प्रपोज – मराठी भय कथा
Marathi Bhay Katha –【 भाग २. 】
………
तीला प्रपोज करायच ठरवल… तीच्या मनात काय आहे माहीत नव्हत पन ते अचानक हे शहर सोडून गेले तर…..? दिवस फिक्स केला… मेसेज टाकला…Propose Marathi Bhay Katha
‘ रंकाळा. 11, am ‘
रिप्लाय आला.. ‘ वाढदिवस आहे वाटत…’
‘हो..’ मी ही मेसेज चिकटवला..
मी जरा अधिकच उतावळा झालेलो… अर्धातास आधीच पोहोचलो..
एक छानस गुलाबाच फुल शर्टच्या आत लपवुन मी तीची वाट पहात बसलेलो..
ती आली… क्लासवरून थेट ठरलेल्या ठिकानी… नेहमीसारखीच सुरेख दिसत होती… ब्लॅक जीन्स . पिंक टॉप, चमकदार सोनेरी केस जे आजही नेहमीप्रमाणेच मोकळे सोडलेले. कानात छानशा रिंग तर कपाळावर बारीकशी टीकली.. दुरूनच स्माईल करत पुढ आली…
” आज सुट्टी तुला….?” बॅग बाजुला ठेवत बाकड्यावर बसली….
” नाही ग…. एक खुपच Importent काम होत म्हणुन सुट्टी घेतली..”
थोडा वेळ काय बोलाव सुचेनास झाल ..
ती मात्र नेहमीच्या गमती सांगण्यात दंग होती हसता हसता दोन वेळा माझ्या पाठीवर नेहमीसारखीच चपाट मारली, पन माझ लक्ष कशातच नव्हत.. मी तीच गोड हसण ,बोलण मन लाऊन ऐकत होतो.. पन तीला ‘प्रपोज’ करायच आहे या विचारान काळीज मात्र धडधडत छातीतुन बाहेर येतय की काय अस वाटु लागल..
” काय झालय तुला….असा गप्प का…?”
शेवटी सारा धीर एकवटला.. डोळे बंद केले , माझ्या शर्टमधे हात घालत ते गुलाबाच फुल बाहेर काढल आणी तीच्या निरागस ,
गोड चेह-याकडे पहात म्हणालो
” प्रिया…….तु….तु…मला खुुप , खुप आवडतेस ग… I love you. प्रिया……”
आयुष्यातल आजवरच सर्वात मोठ धाडस केल होत…ते म्हणजे ‘प्रपोज’… काही काळ जणु सार जगच थांबल होत, मघापासुन होणारी झाडांची हलचाल, संथ हवेचे झोके, पाण्याच वेग काही क्षण सार काही थांबल.. आवाज येत होता तो काळजाच्या धडधडण्याचा. अगदी स्पष्ट , अतिशय वेगाने, तीच उत्तर काय येतय हे श्वास रोखुन ऐकत होतो आणी मला जे आपेक्षीत होत तेच झाल. तीच्या चेह-याचा रंग उडाला, ती अगदी शांत बसुन होती, खाली शुन्यात पहात.. पुढचे काही सेकंद ही जिवघेणी शांतता तशीच राहीली ,
तीच्या अस्वस्थ चेह-याकडे पहात माझ्या डोळ्यात पाणी आल, कारण मला माझ उत्तर भेटल होत. ती काही वेळात निघुन गेली पन मी मात्र त्या तलावातील संथ पाण्याकडे पहात तसाच बसुन राहीलो… किती वेळ, माहीत नाही. पन आता सार काही संपल होत.. काही भावना ह्या मनातच छान , सुंदर , सुरेख स्वप्नातल्या चांदण्यासारख्या असतात..पन जेव्हा त्याच भावना ओठावर येतात तेव्हा त्यांची सत्यता किती वेदनादायी आहे हे समजत पन तेव्हा खुप उशीर झालेला असतो.
