अंधारकोठडी भाग 5-Marathi Katha-Horror
"परंतु सर अंधारकोठडी ती तर तिथे पोहोचणे तो मार्ग कोणालाच माहिती नाहीये वाटत न ? " गोडे गुरुजी उद्गारले " होय परंतु आमच्या वडिलांनी त्याचा मार्ग " प्राचार्य बोलत होते कि तोच त्यांच्या दरवाज्यावर कोणीतरी ठोठावले... "ठक ठक... " प्राचार्य आणि गोडे गुरुजींनी एकमेकाकडे पहिले...
"कोण आहे ? " प्रोफेसर गोडेनी विचारले... " सर मी आहे. शिंदे... " तेव्हा गोडे गुरुजींनी प्राचार्यकडे चकित होऊन पाहिले... हा कसा यावेळी इथे ? " या आतमध्ये या " गोडे म्हणाले तसा शिंदे दरवाजा उघडून आतमध्ये आला... " माफ करा सर मिटिंग चालू होती का ? मी नंतर येऊ का ? "
शिंदे म्हणाला " नाही नाही शिंदे बोला काय काम काढलत तुम्ही ? " गोडे म्हणाले... " सर आजकाल आपल्या कॉलेजमध्ये बघा ना किती विचित्र गोष्टी घडतायत दोन खून झाले. एक मुलगा गायब झाला आहे... मला तर वाटत " शिंदे बोलत होता तसे प्राचार्य म्हणाले " काय वाटत तुम्हाला ? "
"मला तर वाटत सर आपण काही दिवस कॉलेज बंद ठेवायला हव आहे. नाई म्हणजे कस आहे कि मुलांना रात्रीच्या वेळी किवा स्टाफला कुणालाही धोका नको व्हायला म्हणून मी म्हणत होतो.. " शिंदे बोलतच होता प्राचार्य आणि गोडे गुरुजी एकमेकांकडे व त्याच्याकडे पाहत होते.. " हे बघा शिंदे..
आपण सावधान आहोत. आणि आजच विद्यार्थांना आम्ही तशी सूचना देऊ हि कि त्यांच्यासाठी नवीन नियम लागू होत आहेत जे त्यांच्या सुरक्षे साठी असतील. कॉलेज बंद करून नाही जमणार आपल्याला...आणि तुम्हीही रात्रीच्या वेळी कुठे बाहेर फिरू नका... आपल्या खोलीमध्ये राहाल तर सुखरूप राहाल... "
प्राचार्य शिंदेला आवर्जून म्हणाले... " नाही सर मी फक्त सुचवत होतो. बाकी आपणच सर्वेसर्वा आहात. आपला निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची रेघच.. " " हम्म ठीक आहे या तुम्ही आम्ही हि खाली येतोय..." प्राचार्य म्हणाले... " ठीक आहे सर मी मुलांना कळवतो.. " असे बोलून शिंदे तिथून चालता झाला..
केबिनमधून बाहेर पडताच शिंदे स्वतःशी पुटपुटला... " तुम्ही किती हि लपवलत तरी देखील मी ते रहस्य जाणवून घेईनच...कुठे असेल ती अंधारकोठडी... ? " शिंदे तिथून चालता झाला.. क्लास भरत आला होता. विष्णू मोहन मेघा व पूजा चौघे क्लासमध्ये जाऊन बसले होते. वऱ्हांड्यात त्या कोपऱ्यात खांबाआड दडलेल्या
माणसाच्या हातावरचे ते गोंदण ती निशाणी विष्णूच्या डोक्यात अगदी घर करून गेली होती. एक विलक्षण विचारशक्ती होती विष्णूची त्याच मानणे असे होते कि एखाद्या गोष्टीच्या अर्थात रहस्याचा मागे आपण लागलो तर नशीब अगदी नवीन गोष्टी समोर आणून ठेवत ज्यांचा त्या रह्स्याशी अगदी जवळचा संबंध असतो..
