कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -2
पहिले मी सगळ्याना सॉरी बोलतो. कारण असे आहे की मी हे पहिल्या भागेत सांगायचे होते पण ते मी विसरलो म्हणून.
ह्या कथेत कॉलेज लाईफ , फँमेली.लाईफ, घर कुटुंब इमोशनल आजून बरेच काही आहे.
ही कथा सॉफ्ट भयकथा आहे.
.....
कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीण
लेखक :- मंदार साखरकर
भाग :- २
गिरीजाचे आजोबा सुरेखाला तिचा भूतकाळ सांगन्यात रम्य झाले असताना.
.....
तिथे अजून एक आत्मा ऐकत असतो. सुरेखा तिला बोलते तू इथें काय करते आहे. तुझ्या खोलीत जा चल.
......
आजोबा बोलतात येग मुग्धा. तुझे आजोबा होते आता.
......
सुरेखा बोलते बट्टी झालेली दिसतेय.
.......
आजोबा बोलतात पुढे जाऊन हीच तर कामाला येणार आहे ना.
ते जाऊदे सुरेखाकडे बघत बोलतात. कुठे होतो मी हां. मी जेंव्हा ह्यात होतो तेव्हापासून ही अशीच आहे आणि खोडकर.
......
दुसरा दिवस सकाळचे ६.०० वाजले गिरीजा उठत आईला हाक मारत बोलते चहा आणि नाष्टा तयार कर मी आलेच आंघोळ करून.
........
आई बोलते हो ग बाई दररोजचे हिचे, हिच्या साठी दररोज झोपेचे खोबरे करून ५.४५ उठा आणि महाराणीची चहा आणि नाष्टा तयार ठेवत बोलते. दुसरी झोपली असणार, जाऊदे ही बाई येईल आता.
........
गिरीजा फ्रेश होऊन बाहेर येत बोलते आई नाष्टा आन ग. नाष्टा वगैरे करून कॉलेजची तयारी करन ७.०० च्या दरम्यान ती निघणार.
......
तेवढ्यात रुपाली तिला हाक मारत बोलते थांब मेली तू जातेस कुठे रात्री भेटशील ना.
......
गिरीजा तिला जीभ दाखवत निघून जाते.
कॉलेजमध्ये नेहमी प्रमाणे क्लास अटेंड करून जरा वेळ मित्रानं बरोबर टाइमपास करत असते.
........
तेवढ्यात मयूर बोलतो माझ्या गर्लफ्रेंडचा बर्थडे आहे काय गिफ्ट देऊ ग.
........
गिरीजा लगेच बोलते तलाक दे.
........
मयूर बोलतो काय. तसे सगळे हसायला लागतात.
.......
चल रे जाते मी उद्या भेटू.
......
तसा मयूर बोलतो कुठे तलाक पेपर साईन करायला.
......
गिरीजा पाठी येत मयूरचा हात पकडत बोलते चल चल ना विटनेस लागेल ना.
.......
मयूर बोलतो जा ना सोड मला.
.......
गिरीजा हात सोडुन जॉबला निघून जाते. जॉबला आल्यावर तिला सर केबिनमध्ये बोलवतात.
गिरीजा बोलते सर बोलवले मला तुम्ही.
......
सर बोलतात हो. मला सांग तू स्टॉक पण हँडल करते ना. मग दिवसाला तीन पॅकेट शॉर्ट कसे येतात आहे ते एक. दुसरे तू टीम लिडर पण आहे तुला स्टाफवर नजर नाही ठेवत का. कोण काय करते आहे. कोण स्टाफ कुठल्या कस्टमर बरोबर किती वेळ बोलतो.
......
गिरीजा बोलते सर मी आज पासून लक्ष देते सॉरी सर.
......
सर बोलतात अग तू तुझ्या परीने सगळे करते. पण हे जे बाकीचे विश्वसनीय नाही आहे, मी दुसरा स्टाफ बघतो आहे. तिथं पर्यंत लक्ष दे. जा आता तू.
......
गिरीजा बाहेर येत एक नजर सगळ्यांना बघते.
.......
रात्री सगळे काम वाटून बोलते सगळ्यांनी थांबायचे मला बोलायचे आहे सगळ्यांशी.
......
सगळे आपले काम करून थांबत राघव बोलतो बोल काय बोलायचे आहे आम्हाला उशीर होतो आहे.
........
गिरीजा बोलते हो मला माहिती आहे. सगळ्यांना उशीर होतोय आणि कुठे जायचे आहे ते पण मला माहिती आहे तुम्हाला.
.......
शालिनी कडे बघत बोलते तू स्टॉक आणते आणि पेस्टी काउंटर सांभाळते ना मग तीन पॅकेट शॉर्ट का येतात.
......
मोनिका तू स्टॉक घेतेस ना मोजून मग.
......
जोसेफ आणि अनिता कॉफी मशीन हँडल करतात मग तुम्हाला कळत नाही का.
.......
राघव, माधव आणि मी कॉस्टमर हँडल करतो. तुम्ही सगळे काय करतात मला माहिती आहे. सुधारा नाही तर एक दिवस सरना सांगावे लागेल मला. बाहेर कुठले पार्सल मिळते ते कुठे जाते ते पण मला माहिती आहे, जा आता सगळे. वाट बघत असतील ते. जाताना त्या वाँचमेन रघुवीरला पाठव.
.......
रघु आत येत बोलतो बोलावले का.
.......
गिरीजा बोलते सुधर नाही तर बाहेरचा रस्ता दाखवीन समजले चल बंद कर शॉप, मी निघते.
.......
गिरीजा रात्री दरोजच्या टाइम पेक्षा लेट येत बोलते आई जेवण वाढ मी फ्रेश होऊन येते.
.......
रुपाली आपल्या हाताची बोटे तोडत गिरीजकडे रागात बघते.
.......
गिरीजा जेवण करून गप्प चूप जाऊन झोपते.
..........
क्रमश