रात्रीचे दहा वाजले होते… तलावातील पाणी किती सुरेख वाटत होत…. आजुबाजूच्या लाईटचा प्रकाश परावर्तीत होउन चमकत होत, पाणी… माझ्या डोळ्यातही होत.. खारट पाणी.. एकतर्फी प्रेमात अपयश आल्यानंतर डोळ्यात दाटुन येणार पाणी…
खुप खुप वाईट वाटत होत, ती मला आपला चांगला मित्र समजत होती पन मी.. प्रपोज केल तीला ? गमाऊन बसलो तीला…! माझ्या आयुष्यात तिच सर्व काही आहे.. माझ सर्वस्वच… पन संपल हे सार काही..
घरी आलो पन जेवण्याची ईच्छा नव्हती..
“आई …. मी जेऊन आलोय ग…..” एवढ म्हंटल आणी तसाच बेडवर पडलो… मिनीटा मिनिटाला येणारा तीचा मेसेज आज आला नव्हता… झोप येत नव्हती… या कुशीवरून त्या कुशीवर , पन विचार डोक्यातुन जाईना आणी डोळ्यातल पाणी थांबेना… रात्र पुढे सरकत होती फक्त रोजची स्वप्न आजच्या रात्रीत नव्हती, होता तो एकटेपना, आयुष्याला ग्रहण म्हणुन लागलेला एकटेपना…. डव्या कुशीवर झालो इतक्यात दारावर टकटक झाली.. किती वाजलेले माहीत नाही पन बाहेर कोणीतरी आल होत… डोळे नीट पुसले आणी बेडवरून खाली उतरलो… लाईटच बटन ऑन करून दरवाजा उघडला पन बाहेर कोणीच नव्हत.. अगदी निरव शांतता आणी बाहेरचा काळोख किंचीत दुर करणारा सरकारी खांबावरील ट्युबचा पांढरा प्रकाश तेवढच बाहेर होता… कदाचीत भास झाला असेल… मी दरवाजा बंद करून घड्याळ पाहील.. दीड वाजुन गेलेला.. बाजुच्या टेबलवर ठेवलेल्या जार मधल घोटभर पाणी प्यायलो आणी बेडवर आडवा झालो…. भुक लागलेली, त्यामुळे झोप लागेना… डोळे बंद केले तसा तीचा हसरा चेहरा नजरेसमोर आला आणी पुन्हा दरवाजावर टक टक झाली… कोणीतरीे दरवाजा वाजवत होत… पुन्हा दरवाजा उघडला पन कोणीच नव्हत… कोण मस्करी करतय समजेना…. दरवाजा पुढ केला आणी मागेच उभा राहीलो… म्हणजे झटकन दरवाजा उघडुन जो कोणी आहे त्याला फोडायचा या उद्देशाने .. काही वेळ श्वास रोखुन बाहेर काही चाहुल जाणवते का पाहु लागलो. पन अगदी माझ्या संथ गतीन धडधडणा-या काळजाची धडधड ऐकु येईल इतकी ती रात्रीची निरव शांतता पसरलेली..
. भींतीवरील घड्याळाचे काटेही अगदी स्पष्ट ऐकु येत होते.. कानात प्राण आणुन मी बाहेरुन येणारा आवाज ऐकु लागलो.
आणी पुन्हा दरवाजावर ‘टक टक’ झाली………………….
