}
Latest Bhaykatha :
Showing posts with label अघोर-Marathi Horror Story. Show all posts
Showing posts with label अघोर-Marathi Horror Story. Show all posts

अघोर अंत-Marathi Horror Story Aghor-Part 18 -End of the story

| 1comments

अघोर अंत-Marathi Horror Story Aghor-Part 18 -End of the story

लेखक : कनिश्क हिवरेकर
“जखोबाsss...?” जयदेव धावतच जखोबाजवळ पोहोचला तोपर्यंत त्यांच्या पायाचा त्या काळोखातून आलेल्या उपद्रवाने लचका तोडला होता वेदनेच्या कळा त्यांना अगदी असाह्य्य झाल्या होत्या. बघता बघता आता संपूर्ण वाडा काळोखात बुडून गेला होता उरला सुरला प्रकाश होता तो फक्त कडकडनाऱ्या विजांचा... तसे तो गडी देखील जखोबाच्या दिशेने धावत आला त्यानेही जखोबाचा एक हात खांद्यावर घेतला व जखोबाला आधार दिला.. “ मालक...आव काय झाल ह्ये...आता इथन बाहेर कस निघायचं आपण...?” त्याच्या चेहऱ्यावर भय अगदी स्पष्ट दिसत होते... “तोsss....तो इथे नाहीये...त्याचा मुहूर्त आहे...आणि शेवटचा बळीदेखील...” जखोबा जयदेवकडे पाहत म्हणाले... “ म्हणजे संध्या ? संध्याच्या जीवाला धोका आहे...”
“होय...! माझ्या पोरीच्या जीवाला धोका आहे.” जखोबा कण्हतच बोलून गेले...ते ऐकून मात्र जयदेवची मानच आश्चर्याने त्यांच्याकडे वळली... “काय ? तुम्ही...म्हणजे तुम्ही संध्याचे सख्खे वडील आहात ? म्हणजे....म्हणजे संध्याची आई तुमची...”
“हो ती माझी सर्वस्व होती परंतु या नराधमाने तिला आणि माझ्या होणाऱ्या पोरीला हिरावून घेतले माझ्यापासून...अतोनात यातना दिल्या त्याने माझ्या सावित्रीला...माझी सावित्री...! ” जखोबाच्या चेहऱ्यावर दुख , दुःख, वेदना स्पष्ट जाणवून येत होते..
“जखोबा...! इथून वाड्यातून बाहेर निघण्याचा नक्कीच कुठला न कुठला मार्ग असेल तो आपल्याला शोधायला हवाय...! नाहीतर आपल जिवंत राहणे अगदीच अवघड होऊन जाईल... “चला इथून...!”
“होय मालक ! चला लवकर...!” तो गडी म्हणाला...जयदेव आणि त्याने जखोबाला चालायला आधार दिला...जयदेवने एका हातामध्ये आपले खिशातील लायटर काढून पेटवले तेवढाच एक प्रकाश त्यांना अगदी आधार देणारा वाटू लागला होता...वाड्याच्या आवारातून त्यांनी काढता पाय घेतला...ओसरीवरच्या अंधारात पायऱ्या चढत चढत तिघेही वाड्याच्या कोपऱ्यातून प्रत्येक खोली उघडून पाहू लागले...जर नशिबाने एखाद्या खोलीची खिडकी उघडी असेल तर त्यामधून बाहेर पडता येईल...जयदेव जातील त्या प्रत्येक खोलीस उघडून पाहू लागला पण आतमध्ये किरर्र काळोखाशिवाय दुसर काहीही नव्हत...आता खालच्या मजल्याची एकच खोली बाकी राहिली होती. जयदेव तीहि उघडून पाहण्यासाठी तिच्या जवळ पोहोचला त्याने दरवाज्याला हात लावलाच होता कि तेवढ्यात “थांबा जयदेव...!” जखोबाने त्याला आडवले... जखोबाने मागे वळून संपूर्ण वाड्याची एकवेळ टेहाळणी केली जखोबास संशयाची सुई टोचली होती. “काहीतरी वेगळ आहे खूप वेगळ आहे...” जखोबा म्हणाले... “म्हणजे ? काय म्हणायचंय तुम्हाला जखोबा ?” जयदेवने जखोबाला विचारले... “ हे अस होऊच शकत नाही... कुठल्याहि खोलीमध्ये एकही खिडकी नाहीये...! हे शक्यच नाहीये...हा...हा भ्रम आहे...जयदेव हा भ्रम आहे चकवा आहे हा.”
“मग आता...हे ओळखायच कसे कि खरा मार्ग कुठून आहे... ? कुठ दडला आहे तो मार्ग कसे कळणार आपल्याला ?” जयदेव म्हणाला जखोबादेखील विचारात पडले... “या भ्रमाचा तोड एकाच वाक्यात केला आहे... अशी गोष्ट जी प्रकाशात उपस्थित असून देखील त्याचे किरण त्या गोष्टीला स्पर्श करू शकत नाहीत.”
“काय ? म्हणजे ? हे काय आहे काय असू शकते ती गोष्ट आणि आता तर प्रकाश हि नाहीये त्या गोष्टी...”
“हिहीहीईsss...संपती मार्ग सर्व,
काळोख दाटुनी येती,
संकटे चहूदर पसरती
रक्त तुझ ते सांडून वाहती
मांस कचलचक्यात तुटती..
किडे पडतील हो तुला किडे प्रेताला तुझ्या कुठे जाशील...“ जयदेव जखोबाच्या कानावरती तो आवाज पडला... “तो आलाsss....धाव जयदेव धाव...” जखोबा जयदेवला ढकलतच धावण्यासाठी सांगत हात लावणार होते कि जखोबाला आपल्या शेजारी फक्त पोकळी जाणवली जसे जवळ कुणीही उभे नाहीये...इकडे जयदेव हि न जाणे स्वतःला कुठल्या दिशेत अडकलोय हे पाहत होता. आणि तिघेही एकमेकांपासून आता वेगळे झाले होते. माया घडली होती काळ पिसाळलेल्या श्वापदासारखा वाड्यात जबडा वासून फिरत होता त्याच्या हुकुमावरून सैतान सुटला होता भक्ष्य शोधत आपल्या सावजावर आघात करून प्रहार करून त्यांची शिकार...करून त्यांना ठार मारण्यासाठी तो सज्ज झाला होता. मायाचक्र , धुकेरी वलये नजराणा अंध करत होती मेंदूच्या विचारचक्रांना तात्पुरते ग्रहण लागले होते दिशेच भान नव्हत धरती सरळ कि उलटी कळत नव्हते.. पाऊले मात्र कशावरती तरी टेकले आहेत हे जाणवत होत...
“मालकsss ???? मालक वाचवा...माsssलsssकssss....” वाड्याच्या भिंती जणू एके जागी बसून फक्त रक्तरंजित तमाशाचा मृत्यूच्या भयंकर खेळाचा आस्वाद घेत होत्या... मार्ग मिळत नव्हता रात्र अजून विषारी होऊ लागली... जखोबा जयदेव दोघांच्याहि कानावर एक जीवघेणी आर्त किंकाळी पडली..ती किंकाळी वाड्याच्या बाहेरपर्यंत पोहोचली... “ हे काय होत ?” संध्या विश्वास दोघेही विहिरीच्या अगदी काठावर येऊन ठेपले होते...विश्वासने दारावरचा कंदील काढून सोबत घेतला आणि त्याच्या प्रकाशात खाली विहिरीमध्ये पाहिले जाळ्यानमुळे आतमध्ये काय होत हे दिसण मुश्कील होत कंदिलाचा प्रकाश हि तिथपर्यंत पोहोचत नव्हता...विश्वासच्या नजरेस तेव्हा त्या विहिरीत जायच्या पायऱ्या दिसल्या... “संध्याsss...?” विश्वासने एकवेळ संध्याकडे पाहिले...त्याच्या नजरेमध्ये तिला जणू निरोपच दिसून येऊ लागला. विश्वास काही बोलणार होताच कि संध्याने त्याच्या ओठांवर आपला हात ठेवला...नकाराने मान हलवली... “नाही...बोलू नकोस....बस एवढच कर....जे मी पाहिले ते खोटे ठरव...माझ्यासाठी आपल्या अनुसाठी तुला परत यायचं आहे...” विश्वासने संध्याचा हात हाती घेतला... “हो...! मी येईन...!मी परत येईन...!” विश्वासने संध्याचा हात आपल्या हातातून सोडवला निजलेल्या अनुचा माथ्यावर हात फिरवून विश्वास हातात कंदील घेऊन खाली त्या विहिरीच्या पायऱ्यावरून उतरत रस्त्यात आडवे येणारे जाळे काढत थोड खाली जाताच खडखड असा आवाज झाला विश्वासने तो आवाज ऐकला आणि पुढचे पाउल टाकलेच कि तोच त्याच्या पायाखाली असलेल्या एका दगडाचा भुगा भुगा झाला आणि विश्वासचा पाय सटकला... विश्वासने कसाबसा आपला तोल सांभाळला...त्या क्षणी मात्र विश्वासला असे वाटले आपण आता खोलवर खाली पडणार पण तुटलेले दगड खाली त्या विहिरीच्या तळाशी जाताच पाण्याचा डबकण आवाज झाला..पण जरा वेळ घेऊन तो आवाज आला विश्वास समजून गेला कि पाणी जास्त खोल नाहीये. एक एक पायरी उतरत विश्वास खाली त्या अंधारात जाऊ लागला...
“गण्याsss ...?” जखोबा त्या गड्याची किंकाळी ऐकून हादरून गेले होते.जयदेव जागीच पावसाच्या धो धो कोसळत्या थेंबामध्ये जमिनीवर आपले दोन्ही गुडघे टेकून बसला... जखोबाने आपले दोन्ही हात पाठ मागे कशाच्या तरी आधारे टेकवले...पापणीत आसवाचे थेंब ओघळून गालावरती येत होते. “सावित्री...मला माफ कर...! मी हरलो...! आज आपली मुलगी मला मिळाली आणि मी तीच साध रक्षण करू शकत नाहीये...! मार्ग दाखव सावित्री...! मार्ग दाखव...!” जखोबानी आपले दोन्ही डोळे बंद करून सावित्रीचा चेहरा समोर आणला...आणि अचानक एक कडकडकरणारी वीज वाड्याच्या माथ्यावर आसमंतामध्ये चमकू लागली...तब्बल तीन वेळा अगदी ठराविक कालावधी अंतराने ती वीज अवकाशात कडाडू लागली जखोबाने ते पहिले...इकडे जयदेवने आपली नजर वरती केली... “हा लख्ख प्रकाश...!” जयदेव त्या विजेकडे पाहतच राहिला... “अशी एक गोष्ट जी प्रकाशात उपस्थित असते...” जयदेवास जखोबाचे ते शब्द ते पद्य ऐकू येऊ लागले त्याच्या डोक्यात ती गोष्ट वारंवार घुमू लागली... “अशी गोष्ट....जी...जी..प्रकाशात उपस्थित आणि...आणि....अस्पर्श्य किरणानी....” तोच जयदेवने विचारात गुंतवलेले आपले डोळे खाडकन उघडले जणू त्याला त्याच उत्तरच मिळाले होते जयदेवाचा चेहऱ्यावर जणू विजयाच हास्य उमटले आसमंतात कडाडणाऱ्या विजेंच्या थयथयाटीखालीच जयदेव उभा राहिला...आणि त्याच्यापासून काही दूर अंतरावर खुद्द काळ येऊन उभा राहिला होता गोविंदपंताचा हुकुमी गुलाम अघोऱ्या आता आपल्या भयंकर रुपात अवतरला होता जयदेवने एकवेळ अवकाशात पाहिले विजेंच्या लखलखाटीचा त्याने वेध घेतला आणि आपल्या चारीही बाजूनी नजर फिरवत जयदेव पाहू लागला...तशी पहिली वीज कडाडली जयदेवने पहिले तेच मायावी दरवाजे तेच भ्रम पुनश्चः उभे राहिले होते. जयदेवला कळून चुकले होते मार्ग सापडला होता आता फक्त वेळ बाकी होती ती म्हणजे मृत्यूशी शेवटची झुंज देण्याची त्याला चुकवण्याची...जयदेवकडे फक्त शेवटचा एकच पर्याय एकच मार्ग उरला होता... “जी प्रकाशात उपस्थित पण अस्पर्श्य अशी किरणास...म्हणजेच छा..या...!”
***
विश्वासने अखेरीस विहिरीच्या तळाशी आपले दोन्ही पाय ठेवले...कंदिलाच्या प्रकाशात विश्वासने खाली उतरून पाहिले कि कांबरेएवढे पाणी त्या विहिरीच्या तळाशी साचले होते हिरवट शेवाळ आलेले अगदी कुबट , सडके व घाणेरडे आणि त्याच्याहून जास्त तीव्र असा घाणेरडा वास जसे एखादे मृतदेहच तिथे सडत आहे. विश्वासने आजूबाजूस नजर फिरवली विहिरीमध्ये अगदी अनुकुचीदार दगडे रोवले गेले होते जर वरतून कोणी एखादे खाली कोसळले तर त्याची गाठ थेट मृत्यूशीच...त्या सोबतच विश्वास कंदील घेऊन पुढे पुढे सरकू लागला पायाखाली गाळ,चिखल येत होता...विश्वास विहिरीच्या अगदी मधोमध येऊन उभा राहिला अजून पुढे सरकणार तोच विश्वासच्या पायाशी काहीतरी ठेचकाळले..कदाचित दगड होता तो विश्वासने त्यावरती आपले पाउल टाकले तोच विश्वासला जाणवले कि तो दगड ओबडधोबड नसून अगदी सपाट असा बसण्याच्या आसनासारखा होता विश्वासने हातातला दिवा वरतीच धरला...एक जोरदार श्वास घेऊन विश्वासने त्या पाण्यात मनाविरुद्धच बुडी घेतली...दिव्याच्या वरच्या प्रकाशाने तळाला असलेल्या गोष्टी किंचित नजरेस पडत होत्या..विश्वासने तसे आणखीन खाली जात एका हाताने दिवा पाण्याबाहेरच धरला व हाताने तिथल्या चिखलामध्ये गाळामध्ये आपला हात घातला पण श्वास अपुरा पडल्याने विश्वास पाण्यातून बाहेर आला.... “स्स्सह्ह्ह....स्स्सह्ह्ह...” जोरजोरात श्वास घेत विश्वासने नाकातले तोंडातले पाणी थुंकून बाहेर काढले...विश्वास परत एकदा खाली जाणार होता त्या साठी त्याने आपला श्वास परत एकदा रोखला होताच कि...विहिरीच्या भिंतीच्या बाजूकडून एक आवाज विश्वासच्या कानावरती येऊन पडला... “बुद्बुद्बुदssss.....” जसे कि पाण्यातून कसल्यातरी मोठ्या बुडबुड्याच निघाल्या होत्या. विश्वासने पाहिले तसे अचानक त्या थांबल्या...विश्वासला ते भासले कि तिथे पाण्यामध्ये काहीतरी वावरत आहे...विश्वासने परत एकदा श्वास रोखला आणि अजून एक त्याने पाण्यात बुडी मारली यावेळी गाळामध्ये विश्वासने खोलवरती हात घातला, तर त्याच्या हातास काहीतरी लागल काहीतरी कपडा काहीतरी कठीण अस विश्वासने हात घालून ते गाळातून बाहेर उपसण्याचा प्रयत्न केला....पण ते एका हाताने निघणे अशक्य होते विश्वासला....अखेरीस विश्वासने हातातील दिवा तिथे पाण्यात सोडून दिला विश्वासच्या हातामधून जसा दिवा निसटला तसे... पाण्यात चारीही बाजूनी बुडबुड्या उठायला सुरुवात झाली...विश्वास बाहेर निघाला त्याने पाहिले कि आपल्या चारीही बाजूनी काहीतरी जवळजवळ येत आहे...तोच अचानक विश्वास आपोआप पाण्यात खाली खेचला गेला... “आहsss...संध्यsss....संध्य....” हि तीच विहीर होती ज्या मध्ये गोविंदपंताने न जाणे कितीतरी कोवळ्या मुलींचे निर्घृण रित्या बळी दिले होते त्यांचेच अतृप्त गुलाम बनून राहिलेले आत्मे विश्वासला आता नजरेसमोर दिसू लागले....एक एक करून त्या सर्वानीच विश्वासला घेरले...इकडे अचानक जोरदार पाउस सुरु झाला होता वरती संध्याने अनुला आपल्या पदराने झाकून घेतले होते गावातला जमाव अजून हि बऱ्याच अंतरावर होता.आतमध्ये असलेला दिवा चटकन विझलेला पाहून संध्याला धडकीच भरली.... “विश्वासsss??? विश्वासssss ?” संध्या विहिरीच्याकडेवरून विश्वासच नाव जीवाच्या आकांताने घेत त्याला बोलावत होती... “विश्वास...??” तोच त्या विहीरजवळ बांधलेलं गोविंदपंताचे काळे अघोरीमंत्र आपल्या जागेवर एका काळसरधुरातून प्रकट झाले...दोन्ही हात वाढवून आता ते थेट संध्याच्या दिशेने येत होत तिला त्या विहिरीमध्ये ढकलून द्यायला.....
