आमच्या ऑफिस च्या समोर एक प्रशस्त बंगला होता.त्या बंगल्यात एक वृद्ध जोडपं रहात होते.
रिसेन्टली ते वृद्धापकाळाने गेले होते.
त्यांच्या कडे वर्षानुवर्षे काम करणारी मावशीबाई आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा केर व फरशी पुसायला होती.एकदा आम्ही असेच tp करत बसलो होतो त्यात गूढ रहस्य याचा विषय निघाला ती मावशी पण आमच्या गप्पा ऐकत काम करत होती.
आम्ही तिला बंगल्या च्या नावा मागचं कारण विचारलं तेव्हा तीआम्हाला सांगू लागली त्या बंगल्यातील जोडप्या बद्दल ते पुढील प्रमाणे:- साहेब तो समोरचा बंगला आहे ना त्यात म्हातारा म्हातारी राहात होते.
दोघे अनाथ होते नियतीने दोघे एकमेकाच्या सँपर्कात आले,एकाच ठिकाणी कामाला होते प्रेम जुळल लग्न झाल अमाप पैसा कमवत होते पण एक खंत होती ती ही,त्यांच्या संसाराच्या वेलीवर फुल कधी उमललेच नाही.
एवढा मोठा बंगला पण त्याला वारीस कोणी नाही,एकटे पणा खायला उठला होता म्हणून त्यांनी अनाथ आश्रमातून काही मुलं दत्तक घेतली जेणे करून मुलांना आईबाबा व आम्हाला आईबाबा अशी हाक मारणारी मुलं मिळतील पण ती मुलं घरात आल्यापासून आजारी पडू लागली खंगत चालली सारखी रडत असे आश्रमातील संचालिका ना सुद्धा कळेना अस का होतंय आज ह्या मुलांची उज्वल भविष्य घडतील पण हाय रे किसमत मुलं परत आश्रमात जायचं आहे म्हणून जिद्द पकडून बसली.
खूप समजावलं संचलिकेन पण नाही उपयोग झाला परत ते जोडपं एकटं झालं.असेच दिवस जात होते बाईचं एकटेपणाच दुःख साहेबाना सहन होत नव्हतं म्हणून एक दिवस कंपनीतून येताना एक बोलका पोपट, कुत्रा आणि फिश टॅंक आणला.
ज्यांच्या सहवासात वेळ जाईल पण तुम्हाला खोट वाटेल दुसऱ्या दिवशी ते मासे,कुत्र,पोपट मेलेले होते;त्या दोघांनी जवळ एक शेतजमीन विकत घेऊन शेती करायला दिली पण कर्मानीदशा ती उपजाउ जमीन नापिक झालेली होती,त्यावर कहर म्हणजे बाईने बंगल्यात आवारात चांगली फळफुलझाडे लावून घेतली निदान झाडांची निगा राखू त्यांच्यात जीव रमवू पण एकही झाडाला फळ अन फुलं आली नाहीत.
सर्व झाडं सुकून गेली बिचाऱ्या बाई च्या डोक्यावर परिणाम झाला होता बंगल्याच नाव बदलून तीन वांझोटा बंगला ठेवला होता पण मालकाने पुन्हा पहिल्या नावाचा बोर्ड लावला पण बंगल्याला बरेच वांझोटा बंगला म्हणून ओळखतात बिचारे ते अनाथजन्मले आणि अनाथ म्हणून जगले आणि अनाथपणे च गेले त्या अनाथां ना सनाथ कोणीच केलं नाही.
प्रथम वाडकर