तळघरातील रहस्य ( गणेश चतुर्थी स्पेशल )
आम्ही नुकताच नव्या घरात प्रवेश केला होता, घर तस मोठ होत, फार स्वतात सौदा झाल्याने आम्ही खुश होतो... बंगला जरा जुना होता पण रहाण्यासाठी प्रशस्त होता... दोन तिन दिवस सामान आवरा-आवरण्या मधेच गेले, बंगल्यात तस खुप काम कराव लागणार होत "But it's ok ....बंगला आवडला आम्हाला !!! माझे वडिल नास्तिक असल्याने आम्ही ग्रुह प्रवेश वगैरे काहिच केल नाहि', या बंगल्या बाबतीत खुप एकिवात होता पण माझे वडिल कोणत्याही आत्मा भुत-प्रेत असल्या गोष्टीना अजिबात थारा देत नसत, पण का कोण जाणे पण हा बंगला भुता-प्रेतांनी भरलेला असावा असे मलाही कधी वाटले नाहि ...असो', काही दिवस उलटले , घरात आई-बाबा मी माझी लहान बहीण आणि आमचा डॉगी "जो"( jo) अशी आमची family त्यात रहात होतो , घर तसे हवेशीर होते पण लोकवस्ती पासुन हा बंगला दुर असल्याने मला खटकत होता .... ईथे एकटेपना होता त्या बरोबर शांतिही होती....!असेच दिवसा मागुन दिवस गेले , सरव जण त्या घरात रुळले होते "जो"( jo ) सुद्धा , घराची साफ सफाई आता जवळपास होतच आली होती, तळघर बाकी होत, नविन दिवस उजाडला तसे मि आणी माझी बहीण तळघराची किल्ली घेउन साफ सफाई साठी तयार झालो, खुप दिवस हा बंगला बंद असल्याने धुळि आणी कोळीष्टक असणार याची आम्हाला कल्पना होती , आत लाईट नसल्याने अंधार होता मि आणी माझी बहिण बॅटरीच्या प्रकाशात स्विच शोधु लागलो सर्वत्र भयानक शांतता होति अडखळत अडखळत खोलीत शोध घेत होतो ..ईतक्यात माझ्या बहीणीचा पाय कशावर तरी लागला आणी जोरात आवाज झाला तस लगेच बॅटरी तिच्यावर फिरवलि ति जमिनिवर पडली होती बॅटरी च्या प्रकाश झोतात तिच्या पायाखाली बघितले तर मडके होते , आणी पाय लागुन ते कलंडले त्यातुन राख बाहेर पडली ... काय असेल ते?? अस्थी तर नसतिल राख कुठुन आली ? कोणी ठेवल असेल हे ? ते मडक सरकवत पुढे शोध घेउ लागलो ... तेवढ्यात अचानक धाडकन दरवाजा बंद झाला तसे भितिने माझी बहिण अोरडली अाईssssss .. मिही घाबरलो पन तिला धिर देण्यासाठी तिच्यावर बॅटरीचा फोकस ठेवला आणी तिला दरवाजा जवळ नेल थोड्या प्रयत्नाने तो दरवाजा ऊघडला देखिल भितिने आमची पुरति गाळण झाली होती . अंधार्या खोलितला हा अनुभव भयानक ठरला. आमचि साफसफाई तशिच टाकुन आम्ही किचन कडे पळालो .....आईला देखील घडलेल सांगितल ', राहु द्या तळघराच आपण नंतर बघू करत आईने विषय टाळला 'रात्र झाली जेवण झाल आई मि माझी बहिण बेडरुम मधे गप्पा मारत बसलो होतो बाबा यायला उशिर होता ८ वाजले होते मधेच किचन मधुन भांड पडल्याचा आवाज आला. बोलता बोलता आमच लक्ष त्या आवाजा कडे गेल तसेच आम्ही सरव किचन च्या दिशेने गेलो घरि कोणी नसताना भांड कस पडेल बघायला सरवच निघालो कुत्रा "जो" पन बरोबर होता ...किचन च्या दरवाजावर येताच "जो" जोर जोरात भुंकु लागला आम्हाला प्रथम उंदराचा संक्षय होता पन "जो" काहि वेगळच सांगत होता ...."जो" एका विशिष्ट दिशेने बघुन भुंकत होता ....