🙏ही ओढ रक्ताची🙏
मुकुंदानं सकाळची नऊची लिंबर्डीची बस पकडली. रात्रीच्या बाराला तो कल्याणहून रेल्वेने निघून चाळीसगावला पहाटे उतरला व तेथून बसने जिल्ह्याला आला व आता तलाठी म्हणून रुजू होण्यासाठी लिंबर्डीला निघाला होता. जून संपायला आला होता. खानदेशात मिरगानं वेळेवर व दमदार हजेरी लावली असावी. जिकडे तिकडे हिरवेगार शेते डुलत होती. ओढे नाले ओहोळ ढिम्म ढेरीसहीत पोट फुगवल्यागत दोन्ही काठ वाहत होते. डोंगरांनी ओलेती पाचूची चादर पांघरली होती. सूर्यनारायण दहा वाजायला आले तरी तोंड दाखवत नव्हता. बुराईच्या तट्ट फुगलेल्या काठाकाठाच्या रस्त्यावरनं बस मायंदाळ चिखल रबडा तोडत, चिरत, उडवत धावतच होती. गावं सारखी मागं पडतच होती. पाऊस असल्यानं गाडीत गर्दी नव्हतीच. नुकतीच पेरणी झालेली खिडकीतून जाणवत होती. हिरव्या पोपटी रंगाची दोन-तीन पानं फुटलेल्या मक्याची रोपं पाऊस वाऱ्याला न जुमानता आभाळाकडं झेपावत होते. सर्वत्र बोर, केळ, पपईचे मळे दिसत होते. कमरे एवढी वाढलेली पपई व डोक्यापार गेलेली केळ नव्या नवरीगत सजलेली दिसत होती. बोरीचा छाटवाही डिऱ्या फोडत डवरत होता. बोरीतच आंतरिक म्हणून मका तुवर पेरलेली दिसत होती. बुराईच्या काठावरील फरशीवर उतरवत बस माघारी फिरली. फरशीवरून कमरेइतकं पाणी वाहत होतं. मुकुंदानं बॅग खांद्यावर ठेवत पाण्याचा अंदाज घेत चालणाऱ्या माणसाचा हात पकडत निघाला. त्या माणसानं चावडी पर्यंत सोडलं. चावडी जुनी असली तरी समृद्ध व नांदत्या गावाच्या खुणा दर्शवत होती. कमरेपर्यंत ओल्या कपड्यानिशी तो चावडीत दाखल झाला. सर्कल बसले होते.
"मी एम. डी. माने. तलाठी म्हणून आदेश मिळालाय या गावचा. रुजू व्हायला आलोय." नदी उतरून टेकडी चढत वळसा घालत आल्यानं दम भरला असूनही अनअनुभवी बोलात एका दमात पोपटासारखं बोललो.
सर्कलनं खुर्चीकडं खूणेनच बसायला सांगत, "कदम अप्पा येतीलच इतक्यात. तेच तुम्हाला चार्ज देतील व रिलीव्ह होतील"
" भिमा चहा सांग रे नविन तलाठी अप्पा आलेत आपल्या गावाला" असं सांगत कुठून आलात? नाव, गाव व इतर माहिती विचारत माझा बुजरेपणा कमी करण्याचा प्रयत्न केला. भिमा चहा घेऊन आला तोवर कदम अप्पा ही आले. कारदेशीर बाबीची पुर्तता झाल्यावर कदम व सर्कल अप्पांनी राहण्याबाबत, कुटुंबाबाबत विचारणा केली. एकटा असून गावातच राहणार सांगताच कदम अप्पा सर्कलकडं पाहत, "दादासाहेब नविन अप्पांना 'बुराई बंगल्यावर रहायची सोय करा. म्हणजे तेथूनच त्यांना अठरा - वीस वर्षापासुन बंद नविन सचिवालय
(कार्यालय) पण सुरु करता येईल".
"कदम तुम्ही बदलून जात आहात म्हणून हा खोड्यात टाकणारा सल्ला देत आहात का?, नविन माणूस असला म्हणजे त्याला संकटात टाकायचं हे बरं आहे का!"
सर्कलनं रागावणीच्या सुरात म्हटलं.
