Ouija Board ( विजी बोर्ड )
मित्रांनो,Ouija board बद्दल सर्वसाधारण तुम्हाला माहिती असेलच.प्लांचेट करण्यासाठी या विजी बोर्ड चा उपयोग केला जातो.
या विजी बोर्ड गेम द्वारे आत्म्याना आवाहन करून बोलावले जाते व आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे विचारली जातात वगैरे वगैरे...
तेव्हा त्यानेच बोर्ड ला याच नाव क़ाय ठेऊ विचारल तेव्हा अचानक बोर्ड वर मूवमेंट सुरु झाली आणि त्या बोर्ड वर असलेले ऍरो अनुक्रमें एक एक शब्दांवर येऊन थांबत होते.
O U I J A यावर थांबुन संकेत देउ लागले पण याचा प्रॉपर अर्थ क़ाय अस त्या इसमाने विचारल असता पुन्हा एरो मूवमेंट झाली आणि तो G O O D L U C K या शब्दांवर येऊन स्टॉप झाला.
एका स्पिरिट गेम ला डेविल नेच दिलेले हे नाव गूडलक म्हणून आहे.(आता हा गेम खेळताना तुमच लक गुड असणार की bad हे डेविलच ठरवतो हा एक त्यामागे अर्थ आहे)
पण याची स्पेलिंग OUIJA (ओइजा) असल तरी त्याचा उच्चार विजी बोर्ड म्हणूनच केला जातो.
या विजी बोर्ड मुळे स्पेन मधे घड़लेली घटना जी खूप हृदयद्रावक होती..1992 मधे घड़लेली
स्टेफनिया लझारो नावाची ही मुलगी जिच्या कड़े हा विजी बोर्ड होता.ति सतत तो आपल्या बरोबर कॅरी करत असे.
ति 10 वर्षाची असताना तिचे वडील गेले होते म्हणून विजी बोर्ड थ्रू आपल्या वडिलांच्या आत्म्याला बोलवायच अस तीच्या मनात कित्येक दिवस चालल होत.
ही मुलगी शाळेत जाताना पण तो बोर्ड घेऊन जात असे असच एक दिवस लेक्चर ऑफ होत,बाकी सर्व मूले प्ले ग्राउण्ड़ वर गेली होती आणि ही एकटीच क्लास रूम मधे थांबुन विजी बोर्ड काढून वडिलांच्या स्पिरिट ला कॉन्टैक्ट करू लागली, हळू हळू त्यात मूवमेंट व्हायला लागली पण ऐन वेळेस तिथे क्लास टीचर आली आणि चाललेला तो प्रकार पाहून ति स्टेफनिया जवळ आली आणि तिने रागारागाने तो विजी बोर्ड फाडून फेकून दिला.
हा बोर्ड फाड़त असता त्या क्लासरूम मधे अचानक एक थंड वार्याची झुळूक येऊन एक black फिगर स्टेफनिया च्या मागे दिसू लागली.
स्टेफनिया तो फाटलेला बोर्ड उचलून घरी आली पण त्या दिवसा पासून तीच्या आयुष्यात अत्यंत वाईट गोष्टी घडायला सुरुवात झाली.
ति black फिगर सतत तीच्या भवती घुटमळत असे.
स्टेफनिया च्या वागणूकीत विचित्र बदल झाले होते,तीने स्वतःला च एक रूम मधे बंद करून घेतल होत.शाळेत ही जायच सोडून दिल,
फॅमिली शी खूप तुटक पणे वागु लागली तर कधी कधी panic होऊन आपल्याच फॅमिलीवर अटैक करू लागली होती तिने दोन वेळा आपल्याच सख्या भावाला जीवानीशी मारण्याचा प्रयत्न केला होता.
स्टेफनिया तीची रूम बंद करून कोणाशी तरी बोलत असे मधेच किंचाळत असे,जोरजोरात रडत असे.
एक दिवस नॉर्मल असताना ति फक्त तीच्या आईला एवढंच बोलली कि आई मला एक अदृश्य शक्ति खूप त्रास देते,मला ती लवकरच तीच्या सोबत दूसर्य्या जगात घेऊन जाणार म्हणून सांगते, जर त्या शक्तिचा बंदोबस्त केला तर पुढच्या जन्मात पण ति मला असाच त्रास देणार आहे अस बोलून माझ्या शरीरात प्रवेश करते व मला माझ्या कडून शारीरिक हानी करवून घेते अस बोलण चालू असता तीच्या शरीरात पुन्हा त्या शक्तिचा प्रवेश होतो आणि ति जवळपास हवेत आधानतरी उचलली जाऊन जमिनीवर आपटली जाते.आणि हे चालूच रहात....
हा प्रकार बघून फॅमिली प्रिस्ट व पेरानॉर्मल एक्सपर्ट्स,आणि पोलिसांना ही कॉल करून बोलावते.
प्रिस्ट,आणि एक्सपर्ट आपल्या परिने प्रयत्न करत असतात पण हे करत असता त्यातील एक लेडी एक्सपर्ट अचानक पजेस होते हा प्रकार पोलिसांना ही अचंबित करून जातो पण त्या अमानवीय शक्ति पुढे कोणाच काही चालत नाही शेवटी स्टेफनिया चा त्यातच मृत्यु होतो आणि शेवट तो आत्म्या तीला बोलल्या प्रमाणे आपल्या जगात घेऊन जातो.
या घटनेनन्तर बरेच दिवस त्या फॅमिली सोबत बऱ्याच विचित्र घटना घडत होत्या स्टेफनियाच्या मृत्यु नंतर ही त्या रूम मधून स्टेफनिया चा डिमन बरोबर बोलण्याचा आवाज येत असे रात्रि अपरात्री त्या रूम चे दरवाजे आपोआप उघडून जोरात बंद होत असत.शेवटी त्या फॅमिली ने ते घरच सोडून दिल.
आणि पोलिसांनी ही ती केस पैरानॉर्मल घटनेशी सम्भदीत केस असून त्या मुलीचा मृत्यु एका अमानवीय शक्ति द्वारे झाला असल्याची नोंद केली आणि ति केस क्लोज करण्यात आली..
हा गेम सुरु केला की अर्ध्यावर सोडायचा नसतो हा याचा अस्खलित नियम आहे आणि तो गेम अर्ध्यावर च तोडल्या मुळे हा भयंकर प्रकार घडला होता.
एक अशी माहिती मिळाली आहे की मेकर्स आता हा गेम ऑनलाईन सुद्धा खेळता यावा म्हणून त्यावर काम करत आहेत येत्या काही काळात हा गेम ऑनलाइन अवेलेबल होईल.
प्रथम वाडकर