आम्ही त्याला शांत करत होतो , मि सहजच तो कुठे बघुन भुंकत आहे हे पाहिल तर मला काहि विचित्रच दिसल ते पाहुन छातित धस्स झाल मि आईला बहिणीला तिथुन निघायला सांगितल आणी परत आम्ही बेडरुम मधे आलो..... माझ्या साठी हे सरव विचित्र पन भितिदायक होत... कारण "जो" जिथे पाहुन भुंकत होता तिथे मला एक हाताचा काळसर पंजा दिसला मि भास समजु कि सत्य काहिच कळत नव्हत ... आई आणी बहिणीला मि घाबरु ईच्छीत नव्हतो म्हणुन मि तो विषय टाळला पण मि खुप घाबरलो होतो.... रात्री बाबा आले जेवण झाल्यावर आम्ही हॉल मधे गप्पा मारत होतो , तस तळघराचा दरवाजा ठोकल्याचा आतुन आवाज आला सरवांचे लक्ष वेधले ...बाबांनी पन दरवाजा कडे पाहिले , उंदिर खुप आहेत का???? विचारत झोपायच्या तयारित त्यांचा रुम मधे गेले.....माझा कडे काहिच उपाय नव्हता ....माझा संशय अजुन दाट होत चालला होता, बहिण माझ्या कडे प्रश्नार्थक मुद्रेने पहात होति .. आईने मान डोलवली मग सगळे झोपायला गेलो , आई च्या रुम मधे बहीण झोपली होती बाबा त्यांच्या रुम मधे ... मि एकटा, रात्र झाली झोपच लागेना मनात भिति बसली होति... लोक म्हणतात हा बंगला भुताडकिचा आहे ते सत्य आहे का ?? माझी झोपच उडाली होति, "बाप्पा वाचव रे ..! बाप्पांच नाव घेत डोक्यावर चादर घेउन झोपलो ,माझी आणि बाबांची रुम खाली होति आई चि रुम वरच्या मजल्या वर होति तळघर माझ्या रुमच्या समोरच होत... रात्री रडण्याच्या आवाजाने मला जाग आली ... हा आवाज इतक्या रात्री ???? माझी घाबरगुंडी झाली काय कराव कळेना विचार करता करता बाप्पांच नाव घेउन दरवाजा हळुच उघडला ....इथे तिथे पहात रुम च्या बाहेर आलो अंधुक प्रकाशात शोध घेत होतो... थोडिशी हालचाल जिवाचा थरकाप उडवत होती... जरा पुढे गेलो तस मला माझ्या मागे कोणी उभा असल्याचा भास झाला मि घाबरलो .... " हे बाप्पा मला वाचव ....थरथरु लागलो राहुन न राहुन मागे वळलो , तर एक काळी धिप्पाड आकृती माझ्या मागे होति ... अंधारात ते डोळे चमकत होते माझ्या समोर हे पाहुन माझी बोबडीच वळली ....मि तसाच शिड्यांवरुन धावत आईच्या रुम कडे पळालो... जोर जोरात धापा टाकत दरवाजा ठोकायला लागलो...तोंडातुन शब्दच फुटेना , आई बहिण बाबा माझ्या आवाजाने उठले , आणी मला विचारु लागेल पन मि बोलण्याच्या अवस्थेत नव्हतो...दरदरुन घाम फुटला होता, मि खाली हॉल चा दिशेने बोट दाखवल...." काय झाल कोण आहे तिथे ???? बाबा शोध घ्यायला जाणार तोच त्यांचा हात मी पकडला आणि मानेने जाण्यास मनाई केली ...अोके ठिक आहे ...झोप तु काय झाल स्वप्न पडल का सरव जण हसले ....आणी मला परत झोपायला पाठवले मि शांत पणे आपल्या रुम मधे परतलो पन ईथे काहितरी नक्कि आहे या वर माझा विश्वास पटला ...मि जे पाहिल तो भास नक्किच नव्हता...! मि माझ्या रुम मधे बाप्पांचा मुर्तीला पाया पडुन माझा आणी माझ्या घरच्यांच या वाईट शक्ती पासुन रक्षण कर अशी विनवणी केली " गणपति बाप्पा वाचव रे .....बोलता बोलता कधी डोळा लागला कऴलच नाही , सकाळ झाली.... मी रात्री त्या बद्दलच विचार करत होतो ....कि हा नक्कि काय प्रकार आहे ..? आणि याने माझ्या कुटुंबाला धोका तर नाहि ना ....?आधिच हा भुताडकिचा बंगला विकत घेण्याची चुक केल्याची जाणिव मनाला झाली पन कोणाला सांगणार.... मि ठरवल याची माहिति काडायची.....