जयदेवने आपल्या भोवती नजर फिरवली विजेच्या कडकडाटीमध्ये त्याने पाहिले कि कुठल्याहि दरवाज्यावरती त्याची छाया त्याचे प्रतिरूप त्याची सावली पडताना दिसून येत नव्हती कारण ते सर्व मार्ग मायावी होते...सत्य कधीच दडून राहू शकत नाही वास्तविकता नेहमीच उघड होते. “जयदेव...! time for some move...शोध शोध...तुझी सावली कुठल्या दरवाज्यावरती पडेल तोच असेल इथून सुटकेचा मार्ग...जयदेव...चल..” आणि अखेरीस जयदेवाचा अंदाज अगदी खरा ठरला आणि अवकाशात तिसरी वीज कडाडली आणि जयदेवच्या नजरेस अखेरीस तो मार्ग पडला ज्याच्यावरती त्याची गडद आणि महाकाय छाया परावर्तीत झाली...आणि त्याच क्षणी अघोऱ्याने चवताळून आपल्या जागेवरून जोरदार धाव घेतली मृत्यूचे दोन्ही हात पसरवून...एका घासातच अघोऱ्या जयदेवाचा अंत करणार होता...जयदेवने त्याच्याकडे पाहिले आणि अगदी चपळाईने त्यादरवाज्याच्या दिशेने धाव घ्यायला सुरुवात केली अघोऱ्याने दोन तीन ढांगामध्येच जयदेवला गाठलं होत वेळेची गती जणू सेकंदाचे दहा सेकंद होऊन मंदावली...जयदेवने जी चपळाई दाखवली अघोऱ्याने घाव घातलाच होता आपल्या शिकारीवर प्रहार केलाच होता कि जयदेव धावता धावता स्रर्र्क्न गुडघ्यावर खाली मुडपला तोच जमिनीवरच्या पावसाच्या पाण्यानी जयदेव घसरत धडपडत थेट दरवाज्याच्या दिशेने घरंगळत गेला...इकडे सावज हुकले, शिकार चुकली चवताळलेल्या अघोऱ्याने जमिनीवर पाय टेकवले आणि थेट जयदेवला मारण्यासाठी त्याच्याकडे धावत सुटला त्याच्या हुकुमाचा आवाज परत एकदा त्या वाड्यात घुमला... “धर त्याला...मारsss....मूर्खा....मार त्याला पकडsss....” गोविंदपंताचा हुकुमच होता तो परंतु अखेरीस जयदेव त्या दरवाज्यात पोहोचलाच...जसे जयदेवाने त्या दरवाज्यास स्पर्श केला त्याचक्षनी गोविंदपंतांनी मांडलेले मायाजंजाळ एखाद भल मोठ कवच ताडकन फुटाव असे जागीच तुटून गेले...जयदेवने दरवाजा उघडताचक्षणी वाड्यातील एक एक दिवा एक एक कंदील झप झप झप करत पेट घेऊन उजळू लागले....इकडे जखोबानी आपले डोळे उघडून आजूबाजूला आपली नजर फिरवली तेव्हा त्यानाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला... “त्याला समजले....त्याने करून दाखवले...जयदेवने करून दाखवले हे...” जखोबाच्या चेहऱ्यावरील चिंता अजून मिटली नव्हती. कारण मुख्य शत्रू सर्वक्रूर,घृणकर्मी असा अघोरीपंथीचा गोविंदपंत अजून हि त्या वाड्यात एका मोकाट सुटलेल्या राक्षसाप्रमाणे वावरत होता...तोच जयदेव जखोबाच्या नजरेस पडला... “जयदेवा...! इकडे..मी इकडे आहे ...!” जखोबाला समोर अगदी सहीसलामत पाहून जयदेवला धीर आला परंतु वऱ्हांड्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गडी गण्या त्याला पाहून दोघहि हादरून गेले... “जयदेवराव...आता माया सुटलीय...साखळी तुटलीय....वाड्याचा दरवाजा आता काहीक्षणासाठी उघडेल तुम्ही लगेच बाहेर निघा...मी मागून येतो...निघा तुम्ही लगेच निघा....” असे म्हणत जखोबाने जयदेवला एकप्रकारे ढकलतच वाड्याच्या चौकटीच्या बाहेर ढकलून दिले... आणि स्वतःच वाड्याचा दरवाजा बंद करून घेतला...ढगांचा गडगडाट सुरूच होता आज संपूर्ण निसर्ग धरती वारा पाणी आसमंत अग्नी संपूर्ण पंचमहाभूत साक्षी ठरणार होते त्या न्राधामाशी होणार मनुष्याच द्वंद्व... आज आपल्या कुटुंबासाठी आपल्या प्रेमासाठी मैत्रीसाठी जो तो झुंजला...आता वेळ होती मनुष्याची सैतानाशी झुंज... “अघोऱ्याsss.....नराधमा...आज इथे फक्त तू आहे अन मी आहे....आज माझे प्राण गेले तरी बेहत्तर परंतु तुझा या त्रिशंकूमधून या मृत्यूलोकातून नायनाट केल्याशिवाय मी इथून जाणार नाही...लाव जोर तुझा....दाखव मलाही पाहूदे तुझी ताकत....दाखव...” जखोबा वाड्याच्या वऱ्हांड्यात उभे गोविंदपंतास साक्षात ललकारत होता... “समोर ये...असा...चांडाळा...”
तोच वऱ्हांड्यात जखोबाच्या नजरेसमोर एक बलाढ्य शरीर उभ राहू लागल...त्याच हाडमांस बनू लागले त्वचेवर त्वचेचे आवरण चढू लागले शेवटी त्याचाच गोविंदपंताचा एक हुबेहूब आत्मा येऊन जखोबाच्या पुढ्यात उभा राहिला येताच क्षणी त्याने जखोबाची मान जसी चिमटीतच पकडली आणि एका झटक्यात त्याने जखोबाला उचलून दूर फेकून दिले...इकडे जयदेव वाड्याच्या बाहेर पडला त्याने विश्वास आणि संध्या दोघांचीहि शोधाशोध सुरु केली तेव्हा जयदेवने पाहिले एक भयानक काळ्याभोर धुराच्या वेटाळाच्या आतमधून एक पिशाच्च बाहेर निघून आल आहे आणि कुठल्याहि क्षणी ते संध्याला धक्का देणार होत पावसाच्या जोराने वाऱ्याच्या झोतामुळे जयदेव आपल्या डोळ्यांवरती हात ठेऊन संध्याच्या दिशेने जाऊ लागला तिला बोलवण्याचा तिला हाक मारण्याचा प्रयत्न करू लागला इकडे गावातून येणाऱ्या जमावाच्या मशाली देखील आता मात देऊ लागल्या होत्या....विहिरीच्या तळाशी विश्वास ला संपूर्ण चारीही बाजूनी पिशाचानी अतृप्त प्रेतात्म्यांनी घेरून ठेवल होत...विश्वासचा श्वास आता अपुरा पडत होता त्याचे श्वास बंद व्हायला आले होते डोळ्यांवर भुरळ येऊ लागली होती आणि तसाच विश्वास तिथेच गाळामध्ये बेशुद्ध झाला कि तोच त्याचा हात बेशुद्ध अवस्थेत जाऊन थेट त्या गाठोड्यावरती पडला...त्या गाठोड्यावरती विश्वासचा हात पडला न पडला तोच जणू एक लक्ख प्रकाश त्या विहिरीमध्ये अवतरला विश्वासच्या शरीरावर ताबा मिळवण्यासाठी आलेले सर्व पिशाच्च तिथेच जागीच राख होऊन गेले त्याच क्षणी संध्याच्या मागावर आलेले पिशाच्च देखील हवेच्या एका झापाट्याने जणू पावसाच्या थेंबानी वाहून गेले....परंतु विश्वास विश्वास मात्र बेशुद्ध अवस्थेतच पाण्यात बुडत होता संध्या अनुला कांबरेवर घेऊन त्याला हाका मारत होती परंतु विश्वासला मात्र एक शब्दहि ऐकू जात नव्हता बघता बघता त्याच्या ह्रदयाचे ठोके कमी पडू लागले...कि तोच पाण्यात त्या विहिरीत एक मोठा आवाज झाला कोणीतरी काहीतरी मोठ त्या पाण्यात आल होत कोणीतरी त्या पाण्यामध्ये उडी घेतली होती पोहत पोहत विश्वासपर्यंत तो पोहोचला...आणि तो होता जयदेव...आपल्या मित्राची मदत करण्यास जयदेवने सेकंद हि लावला नव्हता त्या विहिरीत अंधपणे उडी घेण्याचा...जयदेवने विश्वासला खांद्यावर घेतले तेव्हाच त्याचवेळी विहिरीच्या गाळात अडकलेल ते गाठोडे विश्वासच्या हाताला अडकूनच बाहेर पडले तीच गोष्ट जयदेवच्या नजरेस पडली...जयदेवला कळून चुकले कि हेच ते देव्हाऱ्यातील देव जे त्या सैतानाच्या एका फटक्यात नाहीसे झाले होते...जयदेवने विश्वासला उचलून विहिरीतून बाहेर काढले बघता बघता तोपर्यंत संपूर्ण गाव तिथे येऊन पोहोचला होता प्रत्येकाच्या हाती जळत्या मशाली दिवे काठ्या अवजारे होती...कारण जखोबाने सरपंचांस वाड्याच धुळीत रुपांतर करण्याची मदत मागितली होती...संपूर्ण संतप्त गाव वाड्याबाहेर जमा झाला होता...जयदेवने विश्वासच्या पोटातील पाणी दाबून दाबून बाहेर काढले...इकडे जखोबाची अवस्था अगदी क्षीण झली होती अतिक्रोधाच्या भरात गोविंदपंताने जखोबावर आघात वर आघात करायला सुरुवात केली.... “तू हरामखोर...अरे भाडखाऊ तेव्हा जर हि गोष्ट मला समजली असती....तर सावित्री संगे तुझा देखील मुडदा पाडला असता मी या वाड्यात....आता हि उशीर नाहीये झाला भोग...तुझ्या कर्माचे फळ...” जखोबा आपल्या तोंडून एक शब्द देखील खूप मुश्किलीने काढू शकत होते...गोविंदपंताचा प्रत्येक आघार , हर एक प्रहार...जखोबाला मृत्यूच्या मुखाशी घेऊन जात होता.. गोविंदपंताने अवकाशाच्या दिशेने दोन्ही हात उंचावले....रे चांडाळकर्त्या तामसा...शक्ती दे मला.....मलाssss..शक्ती दे... वाड्याच्या माथ्यावर ढगांनी वेडे वाकडे गोलाकार घ्यायला सुरुवात केली वाड्यातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात दडलेली भयंकर भयंकर पिशाच्च आत्मे एक एक करून सर्व गोविंदपंताच्या उरात शिरले...त्याने जणू त्याची शक्ती अद्वितीय रीतीने वाढू लागली होती.
“विश्वास तू ठीक आहेस न ? विश्वास ?” संध्या आणि जयदेव दोघेही विश्वासला बेशुद्ध अव्स्थ्तेतून जाग आली जड पापण्यांनी त्याने आपले डोळे उघडले... तसेच जयदेव आणि विश्वास दोघानाची हि नजर त्या गाठोड्यावरती गेली...जखोबाने आपले दोन्ही डोळे घट्ट मिटून घेतले... “आज माझ्या सिद्धीची शक्ती या दानवास हरवू सकत नाहीएत....गोविंदपंताने संपूर्ण पिशाच्च योनीच काबीज करायला सुरुवात केली होती....गोविंदपंत अखेरीस जखोबावरती शेवटचा वार करणारच होता कि तोच....विश्वास आणि जयदेव दोघांनीहि त्या काळ्या गाठोडंची गाठ उकळून घेतली...कि त्याचक्षणी प्रभू श्रीरामांची एक मूर्ती त्या गाठोड्यातून बाहेर पडली... गोविंदपंतने बघता बघता सर्व वाड्यावर आपल प्रभूत्ब मिळवलं होत देवाच्या उपस्थितीने सैतानाच्या बिनबुडाच्या पोकळ अश्या शरीरावर देवाच्या असण्याने फक्त असण्याने त्याची संपूर्ण शक्ती अगदी क्षीण झाली होती... जखोबा समजून गेले कि याची शक्ती आता देवाच्या शक्तीपुढे काहीही चालणार नाही तो आपला अखेरचा डाव वापरेल....आणि तसेच झाले गोविंदपंतांनी त्याच शरीराचा आधार घेत स्वतःचा आकार वाढवला एकेक्क करत सर्व प्रेत त्यांच्या भोवती उभे राहिले....जखोबानी मदतीस बंद केलेले आपले डोळे उघडले आणि आपल्या बाजूस पाहिले....तर तिथे साक्षात संध्याची आई अर्थात....सावित्रीदेवी येऊन उपस्थित होती. “ तू हरलास ! राक्षसा ! तू हरलास ! “पाहता पाहता वाड्याच्या अवतीभवती असंख्य काळे कावेल जमू लागले.... वाड्याच्या चारीहीबाजूनी तडतड तडतड करत चिरा जाऊ लागल्या....संध्याने ते पहिले आणि दरवाज्यात येऊन तिने आपल्या बाबाना बोलवण्यास सुरुवात केली परंतु जखोबाची जणू वेळच आली होती त्याने अखेरच्या नजरेने संध्याच्या दिशेने पाहिले संध्या विश्वास जयदेव तिघेही दरवाज्यातून आतमध्ये येऊन ठेपले होते....त्यांच्या डोळ्यासमोरच अघोऱ्याच भयंकर रूप राख राख होऊन जमिनीवर पडल होत अवकाशातून , नरकातून विजेची धार येऊन गोविंदपंताच्या आत्म्याचा खेच करत होती हा वाडा गोविंदपंताच्या शक्तीचा त्याच्या गुलामांच्या राहण्याचं दडण्याच,सर्वकाही त्यांच्या जिवंतपणी व्हायचं कदाचित आज याचा हिं अंत झाला होता... “ संध्या...? संध्या इथून बाहेर चल इथे थांबणे बरोबर नाहीये हा वाडा पडतोय याची एक न एक दिवस अशीच अवस्था होणार होती संध्या...? नको जाउस तिकडे ऐक माझ” विश्वासने जबरदस्ती संध्याला ओडून बाहेर काढले....तोच संतप्त जमावाने आजपर्यंत घडलेली प्रत्येक चूक गोविंदपंतावर असलेला राग त्यांनी वाड्यावरती काढला... पाउस थांबला परंतु संध्याने आपला वडीलच जन्मदाताच गमावला होता संध्या विश्वासच्या खांद्यावरती डोक ठेऊन हुंदके देत देत रडत होती....आणि इकडे त्या सर्वांच्या नजरेसमोर गोविंदपंताच साम्राज्य धुळीस मिळत होते. कावळे कावsss कावsss... करू लागली... श्वापदे जणू स्वतंत्र मुक्तीमार्गानेच स्वच्छंद वावरू लागली...संपूर्ण वाडा जळून खाक झाला त्याची एक व एक वीट धुळीस मिळून गेली...त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्या आणि विश्वास दोघांनीही सावित्री आणि जाखोबाच पिंडदान व श्राद्ध घातले.. “अखेरीस गाव मुक्त झाला विश्वाराव.....गाव मुक्त झाला..तुम्ह्या कृपेने...”
विश्वास संध्या व जयदेव तिघांनीहि त्या गावातली कटूच आठवणी मनात ठेवल्या होत्या परंतु संध्याचे वडील मिळण्याचा आनंद तिच्यासाठी वेगळाच होता पोरीसाठी त्यांनी आपला प्राण दिला होता. विश्वास संध्या जयदेव तिघेहि एका नवीन सूर्याच्या उगवतीच्या मार्गावर आपल्या घरी परतले आणि सुखाने नांदू लागले.....
समाप्त....!! लेखक कनिश्क हिवरेकर...



MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,


Continue Reading

अघोर.. अंतारंभ-Aghor Marathi Horror Stories Part-17

| 0 comments

अघोर..
अंतारंभ

लेखक : कनिश्क हिवरेकर .....
जयदेवने आपल्या नजरेसमोर अडवलेला हात बाजूला काढला तसा त्याच्या नजरेसमोर काळजाचा ठोका चुकवणार दृश्य होत...साक्षात अघोऱ्याच पोकळ सैतानी शरीर आपला भाजणार हात हातात घेऊन तडफडत उभ होत जयदेवने आपल्या उभ्या आयुष्यात अस काहीच पाहिलं नव्हत. त्या दृश्याने जयदेवच्या अंगाला कंप सुटला...भीतीने , धास्तीने त्याच काळीज घश्यात येऊन अडकल होत...परंतु हे काय घडले ? कसे घडले...अदृश हवेत उपस्थित गोविंदपंताच्या क्रोधाग्नीची ज्वाला संपूर्ण खोलीत जाणवू लागली...पाहता पाहता अक्षरशः भिंतीच्या कान्याकोपऱ्यामधून झळया निघू लागल्या वाफा निघू लागल्या...आजवर ज्या सैतानासमोर कुणीही टिकू शकले नाही त्याने जयदेवला एक साधारण स्पर्श केला त्याचा संपूर्ण हात राख राख झाला...जयदेवने आपल्या स्वतःच्या अंगावर शरीरावर एक नजर टाकली....दुसरा हात पाहण्यासाठी जयदेव मागे वळला...जाळ्या, कोष्ट्या सर्व बाजूला होऊन जी गोष्ट जयदेवच्या हातामध्ये आली होती ती गोष्ट...ती जागा होती....देवाच देवघर....ज्याच्या चारीही बाजूनी साखळदंड होते. मधोमध काळ्या कापडामध्ये काहीतरी गाठ बांधून ते ठेवण्यात आल होत. जयदेवने परत वळून समोर पाहिले...तो सैतान तिथेच तडफडत होता...जयदेवाला कळून चुकले.....परमेश्वराने जणू कौल दिला... “मी आहे...!माझ अस्तित्व अजून हि आहे...!”
“पsss...र....” त्या खोलीच्या कंपनात गोविंदपंताचा दबका आवाज येऊ लागला त्याला ते नाव घ्यायचं होत परंतु सैतानाला बधीत करणार परमेश्वराच नाव हे त्याच्या मुखात येत नव्हत....रागारागात देवाच नाव हि त्याच्या जिभेला चटके बसवत होत... “तू...! तू पुन्हा.... मध्ये येऊ नकोस ...माझ्या...! तुझे मंत्र , तुझी लीला ,तुझी क्रीडा सर्व उच्चारून या कंठात आता विष भरल गेलय.....बहिष्कार आहे तुझा माझ्या राज्यात तिथेच सडून रहा तू....! तिथेच सडून रहा तू....! हsssट्ट...” जयदेवाच्या कानांवरती तो अदृश हुकुमी आवाज पडू लागला होता जयदेवला समजले आपण यावरून जराहि हात बाजूला काढला तर मृत्यू निश्चित आहे... जयदेवामध्ये जणू परमेश्वराच्या पवित्रस्पर्शाने हिंमत भरली गेली...जयदेवास शब्द फुटले...त्याचा हि आवाज त्या खोलीमध्ये गरजू लागला... “तू...! तू जो कोणी असशील...! तुझ्या नजरेसमोर सर्व उघड आहे...! देवाची शक्ती तेव्हाही प्रबळ होती आणि आज हि आहे...तुला भय आहे तुझ्या विनाशाच ....पहा तुझ्या प्याद्याची तुझ्या गुलामाची काय अवस्था आहे... तुझा अंत जवळ आला आहे....तुझा अंत जवळ आला आहे...ऐकतोयस ना...” जयदेवपुढे काही बोलणार कि तेवढ्यात “ ह्याsss...” एका क्षणात असा जोरदार हवेचा झपटा त्या खोलीत जो पसरला त्या झपाट्याने एक विचित्र गोष्ट घडली...जयदेवला त्याचक्षणी संवेदना जाणवल्या जसे कि त्याच्या हाताच्या स्पर्शात असलेला तो देवाचा देव्हारा तिथून नाहीसा झाला होता. आणि बघता बघता खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यामधून आगीचे लोट न लोट उठून येऊ लागले होते. “खीहिहीईsss....कुठेय रे तो....ह्याहाहाहाsss....कुठय तुझा तो...द्द ...द्दे...बोलव त्याला... आगीच्या जळणाऱ्या लोटीचा प्रकाश भिंतीवरती पडला जयदेवची नजर एका भयंकर प्रदीर्घ आकाराच्या सावलीने आपल्यावर खेचून घेतली...जिचा मृत्यू तांडव त्या ज्वालेच्या आरपार त्या भिंतीवरती थैमान घालताना दिसून येऊ लागला होता.
***
“सध्या..वेळ नाहीये पोरी माझ्या स्पष्टीकरणास...आता एकमात्र उरल आहे ते म्हणजे तुमचा जीव वाचवणे..संध्या पोरी त्याचा क्रोध आता अनावर झाला आहे....तो कुठल्याहि क्षणी तुम्हाला मला किंवा जयदेव इतर कुणालाही वाटेत जो येईल त्याला मृत्यूच्या दारात तो ढकलून देईल....आपल्याला लवकरात लवकर इथून निघायला हवय...चला माझ्या सोबत आता वाड्यात थांबणे धोकादायक आहे...चला लवकर इथून...मी याचा नंतर बंदोबस्त करेन...”
“ तुम्ही....? तुम्ही माझे बाबा आहात आणि...आजवर मी हेच समजत राहिले कि माझे वडील माझ्या लहानपणीच....” संध्या जड पावलांनी जखोबाच्या दिशेने येत आसवे भरलेल्या डोळ्यांनी पाहत अगदी हुंदक्याच्या आवाजातच उद्गारली... “पोरी...! मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे...तुझ्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे देईन....मी माझी सावित्री गमावून बसलो आहे पण मला माझी माझ्या सावित्रीची शेवटची आठवण तिचा शेवटचा अंश नाही मला गमवायचा...चला विश्वासराव...ऐका माझ...लवकरात लवकर या वाड्यातून बाहेर चला...”
“संध्या ते म्हणतायत ते अगदी बरोबर आहे...!” अनुला उचलत विश्वास म्हणाला... “चल...! हि योग्यवेळ नाहीये...” डोळे पुसत संध्या उत्तरली... “हं...ठीक आहे चला...” तसे जखोबा त्यांना पुढे घालत स्वतःमागून निघाला...जसे ते तिघेही त्या खोलीमधून बाहेर निघाले... “ थांबा ! आपण काहीतरी विसरतोय...! जयदेव कुठे राहिला ? तो कुठेय ?”
तोच समोरून ते दोन्ही राखणदार जखोबाजवळ धावत आले... “ मालक....! आव त्ये...! त्येsss...”
“त्ये साहेब....त्या येड्या गंग्याच्या माग माग गेले हत...आम्ही त्यांची इथ वाट बघतोयसा पण अजून त्यांचा काय पत्त्या नाय...” त्यांच्या पैकी एकजण म्हणाला... “कायsss? गंग्या आणि जयदेव दोघेही नाहीसे झाले ? कसे ? कुठे ?” विश्वास त्यांच्यावरती ओरडला... “साह्येब आवsss...आम्ही त्यांना नको म्हणल पण त्यांनी काय ऐकल नाय...अन त्या तिकड त्या अंधारान त्या कोपऱ्यात गेले कंदील हातात घेऊन....” जखोबा विश्वास दोघेही त्या दिशेनी अंधारात कोणी दिसते का ते पाहू लागले तोच जखोबा त्या दोघांना म्हणाला... “ए ह्ये बघा ! आत्ताच्या आता तुमच्या पैकी कोणतरी गावात जा! अन सरपंचाला कळवा के जखोबान निरोप धाडलाय...अन बस एवढच म्हणा...
“वेळ आलीया...जखोबान शेवटची मदत मागलीया...” तेवढ आपल्या ध्यानात ठेऊन तो गडी वाड्यातून बाहेर निघाला पावसात चिखलात विजांच्या कडकडाटीतच तो गावाच्या दिशेनी सरपंचाकडे धावत निघाला...
धावता धावता त्याला जाणवले कि त्याच्या मागावर अगदी त्याच्या मागोमाग एखाद्या पिसाळलेल्या जनावरांसारख ते त्याच्यावर धावा बोलून जात होत. परंतु त्याने आपले पाय मात्र थांबवले नाही...उरात आग होत होती, घश्याला कोरड पडली होती पोटरीत गोळे येत होते पायात काटे बोचत होते पण तरीदेखील तो थांबला नाही...कारण काही अंतरावर मदत होती. त्याचाच जोडीदार इथेच वाड्यातच जखोबाजवळ थांबला होता... “ जयदेवsss...?” विश्वास जखोबा दोघेही मिळून जयदेवच्या नावाने त्याला पुकारत होते. पण जयदेव जमिनीवरती आगीच्या भडकत्या धगधगत्या ज्वालेमध्ये होरपळून बेशुद्ध पडला होता. “जयदेवsss....! जयदेव..!” जयदेवच्या कानावरती तो आवाज पोहोचू शकत नव्हता... त्याच्या शरीरातदेखील कसलाच त्राण उरला नव्हता...अंगावर जागोजागी होरपळून निघाल होत. तोच कोणीतरी अलगद त्याच्या पाठीवरती आपला हात ठेवला...त्या स्पर्शामध्ये एक थंडावा होता. बंद पडलेल्या त्याच्या मस्तकाच्या सर्व चेतना तिथेच जणू तडतडून जाग्या झाल्या त्याला आपले शरीर जाणवू लागले..हाताची बोटे पाय मान खांदे सर्वकाही अशक्तपनामुळे जयदेवच्या नजरेत फरक पडला होता आजुबाजूच सर्व त्याला अंधुक दिसत होत... “उsssठ...!” जयदेवला त्याच्या कानावर एका लहान मुलीचा आवाज ऐकू आला... “क...कोण...?” जयदेव थरथरत्या ओठांनी उद्गारला... “ उठ...तुझ कर्म इथच नाय र संपत गड्या...” जयदेवच्या डोळ्यांवरची झाक उतरली त्याने समोर पाहिलं कि एक लहान मुलगी आणि एक माणूस त्याच्या समोर उभे त्याला पाहत होते... “माझी पोर भेटली मला...माझी पोर भेटली...” समोर दोन पांढरक्या सावल्यामध्ये दोन पवित्र आत्मे जयदेवच्या नजरेस पडले....तो गंगाराम आणि त्याची मुलगी छ्की होती “तुम्ही दोघ ? कसे...?” त्यावर छकु त्याला म्हणाली... “आमास्नी त्या बाईनी पाठवल हाय...”
“काय? कोण बाई ?कुणी पाठवल ?” जयदेव धापा टाकतच त्या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करत होता परंतु गंग्याने त्याच्याकडे पाहून बस एवढच म्हटल “त्या भेटतील तुम्हाला...जे व्हायचं ते होऊन जाईल....” मुक्त होण्याच्या शेवटच्या क्षणी त्यांनी जयदेवला आधार दिला...त्या दोघांनीही जयदेवला पाहून आपले हात जोडले व शेवटचा निरोप घेत गंगारामने छ्कीचा हात आपल्या हाती घेतला. ते दोघेही पांढऱ्याशुभ्र धुराच्या वलयात विरघळून गेले...त्या सोबतच आगीच्या ज्वालाही विरळ होऊ लागल्या... विझू लागल्या... “जयदेवsss....?” त्या आगीचे लोट कमी होताच जयदेवला विश्वासचा आवाज ऐकू आला... “ विश्वास ??” जयदेव हाताच्या आधारेच जागेवरती उठून उभा राहिला..एकवेळ त्याने मागे वळून पाहिले पण तिथे तो देव्हारा नव्हता...आतामात्र धोका वाढला होता. लवकरात लवकर विश्वास संध्या अनु तिघानाही या वाड्यातून बाहेर घेऊन जायला हव...जयदेवच्या मनात तो विचार आला जयदेवने खाली पडलेला अर्धा फुटलेला कंदील हातात घेतला त्याची ज्योत आणखीहि जळत होती त्याने तो तसाच उचलला व हेलकावे घेत भिंतीच्या आधारे दरवाजे उघडून त्या दोन्ही खोल्यामधून बाहेर निघाला... “वव...विश्वासsss...?” विश्वासची नजर त्या कोपऱ्यात असलेल्या दाट काळोखात पडली तिथून प्रकाश बाहेर पडत होत त्या उजेडातच हेलकावे घेतच जयदेव दरवाज्यातून बाहेर पडला... “जयदेव....जयदेवsss....” विश्वास धावतच जयदेवच्या जवळ गेला आणि त्याने त्याला आपल्या खांद्यावरती झेलले... “काय झाले तुला जयदेव ? हेय ? तू ठीक आहेस न ? जयदेव ?” जयदेवाने विश्वासला इथून निघण्याचा इशारा केला... “चल...स्स्सहः...चल विश्वास...इथे धोका....इथे धोका आहे आपल्या सर्वांच्या जीवाला....लवकर चल...”
“विश्वासराव घाई करा...जयदेव अगदी बरोबर म्हणतायत आपण लवकरात लवकर इथून निघायला हव नाही तर...” जखोबा आपल वाक्य पूर्ण करणार होताच कि संपूर्ण वाड्याच्या दाही दिशांना एक क्रूर भयंकर अस छद्मी हास्य घोंगावले....
आपापल्या जागेवर उभे विश्वास जयदेव जखोबा संध्या सर्वांच्या नजरावाड्यामध्ये चारीही बाजूनी त्या आवाजाच्या दिशेने घुमल्या... पाहता पाहता वाड्याचा मुख्य दरवाजा त्या चौघांच्याहि डोळ्यासमोर...
“क्र्रर्र्रsss क्र्रर्र्र्र......” आवाज करीत बंद झाला....आमावस्येची मध्यरात्र झाली होती...एक एक करत वाड्याच्या अवतीभवती नाना तऱ्हेचे श्वापदे जमून मृत्यूची विव्हळ घालू लागले....
“परमेश्वरा...!” जखोबाच्या तोंडून भीतीने भरपूर्ण असे देवाच स्मरणकरणारे उद्गार बाहेर पडले... “ बा...! जखोबा...काय आहे हे ?” अनुला छातीशी कवटाळून संध्या जखोबास बाबा म्हणणार होतीच कि तिने आपले शब्द अडवले... जखोबाचे जणू कान तरसून गेले होते ते ऐकायला पण सध्या काळ वेगळाच होता...
“आपण अडकलोय... त्याच्या जाळ्यात...सोबत रहा....काहीही झाले तरी वेगळे होऊ नका...जखोबाने आपल्या खिशातून काही अंगाऱ्याच्या पुड्या बाहेर काढल्या...आणि एक एक सर्वांच्या हातामध्ये दिल्या...
“ हि सर्वांकडे चिमुटभरच आहे...याचा वापर अत्यंत गरज पडेल तेव्हाच करा...! व्यर्थ घालवू नका...आणि अनुची काळजी घ्या..या सर्व घेराव करून उभे राहा...” जखोबा म्हणाले...तसे विश्वास जयदेव संध्या आणि तो राखणदार सर्व जखोबाच्या मागे एकमेकांच्या पाठीला पाठ लाऊन उभे राहिले विश्वास आणि संध्या दोघांनीहि अनुचे हात घट्ट धरले होते.... “पप्पा...! ,मला भीती वाटतेय...!” अनु म्हणाली... “ नाही बाळा ! काही नाही होणार हं...तू बस डोळे बंद करून रहा बर...मम्मा आहे न जवळ....” संध्या अनुला म्हणाली व तिने चिंतेच्या नजरेने विश्वासकडे पाहिले...
“याला संपवण्यासाठी काहीही मार्ग नाहीये का जखोबा ? याच्या पासून सुटकाहि नाहीये का होणार...?”
“याला संपवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम त्या देवांना त्या काळ्याकपड्यामधून बाहेर काढावे लागेल...जेणे करून त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याची शक्ती कमजोर पडेल अशक्त होईल...तेव्हाच मला माझ कार्य कराव लागेल...पोरी तुझ्या आईपासून झालेल्या विरहामध्ये मी माझ आयुष्य देवचरणी घालवले...पंडिताची पदविका एक वेगळच पवित्रसिद्ध प्राप्तीच शिक्षण मी घेतल...पण तिथे काही दिवस त्या सेवेत त्या लोकांच्या आश्यात राहिल्यावर मला अचानक समजले कि गावामध्ये असा असा प्रकार घडतो आहे...त्याचा छडा लावण्यासाठी मी इथे परत आलो...पण तोपर्यंत मला खूप उशीर झाला होता....”
“थांबा ! तुम्ही आत्ता काय म्हणालात ?” जयदेवच्या चेहऱ्यावर अचानक आश्चर्याच एक प्रश्नचिन्ह उभे राहिले... “होय जयदेव बरोबर ऐकलत तुम्ही....” जखोबा म्हणाला.... “ नाही नाही त्याच्या आधी ते काळे कापड त्यातील देव...असच काहीतरी म्हणालात तुम्ही हो न ?” “हो ! पण तुम्हाला त्या बद्दल काही माहिती ?” तोच जयदेवला त्याच्या डोळ्यासमोर काही क्षणापूर्वी घडलेला प्रसंग आठवला....
“मी त्या देवाऱ्यास स्पर्श केला होता. ज्या मध्ये ते काळ गाठोड होत....” जयदेव तो प्रसंग आठवतच उद्गारला... “काय ? कुठे ?” जखोबा जयदेवकडे पाहत म्हणाला... “त्याच अंधारात पाहिलं होत मी..जिथे मी बेशुद्ध पडलो होतो...पण आता ते देवघर तिथे नाहीये...तिथून त्या नराधमाने ते नाहीस केल...” जयदेव बोलता बोलता थांबला आणि त्याच्या एकट्याच्याच नजरा वाड्याच्या भिंतीवरती फिरू लागल्या...कारण एक एक कोपरा कोपरा घेत...वाड्यातल्या सर्वच्या सर्व मशाली दिवे हळू हळू विझत होते...त्याची ज्योत आपोआप कमी होत गेली... “विश्वास...? HE is here...!” बघता बघता वाड्याच्या चारीही कोपऱ्यातून काळोख एखाद्या मायावी जाळ्याप्रमाणे त्या सर्वाना घेरू लागला.. “मी म्हणेन त्यावेळी तुम्ही सर्वजण वाड्याच्या दरवाज्याच्या दिशेनी धावत जा...आणि चुकूनहि मागे वळू नका...” जखोबा म्हणाला... “ मालक...मी तुम्हाला सोडून जाणार नाय...! आजवर स्वतासाठी लय केल...पण आता दुसऱ्यासाठी करायची वेळ आली हाय..मी इथच थांबेन तुमच्याजवळ...” तो गडी जखोबाच्या सोबत राहण्याचा हट्ट करून बसला.... “बर..ठीक आहे...! जयदेव , विश्वास संध्या ? मी जेव्हा म्हणेल त्याचवेळी दरवाज्याकडे धावायला सुरुवात करा...जखोबा म्हणाला...जखोबाने आपले दोन्ही डोळे मिटून घेतले... “ओंम...नमः रक्षाय भवती सिधसौ..नमः तस्से...पिशाच्च वीरधौर” जखोबाच्या मंत्रांच्या उच्चारामधून निर्माण होणारी उर्जा जणू त्या काळोखाच्या वेढ्याला झुंज देऊ लागली होती त्यामंत्रांनी अक्षरश: त्या कालोखास रोखून धरले होते. चर्रर चर्रर झ्र्र्र झ्र्र्र करतच त्या काळोखातून दरवाज्यापर्यंत जाणारी वाट अगदी उजळून निघाली... *** “सरपंचsss...??सरपंचsss....? वाचवा...वाचवा...” जंगलाच्या मार्गाने त्याने गावाच्या दिशेने धाव घेतली होती. परंतु वाटेत ते भयंकर उपद्रव त्याच्या पाठीमागेच होते धावता धावता त्या सैतानाने याच्या शरीरवरती पंज्याने असंख्य वार केले होते त्याच संपूर्ण शरीर रक्ताने माखून गेले होते...धावतधावतच तो सरपंचांच्या पायरीशी येऊन धाडकन कोसळला...सरपंच नाना तत्काळ उठून बाहेर आले आणि त्यांनी पाहिले कि त्यांचाच एक माणूस अगदी भयंकर जखमी अवस्थेत पायरीवरती पडला होता..सरपंचानी त्याला पाणी पाजले...पाहता पाहता त्याचा आवाज ऐकून गावातले लोक तिथे जमा झाले.... “कोणी केल हे तुझ्या सोबत ? काय म्हणायचंय तुला ?”सरपंच त्याच्या इथे येण्याच कारण विचारत होते कि तोच म्हणाला...
मला जखोबान पाठवलय...अन त्येनी हे बी म्हटल हाय...कि हि शेवटची वेळ आलीय...मदत करा...”
“निघा ! निघा इथून...मी याला जास्त वेळ थांबवू शकणार नाही. निघा जा इथून जाsss...” तसा समोरचा दरवाज त्या काळोखास न जुमानता परतएकदा उघडला गेला...विश्वास जखोबाला चालण्याचा आग्रह करत होता परंतु जखोबा त्यां स्थिर मंत्रोच्चारमुळे धरणीद्वारे आपली शक्ती मिळवून तिथेच घट्ट उभा राहिला होता...तोच विश्वास, अनु, संध्या आणि जयदेव चौघेही धावत त्या दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागले तसे विश्वासने प्रथम संध्याला बाहेर ओढत घेतले आणि स्वतःहि बाहेर पडला पाठोपाठ जयदेवहि बाहेर निघणार होताच कि तोच इकडे जखोबाच्या पायचा कसल्यातरी काळ्याभोर गोष्टीने आपल्या सुळ्यानी मांसात रुतवून चावा घेतला आणि तोच जखोबाचे ध्यान भरकटले आणि त्यांचे दोन्ही हात सुटले मंत्रामध्ये भंग पडला...आणि यावेळी जो दरवाजा बंद झाला तो पुन्हा न उघडण्यासाठीच... “no....! जयदेव ? जयदेव ? जखोबा...?” विश्वास दारावारती जोरजोरात थापा मारु लागला..परंतु दरवाजा काही उघडण्याचे नाव घेत नव्हता... “shitt..! shitt !! ते तिघेही आतमध्येच राहिले....संध्या...आपल्याला काहीतरी कराव लागेल...”
विश्वास दरवाज्यावरती थाप मारून थकला “आपण बाहेरून त्यांची काहीच मदत करू शकत नाही संध्या....काहीच नाही...आपण जयदेव आणि जखोबा दोघांनाही गमावून बसलो आहोत...” विश्वास निराश होऊन खाली तिथेच पायरीवरती डोक्याला हात लावून बसला होता कि संध्याला काहीतरी आठवले “विश्वास तुला आठवत जखोबा त्या देवाबद्दल त्या काळ्या कपड्यात बांधलेल्या देवाबद्दल काहीतरी सांगत होते कि जर ते देव मुक्त झाले तर...काहीतरी मदत होऊ शकते त्यांना...बाबाना !!” अखेरीस संध्याने जखोबाचा आपले पिता म्हणून स्वीकार केला होता विश्वासने नजर उचलून भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले... “संध्या...! तू...! हं...ते गाठोड...पण ते कस शक्य आहे ? त्याबदल आपल्याला काहीएक कल्पना नाहीये कि ते कुठे असेल, तसेही जखोबा म्हणाले होते कि ते या वाड्यातच त्याने कुठेतरी दडवून ठेवले असणार...पण कुठे ?आतमध्ये जायचा आपला मार्ग मात्र बंद झाला आहे...कुठे असेल ते ?” विश्वास विचारात पडला...विजांच्या जोरजोरात होणाऱ्या लखलखाटीमध्ये संध्याची नजर थेट त्या विहिरीवरती पडली...जिच्या आसपास जरी गेल तरी ती मायावी विहीर आपली माया दाखवत असे... तोच संध्याने विश्वासच्या खांद्यावरती हात ठेवला...विश्वासने वळून संध्याकडे पाहिले तेव्हा संध्याने तोच हात उंचावत बोटाने ती विहीर दर्शवली आणि म्हणाली... “तिथे...! तिथे असू शकतात ते बंदिस्त देव...!” विजेंच्या चमकणाऱ्या प्रकाशात ती विहीर अगदी स्पष्ट नजरेस पडत होती. “मला वाटत मी तिथे जायला हव...! हाच एक शेवटचा मार्ग आहे आपल्याकडे संध्या...!” विश्वास संध्याच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणाला कि तोच वाऱ्याच्या घोंगाव्यासकटच त्याच्या कानी एका गोंगाट्याचा, लोकांच्या जमावाचा आवाज ऐकू आला..विश्वास आणि संध्या दोघांनीहि त्या आवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा मशालीच्या लवलवत्या भडकत्या ज्योतिनी संपूर्ण जंगल पिवळ्या तांबड्या प्रकाशानी उजळून निघाल होत... हीच ती मदत होती शेवटची मदत होती जी जखोबाने सरपंचाकडे मागितली होती. परंतु त्या सर्वाना यायला ते अंतर पार करयला आणखीही वेळ लागत होता. आणि मरण अगदी तोंडाशी येऊन ठेपल होत.
क्रमश: मित्रहो काही कारणास्तव कथा पूर्ण होऊ शकली नाही...उर्वरित अंत उद्या नक्की पोस्ट होईल माफी असावी .



MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,



Continue Reading

अघोर भाग सोळावा..-Aghor Part-16 -Marathi Horror Story

| 0 comments

अघोर  भाग सोळावा..-Aghor Part-16 -Marathi Horror Story



गोविंदपंतांनी शेवटी अघोरीपथ निवडला...त्यासाठी त्यांना गुरु हवा होता...गावाबाहेरील स्मशानात त्यांने एका अघोऱ्याची मदत घेतली आणि सिद्धी प्राप्त केली...अशी सिद्धी कि जिच्या समोर कुठल्याही साधारण अथवा दैवत्व असलेल्या शक्तीचा निभाव लागू शकत नव्हता... आणि ती सिद्दी प्राप्त झाल्यावर त्याने पहिले कार्य काय केले असेल माहितीये ?” जखोबा म्हणाला.... “ काय...? काय केले त्यांनी ?”
रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात ढगांच्या गडगडाटीमध्ये गावच्या स्मशानात एका कबरीवरती...एक वृद्ध मांत्रिक एक अघोर तडफडत जमिनीवर पडला होता त्याच्याच पुढ्यात लांब केसाची जटा केस विरहीत कपाळ लाल अंगारलेले डोळे दाट काळ्या पांढऱ्या भुवया जाडभरीव फांगलेली मिशी , अंगावर जागोजागी तर्हे तर्हेचे गोंदणे घेऊन गोविंदपंत उभा होता..त्याचे दोन्ही हात रक्तानी माखलेले होते...ज्यावेळी त्याने तो अनुकुचीदार लाकडाचा ओंडका त्या गुरुच्या छातीतून आरपार केला होता त्यावेळी त्याच्या हाती लागलेलं ते रक्त होत
“अरे चांडाळाच्या..., तू... तुझ्या... गुरुवरच उलटलास..याद राख...एक दिवस...एक दिवस असा येईल...याच शक्तीन तुला कुत्र्यासारख मरण येईलsss याद राख तुझा सर्वनाश होईल सर्वनाश होईल तुझा....” एवढ बोलत त्याने आपला प्राण त्यागला... “मेला रे...किडे पडतील हो तुलाsss...तुला जंगलात सोडतो...चल हो...” आपल्या करड्या आवाजात मृत शरीरालाच शाप देऊ लागला होता आणि तसेच ते प्रेत उचलून जंगलात सोडले...गोविंदपंतने आपल्या सिद्धीसोबतच एक भयंकर उपद्रवाची आत्मा कैद केली होती आणि त्याला आपल गुलाम बनवल होत.
“सर्वप्रथम गोविंदपंतने त्याच अघोऱ्याचा त्याच्या गुरूचा बळी दिला...त्याच प्रेत गावाच्या जंगलात गाववाल्याना सापडले. गावात दहशत पसरली कारण एका तंत्रीकाची अघोराची हत्या करणारा कुणीतरी नक्कीच त्याहून जास्त भयंकर आणि क्रूर असेल...पण असा कोण असू शकतो ? त्याचा पत्ता मात्र गाववाल्यांना लागला नाही...”
“आणि मग ?” संध्या म्हणाली “काय केले त्यांनी त्या सिद्धीच काय सिद्धी होती ती ?”
“ती सिद्धी पुत्रप्राप्तीची होती...गोविंदपंताने सावित्रीच्या पोटी मुलगी आली हे पाहिलं. वंशवाढीला मुलाची त्याला गरज होती. त्यासाठी एक भयानक कृत्य एक भयानक उपाय योज होता त्याचा...”
“ आणि तो काय ?” विश्वास उद्गारला... “ नरबळी...वयात आलेल्या मुलींचे दहा नरबळी...”
“what...?? काय हे ?” विश्वास ते ऐकून चकित झाला संध्याला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता...कुणी एवढहि क्रूर कस असू शकत... “
“अश्या रीतीने गावातून एकेक मुलगी नाहीशी होऊ लागली...गावातल्या लोकांना कळेनास झाल होत कि हे कोण करतय काय करतय...त्या मुलींची प्रेत हि अगदी...छिन्नविच्छिन्न अवस्थेत भेटू लागली जसे कोणीतरी त्यांच्या मांसाचे लचके तोडले होते. अख्खा गाव हादरून गेला होता. गावातल्या मुली सायंकाळ होताच बाहेर निघायला टाळू लागल्या...पण एके दिवशी...गंगारामची मुलगी छ्की अचानक गायब झाली होती. गोविंदपंताच्या कटात नाथ्याहि सामील झाला होता. दोन पैसे दिसले नाही कि त्याची लाळ टपकायची...त्यानेच छ्कीला आमिष दाखवून कुठेतरी नेल होत...हे गावातल्या एका माणसाने पाहिले...आणि गंगारामला हि गोष्ट कळवली..पण जोपर्यंत त्याला हि गोष्ट समजली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गंगारामने येऊन वाड्याच्या आजूबाजूला तिची शोधाशोध घेतली...त्याची एकुलती एक पोर ती...”
“छ्केsss.....ए पोरे ? कुठंयस ग तू....ए छकुsss....” वाड्याच्या अवतीभोवती फिरता फिरता गंग्या त्या विहिरीच्या जवळ आला त्याने आतमध्ये पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली स्वतःच्या मुलीच अस भयानक अवस्थेत दृश्य पाहून कुठला बाप ढासळनार नाही ? छ्कीच्या मृत्यूचा प्रतिशोधात गंगाराम ने गोविंदपंताशी झुंज घेतली...पण त्याच्या अघोरी काळ्या ताक्तीपुढे त्याचा निभाव कुठे लागणार होता...त्याचा परिणाम झाला तो थेट गंग्याच्या मानसिकतेवर त्याला वेडाचा जोरदार धक्का बसला..हि गोष्ट गावातल्या लोकांना समजली कि त्या मागे कोण होत आणि त्याच रात्री त्यांनी गोविंदपंताच्या मृत्यूचा त्याच्याच बळीचा कट रचला...त्या रात्री गोविंदपंताचा शेवटचा बळी होता...आणि तो बळी होता...तुझा”
जखोबाने आपले बोट उचलून संध्याकडे दाखवले...त्या रात्री त्याने संपूर्ण तयारी केली होती तुझ्या बळीसाठी पण गावातल्या काही ठराविक लोकांनी आपला समूह गोळा केला मशाली काठ्या लाकडे सर्व काही घेऊन संपूर्ण गाव जंगलाच्या वाटेने वाड्याच्या दिशेने चाल करून येऊ लागला...ऐनवेळी तो तुझा बळी देणारच होता कि गावातले सर्व तिथे पोहोचले आणि वाड्यावरती जळत्या मशाली भिरकावल्या...हि गोष्ट सखारामच्या कानी पडली पण त्याला यायला खूप उशीर झाला होता. वाड्याच्या आगीमध्ये गोविंदपंताचा मृत्यू झाला पण मरता मरता त्याने शपथ घेतली कि....”
“मी गोविंदपंत शपथ घेतोय...अघोऱ्याला साक्षी ठेऊन....जो पर्यंत सगळ्या गावाचा नायनाट होणार नाहि..तो पर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही....कुणाच्याहि घरात सुख नांदणार नाही....किडे पडतील रे....माझा शाप आहे हा....शाप आहे माझा....मी परत येईन माझा अखेरचा बळी घ्यायला मी परत येईन...परत येईन...”
वाड्याला भीषण आग लागली होती सावित्रीने आपल्या जीवावर तुझ प्राण वाचवले होते पोरी...आणि तिने मरता मरता सखारामच्या हाती सोपवले व सांगितले”
“सखाsss..माझ्या मुलीवर या वाड्याच्या कधीही सावली पडू देऊ नकोस...तिचा नवीन काळ घडव तिला घडव...माज्या पोरीचा संभाळ कर...वेळ आल्यावर तिला तिच्या खऱ्या वडिलाशी भेट घालून दे...”
“सावित्रीने सखाच्या मांडीवरच आपला प्राण सोडला...परंतु...परंतु सावित्रीच्या आत्म्यास शांती कधीच नाही लाभली... या नराधमाने तिचाहि आत्मा कैद करून घेतला होता. आणि तेच कारण होत संध्या सावित्रीच्या अतृप्त आत्म्यास मुक्ती हवी होती आणि ती फक्त तिच्या मुलीच्याच हाताने तिला मिळू शकते...हेच कारण होत तुझ्या स्वप्नामागे...”
आपल्या आईची अशी दुर्दैवी आणि पालन करणाऱ्या परंतु अगदी सैतानी दानवी , क्रूर अघोरी बापाची कृत्ये ऐकून संध्याचे रडू आवरले नाही हुंदके देतदेत ती रडू लागली...आईचा चेहरा देखील ती पाहू शकली नव्हती शेवटच्या क्षणी...पण आता वेळी आली होती तिच्या अतृप्त आत्म्याला त्या नराधमाच्या तावडीतून सोडवायची...
“जखोबा...!संध्याचे बाबा! तिचे जन्मदाते वडील..? ते कधी परतले नाहीत का या गावात...कुठे आहेत ते ?” विश्वास संध्याला आवरतच म्हणाला...विश्वासच्या प्रश्नाने जखोबाच्या जणू काळजाचा ठोकाच चुकला...
“विश्वास....!” जखोबा विश्वासकडे वळले आणि म्हणाले....
“ मीच आहे तो....मीच आहे संध्याचा जन्मदाता....!” विजांच्या कडकड करत्या लखलखत्या प्रकाशात जखोबाने आपल्या सत्यावरून पडदा उठवला होता. विश्वास ,संध्या दोघांच्याहि चेहऱ्यावरती एक विलक्षण आश्चर्य उभे राहिले होते...
“तू..तुम्ह....तुम्ही....!?” संध्याला जणू आता भुरळ यायला लागली होती कि विश्वासने तिला पकडून सावरले... “म्हणजे...तुम्ही...? तुम्ही माझे....वडील...?” संध्या विश्वासच्या हातांचा आधार घेत उभी होती आणि जखोबाला अर्थातच आपल्या खऱ्या वडिलांना पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत होती..कि तोच वाड्याच्या भिंतीना अचानक कंप सुटला...
“हे ? हे काय होतय?” विश्वास म्हणाला...
***
“हेयsss.....? कोण आहेस तू ? हेयsss.....?” जयदेवच्या डोळ्यासमोरून त्या भयानक पंजाने छ्कीला आतमध्ये ओढून घेतल आणि तसाच त्याच्या चेहऱ्यावर तो दरवाजा धाडकन बंद झाला...जयदेव ते पाहून हादरला दरवाज्यावर इकडे तिकडे काहीतरी शोधून त्या बंद झालेल्या दारावर जोरात थापा मारायला सुरुवात केल्या... “ कोण आहे तिथे ? कोण आहे दार उघड...हेयsss...?” जयदेवने काही क्षण थाप मारली न मारली तोच दरवाजा अलगद आतमध्ये गेला...जयदेव त्या उघड्या दारांना चकित डोळ्यांनी पाहत राहिला...दरवाजा उघडताच जयदेव चाचपडतच आतमध्ये गेला...कंदिलाच्या प्रकाशात त्याने आजूबाजूला पाहिले जवळ काहीही नव्हते पण जसा त्याने आपला पाय पुढे सरसावला...पाउल पुढे टाकताच जयदेवला जाणवले कि त्या पाउलाखाली काहीतरी चिकट द्रवपदार्थ आला आहे. जयदेवने खाली पाहिले आणि त्याच्यावरून आपला पाय बाजूला घेतला जयदेवने कंदिलाच्या प्रकाशात खाली पाहिले तसे त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. किळस, घृणा ,भय,आश्चर्य सर्वच्या सर्व जयदेवच्या चेहऱ्यावर एकसाथ आले...जयदेवच्या पायाखाली लालभडक रक्ताची धार ओघळत आली होती.. “oh my god....what the hell is this...?” जयदेव त्या येणाऱ्या रक्ताच्या ओघोळाचा माग काढत काढत पुढे पुढे सरकू लागला...
“अहहsss.....छ....छ्के...माझे पोरे...” जयदेवला कुणाच्या तरी कण्हण्याचा आवाज ऐकू आला...त्या वाहत्या रक्ताच्या धारेच्या दिशेनेच त्याने आपली नजर फिरवली समोरच्या भिंतीला लागूनच कोणीतरी एक पाय पसरून पडल होत...कंदील घेऊन जयदेव धावतच त्याच्याजवळ गेला... “अरे ए...गंग्या...?काय झाले तुला ? कस झाले हे ?” जयदेवने कंदिलाच्या उजेडात गंग्याला भिंतीशी टेकून अगदी जखमी अवस्थेत पडलेलं पाहिले...त्याच्या छातीवर पोटावर नखांचे वार केले गेले होते. “छ्की माझी....माझी छ्की...त्यान मारल....तील...तिला...माझ्या..छ्कीला...मी पण जातो आता....मी आयेsss....” वेदनेने तो कळवळत सतत छ्कीच नाव घेत होता... “ती....तुझी मुलगी आहे का ? मघाशी ती..?” जयदेवने गंग्याला विचारत असताना आपल्या खिशातून रुमाल काढला आणि त्याच्या जखमेवरती दाबून धरला व त्याचा एक हात त्याच्यावरती ठेवून दिला... “काहीही होणार नाही तुला....काही होणार नाही गंग्या....” जयदेव त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करत होता परंतु गंग्याला मात्र आपला शेवट दिसू लागला होता नजरेसमोर आपली छ्की त्याला हात वाढवून म्हणत होती... “बाबा...बघ मी आले...चल जाऊ आपण इथून...मला न्यायला आला ना तू...? चल...” गंग्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या...जयदेव त्याच्याशी काहीतरी बोलत होता पण त्याच लक्ष फक्त आपल्या छ्कीवरती होत...जयदेव त्याला ओरडत होता... “मी तुला काहीही होऊ देणार....नाही...” वेळ जणू मंदावलाच गंग्याने शेवटचे जयदेवकडे पाहिले आणि आपल्या हातांच एक बोट उंचावत त्याच बाजूने काहीतरी दाखवण्याचा अन सांगण्याचा प्रयत्न केला...पण जयदेवला ते काही समजून येत नव्हत... “काय ? काय दाखवतोयस ?काय आहे तिकडे ? काय आहे ? गंग्या ? गंगsss...” आणि तिथेच गंग्याने आपला शेवटचा श्वास सोडला त्याने उंचावलेल बोट तेहि त्याच दिशेने खाली पडले... “नोsss...! shitt...!” जयदेवने गंग्याच्या मृतप्रेताचे डोळे आपल्या हातांनी बंद केले...गंग्याने दर्शवलेल्या जागेकडे जयदेवने पहिले तसे कंदिलाच्या अंधुक अंधुक प्रकाशात त्याला काहीतरी चौकोनी आयताकार उभ करून ठेवलेलं पोकळ अस लाकडांच गुडघ्याएवढ काहीतरी मांडलेल दिसून आल त्याला अगदी लहान लहान चौकटहोत्या...त्याच्यावरती शिखराचा आकार होता..जयदेव काही क्षणासाठी मघाशी घडलेला प्रसंग विसरूनच गेला होता छ्कीला ओढणारा तो पंजा त्या मागच शरीर इथेच याच खोलीत वावरत होत आणि त्यानेच गंग्यावर देखील आघात केला होता. जयदेव आपल्या जागेवरून त्या आयताकार गोष्टीकडे वळला...पिवळ्या तांबड्या प्रकाशात त्याने ते पाहण्याचा प्रयत्न करू लागला त्यावरती कोष्टी, कोळ्यांचे जाळे पसरले होते. जयदेवने झटपट त्यावरून जाळे बाजूला करयला सुरुवात केली पण त्या दरम्यान जयदेवच्या पाठीमागे त्या उपद्रवाने हवेतच आकार घ्यायला सुरुवात केली त्या पासून जयदेव पूर्णपणे अनभिज्ञ होता. जयदेवने समोरचे सर्व जाळे आता पूर्णपणे बाजूला काढलेच होते कि त्याच्या मागे आता ते जे काही होत त्याने आपला आकार धारण केला होता. शरीराच्या नावाखाली त्याची विद्रूप विचारसरणीच भौतिक रुपात आली आणि भयंकर अश्या विकृत शरीराचा त्याने आधार घेतला... “ माझ्या परवानगी शिवाय...इथ या जागी कुणीही पाउल ठेऊ शकत नाही....आता आलास इथे तर मृत्यूला सामोर जा हरामखोर...” जयदेवच्या कानावर एक दाटका करडा घोगरा आवाज पडला त्या आवाजाने एकप्रकारची कंपनेच आख्या वाड्यात निर्माण केली..दरदरदर...धडडधड...करतच वाड्याच्या सर्वच्या सर्व भिंती जणू संतापून थरथरू लागल्या... “हे काय होत आहे?” विश्वास आणि संध्या म्हणाले...जखोबा आपल्या जागेवरच उभा ते पाहतच उद्गारला... “हा त्याचा क्रोध आहे...कुणीतरी आहे...ज्याने त्याच्या गाभ्यात अर्थात त्याच्या विनाशाच्या कारणास हात घातला आहे. कुणीतरी अस आहे जो पोहोचला आहे त्याच्या नरडीशी अगदी जवळ...अगदीच जवळ...”
“काय कोण ? कोण पोहोचल आहे ?” विश्वास म्हणाला.... एका संथ नजरेने जखोबाने माघारी वळून विश्वासकडे एक नजर टाकली आणि त्या व्यक्तीच नाव उद्गारले... “जो सध्या आपल्या सोबत नाहीये !”
विश्वास जखोबाच्या नजरेत असलेल ते नाव सहज वाचू शकत होता आणि त्याच्या मुखात ते नाव आलेच..
“जयदेव...!!”
“मारून टाक याला बघतोस काय....! खात्मा कर याचा....जाsss.....” त्या संपूर्ण खोलीमध्ये गोविंदपंतचा आवाज घुमला ज्याने आपल्या गुलामास अघोऱ्यास आज्ञा दिली जयदेवच्या अंताची...आणि बघता बघता..त्या भयंकर उपद्रवाने एका झेपेमध्येच जयदेवावरती आघात केला..जयदेवने देखील आपले मरण आपल्यावर झेपावत आहे हे क्षणभरासाठी पाहिले... “कदाचित हाच आपला अंत आहे...” जयदेव म्हणाला आणि त्याने आपल्या दोन्ही पापण्या बंद करून घेतल्या..त्याच वेळी एक अजब गोष्ट घडली...जयदेवाच्या शरीराला स्पर्श होताच क्षणी अघोऱ्याची एक वेदनादायी अशी दानवी किंकाळी त्या वाड्यामध्ये घुमली...तड तड तड आवाज करीत सर्वच्या सर्व दिव्यांच्या काचांना तडे जाऊ लागले...काचा खळकन फुटल्या गेल्या..
“ हे ? हे काय होत ?” विश्वास संध्या दोघेही त्या किंचाळी पासून वाचण्यासाठी आपल्या कानावरती हात दाबून आणि अनुला जवळ घेऊन उभे होते.
जयदेवने आपले दोन्ही डोळे उघडून समोर पाहिले तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांवरती विश्वास बसला नाही...
क्रमश:
शेवटचा भाग उद्या मित्रहो... कमेंट्स मध्ये नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा

MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,



Continue Reading

अघोर भाग 15-Marathi Bhutachi gosht

| 0 comments

अघोर भाग 15-Marathi Bhutachi gosht

“काय झाल..विश्वासराव अनुबीबीला..?” जखोबा संध्याच्या मागोमागच त्या खोलीत पोहोचले... “बघा...न एवढ्या धावपळमध्ये अनुवरती आमच लक्षच गेले नाही...आणि पोर माझी कशी तापेने फणफणत आहे...डोळे हि उघडत नाहीये...” संध्या अनुच्या माथ्यावरून हात फिरवत म्हणाली... “मी बघितल तर...काय अडचण नाय न ?” जखोबाने संध्याकडे अनुला हात लावण्याची जणू परवानगीच मागितली...तसाच तो पुढे सरसावला... “हो का नाही...!” जखोबा पुढे आला व त्याने अनुच्या मस्तकावर आपला हात ठेवला आणि आपल्या डोळ्यांच्या पापण्या अर्ध्या मिटल्या. संध्या त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला कळेनासे झाले कि जखोबा काय कृती करत होता. जखोबाने आपले डोळे मिटले आणि तोंडातल्या तोंडातच काहीतरी मंत्र पुटपुटायला सुरुवात केली...जसे जसे जखोबा त्या मंत्राचा त्या शब्दांचा उच्चार करत होता त्याचा प्रभास तसा तसा संपूर्ण खोलीभरून दिसून येऊ लागला होता. सैतानाच्या बर्फाळ श्वासाचा गारठा एकाएकी त्या खोलीतून कमी होऊ लागला होता. एक वेगळीच आल्हाददायक उब त्या चारीही भिंतीमध्ये निर्माण झाली होती...पाझरून जाणाऱ्या कंदिलाच्या ज्योती देखील प्रखर झाल्या... एक क्षणिक सकारात्मक उर्जा त्या खोलीमध्ये पसरली होती त्या खोलीत घडत असलेला बदल संध्या आपल्या डोळ्यांनी पाहू शकत होती. पाहता पाहता जखोबाच्या तळहातामधून किंचित प्रकाश फक्त एका सेकंदापुरताच उजळून गेला कि तोच छोट्या अनुने जोरदार श्वास घेत आपले डोळे उघडले...संध्या जखोबाकडे पाहतच राहिली..पण तिच्या नजरा जेव्हा अनुकडे पाहिली अनुची हालचाल पाहून संध्याच्या डोळ्यात एक चमकच आली..संध्याने जागचे उठून अनुला आपल्याजवळ घेतले अनुच्या अंगाला तिचा हात लागताच संध्याला आश्चर्य वाटले कारण तिच्या अंगातील ताप पूर्णपणे नाहीसा झाला होता...संध्याने अनुला माथ्यावर गळ्यावर सगळीकडे हात लावून तपासून पाहिले पण तिच्या अंगात आता कसलाही ताप उरला नव्हता...जखोबाचे आभार मानायला संध्याने जखोबाकडे पाहिले तेव्हा जखोबा अगदी दमून गेला होता... त्याच्या अंगातील सर्व त्राण निघून तो अगदी अशक्त झाला होता...
“जखोबा ? जखोबा काय झाल ? ठीक आहात न तुम्ही ?” संध्या पलंगाच्या दुसऱ्या बाजूस येई पर्यंत जखोबाने आपले अंग खाली सोडून दिले...उभ्या जागीच जखोबा कोसळले... “ काय झाले तुम्हाला ? विश्वासssss...? विश्वासsss??? जयदेव ? लवकर ये इकडे...” संध्याचा आवाज ऐकून जयदेव आणि विश्वास दोघेही स्वयंपाकघरातून बाहेर निघाले व संध्याच्या खोलीकडे जाऊ लागले...धावता धावता त्या दोन माणसांनी जयदेवला हाक मारली.... “ साहेबsss..ओ साहेब लवकर इकड या....” त्यांच्या पैकी एकजण दरवाज्याजवळ उभा त्यानेच या दोघांना हाक मारली. “विश्वास...तू संध्याकडे जा...मी बघतो याचं काय ते...” जयदेव त्यांच्याजवळ पोहोचला त्याने पाहिले कि त्या दोघांचेहि चेहरे भीतीने अगदी पांढरेशिपट पडले होते... “काय रे ? काय झाल ? कशाला बोलावलत....?” त्यावर काही बोलण्या ऐवोजी ते दोघेही एकमेकांकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होते...सोबतच त्या अंधारात जिथ वेडा गंगाराम आपल्या मुलीच्या भ्रमात तिला बोलवत तिच्या मागोमाग गेला होता. “काय झाले बोलणार आहात का तुम्ही?”
“साहेब...तो गंग्या...तिकड....त्या...” त्यांच्यापैकी एकजण समोर बोट दाखवत जयदेवला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता... “काय ? काय आहे तिकडे ? आणि...” जयदेवच्या देखील नजरेस तो दिसत नव्हता... “हा कुठे गेला ?” जयदेव म्हणाला “त..त..तिकडे साहेब...”त्यांच्यापैकी एकाने त्या अंधारात आपले बोट दाखवले... “मी जाऊन बघतो...तुम्ही इथेच थांबा...”
“साहेब...ओ...नका जाऊ तिकड...त्यों गंग्या येडा हाय...परत येईल त्यो...तुम्ही जाऊ नका....ऐका ओ..”
जयदेवने त्या दोघांच एक नाही ऐकले आणि तसाच तिथला कंदील हातात घेऊन त्या अंधाराच्या दिशेने ओसरीवर चढत चालत जाऊ लागला... “तुम्ही दोघे जागचे हलू नका..मी आलो त्याला घेऊन...” जयदेव कंदिलाच्या प्रकाशाचा आधार घेऊन त्या अंधारात पुढे पुढे...एकेक पाउल टाकत जाऊ लागला...कंदिलाचा तांबूस प्रकाश देखील असा त्या काळोखाने घेरला जात होता विरघळत होता...जयदेव तरीदेखील न भिता ओसरीच्या अंधारातून मार्ग काढत इकडे तिकडे गंग्याला शोधत जात होता आणि इकडे विश्वास धावतच संध्याकडे आला होता आतमध्ये येताच त्याने समोर पाहिलं कि जखोबा अगदी अशक्त होऊन आपल अंग जमिनीवर सोडून पडला होता... “जखोबा ? काय झाल तुम्हाला ?” विश्वास जखोबाला उठवायचा प्रयत्न करत होता तोच त्याच्या खिशातून एक चिट्ठी खाली पडली... “अरे बापरे...यांना अचानक एवढा ताप कसा काय भरला ?” विश्वासने संध्याकडे पाहिले पण संध्याला कळून चुकले होते कि जखोबाने एका वेगळ्याच शक्तीने अनुवर आलेल संकट आपल्यावर ओढून घेतल होत....तोच खाली पडलेल्या....जखोबाच्या तोंडून आवाज निघाला... “मी.....ठीक आहे....विश्वासराव...मी ठीक आहे...” जखोबाच्या अंगातून भरलेला ताप त्यांच्या श्वासासकट बाहेर पडला...” काय झाल होत तुम्हाला ? आणि असे अचानक ?” विश्वास म्हणाला... “नाही मी ते....जरा अशक्तपणा आला...” बोलता बोलता जखोबाची नजर खाली पडलेल्या त्या चिट्ठीवर गेली...त्याने आपल्या हातानीच ती उचलली “ हि चिट्ठी...!तर सखामामाची आहे...! जयदेवने माझ्याकडे सोपवली होती...पण अजून याच्यामध्ये जे काही लिहून त्यांनी पाठवल होत त्याचा एकही शब्द मी वाचला नाहीये...”
“वाचा बघू नेमक काय लिहील होत सखाने...! कारण त्याच्या तोंडून ऐकणे आता हे शक्य नाहीये...कधीच नाही, सखाराम आता...हयात नाही... ” संध्या ते ऐकता जागीच खाली बसली...कारण वडीलधारा वडिलाची आईची सावली म्हणून तिच्यासाठी फक्त सखामामाच होता त्याला देखील तिने आता गमावलं होत... “काय होत आहे....हे...? एक एक करून.... माझी माणसे... माझी आपली माणसे... माझ्या पासून नियती दूरदूर ओढून नेतेय...उंहू उंहू...उंहू...” संध्याला हुंदका अवारला नाही तिने ढसा ढसा रडायला सुरुवात केली... जखोबा संध्याला असे रडत असताना पाहून मनोमनीच उद्गारला... “पोरी...कसे सांगू तुला...! एकटी नाहीयेस तू....सावित्री....! तुझ्या वचनांनी मला बांधून ठेवलय नाहीतर आज... आपल्या पोरीचा बाप जिवंत असून तिला एकट वाटल नसत...” जखोबाने विश्वासच्या हातातून खाली पडलेली चिट्ठी उचलली....आणि सखाने लिहिलेला त्यामधला मजकूर वाचला...
“पोरी संध्या...! तुझ्या आईच श्राद्ध जवळ आल आहे...तुझ्या विना तिला तिच्या पवित्र आतम्यास शांती मिळणार नाही...इथे आल्यावर तुला वीस वर्ष तुझ्यापासून दडवलेल गुपित मला तुला सांगायचं आहे...” जखोबाने डबडबलेल्या पापण्या गच्च बंद केल्या...जखोबाला त्याच्या नजरेसमोर सखारामचा चेहरा दिसला...अघोऱ्याच्या गुलामाच्या प्रहारानंतर सखाराम आपले शेवटचे श्वास मोजत होता. “जखा संध्याला जे काही सांगायचं माझ कर्तव्य होत ते मात्र मी पूर्ण नाही करू शकलो...तिच्या जीवाला धोका आहे तिला वाचवा...तिला वाचवा....” सखाने आपले प्राण जखोबाच्या मांडीवरतीच सोडून दिले...जखोबाने भरल्या डोळ्यांच्या पापण्या उघडल्या तशी दरवाजात एक अंधुकशी स्त्री आकृती त्याला दिसू लागली होती. तिची काया अगदीच ओळखीची होती जखोबाला. काही क्षणासाठी तर जखोबाला असेच वाटले कि दारामध्ये खुद्द सावित्रीच येऊन उभी राहिली आहे...डोळ्यामधले पाणी पुसून जखोबा आपल्या जागेवरून उठला.. “पोरी....जे झाल त्याला आपण काही बदलू शकत नाही....या नियतीने जे लिहील आहे ते घडतच...विधिलिखित टळत नाही...”
“पण काय गुपित असेल जे सखामामाने संध्यापासून इतकी वर्ष दडवून ठेवले...ते गुपित...ते रहस्य त्याचा भेद केल्या शिवाय मी इथून जाणार नाही....”
“विश्वासराव...लढा हा नेहमी बरोबरीच्याच विरोधकाशी करावा...आणि जर शत्रू उघड्या डोळ्यांनी दिसतच नसेल...तर”
“माझ्या कुटुंबासाठी मला त्याच्याशी लढाव लागेलच...आणि त्यासाठी माझा प्राण गेला तरी बेहत्तर....”जखोबा त्याचा आत्मविश्वास पाहून भारावून गेला... “ सखाराम व्यतिरिक्त ते गुपित आणखी एका व्यक्तीस ठाऊक आहे...”
“कोण ? कोण आहे तो जखोबा ? आम्हाला घेऊन चला तुम्ही त्याच्याकडे..” बाहेर विजांच्या कडकडाटीत वाड्याच्या अंधारात चंदेरीनिळसर प्रकाश क्षणा क्षणाला पडत पडत होता..
“तो व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे विश्वासराव....” जखोबा उद्गारला...ढगांच्या गर्जना वीजेच थैमान आणि काळोखाचा घालमेल वेळेच्या प्रत्येक सेकंदास घडून येत होता...
“ कायsss ? तुम्ही ? कसे ?” संध्या चकित होऊन म्हणाली...
“ गंगारामा ? ए गंग्या ? कुठ आहेस ?” जयदेव पाहता पाहता एका काळ्या कुट्ट अंधाराने भरलेल्या खोली पोहोचला आतमध्ये शिरताच त्याला एक घाणेरडा आतमध्ये कंदील घेऊन जयदेवने इकडे तिकडे आजुबजुला कोणी आहे का कानोसा घेतला...आणि तसाच जयदेव आपल्या डाव्या हातास वळला तसे त्याने समोर पाहिलं कि समोर अजून एक खोलीचा दरवाजा होता जो अर्धा बंद आणि अर्धा उघडा होता. ज्याच्या पलीकडे कुणीतरी ठेंगन अस उभ होत जयदेवने हातातला कंदील तिकडे त्या दिशेने नेला तसे त्याला दिसून आले कि समोर एक अनुएवढीच लहान मुलगी दरवाज्याच्या आडबाजूला लपण्याचा प्रयत्न करत होती....जयदेवला ते थोडस विचित्र वाटले... कारण अख्ख्या वाड्यात अनु सोडून दुसरी कुठलीही मुलगी नव्हती मग हि कोण ? ती मुलगी एकटक एका नजरेने जयदेवकडेच पाहत होती...जयदेव तसा कंदिलाचा प्रकाश घेऊन तिच्या त्या बंद दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागला... “ कोण ?....कोण आहेस बाळा तू...?” जयदेव म्हणाला... तसे त्या मुलीने काहीएक उत्तर दिले नाही... जयदेव तिच्या आणखी जवळ गेला आणि तिथेच गुडघ्यावरती टेकून बसला... “कोण आहेस बाळा तू ? आणि इथे काय करतेयस ?”
“मी इथ लपलीय माझा बाबा मला शोधायलाय...मला त्यान सांगितल कि....” ती मुलगी बोलता बोलताच आपली मान मागे वळवून त्या खोलीत पाहू लागली...तिने जणू काहीतरी निश्चित केले आणि परत जयदेवकडे वळली... “मला त्यान...बाबाला इथ आण्याला सांगितल...नायतर....त्यो मला मारतो.....” “कोण तुला मारत बाळ ? कोण आहे आतमध्ये...?” “नाही...नाही...नाही...मी नाही सांगणार...” असे म्हणत ती आता हुंदकेच द्यायला सुरुवात करणार होतीच कि “श्श्शस्स...! तो आलाय....!” ती मुलगी म्हणाली.. “काय ? कोण आलाय ? मला तर आतमध्ये कोणीच दिसत नाहीये...” तशी ती मुलगी म्हणाली.... “ नाही....तो माझ्या माग नाय....तुमच्या माग उभा हाय...” तिचे शब्द ऐकून मात्र जयदेवच्या घश्यातच आवंढा येऊन अडकला...कारण त्याच्या मानवी इंद्रियांना देखील तशीच अनुभूती झाली होती कि कोणीतरी त्याच्या मागे उभ आहे...
***
“वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे हि विश्वासराव...या गावात एक प्रतिष्ठित पुरोहित राहायचा...त्याच नाव होत...” जखोबाने एक नजर आजुबाजूच्या भिंतीवर फिरवली आणि ओठांवर ते नाव उद्गार “ गोविंदपंत....” जखोबाने जसे त्याच नाव घेतल खोलीमध्ये एक वाऱ्याचा जोरदार झोत आला आणि खोलीमधला एक दिवा विझला गेला....संध्या विश्वास जखोबा तिघांच्याहि नजरा त्यावरतीच खिळून राहिल्या.... “एकेकाळी गावातला नामवंत पुरोहित होता तो...भट..सर्व गाव त्याला मानायचा अन त्याच्या देवावरच्या भक्तीला...देवाच्या भक्तीने तो दिवस रात्र त्याचे जाप करायचा,मंत्रोच्चार करायचा...शास्त्रज्ञान सर्व होत त्याला...परंतु एकेदिवशी हीच भक्ती भोवली त्याला....देवाच्या भक्तीपोटी त्याने आपल्या मानसिक विचारांची सीमाच ओलांडली...रात्री बेरात्री, अपरात्री देवळाच्या गाभाऱ्यात उठून तो देवाच्या नावाने घंटानाद करू लागला... ढोल नगारे बडवू लागला...परंतु त्याला जे हव होत ते त्या भक्तीद्वारे त्याला मिळणे कठीण झाले होते...गावातल्या लोकांनी त्याच्या वेडेपणाला घाबरून देवळातहि यायचं सोडून दिले...त्याच लग्न आपल्याच शेजारच्या गावातील गरीब घरातल्या एका पोरीशी झाल...तीच नाव होती सावित्री...सावित्रीला फक्त एक भाऊ आणि आई होती...वयात आलेल्या सावित्रीच काही वर्षामध्ये एका तरुणावर प्रेम जडल होत. दोघांनीही आयुष्य एकसाथ घालवण्याचा निर्णय केला होता. सावित्री आणि त्या तरुणाच दोघांच मुल सावित्रीच्या पोटात वाढत होत..त्यांनी लग्न करण्याचा विचार हि पक्का केला होता पण ऐनवेळी सावित्रीच्या आईला हि गोष्ट समजली तिने त्याच वेळी सावित्रीच लग्न गोविंदपंताशी लाऊन दिल...स्वतःचा वाडा आहे .पुरोहित आहे...पोरीला सुखी ठेवेल हा त्यांचा गोड गैरसमज होता सावित्रीच्या आईस काय माहित होत कि तिने आपल्याच हाताने आपल्या मुलीला एका नरकात ढकलून दिल होत.”
“म्हणजे ? गोविंदपंत माझे खरे वडील नाहीयेत ?” संध्याला बसलेला हा दुसरा झटका होता...
“काय झाल होत अस ?जे माझ्या आईने या नर्कयातना सोसल्या..” संध्या म्हणाली... “ नाही पोरी गोविंदराव तुझे खरे वडील नव्हते...केव्हाहि नव्हते...सावित्रीच्या मनावर, शरीरावर, आत्म्यावर त्याने लाखो आघात केले होते प्रत्येक क्षणाक्षणाला सावित्री मरण अनुभवत होती हिंसाचा जनावरांसारख्या त्याच्या वागण्याचा कहर झाला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतर सावित्रीने त्यास हि बातमी दिली कि ती आई होणार आहे...पहिले काही महिने सावित्रीने हि गोष्ट दडवून ठेवली होती...गोविंदपंताने सावित्रीच मुल आपलच मुल समजल... वंशवाढीसाठी..गोविंदपंताने देवाला नवस केले, यज्ञ-हवन केले आपला देव आपली साथ देईल..माझा वंश वाढेल...अशी त्याची आशा होती परंतु सावित्रीच्या पोटी जन्माला आलेलं मुल म्हणजे मुलगी होती... गोविंदपंताने केलेले सर्व यज्ञहवन, पूजापाठ ,नवस , उपास तापास सर्व वाया गेल होत. अखेरीस त्याचा देवावरचा विश्वास उडाला....त्याने संतापाच्या भरात देवळातली सर्व देवांना काळ्या कपड्यात बंद करून त्याचं गाठोडे बांधून या वाड्यातच कुठेतरी दडवून ठेवले...”
“हे भयंकर आहे....अस कुणी करू शकत का ?” संध्या म्हणाली... “होय असे फक्त एकच लोक करतात अघोर..लोक...गोविंदपंताने शेवटी दैवाचा आधार सोडला आणि काळ्या शक्तींच्या साम्राज्यात प्रवेश केला...त्याच्या याच कृत्याने संपूर्ण गावावर एक भयाण संकट ओढवल गेल जे घेऊन आल होत फक्त आणि फक्त मृत्यू....”
***
जयदेवने मागे वळून पाहण्यासाठी आपली मान आणि नजर हळू हळू मागे वळवायला सुरुवात केली...जयदेवने मागे वळून पाहिले तर त्याच्या पुढ्यात संपूर्ण खोली रिकामी होती....बस त्याच्या नजरेआड एक भयंकर काळी आकृती चालत दुसऱ्या बाजूस गेली “हुश्श्सsss.....” जयदेवने सुटकेचा श्वास सोडला आणि समोर पाहिले तसे त्याला ती मुलगी दिसली... “मागे तर कोणी....” जयदेव काही बोलणार इतक्यात एक भयंकर राक्षसी पंजा छ्कीच्या मागून तिच्या केसांमधून ओठांवर आला त्याने गच्चकण छ्कीचा चेहरा आणि ओठातून निघणारा तिचा दाबून धरला जसे ते दोघेही विनापाऊलांचे स्रर्र्क्न मागे सरकले जयदेव मात्र ते पाहून थक्क झाला...त्याने त्या भयंकर उपद्रवाचा चेहरा पाहिला होता...
“ धड्डsss..” कण आवाज झाला आणि जयदेवच्या तोंडावरतीच तो दरवाजा आदळून बंद झला...परंतु जयदेवचा चेहरा भ्हीतीने घामाघूम झाला होता....
“ते काय होत ?” जयदेव उद्गारला....
क्रमश: शेवटचा भाग उद्या किंवा परवा मित्रहो

MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,


Continue Reading

अघोर भाग 14-Marathi Bhutachi gosht

| 0 comments

अघोर भाग 14-Marathi Bhutachi gosht
लेखक:कनिष्क हिवरेकर
जयदेव गाडीच्या चाकाजवळच मानेवर कसलातरी जोरदार फटका बसल्याने बेशुद्ध होऊन पडला होता. गाडी पूर्णपणे लॉक होती आणि लॉकच्या आतमधून काचेच्या पलीकडून विश्वास आणि संध्या दोघेही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते...आपल्या आई बाबाच्या ओरडण्याने..अनुदेखील केविलवाणी होऊन सर्व पाहत होती. संध्याने तिला आपल्या छातीशी कवटाळले होते...ढगांचा गडगडाट होऊ लागला...विजांनी थैमान घातल होत.जयदेवची बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडला होता...तेव्हाच संधीचा फायदा घेऊन नाथ्याने तिथे पडलेला भला मोठा दगड आपल्या दोन्ही हातांनी उचलला आणि जमेल तेवढ आवसान गोळा करून तो पुढे सरसावला... “ आताsss.....मालक माझ्यावर खुश होणारsss....मालक तुमचा इमान ठेवलाय मालकsss....” तसाच नाथ्याने जयदेवाच्या मस्तकात प्रहार करण्यासाठी तो दगड उगारला होता कि...तोच कवटीचा कडकड फुटण्याचा आवाज झाला...आघात झाला, प्रहार झाला...कुणाची तरी एक वेदनादायी आर्त किंकाळी त्या संपूर्ण जंगलात पसरली...आणि पसरली एक निरव जीवघेणी शांतता...विश्वास मात्र आपले विस्फारलेले डोळे घेऊन समोर घडलेला तो प्रकार पाहतच राहिला...मस्तकातील कवटी फुटली परंतु झालेला प्रहार नाथ्याने जयदेवावर नाही तर.....“नाथ्याsss....भाड्याsss....ह्याsss.....” वेड्या गंगारामने छ्कीच्या पित्याने हातात लाकडाचा ओंडका घेऊन त्याचा आघात नाथ्याच्या डोक्यवर केला...नाथ्याच्या हातातला दगड तिथेच खाली सुटला..आणि धाडकन नाथ्याच ताठ शरीर तिथेच जमिनीवर कोसळले...विजांच्या कडकडाट सकट पावसांच्या धारा त्या जंगलात कोसळायला सुरु झाल्या... “छ्केsss....ए छ्केsss..आलो ग...पोरेsss ...आलो...अघोऱ्या...आता तुझी गत हाय...चांडाळाsss....” अघोऱ्याच्या नावाने चित्कार करतच वेडा गंगाराम तिथून जंगलाच्या वाटेने सैरभैर असा वाड्याकडे धावत सुटला... “जयदेव ?” “जयदेव?” विश्वास गाडीच्या काचावरतीच थापा मारत होता... अचानक सुरु झालेल्या पावसांच्या सरीनी जयदेवाच्या चेहऱ्यावर शिंतोडे उडाले...डोळ्याच्या पापण्या मीचवत जयदेव शुद्धीत आला...डोके उचलतानाच तो मागे मानेला हात लावून कन्ह्ला... जयदेवला जाग आलेली पाहून विश्वास ने धीराचा श्वास घेतला... पडल्या पडल्याच जयदेवने बाजूला पाहिले तसा तो दचकून जागचा उठला... त्याच्या जवळच अगदी नजरेसमोर नाथ्याच रक्ताने माखलेल मस्तक होत...
जयदेव गाडीचा आधार घेऊन उभा राहिला...नाथ्याच्या रक्ताने चिखलात लालसर असा चिकट द्रव पसरला होता... जयदेवने समोर पाहिले तसे त्याच्या नजरेस विश्वास आणि संध्या पडले...जयदेवने तिथेच गाडीचा दरवाजा उघडला... तोच विश्वासने जयदेवला गाडीमध्ये घेतले... “जयदेव...ठीक आहेस न ?”
“हो मी ठीक आहे विश्वास थोडीशी जखम झालीय....आणि कोण होता हा? काय झाल आता ? कोणी केल हे ?” अचानक झालेल्या आघाताने जयदेवला भांबावल्यासारखे झाले होते. “या व्यक्तीला मी हि एकदाच पाहिलं होत जेव्हा मी या गावात प्रथम प्रवेश केला होता...”
“तुम्ही दोघ ठीक आहात न ?” जयदेव म्हणाला.. “होय आम्ही दोघेही ठीक आहोत....चला आपण वाड्यावरती जाउयात...इथे राहणे धोकादायक आहे...” विश्वास म्हणाला...विश्वासने जयदेवला शेजारच्या सीटवरती बसवले...आणि गाडीची चावी फिरवली तशी गाडी चालू झाली..पावसाच्या रपरप पडणाऱ्या सरींनी जणू गाडीवरून धबधबाच वाहत होता खडकाळ दगडाच्या रस्त्यामुळे कदाचित गाडी हेलकावे घेत जात होती...संध्या मागे अनुला कुशीत घेऊन झोपवत होती...अनुचा ताप आणखीन वाढतच जात होता. पावसात आणखीन काहीवेळ त्यांनी जंगलामध्ये काढला असता तर गाडी चिखलात धसण्याची भीती होती....परंतु वेळ पाहता विश्वासने गाडी वेगात पळवली...आणि जंगलाचा रस्ता पार केला...व तिघेही वाड्याच्या जवळ येऊन पोहोचले...गाडी थांबताच क्षणी कसलातरी आवाज झाला...जसे कि एखादी जाडजूड भरदार गोष्ट एखाद्या पत्र्यावर पाय ठेऊन उभी राहिलीय....विश्वासने गाडी दरवाज्यातच उभी केली होती...परंतु तो आवाज हेरण्यास मात्र तो चुकला...विश्वासने गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीमधून बाहेर पाय ठेवला होताच कि जयदेवने त्याचा हात धरून त्याला आतमध्येच थांबवले... “विश्वास थांब...! गाडीतून बाहेर निघू नकोस.” विश्वासला आश्चर्य वाटले जयदेव असे का म्हणतोय गाडीतर अगदी वाड्याच्या जवळच येऊन थांबली आहे...अन बाहेर नाही निघायचं म्हटल्यावर.... “जयदेव वाडा आला आहे...अनुची तब्ब्येत ठीक नाहीये आपण आतमध्ये...” तोच जयदेवने आपल्या ओठांवर बोट ठेवले... “श्शश्स्स...!!” आणि तेच बोट गाडीच्या छताच्या दिशेने केले... “वरती.... कोणीतरी... आहे...!” जेव्हा विश्वासने जयदेवच्या इशाऱ्याकडे पाहिले तेव्हा मात्र विश्वास आणि संध्या दोघांच्याहि छातीत धस्स झाल....कारण गाडीचे छत एक इंच खाली धसले गेले होते असे जसे कुणीतरी त्याच्यावरती आपले दोन्ही पाय देऊन उभ आहे.... विश्वासने जयदेव आणि संध्याकडे पाहिल
आणि तसेच त्याने संध्याला खाली राहण्याचा इशारा केला...संध्याने अनुला सीट् च्या खाली झोपवले व स्वतःहि आपले डोके खाली झुकवले...संध्याचे डोळे मात्र अनुला होणाऱ्या त्रासामुळे रडून सुजून लालबुंद झाले होते. “जयदेव आणि विश्वास दोघांनीही आपले डोकी खाली झुकवून घेतली होती...वरती जे काही होत ते काहीक्षणाकरिता स्थिर उभ होत...पण हळू हळू त्याने जागेवरून हलायला सुरुवात केली...त्याच पाउल जसे जसे तो दुसऱ्या जागेवर छतावर मांडत होता तसे तसे गाडीची छत खाली खाली येऊ लागली होती....आता विश्वास जयदेव आणि संध्या तिघांनीही आपले श्वास रोखून धरले होते...गाडीचा एक दरवाजा फक्त उघडा होता तो देखील विश्वासच्या बाजूनेच... तोच विजेचा एक जोरदार तडाखा बसला..लवलवत्या विजेचा एक निळसर चंदेरी प्रकाश संपूर्ण वाड्यावर पडला..आणि त्याच उजेडात दिसून आली एक भयंकर सावली... एका प्रचंड आकाराच्या सैतानी , दानवी रुपाची सावली...जे आता सध्या गाडीच्या छतावरती उभ होत... विश्वास आणि जयदेव दोघेहि त्याच्या गुरगुरण्याचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू शकत होते संध्याने विश्वासचा हात आपल्या हाताने घट्ट पकडून ठेवला... तोच त्याच्या हालचालीमध्ये आणखीन बदल झाला...कारण आता ते गाडीवरून खाली उतरण्याच्या तयारीत होत. विश्वासने मनोमन स्वतःलाच दोष द्यायला सुरुवात केली... “माझ्या मुळे आज माझ्या बायकोचा ,माझ्या मुलीचा आणि माझ्या मित्राचा जीव धोक्यात आलाय...काय अर्थ आहे असे एखाद्याला मरणाच्या तोंडाशी ढकलून जगण्याचा..त्या पेक्षा मी त्याच्याशी दोन हात करून...” तोच मागून विश्वासला एक आवाज ऐकू आला...
“तो विचारसुद्धा मनात आणू नकोस....” हा आवाज जयदेवचा होता. त्याने जणू विश्वासच्या मनातील विचारच ऐकले होते आपला मित्र कसा आणि काय आहे हे त्याला चांगलेच ठाऊक होते गाडीवर असलेल्या त्या ...त्या भयंकर उपद्रव तात्पुरते स्थिर झाल्यासारखे वाटत होते...काही मिनिटे जयदेव, विश्वास आणि संध्या तिघांनीही आपली काहीएक हालचाल होऊ दिली नाही...तिघांचाहि असा समज झाला कि ते सुटले ...छतावरती जे काही होत त्याने आपल सावज , आपल भक्य् सोडल होत...गाडी अजूनही पावसातच उभी होती. संध्याने अलगद आपली मान वरती काढली आणि आजूबाजूला पाहिले...आणि नजर थेट मागच्या काचावरती टाकली....जेव्हा संध्याने आपली नजर मागच्या काचावरती टाकली तिथेच त्या क्षणात काचाच्या पलीकडे तिला एक भयंकर , विद्रूप , कुरूप सडलेला त्वचेचा...दाहक नजरेचा पांढऱ्याफकट बुभळ विरहीत डोळ्यांचा कानापर्यंत विखुरलेल्या केसांचा एक सैतानी चेहरा दिसून आला जो तिच्या चेहऱ्या पासून काही इंच अंतरावर होता. संध्या आपली किंकाळी अडवू शकली नाही...तोच विश्वासने तिला खाली ओढून घेतले...तोपर्यंत तो भयंकर चेहरा तिथून नाहीसा झाला होता...आणि त्याने गाडीच्या उघड्या दरवाज्याच्या दिशेने सरकत सरकत यायला सुरुवात केली होती विश्वास आणि जयदेव दोघांच्याहि नजरा आपल्या दिशेने वाढत येणाऱ्या मृत्यूवर थिजून राहिल्या होत्या आता कुठल्याहि क्षणी ते आतमध्ये येऊ शकत होत. आणि मग... डाव समाप्त....आणि तसेच झाले...उघड्या दरवाज्याच्या चौकटीत एक भयानक अनुकुचीदार नखांचा पंजा धडकन येऊन पडला...ते जे काही होत ते अदू होत..कदाचित विकृत शक्ती सोबतच त्याची शरीररचना हि विकृतच होती परंतु त्याच्या मागचा खरासूत्रधार...अजूनहि पडद्याआडच दडून हे सर्व जीवघेणे डाव मांडत होता...
“त्रिवार नंदना...रक्षाम भवतु....सैतान्ना....भस्म हो...” काही पावित्र्य रक्षकमंत्रांचा आवाज विजेच्या कडकडाटीसह वाड्याच्या आवारात घुमला...त्या आवाजाच्या कंपनाने जणू पावसाच्या थेंबाची आणि वाऱ्याच्या गतीची जणू कायापालटच झाली...थेंबात झुरत चिरत चडचडतच एक ज्वलंत ज्वालाग्राही मशाल....दुरूनच त्या सैतानाच्या त्या उपद्रवाच्या पंजावर येऊन थडकली...चीरग्या उडाल्या , ठिणग्या उडाल्या...अग्नीच्या पावित्र्याने त्या सैतानाच्या पंजावर आघात झाला....वेदनेच्या दैवाच्या अंशाच्या अग्नीने, ज्वालेने त्याला अत्यंत पिडा झाली...विश्वासने समोर पाहिले तेव्हा त्याच्या नजरेस दिसून आले कि त्याच विहिरीच्या मार्गांवरून जखोबा आणि त्याचे दोन साथीदार तिथे धावत येऊन पोहोचले होते.जखोबाचा चेहरा मात्र अगदी निर्भीड होता पण त्यांच्या सोबत धावत आलेले दोघे मात्र त्या उपद्रवाला डोळ्यासमोर नाहीस होताना पाहून बिथरले होते....जखोबा गाडीजवळ पोहोचेपर्यंत त्या सैतानाने त्या उपद्रवाने तिथून एका काळसर धुराच्या वलयात आपल रुपांतर करून पळ काढला... “ चला....उतरा लवकर गाडीमधून आतमध्ये चला...नाहीतर ते केव्हाही इथ येऊ शकत....चला लवकर बाहेर या...”
जखोबा विश्वास संध्या आणि जयदेव तिघांना गाडीचे दरवाजे उघडत बाहेर घेत म्हणाले...जयदेवची मान रक्ताने माखून गेली होती कदाचित रक्त प्रमाणाबाहेर वाहिले जात होते...इकडे संध्याच्या हातामध्ये अनुने देखील आपल्या वाड्याच्या दरवाज्यातून सर्वजण आतमध्ये शेवटी जखोबा आतमध्ये जाणारच होते कि त्यांना पाठीमागून कोणीतरी सदऱ्याला गच्च पकडले...आणि तो म्हणू लागला.... “मला...बी...मला बी...यायचं आतमध्यी....माझी छ्की हाय नव्ह आत..मला यायचं.....”
“जखोबा येऊदेत त्याला हि.....बाहेर त्याच राहण धोकादायक आहे....ते जे काय आहे त्याची कीव कशावरही नाहीये....आणि कुणावर हि नाहीये...” विश्वास म्हणाला...
संध्याने आतमध्ये आल्यावरती अनुच अंग तपासून पाहिले...तीच अंग तापेने फणफणत होत.... “ अनु ? ए अनु ? बाळा ? उठ न ए ? ए अनु ?” संध्या घाबरली होती कारण अनु काही केल्या आपले डोळे उघडायला तयार होत नव्हती... “विश्वास....अनुला बघ न काय झालय ? ती डोळेच उघडत नाहीये....तिला ताप भरलाय अंगात....प्लीज काहीतरी कर...” संध्या पाणावलेल्या डोळ्यांनी विश्वासकडे पाहत विनंती करू लागली... “ आपण तिला लवकरात लवकर खोलीमध्ये घेऊन जाऊ तिचे अंगावरचे सगळे कपे भिजले आहेत त्यानेच तिला ताप भरला आहे....विश्वास आपल्याला मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या कराव्या लागतील लवकर चल....” जयदेव उद्गारला....जखोबा तिथे उभा सर्व काही पाहत होता...जखोबाने त्यांच्या सोबत असलेल्या दोन्ही साथीदारांना बजावले... “हे बघा...तुम्ही दोघेही दरवाजाला राखण राहा....आणि कुणीही आले तरी कितीही आवाज आले तरीदेखील दरवाजा उघडायचा नाही...आजची रात्र फक्त इथे मुक्काम आहे...सावध रहा...”
“होय...हः होय मालक...” दोन्ही व्यक्ती जखोबाला होकार देऊन बंद दरवाज्याजवळ जाऊन बसले...जखोबाच्या जवळच वेडा छ्कीचा बाप कुडकुडत उभा होता...जखोबाने त्याच्या दोन्ही खांद्यांना धरून त्याला एका मशालीजवळ नेऊन बसवले... “इथून हलु नकोस....कुठे हि जाऊ नको....” असे सांगून जखोबा...तिथून निघाले व थेट अनुच्या खोलीच्या दिशेनी गेले...विश्वास आणि जयदेव दोघांनीही स्वयंपाकघरात शोधून मिठाच पाणी आणल.. वेडा गंग्या मशालीजवळ कुडकुडत बसलाच होता कि... “बाबा तू इथ हाय ? मी तर कवा पासून तुला शोधती हाय....तू इथ का बसला....?”
गंग्याने आपली मान आश्चर्याने अलगदपणे त्या आवाजाच्या दिशेने वळवली...समोर उभी छ्की पाहून त्याचा मात्र आनंदाचा पारावारच राहिला नाही....त्याचे डोळे आसवानी डबडबून निघाले.....त्याने आपला हात छ्कीच्या दिशेने वाढवला... “येsss....येsss....माझ्याजवळ ये ग माझे बायsss....” इकडे दरवाज्यात उभ्या त्या दोघांची हि नजर त्याच्यावर पडली... “आर तिथ तर कोणीच दिसत नाय...मग yo येडा नेमका.... कुणाला ये ये म्हणतोय... ?”
त्यावर दुसरा त्याच्याकडे पाहतच राहिला “हेहे...असल त्याची छ्की...” चुकून होईना पण ते वाक्य त्याच्या मुखातून निघताच त्या दोघांनी पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याने एकमेकाकडे पाहिले भीतीची एक अनामिक लहर श्वासावाटे त्या दोघांच्या काळजातून आरपार झाली....त्यांनी समोर नजर फिरवली तेव्हा आणखीन एक धक्का त्यांना बसला...यावेळी गंग्या त्याच्या जागेवरून नाहीसा झाला होता.
क्रमश:


MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,


Continue Reading

stories

! (1) !!!.......कथा एका जन्माची....!!! (1) ...सत्य भयकथा : रक्ताच्या नात्याची! (1) .पैज.....-Challenge -kalpanik katha (1) 'झटेतलं चांदणं-भाग ::-- दुसरा (1) 'झटेतलं चांदणं' (1) " किल्लेदार "- Bhitidayak katha (1) " व्हास व्हिला " (1) "गहिरे पाणी" (1) "फेरा" (1) "विरोचन" (1) “हौसा अन भैरी पहिलवानाच भूत” – गावाकडच्या भुताच्या गोष्टी (1) #काल्पनिक कथा (2) #काळ्या दरवाज्या मागिल रहस्य..-(भयकथा) (1) #तात्या (1) #ती #खोली (1) #पाठराखण* (1) #मोहिनी# (1) © कोणीतरी आहे (1) Aai-A true story (1) Annexes - भाग :- १ (1) Annexes- महाअंतिम_भाग :- १० (1) Annexes-भाग :- २ (1) Annexes-भाग :- ३ (1) Annexes-भाग :- ४ (1) Annexes-भाग :- ५ (1) Annexes-भाग :- ६ (1) Annexes-भाग :- ७ (1) Annexes-भाग :- ८ (1) Annexes-भाग :- ९ (1) Assal Marathi sms (1) Assal Marathi sms Story (1) Bhayanak kissa mintrancha - Marathi Horror Stories (1) bhitidayak katha (1) bhutachi gosht (6) bhutachi gosht -11 to 13 (1) bhutachi gosht -14 to 15 (2) bhutachi gosht -16 to 18 (1) bhutachi gosht -9 to 10 (1) Bhutachi Gosht In Marathi (1) bhutachya goshti (4) bhutachya navin goshti (1) bhutkatha (1) bhutpret (1) comedy sms (2) DENIAL-Bhaykatha-भयकथा (1) Ek Chotishi bhaykatha (1) Ek Chotishi Marathi Bhutachi Gosth (1) Gajara -Marathi Thriller Story (1) ghost story in marathi (1) Haunted College -(Part 2) (1) HAUNTED COLLEGE-भाग 3 (1) haunted house (1) haunted stories in marathi (2) Highway- Part 3 Marathi horror story-हायवे - भाग तीन (1) Highway- Part1 Marathi horror story-हायवे - भाग एक (1) Highway- Part1 Marathi horror story-हायवे - भाग दोन (1) Hindi Horror Stories (1) Hindi Horror Story (1) Horror Experience shared by Chandrashekhar Kulakarni Patil (1) Horror Incident with Me-Horror story (2) Horror Marathi stories (40) Horror Rain Story- in Marathi (1) Horror stories In Marathi language (1) indian horror stories in marathi (1) Jatra { bhag 1 } -Marathi Horror Story (1) Kalpanik Horror story (1) Latur -Bhkuamp -Horror Seen (1) Maharashtra Horror marathi stories -gavakadachya goshti (1) Majhgaon (1) marathi bhaykatha (10) marathi bhaykatha pratilipi (1) marathi bhootkatha (1) Marathi Bhutachi Gosht (13) Marathi bhutachi gosht-ratra shevatachi (1) Marathi bhutkatha (1) Marathi Chawat katha (8) Marathi Full horror story -DharmSankat (1) Marathi Horror Novel (9) Marathi Horror Stories (31) marathi horror stories pdf (1) Marathi Horror story (1) Marathi Horror Story गहिरा अंधार (1) Marathi Horror Story basis on true story (1) Marathi Horror Story Books (1) Marathi Horror story-Missed a road (एक चुकलेला रस्ता) (1) Marathi Horror Suspense thriller Complete Novel (1) Marathi Kadambari (1) Marathi Kalpanik Katha (2) Marathi Pranay katha (2) Marathi rahasykatha (1) marathi romantic story (7) marathi sexy stories (2) Marathi Short Horror story - (1) Marathi Shrungarkatha.- Bendhund (1) Marathi Tips (1) Mitra -Ek bhutkatha (1) Morgue(भयकथा) लेखिका-निशा सोनटक्के (1) My Horror Experience -Marathi Story (1) N.H.4 (एक भयकथा) -NH4-A Horror Story (1) New Marathi Chawat story (1) Newyork Horror Story (1) One of Great Marathi Horror Story (3) Ouija Board ( विजी बोर्ड ) (2) pratilipi marathi horror stories (1) Rahasykatha (1) satykatha (1) SCI-FI HORROR-Story (1) sexy stories (2) Shivadi (1) Short Marathi horror story (2) SOME OF THE BEST SINGLE HORROR STORIES (43) Suspense (1) The End -Marathi horror story (1) The mama (1) the skeleton key (1) The vampire (1) Thriller (1) UrbanHorrorLegends-Bhutkatha-Real Horror-Vadala (1) अकल्पिता.... एक शापित रहस्य....!!! - By दिपशेखर.. (1) अघोर भाग १२ (1) अघोर भाग ३ (1) अघोर भाग ५ (1) अघोर भाग ६ (1) अघोर भाग 7 (1) अघोर भाग ८ (1) अघोर भाग अकरावा.... (1) अघोर भाग चौथा *** (1) अघोर भाग दुसरा... (1) अघोर भाग सोळावा..-Aghor Part-16 -Marathi Horror Story (1) अघोर अंत-Marathi Horror Story Aghor-Part 18 -End of the story (1) अघोर भाग 13-Marathi Horror Story (1) अघोर भाग 14-Marathi Bhutachi gosht (1) अघोर भाग 15-Marathi Bhutachi gosht (1) अघोर भाग ९ (1) अघोर भाग दहावा (1) अघोर-Marathi Horror Story (17) अघोर. भाग पहिला... (1) अघोर.. अंतारंभ-Aghor Marathi Horror Stories Part-17 (1) अघोर...एक प्रकांड भय. (1) अतर्क्य (काल्पनिक कथा ) (1) अंतर्मनाची शक्ती... (1) अंधारकोठडी (7) अंधारकोठडी भाग ७ (1) अंधारकोठडी -भाग ६ (1) अंधारकोठडी भाग 1-Marathi Katha-Horror (1) अंधारकोठडी भाग 2-Marathi Katha-Horror (1) अंधारकोठडी भाग 3-Marathi Katha-Horror (2) अंधारकोठडी भाग 5-Marathi Katha-Horror (1) अधुरी प्रेम कहाणी (1) अनपेक्षित -The real horror experience story (1) अनाकलनीय- Marathi satykatha (1) अनामिका- Marathi Romantic Story (1) अनाहूत (भयकथा) (1) अनुत्तरित -by ✍️ दर्शना तावडे (1) अनोळखी ओळख (1) अनोळखी चाहुल -A Terror Story -Read on your risk (1) अनोळखी_ती (1) अभया (1) अमावस्येचा थरार (1) अमिबा-marathi kalpanik katha (1) अर्धनारी – सुहागरात्रीच सरप्राईझ | शृंगार कथा (1) अलवणी (1) अलवणी लेखक : अनिकेत समुद्र - भाग -12 (1) अलवणी लेखक : अनिकेत समुद्र - भाग ९ (1) आई विना भिकारी (सत्यकथा)-True story (2) आगंतूक - The Man From Taured (1) आंगारा (1) आघात (भयकथा) निशा सोनटक्के लिखित (1) आता तुझा नंबर (1) आत्मदाह- Marathi Kalpnik Katha blog (1) आत्मा -bhay katha (1) आत्याची माया - सत्यकथा -marathi satykatha (1) आयुष्यातल्या काही सुंदर व बेधुंद क्षणांचे शब्दांकन--marathi romantic sexystory (1) आरशातील_नजर_भयकथा -The mirror horror story (1) इथं...! (1) ईपरित -Read marathi horror katha online (1) उतारा... (का ओलांडू नये...) (1) उतारा... (का ओलांडू नये...) Marathi Ghost Horror story (1) उंदरांचा डोह (गूढकथा) (1) एक अघटीत-bhootkatha (1) एक अनुभव : -Marathi horror experience stories (1) एक_अनूभव.. (1) एक_कळी_सुखावली ! (1) एंटिक पिस-सत्यघटना (1) ओढ.-By Sanjay Kamble..-Real Marathi Horror Stories Online (1) कथचे नाव- भिंत (1) कथा - #वैष्णवी (1) कथा - #सहचरणी भाग २ रा (1) कथा - संचार (1) कथा :- अफझल विला (1) कथा :- अफझल_विला - Part 2-11 All (1) कथा :- नकळत सारे घडले (6) कथा :- नकळत सारे घडले -2 -Marathi Romantic Story (1) कथा :- नकळत सारे घडले -4-Marathi Romantic Story (1) कथा :- नकळत सारे घडले -5-Marathi Romantic Story (1) कथा :- नकळत सारे घडले -6- Marathi Roantic Story (1) कथा :- नकळत सारे घडले -Marathi Romantic Story (1) कथा :- नकळत सारे घडले भाग-3- Marathi Romantic Story (1) कथेचं नाव :- मी गिरीजाची मैत्रीन भाग ;- ७ (1) कथेचे नाव - अकल्पिता एक शापित रहस्य -भाग - ४ By दिपशेखर (1) कथेचे नाव - अकल्पिता.. एक शापित रहस्य- भाग 3 -By दीपशेखर (1) कथेचे नाव - टेलीव्हिजन_सिग्नल. - Horror Story -Television Signal (2) कथेचे नाव : HAUNTED COLLEGE-भाग 1 (1) कथेचे नाव : अकल्पिता एक शापित रहस्य -भाग : ५-By #दिपशेखर (1) कथेचे नाव :- (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन -भाग ११ (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन -भाग १२ (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -2 (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -3 (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -4 (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -5 (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -6 (1) कथेचे_नाव_अकल्पिता....एक शापित रहस्य....!!!- By दिपशेखर..-2 (1) करिष्माची पहिल्या लेस्बियन सेक्सची मजा... अनुभव ... (1) कर्म #By_Sanjay_Kamble (1) कळत-नकळत- real pranay stories (1) काठीवाला म्हातारा.....-Marathi horror stories online (1) कारखान्या तील भुत (1) काळ-marathi suspense story (1) काळरात्र (1) काळाची झडप (1) कुन्दनबाग हॉन्टेड हाऊस (1) कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स (1) के. सिवन (1) कोकणातल्या भूतकथा (3) कोकणातल्या भूतकथा भाग १-" वांझल्यातला गिरा " (2) कोकणातल्या भूतकथा भाग 3 " वांझल्यातला गिरा "- Marathi horror story- (1) कोकणातल्या भूतकथा-भाग २ " यव काय " ( येऊ का? ) (2) कोणाला सांगशील (1) क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज (1) खजिना-The Real Horror Marathi story (1) खरा स्पॉट ) (1) खारीबुंदीवाल भूत (1) खुर्ची..भयकथा (2) खुर्ची..भयकथा-भाग - १ (1) खुर्ची..भयकथा-भाग - 2 (1) खुर्ची..भयकथा-भाग - 3 (1) खेकडा भाग क्र - १✍️लेखन - शशांक सुर्वे (1) खेकडा भाग क्र -- २✍️लेखन -- शशांक सुर्वे (1) खेकडे (काल्पनिक भयकथा) -Khekade- marathi kalpanik bhaykatha (1) गजू एक हास्य परंतू सत्यभयघटना- Comedy Marathi horror story (1) गणेशभक्त (1) गधेगळ (1) गंमत अशी ही जीवघेणी... (1) गर्भवती भाग 2 (1) गर्भवती भाग 1 (1) गानू आज्जी आणि तिची अंगाई -Marathi Thriller story from the Andharwari Book (1) गानू आज्जी आणि तिची अंगाई -Marathi Thriller story from the Andharwari Book Part 2 (1) गानू आज्जी आणि तिची अंगाई...-Marathi Thriller story from the Andharwari Book Part 3 (1) गानू आज्जी आणि तिची अंगाई...-Marathi Thriller story from the Andharwari Book Part 4 (1) गानू आज्जी आणि तिची अंगाई...-Marathi Thriller story from the Andharwari Book Part भाग ५ (1) गानू आज्जी आणि तिची अंगाई...-Marathi Thriller story from the Andharwari Book Part भाग 6 (1) गिर्हा- Sweet children horror story (2) गुणाक्का ( पार्ट 2) (1) गुणांक्का ( पार्ट 3) (1) गुणाक्का( पार्ट 1 ) (1) गुपित भुयारी मार्ग (1) गुलाम-काल्पनिक Story (1) गॅरेज -Marathi Handy Horror story (1) गेस्टहाऊस (1) गोरेगांव पूर्व (खरी घटना (1) घर नंबर १३- New latest Marathi horror Story (1) घुंगरु भाग ८ वा (1) घोस्ट रायटर - a writer of ghost (1) घोस्टवाली लवस्टोरी- Ghost Wali Lovestory (1) चकवा -True Horror Story (1) चकवा की मृतात्मा -(सत्यकथा) (1) चिरतरूण- A Real Horror Story - Marathi (1) चिलापी रेंज-Marathi Bhaykatha (1) चेटूक - एक सत्यकथा - A True Horror Story (1) जखीण (repost) (1) जगातला मोठा आणि रहस्यमयी प्रश्न (1) जत्रा - एक भयकथा-Written By - Shrikant Sabale (1) जत्रा एक भयकथा भाग 2 (2) जत्रा एक भयकथा भाग 3 (1) जळका वाडा-Horrible marathi story (1) जीवंत विहीर (1) जीवनरस - Marathi Romanchak goshti (1) जुल्मी संग आख लडी.... (1) जेव्हा भुताची भेट होते. (1) झपाट्लेला वाडा: (1) झोपाळा. - By सुरेखा_मोंडकर (1) टास्क... भय कथा Task -Marathi horror story By Sanjay Kamble (1) डरना मना है ! (1) डाग- Daag the Marathi Horror Story on the blog (1) डिनर (1) डिलेव्हरी-Thriller Gosht (1) डिस्ट्रॉय ग्रेव यार्ड (आयरलैंड) -Some the horror moments (1) तंबाखू (4) तंबाखू - Part 2 (1) तंबाखू -Part1 (1) तंबाखू भाग 3 रा (1) तंबाखू भाग 4 (1) तर... (1) तळघर एका पिशाच्याचा वावर-marathi bhutachi story (1) तळघरातील रहस्य ( गणेश चतुर्थी स्पेशल ) (1) तिची_हाक... (1) तिढा Part 1 - to Part 4 (1) तिढा भाग ८ (1) तिढा भाग Part 5-Part 7 (1) तिरंगा (1) ती आईच होती (1) ती काळरात्र (The Unsolved Mystery) (1) ती काळरात्र (The Unsolved Mystery)-2 (1) ती काळरात्र 2 - शोध रहस्याचा...