संगम_लॉज
अंजुला दिलेल्या शब्दाप्रमाणे सुशांत आपल्या कामाला लागला....अंजुने सांगितल्याप्रमाणे सुशांत त्या कॉलेज बाहेर आला.....कॉलेज बाहेर उभे राहून मुलींना शिट्ट्या मारणाऱ्या टपोरी मुलांच्या घोळक्याजवळ सुशांत गेला....एका मुलाला त्याने संदीप आणि जॉन बद्दल विचारले....त्या मुलाने सुशांत कडे जरा संशयाने बघितले
"ते दोघे आता येत नाहीत इथे ते तुम्हाला संध्याकाळी जिम मध्ये भेटतील"
अस बोलून तो मुलगा निघून गेला....संध्याकाळ झाली 6 वाजले असतील त्या मुलाने पत्ता दिल्याप्रमाणे सुशांत त्या जिम मध्ये आला...मुले व्यायाम करत होती जोरात म्युझिक चालू होतं...त्यात त्याने तिथल्या ट्रेनर ला त्या दोघां बद्दल विचारलं...तस त्या ट्रेनर ने चेंगिंग रूमकडे बोट दाखवलं...सुशांत त्या रूमकडे गेला त्याने दरवाज्यावर नॉक केलं....तसा घामाने भिजलेला जॉन बाहेर आला....दाढी केस वाढलेल्या फाकट्या कपड्यातल्या सुशांतकडे बघून तो खेकसला
"काय आहे????काय पाहिजे??"
तसा लगेच सुशांतने त्याच्यासमोर हाथ जोडले
"मला संदीप भाऊंना भेटायचं आहे"
ह्या फाटक्या माणसाचे संदीपकडे काय काम?? हा विचार करत असताना जॉनला बाजूला करून सुशांत आत शिरला.....धिप्पाड शरीरयष्टीचा संदीप नुकताच व्यायाम करून आला होता...त्याचे स्नायू तरारून फुगले होते....नसा मोठ्या झाल्या होत्या आणि आपली बॉडी अजून वाढवण्यासाठी तो आपल्या नसेत "स्टेरॉड" इंजेक्शन स्वतः घुसवून घेत होता....सुशांत त्याच्या जवळ जाऊन बसला
"पटापट बोल काय काम आहे?? आणि कोण तू??माझ्याकडे वेळ नाही बोल पटकन"
संदीपचा करारी आदेश आला तसा सुशांत परत हाथ जोडून बसला
"साहेब मी खूप गरीब हाय जी...ह्या गावात मी आणि माझी आयटम पळून आलोय बघा...आमचं एकामेकावर लई प्रेम हाय...आता पळून येताना तिने जो पैसा आणला तो सगळा संपला..आम्ही दोघे संगम लॉज वर थांबलो आहोत....संगम लॉज तुम्हाला माहीत असेलच...तिथं तुम्ही खूप मैदानं गाजवलीत म्हण....खूप ऐकलय मी....आता मी काम शोधत हाय पण तोपर्यंत???...."
"साहेब मी खूप गरीब हाय जी...ह्या गावात मी आणि माझी आयटम पळून आलोय बघा...आमचं एकामेकावर लई प्रेम हाय...आता पळून येताना तिने जो पैसा आणला तो सगळा संपला..आम्ही दोघे संगम लॉज वर थांबलो आहोत....संगम लॉज तुम्हाला माहीत असेलच...तिथं तुम्ही खूप मैदानं गाजवलीत म्हण....खूप ऐकलय मी....आता मी काम शोधत हाय पण तोपर्यंत???...."