" दादासाहेब मी राहिलो काय व बदलून गेलो काय,पण वरिष्ठांचा तगादा व गावातील नुकतीच हरलेली सुर्यकांत - चंद्रकांत काकडेची पार्टी आता हेच करायला लावेल या नविन आलेल्या पोरसवदा अप्पास, मग काय कराल? "
" कदम त्या पुढच्या गोष्टी आहेत पण याचा अर्थ यांना जाणून बुजून बुराई बंगल्यात ढकलणं योग्य आहे का? दुसरी गोष्ट कित्येक वर्षा पासुन तुम्ही जशी चालढकल करत जुन्या चावडीत सजा चालवला ना!,
तसा निघेल काहीतरी मार्ग. पण आताच तो विचार नको"
तूर्तास जुन्या चावडी च्याच एका खोलीत आपली सोय करण्याचं ठरवलं. सर्व सोपस्कार पार पाडून दोन दिवस भिमा शिपायाकडंच जेवन करत लिंबर्डीत राहिलो. मग कल्याणला जात जुजबी सामान आणलं व लिबर्डीतच तलाठी म्हणून सेवा सुरु झाली.
पाऊस सारखा सुरुच होता. झडीच लागली होती. वर काटवान माळमाथ्यातही तसाच बरसत असल्यानं बुराई धोक्याची पातळी ओलांडू पाहत होती. गावाचा विस्तार तसा दहा हजाराहून जास्त लोकसंख्येचा. आजुबाजुच्या दहा बारा खेड्यांचा राबता इथल्या बाजारात होता. दररोजची गुजरी भरली की या खेड्यातून लोक बाजाराला येत व इतर जिन्नसाही विकून जात. बुधवारचा आठवडा बाजार तर कुंभमेळासारखाच भरे.
आज ग्रामसभा होणार होती. नुकतंच इलेक्शन होऊन तीन पंचवार्षिक पासुन सत्तेत असलेली पार्टी हरली होती व कृष्णा काकडे या इसमाची पार्टी जिंकत त्यांचीच मुलगी नुकत्याच सरपंच म्हणुन विराजमान झाली होती.
नविन बाॅडीची पहिलीच सभा होती व तलाठी म्हणुन माझीही.
ग्रामसभेत सर्व कर्मचारी अधिकारी व गावकरी हजर होते. सुरुवातीलाच सूर्यकांत काकडेंनी सरपंच हजर नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. पण प्रतिनिधी म्हणून कृष्णा अण्णा काकडे हजर होते. तद्नंतर नविन सचिवालयात कार्यालय स्थानांतरण विषय निघताच ग्रामसेवक व आपणास उभं करत जाब विचारण्यात येताच सर्कलनं बाजू घेत एम. डी. माने आताच हजर झालेत त्यांना अजुन याची काहीच कल्पना नसल्याचं सांगताच अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी साऱ्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत शासनानं लाखो रुपये खर्च करत सुसज्ज सचिवालय बांधूनही कित्येक वर्षापासून धूळ खात पडलंय येत्या आठ दिवसांत इथला कारभार हलवण्याबाबत सुचित करताच कर्मचाऱ्यांत चलबिचल वाढली. गावकरी ही कुजबूज करु लागले. ग्रामसेवक तर मूग गिळून गप्प. कृष्णा अण्णानं लक्षात येणार नाही अशी खूण सर्कलनानांना करताच. सर्कल अप्पांनी अनुभवाचा वापर करत सभेच्या ठरावाप्रमाणं पुर्तता करण्यात येईल अशी ग्वाही दिली. पण कालवाकालव वाढतच गेला. गावातल्या एका जाणकारानं तरी चाचरत सांगितलंच,
"साहेब, का हो उगाच विषाची परीक्षा घेतात. त्यापायी गावानं सुभानरावाचा व एका तलाठी अप्पांचा बळी जातांना पाहिलंय मग का उगा पुन्हा तोच जीवघेणा खेळ खेळताय?"
मध्येच चंद्रकांत काकडे त्यांना थांबवत "तुम्हाला काय म्हणायचं ते खुलं खुलं सांगा." म्हणताच जाणकार भांबावला.
