लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो (भाग १) -
लेखक - रोहन
कथेचा प्रकार - भयावह कामशास्त्र
नमस्कार मित्रांनो आणि लपून छपून वाचणाऱ्या मैत्रिणींनो. मराठी चावट शृंगारिक कल्पनाविश्वात आपले स्वागत आहे. खरं सांगायचं तर आपल्या या मराठी विश्वात इतकं भरभरून चावट साहित्य आहे कि इतर कोणत्याही भाषेतले साहित्य हे कमी पडेल. तसेच मराठी शृंगारिक साहित्य हे इतर शृंगारिक साहित्यापेक्षा नक्कीच वेगळे असते कारण मराठी भाषेमध्ये शृंगार कथा वाचताना वाचकांचे कपडे लागलीच ओले होतात. त्याचबरोबर जेव्हा ती कथा भयावह असेल तर कपडे ओले होण्यासोबत अंगावर काटे देखील येतात. म्हणूनच आपली मराठी भाषा हि खूप महान आहे.
…….धैर्याने कशीबशी ताकद एकवटून पाऊल उचलले आणि धावत धावत तो नाझमीन जवळ गेला. खाली बसून त्याने नाझमीनचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि एका लहान मुलासारखा रडू लागला. ढगांचा गडगडाट होऊन पुन्हा पाऊस बरसू लागला. धैर्या मोठमोठ्याने रडू लागला. नाझमीनला त्याने गमावलं होतं. धैर्या सगळं आठवत होता. फक्त काही क्षणांची साथ लाभलेल्या नाझमीनवर त्याचं इतकं प्रेम जडलं होतं. तसेच नाझमीन सुद्धा त्याच्यावर जीवापाड प्रेम करू लागली होती. पण एकाच क्षणात सगळं काही संपून गेलं होतं…….
कोल्हापुरात उमरज गावा जवळील एका शाळेत शिकवणारी नाझमीन ही अत्यंत जबाबदार आणि हुशार शिक्षिका होती. सकाळपासून धो धो पाऊस कोसळत होता. त्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळेतल्या मुलांना लवकर घरी सोडण्याचे आदेश दिले. बाकीचे शिक्षकही ताबडतोब निघून गेले. पण हातात घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत जागेची न हलणारी नाझमीन घरी जायला तयारच नव्हती. संध्याकाळचे ६ वाजले होते. पावसाचा जोर वाढला तसा शाळेचा शिपाई नाझमीन कडे आला आणि तिला घरी जाण्याची विनवणी करू लागला. तेव्हा नाझमीनने सगळं आटोपून निघायची तयारी सुरु केली. सगळं बंद करून दोघेही शाळेबाहेर पडले. तितक्यात नाझमीनच्या अम्मीचा फोन आला. तिला काळजी वाटत होती म्हणून तिने नाझमीनला फोन केला. अर्ध्या तासात घरी पोहोचते हे सांगून नाझमीनने फोन ठेवून दिला. तो शिपाई एसटी मधून त्याच्या घरी निघून गेला. नाझमीनने रेनकोट घातले आणि तिची स्कुटी सुरु केली. शाळेपासून जेमतेम १५ किलोमीटर वर तिचे खरपे बुद्रुक हे गाव होते. नाझमीन सावकाशपणे तिची स्कुटी चालवत होती. पावसामुळे लवकरच अंधार जाणवत होता. त्यामुळे रस्त्याला फक्त गाडीचीच लाईट होती. ७ किलोमीटर वर गेल्यावर अचानक नाझमीनच्या स्कुटी मधून कर्रर्रर्र कर्रर्रर्र असा आवाज होत तिची स्कुटी बंद पडली. तिने स्कुटी रस्त्याच्या बाजूला लावली आणि उतरून बघू लागली. तर स्कुटीचा टायर पंक्चर झाला होता.