संदीपने एक नजर वर बघितलं....दाढी केस वाढलेल्या मळकट कपड्यातील सुशांतला बघून तो जोर जोरात हसू लागला....त्याने हसत हसत जॉनला टाळी दिली
"अरे...जॉन...हा बघ ह्याची पण सेटिंग आहे...विश्वास नाही बसत यार....अरे पोरी काय येड्या झाल्या का आजकालच्या?? की त्यांची जवानी त्यांना शांत बसू देत नाही....काय बघितलं तुझ्यात तिने??....कधी त्या पैशावर फिदा होत्यात कधी ह्या माझ्यासारख्याच्या मस्क्युलर बॉडी वर.....हे बघ माझ्या दंडावरची फुगलेली बेडकी बघून अनेक पोरी पटवल्यात मी..पण तुझ्याकडे सुद्धा एक नटी आहे...शॉक लागला मला..काय चाललंय काय हे??....बर ते जाऊ दे काय काम आहे माझ्याकडं"
जॉन आणि संदीपचे हसू मध्येच थांबवत सुशांत त्यांना म्हणाला
"आव साहेब....ती मला कशी पटली का पटली ह्या गोष्टी सोडा राव...पण आयटम एक नंबर आहे....आणि ती माझ्यासाठी काहीही करायला तयार आहे....आता "काहीही" शब्दाचा अर्थ तुम्हाला येगळा सांगायला नको"
सुशांत आपल्या वाढलेल्या दाढीवर हाथ फिरवत एकदम हळू आवाजात बोलला....त्या हळू आवाजाचा अर्थ संदीप समजला होता....आपला चेहरा त्याने टॉवेल ला पुसला आणि उभा राहिला
"ठीक आहे....पण पोरगी बघून पैशे देणार....आणि लक्षात ठेव काही फालतूगिरी केलीस तर...गाठ आमच्याशी हाय ....आणि आमच्याशी वाकडं म्हणजे नदीवर लाकडं"
संदीपची धमकी ऐकून सुशांतने परत त्याला मस्का मारला
"आवं साहेब तुमच्याबद्दल सगळं माहीत हाय आमसनी....तुम्ही संजयभैयाची खास माणसं हाईसा...संजयभैयाचा दबदबा आमच्या गावात सुद्धा हाय...तुमच्याशी धोका कसा करीन मी....आज रात्री तुम्ही खुश होऊन जाल ही गॅरंटी माझी हाय"
संदीपने आपल्या खिश्यातली दोन हजाराची नोट सुशांतच्या हातावर टेकवली तसा तो हात जोडू लागला
"लई उपकार झालं साहेब....तुम्ही माझा नंबर लिहून घ्या आणि या रात्री....चला मी निघतो..."
अस बोलून सुशांत तिथून निघून गेला....रात्र झाली....सुशांत चिंतेत घरातून घिरट्या मारत होता...त्या अंधारातुन अंजूचे डोळे लकाकत होते...तो तिला हात दाखवून धीर देत होता....अचानक सुशांतचा फोन वाजला....त्याने अंजुकडे हसून पाहिले आणि तिच्याकडे अंगठा दाखवून इशारा करून तो बाहेर पडला...तो चालत खाली आला...सुशांत आणि जॉन बाहेर उभे होते....सुशांतला बघून ते त्याच्या जवळ आले...जॉनकडून दारूची बाटली घेऊन संदीपने ती तोंडाला लावली....
"चल रे दाखव....कुठे हाय ती पोरगी..??"
तसा काही न बोलता सुशांत पुढे चालू लागला....वरच्या मजल्यावर आल्यावर नेहमीप्रमाणे तेच सिन तिथे चालू होते...सुशांत त्यांना बाजूला करत पुढे जात होता....फुल्ल दारू पिल्यामुळे जॉन आणि संदीप लडखडत त्याच्यामागे चालत होते....एक सिगरेट ओढणाऱ्या मुलाच्या हातातून संदीप ने सिगरेट हिसकावून घेतली ...तो मुलगा काही बोलणार इतक्यात जॉनने त्याच्या कानाखाली जोरदार थप्पड लावली...ते पोरगं तळमळत पडलं...आणि ती सिगरेट तोंडात ठेवून तो पुढे जाणाऱ्या सुशांतला म्हणाला
"अरे ये भाड्या....अरे येत्या का नाही तुझी रुम अजून कुठे आहे""
सुशांत जागेवर थांबला ह्या वाक्याला उत्तर म्हणून त्याने रूम नं 16 कडे बोट केले...त्याच्या बोटाचा इशारा आणि ती रुम बघून त्यांची दारूचं उतरली...जॉन धावत सुशांत जवळ गेला आणि त्याने त्याची कॉलर पकडली
"काय रे xxx...आमच्याशी गेम खेळतो का??इथे काय झालंय ते माहीत नाही काय आम्हाला..."