तस माझ शोधकाम सुरु झाल आजु बाजुला खुप चौकशी केल्यावर खुप माहिती गोळा केली मला एक समजले की या घरात जि व्यक्ती रहात होती ति अजुनही तिथे प्रेत बनुन वास्तव्याला आहे.... फक्त कोणी आपल्या स्वा्र्था साठी त्याला मरणा नंतरही तिथेच डांबुन ठेवल सख्या भावाने प्रोप्रर्टिच्या मोहापायी त्याचा खुन करुन याच बंगल्यात प्रेत तळघरात टाकल होत ....हि राख अस्ती अजुनहि याच बंगल्याचा तळघरात दुष्ट हेतुने ठेवल्या होत्या.... एका मांत्रीका च्या सहाय्याने भावाचा काटा काडला आणी मांत्रीकाला हा बंगला त्या बदल्यात दिला होता पण .... आघोर शक्तिच्या लालसे पोठी त्याने त्याच्या भावाच्या प्रेत आणि नंतर अस्तीं चा वापर केला पण झाल वेगळच या मांत्रिकाला त्याचा विद्येनेच मारल अजुन कोणाला कळु शकल नाहि कि मांत्रिका चा उजवा हात का कापला होता.....?? हे सरव माहित झाल्यावर माझ्या घरातिल एक एक गोष्टिंचा उलगडा मला होत होता ..... त्या दिवशी किचन मधला पंजा आनी तो धिप्पाड माणुस हे दोघ या बंगल्यात कैद होते पन चुकुन त्या मडक्याच्या धक्यामुळे ते आत्मे मुक्त झाले आणी आपल्या प्रेत योनित परतले ....या वर फक्त बाप्पांचा आशिर्वाद आणी काहि नाही त्याच्या कृपे वर मि या वाईट शक्तिचा सामना करयाच ठरवले ....घरी परतल्यावर बाप्पांसमोर हात जोडुन प्रार्थना केली.... "बाप्पा या घरातील दुष्ट शक्तिना बाहेर करण्यासाठी तुच आमचे सहाय्य कर .. आमच्या कुटुंबाचे रक्षण कर ....रात्र झाली सरव जण झोपी गेले सुमारे दिड वाजता "जो" भुंकु लागला तळघरातिल दरवाजा जोरजोरात कोणी ठोकत होता ... त्या आवाजाने घरातिल सरव जण आम्ही जागे झालो हा त्या दिवशी सारखा प्रकार असावा म्हणुन सुरवातिला अंदाज काडला पन काही विचीत्रच झाल तळघराचा दरवाजा उघडला.... अाणी तळघरातिल वस्तु अचानक ईतरत्र भिंतिवर आदळु लागल्या भयानक आवाजाने घर हादरले गुरगुरल्यासारखा अावाज होता.... वडिल हा प्रकार पाहुन थक्क झाले ....काय आहे तेच कळेना भुता खेतांवर विश्वास नसल्याने वडलांची बोलतिच बंद झाली ..... त्यांनिही हा प्रकार मान्य केला ....सरव घरातिल माणस हॉल मधे एकत्र होतो "जो" पण सतत भुंकत होता.... घरातिल त्या आत्माची शक्ती आता वाढु लागली होती ...मि लगेच बाप्पांच स्मरण करत सरव कुटुंबाच्या पुठे ढाल बनुन उभा राहिलो...." तुला जे काय करायच असेल तर माझ कर घरच्यांना त्रास देउ नकोस.. निघुन जा ..... येवड बोलतो न बोलतो तोच "जो" तळघरात घेला मि घाबरलो ...आता हा परत यायचा नाहि मि सावध झालो तळघरातिल अंधारात प्रवेश करताच "जो" चा आवाज बंद झाला आणी एक भायानक शांतता पसरली .... थोड्याच वेळात "जो" बाहेर आला त्याचे डोळे लाल लाल झाले होते ... तो खुप चिडलेला होता आणी आमच्या दिशेने धावत आला....त्याने उडी घातली माज्या तोंडातुन "बाप्पा" शब्द निघताच क्षणी "जो" ला एका शक्तिने हवेतल्या हवेत आमच्या समोरुन फेकले "जो" भिंतिवर आदळला आणि तिथेच निचपित पडला.... जोरात हवेचा झोत वाहु लागला ....मि आई बाबा आणी बहिणीला घेउन वरच्या रुम वर गेलो ..आणी दरवाजा बंद करुन रात्र भर गणपति बाप्पाचे स्मरण करत राहिलो.... काही तासानी सकाऴ झाली तसे आम्ही अंदाज घेत बाहेर आलो ....तळघर बंद होत "जो" दिसत नव्हता आम्ही ते घर सोडु शकत नव्हतो पन त्या घरातिल हि दुष्ट शक्ती बाहेर करायची होती ....