नाझमीन धीट होती. अजिबात न घाबरता ती इकडे तिकडे कोणाची मदत मिळते आहे का ते पाहू लागली. पण संध्याकाळची वेळ असल्याने आणि जोराचा पाऊस पडत असल्याने कोणीच नव्हते. तिने तिच्या अम्मीला फोन करण्यासाठी फोन बाहेर काढला तर फोन मध्ये सिग्नल सुद्धा नव्हते. बहुतेक जोराचा पाऊस असल्याने पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असावी आणि त्यामुळे मधला पूल पाण्याखाली गेला असावा. म्हणूनच एक सुद्धा गाडी या बाजूला फिरकत नव्हती. नाहीतर आत्तापर्यंत एखादी एसटी किंवा टमटम तरी आली असती. एखादी मोटारबाईक सुद्धा दूर दूर पर्यंत दिसत नव्हती. काय करावे आता नाझमीनला सुचत नव्हते. अशा पावसामध्ये रस्त्याने घरी चालत जाईपर्यंत जवळ जवळ २ तास तरी लागतीलच. तसेच पाठीमागे ७ किलोमीटर परत शाळेच्या इथे चालत जाण्याचा प्रश्नच नाही. कारण त्यापेक्षा मग ८ किलोमीटर चालत घरी जाणे फायद्याचे ठरेल. नाझमीन धीट असली तरी ढगांचा गडगडाट... विजांचा कडकडाट आणि पावसाच्या जोरामुळे थोडी विचारात पडली होती. त्यानंतर तिला आठवलं कि लहानपणी तिच्या अम्मीने तिला एकदा जंगलातल्या कच्च्या रस्त्याने घरी नेलं होतं. जवळच एक लहानसं मंदिर आहे. त्या मंदिरालगत जंगलातून एक कच्चा रस्ता जातो आणि त्या रस्त्याने नाझमीनच्या खरपे बुद्रुक या गावात अवघ्या पाऊण तासात पोहोचता येते. पण या रस्त्यावरून जाताना एक स्मशानभूमी आहे आणि रात्रीचे त्या स्मशानभूमी मधून जाताना नक्कीच कोणालाही नाही आवडणार. लहानपणी नाझमीन अम्मीसोबत त्या स्मशानभूमीमधून जाताना रडत होती हे तिला आठवलं. पण आता तिने सगळी शक्ती एकवटली आणि सगळी भीती दूर सारून त्या जंगलवाटेने जाण्याचे ठरवले.
मारुतीच्या मंदिराशेजारी तिने तिची स्कुटी लावली आणि त्या स्कुटीला झावळ्यांनी व्यवस्थित झाकून ठेवले जेणेकरून कोणी त्या स्कुटीला पळवून नेणार नाही. मारुतीच्या पाया पडून नाझमीनने कच्चा रस्ता पकडला. संकटकाळी प्रत्येक देव हा शक्तीच देतो या विचारांची असलेल्या नाझमीनला मारुतीचे दर्शन घेऊन बरीच ऊर्जा प्राप्त झाली होती. तिच्या मनात आता भीती अजिबात उरली नव्हती. सोबत असलेली बॅटरी चालू करून ती एक एक पाऊल पुढे टाकत होती. काही पावले पुढे चालत गेल्यावर तिला स्मशानातील धुराचा आणि अत्तराचा वास येऊ लागला तेव्हा तिला जाणवलं कि स्मशान जवळ आलं आहे. त्यासोबत कुत्र्यांच्या विचित्र भुंकण्याचा आवाज देखील नाझमीनचे लक्ष विचलित करीत होता. तीन गावांनी मिळून बांधलेली असल्यामुळे हि स्मशानभूमी खूप मोठी होती. स्मशानाचा दरवाजा उघडताच कर्रर्रर्र असा आवाज झाला आणि त्याचबरोबर कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज अजूनच जोर धरू लागला. चित्रविचित्र आवाज नाझमीनच्या कानावर येऊ लागले. त्यामध्ये पाऊस सुरूच असल्याने तिला सारखे सारखे चेहऱ्यावर येणारे पावसाचे पाणी पुसावे लागत होते. स्मशानात थोडे आतमध्ये गेल्यावर नाझमीनला आपल्या पाठीमागून कोणीतरी चालत असल्याचा भास झाला. तिने चटकन मागे वाळवून पाहिले पण कोणीच नव्हते. कधी तिला वाटे तिच्या उजव्या बाजूने तर कधी डाव्या बाजूने तर कधी कोणीतरी समोरून चालत येत आहे असा भास होऊ लागला. पण नाझमीनने स्वतःची मूठ घट्ट आवळून धरली होती आणि जलदगतीने पाऊले टाकत होती. पुन्हा एकदा तिच्या पाठीमागून कोणीतरी पळत आल्याचा तिला भास झाला पण मागे वळून बघताच कोणीच दिसत नव्हते. नाझमीनने मनाशी ठरवले कि आता कोणताही आवाज झाला तरी मागे वळून बघायचेच नाही.
