कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन
लेखक :- मंदार साखरकर
भाग १०
(मी गिरीजाची मैत्रीन.
ह्या कथेचे पुढचे भाग मी मंगळवार, शुक्रवार आणि रविवार प्रकाशित करणार आहे.)
परत कधी भेट होणार ते माहीत नाही.
..
गिरिजा बोलते लवकरच भेटू आपण दोघे बरोबर ना. जरा तुमच्या नातवाला भेटा म्हणजे राघव ला कुठे आहे माहिती असणार ना.
.
शास्त्री बोलतात हो माहिती आहे मला. तुझे नशीब चांगले आहे की ही. तुझ्या जन्मा पासून ही सुरेखा पाठूशी उभी आहे का ते बघायला लागेल असे बोलून गिरीजाच्या बाबान कडे बघतात.
तुला खूप माहिती आहे ग पुस्तकात काही आहे, काही नाही. तरी पण तुला कसे समजले ते बघितले पाहिजे बोलून गिरीजच्या डोळ्यात एक टक बघत असतात.
..
तशी सुरेखा दोघांच्यामध्ये उभी राहून बोलते आजोबा जा तुम्ही अगोदर.
..
तसे शास्त्री अदृश्य होतात.
..
सुरेखा एक दीर्घ श्वास घेत पाठी वळून गिरीजाच्या काना खाली मारत बोलते तुला कोणी मध्ये बोलायला सांगितले होते.
...
गिरिजा गालावर हात फिरवत रागात बोलते. ते माझ्या आई-बाबाना बोलतात मी त्यांची मुलगी नाही आहे. त्यांना कोणी हक्क दिला आहे, माझ्या घरात दखल द्यायला बोल ना. हो ते काय बोलून गेले तू माझ्या जन्मा पासून पाठीशी उभी आहे आणि बाबा तुमच्याकडे का बघितले त्यांनी मला उत्तर पाहिजे आहे .
..
सुरेखा तिच्याकडे बघून काही न बोलता फक्त तीच्या रूमकडे हात दाखवते आणि बोलते तुला वेळ आली की सांगते.
..
गिरिजा पण काही न बोलता तिच्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करत. रूममध्ये समान इकडे तिकडे टाकत बोलते.
हिने एक चुकी केली आणि भोगावे लागते आहे.
..
सुरेखा, खुशीला बोलते साचीला घेउन तुझ्या रूममध्ये जा. तुझ्या प्रश्नांची उत्तरे नंतर देते मी.
सगळे आपापल्या रूममध्ये जा आत्ता.
मुग्धा कुठे आहे आई. बोलून गिरिजाच्या रूममध्ये जात गिरीजला शांत करून बाहेर येते.
..
तशी मुग्धाची आई बोलते आता तर इथे होती ना उभी.
.
तशी सुरेखा आई जवळ जाऊन. मुग्धा उभी असते तिथे हात घालून तिला बाहेर खेचून बोलते.
तुला पण तिला दिली तशी देऊ का. तुला कोणी सांगितले होते का नसते उद्योग करायला. एकदा वाचली आहेस आता काय कायम स्वरूपी जायचे आहे का ते सांग मला.
..
मुग्धा बोलते मी मी जाऊदे ना चल ग आई आपल्या रूममध्ये. जात बोलते ही युक्ता कोण आता. आई राघवला भेटून ये जरा.
आणि सड्यावर टिचकी का वाजवली होती.
तिथे पिशाच्च असल्याचा भास झाला मला.
.
आई बोलते जा तू मुग्धा आणि शांत रहा. सुरेखा आत चल मला बोलायचे आहे मला.
..
दोघी आत जातात, तशी आई बोलते हिला सगळे कसे माहिती युक्ता बद्दल मला पण शोधावे लागेल आता पाणी कुठले आहे ग. जा आता साचीला घेऊन ये ईथे बोलून डोळे बंद करते…
..
जरा वेळाने सुरेखा साचीला घेऊन आत येत बोलते ही घे आणली हिला.
..
आई, साचीला बोलते चल माझ्या सोबत बोलून बाहेर येत रुपालीला हाक मारते.
.
रुपाली बाहेर येत बोलते बोलवले का मला बोलून साचीकडे बघते.
.
आई बोलते चल माझ्या सोबत बोलून दोघीणा राघवच्या खोलीत आणत बोलते.
राघव तुझ्या साथीदार आणल्या आहेत बघ जरा आणि आजोबा भेटून गेले ना.
काय रुपाली बरोबर ना. राघव हीच ना ती, तू बोललास होतास आजून एक राहिली आहे ना. बोलून रुपलीच्या काना खाली मारत बोलते. काय ग बहिणीच्या जीवावर उठलीस तू. ती किती तुझ्यावर प्रेम करते.
तिला सगळे समजले होते तू काय करायची. म्हणून तिने गेटच्या बाहेरचे रेकॉर्डिंग डिलिट केले होते.
साची तू आज पासून चार दिवस इथंच राहणार जेवण पाठवीन मी.
..
राघव बोलतो हो हीच होती. ती आता तिला सांगा हिला पण मारायला तरच ती सुटणार.
.
आई बोलते ते मी बघून घेते तू नको विचार करू त्याचे. तुला जीवित ठेवलं आहे ते नशीब समज.
.
साची तुला काही पाहिजे असेल तर आताच बोल.
.
साची बोलते मला तिला भेटायचे आहे आणि तिच्या बरोबर बोलायचे आहे.
..
आई बोलते बघू नंतर. तू चल वर का राहायचे आहे यांच्या बरोबर.
तो चंद्रकांत कुठे आहे ते बोला दोघी.
.
साची बोलते तो तुम्हाला आता २०२३ मध्ये भेटेल तो तिथे लावण्याच्या मुलीला शोधत आहे.
.
रुपाली बोलते मला तो गिरिजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली तेंव्हा भेटला होता.
बोलत होता की सुद्रा भेटली आहे म्हणून.
..
आई बोलते वर जाऊन कोणाला सांगायचे नाही समजले आणि खुशी पासून लांब राहायचे.
.
साची ह्याच्या पासून लांब रहा समजले नाही तर ज्या युगातून आली आहे तिथे परत नेते असे बोलून वर येते.
.
खुशी आईला बोलते तिला खाली का ठेवले आहे. ती आपल्यातील आहे ना मग आणि हिला का खाली नेले होतें, हिच्या गाला वर नमस्कार कुठला ग.
.
सुरेखा पण जवळ येत बोलते हो ग बरोबर कोणाची बहीण शेवटी मध्ये कुजबुज केली असणार ना दिली असेल आईने.
.
तेवढ्यात गिरिजा बाहेर येत बोलते हो माझी बहिण आहे ती. मुलगी तशी आई बरोबर ना आई बोलून रुपालीचा हात पकडून, खुशीला बोलते हिच्या पासून दूर रहायचे समजले नाही तर मी आहे आणि तू.
ती चिरकूट ला पण सांग आई, हिच्या पासून दूर रहा मी कधी पासून बघत आहे हिच्या वर तिची नजर आहे.
क्रमश