दैवी संपदा लाभलेली झाडे... भाग २
१०. काळी हळद भाग एक पासून पुढे चालू:-
....मित्रांनो मागच्या भागात आपण काळी हळद कुठे मिळते ह्या संबंधी माहिती घेतली. ह्या भागात आपण तीची ओळख कशी पटवायची आणि तीला घरी कशी आणू शकतो ह्याचा विचार करणार आहोत.

१. काळ्या हळदीचे झाड कसे ओळखावे...
... काळ्या हळदीचे झाड हे सेम कर्दळीच्या झाडासारखेच दिसते परंतु ते कुठेही शहरात किंवा रस्त्यावर उगवत नाही तर ते जंगलात किंवा जिथे लोकांचा वावर कमी आहे अशा ठिकाणी उगवते किंवा मग जर कोणाकडे कुंडीत लावले असेल तर तुम्हाला ते मिळू शकते. त्यामुळे जर तुम्हाला काळ्या हळदीचा शोध घ्यायचा असेल तर डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहावे लागेल. काळ्या हळदीच्या किंवा इतर प्रकारच्या हळदीच्या झाडात आणि कर्दळीच्या झाडात हा फरक असतो की काळ्या हळदीच्या पानावर मध्यभागी रेष असते त्यामुळे जर तुम्हाला कुठेही अशा प्रकारचे रेष असलेले कर्दळी प्रकारचे झाड आढळून आले तर समजा की ते झाड त्या प्रकारच्या हळदीचाच प्रकार आहे.

२. काळ्या हळदीचे झाड किती शक्तिशाली आहे हे ओळखण्याच्या टेस्ट...
... काळी हळद ओळखण्याच्या काही टेस्ट असतात. त्या टेस्ट जरा चमत्कारिक आहेत पण खऱ्या आहेत. परंतु ह्या टेस्ट सर्वच झाडाला येत नाहीत. परंतु जे झाड खूप जंगलात किंवा निर्जन ठिकाणी असेल तर त्याला अशा प्रकारच्या टेस्ट मिळू शकतात.

टेस्ट नं १ - ब्याटरी
ह्या टेस्ट मध्ये आपण काळ्या हळदीच्या झाडाजवळ छोटी ब्याटरी नेली असता तिचा प्रकाश कमी होऊ लागतो ती वीझु लागते त्याच प्रमाणे जर झाड खूपच शक्तिशाली असेल तर ब्याटरी चा बल्ब फुटतो.
टेस्ट नं २ - Snake
काळ्या हळदीच्या झाडाजवळ सापांचा वावर असू शकतो. जर अशाप्रकारच्या झाडाजवळ तुम्हाला साप इत्यादि आढळून आल्यास ती खूप शक्तिशाली हळद आहे असे समजावे.
टेस्ट नं ३ - niddle
काळ्या हळदीच्या रोपा जवळ एक छोटी सुई ठेवावी आणि काही तासांनी परत जाऊन बघावे जर ती सुई वाकडी झाली तर समजावे कि हे झाड त्याच प्रकारचे आहे खूप शक्तिशाली आहे. काही झाडांमध्ये इतकी शक्ती असते की त्या एखाद्या मोठ्या पारई (खड्डा खनण्याचे हत्यार) किंवा मोठा लोखंडी रॉड पण वाकडी करू शकते.
टेस्ट नं ४ - मशिन
काळी हळदीच्या बाजूला रिस्ट वॉच इत्यादी नेले असता ते बंद पडू शकते त्याच प्रमाणे तुम्ही काळी हळद घेऊन बस, कार इत्यादी मधून प्रवास करत असाल तर बस इत्यादी च इंजिन बंद पडते आणि टायर फुटू शकतात.
टेस्ट नं ५ - कुलूप
काळ्या हळदीच्या झाडाजवळ कुलूप नेले असता ते आपोआप उघडते. त्याप्रमाणे लहान मोठे कुलूप घेऊन त्याची परीक्षा करावी.
टेस्ट नं ६ - कापूर
काळ्या हळदीच्या जवळ कपूर नेला असता तो आपोआप विरघळू लागतो किंवा उडून जातो. हि सर्वात साधी टेस्ट आहे.
३. काळी हळद घरी आणण्याचे साधन...
