अघोर भाग दहावा
सकाळी सकाळीच न्याहारीच्या वेळेस जखोबा विश्वासच्या नावाने आलेली चिट्ठी घेऊन वाड्यावर पोहोचला होता वाड्याच्या चौकटीत त्याने आपला साधा अंगठा सुद्धा लागू दिला नव्हता. मनात एक दहशतच होती त्या जागेची सबंध गाव त्या वाड्यापासून कोस कोस दूर राहायचा आणि अश्या वाड्यात इवलुश्या जीवाला अनुला घेऊन संध्या आणि विश्वास दोघ वास्तव्यास आले होते न जाणे देवाच्या मनात काय होत ते योगायोगाच चक्र असे सुरु झाले कि एक एक करत सर्वांना त्यात सामील व्हावे लागले...असो...जयदेवने पाठवलेली तार हातात घेऊन संध्या विचारात पडली... “ जयदेवची तार या पत्त्यावर कशी काय आली ? त्याला कसे समजले कि आम्ही इथे आहोत...” संध्या त्या पत्राकडे पाहत विचार करण्यात गुंगच झाली होती तसा पायऱ्या उतरून विश्वास खाली तिच्याजवळ आला... “ जावईबापू झोप कशी लागली तुम्हाला? पूर्ण तर झाली न ?” सखा विश्वासकडे पाहत म्हणाला...विश्वासने आपल्या कपाळावरून हात फिरवत झोपेच्या गर्द आवाजातच उत्तर दिले... “होय...रात्री पडल्या पडल्याच झोप लागली आणि...” बोलता बोलता विश्वासचे दरवाज्याकडे लक्ष गेले... “ जखोबा ? तुम्ही इथ काय करताय ? या ना आत या...” तसे जखोबाने दरवाज्यातच उभ राहून आपले हात जोडले आणि नमस्कार केला... “ नाही विश्वासराव मी इथच ठीके...आता निघालोच होतो तुमच्या नावच पत्र आल होत तेच द्यायला आलो होतो.” विश्वासने तसे संध्याच्या हातामध्ये एक लिफाफा पाहिला आणि त्यावरती नाव सुद्धा... “काय ? जयदेवच पत्र ?” असे म्हणत त्याने संध्याच्या हातातून तो लिफाफा काढून घेतला आणि खोलून त्यातले पत्र काढून वाचायला सुरुवात केली. संध्याने तसे आजूबाजूलाच फेऱ्या मारत वाड्यात बकुळाला हाका मारण्याचे प्रयत्न चालू ठेवले... “ बकुळा मावशी ? बकुळा मावशी ? अरे देवा या आजून कुठे गेल्या ? मामा तुम्हाला काही सांगून गेल्या किंवा दिसल्या का ?” तसे सखाराम “ नाही ग पोरी मी जागा झालो तव्हापासून ती मला कुठ दिसलीच नाही..” पत्रातला संदर्भहि विश्वासने वाचला नव्हता तसे बकुळा नाहीशी झाल्याचे त्याला समजले...“कायsss ? सकाळ पासून बकुळामावशी तुम्हाला कुठ दिसलीच नाही ?” विश्वास आणि संध्या दोघेही चकित झाले...कारण अगदी नवख्या गावात एका वृद्ध बाईच पहिल्याच दिवशी अस नाहीस होने हि काय साधारण गोष्ट नव्हतीच.
“शिवsss शिवsss शिवsss...ह्ये काय होऊन बसल देवा.....” जखोबा दरवाज्यातच त्या चौकटी बाहेर उभा राहून तोंडातल्या तोंडात पुटपुटला... “ पण एवढ्या सकाळी सकाळी ती जाऊ कुठ शकते..?” संध्या म्हणाली... “ या गावतल तर तिला काहीच माहिती नाहीये...जखोबा ?”