" काय रे विष्णू कसला विचार करतोयस ? क्लास सुरु होतोय. " त्यावर विष्णू म्हणाला " मी अरे तिथे बाहेर.. " तेवढ्यात क्लासमध्ये शिंदे सर अवतरले दरवाज्यातून आतमध्ये शिरले. " क्लास..थोड्याच वेळात प्राचार्य इथे येतील काही सूचना आहेत ऐकायच्या आहेत. काही दंगामस्ती नाहीये करायची..समजल ना चला आज पुढचा चाप्टर बघू.. काढा नोट्स.. "
विष्णू आपल्याच विचारात गुंग होता तोच शिंदेने पाहिले व जवळ येऊन त्याने धाडकन विष्णूच्या डेस्कवरती डस्टर आपटले तसा विष्णू दचकला. " आजकाल मी पाहतोय क्लास सोडून अभ्यास सोडून तुला इतर गोष्टीवर खूप लक्ष द्याव वाटतय..? " शिंदे विष्णूजवळ येऊन खाली वाकून पाहत म्हणाला..
" सॉरी सर...तुम्ही म्हणालात ना प्राचार्य येणार आहेत तर तेच विचार होता बाकी काही नाहीये... हह " विष्णू किंचित हसला... " दात काढू नकोस नोट्स काढ.. " शिंदे म्हणाला आपल्या बँगमध्ये हात घालून विष्णूने नोट्सची वही बाहेर काढली. त्याच लक्ष तेव्हा दुसरीकडेच गुंतले होते आणि नकळत विष्णूने
आपल्या हाताने तीच नोट्सची वही बाहेर काढली आणि डेस्कवर ठेवली आणि उघडली देखील उघडले ते थेट शेवटचे पानच आणि त्याच्या समोरच प्रोफेसर शिंदे उभा बोर्ड पुसत होता विष्णूची नजर आपल्या नोट्सच्या वहीवरती पडतच नव्हती. आणि त्याने जी नोट्सची वही बाहेर काढली होती ती होती
प्रशांतच्या टिपून ठेवलेल्या आणि चिकटवलेल्या त्या कात्रणांची डायरी. विष्णूचे लक्ष पुजाकडे होते त्यामध्येच त्याने ती डायरी उघडली देखील आणि काढले ते थेट शेवटचे पान... तोच इकडून प्राचार्य आणि प्रोफेसर गोडे कोरीडोर मधून येत होते इकडे शिंदेचा देखील बोर्ड पुसून संपत आला होता. तोच कदाचित विष्णूचे नशीब थोर होते.
बाजूला बसलेल्या मोहनचे लक्ष त्या डायरीवर पडले... " oh my god हे काय विष्णू ? " मोहन च्या तोंडून उद्गार बाहेर पडले. कदाचित त्याने देखील त्या डायरीमधील ती गोष्ट नव्हती पाहिली. का कदाचित ती विष्णूकडून त्याला अपेक्षाच नव्हती कि तो ती एवढी रहस्यमयी गोष्ट इथे भर वर्गात बाहेर काढेल..
ते पण शिंदेच्यासमोर मोहनच्या आवाजाने विष्णू भानावर आला त्याने समोर पाहिलं " काय रे काय बडबडतोय ? " मोहनकडे पाहत तो म्हणाला... " अरे हे बघ न समोर तू काय बाहेर काढल आहे " विष्णूने तसेच आपल्या डेस्कवर पाहिलं तोच त्याला आश्चर्याचा धक्का बसला... " हि इथे कशी ? आणि केव्हा ? " तेव्हा विष्णूला आठवले त्याने सकाळीच घाईगडबडीत ती नोट्सची डायरी आपल्या
बँगमध्ये टाकली आणि तो विसरून गेला होता. पण मात्र आता त्याला डायरी सोबतच दिवसाच्या लक्ख प्रकाशामध्ये त्या डायरीच्या शेवटच पान उघडे दिसले आणि त्यावर जे चिन्ह जे सिंबल त्याला दिसले ते पाहून मात्र विष्णूला ताडकन आपल्या जागेवरून उठून बाहेर जावस वाटल... तेच चिन्ह तेच गोंदण त्याने एका माणसाच्या हातावर पाहिले होते सकाळी जो शिंदे प्रोफेसरशी बोलत होता.
