कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -3
कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीण
लेखक :- मंदार साखरकर
भाग :- ३
सकाळी परत उठून दररोजचे चालू, आई नाष्टा.
......
सकाळी गिरीजा काँलेजला जाऊन क्लास अटेंड करून, टाईमपास करून कामाला निघून जाते.
........
सगळे आपले काम करत असतात. गिरीजा सगळयानवर बारीक नजर ठेऊन काम करत असते. तेवढ्यात तिला राघवला एका कस्टमर कडून काही तरी घेताना दिसतो.
.......
राघव ते मोनिकाला देत बोलतो, रात्री शालिनीला दे.
........
अनिता गपचूप कान्या डोळ्याने गिरीजाकडे बघत असते.
ते जोसफला डोळ्याने खुनवत गिरीजकडे दाखवते.
.......
गिरीजा परत सगळ्यांना सांगते काल समजून सांगितले तरी सुदरले नाहीत. चला जा सगळे.
सगळे गेल्यावर सरांच्या केबिनमध्ये जाऊन ती कँमेराचेक करून. सराना एक क्लिप सेंड करून निघुन जात.
जाताना रघूला बोलते उद्या पासून नवीन जॉब शोध.
......
परत गिरीजाला घरी येण्यास रात्रीचे १०.३० वाजतात.
घरी येत आईला बोलते जेवण वाढ मी आलीच फ्रेश होत.
रूपालिकडे बघत बोलते काल पासून बघते आहे मी हाताचे बोटे मला बघून तोडते आहेस. काय जेवायला त्रास होत आहे का.
बोट तोड ती मी खूप दिवस झाले नॉन व्हेज नाही खाल्ले आहे दे ते.
.......
रुपाली बोलते गप्प बस बोंबील.
.......
रात्री रघु, राघवला फोन करून गिरीजा काय बोलली ते सगळे सांगून फोन कट करतो.
......
राघव एकेकाला फोन करून रघूला गिरीजा काय बोलली ते सांगतो.
.......
सगळे जण ठरवतात उद्या सकाळी ८ ०० वाजता साठे पार्कमध्ये भेटायचे.
........
घरी रात्री २.०० च्या सुमारास गिरीजा झोपेत रुपालीला जोरात पाठून मिठी मारत बोलते. सोडा मला ताई वाचावं ग बघ सगळे मला मारण्याचा प्रयत्न करतात आहे ताई वाचावं मला. असे बोलून एक लात मारते.
.......
तशी रुपाली पलंगावरन खाली पडत जोरात किंचाळत बोलते बाबा मेली मी. तशीच कंबरेवर हात ठेऊन लाईट चालू करून पलंगावर बघते तर गिरीजा तिथे नसते.
रुपाली बोलते मेली गेली कुठे बोलते. तर कोपऱ्यात बसून बोलत असते, ताई मला वाचावं ते मला मारतील ग.
रुपाली जोरात आई आणि बाबांना हाक मारात बोलवत असते.
.......
आई, बाबा धावत रूममध्ये येत रुपालीला बोलतात काय झाले ओरडायला.
......
रुपाली गिरीजकडे बोट दाखवत बोलते. ती बघा.
........
बाबा पाठी वळून बघतात तर गिरीजा कोपऱ्यात बसून बडबड करत असते. ताई वाच व मला ते मला मारतील.
......
बाबा हळू हळू गिरीजकडे जात बोलतात बेटा काय झाले.
......
गिरीजा तिथे असलेला पाण्याचा ग्लास उचलून बाबांना बोलते जवळ नका येऊ नाहीतर मी मारीन. व्हा लांब माझ्या पासून असे बोलुन ती ग्लास मारते. बोलते. काय ग ताई बोलले होतीना वाचावं मला बोलून बेशुद्ध होते.
.......
बाबा जवळ जाऊन तिला उचलून पलंगावर आणून झोपवत शोभाला बोलतात पाणी आन लवकर जा. तू काय बघते आहे जा किचनमध्ये दुध आणि बिस्कीट आन जा.
........
आई पाणी आणून ह्यांना देत गिरीजाच्या बाजूला बसून तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलते काय झाले हो.
.......
बाबा गिरीजच्या तोंडावर पाण्याचे सिंथोडे हळूहळू मारतात आणि बोलतात हिला उद्यापासुन भुताकेताचे पुस्तके वाचायला देऊ नकोस. रात्री पुस्तके वाचते आणि सगळ्यांनाचे झोपमोड करते.
ती मेली दूध बनवायला गेली की आणायला गेली.
.....
आई बोलते थांबा ती शुद्धीत आली की समजेल आपल्याला नेमकं काय झाले ते.
.......
रुपाली दूध आणि बिस्कीट आणत बाबा ना बोलते हे आणले आजून शुद्धीत नाही आली का.
......
गिरीजा हळूहळू शुद्धीत येत आपले डोळे उघडून बोलते. ताई का नाही आली तू.