“तुम्हाला कुठे वाड्याच्या बाहेर दिसल्या का बकुळा मावशी ?” संध्याने दारात उभ्या जखोबास विचारणी केली... “ मी...नाही तर बाहेर कुठेच दिसल्या नाही मला त्या...अन या जंगलातून दुसरीकडे कुठ जायला कसलीच पायवाट नाहीये इथून माग कोसकोस वर पसरलया हे...तुम्ही समदे अस करा इथच थांबा कुठ जाऊ नका...मी सरपंचाकड जातो अन दोघ तीघ माणस सोबत घेऊन येतो...म्हणजे त्यानला शोधायला जमल तर...नका जाऊ कुठ...”
“ थांब जखोबा मी पण येतो तुझ्या संग...” सखाराम उद्गारला आणि तो देखील वाड्यातून बाहेर जखोबासोबतच सरपंचाच्या घराकड जायला निघाला... “विश्वास ? कुठे गेल्या असतील बकुळा मावशी ? अस न सांगता त्या कधीच जात नाहीत आणि आज अस..”
“सापडतील...! इथेच कुठेतरी असतील...!” विश्वास उद्गारला...संध्या न बोलता त्याच्या जवळ येऊन बसली तिने आपल्या केसांचा टॉवेल सोडला... “विश्वास...? जेव्हा पासून आपण... इथ या गावात आलो आहोत... तेव्हा पासून सगळ विचित्रच घडतय...” विश्वासने संध्याच्या चेहऱ्याकडे पाहिले... “संध्या तुला दोन रात्र झाले ते स्वप्न नाही न आले ? कारण एक हि मध्यरात्री तू झोपेतून जागी नाही झालीस..काही वेगळ नाही वाटल तुला हे ?” “ हो...इथे आल्यापासून या गावात पाउल ठेवल्यापासून मला अगदी माझ मन शांत वाटू लागल आहे...पण!”
“ पण ?”
“ हि शांतता.. वादळापूर्वीची तर शांतता नाही न विश्वास ?” असे म्हणत संध्याने विश्वासकडे पाहिले विश्वासची हि नजर तिच्या नजरेस खिळून राहिली दोघांच्याहि डोळ्यात संध्याच्या या प्रश्नाला एक साफ होकार दिसून येत होता. “ ममाsss....ममाsss...उंहू उंहू उंहू....” संध्या विश्वास दोघांचेहि लक्ष तुटले कारण वरच्या खोलीत अनुच्या रडण्याचा आवाज येत होता. “ अनु उठली वाटत..मी बघते...” असे म्हणत संध्या उठतच होती कि विश्वास म्हणाला... “ तू थांब इथेच मामा येतील केव्हाही मी घेऊन येतो तिला खाली...आणि जमलेच तर घराच्या खोल्यांमध्ये तपासून पहा..” विश्वासने संध्याला काही सूचना दिल्या आणि अनुला घेण्यासाठी वरच्या मजल्यावर जाऊ लागला...संध्या वाड्याच्या वऱ्हांड्यात उभी दरवाजाच्या चौकटीतून बाहेर पाहत उभी होती जवळचा टॉवेल तिने तिथेच बाजेवर टाकला...तसेच तिला कुणाच्या तरी कुजबुजण्याचा, पुटपुटण्याचा आवाज... कानी ऐकू येऊ लागला...तो आवाज दरवाज्यच्या पलीकडून येत होता अस वाटत होत जस कोणीतरी आडबाजूला उभ राहून स्वतःशीच नाही नाही...दुसऱ्याशी बडबडत आहे... संध्या चौकटीतून बाहेर आली आणि तिने आजूबाजूं नजर फिरवली तसे तिने पाहिले कि कुणीतरी विद्रूप तिच्याकडेच पाठ करून वाड्याच्या भिंतीकडे तोंड करून काहीतरी बडबडत होत. त्याला पाहताच संध्या दचकली पण त्याच ते रूप तिने याआधीहि पाहिलं होत..हो जेव्हा त्याने अनुला खांद्यावर घेऊन जंगलाच्या वाटेने पळ काढला होता... तो वेडा गंग्या होता तिथे कोपऱ्यात बसून थरथरत तो हातात काहीतरी घेऊन त्याच्याशीच कुजबुज करत होता...