क्षणार्धात घटना अश्या काही क्रमाने घडल्या कि जणू उन वारा पाउस एकाच वेळी येऊन धडकले आहेत. वेळेची गाठ पडली न जाने वाईट आणि चांगल्याची समोरासमोर अश्या गोष्टीशी गाठ पडली ज्याची त्या दोघांनाही गरज आहे. विष्णूने ज्या वेळी आपल्या डेस्कवर डायरीत बघितले त्याचवेळी शिंदे प्रोफेसरचा बोर्ड पुसून झाला
आणि तो माघारी वळला... आणि त्याच क्षणी प्रोफेसर गोडे व प्राचार्य एकावडेनी क्लासमध्ये प्रवेश केला. आणि विष्णूच्या डेस्कवर तशीच ती डायरी उघडी ती उघडीच राहिली...प्राचार्य क्लासमध्ये आले पाहून सर्व मुलेमुली जागीच उभा राहिली... " विद्यार्थ्यानो आज तुम्हा सर्वांना प्राचार्य काही अत्यंत महत्वाच्या सूचना द्यायला इथे आले आहेत. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका.. " प्रोफेसर गोडे पुढे येऊन म्हणाले...
" मुलानो...आपल्या कॉलेजमध्ये जरा काही प्रसंग घडले आहेत. त्यात घाबरण्यासारखे कारण नाहीये परंतू हि बाब अत्यंत लक्ष देऊन ऐकण्यासारखी आहे..." प्राचार्य एकावडे क्लासच्या मधोमध येऊन आपली काठी टेकवत उभे सर्वांकडे पाहत बोलू लागले. बाहेरच वातावरण अगदी गारठून जाण्यासारखं होत.
पावसाळी अन हिवाळी दिवस असल्या कारणाने बाहेर ढगांनी सूर्य संपूर्ण झाकून टाकलेला होता. अश्या वातावरणात अगदी उदासीनता पसरली होती कॉलेजमध्ये आणि त्यातच अचानक प्राचार्य स्वतः तिथे हि बातमी सर्वाना द्यायला आले होते... " आपल्या याच क्लास मधून प्रशांत गुरव नावाचा
मुलगा... दोन दिवसाखाली संध्याकाळी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये गेला होता आणि त्यानंतर तो हॉस्टेलवरती अथवा कॉलेजमध्ये परतला नाही...पोलीस त्याचा तपास लावत आहेत आणि आणखीन एक गोष्ट आपल्या कॉलेजचे ग्रंथपाल आणि बॉईज हॉस्टेलचे वार्डन पानसे हयात राहिले नाहीयेत " ते ऐकताच सर्व मुलांमध्ये कुजबुज सुरु झाली...
जो तो आपल्या बाजूला बसलेल्याशी तत्यावर चर्चा करू लागला... " हे कस झाल ? काय झाल ? परवा तर आम्ही त्यांना पाहिलं होत.." नाही नाही ते मुलांमध्ये पुटपुटने सुरु झाले... "शांSSSत व्हा... ! शांत ! हे पहा आम्ही तुम्हा सर्वांना सावधान करण्यासाठी इथे आलो आहोत. कुणीही कॉलेजच्या आवारात किंवा हॉस्टेलच्या बाहेर सहा वाजल्याच्या नंतर निघायचं नाही..."