" काही बाबी या शासकीय पातळीवर मिथ्या असतात. त्यावर विश्वास ठेवता येत नाही. पण तलाठीनं जीव गमावला हे साऱ्या गावानं पाहिलंय हेही विसरुन चालणार नाही. बाकी सारे जण सुज्ञ आहात"
म्हणत व स्थलांतरचा ठराव पारीत करत व पुढचा पावसानं झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याबाबतचा ठराव होत सभा बरखास्त झाली. पण नविन सचिवालयाचं लचांड काय हे समजेना. ग्रामसेवकानं तर महिन्याची रजा टाकत
गावालाच प्रस्थान केलं. मी सर्कल अप्पांना विचारणा करताच. एम. डी. ते प्रकरण खूपच जिवघेणं आहे. तुम्हाला झेपावणारं नाही. पण पाहू,काढू काही तरी मार्ग. शिवाय कृष्णा अण्णा भला माणूस आहे. करतील मदत आपणास",
म्हणत विषय पालटला. बुराईची पातळी वाढतच होती. केळी, पपई अति पाण्यानं आडव्या पडू लागल्या. मका, तुवर, कडधान्ये पाण्याखाली बुडू लागले. दोन दिवसात तर बुराईच्या पाण्यानं गाव दरवाजा गाठण्याच्या बेतात आलं. . जुनी जाणती माणसं धाकधूक करू लागली. आता गावावर बला येईल किंवा काही चांगलंही घडेल. कारण असा प्रसंग दहा बारा वर्षांनी येतो असं जाणती बोलू लागली. गावदरवाज्याला पाणी पोहोचलं की आजु- बाजूच्या पाच- सहा खेड्यात पाणी घुसतं व तेथील लोक उंचावर वसलेल्या लिंबर्डीत आसरा घेतात हे जुनी लोकं जाणून होती. गाव देवीला आज साकडं घालण्याचं ठरवलं. सरपंचाकडंनं साडीचोळीचा आहेर बुराईच्या पाण्यास व गावदेवीस चढवण्यात येणार होता. रात्री आठ वाजता पाण्यानं गावदरवाज्याची वेस ओलांडताच सरपंच बाई आल्या. अंधारात व पावसात सारा गाव गोळा झाला. आजुबाजूच्या गावातूनही लोक येऊ लागले. बालट्या थोरात फुल्ल टल्ली होऊन कमरेइतक्या पाण्यात पुढं होत हलगी घुमवत होता. पण ओल्या वातावरणात हलगी वाजतच नव्हती. तो जीव तोडून वाजवतच होता. तेवढ्यात भिमानं आपल्याला सरपंच कुंदा ताई आल्याची बातमी दिली. पण अंधारात काहीच दिसत नव्हतं. सरपंच बाईनं खण साडीचा आहेर बुराई मातेस चढवला. व नंतर तेथून दोनेकशे मीटर अंतरावर पाण्यात बुडालेल्या गावदेवीला आहेर देण्यासाठी त्या खोल पाण्यात उतरू लागल्या. गावकऱ्यांनी त्यांच्या भोवती पाण्यातच कडं केलं. गाव देवीच्या नावानं उदो उदो करण्यात आला. त्यानं चेव चढत बालट्या थोरात पुढं सरकला व हलगी समवेत पाण्याच्या धारेत गटांगळ्या खात वाहू लागताच कड्यातले लोकं झेप घेत त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरली. तोच पाण्याचा प्रवाह वाढला व सरपंच कुंदा ताईचा पाय उठला व एकच गलका वाढला. पटापट पाण्यात उड्या पडल्या त्यातच आपणही झेप घेत धार काटत कुंदा ताईस गाठलं व एका हातानं केस पकडत बाहेर काढू लागलो. काठावर येताच बॅटरीच्या झोतात कुंदाताईचा चेहरा पाहताच "कुंदा तू? आणि इकडं कशी? हे तूझच गाव का? तू तूच सरपंच कुंदा?" प्रश्नाची सरबत्ती सुरु केली.
"मुकुंदा, आधी तू इथं कसा? ते सांग"
कुंदाला पाहताच आपला गारठा गायब झाला. व मनात एकदम टवटवी जाणवायला लागली.
"अगं इथं तलाठी म्हणून रुजु होऊन मला आठ दहा दिवस झालेत. मी कुंदा कृष्णा काकडे हे नाव सरपंच म्हणून वाचलं बोर्डवर व ऐकलं ही पण तूच असशील हे मनात आलच नाही.
कुंदा पुरती भिजून कुडकुडत होती. पण तिची नजर मुकुंदावरून हटतच नव्हती. तिला व त्यालाही दोन महिन्यापूर्वीच भेट आठवत होती.
बुराई बंगल्यात मात्र काळ टवका मारत जिभल्या चाटत थैमान घालत वाट पाहत होता......

क्रमश.......
✒वासुदेव पाटील.
नंदुरबार.
नंदुरबार.