“ ए ? कोण आहेस तू ? इथे काय करतोयस ? माझ्या मुलीला पळवायला आला आहेस ? चल जा गावात इथे कोणी नाही तुझ..” संध्या चे शब्द ऐकताच त्या वेड्याच थरथरत अंग एकदमच शांत झाल पायाच्या आधारे एखाद माकड गुडघ्यावर जस वळण घेत तसा तो संध्याकडे वळला... “ तू ? अजून इथच ?? छ्के हि बघ हि अजून इथच हाय....इथच हाय हि....जायला सांग हिला.....हिह्हीही...ए सावित्रेचे पोरे...तू....तू ...तू तू माझ्या छ्कीला बघितल का ? कुठय माझी छ्की....खाऊ आणायला मनून गेली अन...” बोलता बोलता तो जागचा उठून उभा राहू लागला हातच एक बोट थरथर करत तो स्वतःलाच हुंकार देऊ लागला...खाऊ आणयला गेली माझी छ्की...अन ...”
यावेळी मात्र संध्या स्तब्ध उभी राहून त्याच सर्वकाही ऐकत होती. “आणि ?” \
“अन... माझी छ्की.... पुन्यांदा..... परत आलीच नाय....त्यो नाथ्या मला म्हणाला तुझी पोर...या ..या या या....” रागाने दात खात वाड्याच्या दिशेने बोट दाखवत तो उद्गारला.. “या... गोयान्द्या.... या अघोऱ्यान पळवली....माझी छ्की....” संध्या पायऱ्या उतरून आता वाड्याच्या बाहेर आली आणि तिने एक नजर संपूर्ण वाड्यावर फिरवली... तोच इकडे जंगलातून दोन तीन लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले एक घोळकाच जंगलातून येत होता...त्यातला सखाचा आवाजच संध्याला ओळखीचा वाटला... “बकुळा मावशेsss....अग ए बकुळा मावशी ?” संध्या त्या आवाजाच्या दिशेने वळली तसा तो समोरून खिद्खीद हसू लागला... “इहिहहिsss....मला माहितीया...तुमी कुणाला शोधताय....तीच नव्ह जिला म्या धक्का दिला अन ती पडली...ह्या ह्या ह्या....ह्या ह्या...लय मजा आली त्या जाडीला ढकलली...” तोच संध्या त्याला म्हणाली...
“ तू पाहिलस तिला ? कुठे ? कुठ पाहिलस तू तिला?”
“म्या रातच्याला माझ्या छ्कीला हुडकत हुडकत हिथ त्या वडाच्या झाडावर येऊन बसलो होतो...तवा मला ती दिसली....रातच्यालाच ती बाहेर आली...अन त्या...त्ये बघ त्ये बघ..तिकड त्या हिरीकड गेली..अन...अन...त्यान तिला....” बोलता बोलता त्याचा चेहरा भीतीने रडवेला झाला... “ तिला त्यान लचक्यात धरल...अन तिकड त्या जंगलात पार....पार पार तिकड घेऊन गेला....म्या बगितल तीच रगात..त्या झाडावरून खाली येताना...हीहीही...लाल लाल नुस्त लाल लाल...”