" अंधार व्हायच्या आतमध्ये सर्वजणांनी आपापल्या खोल्या गाठायच्या... आणि आज पासून कॉलेजमध्ये पोलीस पहाऱ्याला येणार आहेत. प्रशांतचा शोध लागेल लवकरच. पण लक्षात ठेवा. कुणीही रात्रीच्या वेळी बाहेर पडायचं नाही..." बोलता बोलता प्राचार्याची नजर विष्णूकडे पडली किंचित दृष्टी त्यांनी त्याच्या डेस्कवरती देखील फिरवली होती कदाचित...
आपल्या सर्व सूचना गोष्टी संपेपर्यंत प्राचार्य आता विष्णूकडेच पाहत होते. आणि त्याच्या डायरीमध्ये...जणू काही वेगळच भेटल आहे त्यांना असे जसे कोणीतरी आहे जो त्यांच्या आयुष्यातल्या त्या संकटाच्या मागे आपल्या मित्रासाठी मागे लागला आहे. जो त्या स्थितीला समजून घेतोय त्या रहस्याशी स्वतःला जोडू पाहतोय...
पण प्राचार्यांनी आपला चेहरा निर्भाव ठेवला होता पण त्यांची नजर विष्णूवरची हटत नव्हती... त्याच वेळी विष्णूला समजले प्राचार्य आपल्या जवळच्या डायरीकडे पाहताय विष्णूने चपळाईने ती डायरी बंद केली... " म् मम म्हणजे त्यानेच... त्यानेच मारले असणार हो पूजा त्यानेच तोच... तोच
मनोऱ्यावर उभा तो राक्षस त्यानेच..." प्राचार्यांच संपताच मेघाने परत भीतीने बडबड करायला सुरुवात केली... " काय ? कोण ? राक्षस ? " प्राचार्य विचारत मेघाजवळ आले... काठीचा आधार घेत खाली वाकून तिला गोंजारत ते विचारू लागले... " काय पाहिलस तू बाळ ? कुठे पाहिलस ? " त्यावर मेघा आपल्या जागी उभी राहिली. थरथरत्या ओठांनी तिने सर्व सांगायला सुरुवात केली..
संपूर्ण क्लास ते ऐकत होता. " काल रात्री मला ते दिसले त्या.... त्या मनोऱ्यावर जेव्हा रात्री शेवटचा टोल पडला काहीतरी रांगत त्या छतावर वेडवाकड चालत फिरत होत माझ्या खिडकीमधून मी तिकडे पाहिलं तेव्हा मला त्याचे ते पिवळे डोळे ते आसुरी विचकलेले दददात दिसले... विजाच्या....
उजेडात म्म्म्ला . त्याचा तो भयंकर चेहरा... आईई... उंहू उंहू.. ." मेघा त्याचे वर्णन करता करता किंचाळली रात्रभर रडून तसेही तिचे डोळे सुजले होते आणि परत तिने त्याच वर्णन वर्तवून हंबरडा फोडला...तिच्या प्रत्येक दुसऱ्या वाक्यास ऐकून एकावडेच्या चेहऱ्यावरचा भाव बदलत जात होता. कारण आता मात्र त्यांच्या संशयाला पुष्टी भेटली होती...
स्वतःचा विचार आणि भेदरलेले भाव कसे बसे सांभाळत " शांत हो बाळा...! शांत हो ...बस खाली... " प्राचार्यांनी तिला शांत केले तसे मेघा खाली पूजाजवळ बसली.
प्राचार्यांनी एकवेळ मागे मुलांकडे वळून पाहिलं सर्वांच्या चेहऱ्यावर आता एक अनामिक भीती दिसून येत होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त एकच प्रश्न पडला होता आता कसे होणार ? मेघा म्हणतेय ते खरे आहे का ? आपण सर्वांनी इथे राहणे रात्री बाहेर पडणे सुरक्षित असेल का असे ना ना तर्हेचे प्रश्न आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटले होते..