आम्ही सरवांनि एक उपाय करायचा ठरवला या आत्म्याना त्यांचा दुनियेत परत पाठवायच होत आता हि पिशाच्य आपल्यावर हल्ला करे परयंत तसेच यांची शक्ती वाडण्याचा आत त्याना संपवायच होत....! गणेश चतुर्थी दोन दिवसा वर आली होती माझ्या डोक्यात विचार चालु होते तेवड्यात बाबानी माझ्या मनातिल भाव अोळखले आपण घरात गणपती बाप्पांची स्थापना करु या घरात देवघर ही नाहि.... या ईथे नकारात्मक शक्तिंचा वावर आणी या शक्ति फोपवायच्या आत त्याला संपवायच होत ....! दोन दिवस..... या शक्तिंचा प्रतिकार करायचा हि ताकद बाप्पाने मला दिली आहे हे मि अोळखले ....रात्री या शक्ती घरात वावरतात हे मला माहित होत पहिल्या रात्री आम्ही सरव जण जेवण आटपुन वरचा मजल्यावर आईच्या खोलीतच जमलो बाप्पांची लहान मुर्ती माझ्या हातात होती घरातल्याना वर ठेउन मी बाप्पांना घेउन खाली उतरलो ....हॉल मधिल खुर्ची वर बसुन मि त्या शक्तिंना आवाहन करु लागलो मध्यरात्री खुप वेळाने तळघराचे दरवाजे ताडकन उघडले ....आणी ते पिशाच्य भयाण रुप धारण करुन बाहेर आल... त्याला बघुन मि मागे हटलो... घाबरलो ....माजा धिर खचला पण कुटुंबाची काळजी आणि बाप्पांची साथ या ताकदीवर मि परत फिरलो ....." काय हवय तुला ??? " घर " ssssss एक भरदार आवाज हॉल मधे गुजला मि न घाबरता त्याला उत्तर दिले " बाप्पा मोठा आहे तु आमच काहिच बिघडउ शकत नाहिस....!!! ते प्रेत माझ्या दिशेने चालुन येत होते पण बाप्पांच्या मुर्तीच्या तेजाने ते जागेवर थांबले , "तुला मुक्ति नको का ???? का त्रास देतोयस "जो" आचानक तिथे आला त्याचा हातात एक पुडक होत हा " जो " त्याच्या वश मधे आहे हे मि अोळखल पण त्याला जवळ येउ दिल नाहि "जो" ने रागाने ते पुडच दाताने गुरगुरत उघडल त्यातुन हाताचा पंजा बाहेर आला हा त्या मांत्रिकाचा असावा हा मला अंदाज आला ..."जो "लाल लाल डोळ्याने माजा कडे त्वेशाने पहात होता ..बाप्पांच स्मरण केल्याने मला बुद्घी झाली... मि तसेच त्या प्रेताला आवाहन केल "ठिक आहे हे घर तुझ आहे ...मला माहित आहे तु कोण आहेस पण मला आणी माझा कुटुंबाला ईथे राहायला परवांगी दे ....तुझा अस्तिंचे विधिवत विसर्जन करुन तुझा मुक्ति साठि मि प्रयत्न करेन .... बोल मान्य आहे ....??? नाहितर इथेच रहा पण माझे बाप्पा तुला सोडणार नाहित ... ते पिशाच्य तिथे प्रकट झाले..... तस बाप्पांची मुर्ती मि समोर धरली आणी "गणपति बाप्पा धाउन या ....बोलत डोळे बंद केले तस माझा समोर प्रकाशाचा गोळा तयार झाला... त्याचा तेजाने ते प्रेत नाहिस झाल सर्वत्र शांतता पसरल्यावर "जो" नॉर्मल होउन माझा जवळ आला मी वर आपल्याखोलीत कुटुंबा कडे धावत गेलो सरवाना हायसे वाटले .... आईने मला मिठी मारली दुसरा आणी अंतिम दिवस उजाडला आता घर तस शांत वाटत होत पन तो पंजा हा मंत्रिकाचा होता.... तो घेउन घरापासुन दुर नदि वर जाउन तो नदित फेकला आता घरात शांती होती रात्र झाली आम्ही जेवण उरकली घरात आज कोणतिच घटणा घडली नाहि...." जो" देखिल शांत होता .... रात्र झाली तसेच परत ते प्रेत खवळले आणी दरवाजा अक्षरक्षा तोडण्या ईतक्या जोरात तळघरात आवाज येत होता ... ते प्रेत अधिकच हिसंक झाले होते ....