तिढा भाग १
-सचिन पाटील
अवजड सामानाने भरलेली शेवटची जाडजूड लोखंडी पेटी त्या धूळभरल्या खोलीत आदळून मी मटकन खाली बसलो. सभोवताली बघत करवादून बोललो.
पळून पळून दमलोय मी ! आता नाही सोसवत.. थांबव हा सर्व प्रकार.. हे काय जगणं आहे ? गाव बदलून बदलून आयुष्य जाणार आहे का आपलं ? ... माझा स्वर कातर झाला होता.
ही नेहमीची अडचण आहे माझी ! जेव्हाही चिडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी माझा आवाज कातर होतो. त्यामुळे माझा संताप कुणाच्याच ध्यानीमनी येत नाही.
स्मिता, माझी पत्नी आताही माझ्याकडे विस्मयाने बघत होती.
म्हणजे ? तुला म्हणायचं काय ? तू ही या सर्व प्रकारांमागे मीच आहे असे समजतोस ?..ती फणकाऱ्याने म्हणाली.
मग काय समजू ? एकामागे एक सात खून पडलेत, लोक आपल्याला जबाबदार धरताहेत. नशीब अजून कुणी चेचून मारले नाही. आपण जिथे जातोय, तिथे मृत्यूचे थैमान सुरु होते.... बोलता बोलता माझा गळा दाटून आला होता.
ती पुढे सरकली. माझा चेहरा हातात घेऊन कळवळ्याने म्हणाली,
नको रे, किमान तू तरी माझा संशय घेऊ नकोस. मी काहीच केलेले नाही. तुझी शपथ, राणीची शपथ !
तिच्या तोंडी आपले नाव ऐकून राणी, माझी आठ वर्षाची मुलगी धावत आली.
स्मिता, मला बोलावलेस का ? तिने विचारले. हो, ती तिच्या आईला नावाने हाक मारते.
नाही रे बेटा, तू जा खेळ बघू बाहेर ! स्मिताने तिला पिटाळले.
एकदा तिच्याकडे, एकदा माझ्याकडे बघून ती अजाण पोर बाहेर निघून गेली.
आम्ही दोघे कितीतरी वेळ आसवे गाळत बसून होतो.

रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या मी भूतकाळ आठवत होतो.
स्मिता ही माझी दुसरी पत्नी. पहिली पत्नी किरकोळ आजाराचे निमित्त होऊन कायमची सोडून गेली, पदरात लहानग्या राणीला टाकून ! माझा सौंदर्यप्रसाधने विक्रीचा व्यवसाय आहे. त्यातून स्मिताशी ओळख आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. बिजवर असूनही माझ्याशी लग्न करण्याचा निश्चय तिने केला. निवृत्त वडील, गरीबडी आई तिच्या निर्धाराआड येणार नाही अशी अटकळ होती. पण तिच्या लहान भावाने मात्र कहर केला.
चार दांडगे मित्र घेऊन माझ्या दुकानात शिरला. तोडफोड करून मला बेदम चोपला. तक्रार केली तर स्मिताचा भाऊ पुन्हा येऊन मारणार या भीतीने मी पोलिसांत जाण्याचे टाळले. घरातल्या खोलीत कोंडलेली ती मात्र अखंड रडत होती.
तिची सुटका झाली तो दिवस.. ते निमित्तही भयंकर होते.
घरातल्या किचनमध्ये तिच्या भावाचा मृतदेह आढळला. त्याची मान कोणीतरी पिरगाळली होती. डोळे सताड उघडे होते. शरीरातला जीवनरस जणू कुणी शोषून घेतला होता.
गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याची पूर्ववैमनस्यातून कुणीतरी हत्या केली असावी असा कयास पोलिसांनी बांधला. मी मात्र खंतावलो होतो. शेवटी स्मिताचा भाऊ होता तो... त्याची अशी अखेर व्हायला नको होती.
ती मात्र निर्विकार होती. प्रयत्न करूनही तिच्या डोळ्यातून टिपूस बाहेर पडला नाही. मी काहीसा आश्चर्यचकित झालो. कदाचित त्याने माझ्यासोबत केलेला प्रकार तिला प्रचंड दुखावून गेला असावा.
