जेवणानंतर पाणी पिण्याऐवजी हा पदार्थ घ्या… कसलाही पदार्थ पचेल, अपचन पोटाची चरबी जळेल, पित्त, पोट होईल साफ… एकदा करून बघाच…!
नमस्कार, तुमचे स्वागत आहे. आजपर्यंत असंख्य गोळ्या औषधे घेऊनही जर तुम्हाला भयंकर प्रकारच्या पित्तपासून आराम मिळत नसेल तर अशा व्यक्तींसाठी आजचा उपाय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. बऱ्याच व्यक्तींना पित्तामुळे अंगावरती गांधी येतात, त्याला खाज येते, त्याची आगही होते आणि जर ती जखम जास्तच खाजली गेली तर मग इन्फेक्शन सुद्धा होऊ शकते. काही वेळेस ते कसल्या एलर्जी मुळे देखील होत असते. परंतु या सगळ्या समस्यांसाठी आजचा उपाय हा वरदान ठरणार आहे.
या सोबतच बऱ्याच व्यक्तींना पोटात गॅस निर्माण होणे, पोटात वारंवार जंत निर्माण होणे, पोट साफ न होणे, यापैकी कोणती समस्या जर तुम्हाला असेल तर त्या वर सुद्धा हा उपाय अतिशय गुणकारी ठरणार आहे. तर अशा या उपायासाठी कोणते पदार्थ आवश्यक आहेत ते आता आपण जाणून घेऊया.
तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक ग्लास पाणी उकळायला ठेवायचे आहे. आणि त्यांनतर पुढचा पदार्थ म्हणजे खडीसाखर आपल्याला लागणार आहे. आयुर्वेदामध्ये खडीसाखर अत्यंत फायदेशीर मानली गेली आहे. खडीसाखर ही पौष्टिक, गोड, हलकी, बलवर्धक आणि उष्णतेवर गुणकारक अशी असते.
खडीसाखर घेतल्याने आपल्या शरीरातील ताणतणाव कमी होतो, तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, खडीसाखर खाल्ल्याने कफजनक आजार कमी होण्यात मदत होते, घशातील खवखव, खोकला दूर होण्यासाठी ही खडीसाखर अत्यंत उपयुक्त ठरते. अशी ही खडीसाखर आपल्याला साधारण एक चमचा इतकी कुटून बारीक करून घ्यायची आहे.
त्यांनतर आपण जे पाणी उकळायला ठेवलेले आहे ते आयाला एका ग्लास मधे काढून घ्यायचे आहे आणि त्यांनतर या मधे आपल्याला पुढचा पदार्थ मिसळायचा आहे आणि तो पदार्थ म्हणजे कोकम आहे. मित्रांनो कोकम मधे लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्त पित्त शामक, पाचक गुणधर्माचे आहे. म्हणून आयुर्वेदात देखील कोकम ला महत्वाचे स्थान आहे.
असे हे कोकम चे तीन तुकडे आपल्याला गरम पाण्याच्या ग्लास मधे टाकायचे आहेत आणि त्यांनतर आपल्याला तो ग्लास झाकून ठेवायचा आहे. त्यांनतर तुम्हाला जर वारंवार पित्त होत असेल तर पित्ताच्या दरम्यान आंबट पदार्थ खाणे कमी करावे लागेल. या सोबतच तुमच्या आहारामध्ये तुम्हाला शिमला मिरची, वांगे, गोबी, फ्लॉवर, टमाटे, चिंच, अंडी, नॉनव्हेज, तळलेले पदार्थ, खाणे बंद करावे लागेल.
यासोबतच तुम्हाला दुधाचा चहा आणि तुरीची डाळ खाणे सुद्धा बंद करावे लागेल. कोणत्याही प्रकारचे पित्त हे या उपायाने संपून जाते. त्यांनतर आपल्याला तयार झालेले मिश्रण हे दुसऱ्या एका ग्लास मधे गाळून घ्यायचे आहे आणि कोकम च्या शिल्लक राहिलेल्या फोडी ह्या, ज्या व्यक्तींना अंगावर पित्त येत त्या ठिकाणी लावयच आहे. त्याने लगेच फरक बघायला मिळतो, पित्त कमी होत.
यानंतर तयार झालेल्या मिश्रणात आपल्याला बारीक केलेली खडीसाखर आपल्याला टाकायची आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. त्यांनतर हे मिश्रण तुम्हाला रात्री जेवणाच्या अगोदर घ्यायचे आहे. या उपायाने तुम्हाला लगेच आराम मिळेल. सांगितलेला उपाय जर पथ्य पाळून सलग सात दिवस केला तर पित्ताचा कसलाही त्रास होणार नाही.
धन्यवाद…!