"काय रे xxx...आमच्याशी गेम खेळतो का??इथे काय झालंय ते माहीत नाही काय आम्हाला..."
जॉनचा चाकू सरळ सुशांतच्या पोटावर होता....तो रामपुरी चाकू बघुन सुशांत घाबरला
"साहेब...साहेब....मारू नका ओ....त्या खोलीत माझी नटी आहे जी....अहो स्वस्त रूम म्हणून त्या मॅनेजरने आम्हाला ती दिली....मला काय बी माहीत नाही ओ"
संदीपने जॉनला मागे ओढले..."जॉन...जॉन...भाई काय घाबरतोस यार....ह्या रूम मध्ये किती मज्जा मारलीय विसरलास काय तू....असू दे रे चल आता वांदा नको इथे"
हे ऐकून जॉनने आपला चाकू खिशात ठेवला आणि दोघे सुद्धा रूम नं 16 कडे चालू लागले....सडलेला दरवाजा अजून भयानक वाटत होता....सुशांतने तो दरवाजा उघडला....तसे ते दोघे छाती फुगवून आत शिरले....ते आत जाताच सुशांतने बाहेरून दरवाजा बंद केला......दोघे सुद्धा आत होते.....कुबट सडलेला वास त्यांच्या नाकात शिरला...त्यांची नजर त्या पोरीला शोधू लागली.....अंधाऱ्या कोपऱ्यावर संदीपची नजर गेली....त्या कोपऱ्यात काहीतरी चमकत होतं...दोघांची सुद्धा हवा टाईट झाली होती..9 वाजले होते घड्याळाचे ठोके ठणाणू लागले अचानक पंखा चालू झाला..लाईट अचानक चालू बंद होऊ लागली...जॉनने आवाज दिला
"कोण आहे रे....समोर ये "
तसे ते डोळे आता मोठमोठे होऊ लागले.....हवेत तरंगणारे ते पाय त्यांना दिसले....ती आता उजेडात आली...विस्कटून केस तिच्या चेहऱ्यावर आले होते...तिच्या अंगावर ओरखड्याचे डाग होते..
"अरे....ही....भुत.......भुत sssss"
.तिला बघून ते दोघे दरवाज्याकडे धावले...संदीप आणि जॉन घामाने भिजले होते...ते जोर जोरात दार ठोठावत होते....ती अजून सुद्धा हवेत तरंगत होती....
"अरे....ही....भुत.......भुत sssss"
.तिला बघून ते दोघे दरवाज्याकडे धावले...संदीप आणि जॉन घामाने भिजले होते...ते जोर जोरात दार ठोठावत होते....ती अजून सुद्धा हवेत तरंगत होती....
"ए...ए....भाई दरवाजा उघड रे....मी....मी....तुला पाहिजे तेवढा पैसा देतो...दार उघड"
संदीपच्या तोंडून ही भिकेची हाक ऐकून ती हसू लागली....ते भयाण हसू ऐकून ते गप्प झाले...दोघे सुद्धा दरवाज्याच्या कोपऱ्यात बसले होते....संदीप तर तिला बघून चड्डीत मुतला होता....
ती हळू हळू जमिनीवर उतरली....तिने आपल्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले.....जॉन आणि संदीपने दिलेले सिगरेट चे चटके तिच्या चेहऱ्यावर जसेच्या तसे होते....अचानक तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले...तिच्या चेहऱ्यावर आता क्रूरतेचे भाव दिसू लागले...अंजुने आपल्या हाताकडे बघितलं...तिच्या हाताची नखं मोठी होऊ लागली....तिच्या हाताच्या शिरा काळ्या पडू लागल्या...निस्तेज पांढरे डोळे रागाने लाल भडक झाले होते...बहुतेक तिने आपली सगळी शक्ती ह्याच क्षणासाठी राखून ठेवली होती..तिचा तो मदतीचा आवाज अचानक भयानक बनला होता....