भींतीवरील घड्याळाचे काटेही अगदी स्पष्ट ऐकु येत होते.. आणी पुन्हा दरवाजावर टकटक झाली तसा क्षणाचाही विलंब न करता मी दरवाजा उघडला तसा अंगावर सर्रर्रर्र कन काटा आला… बाहेर कुणीच नव्हते.. होती ती एक जिवघेणी शांतता… आता मात्र भीती वाटु लागली.. कसलीच हलचाल न करता मी हळूच दरवाजा बंद करू लागलो तसा एक आवाज कानावर पडला.. कोणातरी कण्हत होत, शरीराला होणा-या असह्या यातनांनी रडत होत.. माझी नजर समोरच्या रस्त्यावर गेली, धुळ मातीन माखलेल्या रस्त्यावर एक सावली पडलेली.. आडवी… जीला शरिर नव्हत पन तरी एक सावली जमिनीवर होती.. दाराच्या चौकटीच्या आत मी उभा त्या सावलीकडे पहात होतो तोवर त्याच्यात किंचीत हलचाल जाणवली… ते अखुड होता होता तडफडत असल्यासारखे शरिराची हलचाल करू लागले…
जमिनीवर पाय आकडुन घेत सार शरिर गोळा करत पुन्हा झटक्यासरशी सरळ केले . समोरच ते भयान दृश्य पाहुन भितीन अंग थरथर कापत होते, सर्वशक्तिनीशी ओरडाव किंचाळाव वाटत होत पन दातखिळी बसल्यासारखी अवस्था झालेली.. पाय जमिनीत रूतल्यासारखा मला जागेवरून हालता येईना.. संपुर्ण शरिराला जणु लकवाच मारला… उघड्या डोळ्यांनी फक्त पहाण्याशिवाय काहीच करता येत नव्हत. अस वाटत होत की असह्य वेदनेन कण्हत होती, तळमळत होती आणी त्यामुळे रस्त्यावरचे खडे आजुबाजूला सरकत होते.. आता ती सावली माझ्याकड सरपटत येत असल्याच लक्षात आल… इतक्यात चरर्रर्रर्रर्र चर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज करत बाहेरच्या खांबावरची ट्युब फट्टकन गेली तशी बाहेरची ती भयान शांतता दुरवर पसरलेला काळोख आणखी गडद्द झाला… आकाशातल चंद्रबिंबाच्या नितळ प्रकाशात ती सावली आता आणखी गडद , काळीकुट्ट दिसु लागली… तीचा आवाजातली घरघर काळजाचा थरकाप उडवत होतीे… ती काळीतुट्ट आकृति तशीच जमिनीवरून माझ्या दिशेने सरकत पुढ येऊ लागली… मी मागे सरकण्याचा प्रयत्न करत होतो पन व्यर्थ… त्या आकृीतीन दरवाजा जवळ येत माझा डावा पाय घट्ट पकडला… एक घट्ट पकड जस एखाद्या श्वापदाच्या जबड्यात माझा पाय सापडला होत…घट्ट, आणखी घट्ट पकड करत ते मान वर करून माझ्याकड पाहु लागले.. लाल तांबुस रंगाचे डोळे माझ्यावर रोखले होते.. मी डोळे विस्फारुन त्याला पहात होतो की झट्टकन माझा पाय खेचला आणी मी जमीनिवर आपटलो… माझ लकवा मारल्यासारख शरीर कसलीच हलचाल करण्याच्या स्थितीत नव्हत… ते आता माझ्या अंगावर तसच सरपटत येत होत… त्याच्या घरघरणा-या आवाजान मेंदु बधीर होत निघाला…माझ्या पोटावर उभ रहात त्या आकृतिन आपले दोन्ही हात हवेत पसरले आणी झटक्यासरशी माझ्या शरिरात घुसली तसा खाडकन जाग झालो.. अंग घामान भिजलेल…उठुन बसलो अंग थरथर कापत होत… पन मी माझ्या बेडवर नव्हतो तर बंद दरवाजाच्या जवळ होतो… लाईट सुरूच होती.. हे स्वप्न होत..?डाव्या पायावर काहीतरी चरचरत होत.. दाह होत होता… मी नाईटपैंट वर करून पाहील आणी व्रण दिसत होता… हातांच्या पंजाचा…. अंग अजुनही थरथर कापत होत…
सकाळी आवरून कामावर गेलो पन लक्ष लागत नव्हत… रात्रीच स्वप्न कधीच डोक्यातुन गेल होत…. पन स्वता:च्या मुर्खपनावर राग येत होता.. मी तीच्या निखळ मैत्रीला कायमच मुकलो होतो. आजही तीचा एकही मेसेज नव्हता की मिसकॉलही नव्हता… इतका तिरस्कार करत होती माझा.. इतका राग आलेला तीला माझा…? खरच मी तीच्या मैत्रीला समजुन घेतल नाही, पन मी ही प्रेम केल तीच्यावर , म्हणुन तर तीच्या अप्रत्यक्ष नकारानंतरही तीच्याबद्दलचा आदर , प्रेम , भावना कमी झाल्या नव्हत्या.. रात्री उशीराच घरी आलो… बॅग ठेवतच सोफ्यावर अंग टाकल… डोळे बंद करुन तसाच बसुन होतो..