जळलेल्या प्रेतांचा उग्र वास नाझमीनच्या नाकामध्ये घर करत होता. त्याचसोबत अत्तराच्या सुगंधाने तिला मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटत होते. नाझमीनचा भूत आत्मा वगैरे गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता पण अशा वेळी कोणत्याही माणसाच्या मनामध्ये त्या सगळ्या कल्पना आल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे नाझमीनच्या मनात सुद्धा भूत... आत्मा वगैरे संकल्पना चलबिचल करीत होत्या. त्यामुळे ती घाबरू लागली होती. प्रत्येक पावलावर पाचोळ्याचा आवाज .... त्याचसोबत पावसाच्या बरसणाऱ्या सरींचा आवाज..... दुरून येणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज... रातकिड्यांचा आवाज.... त्यामुळे नाझमीनच्या मनात वेगवेगळे विचार येत होते आणि त्यातूनच तिला सगळे भास होत होते. तिच्या डोक्यामध्ये अनेक संकल्पना येऊ लागल्या. कधी तिला वाटे कि हाडांचा सापळा उठून तिच्या समोर येईल तर कधी पाठीमागून येऊन तिचा गळा आवळेल. भयभीत होऊन ती जलदगतीने पावले टाकत होती. इतक्यात तिला जाणवलं कि तिच्या पाठीमागे कोणीतरी उभे येऊन ठाकले आहे. तिने लगेच पाठीमागे वळून पाहिले तर एक कुत्र्याचं पिल्लू तिच्या समोर उभं होतं. अतिशय घाबरलेलं ते पिल्लू जणू काही तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होतं. नाझमीनने इकडे तिकडे पाहिलं आणि मग पुन्हा त्या पिल्लाकडे पाहिलं. तेवढ्यात तिच्या पाठीमागून कोणीतरी धावत गेल्यासारखं तिला वाटलं म्हणून तिने मागे वळून पाहिलं पण तिला कोणीच दिसलं नाही. तिने पुन्हा त्या पिल्लाकडे वळून पाहिलं आणि जोराची किंकाळी सोडली. ते कुत्र्याचं पिल्लू रक्ताने माखलेलं मरून पडलं होतं. नाझमीनने डोळे बंद करून घेतले आणि पुन्हा डोळे उघडून पाहते तर ते पिल्लू तिथे नव्हतं. तिने इकडे तिकडे पाहिलं तर कोणीच नव्हतं. तिला समजलं या सगळ्या तिच्या डोक्यातल्या कल्पना आहेत बाकी काहीच नाही.
नाझमिन पुढे चालतच राहिली. स्मशानातला रस्ता आता संपत आला होता आणि नाझमीनला समोरचा दरवाजा दिसत होता. ती खुश झाली होती पण तितक्यात तिच्या डाव्या बाजूने एका वाघाने तिच्यावर झडप घातली. पहिल्या क्षणाला तिला समजलेच नाही कि काय झाले. नाझमीनच्या हातामधली बॅटरी खाली पडली. वाघाच्या पंजाच्या नखांनी तिच्या कमरेवर ओरबाडले होते. नाझमीन उठून उभी राहिली तर समोर एक जंगली वाघ तिच्याकडे बघून डरकाळी फोडत होता. वाघाची नजर तिच्यावर होती. नाझमीनच्या कमरेमधून रक्त वाहत होते पण तिचं सगळं लक्ष त्या वाघावर होतं. तो जंगली वाघ नाझमीनच्या डोळ्यांमध्ये बघत होता. नाझमीन खूप घाबरली होती. तिला इतकं माहित होतं कि अशा वेळी वाघाच्या डोळ्यांमध्ये डोळे घालूनच पाहायचं असतं. अजिबात नजर