....तिने आपल्या चेहऱ्यावरचे केस आपल्या लांब नखांनी बाजूला केली...अंजुला बघून संदीप किंचाळला....तो त्या रूम मध्ये इकडे तिकडे धावू लागला...जॉन तर बेशुद्धच पडला होता.....संदीप तिला बघून किंचाळत बाथरूम कडे धावला त्याने आतून कडी लावली....दरवाजा धडधडू लागला...त्या दरवाज्याची धडधड संदीपच्या काळजाचा ठोका चुकवत होती...तो रडू लागला....त्याला आसपास कुठेच बाहेर पडण्याचा रस्ता दिसत नव्हता...
....तिने आपल्या चेहऱ्यावरचे केस आपल्या लांब नखांनी बाजूला केली...अंजुला बघून संदीप किंचाळला....तो त्या रूम मध्ये इकडे तिकडे धावू लागला...जॉन तर बेशुद्धच पडला होता.....संदीप तिला बघून किंचाळत बाथरूम कडे धावला त्याने आतून कडी लावली....दरवाजा धडधडू लागला...त्या दरवाज्याची धडधड संदीपच्या काळजाचा ठोका चुकवत होती...तो रडू लागला....त्याला आसपास कुठेच बाहेर पडण्याचा रस्ता दिसत नव्हता...
"जा ना इथून....मेलीस ना तू....तुझ्या कर्माने मेलीस...मी नाही मारलं तुला....जा इथून plz"
संदीपच्या ह्या आवाजने दरवाज्यावरची धडधड अचानक बंद झाली....तसा संदीप त्या दरवाज्याजवळ येऊ लागला....एक जोराचा आवाज झाला....तसा संदीप मागे सरकला....दरवाजा तुटून खाली पडला होता..अंजु आत आली होती....संदीपला बघून गुरगुरत होती....तिने संदीपला उचलून बाजूच्या भिंतीवर फेकले......तो भिंतीवरून खाली आला...त्याच्या डोक्याला मार लागला...तो डोकं धरून खाली पडला होता....अंजु गुरगुरत त्याच्याजवळ आली आणि त्याच्या पायाला पकडून त्याला फरफटत नेऊ लागली...संदीप गयावया करू लागला हाथ जोडू लागला....त्याचे ते विव्हळणे अंजुला एक वेगळंच समाधान देत होत...ती जोरजोरात हसत त्याला फरफटत घेऊन हॉल मध्ये आली...बेशुद्ध जॉनचा आणि संदीपच्या गळ्याला आपला काळाकुट्ट हाताने अंजुने पकडले...त्या दोघांना तिने भिंतीला टेकवून वर उचलले...तिचे लालभडक डोळे बघून दोघे सुद्धा रडत रडत तिच्यासमोर मदतीची भीक मागत होते....अंजुला एक वेगळंच समाधान लाभत होत....तिने आपला फास आवळला....ती मोठ्या आवाजात गुरगुरत संदीपकडे बघत म्हणाली
"कर्माने नाही मेली मी....तू मारलीस मला....मला नाही माझ्या आई वडीलाला माझ्या भावाला...ते जिवंत असून रोज मरत असतील....खूप तडपवलं रे तुम्ही मला....पण काळजी करू नका..मी तुम्हाला तडपवून मारणार नाही...."
