रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 5)
रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 5)
नितीन काकड
....प्रत्येक गोष्टीत आपल्या सोबत असणारे पुजारीबाबा,काका आणि सरपंच ह्या वेळी अचानकपणे मधेच कुठे सटकले ......?जाऊदे गेले असतील कुठे कामासाठी ,असं म्हणून तो मार्गस्थ होतो ,भगवान शिव शंभो आणि स्वामी समर्थांच ध्यान करून तो तलावात त्याची विशेष साधना करण्यासाठी सज्ज झाला ,इकडे सरपंच आणि पुजारीबाबा आपल्यातून गायब झाले आहेत ह्याची भनक पण समर्थ ला नव्हती ,तो झालेल्या प्रकारामुळे अस्वस्थ होता ,पण इथेसुद्धा कल्पना त्याला धीर देत होती ,तिच्या मिठीत त्याला एकप्रकारची हिम्मत देणारी ऊब जाणवायची ,बघता बघता दोन दिवस निघूनही गेले ,आणि आला तो माघ पौर्णिमेचा दिवस ,समर्थ आणि त्याच्या साथीदारा सर्व तयारीनिशी सज्ज होते ,गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये सकाळपासूनच होमहवन सुरु होता ,दूर दुरून पुजारी आलेले होते ,समर्थन सर्वांना गोळा करून सांगितलं की, "आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे आणि तो नयनरम्य सोहळा आपण सर्वजण ह्या वर्षी अनुभवणार आहोत ,मंदिरावर असणारा श्राप आज कायमस्वरूपी मिटणार आहे ,त्यामुळे तुम्ही सर्वजण आपल्या आराध्य शंभो महादेवांना भेटायला रात्री 12 वाजता मंदिरात यायचं ,पण त्यापूर्वी मी आणि काही निवडक लोकं आधी जाऊन मंदिर उघडणार आहोत ,आमचं थोडं काम आहे तिथे ,त्यामुळे आधी कुणीही यायचं नाही ", खूप वर्षानंतर लोकांना त्यांच्या आराध्या समोर शिवरात्रीच्या दिवशी नतमस्तक होता येणार होतं, लोकांमध्ये खुशीची लहर पसरली होती ,इकडे त्याच्या भक्तांचं सुद्धा त्याला मुक्त करण्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं, त्यादृष्टीने त्यांनी मंदिरातच म्हणजे त्या भुयारा मध्ये एक विशेष यज्ञ आयोजित केला होता ,यज्ञ कसला तर दृष्ट शक्ती आवाहन यज्ञ ,त्या यज्ञा मध्ये सात्विकता,पवित्रता कुठेही नव्हती,तो यज्ञच त्या काळ्या शक्तीचा पाताळ ते भूलोकं ह्यातील प्रवेशद्वार बनणार होता,त्यामुळे त्याच्या साधकांनी दुपारच्या बारा वाजल्यापासूनच कसल्या कसल्या अघोरी क्रिया सुरु केलेल्या होत्या ,त्याचे सर्व साधक काळ्या कपड्यांमध्ये होते ,डोक्यावर काळी टोपी जिने पूर्ण चेहरा झाकला जाईल ,अंगात पायघोळ झग्गा, अश्या विचित्र वेशात ते पूर्ण मंदिरभर तैनात होते ,यज्ञाच्या बाजूला एक अघोरी कसलेतरी अगम्य भाषेतील मंत्र म्हणत यज्ञात आहुती वाहत होता ,त्याच्या बाजूला तीन सेवक अस्वस्थपणे बसले होते ,इकडे बाहेर समर्थ आणि टीम मंदिराच्या मुख्य दरवाज्यावर पोहचले होते ,तिने त्यांना एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती ,त्यांनी शंभो देवांना नमन करून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आतून कुणीतरी घट्ट पकडून ठेव्यासारखा वाटत होता,,अर्धा तास त्याच्यासोबत झटल्यानंतर सर्वांनी मिळून दरवाजा ला धक्के मारण्यास सुरुवात केली ,तेव्हा कुठे जाऊन दरवाजा उघडला ,आत गेल्याबरोबर त्यांना एक वेगळाच दर्प नाकामध्ये जाणवू लागला ,पण मुख्य मंदिरात कुणीच दिसत नव्हतं मंदिरात काळोख पण खूप होता म्हणा ,पन समर्थला सतत कुणीतरी मंत्र पुटपूटल्याचा आवाज येत होता ,अंधारात नक्की दिशा कळत नव्हती ,एकदा आवाज मंदिराच्या एका भागातून येत होता तर दुसऱ्या वेळी दुसऱ्या भागातून ,कुणीतरी त्यांच्या मेंदूसोबत खेळण्याचा प्रयत्न करत होतं, अंधार एवढा किर्रर्र होता की शेजारी सोबत चालत असलेला दुसऱ्याला दिसत नव्हता,त्यामुळे एकमेकांच्या आधारानेच ते पुढे पुढे जात होते ,अचानक त्यांच्यातल्या एकाच जोराने ओरडण्याचा आवाज आला आणि तसा आवाज नाहीसा पण झाला, सर्वजण अचानक झालेल्या आवाजाने घाबरले ,नक्की काय झालं ते कुणालाच कळत