आम्ही तळघरा समोर आलो आणी त्या समोरच बाप्पांची मुर्ति ठेवली .... प्रेत बाहेर येयिना पण आत पुरण नास धुस चालु झाली.... आम्ही सरव रात्र भर त्या शक्तिला बाप्पांचा धाकावर तळघरातच डांबुन ठेवल.... तासा वर तास लोटले अंधार अोसरला सकाळ होत आली त्या प्रेताचा जोर कमी झाला आज गणेश चतुर्थी आम्ही ठरवल होत कि बाप्पांना आणायच आणी या पिशाच्यांना बाहेर ची वाट दाखवायची.... सगळी तयारी झाली सकाळी बाबा आणी मी बाप्पांचा नाव गजरात "गणपती बाप्पा मोरया"अोरडत गणपती बाप्प़ांना घरी आणल.... तस घरातील वातावरण पवित्र मंगल झाल मनात जोश आलाच ... आता मि बाबांकडे पाहिल बाबांनी माझा कडे पाहिल बाबांनी नजरेने ईशारा केला तस आम्ही तऴघरात दरावाजा जोरात ढकलुन आत प्रवेश केला.... आई बाबा बहिण सरव जोरात "गणपति बाप्पा मोरया" "मंगल मुर्ती मोरया " चा जयघोष करु लागलो तळघरात आमचा आवाज दुमदुमला.... तसे तळघरात विचित्र आवाज येउ लागले पण आम्ही गणपती बाप्पांच नाव आधिक जोराने घेउ लागलो.... एक वेळ आशी आली कि तळघरात सरव वस्तु ते प्रेत हलउ लागल... पन आम्ही विचलीत झालो नाहि ...कारण आम्हाला बाप्पांची साथ होती, तसे काहि वेळानंतर तळघराच्या एका कोनात एक दिव्य प्रकाश तयार झाला ....आणी आम्ही सरव स्तब्द झालो ..काहिच कळेना , ईतक्यात मोठ्या स्पोटा सारखा आवाज झाला आणी ते वलय हि नाहिस झाल ...आम्हीआता शांति चा अनुभव करत समाधानाने बाप्पांकडे बघत होतो ... आमच्या सरवांच्या डोळ्यात पाणी होत ...आता सर्व शांत झाल... आमची खात्री झाली आम्ही बाहेर आलो आणी हॉल मधे बाप्पां ची स्थापना केली मनोभावे हात जोडुन " सुखकर्ता दुख: हर्ता " आरती चालु झाली मन प्रसन्नतेने भरुन आले ,आता मनात भय नव्हत विश्वास होता ... चेहर्यावर चिंता नव्हती आनंद होता, प्रेमाने बाप्पांकडे पहात होतो खुप समाधान शांति आणि सुखाचा अनुभव होत होता ...आज बाप्पांनी आमच्या वरच सरव संकटच दुर केल !!! सरव छान चालल होतकाहि दिवस लोटले ... आता ते तळघर भयानक वाटत नव्हते ते आता त्या दुष्ट प्रेत शक्तिंपासुन मुक्त होते!!
आम्ही रात्री जेवण करायला हॉल मधे बसलो होतो तेव्हा तळघरातुन पुन्हा आवाज यायला लागला ...
आमच लक्ष तळघराच्या दरवाजा जवळ गेल जे आम्ही त्या दिवसा पासुन उघडच ठेवायचो... सरव जण अवाक झाले एकमेकांकडे पाहु लागले तेव्हा त्यातुन एक लहानसा उंदिर उड्या मारत बाहेर आला आणी आम्ही सरव जोरजोरात हसु लागलो लगेच माझ्या बहिणीने जयघोष केला....!!" गणपती बाप्पा मोरया- उंदिर मामा की जय "
आम्ही रात्री जेवण करायला हॉल मधे बसलो होतो तेव्हा तळघरातुन पुन्हा आवाज यायला लागला ...
आमच लक्ष तळघराच्या दरवाजा जवळ गेल जे आम्ही त्या दिवसा पासुन उघडच ठेवायचो... सरव जण अवाक झाले एकमेकांकडे पाहु लागले तेव्हा त्यातुन एक लहानसा उंदिर उड्या मारत बाहेर आला आणी आम्ही सरव जोरजोरात हसु लागलो लगेच माझ्या बहिणीने जयघोष केला....!!" गणपती बाप्पा मोरया- उंदिर मामा की जय "
समाप्त
॥ श्री ॥
मंगेश पांडुरंग घाडीगावकर
( कथा काल्पनिक असुन बाप्पांना समर्पित आहे केवऴ मनोरंजन म्हणुन पहावे ..अतिक्षयोक्ती आढळल्यास क्षमस्व 🙏)