अंधारकोठडी भाग 3-Marathi Katha-Horror
त्या भयंकर जीवघेण्या किंकाळीचा आवाज प्राचार्य एकावडेच्या कानावरती पडला. आपल्या जागचे ते ताडकन उठून उभे राहिले.टेबलावर ठेवलेला कंदील त्यांनी उचलला व आपल्या दरवाज्याच्या दिशेने ते निघाले. दरवाजा उघडताच प्राचार्य थक्क झाले. बाहेर पावसाच्या धारा कोसळत होत्या.
प्राचार्य बाहेर पडताच विजांच्या लखलखाटीमध्ये त्यांना आपल्या समोर कोणीतरी उभ असलेल दिसून आले. एका हातामध्ये बंद केलेली छत्री व दुसऱ्या हातामध्ये जळता कंदील घेऊन उभे त्याच्या देखील चेहऱ्यावर तसेच भाव होते त्याच आश्चर्याचे जे प्राचार्यच्या चेहऱ्यावर त्या किंचाळीने उमटले होते. तो इसम दुसरा तिसरा कोणी नसून गोडे प्रोफेसर होते. " तुम्ही ? यावेळी इथे ? " प्राचार्यांनी गोडेना विचारले... " सर , ऐकलत तुम्ही? तो आवाज ? " प्रोफेसर गोडे म्हणाले... " होय. त्यासाठीच मी बाहेर पडलोय.."
" मी हि त्या करीताच इथे आलोय... " प्रोफेसर म्हणाले " आणखी कुणी ऐकला आहे का तो आवाज ? " प्राचार्यांनी विचारले... " नाही मला नाही वाटत. तो आवाज फक्त आपल्याच केबिन पर्यंत पोहोचला आहे. " गोडे उत्तरले.. " चला जाऊन पाहायला हवय.. " प्राचार्य पुढे चालत उद्गारले तोच..प्रोफेसर गोडे
म्हणाले " नाही सर. मला नाही वाटत तिथे जाणे आता योग्य असेल. " त्याचं वाक्य ऐकून प्राचार्यचे पाउल जागीच थांबले... " काय ? अस का म्हणताय ? " प्राचार्यांनी थबकून विचारले.. " सर तिथे जाणे धोकादायी आहे. तिथ जे काही झाले आहे ते फक्त त्या ग्रंथालया पुरत मर्यादित आहे. "
" प्रोफेसर आपल्याला तिथे जाव लागेल. दुसरे कोणी जर तिथे पोहोचले तर दुसरा अनर्थ घडायला वेळ लागणार नाही... " " नाही सर , मनोऱ्याच्या लंबकामध्ये नियमानुसार शेवटचा टोल दिला आहे. कुणी हा नियम मोडून बाहेर पडणार नाही मी याची खात्री देतो तुम्हाला...जर आपण तिथे पोहोचलो तर..; "
" धोका आहे सर तिथे. मला वाटत आपण सकाळ होण्याची वाट पहायला हवी. सकाळी जाऊन जो तो सोक्षमोक्ष लाऊन टाकू आपण. मी इथे तुम्हाला त्याच कारणासाठी रोखण्यासाठी आलोय...तिथे जाणे म्हणजे तुम्हाला माहिती आहेच.. " प्रोफेसर गोडे उद्गारले... "पण तो आवाज कुणाचा असेल ? "
" मी चौकशी करतो. कॉलेजच्या गेटवरती तो गार्ड नक्कीच असेल त्याने पाहिले असेल कोणाला न कोणाला तरी येता जाता. मी जाऊन पाहतो. " गोडे म्हणाले... " गोडे ? कदाचित आपण चूक केलीय... " प्राचार्य गोडे प्रोफेसरना पाहत म्हणाले... " मला हि तीच आशंका वाटतेय सर. पण आंधळ्या तर्कावर निष्कर्ष काढून नाही जमणार आपल्याला...मी जाऊन पाहतो. आपण इथेच थांबा"
असे बोलून प्रोफेसर गोडेनी तिथून काढता पाय घेतला व प्राचार्यच्या केबिन पासून कोरीडोरमध्ये चालत पायऱ्याजवळ पोहोचले. तिथे पोहोचून त्यांनी एक नजर प्राचार्यांवर टाकली. आणि तिथून खाली पायऱ्या उतरू लागले. विजांच्या लुकलुकत्या तारा अवकाशात तांडव प्रस्थापित करत होत्या. ढगांचे ढोल धडम धडम करत दुमदुमत होते.
