सीता भवन भाग 4
सचिन बी.पाटील
सचिन बी.पाटील
सीता भवनचा तीन नंबर ब्लॉक...
नव्या नवलाईचा संसार थाटण्यासाठी ती अधीर होती. मोजकी पण लख्ख घासलेली भांडी तिने नीटनेटकी लावली. एकुलत्या एका कपाटात कपडे सुरेखरित्या रचले. पलंगावर फ्लॉवर प्रिंटचं बेडशीट व्यवस्थित बसवलं. फरशी आधीच घासूनपुसून उजळली होती. सगळं आवरून झाल्यावर ती निवांत न्हायला बसली. स्वतःशी गुणगुणत अर्धा तास सचैल स्नान केल्यावर तिचा थकवा पळाला. आरशासमोर उभी राहून ती केस विंचरू लागली.
चुकचूक....चुकचूक....चुकचूक...
तीनदा तो अशुभ आवाज कानावर पडल्याने ती काहीशी शहारली. तिचे कान त्या आवाजाच्या दिशेचा वेध घेऊ लागले.
चुकचूक.....तो आवाज पुन्हा कानावर पडला आणि तिने आरशात बघितलं.
तिच्या पाठीमागे भिंतीवर दोन पाली चुकचुकत होत्या.
पांढरेफटक ओंगळवाणे जीव...त्यांचे वटारलेले डोळे, सारख्या लवलवणाऱ्या जिभा..भक्ष्याचा अंदाज घेऊ पाहणाऱ्या...
टरारून फुगलेल्या त्यांच्या शरीरातून हिरव्यानिळ्या शिरांचे जाळे सहज दिसत होते. त्या भिंतीवरून त्यांची नजर आरशात आणि आरशातून थेट तिच्या डोळ्यात परावर्तित होत होती.
ती काही क्षण जागेवर खिळून राहिली. मग भानावर आली. हातात झाडू घेऊन त्यांना हुसकावून लावावं अशा विचाराने ती क्षणभर वळलीही..
पण...आपल्या पूर्वीची त्यांची या वास्तूत वहिवाट आहे. त्यांना हुसकवण्याचा आपल्याला अधिकार काय ? असा काहीसा विचार करून ती थबकली.
त्या तळहाताएव्हढ्या जीवांना जणू तिचा विचार कळला असावा..पुन्हा न चुकचुकताच ते पसार झाले.
तिचा जीव भांड्यात पडला. ती स्वयंपाकघरात वळली..

सायंकाळी तो घरी परतला. हातातल्या पुडक्यात ताज्या मोगऱ्याच्या फुलांचा गजरा होता. तसा त्यांचा अलिखित करार होता. ती गजऱ्यावर समाधानी होती आणि तिच्या अर्धकच्च्या सैपाकाबद्दल त्याची कोणतीच तक्रार नव्हती.
......त्यालाच संसार म्हणतात !
तो हातपाय धुवून आल्यावर तिला अचानक आठवलं...
अहो, आज सकाळी सीताक्कानी प्रसाद दिलाय आपल्यासाठी..
कोण सीताक्का ? त्याने विचारलं.
अहो, ज्यांचं नाव या इमारतीला दिलंय ना त्या सीताक्का ! ती.
बरं, बरं..कोणत्या देवाचा प्रसाद आहे ? तो.
ते काही माहीत नाही. पण खूप भली बाई वाटली. ती
बरं, आण बघू तो प्रसाद ! त्याने सांगितलं.
ती आतल्या खोलीत तो प्रसादाचा द्रोण आणण्यासाठी गेली.
काही क्षणातच तिची भयंकर किंकाळी त्या घरात घुमली..तो पळतच तिथे पोहचला.
ती भेदरलेल्या नजरेने द्रोण ठेवलेल्या जागेकडे बघत होती. वादळात सापडलेल्या झुडुपाप्रमाणे तिचे शरीर थरथरत होते. तिच्या नजरेची दिशा हेरून त्याने तिकडे पाहिले.
त्या द्रोणातील दहिभाताच्या ढिगात एक पाल अडकली होती.
केवळ अडकलीच नव्हती..ती क्षणाक्षणाला आत खेचली जातेय हे स्पष्ट दिसत होतं. बाहेर पडण्याची तिची प्राणांतिक धडपड सुरू होती. पण त्या घासभर ढिगात जे काही होतं ते तिला तसूभरही हलू देण्यास तयार नव्हतं.
आपल्या साथीदाराची ती तडफड पाहून दुसरी पाल अस्वस्थपणे द्रोणाभोवती फिरत होती.