अंजुचा फास आवळू लागला...संदीप आणि जॉनचे डोळे बंद होऊ लागले...अंजुच्या चेहऱ्यावर त्या दोघांनी केलेल्या अन्यायाचा आपण बदला घेतला याचे एक समाधान दिसत होते...अंजुच्या चेहऱ्यावरील त्या समाधानाचे रूपांतर अचानक चिंतेत झाले.....तिचे हात अचानक सुन्न पडू लागले....तिचे हात अचानक थरथरु लागले....ती आपली बोटं त्यांच्या गळ्याभोवती आवळून त्यांचा खेळ संपवण्याचा प्रयत्न करीत होती पण तिची बोटं काम करेनाशी झाली...तिच्या हाताची पकड ढिली झाली....तसे ते भिंतीवर लटकलेले दोघे खाली पडले....अंजुला काहीच कळत नव्हतं....तिच्या हाताची हालचाल होत नव्हती....तिने खाली बघितलं....जॉन आणि संदीप खोकत खाली पडले होते...ते जोर जोरात श्वास घेत जमिनीवर पडले होते...त्यांना जिवंत बघून अंजु गुरगुरु लागली..ते दोघे जिवंत बघून अंजुला काही सुचेना ....ती हिसका देऊन हात हलवण्याचा प्रयत्न करीत होती...पण तिचे हात तिथेच गोठले होते.....अचानक मागून दरवाज्याकडून एक आवाज आला
"साली.....भुत झाली तरी मागून अजून सुद्धा माल दिसते आधीसारखी"
अंजुने आपली मान पूर्ण उलटी फिरवली....मागे आपल्या केसावरील विग काढत आपल्या नकली दाढी मिश्या ओढून काढत असलेला सुशांत तिला दिसला...त्याच्या सोबत एक काळ्या पोशाखात...गळ्यात भलीमोठी रंगेबेरंगी खड्याची माळ घातलेला एक मांत्रिक टाईपचा माणूस उभा होता...त्याचा हात वरच्या दिशेने अंजुकडे होता...जणू त्याने अंजुला वश केले आहे....एक असा जळता पाश जो फक्त त्या मांत्रिकाला दिसत होता....त्या जादुई पाशात अंजु अडकली होती तिला हलता सुद्धा येत नव्हतं.....सुशांतच्या चेहऱ्यावरील नकली दाढी मिश्या नकली केस बाजूला झाले तसे खाली पडलेले संदीप आणि जॉन स्वतःला सावरत धडपडत धडपडत त्याच्याजवळ आले...त्यांनी त्याच्या हाताला पकडलं आणि खोकत कापर्या आवाजात संदीप त्याला म्हणाला
"संजयभैया......संजयभैया.......अरे तू हाईस व्हय...मी ओळखलं नाही बघ तुला.....अरे...ही.....ही बघ आम्हाला मारायला लागलीय रे"
संजयभैयाने हतबल अंजुकडे बघत बघत त्याने संदीपची कॉलर पकडली आणि एक जोरदार कानाखाली लावली
"xxच्यानो.....कधी सुधारणार रे तुम्ही....किती वाचवायचं तुम्हाला??....आधी हिच्या बलात्काराच्या आरोपातून वाचवलं आणि आता हित हे......ह्या ह्या मांत्रिकानं सांगितलं की ही साली आपल्या रागीट खऱ्या रुपात आली की कैद करता येईल...म्हणून हे सोंग घेतलं हे"
तसा मांत्रिक बोलला "व्हय संजयभैया....परवा मी हिला पकडायला आलो होतो....तवा फक्त हिचा वास येत होता पण काही केल्या ही काय सापडत नव्हती..हे बघ हे असतय भूतांचे मूळ रूप आमच्या सारख्या मंत्रिकाना ह्याच रुपात पकडता येत बघ...लई दिस शोधत होतो..पण आता बघा कशी सापडली त्ये"
मांत्रिकाच्या पाठीवर हात ठेवत संजयभैया हसत हसत बोलला
"व्हय मांत्रिका व्हय....तू सांगितल्या प्रमाणे केलं सगळं...आणली की नाही हिला मूळ रुपात तू सांगितल्या प्रमाणं.....खूप बदनामी झाली माझ्या लॉजची हिच्यामुळं....पोर पोरी यायच्या बंद झाल्या राव....आणि ए भूतीनबाई...मी पण भोगलीय बरं तुला...गुंगीचे औषध देऊन...आईशप्पत जबराट होतीस तू...उफफ्फ...खूप आग होती तुझ्यात..आणि अजूनही हाय...अरे संदप्या बघ कशी फडफडत्या.....मज्जा आली मज्जा..."