...जर काळी हळद ही साधी असेल तर तिला सहजपणे आणता येते परंतु जर ती खूप शक्तिशाली असेल तर खूप काळजी घेणे आवश्यक असते. शक्तिशाली झाडाजवळ मोठे साप असण्याची शक्यता असते. अशा झाडाजवळ जाण्याआधी आजूबाजूला पाहणी करणे आवश्यक ठरते नाहीतर ते जीवावर बेतू शकते. अशा झाडांची रक्षा मोठे साप करत असतात कोणी त्या झाडाजवळ गेले की त्यांना त्यांच्या मनातले विचार कळतात आणि ते त्यांच्यावर हल्ला करतात. त्यासाठी जंगलात उगवलेल अस झाड दिसल की लगेच त्याला घरी आणण्याचा विचार न आणता त्याच्याजवळ जाऊन प्रार्थना करावी की मला चांगल्या कामासाठी तुम्हाला घरी घेऊन जायचे आहे असे सांगावे आणि त्याची टेस्ट घेऊन बघावी.
...जर ती ब्याटरी टेस्ट किंवा niddle टेस्ट देत असेल तिथे १००% साप असू शकतो त्यामुळे शक्यतो तीचा नाद सोडावा. हे सांगत असताना जर तिथे साप इत्यादी आला तर जास्त प्रार्थना करावी हे करत असताना तो माघारी गेला तर त्याचा होकार समजावा आणि दुसऱ्या दिवशी किंवा शुभ मुहूर्तावर रीतसर पूजा पाठ करून त्याचे मूळ घरी आणावे. समजा साप माघारी नाही गेला तर तिला आणताना खूप काळजी घ्यावी लागते.
... हळदीचे झाड साधे असेल तर म्हणजे पानावर काळी रेष नसून जांभळी इत्यादी असेल तर तीपण खूप उपयोगी असते. ती तुम्ही वरील प्रमाणेच अदल्यादिवशी तिला आमंत्रण देऊन दुसऱ्यादिवशी पूजा करून घरी आणू शकता.
...आता जाणून घेऊ की शक्तिशाली काळी हळद काढण्याची विधी आणि काळी हळद किंवा इतर हळदीची लागवड संगोपन कसे करावे. अंकुश सू. नवघरे.
१. शक्तिशाली काळी हळद काढून आणण्याचा विधी
... शक्तिशाली काळी हळद टेस्ट शिवाय ओळखण्याचा प्रकार म्हणजे तिचा कलर आणि तिच्यावर असलेल्या रेषेचा गडद पणा आणि त्या झाडापासून साधाराणतः १०० मीटर च्या परिसरात पसरलेला कापरासारखा सुगंध. अशा प्रकारची शक्तिशाली हळद आणण्याचा विधी.
... जिकडे जंगलात अशाप्रकारचे काळ्या हळदीचे झाड असेल तिथे नीट पाहणी करून त्या झाडाच्या आसपास ची अशा दोन झाडांची निवड करावी जी झाडे उंच असून त्यावर सहजपणे चढता येईल आणि त्या झाडांच्या बरोबर मध्यभागी काळ्या हळदीचे झाड उगवले आहे. त्यानंतर काळ्या हळदीच्या मुळाच्या आसपास कुदळीने जरासे खणून त्याच्या आजूबाजूची माती भुसभुशीत करावी आणि ती कुदळ तिकडेच ठेऊन त्या स्थानापासून आपण दूर जाऊन आपल्या अंगावरचे सर्व कपडे काढून तिथेच टाकून दुसरे घालावेत आणि दोन झाडांपैकी एका झाडावर चढावे. त्यानंतर हळदीच्या झाडाच्या खोडाला दोरीचा मध्यभाग बांधावा आणि त्यादोरीचे एक टोक एक झाडावर घेऊन बसावे आणि दुसरे टोक पकडून दुसर्याने दुसऱ्या समोरच्या झाडावर बसावे आणि झाडावर चाढुन ती दोरी त्या दुसऱ्या माणसाला खेचायाला सांगावी ज्या व्यक्तीने त्या झाडाला स्पर्श केलेला नसेल किंवा आसपासची माती खणली नसेल. दोरी खेचल्यामुळे ते झाड बाहेर खेचले जाते आणि जर का त्याच्या मुळाशी काही साप इत्यादी जनावर असलेच तरी ते आपल्या पर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्या मुळातून साप बाहेर येऊन तो वास घेऊन पहिला वार त्या कुदळीवर करतो आणि त्यावर डोकं आपटून स्वतःचा जीव देतो. अशावेळी जर का ते झाड काढणाऱ्या माणसाने अंगावर पूर्वीचा एकही कपडा किंवा