भाग ::--चौथा
मि. मानेंनीच कधी तरी राष्ट्रीय महाविद्यालयात प्राध्यापक जागेचं आवेदनपत्र भरलं असेल त्यांचं मुलाखतीचं पत्र आलं.
अजंना मॅडमच तिथं प्राचार्या. मुलाखतीत आपली निवड झाली आपण ज्युनियर कॉलेज ला प्राध्यापक झालो. पण कागदपत्र चाळताना मॅडमांनी आपलं कागदावर सर्व ठिकाणी सरसोली गाव पाहिलं. निवड झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन करतच विचारलं "अरे आलोक तू तर आमच्या व्याह्याच्याच गावाचा निघालास रे!
माझी सून त्याच गावची. आपण नाव विचारलं व 'विधी'चिंधू... हे नाव ऐकताच नोकरी मिळाल्याचा सारा आनंद क्षणात गायब झाला. आपण आधी त्यांना सरसोलीहून आलो तेव्हा आपलं सातपुडा पर्वतातलं मूळगाव मोरचिडा सांगितलं होतं. त्यांना त्याचं काही नाही वाटलं उलट आनंद हा की आपल्या शेजारी राहणारा व आपल्या नातेवाईकाच्या गावाचा चांगला माणूस हाताखाली येतोय. पण विधीचं नाव ऐकताच या मॅडम विधीच्या सासू व शेजारी पण. म्हणजे पुन्हा विधी भेटेलच. काय करावं नोकरी नाकारावी का?
तूर्तास आपण स्विकारली. व विचार केला की मँडमची सेवा तीन चार वर्षे राहीली नंतर निवृत्ती आणि विधी आता तरी पुण्याला नाही. पाहू इथं आलीच तर आपण दुसरं घर पाहू. असा विचार करत आपण नोकरी स्विकारली.
आश्लोक स्पर्धा परिक्षेची पूर्वी चाचणी, मेनपरीक्षा, शारीरिक पात्रता, मुलाखत असे टप्पे पार करतच होता. माने सरांना पूर्ण विश्वास होता की लवकरच आश्लोक पण अधिकारी बनतोय.
ज्याची भिती होती तेच घडलं. एके दिवशी संध्याकाळी विधी अचानक समोर. क्षणात वीज चमकून सळसळावी तसचं. आपण पुरतं घाबरलो. ही इथं केव्हा आली ? नी घरात अचानक कशी? मॅडमांनी पाहीलं तर? आधीच सरसोलीत बभ्रा झालाय व आताच कुठं स्थावर होऊ पाहतोय आपण आणि ही?
विधीला आपण टाळत तीनं लवकर निघावं म्हणून विनवत रागावत होतो. ती काय बोलत होती काहीच सुधरत नव्हतं. दुसऱ्या दिवशीच आपण तिथला फुकट मिळालेला फ्लॅट सोडला व कात्रजला रहायला आलो. जातांना अजंता मॅमला फ्लॅट मालकानं खाली करायला लावला असं खोटच कारण सांगितलं.
गाव बदलवत होतो, घर बदलवत होतो. पण विधीची विधा की विधीलिखीत आमचं दोघांचं ते काही बदलण्याचं नाव घेत नव्हतं. सारखा पाठलाग सुरुच होता. जो जो दुर जात होतो तो तो ते फिरवुन पुन्हा परिघावरच आणत होतं. प्रित ओल..... भिज ओल....
विधी प्राध्यापक झालोय गं मी. मला का या गोष्टी कळत नसतील का? देह, मन, स्पृहा- लिप्सा, आकांक्षा हा सारा भावनांचा खेळ मला ही कळतोच गं. मनाच्या गाभाऱ्यात ओलच काय पण प्रितीचा झराच वाहत असेल! पण व्यर्थ. कारण संघर्षाचा, कष्टाचा व या नियतीच्या माराचा लाव्हाच मनात असा भरलाय की प्रित ओलीचा केव्हाच कापूर होतो.
