अनोळखी ओळख
सौरभ तसा लहान पणापासून खूप हुशार. दहावी नंतर बारावी सायन्स शहरातील एका कॉलेज मध्ये अॅडमिशन
घेतल्यावर , गावातून शहरात शिफ्ट झाला. काही दिवस नातेवाईकां कडे राहील्या नंतर त्यांना त्रास नको म्हणून,एका हॉस्टेल वर राहू लागला. बारावी चांगले मार्क मिळाले. पुढे इंजिनीयरिंगला अॅडमिशन घेतले. तिथे च त्याची मैत्री प्रियंका ओळख झाली. दोघेही एकाच फॅ्ल्कटी होते. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर दोघेही एका मोठ्या आतंरराष्ट्रीय कंपनीत कामाला लागले. आता दोघ्याच्यांही मैत्रीचे रूपांतर प्रेम झाले हाेते. एव्हाना दोन्ही कुटुंबीयांना सौरभ व प्रियंका ह्याच्या प्रेमाबद्दल कल्पना आली होती, त्याची सुध्दा दोघांनी आता लवकरात लवकर लग्न करावे असे वाटत होते. आपल्या कुटुंबीयांची संमती असल्याने ते लवकरच विवाह बंधनांत अडकले.
हॉस्टेल सोडून सौरभ व प्रियंका ह्यांनी एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. पण सौरभला गावातील सवयी प्रमाणे बैठी घरांची आवड होती. म्हणून त्यांनी शहरांच्या बाहेर एक मोकळी जागा घर बांधण्यासाठी विकत घेतली. आजुबाजूला तुरळक घर होती. जवळच चींचेच झाड होत. पण त्याला पान मात्र नव्हती. स्वभोवतालच वातावरण शांत पन होत.सौरभला मात्र जागा खुप आवडली होती.म्हणून प्रियकांही काही बोलली नाही.वर्ष भरात बांधकामात स्वतः जातीने लक्ष घालून दोघांनी काम पूर्ण करून घेतले. आणी राहण्यासाठीही आले. मध्यंतरी लग्न, घरांचे काम ह्यामुळे दोघ्याच्यांही ऑफिस ला खूप सुट्टी झाल्या होत्या. म्हणून वास्तुशांती नंतर करू असे त्याच मत होते. ही बाब मात्र त्यांच्या कुटुंबीयांना आवडली नव्हती. कही दिवसांनी सौरभ ऑफिसच्या नव्या प्रोजेक्टसाठी बंगलोरला गेला होता. प्रियंका कामावरून घरी आली घरांत एकटीच होती.
जेवण झाल्यावर भांडी धुवून ठेवली. हॉलमध्ये टिव्ही बघत होती. तेव्हा अचानक किचन मधून मोठा आवाज झाला. प्रियंका धावत आत गेली तर बघते तर काय तीने व्यवस्थित लावलेली सर्व भांडी अस्ताव्यस्त पडलेली होती. तिथे कोणाचा तरी आवर तीला जाणवत होता. ती तशीच घाबरलेल्या अवस्थेत आपल्या बेडरूम मध्ये गेली व आतून कडी लावून आपल्या बेडवर पडून राहिली.प्रियकांचा तसाच डोळा लागला . मध्यरात्री जेव्हा तीला जाग आली तेव्हा ती जोरात किंचाळली.

क्रमशः