लहानसा दोरा जरी घातलेला असेल तर तो त्याला शोधून काढून त्याला चावून चावून त्याचा प्राण घेऊ शकतो. त्यामुळे पूर्वीचे कपडे ना बदलत तेच ठेवणे हे जीवावर बेतू शकते. त्या सापाला ते झाड खूपच प्रिय असल्याने ते उखडल्याच्या वियोगात आणि रागात तो ते काढणाऱ्याला मारण्याच्या उद्धेशाने त्या माणसाच्या कापड्याला किंवा त्या कुदळीलाच तो माणूस समजून त्यावर वार करतो आणि मारतो. ( हे माझ्या गुरूंनी सांगितले होते. अर्थात हे नेहमीच होते असे नाही परंतु ह्या प्रकारचे काम करताना नेहमी काळजी घेणे अपेक्षित आहे) त्यानंतर झाडाची मनोभावे पूजा करून सहजपणे तुम्ही ते झाड घरी आणू शकता. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की ह्या झाडाकरिता आमंत्रण देण्याची विधी करायची गरज नसते कारण ही वनस्पती खूप दुर्लभ असल्याकारणाने तुम्ही आदल्या दिवशी आमंत्रण दिले आणि दुसर्या दिवशी ती आणण्यासाठी गेलात तर तिने जागा बदललेली असू शकते.
२. काळी हळद मिळण्याची ठिकाणे...
निर्जन प्रदेश, जंगल, डोंगरावरील उतार, उंच डोंगर कड्यावर, निर्जन ओसाड शेते किंवा शहरात एकदोन ठिकाणी रेल्वे लाईनच्या बाजूला जिकडे माणसांचा अजिबात वर्दळ नाही अशा ठिकाणी अशा प्रकारची झाडे पाहण्यात आली आहेत. काळ्या हळदी मधेच एक राज मोहिनी नावाचे झाड येते त्यामध्ये कोर्ट कचेरी मध्ये विजय मिळवून देण्याची ताकद असते पण तिची पाने हि सध्या हळदीच्या पानासारखी असतात, परंतु ती फक्त जंगलात सापडत असून तिच्या मुळाशी शक्यतो काळे विंचू असण्याची दाट शक्यता असल्याने तिकडची माती भुसभुशीत करून त्यात धूर सोडावा त्यामुळे विंचवसारख्या प्राण्यांची भीती कमी होते.
३. काळी हळद किंवा तशाप्रकाराची दुसरी हळदीची लागवड कशी करावी...
...काळी हळदीचे मूळ/कंद मिळाले असता ते कधीही उघड्यावर किंवा घराबाहेर ठेऊ नये नाहीतर चोरी होण्याचा संभव असतो कारण बऱ्याच लोकांना त्यासंबंधी माहिती असते.
... ते मूळ/कंद लगेच जमिनीत अथवा कुंडीत पुरावे. ते जर तुम्ही घरात कुठेही माती सोडुन किंवा जमीन सोडून इतरत्र ठेवले तर उंदीर पळवतात परंतु मातीवर ठेवले तर त्याला उंदीर घेऊन जात नाहीत. हा त्याचा चमत्कारिक भाग आहे.
... काळी हळदीला सामान्यतः दिवाळीच्या जरा आधी पालवी फुटायला, कोंब यायला सुरुवात होते त्याआधी ते मूळ सुकलेल दिसते परंतु त्याच्यात जीव असतो. उन्हाळ्यात पाने सुकलेली असल्यामुळे ती बाहेर दिसत नाहीत त्यामूळे फक्त पावसाळ्यातच तिचा शोध लागू शकतो. परंतु काळ्या हळदीच्या बाबतीत आजूबाजूची माती काळी पडत असल्याने नीट निरीक्षण केले तरी अशा वनस्पती मिळू शकतात. अशाप्रकारच्या हळदीच्या रोपाची पाने उन्हाळ्यात पूर्णपणे सुकतात त्यामुळे त्याचा सुकलेला कंद जमिनीवर दिसून येतो, असे असले तरी ते आतमध्ये जिवंत असल्याने त्याला मेलेलं मानून फेकू नये तसेच पाणीहि घालू नये कारण उन्हाळ्यात त्याला पाण्याची आवश्यकता नसल्याने ते कुजण्याची शक्यता असते. निसर्गतःच त्याला स्वतःला जिवंत ठेवण्याची शक्ती असते त्यामुळे उन्हाळ्यात ते स्वतःला जीवंत ठेवते त्याला पाण्याची आवश्यकता लागत नाही. त्याला जेव्हा पालवी फुटायला सुरवात होते तेव्हा पाणी घालायला सुरुवात करावी. अंकुश सू. नवघरे.