“संज्या….. इतका राग मनात धरायचा….?”
कानावर पडलेल्या त्या शब्दांत राग होतो आणी आदेशही होतो…
” हो ना…. खुपच राग आहे त्याला…” पुस्तकातून डोकावत माझी छोटी बहीन पुजा थोडी रागातच बोलली….
” पुजा….. तु अभ्यास कर, आणी आई कसला राग…? काय बोलतेस….?”
” मग पाहुन तरी ये तीला…”
” म्हणजे …. कोणाला….? आई… जरा निट सांगशील का….?”
“म्हणजे …. तुला काहीच माहीत नाही…?”
माझ्या काळजात चर्रर्रर्र कन झाल….
” आई…. कोणाला काय झाल…..?”
” काल रात्रीच दवाखाण्यात नेल.. पोरीच सार अंग आकडुन गेलेल… काल रात्री तु यायच्या आधीच नेल प्रियाला…”
आईच बोलण ऐकताच डोक सुन्न झाला… प्रियाला दवाखाण्यात नेल..? आणी मला माहीतीही नव्हत..! झटकन उठलो आणी गाडीला किक मारली… सुसाट वेगाने माझी गाडी त्या हॉस्पीटलच्या दिशेने धावत होती… काय झाल असेल तीला…? पुन्हा तोच त्रास तर…? हॉर्न देतच रस्त्यावरून गाडी वेगात जात होती, सगळ्यांना मागे टाकत…. दोन वेळा ट्रकला ठोकता ठोकता वाचलो…. हॉस्पीटल समोरच गाडी लावत आत शिरलो प्रियाचा भाऊ समोरच होता.. त्याच्या डोक्यालाही पट्टी बांधलेली…
“हे काय झाल रे तुला…. आणी कुठ आहे प्रिया…?”
“त्याच्या डोळ्यातल पाणी पाहुन माझ्या काळजात धस्स झाल…”
दोघेही चालत I.C.U. रूम जवळ आलो.. तीची आई , बाबा दोघेही बाहेरच उभे होते. मला पाहुन तीच्या आईला अश्रु अनावर झाले… दरवाजा जवळ जात आत पाहील… ती आत बेडवर पडुन होती.. निपचीप , निस्तेज, एका असाध्य रोगान ग्रस्त रूग्णासारखी कोमेजून गेलेली …हळूच दरवाजा उघडत आत गेलो पन ती शुद्धीवर नव्हती… तीची अवस्था पाहुन खळ्ळकन डोळ्यात पाणी तराळल, फक्त दहाच दिवस झालेले तीला याच हॉस्पीटल मधुन घरी जाताना आमची किंचीतशी ओळख झालेली आणी तीच्या स्वभावाचा फॅन झालो.. तीची मस्करी, बोलण सार एकदम नजरेवर आल…
” काय झालय प्रियाला…? का अस होतय तीला..? आणी मला कोणीच का नाही सांगितल….?”
बोलत मी तीच्या बाबांकडे पाहील
“प्रिया म्हणाली होती…. आपल्यामुळे कुणाला त्रास नको व्हायला…” तीच्या बाबांच उत्तर ऐकुन काळीजच फाटल.
तीच्यासाठी इतका दुरावलो मी…?
तीला प्रपोज करून इतकी मोठी चुक केली का मी…?
