बारीची पारी-Marathi Best story |
💃 बारीची पारी💃
प्रीतीसंगम ओलांडून दहा-पंधरा मैल आल्यानंतर झगा पाटलाच्या खिलारी बैलाच्या गाड्या वाटच पाहत होत्या.गणाजी सौंदणकर व बापू मोरंबीकरांनं आपला सारा फड गाड्यांमध्ये बसवला. बैलांच्या शेपट्या मुरगाळताच बैलं दुडूदुडू धावू लागले.लाल धुरडा उडवतच गाड्या गर्तेवाडी जवळ करु लागल्या.पारोनं गाडीतच ताणून दिली.गणाच्या विचारानं व जागरणानं डोळ्यावर झापडं आली. गणा सौंदणकर ऊसाचे फड पाहत होता.आपल्या फडात व पाटलांच्या ऊसाच्या फडात किती फरक असतो याचा तो मनाशीच गुंतावा वाढवत होता.याच फडाच्या जोरावर पाटील आपल्या सारख्यांचे फड नाचवतात याचा त्याला मनातल्या मनात खेद वाटत होता.त्याचं कुटुंब पार्वताबाई आपल्या पाच वर्षाचा प्रभू व दोन वर्षाचा किसनास घेऊन सोबत करीत होत्या. गणाच्या कलेवर फिदा होऊन उत्तर भारतातली रामलिला करणारी पार्वती नरसोबाच्या यात्रेतच गावली व सहा सात वर्षातच मराठमोळी झाली.गणाही तिच्यावर खुप जीव लावत होता.पोरं शांत पहुडली होती.ऊसाच्या फळाची व हळदीच्या शेताची वाट तुडवत गाड्या अकराला गर्तेवाडीत शिरल्या.तोच पोरांनी एकच गिल्ला करत गाडीतल्या पारोला जागं केलं.पारोनं आळोखे देत जांभई देत अंग झटकलं.कोलाहल वाढला.लोकंही आंबटपणानं तोंड न्याहाळत गाड्यांमागं येत चिल्ल्या-पिल्ल्यांना "मागं सरका की रं बांदरांनो!बाया कधी पाहिल्या नाहीत का!"म्हणत पोरांना हाकलत गाड्यातून उतरणाऱ्या बाया न्याहाळत होते.पारो उतरताच झगा पाटील वाड्यातून महाद्या कोतवालाला दटावत चावडीकडं साऱ्यांची सोय करण्याबाबत फर्मान सोडू लागले. चहापान होताच सारे सुस्तावले.दुपारी मटनाचा रस्सा वरपून जागरणानं बरीच जण झोपली पण गणा,बापू व पारो रात्रीच्या वगाची ओझरती तयारी करू लागले.गावातल्या पोरांचं ओसरीवरनं,खिडकीतनं ढुकणं सुरूच होतं.
पारोनं पार्वती झोपलीय पाहून हीच संधी आहे म्हणत गणाकडं सरकली.कारण नंतर संधी मिळणार नाही हे तिला ठाऊक होतं.पंधरा दिवसांपासून ती दररोज हिच वेळ साधत असे.या वेळेस ती गणा व तिचाच मामेभाऊ बापू हे तिघेच असत.बापूला सारं समजलं तरी बापू काहीच करणार नाही याची तिला खात्री होती.पण गणा?गणा समजून ही तिच्याकडं दुर्लक्ष करत होता.कारण त्याच्या फडाला अजुन तिची गरज होती.पारो रूपानं लावण्याची खाण,गोड गळ्याची, नृत्य समशेर होती.पण यावर कडी म्हणजे तिचं ढोलकी वाजवणं म्हणजे जित्या रसिकाला दर्दाचं मलम लावत तडफवणं होतं.तिच्या बोटात अशी काही जादू होती की फडावर ती नुसती ढोलकी घेऊन उभी राहिली तरी सारा गाव आरोळ्या ठोकत घायाळ होत असे.गणाच्या फडाची पारो जान होती.तिच्या जोरावरच त्याच्या फडाची महाराष्ट्रातील अव्वल फडात गणना होऊ लागली होती.पण पारोची जान गणा होता.कारण तिच्यात लाख गुण होते तरी त्या साऱ्या गुणाचा उतारा गणाकडंच आहे हे ती पुरतं ओळखून होती.गणानं ढोलकी घेतली की रसिकांना सौंदर्यामुळं वाटत नसेल पण तिला मात्र आपली ढोलकी फिकी वाटे.