देखाव्यासाठी का असेना, तिला सांभाळणे मला भाग होते.
पुढचे सोपस्कार आटोपल्यावर ती माझ्या संसारात प्रवेशली. लग्न नोंदणी पद्धतीने झाले. माझी काही हौस नव्हती आणि तिच्या घरच्या लोकांची हरकत किंवा मनस्थिती नव्हती.
स्मिता माझ्या घरात फार लवकर रुळली. तिच्या भावाच्या भयानक मृत्यूबाबत विचारावे असा विचार अधूनमधून माझ्या मनात घोळायचा. पण तिला दुखवायचे नाही असा विचार करून मी गप्प होतो.
ती मात्र रोजच्या कामात व्यस्त होती. राणी आणि ती, दोघांना एकमेकांवाचून क्षणभर राहवत नव्हते.
अशा सुखी संसाराला दृष्ट लागू नये....
पण तसे घडणार होते.

स्मिताने नोकरी करण्याचा हट्ट धरला. माझी मिळकत फार नसली तरी तिघांना पुरेशी होती. पण पुढच्या भविष्यासाठी भक्कम तरतूद हवी असा तिचा दृष्टिकोन होता. आणि तो काही चुकीचा नव्हता. राणी समजूतदार होती. मी दुकानातून तिला पुरेसा वेळ देऊ शकत होतो. एकूण फारसा वितंडवाद न होता मी तिला संमती दिली.
तिचं शिक्षण, योग्यता निश्चित उजवी होती. लवकरच तिला एका चांगल्या जागी नोकरी मिळाली. आर्थिक स्वावलंबनाचे समाधान तिच्या चेहऱ्यावर, देहबोलीमध्ये झळकू लागले. मूळचीच सुंदर असलेली स्मिता नव्या तेजाने तळपू लागली.
आणि तो दिवस उजाडला...
त्या सायंकाळी ती घरी आली... तापाने फणफणलेली ! डोळे लालबुंद झाले होते. कदाचित खूप वेळ रडली असावी. मी दुकानातून घरी येईपर्यंत झोपून होती.
मी आल्यावर राणीने तिच्या अवस्थेबद्दल सांगितले. मी स्मिताच्या कपाळावर हात ठेवून चौकशी केली. माझा स्पर्श होताच ती ओक्साबोक्शी रडू लागली.
मी राजीनामा देणार आहे नोकरीचा ! .. ती हुंदके देत म्हणाली.
का, ग ? काय घडल एव्हढं ? ... मी विचारले.
ती पुन्हा स्फुंदू लागली. मी तिला मनसोक्त रडू दिले.
रडण्याचा भर ओसरल्यावर ती बोलू लागली.
तिचा बॉस... तिच्या मते अत्यंत स्त्रीलंपट माणूस ! तो स्मिताला उद्देशून अचकटविचकट बोलत होता. आजवर तिने दुर्लक्ष केले. पण आज त्याने मर्यादा ओलांडली होती.
केबिनमध्ये तिच्या हाताला धरून त्याने ती मागणी केली होती.
स्मिता बिथरली होती. ती पुन्हा त्या ऑफिसमध्ये पाय ठेवणार नव्हती.
तू जाऊ नकोस ! उद्या रविवार आहे. सोमवारी मी जाऊन बघतो त्याला !.. मी गर्जायचा प्रयत्न केला. पण तोच प्रॉब्लेम...
माझा आवाज चिरकला !
मुर्दाड माणसा ! तुझ्या बायकोचा विनयभंग होतोय आणि तुला साधं चिडताही येत नाही.
त्या हीन भावनेने माझ्या डोळ्यात पाणी तरारले. तिने ते ओळखले असावे.
तुम्ही मनस्ताप करू नका ! मी स्वतः परवा जाते, त्याच्या तोंडावर राजीनामा भिरकावते आणि कायमची अद्दल घडवते बघा !..तिने माझी समजूत घातली.
ती बोलली ते करणार याविषयी मला शंका नव्हती. पण पुरुष असूनही मी पेटून उठू शकत नाही या भ्याकड वृत्तीची लाज वाटत होती.