स्वताचाच तीरस्कार वाटावा अस वागलो होतो मी.. I.C.U. चा दरवाजा उघडुन डॉक्टर आत आले..
” रिपोर्ट आणले का सांगितलेले….”
” हो साहेब….” तीच्या भावाने रिपोर्ट फाईल डॉक्टरांच्या हातात ठेवली… फाईल हातात घेत एकएक रिपोर्ट चाळू लागले… तसे अनुभवी , नावाजलेले डॉक्टर होते… विरळ होत चाललेले पांढरट केस, किंचीत सुरकुतलेला उभा चेहरा , सरळ नाकावर चौकोनी फ्रेमचा जाड चश्मा, जाड पांढरट मिशा, चकचकीत दाढी…
भुवया किंचीत आकसत त्यांनी रिपोर्टची सारी पानं पुन्हा पुन्हा पाहीलित आणी डोळ्यावरचा चष्मा काढला.. आम्ही सर्वच गंभिर मुद्रेने त्यांच्याकडे पहात होतो… माझ्या तर काळजाचा क्षणाक्षणाला ठोका चुकत होता… ते काय सांगतील…
‘ परमेश्वरा जे काय व्हायच ते मला होऊदे. ती बरी होऊदे..’
मनातुन माझा ईश्वाराचा धावा सुरू होता..
” सगळे रिपोर्ट तपासलेत, जुने नवे… सगळ्या टेस्ट करून झाल्या पन कुठच काही प्रॉब्लम दिसत नाही आहे….”
डॉक्टरांचे शब्द ऐकुन आयुष्यातल सर्वात मोठ समाधान भेटल्यासारख वाटल…
” पन तरीही त्यांना त्रास होतोय… केस बरीच कॉम्पलिकेटेड वाटतेय…”
डॉक्टर तीच्या बाबांशी बोलत बाहेर पडले , मी ही तीच्याकड पाहील आणी बाहेर पडायला I.c.u. चा दरवाजा उघडणार तोच त्या काचेत काहीतरी दिसल ज्याने माझ लक्ष वेधुन घेतल… मी जागेवरच थबकलो… तसच निरखुन पहाताना काळजाचा थरकाप उडाला… डोळे विस्फारून मी मागे वळून पाहील तर प्रिया तशीच पडुन होती आणी पुन्हा समोर पाहील तर मागे बेडवर झोपलेल्या प्रियाच प्रतिबींब समोर दरवाजावरील काचेत दिसत होत तीच्या अंगावर उभी एक धुसर आकृती दीसत होती… जशी एक सावली , पुरषाची.. तीच्या बेडवर उभी, दोन्ही हात हवेत पुर्ण पसरलेले आणी वर छताकडे पहात तोंडाचा जबडा पसरलेली ती आकृति पाहुन अंगावर शहारा आला… मी त्या आकृतिची होणारी हलचाल पहात होतो त्या आकृतीने हवेत पसरलेल्या आपल्या दोन्ही हातांच्या मुठी करकचुन आवळल्या आणी झटक्यासरशी प्रियाच्या शरिरात सामावली त्या आघातासरशी प्रियाच्या तोंडातुन आर्त किंकाळी बाहेर पडली… सर्वांग आखडुन गेल असह्य वेदनेन गुडघे आखडुन घेतले आणी सार शरीर गोळा करत रडु लागली.. किंचाळू लागली… आणी तीची आई तीला सावरु लागली पन काळीज पिळवटून टाकणार तीच किंचाळण सुरूच होत.. काय कराव सुचेना.. तसाच धावत डॉक्टरांना बोलवून आणल.. इकडे तीच्या वेदना वाढतच होत्या . मासा पाण्यावीना जमिनीवर तडफडावा, झटके खावा तस तीच सार शरीर तडफडत होत क्षणाक्षणाला झटके खात होत आणी पुन्हा बेशुद्ध झाली.. डॉक्टरांनी तीची अवस्था पाहीली आणी शांतपने म्हणाले
” तुमच्या मुलीचे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत सगळ चेकअप करून पाहीलय.. मुंबईच्या , पुण्याच्या डॉक्टर्सचे पन रिपोर्ट पाहीलेत त्यांनीही तेच लिहीलय…. नॉर्मल…तरी काहीतरी घडतय … ”
” डॉक्टरसाहेब आता तुम्हीच सांगा… पुण्यातुन इकडे कोल्हापुरला आलो. मागच्या सहा महीण्यापासुन सहन करतीये ती…..”