प्रोफेसर झटपट पायऱ्या उतरून खाली पोहोचले... एकवेळ कॉलेजच्या आवाराच्या मधोमध आले व आपली छत्री उघडी करून पावसांच्या सरीमध्ये उभे राहून त्यांनी संपूर्ण कॉलेजवर चहूदिशांनी नजर फिरवली. कोणी बाहेर तर पडले नसेल याची खात्री करून घेतली. स्टाफच्या सर्वखोल्या केबिन बंद होते. ते पाहून प्रोफेसर गोडे तिथून निघणार होतेच कि काहीक्षणासाठी त्यांच्या नजरेला जे शोधत होते ते दिसून आले.
एका स्टाफची केबिन किंचित उघडली होती. प्रोफेसर गोडेची नजर त्यावर पडताक्षणीच तो दरवाजा खटकन बंद झाला... " शिंदे ? " प्रोफेसर गोडे शिंदेच्या केबिनकडे तिथेच उभे राहून पाहत होते. दोन एक मिनिटे उलटून गेली...त्यांना काही हालचाल दिसली नाही. तसे प्रोफेसर तिथून चालते झाले. प्रोफेसर गोडे तिथून गेल्यावर... काही सेकंदानंतर तो दरवाजा आणखीन एकदा उघडला...
" बघून घेईन तुला..." दात खात आपली मुठी आवळत शिंदे तोंडातच बरळला... प्रोफेसर गोडे कॉलेजचे आवार सोडून गेटच्या दिशेने त्या गार्डच्या शोधात निघाले... जाता जाता प्रोफेसर गोडेच्या उरात एक किंचित क्षणासाठी धडकी भरली...कारण जिथून ते जात होते त्या स्थानापासून थोड्याच अंतरावर ते ग्रंथालयाच पेसेज होत अगदी अंधारात गाढ बुडून गेलेलं. तिथे पाहून जणू अस वाटायचं.
अंतराळातली एक पोकळ जागाच आहे ती, वैज्ञानिक भाषेत त्याला black hole म्हणतात. ज्याच्याकडे अपोआप सर्व खेचून घेतल जात. प्रोफेसर गोडेनी आपली नजर तिथून कशीबशी हटवली व काही पावले पुढे जात होतेच कि त्यांना त्यांच्या पावलांखाली काहीतरी ओले आणि खडबडीत
जाणवले...तसे दोन पावले मागे सरकून त्यांनी प्रकाशझोत खाली टाकला व पाहिले तसे त्यांना तिथे काही चिखलाने बरबटलेल्या बुटांचे ठसे दिसून आले.. एकूण सहा ठसे होते अर्थात तीन माणसांचे. " ते तीन जन होते. तर मग आवाज एकाचाच कसा आला. बाकीचे दोघे जन ? " ते पावलांचे ठसे कॉलेजच्या गेटच्या दिशेहून आले होते.
आणि ग्रंथालयाच्या दिशेने गेले होते. पण नवलाची गोष्ट आणखी एक होती. ग्रंथालयाच्या दिशेने फक्त दोनच पावलांचे ठसे जात होते. जो कोणी तिसरा होता त्याच्या बुटांचे ठसे आले त्याच रस्त्यांनी परत फिरलेले त्यांना दिसून आले. प्रोफेसर गोडे अगदी तर्कबुद्धी हुशार माणूस. ते समजून गेले हे ठसे नक्कीच त्या गार्डचे असणार..
प्रोफेसे गोडेनी तिथून आपला कंदील उचलला व थेट गेटच्या दिशेने निघाले. तिथे गार्ड असण्याची शक्यता होती. पावसामध्ये चिखलात पाय टाकत गोडे ताडताड चालत गार्डला शोधत निघाले..." सिक्युरिटी ? " गोडेनी त्याला हाक मारायला सुरुवात केली. त्याला पुकारत पुकारत शेवटी गोडे कॉलेजच्या गेटजवळ येऊन ठेपले. त्यांनी समोर पाहिले तेव्हा मुख्य फाटक जसेच्या तसे सताड उघडे पडलेले होते.
" गेट उघडेच. आणि हा कुठे गेला असेल.. " प्रोफेसर गोडेनी आजूबाजूला पहायला सुरुवात केली त्या सोबतच त्यांची नजर फाटकापासून काही अंतर दूर असलेल्या त्या गार्डच्याच केबिनवर पडली. त्याच्या केबिनच्या काचापलीकडे दिव्याच्या उजेडात कुणाचीतरी सावली अगदी दबा धरून बसली असल्याची त्यांना दिसून आली...