परंतु त्यांच्या पैकी एक असा होता ज्याच्या समोर असलेल्या त्या डायरीतील चिन्हामुळे एखाद्या व्यक्तीस जश्या अंधाऱ्या काळोख्यात एखाद कवडसे जरी दिसले तरी उत्स्फुरन येते तसेच प्राचार्यांना विष्णूला पाहून एक आशेच कवडस दिसू लागल होत. त्यांनी याबद्दल काहीएक बतावणी केली नाही किवा विष्णूला एक हि शब्द उद्गारला नाही
पण दोघांच्याहि नजरेने एकमेकांशी वार्तालाभ केला होता. विष्णू चाणाक्ष होता चतुर होता तो समजून गेला. प्राचार्यांनी पाहून देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. प्राचार्य तिथून चालते झाले जाता जाता प्रोफेसर गोडेनी देखील विष्णूकडे पाहिले व तिथून बाहेर पडले...दिवसभरात विष्णूला केव्हा एकांत मिळेल अस वाटत होत कारण आता एक नवीन सुगावा हाती लागला होता. प्रशांतच्या डायरीमधील ते चिन्ह आणि
हातावर आगदी तसेच गोंदण असलेला तो संदिग्ध व्यक्ती तो इसम कोण होता याचा पत्ता लावणे फारच मुश्कील होते. सायंकाळच्या पाच वाजताच कॉलेज सुटले सर्व मुले आपापल्या क्लासमधून बाहेर पडली... बाहेर पडताच विष्णूने मोहनला अडवले... " मोह्न्या इकडे ये तुला काहीतरी सांगायचं आहे "
" काय रे ? आता काय नवीन ? " मोहन म्हणाला " आपण आज जे डायरीमध्ये चिन्ह पाहिलं ते राक्षसाच अगदी तसेच हुबेहूब वर्णन मेघानेही केले आणि त्याच चिन्हाच गोंदण असलेला व्यक्ती मी आज कोरीडोरमध्ये असताना पाहिला होता जो शिंदे गुरुजीशी काहीतरी बोलण्यात गुंग होता..."
" विष्णू अरे बाबा मला हे भलतच काहीतरी दिसत आहे बर का. आपण हे पोलिसांवर सोडल तर नाही का बर होणार कारण या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीयेत वाटत प्रशांत नाहीसा झाला आहे याच्या मागे कुणाचा हात आहे ते पोलीस शोधून काढतीलच तू माझ एक हॉस्टेलवर चल आपल्याला सक्त ताकीद दिली गेली आहे कुणीही बाहेर थांबायचं नाहीये.. " मोहन बोलतच चालला होता..
तोच विष्णूने त्याला थांबवले " झाल तुझ ? मी बोलू? " मोहन ने हात वर केले " हे बघ प्रशांत सारखे आजून इथे बाकीचे हि मुले आहेत त्यांच्या हि जीवाला धोका आहे आणि प्रशांत आपला मित्र होता त्याची काळजी करणे त्याचा शोध घेणे आपल थोडतरी बनते न आणि तू म्हणतोस ते अगदी सत्य आहे यामध्ये काहीतरी खूप मोठ गुपित दडलेलं आहे. हि काय साधीसुधी गोष्ट नाहीये... "
आणि या रहस्याचा भेद आपल्याला करायला पाहिजे " " ठीक आहे बाबा तू जस म्हणशील तस करूयात.." मोहन म्हणाला... " आपल्याला आज रात्री हॉस्टेलमध्ये नाहीये जायचं इथेच कुठेतरी दडून रहाव लागेल...रात्र होताच आपण लायब्ररीमध्ये जाउयात त्याची खिडकी उघडून... समजल ? " आणि अशी विष्णूने योजना आखली...
" कोण होता तो मुलगा ? त्याच्याकडे त्या डायरीमध्ये ते गोंदण कसे काय आले ? " विष्णूने दुपारी लायब्ररीमधून बाहेर पडलेल्या पोलिसांना बोलताना ऐकल होत कि आतमध्ये काही पुस्तके उघडी पडलेली आहेत त्यांना कोणी हात लावू नका... त्या रात्री इन्स्पेक्टर कदमने सुकडे हवालदार व त्याच्या सोबतच हनम्या हवालदार दोघांना पाठवले...