......
रुपाली बोलते कुठे नाही आली मी. काय बोलते आहेस तू. आजून झोपेत आहे का.
हे घे दूध आणि बिस्कीट खा आणि नीट सविस्तर सांग.
......
आई डोक्यावरून हात फिरवत बोलते काय झाले. वाईट स्वप्न बघितले का.
......
गिरीजा बाबां कडे बघत बोलते हो. मला कोणी तरी मारण्याचा प्रयत्न करत होते म्हणून मी ताईला हाक मारत होते.
......
बाबा बोलतात कोण होते. तू भुताच्या गोष्टी वाचते ना म्हणून तुला तसे स्वप्नात दिसले असणार खा आणि झोप आता.
.....
गिरीजा बोलते नाही बाबा खरच कोणी तरी मारत होते.
.......
आई बोलते ठीक झोप आता शांत पणे.
.......
गिरीजा नेहमी प्रमाणे उठून आईला हाक मारत बोलते चहा आणि नाष्टा तयार ठेव मी आलेच फ्रेश होऊन.
.......
आई बोलते तयार आहे ये तू.
........
गिरीजा नाष्टा करून कॉलेजला जाते क्लास अटेंड करून जरा वेळ सगळ्यांन बरोबर टाईम पास करून कामाला निघून जाते.
.........
कामावर गेल्यावर तिला नवीन वाँचमेन दिसतो. ती समजून जाते की रघुला कामावरून सरानी काढले. तशीच ती आत जाते तर तिला सगळे नवीन स्टाफ दिसतात.
ती परस्पर सरानंच्या केबीनचा दरवाजा नाँक करून आत जात बोलते सर एक नोटीस तर द्यायचीना सगळ्यांना काढले का.
......
सर बोलतात गिरीजा, जर ते कॉफीचे पँकेट मध्ये रोलिंग करत असते तर ठीक होते ते कॉफी शॉपमध्ये गैर काही करत होते म्हणून त्यांना काढले. जा तू तो विचार करू नकोस.
........
इथे राघव, अनिता, शालिनी, मोनिका, जोसेफ, माधव सगळे एकत्र भेटून बोलत असतात.
राघव बोलतो पहिलेच बोललो होतो हीला रस्त्यातून काढा नाही ऐकले तुम्ही घ्या आता.
मोनिका बोलते अरे पण आपल्याला वाटले होते का ती असे करेल नाही तर कधीच काटा काढला असता.
अनिता बोलते ठीक आहे आजून वेळ कुठे गेली आहे.
माधव बोलतो पत्ता साफ करा पण जीवावर नको बोलतो.
सगळे जण हो बोलून एक प्लॅन करतात आजच तिला अद्दल घडवूया काय बोलतात. सगळ्यांना माहिती आहे ती किती वाजता निघते ती आणि कुठल्या रोड ने जाते चला मग रात्री १०.०० वाजता भेटा.
.......
कॉफ़ी शॉपमध्ये नवीन स्टाफला गिरीजा आपली ओळख करून देत ब्रिर्फ करून सगळ्यांना आपली काम देत ती कस्टमर ची ऑर्डर घेण्यात सुरवात करते. तिचा आजचा दिवस खूप चांगला गेला म्हणून ती खुश होती. ती सगळे आवरून गार्डला बोलते शॉप बंद करून ती निघून जाते.
.......
रात्री १०.१५ वाजले होते सगळे जण तिची वाट बघत असतात.
शालिनी बोलते पार्सल आले चला लागा कामाला जसे प्लॅन केले आहे तसे करूया.
प्लॅन प्रमाणे सगळे होऊन तिला राघवणी आणलेल्या गाडीत बसून तिला वांगणी इथे एक अज्ञात स्थळी घेऊन जातात.
........
घरी सगळे काळजीत असतात आजून गिरीजा घरी कशी आली नाही.
बाबा बोलतात तिला फोन लाव बघ कुठे आहे ती.
........
रुपाली गिरीजला फोन लावते. फोन कॉल पिकउप होतो. हॅलो बोलते तसा गिरीजाचा रडत आवाज येतो ताई मला वाचावं हे सगळे मारतील ग ताई वाचावं मला.
.....
तिच्या कडून फोन घे लवकर आणि फोन कट होतो.
......
रुपाली परत फोन लावते तर फोन ऑफ असतो.
......
आई बाबा विचारतात काय झाले ग तू का रडते आहेस बोल.
......
रुपाली बोलते गिरीजा बरोबर बोलत होती. तिला कोणी तरी पकडले आहे आणि आता फोन ऑफ मिळतो आहे.
.......
बाबा बोलतात चल लवकर पोलीस चौकीत.
दोघे चौकित येत हवालदार सावंत याना भेटून सगळे सांगत ती काँल रेकॉर्डिंग ऐकवतात. रिपोर्ट्स दाखल करून घरी येतात.
क्रमश