गोडे प्रोफेसरने डोक्यावर छत्री धरली होती त्याची पकड त्यांनी घट्ट केली. बाहेर पडल्यामुळे वाऱ्याचा आणि पावसाचा तडाखा जोरदार वाढलेला त्यांना जाणून आला. दबक्या पावलांनी प्रोफेसर त्याच्या केबिनच्या दिशेने जाऊ लागले. आतमध्ये असलेल्या त्या इसमाची सावली अचानक हलताना प्रोफेसरांना दिसली..
त्या इसमाने कसलीतरी बाटली हातात घेतली व तोंड वरती करून त्या बाटलीतून काहीतरी पिताना तो त्यांना दिसून आला...प्रोफेसर समजले तो गार्ड मद्यपान करत होता. प्रोफेसर गोडेनी एक जोराचा श्वास घेतला आणि तडतड चालत जाऊन त्यांनी त्याच्या केबिनचा दरवाजा " धड धड" वाजवला...
दरवाजा वाजण्यासकटच त्यांना आतमधून " खळळSSS" असा काहीतरी फुटण्याचा आवाज आला. कदाचित त्या गार्डच्या हातामधून ती मद्याची बाटली पडून फुटली होती. आतमधून घाबरा आणि थरथरता आवाज बाहेर आला.. "कक्कक्कोन आहे तिकडे ? " गोडे गुरुजींनी परत एकदा त्याचा दरवाजा वाजवला..
" दरवाजा उघड ! मी आहे प्रोफेसर गोडे " काहीक्षण आतमधला आवाज येन बंद झाले व पुढच्या क्षणी त्या गार्डने दरवाजा उघडला... तो गार्ड आता प्रोफेसराच्या समोर उभा होता. पावसाच्या थेंबानी त्याचे कपडे भिजलेले दिसत होते. पुसलेल्या तोंडावर त्याच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा स्पष्ट दिसून येत होत्या.
भीतीने त्याचा चेहरा पांढरा शिपट पडला होता. पाय चिखलाने बरबटलेले होते. आणि तसाच तो कोपऱ्यात जाऊन बसलेला होता तिथे त्याच्या पायचा चिखल आणि फुटलेली दारूची बाटली दिसत होती. गोडे गुरुजी त्याला पाहतच राहिले... " काय झाल रे ? काय करतोयस तू हे ? " गोडे गुरुजीना पाहून तो
आधीच घाबरला होता आणि त्या पूर्वी त्याने घडलेलं जे पाहिलं त्याची भीती उरात वेगळीच होती... थरथरत्या आवाजाने त्याने बोलायला सुरुवात केली. " त..त ...त्या ..तिथे... ते .. प्पान्से... ग्रंथपाल... मी... लायब्र.. लायब्ररीत...ते .. ते ... " त्याची अवस्था भीतीने नशेने धाकाने पुरती बिगडून गेली होती...
त्याच्या खोलीतून घाणेरडा वास बाहेर येत होता. " हे बघ इथे बस शांत... हे घे पाणी पी... "गोडे गुरुजींनी त्याला खाली खुर्चीत बसवलं व तिथलाच पाण्याचा तांब्या उचलून त्याला दिला... "घे पी.. " तांब्या तोंडाला लाऊन त्याने घटा घटा एका दमात सगळा त्याने पिऊन टाकला... आणि जोरजोरात
श्वास सोडू लागला... प्रोफेसर गोडेनी त्याची अवस्था समजून घेतली. हि वेळ त्याच्यावर राग करण्याची नव्हती. जर त्याच्यावर धाक , दाब टाकला असता तर त्याने आपल तोंड उघडणे अगदीच मुश्कील झाले असते. गोडे गुरुजीनी त्याला आपल्या जागेवर शांत बसवले... " सांग आता, काय झाल होत? का गेला होतास तिथे ? आणि कोणकोण सोबत होत तुझ्या.. "
पाणी प्यायल्यावर त्याच्या घश्याची कोरड गेली. त्याने नशा अडवण्यासाठी तोंडावर पाणीदेखील मारून घेतले. परंतु मनातली भीती तो दरारा याच्या पुढे नशा काहीच नव्हता. त्याने एक एक करून प्रोफेसर गोडेजवळ सर्व काही सांगायला सुरुवात केली... घटनानंतर घटना घडत होती. तो प्रत्येक एक गोष्ट सांगत होता. जी त्याने त्या दोघाकडून ऐकली होती.