शेवटी नाईलाज झाल्याने तिनेही त्या ढिगात उडी घेतली. तो तिचा निर्वाणीचा प्रयत्न असावा..
तिची गत काही वेगळी झाली नाही...
काही क्षणातच ते दोन्ही क्षुद्र जीव दहिभाताच्या त्या ढिगाने पाहतापाहता गिळले..
त्यानंतरचे दृश्य आणखी विचित्र होते.
दहिभाताच्या त्या ढिगातून एकेक कण सुटा झाला. त्या कणांनी फेर धरला. एक छोटी वावटळ तयार झाली. त्या खोलीच्या मध्यभागी स्थिरावली. काही क्षण प्रचंड वेगाने फिरल्यावर अदृश्य झाली.
आता तिथे स्मशानशांतता पसरली होती.
ते दोघेही त्या दृश्याकडे बघत उभे होते. त्यांच्या जाणिवा गोठल्या होत्या. संवेदना बधिर झाल्या होत्या. ते जे काही घडून गेलं, त्याला स्वप्न म्हणावं की भास की आणखी काही....
असं कसं घडू शकेल ?
कोणत्याही धक्क्यातून स्त्रिया अधिक लवकर सावरतात..
मूढ होऊन उभ्या असलेल्या त्याला तिने हाताला धरून ओढतच बाहेरच्या खोलीत आणले. तो अद्यापही सुन्न होता. तिच्या डोक्यात मात्र गरगरत होतं.
तो प्रसाद खाल्ला असता तर...
त्या पालींच्या जागी आपणच असतो नक्की !
सकाळी त्यांना हुसकण्याची दुर्बुद्धी झाली नाही याचाच परिणाम म्हणून आपण वाचलो..
त्या किळसवाण्या जीवांनी केव्हढा उपकार केला होता !
पण सीताक्का ?? तिने असे का करावे..आपल्याला इथे येऊन एक दिवसही उलटला नाही तोच हा अघोरी प्रयोग ! त्या थेरडीला जाब विचारलाच पाहिजे.
तिने मुठी आवळल्या. ताडकन उठून उभी राहिली.
आतापर्यंत थंड झालेल्या त्याने तिचा हात धरला.
कुठे निघालीस ?
वर जाते त्या थेरडीकडे..विचारते ना तिला की का उठलीस आमच्या जीवावर ? तिच्या आवाजात संताप होता.
तो खिन्न हसला...म्हणाला
आणि तुझ्यावर कोण विश्वास ठेवेल ? आहे काही पुरावा !
ती मटकन खाली बसली. अगतिक झाल्याने तिचे डोळे भरून आले.
पण मग काय करायचं ? इथून निघून जाऊ!
काहीच नाही..सावध राहायचं...इतकी मोक्यावर आणि स्वस्तातली जागा कुठे मिळणार आहे दुसरीकडे ? थोडी कळ काढावीच लागेल !
तिने आणखी काही केलं म्हणजे ?
मी म्हटलो ना की सावध राहायचं ! तू फक्त काळजी घे..त्याने समजावले.
त्याच्या खांद्यावर मान ठेवून ती रडू लागली.
त्याने आणलेला गजरा कधीच चुरगाळून गेला होता...

मध्यरात्र झाली..
सीता भवनच्या वरच्या मजल्यावर सीताक्काच्या खोलीचं दार हळूच उघडलं.
सावकाश पावलं टाकीत सीताक्का बाहेर पडली. तिच्या चेहऱ्यावर कमालीची खिन्नता पसरली होती.
काळ्याकुट्ट ढगाआड चंद्र बेपत्ता झाला होता..अगदी सीता भवनच्या भाडेकरूंसारखा ! भोवताली पसरलेल्या जर्द अंधारात तिने नजर फेकली.
आणखी किती पापे करवून घेशील माझ्या हातून ? त्यापेक्षा मलाच का संपवत नाहीस ? घे माझा घास आणि सोडव मला...तू ही मोकळा हो ! आता नाही बघवत मला...मुक्त कर..मुक्त कर मला!!
ती बेभानपणे पुटपुटत होती.
त्या मिच्च काळोखात कुणीतरी हसल्यासारखं वाटलं.
निराशेने मान हलवत ती जिना उतरून खाली गेली.
तीन नंबरच्या ब्लॉकमध्ये सामसूम जाणवत होती.
तिचा चेहरा आणखी कोमेजला.
ती जिना चढू लागली..
पाठीमागे येणाऱ्या दोन सावल्यांकडे तिचे लक्ष गेले नाही !
(क्रमशः)