त्याच्यातला सोंगाड्या फडावर वावरतांना ती मंत्रमुग्ध होई.आणि यावर कडी म्हणजे त्याचा वग व वगातला अभिनय.आज घडीला महाराष्ट्रात त्याच्या तोडीचा वगसम्राट कोणी नव्हता.म्हणुन तिला तो हवा होता.आज याच्या नावाचा फड असला तरी हा हातात आला म्हणजे 'पारो संगित बारी'व्हायला वेळ लागणार नाही हे ती जाणून होती.म्हणुन गणा विवाहीत होता तरी तिला तो हवा होता.म्हणुन वग सादर होत असतांना भुमिकेदरम्यान वेळ मिळाला की रात्रीच्या अंधारात पडद्यामागं गणाशी सलगी करू लागे.पण गणा आपल्या कलेवर ,फडावर व पार्वतीवर जीव ओवाळणारा.तो तिला तडक झिडकारे व पार्वतीशी इमान राखी.पण तिच्यातली कलाकार त्याला हवी होती व तिच्या कलेचा तो आदरही करी म्हणून तिला समजावत तो फड चालवत होता.त्यानं बापूला सारा प्रकार समजावत पारोला आवरण्यास सांगितले.बापुनं पारोला खाजगीत 'गणा हाडाचा कलाकार तर आहेच पण कुटुंबावरही प्रेम करणारा आहे. तू त्याचा नाद सोड म्हणून खडसावलं'.पण पारोची ध्येय वेगळी होती.
आज ही ती गणाशी लगट करू लागताच गणा संतापला"पारी आदब राख नाही तर याद राख याउपर मी मुलाहिजा ठेवणार नाही"कलाकार म्हणुन मी तुझी इज्जत करतो पण तुझी वागणूक अशीच राहिली तर मला वेगळा विचार करावा लागेल"गणा लाल होत कडाडला व रागानं चावडीतून बाहेर पडला.संध्याकाळच्या हजेरीला ना गणा गेला ना पारो.बापूनं इतरांना हाताशी घेत वेळ मारली.पण इकडे चावडीवर पार्वती व गणात धुसफूस झाली.गणा पोटतिडकीनं सफाई देत होता पण पार्वतीचं समाधान होत नव्हतं.ती सारखी रडत होती.बिनसलेली पारो मात्र झगा पाटलाच्या पोराबरोबर पाच वाजेलाच गावात निघून गेली. ती रात्री फडावरच आली.
त्या दिवसापासून गणा व पारोचं फाटलंच. ते रात्री फडावर एकत्र काम करत पण आधीचा उठाव, रंग भरतच नव्हता.हे बापूनं ओळखलं.यानं फड चालणार कसा?झगा पाटलाचा पोरगा जि.प. ला उभा राहिला.तो प्रचार करत फिरत होता.पण एक दोन दिवसाआड तो पारोला भेटु लागला.पारोनं नाही गणा तर या प्रतापरावाची मदत घेऊ पण संगित बारी उभी करूच.राहिला प्रश्न कलाकाराचा ,तर महाराष्ट्र कलाकाराची खाण आहे,मिळवू आपण कलाकार.असा विचार करत ती प्रतापरावाला घोळवू लागली.प्रचार करता करताच पाखरू पारोच्या नादी नादावलं.पार्वती मात्र गणावर पुरती उखडलीच.गणाची पुरती गोची होऊ लागली.पारो फडात काम करतेय व त्या दिवसापासून आपल्याशी लगटही करत नाही म्हणुन गणा फड चालवतच होता.ती सहकार्य करत नसली तरी रात्री ढोलकी घेऊन फडावर उभी राहते हेही फार ;समजून तो तमाशा चालवतच होता.यानं पार्वतीला संशय वाढतच होता की आपला नवरा तिला फडातून हाकलत नाही म्हणजे हा तिच्या पूर्ण कह्यात गेला.ती तडफड करू लागली.
पारो जि. प. त प्रतापराव निवडून येताच चार दिवस गायब झाली.चार दिवसात प्रतापरावास खूश करत तिनं निवडल्याच्या खुशीत बारीसाठी लागेल ती मदत देण्याचं कबुल करवुन घेत माघारी फिरली.