आलोक....! किती संघर्ष! किती दुःख! कोवळ्या नादान वयापासून. आणि हा संघर्ष, हे दुःखच मला तुझी प्रितओल, भिज ओल कळू देत नाही. संघर्षमय जिवनाच्या गाथेला कुठून सुरुवात करू मी?
सातपुड्याच्या पायथ्याशी माघासलेलं मोरचिडा गाव. मोजून पन्नासेक उंबऱ्याचं गाव. हातावरचं पोट. उन्हाळ्यात धरण, रस्त्यावरचं मातीकाम करणारं किस्नाचं कुटूंब. नऊ वर्षाचा आलोक व पाच - सहा वर्षाचा आश्लोक. जवळच्याच वाडीला रस्ता बनत होता. त्याला लागणारा मुरुम, दगड खोदायचं काम सुरु.कालच्या वळवाच्या पावसानं उष्मा वाढलेला. आजही पाऊस पडणारच म्हणुन किस्ना मुरूम खोदण्याची घाई करत होता. कारण आता पावसाळ्याचे कामही बंद होणार होतं. म्हणून दोन चार दिवसात जितकं जास्त काम करता येईल तितकाच हातभार. या घाईत पावसानं भिजलेलं धपाडं सुटतच चाललंय हे त्याला व सुमीला ही लक्षात येत नव्हत. ही दोघं खणत होते व वर धपाड सुटतच होतं, उष्मा वाढतच होता. पाऊस सरकत होता तसा यमकाळही जिभल्या चाटत वेगानं सरकत होता. आणि क्षणात धडाड धडधूम धप्पssssकरत वरून मुरूम, दगडाचा खच पडला. डोंगरात आरोळ्या, किंकाळ्या घुमल्या. पण दोन किंकाळ्या ढिगाऱ्यातच गडप झाल्या. लोक धावली पडला ढिगारा पलटू लागला. कामाकडं पळणाऱ्या गर्दीत आलोक, आ श्लोकही पळत होते. गर्दीत काय झालं लक्षात येईना. गर्दी त्यांना सहानुभूतीने गोंजारत होती. एकजण वीस मैलावरच्या सरसोलीला सोनू मामाकडं सायकलीवर धावला. ढिगारा कमी होईना. वळीव गर्दी करू लागला. घामाच्या धारा. आता आलोक धडधडू लागला. तोच टिकाव पोटात घेतलेला किस्ना व घमेलीतच चेहरा मुडपलेली सुमी हळूहळू दिसू लागली. लोक चुकचुकु लागली. नभात ढग व धर्तीवर दोन निरागस जीव आकांत करू लागले. धो धो पाऊस व आसवाचा आकांताचा विलापाचा महापूर आला.
दोन्ही प्रेतं पडलेली.लोकं मामाची वाट पाहत होती. दिवेलागणीची वेळ झाली.तो पावेतो वळीव आपलं काम करून परतत होता. सोनू मामा आला. मामी आलीच नाही. अंधारातच किसना व सुमी दोन्ही लेकरांना अनाथ करून निघून गेली. आलोकनं आश्लोकला कडेवर घेत भो भो बोंब ठोकत पाठीवरचं मडकं सोडताच धप्प टिच्च आवाज आला. भडाग्नी व पाणी देताच सारी परतू लागली. .
सोनू मामाही आलोक व आश्लोकला घेत परतू लागला. तोच आश्लोक आकांत करू लागला. "दादा! आया आबा? आयाला ही सोबत घेना."
त्या सरशी मामानं टाहो फोडत "आश्ल्या गेली रं दोघं ती न परतणाऱ्या वाटेनं, आपल्याला सोडून! चल बाबा! " सांगताच आलोक चितेकडं धावू लागला.
"आया आबा या ना! कुठं चाललाय तुम्ही?"