पाशात अडकलेल्या अंजुला बघून मघाचा केविलवाणा संदीप आता फडफडू लागला
"येडी हाय भैया ही.....दोन प्रेमाच्या गोष्टी काय केल्या....सगळं देऊन बसली....ए बाई तू ज्या रक्ताने लिहलेल्या लव्ह लेटर वर फिदा होऊन माझ्या गळ्यात पडली होतीस ना....ते रक्त कोंबडीचं होतं...उगीच मेली तू... तुला ब्लॅकमेल करून अजून मज्जा केली असती आम्ही...साली...xxx"
हे सगळं ऐकून पाशात अडकलेली अंजु तडफडू लागली...तो जादुई पाश तिच्या अंगाला जाळत होता वेदना देत होता....तिच्या चेहऱ्यावर आता प्रचंड क्रूरतेचे भाव आले....ती इजा होत असताना सुद्धा त्या जादुई पाशाला तोडून त्या सगळ्याच्या नरडीचा घोट घ्यायला बघत होती....मांत्रिकाला तिची तडफड आता चिंताजनक वाटू लागली.....अंजु त्या जादूने अशक्त झाली होती तिचं ते गुरगुरने शांत झालं होतं...तिने खाली मान टाकली....तिचा तो क्रूर आवाज परत सामान्य झाला
"विश्वास उठला प्रेमावरचा....वासनेपुढे हरलंय आज प्रेम....खरं तर तुमच्या सारख्या नीच माणसांना जगायचा अधिकार नाहीय....तुमची माणुसकी तुमचा न्याय करू शकत नाही....माझी भुताटकी सुद्धा तुमच्या पुढे हतबल झाली आज....एक गोष्ट लक्षात ठेवा....मरायचं तर आताच मारून टाका....भस्म कर मला.....पण मी जर वाचले तर माझ्या त्या लाचार माझ्यासाठी तळमळणार्या आईची शपथ घेऊन सांगते...."सबका हिसाब करुंगी..."
हे ऐकून मांत्रिक भलताच संतापला
"xxx साली..हिसाब तर तुझा करतो...तुला भस्म नाही करणार मी...तुझा आत्मा गहाण ठेऊन माझी शक्ती वाढवणार मी"
अस बोलून मांत्रिकाने आपला हात फिरवला त्याबरोबर पाशात अडकलेली अंजु समोरच्या भिंतीवर आपटली...मांत्रिक तिला त्रास देण्यासाठी तिला धडाधड भिंतीवर आपटत होता....पण अंजुच्या चेहऱ्यावर वेदनेचा एकही भाव नव्हता ती रागाने त्या हसणार्या संजयभैया कडे बघत होती....तिची नजर त्या तिघांना घाबरवत होती....ती ताकतीने पाश तोडण्याचा प्रयत्न करीत होती पण तिचा अंगाची आग आग होत होती....इतकं आपटून सुद्धा अंजुच्या चेहऱ्यावर एकही वेदनेचा भाव नाही हे बघून मंत्रिक अजूनच चिडला त्याने आपला एक हात झोळीत घातला.....त्याच्या हातात चार लोखंडी सळ्या होत्या त्यांना पुढे तीक्ष्ण टोक होते...त्या सळ्याना कसले तरी ताबीज बांधले होते....कित्येक पिशाच्यांचा जीव त्या अभिमंत्रित लोखंडी सळ्यानी घेतला होता....मांत्रिकाने त्या सळ्या हातात पकडल्या आणि मंत्र म्हणू लागला....मंत्र पूर्ण झाल्यावर त्याने हसत अंजुकडे बघितले
"साली लईच चिवट आहेस तू...माझ्या ह्या पाशात अनेक भुतांनी जीव सोडलाय पण तू अजून टिकून हाईस...ह्या ह्या लोकांना बाई बाटली मधी मज्जा येती पण आमच्या सारख्या मांत्रिक लोकांना....जेव्हा भुत तडफडत...दयेची भीक मागतं तवा लई आनंद मिळतोय"
अस बोलून त्याने त्या सळ्या तिघांना दिल्या आणि हसत दाढीवरून हात फिरवत बोलला
"घ्या पोरानो करा शिकार"
अस बोलून मांत्रिकाने ती छोटी सळी अंजुच्या दिशेने भिरकावली ती सरळ तिच्या पोटात घुसली...मंत्रीत सळी मुळे अंजु प्रचंड किंचाळू लागली...तिच्या पोटात आग लागत होती....जॉन ने तिच्या दिशेने सळी भिरकावली ती सरळ तिच्या खांद्यात घुसली....प्रचंड वेदनेने अंजु तडफडत होती....तिला तडफडताना बघून संदीपने आपली सळी भिरकावली ती सरळ अंजुच्या मांडीत घुसली.....तिला प्रचंड वेदना होत होत्या....तिला तडफडताना बघून संजयभैया अजूनच खुश झाला आणि संदीपची मान पकडून बोलला
"अरे काय येड्यांनो....काय तुमचा नेम.....आता बघा मी कसा निशाणा लावतो ते..."