इकडची तिकडे करायची नसते. तो वाघ पुढे झेप घेण्यासाठी थोडा मागे सरकला आणि त्याने झेप घेतली. नाझमीनने भीतीने डोळे बंद केले. त्याच वेळी ‘धैर्या’ ने वाघावर झेप घेऊन त्याला दुसऱ्या दिशेला जमिनीवर पाडले. नाझमीनने डोळे उघडले तेव्हा तिने पाहिलं कि एका माणसाने वाघापासून तिचा बचाव करण्यासाठी मध्येच उडी घेतली होती आणि वाघाला धरून दुसऱ्या दिशेला जमिनीवर पाडले होते. नाझमीनने लगेचच बॅटरी उचलली आणि चालू करून धैर्या आणि वाघ यांच्या दिशेने धरली. धैर्या आणि वाघ दोघेही एकमेकांसमोर हल्ल्याच्या आवेशाने उभे राहिले. नाझमीन धैर्याकडे पाहत होती. ६ फूट उंच आडदांड शरीर.... ..कणखर मनगटं...निधडी छाती...पिळदार मिशा.... अंगावर फक्त धोतर कसून बांधलेले.... दोन्ही दंडांवर तांब्याचे कडे.... तीक्ष्ण नजर वाघाच्या नजरेला धडक देत होती. धैर्याने एक पाय मागे मातीमध्ये रोवला जेणेकरून वाघावर हल्ला चढवता येईल. वाघाने पुन्हा एकदा डरकाळी फोडली. धैर्याने दोन्ही हातांची मूठ आवळली आणि त्या वाघाच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून मोठ्या जिद्दीने पाहू लागला. अचानक वाघाचं गुरगुरणे बंद झाले आणि वाघाची पावलं मागे मागे सरकत त्याने जंगलामध्ये धूम ठोकली. इतक्या चवताळलेल्या वाघाने अचानक पाठी होऊन हार कशी काय मानली असेल आणि लगेचच जंगलात पळून कसा काय गेला असेल या विचारात नाझमीन पडली. धैर्या पाठीमागे वळला आणि नाझमीन जवळ आला. धैर्याच्या धिप्पाड देहासमोर नाझमीन एक लहानगी बाहुली दिसत होती. स्वतःच्या मिशांना पीळ देत धैर्या नाझमीनला म्हणाला,"नमस्कार बाईसाहेब. हिकडच्या तुमि दिसत न्हाईत. मंग कुटणं आलायसा अन कूट जायाचं हाय". पावसाचा जोर कमी झाला होता. नाझमीनच्या कमरेवर झालेल्या जखमेची जाणीव आता तिला होऊ लागली. जखम किती झाली आहे तिला समजत नव्हतं. तिने तिच्या डाव्या हाताने जखम दाबून धरली होती. ती वर तोंड करून धैर्याच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून म्हणाली,"जी नमस्ते. मी उमरज गावाजवळच्या शाळेमध्ये शिक्षिका आहे. आज घरी जाताना रस्त्यामध्येच माझी गाडी बंद पडली. मग विचार केला कि या जंगलातल्या आडवाटेने लवकर पोहोचता येईल माझ्या गावाला खरपे बुद्रुकला. पण वाघाने अचानक हल्ला चढवल्यामुळे मी खूप घाबरली होती. तुम्ही तुमची जान जोखीम मध्ये टाकून मला वाचवलं. अल्लाह तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही."... हे ऐकल्यावर धैर्या जोरजोरात हसू लागला.... "आव बाईसाहेब. या जंगलातल्या जनावरांशी माझं जवळचं नातं हाय. अन देवाकडे म्या कदीबी काय मागत नसतो. मजा इश्वास हाय त्यो फकस्त माज्या या मनगटावर" धैर्याने नाझमीनसमोर त्याचा उजवा हात पुढे करून त्याच्या मनगटा मधली ताकद दाखवली.