काळीज चिरणाऱ्या या टाहोनं परतणारी गर्दी थबकली. सांगत सवरत पोरांना व मामाला घेत गावात परतली.
दुसऱ्या दिवशी पहाटे जाग येताच आलोक, आश्लोकनं 'आया', 'आया' करत परत हंबरडा फोडला. शेजाऱ्याकडं कडूमडू करत चहा घेऊन मामानं आलोकला सायकलच्या कॅरीवर तर आश्लोकला पुढं बसवत सरसोलीकडं पॅंडल मारला. आणि मोरचिडा हे नाव आधीच कोऱ्या असलेल्या आमच्या सातबाऱ्यावरनं कायमचच खोडलं गेलं.
दुपार कलतीला मामानं सरसोलीत आपल्या झोपडीसमोर सायकल उभी करून भाच्यांना उतरवलं. आभाळ कोसळलेली पोरं म्लान चेहऱ्यानं कावरीबावरी होत इकडं तिकडं पाहू लागली. तोच मामी घरातून संतापातच बाहेर आली.
"आलास ही बाचकं घेऊन! ती बया गेली नी यांना सोडून गेली माझ्यासाठी. पण मी यांचा सांभाळ करायला रिकामी नाही. मी चालली माहेरी. तुला कालच जातांना सांगितलं होतं की या बाचक्यांना आणायचं नाही. तरी घेऊन आलास".
"सरू काय बोलतेस हे. माझी बहिण गेली गं आणि वरून तू हे बोलतेस. त्यांना आपल्याशिवाय दुसरं कोण गं! "मामा रडतच गयावया करू लागला. तितक्यात आश्लोक मामीच्या पायाला मिठी मारत" आया!, आया! "म्हणत केविलवाण्या नजरेनं बिलगू लागला. मामीनं त्याला झिडकारत दूर भिंतीकडं ढकलताच भिंत लागून कपाळावर फरफर ठेंगूळ चालून येऊ लागलं. आश्लोक जोरात रडत मामाआड लपला व आया, दादा, मामा करत टाहो फोडू लागला.आलोकनं त्याला कडेवर घेत अंगणात आणलं. संतापातच मामीनं पिशवीत कपडे भरत माहेरचा रस्ता धरला. मामानं आलोकला आलोक इथंच थांब बाळा मी तिला माघारी फिरवून आणतो सांगत गल्लीतुन दूर पर्यंत रडत रडतच विनवण्या करत तिचा पिच्छा करू लागला.थोड्या वेळानं मामाच उंदरागत मरतुकडं तोंड घेऊन परत आला
मामी आलीच नाही.
रात्री गल्लीतल्या एका बाईस कीव आली. तीनं खिचडी टाकुन तिघांना खाऊ घातलं. रात्री काळ्या ढगाआड उदास एकटाच पळणाऱ्या चांदकडं भकास नजरेनं आलोक कितीतरी वेळ पाहत रडत होता.
सोनू मामानं सकाळी उठताच दोघांना खळ्यात नेलं. गावात सदा अण्णाकडं मामा कामाला होता. त्याच वेळी सदा अण्णा व सावित्रीमाय आपल्या पोरी जावयासोबत महिनाभर भारत दर्शन साठी गेलेले.
मामा दिवसभर खळ्यात राबे. म्हशीचं दुध काढणं, गोठा झाडलोट करण, गुरांना चारापाणी करणं, साड्यांच्या भाकरी घेऊन जाणं गुरं चारणं अशी किरकोळ कामं करी. मामाला क्षयानं पोखरल्यानं दुसरी जड काम होतच नसत. म्हशीची धार काढतांना मामा हाफायला लागे. पण पर्याय नव्हता.