सोमवारी ती ऑफिसमधून थेट माझ्या दुकानात विमनस्क होऊन परतली. कमालीची सैरभैर झाली होती. काही मिनिटे तिला तशीच बसू दिल्यावर मी चहा मागवला. काहीशी तरतरी आल्यावर तिला विचारलं,
दिलास राजीनामा ? आणि तुझी प्रकृती बरी आहे ना, काही बोलला का तो ?
तिचे डोळे शून्यात खिळले होते. खोल विहिरीतून यावेत तसे शब्द बाहेर पडत होते.
राजीनामा देण्याची वेळच आली नाही !
मी उडालोच !
पण का ?
तो काल रात्रीच मेलाय. घराजवळच्या पिंपळाला गळफास लावलेली त्याची बॉडी सापडलीय. आणि आणि.... ती गुंतत बोलत होती.
आणि काय स्मिता ? मी ओरडलो.
त्याचा कमरेखालचा भाग कोणीतरी ओढून नेलाय !
आता सुन्न होण्याची माझी पाळी होती. माझ्या नजरेसमोर अर्ध्या शरीरानिशी गळफासावर झुलणाऱ्या त्या माणसाचे कल्पनाचित्र उभे राहिले. पाठोपाठ स्मिताच्या भावाचा मान पिरगाळलेला पालथा पडलेला मृतदेह !
तिचे डोळे मात्र अजूनही कसला तरी वेध घेत होते. काय बाकी राहिले होते, काय घडणार होते.. काही पत्ता लागत नव्हता.
आपण कशात तरी अडकतोय असे राहून राहून वाटत होते !
तेव्हढ्यात...
स्मिता माझ्याकडे गर्रकन वळली...
तिचा चेहरा पाहून मी हादरलोच !...

(क्रमश:)
तिढा भाग २
-सचिन पाटील
-सचिन पाटील
तो चेहरा...
ती स्मिता नव्हतीच ! कुण्या अमानवीय शक्तीने तिच्यात संचार केला असावा. तिच्या मूळच्या सुबक चेहऱ्यावर हिंस्त्र छटा आली होती.
माझ्यासाठी घरदार त्यागणाऱ्या स्मिताचा तिथे लवलेशही नव्हता. माझा श्वास अडकला. हे दृश्य निराळंच होतं आणि त्याहून भीतीदायक होतं.
त्या हिंस्त्रपणात हळूहळू समाधानाचे सूक्ष्म तरंग उठत होते. मनासारखी शिकार झाल्यावर श्वापद तृप्त व्हावं तशी तृप्तीची भावना तिच्या चेहऱ्यावर पसरत होती. मघाशी तिचा विकृत झालेला चेहरा पाहून वाटली नव्हती तेव्हढी भीती मला आता वाटू लागली होती.
तिचे दोन्ही खांदे गच्च धरून हलवत मी ओरडलो.
स्मिता, काय होतंय तुला ? भानावर ये !
माझ्या हालचालीच्या प्रतिक्रियेस्वरूपात ती शक्तिपात झाल्यासारखी कोसळली. काही मिनिटे तशीच पडून राहिली.
शुद्धीवर आल्यानंतर मात्र स्मिता पूर्ववत झाली होती. जणू काही घडलंच नव्हतं.
मी मात्र त्या अतर्क्य घटनेवर डोकं झिजवत बसलो होतो. स्मिताने बोलून दाखवलेली इच्छा किमान या मार्गाने तरी पूर्ण व्हायला नको होती. एका मानवाला दुसऱ्या मानवाचे आयुष्य संपवण्याचा अधिकार कसा असू शकेल ?
जे काही घडलं त्यात तिचा संबंध नसेलही..तस झालं तर फारच चांगलं !
पण तिचा कणमात्रही संबंध असला तर ?
... तर मग अर्थ स्पष्ट होता.
स्मिताला स्वतःच्या पाशवी सामर्थ्याची जाणीव होणे सर्वानाच महागात पडणार होते. तिच्या डोक्यात अमानुष खुनाचा कैफ चढला तर उद्या मी आणि राणीही बळी ठरू !
मन चिंती ते वैरी न चिंती !