नव्हतं ,सर्वांनी त्यांच्या साथीदाराला आवाज दिला पण त्याचा काहीच प्रतिसाद येत नव्हता ,असंच थोड्यावेळाने परत एकाच ओरडण्याचा आवाज आला आणि तो पण अंधारात गायब झाला ,असं करत करत सर्वजन अंधारात गायब झाले ,आता फक्त एकटा समर्थ उरला होता , त्याला सुद्धा त्याच्या मागे कुणीतरी आहे असं जाणवत होतं ,त्याने अंधारातच 2,3 वेळा आपली सेल्फ डिफेन्स ची जादू दाखवली ,कुणालातरी त्या लाता खूप जोरात बसल्या होत्या ,त्यानंतर त्याला त्याच्या मागे कुणी जाणवलं नाही ,दुसरीकडे मल्हारची 72 तासांची तपस्या पूर्ण झाली होती ,देवाचे आभार मानून त्याने रूम मध्ये एक पवित्र यज्ञ सुरु केला ,त्यापूर्वी त्याला बसायच्या आसनाभोवती त्याने पवित्र भस्माचे एक रिंगण ओढले त्या रिंगणाच्या 8 बाजूला 8 त्रिशूळ काढले ,होमकुंडाची सर्वबाजू गोमूत्राने पवित्र करून शेणाने सारवून घेतली होती ,यज्ञा भोवती कुंकवाने त्याच्या जवळ असलेल्या प्राचीन ग्रंथा मध्ये काही चिन्ह तिथे काढले ,यज्ञा साठी लागणारे सर्व साहित्य ,समिधा तिथे आणून ठेवल्या ,आणि त्याच्या कामात कोणत्याही दृष्ट शक्तीचा अडथळा होऊ नये म्हणून त्याने पूर्ण रूम भोवती हळदी कुंकूचे रिंगण तयार केले होते ,शंभो महादेवाचं नामस्मरण करून स्वामी समर्थांना साकडं घालून तो यज्ञास बसला ,समर्थवर आलेलं मोठं संकट त्याला जाणवत होतं ,आणि म्हणूनच तो समर्थभोवती संरक्षण चक्र करण्यासाठी मंत्र म्हणून लागला ,त्या पवित्र मंत्र शक्ती मुळे एक सप्तरंगी आकाराचं वलय तिथे तयार झालं मल्हार ने त्याच्या शक्तीद्वारे ताबोडतोब ते वलय समर्थच्या शरीराभोवती तयार केलं,आता काही वेळा साठी तरी समर्थ सुरक्षित आहे अशी मल्हार ला खात्री पटली आणि त्याने पुन्हा मंत्र सुरु केले ,इकडे समर्थ ला स्वतः च्या आजूबाजूला सप्तरंगी प्रकाश जाणवू लागला होता ,त्यामुळे तो थोडासा निश्चितं झाला ,त्याला आता तो आवाज कुठून येत आहे ते शोधून काढायचं होतं ,तो असाच कानोसा घेत घेत भुयाराजवळं येऊन पोहचला आणि त्याला धक्काच बसला कि मंदिरात भुयार ,भुयारात गेल्यानंतर त्याला तिथे ते सर्व लोकं पूजा करतांना दिसले ,तो हळू हळू त्या ठिकाणी पोहचला आणि सर्वांना दरवडून विचारू लागला ,कि कोण आहात तुम्ही लोक ,आणि हे काय अभद्र चालवलंय ह्या मंदिरात ,आताच्या आता हे सर्व बंद करा नाहीतर ,सर्व गावाला आत बोलविन ,मग मात्र तुमचं काही खैर नसेल ,त्यामुळं गोडीने आताच हे थांबवा आणि निघून जा इथून ,"एवढं म्हटल्यानंतर त्याला जोरजोरात हसण्याचा आवाज आला ,आणि त्यानंतर पूजेला बसलेली एक व्यक्ती त्याच्यासमोर आली आणि म्हणाली ,शहाणा असशील तर गप गुमानं ,इथून निघून जा नाहीतर त्याला शरण तरी ये ,एकदा का तो बाहेर आला की तुझा हा महादेव काहीच करू शकणार नाही ,त्यामुळे त्याच्या मार्गात अडथळा बनू नकोस ,एकतर त्याचा आमच्या सारखा गुलाम बन नाहीतर इथून निघून जा ,"
"अरे प्राण गेले तरी बेहत्तर पण मी तुमचा जो काही मनसुबा आहे तो यशस्वी होऊ देणार नाही ,"
"अगदी तुझ्याबापावर गेलाय तू ,अन खऱ्या अर्थाने माझा पुतण्या शोभातोय समर्थबाळा तू "
आणखी एक ओळखीचा आवाज ,नव्हे हा तर त्याच्या सख्या काकांचा आवाज होता ,
समर्थला हा आवाज खूप जवळचा ,नेहमी ऐकल्यासारखा वाटत होता ,त्याच्या डोक्याला मुंग्या लागल्या होत्या ,
"क..क..कोsssण आहात तुम्ही ?,आणि माझ्या काकांच्या आवाजात का बोलताय? ,काय केलंय माझ्या काकाला तुम्ही?" ,समर्थ आता घामाघूम झाला होता ,
"किती सोज्वळ बाळ आहे की नाही पुजारीबाबा आमचं ,ज्याला त्याच्या काकांवर एवढा विश्वास आहे ", आता त्या व्यक्तीं हातात मशाल घेऊन समर्थजवळ आल्या आणि त्यांनी त्यांच्या तोंडावरची टोपी बाजूला केली ,त्यांना बघून समर्थ चक्कर येऊन खाली पडला ,ते दुसरे तिसरे कुणी नसून त्याचे काका आणि मंदिराचे पुजारीबाबा होते .......
(क्रमश: )