इकडे हॉस्टेलवरती त्या गार्डने पहारा दिला होता. बघता बघता संध्याकाळ उलटून गेली कॉलेजच्या बाथरूममध्येच विष्णू आणि मोहन दोघे दडून राहिली. संध्याकाळ झाली तशी पोलिस हवालदार आले ते संख्येने दोन होते त्यांच्या पैकी एक अगदीच लुकडा होता त्याच नाव होत सुकडे आणि दुसरा अगदी जाडा होता त्याच नाव हनम्या होत...
कॉलेजच्या आवाराबाहेरच त्यांनी आपली मोटारसायकल लावली व आतमध्येच तंबाखू चोळत शिरले तसे प्रोफेसर गोडेनी त्यांना त्याच्या बसायच्या जागा दाखवल्या तसे दोघांनी कॉलेजच्या मेन एन्ट्रीवरतीच आपले ठाण मांडले... बराच वेळ झाला संध्याकाळची आता रात्र झाली होती. " हनम्या कदम साहेबांन तुला काही बी सांगितल नाई ना इथल ? "
" कोण सायबांनी ? नाही का र ? अस काय झालय इथ ? " " अर लेका भुताटकी आहे कि इथ ! " " ह्या म्या नसतो घाबरत कोण भूताबिताला... चल तंबाखू चोळ गपचूप.. "
" मोहन हीच वेळ आहे बाहेर कोणी नाहीये बस त्या दोन ह्वालदाराना चकमा देऊन आपल्याला लायब्ररीमध्ये शिरायचं आहे... " विष्णू म्हणाला... विष्णूने आपल्या बँगमधून ती डायरी काढून घेतली व दोघेही बाथरूम मधून बाहेर निघाले... " चल सांभाळून.." क्लासजवळच्या बाथरूम मधून तसे दोघेहि बाहेर पडले...
अंधारात कॉलेजच्या आवारात कोणाला काही दिसणे शक्य नव्हते पण पहारावर बसलेल्या सुकड्या आणि हनम्याजवळ दिवे मात्र होते. जे ते दोघेही इकडून तिकडे घेऊन फिरस्त होते. आतमधून विष्णू व मोहन ग्रंथालयाच्या दिशेने अंधारातून आडोसा घेऊन निघाले अगदी दबक्या पावलांनी ते दोन्ही हवालदार कोरीडोरमधेयच चहू बाजूनी फिरत होते...
विष्णू व मोहन ग्रंथालयाच्या खिडकीजवळ येऊन उभे राहिले...त्यावेळी दोन्ही हवालदार कोरीडोरच्या दुसऱ्या कोपऱ्यात गेले तोच संधी साधून विष्णू आणि महेश दोघांनी खिडकीद्वारे आतमध्ये प्रवेश केला. तोच खिडकी आपटण्याचा किंचित खड्ड असा आवाज झाला.." ए कोण हाय रे तिकडे ? "
" सुकड्या कसला तर आवाज आला कोण तर हाय तिकड " हनम्या म्हणाला " आर मांजर असेल राहूदे इथ कोण येणारे मरायला ग्रंथालय आहे ते कोणाला पडलय एवढ्या रात्रीच वाचायचं चल आपल फेऱ्या मारू..." दोघे परत फिरस्तीला लागले खिडकीतून आतमध्ये महेश आणि विष्णू दोघेही तोंड दबून बसले होते. ते हवलदार गेले हे समजताच दोघेही जागेवरून उठले...
"चल कुठ आहेत ती पुस्तके आपण शोधू... तो तिथला कंदील घे " विष्णू म्हणाला...दोघेही आपल्या जागचे उठले व दबक्या पावलांनी लायब्ररीमध्ये शोध घ्यायला लागले आतमध्ये सगळीकडे अगदी घनघोर अंधार होता. स्मशानशांतता पसरली होती जरा जरी आवाज केला तर आवाज घुमत होता...