नाझमीनच्या दोन्ही हातांना एकत्र केले तरी त्याहून मोठा होईल असा धैर्याचा एक हात होता. इतका दणकट आणि मजबूत हात नाझमीनने आतापर्यंत कधीच पाहिला नव्हता. ... "अल्लाह आआअह् ओह ... शायद वाघाच्या नखांनी माझ्या कमरेवर जास्तच जखम केली आहे." नाझमीनला आता ती जखम सहन होत नव्हती. तसेच त्यामधून रक्तस्त्राव सुद्धा होत होता. तिने ओढणी काढून तिच्या कमरेभोवती घट्ट त्या जखमेवर बांधून धरली. धैर्या त्या जखमेकडे बघून म्हणाला..."माझं झोपडं इथंच हाय जवळ. तुम्हास्नी म्या जखमेवर औशीद देतो लावाया. चला बिगी बिगी." धैर्या नाझमीनला रास्ता दाखवत त्याच्या झोपड्याजवळ घेऊन गेला. त्या स्मशानाच्या थोड्या अंतरावर धैर्याचं झोपडं होतं. दोघेही झोपडीत आले तसा पुन्हा जोराचा पाऊस सुरु झाला. धैर्याने लगेचच कंदील लावला आणि दोन तीन ठिकाणी दिवे लावले जेणेकरून झोपडीमध्ये उजेड होईल. मग त्याने नाझमीनला बसायला जागा दिली. दोघेही पावसाच्या पाण्याने पूर्णपणे भिजले होते. नाझमीनने तिचं रेनकोट काढून ठेवलं. धैर्याने नाझमीनला केस पुसायला एक कापड दिलं. केस पुसून झाल्यावर त्याने तिला त्याच्या झोपड्यात असलेल्या एका लाकडाच्या ओंडक्यावर झोपायला सांगितलं आणि कंदिलाच्या प्रकाशात तिची जखम व्यवस्थित पाहिली. वाघाच्या नखांचा फक्त हलकासा मारा होता पण नाझमीनच्या कमरेला गंभीर जखम देऊन गेला होता. तो म्हणाला रक्त बरंच जात आहे. लगेचच जखम शिवावी लागेल आणि त्यावर आयुर्वेदिक लेप लावावा लागेल. नाझमीनने धैर्याला विचारलं कि जखम शिवणार कशाने?
त्यावर धैर्या म्हणाला कि त्याच्याकडे असलेल्या कपडे शिवायच्या जाड सुई आणि धाग्याने तात्पुरती जखम शिवून देईल. मग उद्या सकाळी डॉक्टर कडे जाऊन व्यवस्थित उपचार घेता येतील. पण सध्या जखम शिवून त्यावर लेप लावणं गरजेचं आहे हे धैर्याने सांगितलं. कारण जखम मोठी असल्याने फक्त लेप लावून चालणार नाही. नाझमीनने होकारार्थी मान डोलावली. त्यावर धैर्या म्हणाला,"बाईसाहेब पर त्यासाठी तुम्हास्नी तुमची हि वरची कापडं काडाया लागतील. न्हायतर जखम यवस्थित शिवता येनार न्हाय." धैर्या नाझमीनच्या डोळ्यात बघून बोलत होता. "अहो पण तुमच्यासमोर कसं?", नाझमीन उत्तरली. त्यावर धैर्या म्हणाला,"बाईसाहेब या वक्ताला म्या तुमच्यासाठी एक वैद्य हाय हे लक्षात ठेवा. मनात काय बी इचार आणू नका". धैर्याचं मन सुद्धा एकदम साफ होतं. नाझमीन बद्दल त्याच्या मनात काहीच वाईट विचार नव्हते. नाझमीनने काहीही न बोलता पुन्हा होकारार्थी मान डोलावली. त्यानंतर धैर्या तिला म्हणाला," बाईसाहेब तुमि तयार व्हा. म्या पानी गरम करून आणतो अन सुई धागा अन लेप बी बनवून आणतुया लगीचच." धैर्या पाठीमागे वळाला आणि चुलीमध्ये लाकडं घालून अग्नी पेटवला. त्यावर पाण्याचे पातेले ठेवून मग पानांचा लेप बनवायला घेतला. वाटीभर पानांचा लेप बनवून झाल्यावर त्याने डब्यातून सुई धागा काढून ती सुई गरम पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतली जेणेकरून नाझमीनला कसलंच इन्फेक्शन होणार नाही. पाणी व्यवस्थित गरम होईपर्यंत त्याने धैर्याने चार्जिंग वाला रेडिओ सुरु केला त्यावर त्याने कॅसेट मधून एक गाणं लावलं... धैर्या म्हणाला,"बाईसाहेब माझं आवडतं गाणं म्या लावतुया. तुम्हास्नी बी आवडेल अन तुमचं दर्द थोडं कमी व्हईल"
'लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो
लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो
लग जा गले'
हे गाणं ऐकून नाझमीन म्हणाली,"तुम्हाला सांगू माझं सुद्धा हे खूपच फेव्हरेट गाणं आहे. मला हे गाणं खूप खूप आवडतं." त्यानंतर ते सगळं घेऊन धैर्या पाठीमागे वळाला. त्याने सगळं सामान बाजूला जमिनीवर ठेवले आणि नजर वर करून बघितली तर समोर नाझमीन खाली मान घालून उभी होती. तिने तिच्या अंगावरचे कपडे काढून बाजूला ठेवले होते आणि आता ती फक्त ब्रा आणि निकर वर होती. जखम कमरेवर असल्याने तिला पायजमा देखील काढणे भाग होते. ती तिच्या दोन्ही हातांनी तिचं शरीर झाकण्याचा प्रयत्न करीत होती. लाजेने ती लाल लाल झाली होती. दोन्ही हात स्वतःच्या खांद्यावर तिरकस ठेवून ती तिच्या वक्षस्थळांना झाकण्याचा प्रयत्न करीत होती. धैर्याने त्याची नजर वळवली आणि तो नाझमीनला म्हणाला,"बाईसाहेब तुमि या लाकडाच्या ओंडक्यावर जखमेची बाजू वर करून झोपा" नाझमीन उजव्या बाजूच्या कुशीवर झोपली. धैर्याने गरम पाण्यामध्ये फडकं बुडवून नाझमीनची जखम व्यवस्थित साफ केली. उभा राहून तो नाझमीनच्या जखमेवर उपचार करीत होता. जेव्हा गरम पाण्याचं फडकं नाझमीनच्या जखमेवर धैर्याने टेकवलं तसं नाझमीनला खूप जोरात दुखलं आणि तिने डोळे बंद करून धैर्याचा हात धरला. धैर्याने काहीही न बोलता नाझमीनच्या चेहऱ्याकडे पाहिले. अतिशय सुंदर अशा नाझमीनच्या चेहऱ्यावर असलेल्या भीतीने ती अजूनच सुंदर दिसत होती. नाकामध्ये बारीक खडा आणि डोळ्यांमध्ये काहीसं राहिलेलं काजळ याव्यतिरिक्त तिच्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं तरीही ती एक सुंदर अप्सरा दिसत होती. तिच्या हनुवटीवर असलेला तीळ तिच्या सौंदर्यामध्ये अजून एक मोती जोडत होता. नाझमीनची गोरी काया अप्सरेहूनही सुंदर होती. तिच्या दोन्ही वक्षस्थळांचा आकार हा कमाल होता. कमरेवरची त्वचा इतकी गुळगुळीत आणि कोमल होती कि त्यावरून हात फिरवला कि सर्र्र्कन घसरून जाईल. तिच्या काखेमध्ये असलेले बारीक केस तिच्या गोऱ्या सौंदर्यामध्ये अजून भर घालत होते. नाझमीनचा हात धैर्याने दुसऱ्या हाताने पकडून लाकडाच्या ओंडक्यावर ठेवला. तिचे डोळे बंदच होते. धैर्याचं लक्ष अजूनही नाझमीनच्या सुंदर चेहऱ्यावर होतं. एक सुंदर स्त्री फक्त ब्रा आणि निकर वर असून सुद्धा तिच्या चेहऱ्यावरील सौंदर्याकडे पाहणारे खूपच कमी असतात. त्यातला एक धैर्या होता. जखम साफ करताना डोळे बंद ठेवूनच नाझमीन धैर्याला विचारू लागली,"मला सांगा तो वाघ तुम्हाला घाबरून जंगलात कसा काय पळाला? मला समजलं नाही कि इतका मोठा वाघ एका माणसाला घाबरून कसा काय पळून जाईल" त्यावर धैर्या म्हणाला,"अहो बाईसाहेब मी या समशानाची रखवाली करतुया. त्यामुळे मला इथंच झोपडं बांधून राहायला लागतंय. इथलं जंगलातले कोल्हे या मुडद्यांची नासधूस करतात त्यामुळे या तिन्ही गावकऱ्यांनी मला इकडं रखवाली कराया ठेवलं हाय. लहानपनापासून मला प्राण्यांचं लय येड हाय. त्यामुळे मला त्यांची भीती अजबात न्हाय. म्हणून त्यो वाघ मला घाबरून जंगलात पळून गेला कारण त्यो वाघ काही भुकेलेला नव्हता. त्याच्याकडे बघून मला समजलं कि तो फक्त घाबरवायला इकडं आला हाय. म्हणून म्या त्याच्या डोळ्यात रोखून पाह्यलं अन तो धूम ठोकीत जंगलात निघून गेला." धैर्याचं हे उत्तर नाझमीनला इतकं पटलं नव्हतं पण तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. ती म्हणाली,"खरंच तुमच्यावर अल्लाह ची मर्जी आहे त्यामुळे त्यो वाघ तुम्हाला काहीही इजा न पोहोचवता जंगलात निघून गेला."