“संध्या ? तू इथे काय करतेयस ?” तो वेडा बडबडत होताच कि दरवाज्यातून विश्वास काखेत अनुला घेऊन बाहेर आला...तशी त्याचीही नजर त्या वेड्यावरती पडली... “ तूsss ? तू इथे कशाला आलास चल पळ इथून ...निघ इथला नाही तर मार मार मारेन...चल पळ इथून....” विश्वासने त्याला दम देताच तो घाबरून दचकून तिथून मागे मागे जाऊ लागला... “ विश्वास अरे...तो म्हणतोय कि....त्याने बकुळाला पाहिले...आणि”
“ आणि काय संध्या ?” विश्वासने विचारले.. “ आणि तो काहीतरी विचित्रच बडबडतोय...कि बकुळाला त्याने इथे रात्री बाहेर आलेलं पाहिलंय आणि कुणीतरी बकुळाला...” सांगता सांगता संध्याच्या चेहऱ्यावर भय निर्माण होऊ लागले... “हे याने केव्हा ?” विश्वासने बोलत असतानाच त्याच्याकडे पाहिले आणि तिथे पाहून विश्वासचे डोळेच विस्फारून गेले...आणि त्या सोबतच संध्याचे देखील...कारण दोघांच्याही डोळ्यासमोर तो नव्हता त्याच्या उभ्या जागी आता फक्त हवा खेळत होती आणि तो नाहीसा झाला होता. तोच छोटी अनु आपल्या वडिलांच्या काखेत बसून बोबड्या सुरात म्हणाली... “पप्पा... पप्पा ....तो पळाला...” तो आलेल्या वाटेने जंगलाच्या दिशेन धावत गेला... इकडे सखराम आणि जखोबाने गावतले दोन चार ओळखीचे माणसे जे धीट होते त्यांना आपल्या सोबत बकुळाला शोधायला आणल होत परंतु वाड्याच्या जवळ जवळ येताच त्यातील दोघा तिघांना घाम फुटू लागला...वाड्याकडे आणि वाड्या बाहेर उभ्या संध्या आणि विश्वासकडे अगदी संदिग्ध असल्यासारखे ते पाहू लागले... ते सर्वजण हातात एक दोन काठ्या घेऊन आले होते. तसा सखाराम अन जखोबा या दोघांच्या पुढ्यात येऊन उभे राहिले... “ आम्ही सगळ्यांनी येत येत रस्त्याला जमल तिकड बघितल पण बकुळा कुठच दिसली नाही...” संध्याला मात्र त्या वेड्याचे शब्द आठवू लागले तो सारख सारख त्या विहिरीचा उच्चार करत होता.. “ मामा ? त्या बाजूने काय आहे नेमके ? त्या विहिरीकड....?” संध्याने तस विचारताच सखा चकित झाला... “ काय ? कुठे ? कुठल्या विहिरीकडे ?” “त्या तिथेच मामा त्या एकाच विहिरीजवळ तिथून हि एक रस्ता दिसतोय न..तुम्ही तिकड जाऊनहि पाहिले तर बरे होईल...” तसा विश्वास तिला म्हणाला “अग संध्या तू काय त्या वेड्याच्या शब्दावर भरवसा ठेवणार आहेस का ? तरीही तुझ्या समाधानासाठी आपण...मला वाटत त्या तिकडच्या मार्गावरहि एक चक्कर टाकायला हवी...” विश्वास उद्गारला... “ ठीक आहे मग...जशी तुझी इच्छा पोरे...आम्ही तिकडहि जाऊन बघतो...तूझ अस एकटीन राहण बरोबर नाही पण. “ठीके मी हि येते तुमच्या बरोबर...” तसे विश्वास तिला नाकारू लागला... “अग पण नाही तू इथेच थांब आणि दिवस आहे काहीही होणार नाही...वाटल्यास कोणीतरी थांबेल तुझ्याजवळ...” विश्वास म्हणाला आणि त्यांच्या पैकी एक माणूस तिथे संध्या आणि अनुजवळ थांबला...त्यांच्या पैकी काहीजण मात्र तिकडे यायला थोडे चाचपडत होते पण जबरदस्ती त्यांनी आपली पावले तिकडे वाढवलीच... विहिरीजवळून जात असताना विश्वासला सखा जखोबा सर्वानाच त्यांच्या घोळक्यातच एक भयंकर अतिभयंकर असा दुर्गंध आला क्षणातच त्यांच्या नाकात तो वास घुमला विश्वासने त्या विहिरीत डोकावून पाहायचा प्रयत्न केला परंतु त्या कोरड्या विहिरीत पसरलेल्या कोळ्याच्या जाळ्या व्यतिरिक्त त्याला दुसरे काहीच दिसले नाही.... “आता एक काम करा दोघ दोघ मिळून फुटा आणि सगळीकड शोध घ्या ज्याला कुणाला पहिल्यांदा सापडलं त्यान इशारा करायचा..” जखोबाने सर्वाना सूचना दिल्या आणि तसे तसे सखाराम आणि आणखी एक माणूस व जखोबा आणि विश्वास दोघेही झाडा झुडुपातून काट्यामधून बकुळाला पुकारत तीच नाव घेत सर्व तिला शोधू लागले....