... काळी हळदीची कुंडी अशा ठिकाणी लावावी जी जागा खूप पवित्र आहे, जिकडे माणसांची सावली किंवा जास्त वावर नसेल, कोण जास्त फिरकत नसेल तर तिच्यात जास्त पॉवर येत असते. तिला रोज उदब्बती दाखवावी आणि तिची तुळसीच्या झाडा प्रमाणे पूजा करावी. जर शेतात झाड लावले असेल तर त्याला कुंपण करून कोणाला हि जाऊ देऊ नये.
४. सहजपणे काळी हळद मिळविण्याची सामान्य विधी
... मित्रांनो काळी हळद किंवा त्या प्रकारातली कुठलीही हळद हि सहजासहजी मिळत नसली तरी काही मार्गानी आपण ती मिळवू शकतो. तुमच्यापैकी कोणी शेती करत असेल तर त्याच्यासाठी हे शक्य होऊ शकते. ज्यावेळी साध्या हळदीचे पीक घेतले जाते तेव्हा कधी कधी दैवयोगाने त्यात थोड्याफार प्रमाणात काही हळद काळ्या रंगाची पण उपजू शकते. त्यामुळे हा काळी हळद मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. हा उपाय मी स्वतः अनुभवलेला आहे.

५. काळ्या हळदीचा उपयोग कसा करून घ्यावा...
१. काळ्या हळदीचे रोप असलेली कुंडी तुमच्या ऑफिस मध्ये किंवा दुकानाच्या दरवाजा बाहेर ठेवली असता व्यवसायात कमालीची वाढ होते. आमच्या येथे मी तुम्हाला कित्येक दुकाने दाखवू शकतो त्याच्यासमोर अशा कुंड्या ठेवल्या आहेत.
२. घराच्या बागेत ह्याची रोपे लावल्याने घरात समृद्धी येते. काळ्या हळदीच्या पानाचा रस प्यायल्याने ३ दिवस पर्यंत तहान भूक लागत नाही. त्यामुळे साधू इत्यादी त्याचा उपयोग करताना आढळतात.
३. ज्याच्या घरात अशाप्रकारची झाडे असतात त्यांचे रक्षण सर्प करतात. (न मानणार्यांनी ह्याला अंधश्रद्धा समजून सोडून द्यावे) काळ्या किंवा इतर हळदीचा जरासा नखाएवढा तुकडा तोंडात ठेऊन तुम्ही ज्याच्याशी बोलता तो तुमच्यावर मोहित होतो आणि तुमची शासकीय किंवा इतर काही कामे सहजपणे होऊ शकतात. तसेच पैशाची कामे किंवा कोणाला कर्जाऊ दिलेली रक्कम सहजपणे परत मिळू शकते.
४. रोज काळ्या हळदीचे किंवा इतर त्याच प्रकारातील हळदीचे सेवन केल्याने माणसाच्या बोलण्यात एक प्रकारची वाचा शक्ती निर्माण होते.
५. हळदीचे पान असनाखाली ठेऊन ध्यान केले असता ते पटकन लागते कारण ह्या प्रकारच्या झाडांमध्ये विचार संक्रमाणाची आणि विचार ग्रहणाची जबरदस्त शक्ती असते. ज्या प्रमाणे व्याघ्रसनावर बसून माणसाचे सहज ध्यान केंद्रीत होते त्याच प्रमाणे ह्याच्या पानांचा उपयोग असनाखाली केला असता सहज योग प्राप्त होऊ शकतो.
६. अशा प्रकारच्या हळदीचा एक गोल तुकडा कापून त्यावर त्राटाक केले असता तुमच्या वर केले गेलेले करणी प्रयोग (Phychic Attack) त्या माणसावरच उलटू शकतात.