" म्हणजे ते दोघजन ग्रंथपाल आणि वार्डन होता ?" गोडे गुरुजीना बाकीची देखील बाब समजून आली. कसा प्रशांत तिथे गेला व हॉस्टेलवर परतला नाही. ग्रंथपालने आपल्या किल्ल्या तिथे त्या दरवाजावर कश्या विसरल्या... ते सर्व ऐकत प्रोफेसरच्या चेहऱ्यावर भीती, शंका आश्चर्य सर्वकाही
क्रमानुसार कंदिलाच्या उजेडामध्ये ठळक उमटताना दिसत होते. " आणि आणखीन एक गोष्ट साहेब; " तो बोलता बोलता थांबला...एकवेळ त्याने खिडकीतून बाहेर ग्रंथालयाच्या दिशेनी पाहिले..." ती कोणती? " प्रोफेसर प्रश्नावले... "सरसाहेब तिथे... ! तिथे आतमध्ये काहीतरी आहे... काहीतरी भयंकर
वावरत आहे. आणि त्या ग्रंथालयाचा दरवाजा अजूनहि तसाच उघडा आहे मला इथे नाही थांबायचं.. " तो अस म्हणताच विजांच्या कडकडत्या तडाख्याने त्याच्या या उद्गारला तंतोतंत प्रतिसाद दिला. प्रोफेसर आपल्या जागेवरचे किंचित मागे वळले आणि काही क्षणासाठी त्यांनी देखील त्या ग्रंथालयाकडे पाहिले... " याचा अर्थ हॉस्टेलवर मुल खोळंबली असतील... तिथे कोणी नसेल मला जायला हव... " एवढ बोलून गोडे गुरुजी तिथून निघाले होतेच कि तो गार्ड म्हणाला
" सर साहेब ? मला पण येवूद्या मी इथे नाही थांबू शकत.... म्म्म्म..मी जर इथे थांबलो तर... " त्यावर गोडे गुरुजी त्याला अडवत म्हणाले... " घाबरू नकोस. चल तू माझ्यासोबत. " असे बोलून प्रोफेसर त्याच्या खोलीतून बाहेर पडले... व दोघे मिळून त्या किरर्र काळोख्या अंधारात हॉस्टेलच्या दिशेने जाऊ लागले...
पावसाचा जोर आता कमी झाला होता. थेंब मोजून पडत होते. पण पायाखाली चिखल तसाच जमलेला होता. इकडे आपल्या खिडकीमधून विष्णूने बाहेर डोकावून पाहिले... " हे कोण येत आहेत ? " विष्णू स्वतःशीच पुटपुटला... " मोहन ? " मोहन व बाकीची मुले कोरीडोरमध्येच घोळका करून उभी
होती. प्रत्येकाच्या तोंडी आता एक नवीन गोष्ट होती. प्रशांत कुठे गायब झाला हि पहिली गोष्ट पण नवीन गोष्ट होती ती म्हणजे त्या किंचाळीची याचा अर्थ तो आवाज ती जीवघेणी किंचाळी हॉस्टेलच्या मुलांच्या हि कानी येऊन पडली होती. सर्वमुले वार्डन गेल्यानंतर प्रशांतच्या खोली बाहेर जेव्हा उभी होती त्याच वेळी होय त्याच वेळी तो चित्कार त्यांनादेखील ऐकू आला होता...
मुलांच्या त्या घोळक्यामध्ये त्या भयंकर चित्काराने त्या किंकाळीने भीतीचा एक अगम्य स्फोट झाला होता जो तो घाबरून बिथरून होता भीतीने सर्वांचे चेहरे अगदी निळे पांढरे पडले होते. " हा कसला आवाज होता ?? " कल्ला करणाऱ्या मुलांमध्ये तेव्हा वेगळीच चित्तथरारक शांतता पसरली होती...
त्यानंतरची गोष्ट विष्णू आपल्या खोलीमध्ये राहून बाहेर काय चालले आहे याची शहानिशा करून घेत होता. आणि त्याच वेळी हॉस्टेलच्या दिशेने दोन इसम येताना तो पाहू शकत होता.अगदी अनोळखी दोन माणसे त्यांच्या वस्तीगृहाकडे येतायत हे पाहून तो विचारात पडला होता. नेहमीच्या वार्डनच्या
येण्याची चाल त्याचा कंदील आणि बाकी सर्व हालचाली बरोबर ठाऊक होत्या; पण हे लोक कोण ? आणि अचानक त्यांच्या पैकी एका इसमाने आपल्या हातातला कंदील किंचित उचलून आपल्या चेहऱ्याजवळ आणला तसा विष्णूला त्या इसमाचा चेहरा स्पष्ट दिसून आला त्यावेळी त्याच्या तोंडून आश्चर्यात्मक उद्गार बाहेर पडले....
" हे तर ..., हे तर खुद्द प्रोफेसर गोडे इकडे येताहेत.... काय झाल असेल एवढ ? "
क्रमश :

No comments:
Post a Comment