"काय जागा आहे रे हि भयंकर... ? उगचच आलोय तुझ्या मागे मी यार देवा वाचव रे या अंधारापासून.. " हातामध्ये कंदील घेऊन दोघेही विष्णू आणि मोहन प्रशांतच्या ठिकाणी बसला होता जिथे ती पोलिसांनी सांगितलेली पुस्तके उघडी पडली होती त्याचा शोध ते घेत होते. काही अंतर पुढे गेल्यावर दोघांच्याहि नाकात एक भयंकर सडका वास घुमला त्या वासाने दोघानाही उलटी यायला झाले... " अरे कसला घाणेरडा वास आहे हा ? "
विष्णूने आपले नाक दाबत कंदिलाच्या उजेडात आजूबाजूला पाहिले तसे त्याची नजर खाली असलेल्या चिकट द्रव पदार्थवर गेली हिरवट असा द्रवपदार्थ होता तो अगदी गुळगुळीत पाय पडला तर सटकून जाईल असा...त्याचाच घाणेरडा वास येत होता " हे मोह्न हे बघ काय आहे ? याचाच वास येतोय... "
मोहन आणि विष्णू दोघेहि तिथे वावरत असलेल्या संकटापासून पूर्णपणे अनभिज्ञ होते. इकडे तिकडे शोधाशोध करता काही बिनकामी पुस्तके चाळत शेवटी विष्णूला हवे ते भेटलेच एका टेबलावरती भल जाडजूड एक पुस्तक उघडे पडलेले त्याला दिसून आले विष्णू त्या सर्वामध्ये ती एकच गोष्ट शोधत होता ते सैतानी मुंडक असलेल चिन्ह...
" मोहन हे बघ सापडले... " लायब्ररीच्या अगदी कोपऱ्यातल्या शेल्वजवळ एका स्टडी टेबलवरती ते पुस्तक उघडे पडलेले होते. " finally आता सर्व कोडे सुटतील हा नेमका काय प्रकार आहे..." विष्णू म्हटला... दोघेही त्या पुस्तका भोवती बसले व तिथेच कंदील ठेवला.... " याचा अर्थ प्रशांतने आपल्या डायरीमध्ये हे चिन्ह याच पुस्तकातून उतरवले आहे...वाचून पाहू या... "
असे म्हणत विष्णूने ते पुस्तक बंद केले व त्याच्या मुखपृष्ठापासून सुरुवात केली त्यावरती लिहील होत. " कांतारचे साम्राज्य... " विष्णूने ते हळू आवाजात वाचले.... " विष्णू हे बघ तो न्यूजपेपर यातूनच प्रशांतने कात्रणे काढून घेतली वाटत यात कट केलेल्या पोकळ जागा दिसतायत..." मोहन म्हटला.