मामा दोन्ही भाच्यांना सोबतच फिरवू लागला. कधी म्हशीचं दुध पाजू लागला कोणी द्या येऊन कोर तुकडा दिला की भाच्यांना भरवू लागला.पण कोणी दररोजच देईल याची शाश्वती नसायची. नुसतं म्हशीचं दुध आश्लोकला जासे. पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतात अजुन काहीच खायला मिळेना. मग मामा नऊ वाजता दोघांना अंगणवाडी घेऊन जाई. तिथं गोदामाय मदतनीस होती. तिला पोरांचे हाल पाहून द्या वाटे. ती पोरांना सुगीचा घाटा देई. कधी कधी कुणी पाहणार नाही या बेतांनं सोनू मामाला ही देई. मामा बळेच नाही म्हणे. "गोदा आक्का पोरांना मिळालं तरी माझं पोट भरतं गं"
पण गोदा मायेला मामाला क्षय व त्यातच बाई गेली माहेराला कोण देईल बिचाऱ्याला म्हणून द्या येई. तर कधी दुपारीसालगडी आपल्या डब्यातून कोर तुकडा देत. मामा तो ऐवजासारखा रात्री पर्यंत जपून ठेवत व रात्री भाच्यांना भरवत.
" पोरांनो थोडेच दिवस अण्णा व सावितरा माय गावाहून आली की आपले. आल थांबतील ती देव माणसं आपल्यास उपाशी मरु देणार नाहीत.
पावसाळ्याची झडी वाढली तसा मामाचा खोकला वाढला. मामा झडकनमध्ये रात्र भर खोकलू लागला. आता तो आलोक व आश्लोकला जरा लांबच झोपवे पण लगेच बहिणीची आठवण येताच झोपलेल्या पोरक्या भाच्याचे पटापट मुळे घेत रडे.
सदा अण्णा व सावित्री माय देवदर्शन करून परतले याचा सर्वांपेक्षा मामाला कोण आनंद झाला. सावित्रीमायला कळताच संध्याकाळी मामाला बोलवलं. मामा भाच्यांना घेऊन गेला. कोवळ्या पोरांना पाहून सावित्रीमायला गलबलून आलं. मायनं "सोनू काय आक्रीत झालं बाबा? निर्दयी देवाला पोरांची आई हिरावून नेतांना या कोवळ्या जिवाची पण दया नाही आली!" म्हणत दोन्ही पोरांना मायेनं जवळ घेतलं. महिन्यापासून मायेच्या स्पर्शास मुकलेल्या पोरांना ममतेची ओल कळताच कधीच न पाहिलेल्या सावित्रीमायला ती पाखरं "आया आया म्हणतच बिलगली" सदा अण्णानंही कुणाच्या लक्षात येणार नाही या अंदेशानं धोतराच्या सोंग्यानं पाणावले डोळे पुसले. सोनू मामा तर बहिण मेव्हणा गेल्याचं दुःख जणु आजच मोकळं करत होता. रात्री साऱ्यांना सावित्रीमायनं पोटभर जेवू घातलं.
दुसऱ्या दिवशी सदा अण्णानं सकाळी मास्तरला बोलवत मोरचिड्याहून दाखला मागवत आलोकला चौथीत घातलं तर लहाण्यास पहिलीत. पोरं खळ्यात राहत शाळेत जाऊ लागली. सदा अण्णाकडचं दोन्ही वेळचं हक्काचं मायेचं जेवणं पोरांना भेटू लागलं. पण देवाला हे ही मान्य नसावं.
श्रावण धो धो बरसत अर्धा झाला. नी पावसाच्या पडझड झडीत सदा मामाही चिमण्या पिलांना अधांतरीच सोडून क्षयाच्या लढाईत हारत निघून गेला. आलोकला कोवळ्या वयात आश्लोक ची जबाबदारी सोपवत.
मंग्या मांगाची हलगी ही त्या दिवशी रात्रभर वाजत होती की रडत होती हेच समजत नव्हतं.

क्रमशः.........
✒वासुदेव पाटील.