७. रोज ह्या प्रकारच्या हळदीची मनोभावे पूजा करून तिला तुळशी प्रमाणेच धूप दीप दाखवल्याने आपल्या मनोकामना ६ महिने ते १ वर्षांत पूर्ण झाल्याचे कित्येक लोकांचे अनुभव आहेत.
८. काळ्या हळदीचे किंवा त्याच प्रकारच्या इतर हळदीचे लहान तुकडे किंवा छोटी रोपे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात परंतु दक्षिण दिशा सोडून लावले असता त्या त्या दिशेचा वास्तुदोष जातो. जसे नैवृत्त कोपऱ्यात लावले असता घरात एकोपा निर्माण होतो व घरातलयांशी संबंध सुधारतात. दारासमोर लावले असता अशुभ शक्ती घरात शिरत नाहीत, इत्यादी.

११. नारळ:-
.....नारळ माहिती नाही असा एकही माणूस ह्या जगात मिळणार नाही, परंतु आपल्या देशात नारळाला खूपच महत्व प्राप्त झालेले आहे. नारळाला माणसासारखे मानले जाते करण नारळाला २ डोळे आणि एक शेंडी असल्याने नारळाला ब्राम्हण मानले जाते आणि कुठल्याही सात्विक पूजा कार्यात नारळाची स्थापना केली जाते. कुठलेही पूजा, कर्म, श्राद्ध किंवा कुठलेही कार्य नारळाशिवाय पूर्णच नाही होऊ शकत. अशा ह्या नारळात एखादी वाईट किंवा अशुभ शक्ती अडविण्याची प्रचंड ताकद आहे. तुम्ही घरोघरी पाहिले असेल की देव्हाऱ्यात कर्यावर म्हा आहे तांब्याच्या तांब्यावर नारळ ठेवलेला असतो आणि त्याखाली पाणी ठेवलेले असते किंवा कित्येकांच्या घराच्या आढयाला लाल किंवा पिवळ्या कपड्यांत नारळ टांगलेला असतो तर ते का. त्या मागे एक शास्त्रीय कारणही आहे ते म्हणजे आकाश तत्व. इतर कुठलेही फळ, कुठलीही गोष्ट सोडलीत तर फक्त नारळातच पंचमहाभूतांतील सर्वच तत्व सम प्रमाणात एकटवली गेलेली आहेत. त्यात आकाश तत्व हे जास्त प्रमाणात आहे. अगदी मानवी शरीरापेक्षाही जास्त आकाश तत्व नारळात एकटवलेले आहे आणि सृष्टी च्या नियमाप्रमाणे कुठलीही शक्ती ही नाशानंतर आकाषश तत्वाकडेच खेचली जाते. जसे मनुष्याचा आत्मा देहाच्या मृत्यूनंतर सुर्यलोकत म्हणजे आकाशातच जात असतो. ह्याच कारणांमुळे ह्या जगातील सर्वच शुभ, अशुभ आणि नकारात्मक शक्तीही नारळाकडेच सहजरित्या आकर्षित होत असतात आणि म्हणून कुठलीही शक्ती घरात पासरण्या आधी ती नारळात खेचली जाऊन आकाशाकडे परावर्तित केली जाते किंवा आतल्या जलतत्वा मध्ये विलीन केली जाते. कुठलाही उतारा किंवा अस्थींचे विसर्जन जलात करतात कारण फक्त जल तत्वातच त्याचे विघटन करण्याची शक्ती आहे आणि ती नारळामध्ये निसर्गतः आहे. तुम्ही पाहिले असेलच की देवाला नारळ अर्पण करताना त्याची शेंडीकडची बाजू देवाकडे ठेऊन मग तो फोडून प्रसाद म्हणून दिला जातो कारण त्या शेंडीतूनच कुठलीही शक्ती नारळात खेचली जाऊन त्यात कैद होत असते. तशीच ईश्वरी शक्ती त्यात खेचली जाऊन त्यातील पाण्यात विरघळते आणि म्हणूनच ते पाणी तीर्थ म्हणून आणि खोबर प्रसाद म्हणूंन वाटला जातो. नारळाला देवघरात कर्यावर ठेवण्याचे कारण म्हणजे तुम्ही हे ऐकलेच असेल की कोणावर ही करणी करण्या आधी त्याच्या देवांना बंधन आणले जाते, त्याचप्रमाणे कुठलीही अशुभ शक्ती आधी आपल्या देवावर किंवा कुलदैवतावर हल्ला करते आणि त्याला निष्प्रभ करून आपल्याला मिळणारे देवांचे सहाय कमी करते त्यानंतर मग ती शक्ती आपल्या घरावर हल्ला करते परंतु नारळाच्या अस्तित्वामुळे ती त्याच्यात खेचली जाऊन आपल्या देवाना त्याची झळ पोहोचत नाही आणि आपलेही रक्षण होते. कर्यात पाणी ठेवण्यामागचे कारण म्हणजे कधी कधी नारळ सुकलेला असू शकतो किंवा खराब झालेला असू शकतो तेव्हा हीच शक्ती कार्यतील पाण्यात उतरते आणि आपले रक्षण होते.