" आर हनम्या कोणी नाही गेल रे आतमध्ये च्या आयला तंबाखू चढली का काय तुला र ? " सुकडे हवालदार हनम्याला म्हणाला... " आर खुळ्या आत्ताच आपण त्या कोपऱ्यात होतो तवा मला दिसल कोण तर काळा कपडा अंगावर पांघरून आत गेल ते. भूत बित तर नसल...? "
" आर ए बाबा गप कि मी चेष्टा केली म्हणून का तू बी करतो होय र गप उभा राहा कि आतमध्ये जायचं नाही साहेबाचा आदेश आहे माहिती आहे न ? " विष्णू आणि मोहनच्या पाठोपाठ आणखीन कोणीतरी तिसरा इसम आतमध्ये शिरला होता... त्याला आतमध्ये शिरताना हनम्या हवालदारने पाहिले होते
पण त्याच्यावर सुकडे विश्वास ठेवायला तयार नव्हता... इकडे विष्णूने आतमध्ये त्या पुस्तकाच पहिलं पान उघडल " काय लिहील आहे यात ? " मोहन म्हणाला.... " याच्यामध्ये सर्व काही स्पष्टीकरण दिलेले नाहीये पण चित्रांसोबत इथ काही मजकूर आहेत आणि ते अगदी क्रमाने आहेत थांब वाचू देत... "
" तब्बल हजारो वर्षापूर्वी जुन्या भारतामध्ये एके जंगलात एक आदिवासी समाज राहायचा... एकेकाळी त्यांचाच एक शिकारी संघ शिकारीसाठी जंगलात निघाला होता. जंगलात भटकत भटकत ते बरेच दूर निघून आले होते. शिकार केल्यावर त्या लोकांनी आपल्या जवळच मांस बरेच दिवस सोबत वागवले. परत जाण्याचा मार्ग चुकल्या कारणाने ते लोक
मार्ग शोधत शोधत एका विचित्र ठिकाणी येऊन पोहोचले जिथे झुडुपातून पलीकडे त्यांना एक भले मोठे दगडी मंदीर सापडले...त्याचा काही भाग शिखराचा खांबाचा पायऱ्यांचा अर्धा दगडाने तर अर्धा सुवर्ण अर्थात सोन्याने बनलेला होता. परंतु त्याकाळी त्या लोकांना त्या पिवळ्या धातू बद्दल काहीएक कल्पना नव्हती. त्यांच्यासाठी ते मंदिर आश्रय देणारे ठरले...
आतमध्ये गेल्यावर त्यांना तिथे पाणीही सापडले पण त्या मंदिरात एक गाभारा होता त्यांच्यापैकी एकाने तो गाभारा उघडला आणि अचानक त्या गाभाऱ्यातून एक दानव बाहेर आला. एक भयंकर सैतानरुपी दानव त्याने बाहेर पडताच एक एक करून त्या शिकारी संघातील लोकांना मारायला सुरुवात
केली. हे पाहून त्या लोकांनी एक तर त्याच्याशी लढावे किंवा त्याच्याशी शरणागत व्हाव..
त्या लोकांनी त्या दानवाला आपल्या जवळील भोग चढवला. त्या नंतर तो सैतान नजाणे कितीतरी शेकडो वर्षासाठी निद्रेत बुडाला...त्या मंदिराच्या गाभाऱ्यात एक अलौकिक मूर्ती होती त्याचेच रक्षण तो दानव करत होता. त्या दैवतानेच त्यांना परतीचा मार्ग दाखवला.
त्या जमातीने त्या देवाला पुजायला सुरुवात केली..
असे करत करत शेकडो वर्षे उलटून गेली.. त्या दैवताच्या रक्षणास असलेला तो सैतान नंतर कधीच जागा झाला नाही. पण जर कोणी त्या मूर्तीस हलवण्याचा प्रयत्न करेल त्या त्यावेळी तो दानव कांतार जागा होईल व त्याच्या मागे श्राप बनून लागेल...व त्याला रोखणे असंभव होऊन जाईल...त्याच्या पिवळ्या धारदार नजरेपासून कोणी दडू शकत नाही. त्याच्या लाळेमध्ये लाव्हारस वाहतो...असा आहे तो कांतार... "
" oh my god..! हे ऐकून तर तोंडच पाणीच पळाले रे विष्णू...आणि हे वर्णन देखील तसेच आहे जसे मेघाने सांगितले होते. आणखीन काही नाहीये का ? " तोच विष्णूने त्याला थांबवले " थांब मला परत ते वाचू दे त्याची हिरवी लाळ .... अरे बापरे... " विष्णू काही क्षणभरासाठी आपल्या भूतकाळात गेला. जेव्हा ते दोघेही आतमध्ये आले होते विष्णूला सडका घाणेरडा वास येत होता त्याने कंदिलाच्या प्रकाशात पाहिले तेव्हा तिथे हिरवा द्रव पाझरला होता...

No comments:
Post a Comment