काही दिवस सुरळीत गेले. स्मिता पूर्ववत नोकरीस जाऊ लागली होती. माझ्याशी आणि राणीशी तिचे वर्तन नेहमीसारखेच होते. तिच्या मायेच्या वर्षावात राणी न्हाऊन निघाली होती.
अस्वस्थ होतो तो फक्त मी !
रात्री-बेरात्री उठून मी स्मिताचा चेहरा न्याहाळत होतो. बेडरूमच्या दाराला भरलेली कडी पुन्हापुन्हा तपासत होतो. जराही खुट्ट झालं की माझी झोप मोडत होती. काहीतरी भयंकर घडणार आहे का.. ही चाहूल घेण्याचा मी वारंवार प्रयत्न करीत होतो. माझ्या मर्यादा लक्षात घेऊनही शक्य तितकी काळजी घेऊन काही अभद्र, अमंगल घडू नये म्हणून माझी धडपड सुरु होती.
तो दिवस नेहमीसारखाच उगवला. मी दुकानात होतो. काचेच्या काउंटरवर दोन्ही हात टेकवून बघत उभा असलेला तो माणूस मला दिसला. क्षणभर मला आश्चर्य वाटले. त्या गावात सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानात जाणारे चारदोन पुरुष होते. हा नेहमीच्यांपैकी नव्हता. मी त्याच्याकडे वळलो.
नमस्कार, मी दिनकर देसाई ! तुम्ही मला ओळखले नसणारच ! तो किंचित हसून म्हणाला. त्या हसण्यात बेरकीपणा होता.
खरोखर ओळखले नाही देसाईसाहेब !... मी प्रांजळपणे बोललो.
मी स्मिताच्या ऑफिसमध्येच काम करतो. हेडक्लार्क म्हणून... त्याने ओळख दिली.
त्याला बसण्यासाठी स्टूल देऊन मी चहा आणण्यासाठी नोकराला पिटाळले.
थोडं महत्वाचे आणि खाजगी बोलायचं होतं ! त्याचा स्वर चोरटा झाला होता.
बोला ना ! मी म्हणालो.
तुम्हाला माहीतच असेल, काही दिवसापूर्वी आमच्या साहेबांचा खून झाला ते !... त्याने विचारले.
हो !..मी
मग तो खुनी अद्याप सापडला नाहीये हेदेखील ठाऊक असेल तुम्हाला !.. एकेक शब्द उलगडत होता.
मग, त्याचे काय ?... आता माझ्या पाठीचा कणा ताठ होऊ लागला होता. ही काय नवी भानगड ?
तुम्हाला माहित असणारी गोष्ट सांगतो. तुमच्या पत्नीचे आणि साहेबांचे भांडण झाले, त्यादिवशी तिने माझ्यासमोर केबिनमध्ये ठार करण्याची धमकी दिली होती त्यांना !.. तो आता शब्द चावून चावून बोलत होता.
ब्लडी ब्लॅकमेलर !! तोंडात येऊ पाहणारी शिवी मी गिळली.
मी सावध पवित्रा घेतला. हळूच म्हणालो.
मग देसाई साहेब, मी काय करू म्हणता ?
तो थंडपणे हसला. बोलला..
हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही एकतर मूर्ख आहात किंवा तसे सोंग घेतलय तुम्ही ! ती धमकीची बाब जर मी पोलिसांना सांगितली तर काय होऊ शकेल याची कल्पना नाही तुम्हाला !
मी तरीही शांत राहून म्हणालो.
हे बघा देसाईसाहेब, केबिनमध्ये ती काय बोलली याला तुमच्याशिवाय दुसरा पुरावा नाही. आणि तुमच्या साहेबांचा इतका निघृण खून करण्याची तिची ताकद नाही. पुराव्यांवर अवलंबुन असलेले पोलीस केवळ तुमच्या सांगण्यावरून तिच्यावर कारवाई करतील असं मला वाटत नाही. तरीही तुम्ही मला सावध केल्याबद्दल धन्यवाद !