अस बोलून संजयभैयाने आपला डावा डोळा बंद केला...त्याला आता वेदनेने तडफडणारी अंजु दिसत होती....त्याने नेम घेतला आणि एक शड्डू मारून बोलला
"आता बघा भुतावरचा सामूहिक बलात्कार"
सर्रर्रर्रकन ती छोटी सळी अंजुच्या छातीत घुसली....अंजु जोरात किंचाळली
"आईssssssssssss"
हे किंचाळनं एवढं भयंकर होतं की खिडक्यांच्या काचा फुटल्या....त्या तिघांनी आपल्या कानावर हाथ ठेवले...ते तिघे भीतीने कोपऱ्यात गेले संजयभैया कोपऱ्यातून मांत्रिकावर खेकसला
"अरे ए.....भस्म कर तिला...आता माझा लॉज पडतो काय??"
मांत्रिकाने झटकन आपल्या झोळीतून एक रिकामी दारूची बाटली काढली काचेची पारदर्शी बाटली समोर ठेवून तो मंत्र म्हणू लागला....अंजु वेदनेने तडफडत होती....."फट्टsssssss" असा आवाज झाला आणि अंजुचा पाश मुक्त झाला...तिच्या अंगातून एक काळा धूर निघू लागला....तो धूर आता त्या काचेच्या बाटलीत शिरत होता.....कापूर जळून हवेत विरघळावा तशी अंजु विरघळून त्या बाटलीत जात होती.....शेवटी ती दिशेनाशी झाली...तिला मारलेल्या सळ्या खाली पडल्या....ती बाटली काळ्या धुराने भरली होती...मांत्रिकाने झटकन त्या बाटलीला बुच लावले आणि त्या बाटलीकडे बघत हसू लागला
"साली माझ्याशी पंगा घेत होती...आता बस बाटलीत...काय पण म्हणा संजयभैया आतापर्यतच सगळ्यात जालीम भुत होत हे"
मांत्रिकाने ती बाटली झोळीत टाकली...तसा संजयभैया पुढे आला त्याच्या हातात नोटांचा बंडल होता
"व्वा.....मंत्रिका व्वा....जालीम भुत तर असणारच कारण आम्ही तिघांनी जुलूम तसे केले होते...चल सोड...मुक्त केलंस एकदा माझ्या लॉजला हिच्या भुतापासून...आता मस्तपैकी रूम दुरुस्त करून घेतो म्हणजे आपल्या ह्या पोरांना सोय होईल..........(क्रमशः)
#शशांक_सुर्वे
(कथेतील हे स्थळ पूर्णपणे काल्पनिक आहे...ही कथा लिहून तयार आहे पुढचा भाग उद्या मिळेल...आपला बहुमूल्य अभिप्राय कमेन्ट बॉक्स मध्ये नोंदवा........धन्यवाद🙏)