असा हा दैवी संपदा लाभलेला नारळ सर्वांनी आपल्या घरातील देव्हाऱ्यात किंवा देव्हारा ईशान्य भागात नसेल तर ईशान्य कोपऱ्यात ठेऊन आपले आणि आपल्या घराचे रक्षण करावे ह्याबाबत मी स्वतः अनुभवलेला प्रसंग असा आहे की, माझ्याकडे एक केस आली होती की एक माणसावर कदाचित करणी प्रयोग झाला असावा, त्या माणसाला अचानक सतत रक्ताच्या आणि पाण्याच्या उलट्या सुरू झाल्या होत्या, त्या लोकांना ह्या सर्वांवर विश्वास नसल्याने त्याच्या नातेवाईकानी त्या माणसाला हॉस्पिटल ला ऍडमिट केले होते परंतु नक्की काय झालंय ह्याचे निदान न झाल्यामुळे केस खूपच सिरीयस झाल्याने डॉक्टरांनी त्यांचे हात वर केले होते व त्याला घरी घेऊन जाण्यास संगीतले होते पण सोबत एक चांगला डॉक्टर दिला होता. शेवटी नाईलाजाने म्हणून त्याच्या नातेवाईकांनी त्याला परत घरी हलवले होते. त्या माणसाच्या नातेवाईकांना कोणीतरी मला भेटण्यास सांगितले होते आणि म्हणून एक शेवटचा प्रयत्न म्हणून ते मला त्यांच्या घरी घेऊन आले होते. मी त्यांच्या घरी जाऊन घराची पाहणी करून त्यांना त्या माणसाच्या डोक्याशेजारी कर्यावर नारळ ठेवायला सांगितला, नारळ ठेवताना त्याच्यावर मी काही मला येत असलेल्या मंत्रांचे प्रोक्षण केले होते व आता काय होईल ह्याची वाट पाहत असताना तो नारळ अचानक फुटला म्हणून आम्ही परत दुसरा नारळ ठेवला तर तोही फुटला, असे करता करता जवळपास ६ नारळ फुटले आणि त्यानंतरचे ३ तडकले, त्यानंतर मात्र नारळ तडकला नाही त्याच वेळी त्या माणसाच्या उलट्या कमी कमी होऊन थांबल्या. म्हणून तिथे असलेल्या डॉक्टर ने परत त्याला तपासले आणि अंबुलन्स बोलावून घेतली आणि परत हॉस्पिटल ला ऍडमिट केले. काही दिवसांनी तो माणूस खणखणीत बरा झाला. म्हणूंन आजच सर्वांनी कर्यावर नारळ ठेऊन आपले जीवन सुखी करून घ्यावे.
आता हे सर्व कसं झाल, त्या नाराळामुळेच झाले असा कुठलाही दावा मी करत नाही परंतु ते सर्व असे होते की नाही हे कृपया वाचकांनीच ठरवायचे आहे.