काहीस अंतर पुढे दाट झाडीतून गेल्यावर दमून विश्वासने आपले हात त्या उंच झाडाच्या खोडावर टेकवले आणि मान खाली घालून श्वास भरू लागला...श्वास भरता भरता अचानक त्याला जाणवले कि.... “टपकनsss....” अस काहीतरी त्याच्या हातावरती टपकल विश्वासने न पाहताच ते पुसून काढायचा प्रयत्न केला परंतु हात त्याच्यावर जाणारच होता कि कुणीतरी त्याचा हात रोखला...विश्वासने मान वरती करून पाहिलं तर जखोबाने त्याचा हात. त्याच्या हातावर पडलेल्या, त्या थेंबास... पुसण्यासापासून अडवला होता. जखोबा ते काही क्षण डोळे विस्फारून पाहतच राहिले हलक्या मानेने त्याने विश्वासकडे पाहिले आणि विश्वासची हि नजर त्या थेंबाकडे पाहून थक्क झाली होती. त्या लगतच त्यांना काही कळणार इतक्यात टपटप टपटप करत सलग एका पाठोपाठ एक लालभडक रक्ताचे थेंब धारा त्याचा चिकट स्त्राव झाडावरून गळत खाली येत विश्वासच्या हातावरती पडू लागला..दचकून विश्वास आणि जखोबा दोघेही मागे सरकले...त्या धारेच्या दिशेने दोघांनीही आपल्या नजरा वरती उचलल्या आणि..... समोर जे भयंकर दृश्य होत ते पाहून मात्र विश्वास आणि जखोबा दोघांच्याही छातीत धस्स झाल...विश्वासच्या नजरे समोर एक भयंकर देखावा होता. झाडाच्या खोडावरून खाली सरकत सरकत रक्ताचे ओघोळ पाझरत होते तर काही खालचा पाला पाचोळा रक्ताने लालभडक झाला होता...विश्वासने नजर दौडवली आणि वरती पाहिले त्या झाडाच्या एका काटेरी फांदीवरून बकुळाच छिन्नविछिन्न अवस्था झालेलं प्रेत रक्तबंबाळ होऊन झाडाच्या फांदीत अडकून खाली लटकत होत.तिचा साडीचा पदरच फक्त बिना डागाचा होता आणि बाकीच शरीर मात्र एखाद्या जनावराने अगदी निर्घृणपणे केलेल्या शिकारी सारख खाऊन राखून ठेवल होत.
इकडून सखाराम आणि बाकीचे माणसेहि तिथे धावून आले...त्यांनी तर पाहताच क्षणी....
“राम राम राम.....” रामाच्या नावचा जप सुरु केला... “क...क्क...कोणी केल असेल हे...?”
विश्वासच्या थरथरत्या ओठातून कोरड्या पडलेल्या घसातून आवाज बाहेर निघाला....
“ काळ...त्यो आलाय...सखा....अन त्याच आगमन आता...अटळ हाय...”
सखारामला ते पाहून स्वतःचा राग आणि पश्चाताप वाटू लागला...कारण त्यानेच या सर्वांना ओढून इथ या मरणाच्या दारात आणून उभ केल होत...पण आता माघार घेणे अशक्य होते. आतावेळ आली होती कि संध्याला तिचा खरा भूतकाळ कळण्याची वीस वर्षे तिला छळणाऱ्या त्या स्वप्नांच्या त्रासांच्या मागे असलेल एक गूढ रहस्य कारण वेळेच्या ज्या रक्षकांनी काळ इतके वर्ष डांबून ठेवला होता तो आज मुक्त झाला होता. मृत्यूचा महाभयंकर अघोरी खेळ सुरु झाला होता.
क्रमश पुढील भाग उद्या रात्री 11 वाजता
MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,
PART-1 , PART-2, PART-3 ,PART-4 , PART-5 , PART-6 , PART- 7, PART-8 ,PART-9
PART-10 ,PART-11 ,PART-12 ,PART-13,PART14,PART-15,PART-16, PART-17,END OF THE STORY -AGHOR-BHUTACHI GOSHT PART-18