यावर चे वर्ण जातात.
...
मुग्धा बोलते च्या मारी ही तर फटाकाची गर्लफ्रेंड निघाली.
.....
तेवढयात रूपाली आई बाबा हाक मारत बोलवले लवकर या इकडे बघा गिरीजा कडे तिच्या अंगावरचे खुणा नाहीसे झाले आहे.
...
गिरीजा बोलते आता मला समजले पाहिजे तुम्ही कोण आहेत. अग ऐ फटका फक्त मी बोलते समजले का.
....
मुग्धा बोलते बोल ना माझे काय जाते आणि मी तुझ्या कॉलेजची नाही आहे. त्या दिवशी तू जे सगळे बोलत होती तेंव्हा मी तिथेच होती. ताई तू त्याला पपी दिली का.
....
सूरेखा बोलते गिरीजा तू तर बोलत होतीस.
...
गिरीजा बोलते नाही ही खोटे बोलते आहे. मी आजून पर्यंत तसे काही केले नाही आहे. ऐ गप्प बस काही बोललीस तर. सूरेखा कडे बघत बोलते माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले आजुन.
....
इथे रुपाली आई-बाबाना बोलते. मला ही फँमेली विचित्र वाटते ग. बघ ना गिरीजाला एव्हडे दिवस काही फरक नव्हता आता बघ किती फरक आला तिच्यात आणि ती बघ कोणाशी बोलते आहे समोर फक्त आई आहे. तिची आजूबाजूला कोणी नाही आहे. आई बोलते गप्प बस.
....
सूरेखा बोलते ठीक आहे मी कोन. अरे परत सांगायचे मी कोण हो बरोबर माझी नीट ओळख करून देते.
माझे नाव सूरेखा विश्वास राऊत. मी डॉक्टर आहे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये. तुझी आणि ही उभी आहे ना खोडकर तिची ट्रीटमेंट मीच बघते आहे. मला तुमच्या सारखे आत्मे दिसतात.
आणि ही माझी आई वयवर्षे माहीत नाही, माझे पण माहीत नाही आणि माझ्या बहिणीचे पण.
कारण आम्ही पिशाच्च आहे. आजून काही माहिती हवी आहे का. आता बोलू नको मूळ रुपात येण्यास काय, तुझा भरवसा नाही बोलशील पण. मुग्धा कडे बघत बोलते तू गप्प बस एका जागेवर उभी रहा समजली. जीभ कोणाला दाखवते आहे.
आईने जास्तच झाडावर चढवले आहे.
....
मुग्धा जोरात आईग बोलते.
......
सूरेखा ,मुग्धाच्या जवळ जात बोलते काय झाले ग हात बघत बोलते.
....
मुग्धा लाडात येत बोलते म्हशीने इंजेकॅशन दिले.
..
गिरीजाची आई येत बोलते डॉक्टर मॅडम बोलायचे आहे तुमच्या बरोबर गिरीजा मध्ये चेंजस दिसतात आहेत.
.....
सूरेखा बोलते हो माहित आहे ती हळू हळू कोमा मधून बाहेर येत आहे. चार दिवसांनी पूर्ण शुद्धीत येईल ती.
....
गिरीजा बोलते चार दिवसांनी मी .
...
सूरेखा बोलते गप्प बस जरा मी आई बरोबर बोलते आहे ना. तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटलीना तुला मी एक रूम दाखवली होती ना जा पहिली.
आई तुम्ही पण जा थकलेल्या असाल आराम करा नंतर बोलू आपण.
चल ग आपल्या रूममध्ये आई चहा आणि नाष्टा दे ग.
मला झोप येत आहे असे बोलून सूरेखा नाष्टा करून झोपायला आपल्या रूममध्ये जाते.
क्रमश