१२. सुपारी:-
....सुपारी ह्या वस्तूला आपल्या जीवनात खूपच महत्व आहे. मला सुपारीचे २ प्रकार माहीत आहेत जे मला उपयोगी आहेत. १ साधी सुपारी किंवा पांढरी सुपारी ही पूजापठात वापरली जाते आणि २ काळी सुपारी ही तंत्र कर्मात वापरली जाते. एखाद्याला सुपारी देणे म्हणजे वचन देणे. जस पूजापाठात सुपारीला महत्व आहे तसेच ते आपल्या आयुष्यात ही आहेच. कुठल्याही कामात सुपारी हा शब्द वापरला जातो. सुपारी दिल्यानंतर खऱ्या कामाला सुरुवात होते. अशा ह्या सुपारीला पूजापाठात पण खूपच महत्व आहे. प्रत्येक कार्यात देवाला मुखशुद्धी करिता सुपारी दिली जाते किंवा एखाद्या देवाची मूर्ती नसेल तर त्या सुपारीवर ही देवाचे आवाहन केले जाते. अशी ही सुपारी घराच्या दारात वचन घेऊन ठेवली असता घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जसे मी मागच्या भागात सांगितले तसे त्या ५ वस्तूंमध्ये सुपारीही ठेवली जाते. एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की कोणीही म्हणजे घरातल्या माणसांपैकी सोडून कोणीही तुम्हला सुपारी खायला दिली तर ती खाऊ नये कारण सुपारीत वाशिकरणाचीही खूप मोठी ताकद असते. सुपारी वाशिकरणाच्या विधीत कोणीही फक्त सुपारी खायला देऊन तुमच्याकडून कुठलेही काम करून घेऊ शकतो तुम्हाला फसवू शकतो. माता आणि भगिनींनी शक्यतो सुपारिपासून लांबच राहावे अन्यथा अनर्थ होऊ शकतो. अशी ही सुपारी तुम्ही तुमच्या आज्ञाचक्राच्या इथे लावून डोळे मिटून एकदम एकाग्रतेने आणि श्रद्धेने जर एखादा विचार त्या सुपारीत प्रोक्षित केला आणि ती सुपारी इच्छित व्यक्तीला खायला दिली तर मंत्राशिवायही तुमचे काम तुम्ही सहजगत्या करून घेऊ शकता, तसेच देवाला एखादा नवस घेताना तो सुपारी ठेऊन घेतला तर लगेच फलदायी ठरू शकतो. गावाकडे सुपारी चिकटवूनच कौल मागितला जातो. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक अकॅशन ला रिअकॅशन ही असतेच म्हणूंन कुठलेही चांगलेवाईट काम करण्याआधी नीट विचार करूनच करा.

१३. नागवेलीचे पान:-
.....नागवेलीचे पान म्हणजेच खायचे पान. सुपारीनंतर नागवेलीची पाने पूजेसाठी वापरली जातात. नागवेलीच्या पानातही वाशिकरणाची खूप मोठी शक्ती असते. असे म्हणतात की कोणी पानाचा विडा आपल्याला खायला दिला तर खाऊ नये कारण पानाच्या विड्यात वशीकरण करण्याची खूप मोठी शक्ती आहे. तुम्ही जर का निरीक्षण करत असाल तर एक लक्षात येईल की नेहमीच घरोघरी फिरणारे विक्रेते काही न काही सुपारी किंवा पान तोंडात चघळत असतात आणि बोलत असतात त्यामुळे आपल्या मनावर एक प्रकारची धुंदी येऊन तो सांगेल त्या किमतीला आपण वस्तू विकत घेतो. परंतु ह्या वाशिकरणाचा परिणाम त्या स्त्रियांवर किंवा पुरुषांवर होऊ शकत नाही जे स्त्री, पुरुष कपाळावर तिलक लावतात किंवा टिकली लावतात. तर असे हे नागवेलीचे पानाचे झाड ही खूपच दैवी असते. भारतीय ज्योतिषशास्त्रा प्रमाणे नागवेलीचे झाड घरात कुंडीत लावले असता बुध ग्रहाची शांती होऊन त्यासंबधातील त्रास कमी होतात. ह्या झाडाची रोज पूजा केल्याने वाकचातुर्य प्राप्त होते. ह्या पानांचे काही तांत्रिक प्रयोग असे आहेत.
१. कुठल्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना २ नागवेलीची पाने सोबत ठेवल्याने कामे व्यवस्तीत पार पाडतात कारण त्यांच्या उग्र वासाने अशुभ शक्ती कामात अडथळा आणत नाहीत.
२. भगवान शंकरांना खायचे पान अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात परंतु ते पान कापलेले इत्यादि नसावे.
३. कोणाला वाईट नजर लागली असता खायच्या पानात ७ गुलाबाची पाने टाकून ते खायला दिले असता सर्व नजरबाधा समाप्त होतात. ह्या पानात इतर वस्तू पैकी फक्त खोबर आणि बडीशेप टाकली तर चालू शकते.