त्याने जखम व्यवस्थित साफ केली. त्यानंतर त्याने ती जखम सुई धाग्याने शिवायला घेतली. त्याने नाझमीनच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला,"बाईसाहेब थोडंसं दुखेल पर तुमि काय बी काळजी करू नका. म्या समदं यवस्थित करतुया." नाझमीनने डोळे उघडले आणि धैर्याकडे बघत म्हणाली,"तुम्ही खरंच माझ्यासाठी खूप करत आहात. पण मला खूप भीती वाटत आहे ओ." धैर्या म्हणाला,"आवं तुमि नका घाबरू. म्या करिन समदं." नाझमीन थोडीशी हसली आणि तिने होकारार्थी मान डोलावली. धैर्या नाझमीनची जखम सुई धाग्याने शिवू लागला. त्याने तिच्या जखमेमध्ये सुई टोवल्यावर नाझमीनच्या तोंडातून किंचाळी निघाली आणि तिने धैर्याच्या दंडाला घट्ट पकडून ठेवले. धैर्याने एक टाका घातला. नंतर न थांबता एका मागोमाग एक धैर्या टाके घालत गेला. त्याने व्यवस्थित टाके घालून ती जखम जशी जमेल तशी शिवून टाकली. ते झाल्यावर धैर्याने आयुर्वेदिक लेप घेऊन नाझमीनच्या जखमेवर लावू लागला. ज्या वेळी धैर्याचा हात नाझमीनच्या शरीरावर पडला त्या वेळी तिच्या शरीरावर शहारे येऊ लागले. धैर्याने एका हाताने नाझमीनची जखम जास्त दुखू नये म्हणून तिच्या कमरेच्या थोडं वर दाबून धरले होते तर दुसऱ्या हाताने तो जखमेवर लेप लावत होता. नाझमीन डोळे उघडून त्याच्याकडे बघत होती. धैर्याचे लक्ष नाझमीनच्या जखमेवर लेप लावण्यात होते. जसजसा धैर्या नाझमीनच्या जखमेवर लेप लावत होता तसतसा त्याच्या भिजलेल्या धोतरामध्ये तंबू होत होता. नाझमीन सारख्या सुंदर स्त्री बद्दल जरी त्याच्या मनात काही वाईट विचार नसले तरी निसर्गाचा नियम कोणीच मोडू शकत नाही. नाझमीनच्या यौवनाला जेव्हा धैर्याने स्पर्श केला तेव्हा त्याच्या धोतरामध्ये तंबू व्हायला सुरवात झाली होती. धैर्याचा ८ इंचाचा सोटा ताठुन ९० अंशामध्ये उभा राहिला होता. धोतर भिजलेले असल्याने धैर्याच्या सोट्याचा आकार स्पष्ट दिसत होता. पण त्याचे त्याकडे अजिबात लक्ष नव्हते.
पहिला भाग समाप्त. मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हि कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तसेच या कथेमधले शृंगारिक शब्द कसे आहेत याबद्दल सुद्धा तुमचे अभिप्राय जरूर मांडा. दुसरा भाग हा थरकाप उडवणारा असणार आहे हे नक्कीच. त्यामुळे दुसरा भाग मी लवकरच पोस्ट करेन. धन्यवाद