त्या दिवशी गणाचा फड साताऱ्या जिल्ह्यात कृष्णा काठावरच्या गरतेवाडीच्या आसपासच्या वाडीवरच होता. प्रतापराव ही रात्री येणार होते.आज पारी एकदम खुशीत व साऱ्यांशी हसत खिदळत होती.हजेरीत ही तिनं ढोलकी अशी गुंगवली की वाडीसोबत गणा व बापू ही खुश झाले. बऱ्याच दिवसांनी पुर्वीची हरवलेली पारो त्यांना दिसली.त्यानंगणास हुरुप येऊन रात्री गणा व पारोची ढोलकीची जुगलबंदी रंगली.उत्तर रात्री वग रंगला.प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.रंगबाजीतले कलाकार मुक्कामाच्या ठिकाणी जाऊ लागले.फक्त वगात काम करणारे बापू, गणा, पारो व इतर कलाकार फडावर भुमिका करत वावरू लागले.पडद्या आड अंधारात कापडं बदलायला गेलेली पारो एन्ट्री आली तरी येत नाही म्हणून गणा पडद्याआडच्या तंबूत गेला.पारोनं आधीच कापडं फाडलेली, केस विस्कटवलेले.स्टेजवर बापू गांगरला .गणा व पारोची एन्ट्री असुनही येत का नाही?वेळ मारून नेऊ लागला पण किती वेळ?तो पुन्हा पुन्हा मागं पाहत खुणावू लागला.गणाला पारोनं अंधारातच धरत बोंब ठोकली.
स्टेज वर हुल्लड माजली.प्रतापरावांनी माणसांना इशारत केलीच होती ती तंबू मागंच होती.पारोची बोंब उठताच त्यांनी गणाला पकडला व ठोकतच स्टेजवर आणलं.मागोमाग रडतच फाटक्या कपड्यातच स्टेजवरून पळत पारो आली व गेली. प्रेक्षकांना वगातला अभिनय आहे का सत्यातला हे कळण्याआधीच गणा धुतला जाऊ लागला,तुडवला जाऊ लागला.एकच हुडदंग मातला.फडातली माणसं गोळा होतात व बापूला काय प्रकार झाला हे लक्षात येई पर्यत प्रतापरावाच्या माणसांनी गणाची यथेच्छ धुलाई करत जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाला बांधला.एकानं गळ्यात ढोलकी अडकवली.तोच काहींनी पार्वतीला धरून आणत मालक हे या गणाचं कुटुंब.हा फड चालवतांना कुटुंब असुनही असले धंदे करतो.फडातल्या लेकीवरच......याच्या कुटुंबालाही बांधा इथच ......
तोच बापूला तंबूची लोखंडी मेख सापडली.ती हातात घेत तो वाघासारखा जमावावर तुटुन पडला."याद राखा त्या माऊलीला हात लावला तर.. गणानं खरच गुन्हा केला असंल तर त्याला फाडून टाका हवं तर फडातल्या साऱ्या बाप्याना फाडा पण एकाही बाईस हात लावला तर असाही मेलोच हाय पण मरण्याआधी मुडदंच पाडीन".
बापुचा अवतार पाहून व गणाची स्थिती पाहून माणसं नमली.तरी त्यातला एकजण म्हणाला"अय शहाणा,यानं ज्यिच्या इज्जतीवर हात घातला ती ही तुमचीच मग असले धंदे करतो का हा?"
"ती माझीच आतेबहिण हाय .हवं तर सकाळी याला पोलिसात द्या पण बायाच्या इज्जतीला जपा.पाया पडतो हवं तर .जमाव नरमाईला आलेला पाहून बापू रडू लागला.वाडीतले कारभारी मध्ये पडले त्यांनी पारीला व फडातल्या इतर लोकांना सुरक्षित ठिकाणी नेलं.बापू मात्र गणाला बांधलं होतं तिथंच थांबला.सकाळ होताच सारा गाव चावडीवर गोळा झाला.गणाला ढोलकी गळ्यात अडकवल्या,अंगावरच्या लक्तरासहीत हात बांधल्या अवस्थेत आणण्यात आलं.चावडीवर पार्वती - प्रभू व किसनाला घेऊन उभी होती.पारी मगरीचे अश्रू ढाळत कोपऱ्यात उभी होती.प्रभूनं वडिलांना पाहताच जोरात "बाबा,बाबा!"म्हणत रडायला सुरुवात केली.तर किसना रांगतच गणाच्या पायाला बिलगत उभा राहत भेदरल्या नजरेनं रडू लागला.वाडीचा पाटील हे पाहून पाझरला."गणा आरं या सोन्या सारख्या पाखराचा तरी निदान विचार केला असता रं !"