सुरुवात अंताची-भाग : 1 (1) ती काळरात्र 2 - शोध रहस्याचा...सुरुवात अंताची...-भाग : 2 (1) ती__कोण__होती.. (1) ती__थरारक__रात्र (1) ती_भुतिन-marathi horror stories blogs (1) तु ??? - A Hostel Horror story by Marathi ghost stories blog (1) ते कब्रस्थान ......-Horrible story (1) तो परत उठला आहे (1) दंडक (थरारक भयकथा) भाग - 2 (1) दंडक (थरारक भयकथा) भाग- 3 (1) दंडक (भयकथा)- Dandak Marathi bhaykatha online (1) दत्तक (काल्पनिक कथा) (5) दत्तक (काल्पनिक कथा) भाग २ (1) दत्तक (काल्पनिक कथा) भाग ३ (1) दत्तक (काल्पनिक कथा) भाग ४ (1) दत्तक (काल्पनिक कथा) भाग ५ (1) दत्तक (काल्पनिक कथा)-1 (1) दबंग - bhutakhetachya goshti (1) दरवाजे -Door Horry Story in Marathi (1) दराक्षी- Read online new marathi stories on this blog (1) दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी (1) दिपु -Small Marathi bhutachi gosht (1) दुसरा अनुभव (1) दुसरे जग-Horror Stories (1) दैवी संपदा लाभलेली झाडे... भाग २ (1) दैवी संपदा लाभलेली झाडे.... (1) नरपिशाच्च - भाग एक-marathi bhutachi gosht (1) नवी जन्मेन मी... भाग 2 (1) नवीन भयकथा-नशा- Navin bhutachi gosht -nasha (1) ना कलंक लग जाए। (1) निरंत (काल्पनिक भयकथा) (1) निरोप -marathi bhutachya goshti (1) निळावंती-Marathi bhutachi gosht (1) निष्प्राण By Ankit Bhaskar ( अंकित भाष्कर) (2) नूरमंजिल कॉलनी -New Marathi Horror Story (1) नूरमंजिल कॉलनी- A Real Horror Series (1) पंगत (1) परिपूर्ण संभोग कसा करावा? (1) पहिला पगार (भयकथा) (1) पाऊस (1) पाऊस -Rainy House story in Marathi (1) पाठराखण (1) पाणेरी... (1) पानाचा बटवा (1) पायवाट -भाग: दुसरा (1) पिंडदान-Marathi bhutachi gosht (1) पिशाच्च (2) पिशाच्च - भाग 01 (1) पिशाच्च - भाग 02 (1) पिशाच्च - भाग 03 (1) पिशाच्च पर्व -Marathi Great Histry (1) पिशाच्च पर्व -पर्व पहिले – अघोर कालींजर -भाग १ – धडा – १ (1) पिशाच्च पर्व -पर्व पहिले – अघोर कालींजर -भाग १ – धडा – २ (1) पिशाच्च पर्व -पर्व पहिले – अघोर कालींजर -भाग १ – धडा – 3 (1) पॅरानॉर्मल इन्व्हिस्टीगेशन अँट हॉन्टेड फोर्ट (राजस्थान) (1) पेन्सिल (1) पेन्सिल (भाग दोन)- PENCIL A HORROR TERROR STORY (1) पेन्सिल- PENCIL A HORROR TERROR (1) पेस्ट कंट्रोल....-लेखक - अक्षय शेडगे. (1) पेस्ट कंट्रोल....-लेखक - अक्षय शेडगे... (1) पोलीस चौकी-Marathi Horror Story (2) प्यार तुने क्या किया....-This is a horror story. Sensitive people be careful. (1) प्रपोज – मराठी भय कथा (2) प्रपोज – मराठी भय कथा-2 (1) प्रेमळ भूत -Lovely ghost Marathi Story (1) प्लॅटफॉर्म नं 7 - (भयकथा) - Platform 7 -bhaykatha marathi (2) फक्त पिता- bhutkatha (1) फायनलड्राप्ट (लघुकथा ) (1) फ़ार्म हाउस 😱 ( भाग -१ ) (1) फिरूनी (1) फिलिप-Marathi Horror Novel (1) फ्लॅट- A real horror story (4) बळी-part1 (1) बाभूळभूत.. (1) बायंगी एक सत्यघटना (1) बारीची पारी-Marathi Best story (1) बारीची पारी-Marathi Best story -Part3 (1) बारीची पारी-Marathi Best story -Part4 (1) बिंद्रा नायकिण (1) बिननावाचीगोष्ट.-काल्पनिक भयकथा (1) बेबी (Marathi)-मराठी चावट कथा (1) बेबी (Marathi)-मराठी चावट कथा- Part 2 (1) ब्लड रिलेशन्स (1) ब्लडी मेरी-भाग 1 (1) भयकथा (1) भयकथा-गुप्तधन Bhaykatha-Guptdhan (1) भयकथा: न जन्मलेली बाळं-bhutachi story (1) भयभीत- लेखक :- अंकित भास्कर- Bhaybheet Marathi horror story (1) भयानक गोष्ट-Bhayanak Gosht (1) भावकी- Marathi Pranay katha (1) भासातले_जग ( गुढकथा ) (1) भिज ओल- Marathi Thriller Experience Story 1 -3 (1) भिज ओल- Marathi Thriller Experience Story 4-6 (1) भिज ओल- Marathi Thriller Experience Story 7-9 (1) भुतांचा बाजार (1) भुताचा माळ-Marathi Thararak katha (1) भुताची_कोंबडी- Bhutachi komdi -marathi bhutkatha (1) भूक लागलीय त्यांना -Marathi Horror Stories Website (1) भूषण मुळे सातारकर (1) भेट-Marathi hrudyasparshi katha (1) मंतरलेली_रात्र (1) मदत (1) मदतीचे हात - Bhutachi gosht (1) मनोरमा ......... - Marathi new stories from Marathi writers (1) मनोरुग्ण (1) मनोरुग्ण - भाग आठ (1) मनोरुग्ण - भाग एक (1) मनोरुग्ण - भाग दोन (1) मनोरुग्ण - भाग सात (1) मनोरूग्ण - भाग चार (1) मनोरूग्ण - भाग तीन. (1) मनोरूग्ण - भाग पाच (1) मनोरूग्ण - भाग सहा (1) मयत... (1) मर्यादेच्या आत (1) मला.... बोलवतात -ऐक भयानक कथा (1) मसणवाट! (1) महिला विवाह सल्लागाराने दिला मला आणि माझ्या बायकोला (1) माघारपण- Marathi bhutachya goshti (1) मांजर..-Marathi bhutachi gosht (1) माझी अभया. (1) माझी शेवटची कथा..! ( friendship day spacial) (1) माझे बोन्साय (1) माझे_रडगाणे (1) माझे_रडगाणे (लघुकथा) लेखन-- शशांक सुर्वे (1) माझ्या मुलांना एवढा डबा द्याल का (1) माताराणी (Marathi Chawat Katha) (1) माध्यम..... (1) मानसीचा चित्रकार तो (1) मामा-Marathi karani katha (1) मायकल -भाग क्र -१ -लेखन -- शशांक सुर्वे (1) मायकल भाग क्र - २ (1) माया- ek marathi romanchak gosht (1) माया- Marathi bhutkatha (1) माया-EK Marathi Romanchak Katha (1) मित्र-भयकथा (2) मिरा दातार बाबा - एक सत्य कथा (1) मी गिरीजाची मैत्रिण -अंतिम (लवकरच भेटू) (1) मी गिरीजाची मैत्रीन -भाग :- ९ (1) मी गिरीजाची मैत्रीन -भाग १० (1) मी गिरीजाची मैत्रीन- (1) मी गिरीजाची मैत्रीन-भाग :- १३ (1) मी गिरीजाची मैत्रीन-भाग :- १४ (1) मी गिरीजाची मैत्रीन-भाग :- १५ (1) मी गिरीजाची मैत्रीन-भाग :- १६ (1) मी गिरीजाची मैत्रीन-भाग :- ८ (1) मी येऊ का- Horror Blog from maharashtra (1) मी_तुमची_वाट_पहाते- Marathi Stories Portal (1) मुडदा_घर.. (1) मु्त्युचा_जबडा (माझ्या गावी घडलेली पिशाच्चा ची सत्यकथा) (1) मृत्यूचा दिवा (रहस्यकथा) - Marathi Rahasykatha (2) मृत्यूची देवता- Marathi Information about death (1) मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास-गरुडपुराण-Marathi Best Stories on the blog (1) मृद् गंध भाग::-- पहिला -By Vasudev Patil-Nandurbar (1) मृद् गंध -🔖 भाग ::-- आठ-By Vasudev Patil (1) मृद् गंध -🔖 भाग ::-- तिसरा -By vasudev Patil (1) मृद् गंध 🔖 भाग ::- सातवा-By Writer Vasudev Patil (1) मृद् गंध 🔖 भाग ::-- दुसरा- By Vasudev Patil Nandurbar (1) मृद् गंध 🔖 भाग ::-- नववा.-By Vasudev Patil (1) मृद् गंध 🔖 भाग::-- चौथा-By vasudev Patil (1) मृद् गंध 🔖 भाग::-- पाचवा -By Vasudev Patil (1) मृद् गंध 🔖 भाग::-- सहावा-Vasudev Patil (1) मॅडम तुंम्ही बरोबर होता-भयकथा (1) मेनका - भयकथा- Menaka Marathi horror story -bhaykatha (1) मैत्री -A Freind Story (1) मॉल - पार्ट -5 (2) मॉल ( पार्ट 3 ) (1) मॉल ( पार्ट 4 ) (1) मॉल ( पार्ट 6) (1) मॉल ( पार्ट 7) (1) मॉल (पार्ट 1) (1) मॉल (पार्ट 2 ) (1) मोहिनी -Marathi Horror story blog story (1) मोहिनी-EK Marathi bhaykatha (1) यौवन ज्वर.marathi chawat katha (1) रक्षाबंधन(भयकथा)-Marathi bhyakatha (1) रखवालदार-Marathi Bhutachi gosht (1) रखेल... शोकांतिका... (1) रत्नदिप सोसायटी- Marathi Gudhkatha (1) रहस्यकथा (1) रहस्यकथा - Marathi pratilipi (1) रहस्यमयी गुफा....-Bhutakhetachya Goshti (1) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 3) (1) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 4) (1) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 5) (1) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 6-7) (1) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 8)- End (1) राखणदार सलामत तो -Marathi Reading blog stories (1) राखणदार-काल्पनिक भय?? (अतृप्त आत्म्याची कथा ) (1) राजकारण- Marathi Pranay Katha (1) रावण संहिता माहिती-Asali Raavan Sahinta (1) रूममेट-Collage time horror story (1) रेल्वेचा बंगला (1) रोमांचकथा (1) लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो (भाग १) - (1) लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो (भाग २) (1) लेकीची_फी (1) वय फक्त एक अंक आहे..! - - Marathi Sexy Story online (1) वाड्यातील खिडक्यांचे महत्व. (1) वासनांध- Horror Story marathi (1) विकल्प-Marathi bhaykatha (1) विजय_कुमार- Marathi Bhaykatha (1) विपरीत -Marathi bhutachi gosht (1) विपरीत भाग -१ (1) विपरीत भाग -२ (1) विळखा (2) विळखा - भाग 2 (अंतिम भाग) (1) विळखा - सत्य घटना - MArathi horror story Part1 (1) विवाहित नवरा बायकोची प्रेम कथा. (1) विसावा विहीर - आरे कॉलनी (1) विहिर (1) वेड लावी बावरी नजर-भाग::- एक (1) वेड लावी बावरी नजर-भाग::-- दुसरा (1) वेड लावी बावरी नजर-भाग::---तिसरा (1) वेश्या -लेखन - अक्षय शेडगे Story by Akshay Shendage (1) वेश्यागमनातील त्रूटी आणि धोके... (1) शिकार भाग क्र - १- लेखन :- शशांक सुर्वे (2) शिकार.........(भाग क्र - २) (2) शिघ्रपतनवर उपाय start stop start (1) शृंगारिक कथा - संगीताची धुलाई- (लेखक गंगाधर पाटणकर)- भाग पहिला (1) शृंगारिक कथा - सरिताच्या नवऱ्याची मैत्रीण - भाग १ (1) शेकोटी (लघुकथा) -लेखन :- शशांक सुर्वे (1) शेकोटी.-Romanchak Katha (1) शेवटची लोकल (लेखक -K sawool ) (1) संगणक दुरुस्ती येते कामाला - Marathi pranay katha stories (1) संगम_लॉज (1) संगम_लॉज (भाग तिसरा)- 3 (1) संगम_लॉज - Part 2 (1) संगीत.. - एक सुरमयी भयकथा (1) सत्य कथा.....-True Story (1) सत्यकथा : #प्रेमम.. (1) सत्यातील असत्यता लेखक : अमृता राव (1) समय - ती एक अनाहूत वेळ ! (भाग १) (1) समय-ती एक अनाहूत वेळ..!(भाग २) (1) समुद्र योगिनी (प्रकरण एक ) (1) समुद्र__किनारा (1) सरदेसायाची गढी (1) सरदेसायाची गढी-भाग :-दुसरा (1) सरदेसायाची गढी-भाग:- तिसरा (1) सवाष्ण ********* (1) सहचरणी भाग १ ला (1) सावट भाग -२ (1) सावट💀 भाग -१ (1) सासूमाँ (1) सीता भवन - Marathi Story - Part 2 (1) सीता भवन - Marathi Story - Part 3 (1) सीता भवन - Marathi Story - Part 4 (1) सीता भवन - Marathi Story -Part 5 (1) सीता भवन - Marathi Story -Part 6 (1) सीता भवन-bhutachi gosht (1) सीमा लॉज... (1) सुटका... (1) सुडाचा प्रवास... (1) सुनीताचे धाडस -Marathi love story (1) सुपरफास्ट_भोकाडी. (1) सुलेखाचा टाक (1) सुसाईड... वी.............काल्पनिक लघुकथा (1) सूडकथा-गूढकथा (1) स्त्रियांचे हस्तमैथुन (1) स्त्रीचा ‘काम’प्रतिसाद... (1) स्मशानातील पैसे (1) स्वप्न -(लघुकथा) (1) स्वप्न-पार्ट... 2. (1) स्वप्न... पार्ट 1...- Kalpanik katha (1) हातजोडी-देवा धर्माचे गूढ आणि विज्ञान (अधिकृत) (1) ही ओढ रक्ताची (1) ही ओढ रक्ताची-Bhag 2 (1) ही ओढ रक्ताची-Bhag 3 (1) ही ओढ रक्ताची-Bhag 4 (1) ही ओढ रक्ताची-Bhag 5 (1) हॉस्टेल !! भाग : १- Hostel !! Horror story online Marathi -Part1 (1)