४. शनिवारी ५ पिंपळाची पाने आणि ८ देठ असलेली विड्याची पाने लाल धाग्यात बांधून पूर्व दिशेकडे बांधल्याने व्यवसाय वाढतो. असे कमीतकमी ५ वेळा करणे गरजेचे असते आणि प्रत्येक वेळी जुनी पाने पाण्यात विसर्जन करावी.
५. रविवारी घराबाहेर पडताना खायचे पान सोबत घेऊन निघाल्याने सर्व अडलेली कामे पार पडतात.
मित्रांनो असे हे गुणकारी खायचे पान कित्येक आजारांवर उपयोगी आहे.
१. खायची पाने पाण्यात उकळवून ते पाणी प्यायल्याने कफ आणि खोकला होत नाही.
२. पान खाण्यामुळे पाचनशक्ती वाढते.
३. २ कप पाण्यात ५ खायची पाने उकळवून ते पाणी प्यायल्याने शरीराची दुर्गंध जाते.
४. तोंडातून किंवा हीरड्यांतून रक्त येत असल्यास २ पाने आणि १० ग्राम भीमसेनी कापूर चावून चावून खाल्ल्याने हा त्रास कमी होतो तसेच तोंडाला येणार दुर्गंध निघून जातो.

१४. लवंग:-
.....ज्याप्रमाणे पूजपाठात, तंत्रशास्त्रात लवंगला खूप महत्व आहे तसेच ते आयुर्वेदामध्येही आहे. दातदुखीत लवंग तोंडात धरले असता दात दुखी कमी होते, सुक्या खोकल्यामध्ये लवंग तोंडात धरले असता खोकल्याची उबग कमी होते, घसा खवखवणे कमी होते, १ लवंग टाकून दूध प्यायल्याने कामशक्ती वाढते इत्यादी अनेक औषधी उपयोग लावंगाचे आहेत आणि त्यांची लिस्ट करायला गेले तर एक पुस्तक लिहून होइल. त्याचप्रमाणे लवंगामध्ये असे काही गुप्त आणि दैवी गुण आहेत ज्यांचा वापर करून कोणीही मनुष्य रंकाचा राजा होऊ शकतो, आपले जीवन सफल करून घेऊ शकतो. काळे मीठ घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवल्याने त्याभागातली नकारात्मक ऊर्जा कमी होऊन वास्तुदोष कमी होण्यास मदत होते हे सर्वाना माहीत असेलच परंतु त्यात जर का एक दोन लवंग खोचून ठेवले तर वास्तुदोषच काय परंतु प्रत्येक कोपरा आणि दिशा शुद्ध होऊन अशुभ शक्तीही असेल तर निघून जाते.
१. सकाळच्या आरतीत कापूर सोबत लवंग जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन आपल्या साऱ्या इच्छा पूर्ण होतात.
२. लिंबू मध्ये ४ लवंगा टोचून हनुमान मंदिरात ठेऊन 3 वेळा हनुमान चाळीसा पठाण केल्याने सर्व अडलेली कामे होतात.
३. इंटरव्युला किंवा कुठल्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना ५ लवंग पुडी करून जवळ बाळगले असता अशुभ शक्ती अपल्यापासून लांब जाऊन आपल्याला यशप्राप्ती होऊ शकते.
४. नवरात्री मध्ये देवीला लवंग वाहिल्याने आपली शक्यकोटीतील इच्छा पूर्ण होऊ शकते.
५. घराच्या मुख्य दरवाजासमोर लवंग ठेवल्याने त्याच्या वासाने घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाहीत.
६. कोणी तुम्हाला नाहक त्रास देत असेल, तुमची बदनामी करत असेल तर त्याच्या फोटोवर ३ लवंग ठेऊन त्याची पुडी करून त्या पुडीवर एक मोठा दगड ठेवल्याने ती व्यक्ती आपला मित्र बनते किंवा आपला मार्ग बदलते.
.. वरील दिलेल्या माहिती प्रमाणे तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आणि आपले जीवन सुखकारक करून घ्यावे. तुमच्यापैकी कोणालाही ह्या माहितीपेक्षा अजून काही माहिती असेल तर कृपया मलाही सांगावे आणि माझे ज्ञान वाढवावे ही विनंती. हा ह्या लेखाचा शेवटचा भाग असून हा लेख इथेच संपवतो.
धन्यवाद...
अंकुश सू. नवघरे..

Desclaimer: सदरची माहिती ही काही जाणकारांच्या मार्गदर्शनातून आणि साधकांकडून संकलित केली गेलेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.