गणानं महा मुश्कीलीनं मान वर करत खरखरत्या गळ्यानं "मालक एवढ्या गर्दीत कुणाच्या इज्जतीवर हात टाकायला मी काय तुम्हास्नी जनावर वाटलो काय.फडाचा मालक आहे मी. असली थेरं करणारी अवलाद नाही माझी.तरी वाडी देईल ती सजा भोगायला मी तयार आहे मला त्याची भिती नाही.भिती फक्त मला माझ्या पार्वतीची आहे"
पोलीस आले पारीनं गणावर केस गुदरवली.गणास पोलीस घेऊन गेले.पारीस प्रतापराव घेऊन गेले.फडातले बापये बायांना आपापल्या घरी पाठवत सातारला ठाण्यात गेली.पार्वतीनं आपल्या अंगावरचे डाग बापूकडं दिले.बापू जामिनीसाठी फिरू लागला.पण आठ दिवस प्रतापरावांनी टाळाच बसु दिला नाही.सारे डाग जाऊनही आठ दिवसांनी गणा सुटला. तो सुटताच पार्वतीनं रडतच बापूला "मला उत्तरप्रदेशात भावाकडं सोडा.आठ दिवस मी पोरासाठी थांबली होती."म्हणत जाऊ लागली.गणा सर्वस्व उलगल्या नजरेनं पाहत जमिनीवर काडीनं माती उकरत होता.दोन्ही पोरं रडत होती.
"पार्वती, माझी पोरं मला जड नाहीत.पण अजुन ही केस चालेल.सजा ही होईल म्हणुन निदान सुटेपर्यत किसनास तरी घेऊन जा.मी तुला थांबवणार नाही."
पार्वती जागेवर थबकली.किसनास सोबत नेते पण एका अटीवर?"
"बोल"तहात सर्वस्व गमावल्या पक्षकारागत खोल आवाजात गणानं विचारलं.
"यापुढे मला वा किसनास कधीच भेटायचं नाही वा मागावर फिरायचं नाही.आम्ही मेलोत समजायचं"
गणाच्या काळजावर तप्त तेल पडल्यागत चर्रकन जळालं.तो रडणाऱ्या किसनास उचलत पटापट पापे घेत हंबरू लागला."पोरा तुला कधी काळी मोठा झाल्यावर तुझा हा बाप निरपराध वाटलाच तर परत ये.तुझा हा निरपराध बाप त्या एका क्षणासाठी उभी हयात फडावर ढोलकीतून साद घालेल."म्हणत गणानं किसनास खाल मानेनं पार्वतीकडं सोपवलं.बापु पार्वती व किसनास घेऊन उत्तरप्रदेशात निघाला.प्रभू आईसाठी हंबरडा फोडू लागला.पार्वती मात्र निखाऱ्यावर चालावं तशी पुढेच चालत निघून गेली.पाठमोऱ्या आकृतीकडं प्रभु व गणा पाहत राहिले तर "बाबा, बाबा"
म्हणत किसना रडतच आईकडंनं सुटण्याचा प्रयत्न करू लागला.......
पारी मात्र आपल्या संगित बारी सुरू करण्याच्या मार्गातली गणारूपी धोंड तुरंगात घालुनच शांत बसणार होती.
गणास पाच वर्षाची सजा झाली.फडातली माणसंही हळूहळू पांगली.बरेच पारीच्या संगित बारीतच गेली.गणा सौंदनकराचा फड बसला.बापू मोरंबीकरांनं पाच -साडेपाच वर्षाच्या प्रभूला व आपल्या दोन्ही तान्ह्या मुलींना घेत पारीच्या बारीत न जाता दुसऱ्या फडात जात गुजराण करू लागला.

.....
....
क्रमशः
✒ वासुदेव पाटील.