त्याला अशा प्रतिसादाची अपेक्षा अजिबात नसावी. तो चरफडत उठला. गुरकावला,
तुम्हाला समजलेल नाही माझ्याबद्दल पुरतं ! साहेब माझे खास मित्र होते. आणि त्यांच्या खुन्याला मी सोडणार नाही. मला वाटलं, तुम्हाला व्यवहारज्ञान असेल. पण तुम्ही ओव्हरकॉन्फिडन्ट दिसताय. ठीक आहे. कळेल लवकरच ! पुढचे परिणाम भोगायला तयार राहा.
मी अचानक त्याचे दोन्ही हात धरले. कळवळून म्हणालो,
असे रागावू नका देसाईसाहेब.. एक मिनिट खाली तर बसाल ?
माझी विनवणी ऐकून त्याचा चेहरा फुलला. तो पुन्हा स्टुलावर बसला. मी बोलू लागलो,
साहेब, माझं हे प्रकरण वाढवण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणून तुम्हाला विनंती करतो. तुम्ही तिथे आलात आणि मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला हे मी विसरतो. ऑफिसमध्ये काय घडले ते तुम्ही विसरा. म्हणजे काय होईल माहित आहे का ? मला मानसिक त्रास होणार नाही आणि तुमचाही जीव वाचेल.
तू मला धमकी देतोस !.. देसाई आता त्याच्या मूळ रूपात आला होता. गुंड साला !
धमकी नाहीये हो देसाईसाहेब.. तुमचं काहीतरी बरंवाईट होईल असं मला मघापासून वाटतेय.. आणि तस खरंच घडू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.... माझ्या डोळ्यात पाणी तरळत होतं.
त्याने माझे दोन्ही हात झटकले. म्हणाला,
चक्रम दिसतोय तू.. मला धमकी ? बघच तू आता !...
तो झपाट्याने दुकानाबाहेर पडला. माझ्या हाका त्याच्या कानीही पडल्या नसाव्यात.

ही एक नवी पीडा माझ्यामागे लागली होती. महत्प्रयासाने मी दिनकर देसाईचे घर शोधून काढले. एक-दोन दिवसाआड त्याचा घराजवळ आडोशाला लपून तो जिवंत असल्याबाबत मी खात्री करून घेत होतो. एव्हढंच काय, रात्री बेरात्री त्याच्या घरी निनावी फोन करून त्याच्या शिव्या ऐकत होतो. तो जिवंत असल्याची खात्री झाल्यावरच मला सुखाची झोप येत होती. अधूनमधून स्मिताला " तुझ्या ऑफिसमध्ये काय चाललंय, सर्व बरे आहेत ना !' अशी उगाचच विचारणा करायचो..
ती विचित्रपणे माझ्याकडे बघायची आणि म्हणायची...
काय झालय काय तुम्हाला अलीकडे ?
मी समाधानाने हसायचो. ते किती काळ टिकणारे होते कुणास ठाऊक ?
दोनदा तर मी देसाईला रस्त्यात गाठले. स्वतःची काळजी घे म्हणून विनवले.
तो चक्क पळत पळत माझ्यापासून दूर गेला. त्याच्या तोंडातून शिव्यांची लाखोली बाहेर सांडत होती.

वर्तमानपत्रे.... ती सुखद काही देतच नाहीत.
उगाच चिंता मात्र वाढवतात.
ती तीन कॉलमची बातमी माझे काळीज चिरून गेली.
घराजवळच्या झाडीत दिनकर देसाईंचा मृतदेह सापडला होता.
अंगावर कोणत्याच झटापटीच्या खुणा नव्हत्या. घटनास्थळीही सर्वकाही ठीकठाक होते. एकच बाब वेगळी होती.
चुरुचुरु बोलणारी, धमक्या देणारी, देसाईचे अमोघ अस्त्र असलेली त्याची जीभ...
ती कुणीतरी मुळासकट उपटून काढली होती.
मी सुन्न झालो.
रात्री झोपताना स्मिताला देसाईच्या मृत्यूबाबत सांगितले. ती निर्विकारपणे एव्हढंच म्हणाली.
जो आलाय त्याला कधी ना कधी जायचेच आहे. सरळ किंवा वाकड्यात ! गुड नाईट !
माझी झोप मात्र उडाली होती...

क्रमश :