तीच्या वडीलांनी आपल्या शुद्ध हरपलेल्या मुलीकड पाहील…..
” एक विचारू का……?”
” हो विचारा ना साहेब…..”
डोळ्यावर लावलेला चश्मा काढत डाक्टरांनी एक कटाक्ष प्रियाकडे टाकला…..
” गैरसमज करून घेऊ नका…. मी फक्त माहीत असाव म्हणुन विचारतोय….”
“बोला साहेब… परमेश्वरान मुलीचा बाप बनवताना सहनशक्तिही दीली आहे.. विचारा..”
” एक तर ती आजारी असल्याच नाटक करतेय किंवा तीला एखाद्या मानसिक आजारान ग्रासलय ….”
डॉक्टरांच बोलण ऐकताच माझा पारा चढला..
” डॉक्टर… ती वेडी नाही आणी नाटकही करत नाही….”
एकापेक्षा एक माझ्याकड पहात होते…
” आणी हो… या जगात जशा आडचणी आहेत तसे उपायही आहेत…. ती बरी होईलच… तुमच्याकडून काही होईल का ते सांगा….?”
मी आवेगात बोलुन गेलो पन सर्वच निरूत्तर झाले.. डॉक्टरांनी एक कटाक्ष माझ्याकडे टाकला आणी बाहेर निघुन जात तीच्या बाबांना सोबत यायला सांगितल…
” आई….” त्या केविलवाण्या यातनेन भरलेल्या आवाजान आम्हा तीघांच लक्ष वेधुन घेतल…
तीची आई धावतच तीच्याजवळ जात तीचा हात आपल्या हातात घेत म्हणाली …
“बोल बाळा….”
” मी कधीच बरी होणार नाही का ग..?”
तीच ते वाक्य मनाला चाटका लाऊन गेल… मी दुरूनच तीला पहात होते…
“बरी होशील ग बाळा.. आम्ही आहोत ना..”
” खुप त्रास होतोय ग आई… आता अस वाटतय या वेदना माझ्या प्रेतासोबतच संपतील ग….”
” अस नको बोलु बाळ… आपन आणखी चांगल्या डॉक्टरकडे जाऊ…” आई तीला धीर देत होती..
” नाही सहन होत आता…” प्रिया मनापासुन थकली होती…
” आई…. खुप स्वप्न पाहीली होती ग… डॉक्टर व्हायच होत.. वाचवशील का ग मला…?”
काळीज पिळवटपन टाकणारा तीचा शब्द नी शब्द मनात घर करत होता….
“काही गोष्टींवर औषधांबरोबरच आणखी एक उपाय करावा लागतो…”
तीच्या भावाने माझ्याकडे पाहील,
“कसला उपाय….?”
” जेव्हा डॉक्टरही हतबल होतात तेव्हा स्वता:सांगतात.. ‘आता सर्व काही परमेश्वराच्या हाती आहे.’..”
” कुठला परमेश्वर.. आमचा आता कशावरच विश्वास राहीलेला नाही… आमच हसत खेळत सुखी कुटुंम्ब आज मुलीचा जीव वाचवायला मागच्या सहा महीण्यांपासुन एका शहरातुन दुस-या शहरात फिरतय… का त्याला दया नाही येत…?”
तीच्या आईची ती तक्रार योग्यच होती,
प्रिया आपल्या आईला शांत व्हायला सांगु लागली पन त्याच्या डोळ्यातुन पाणी येतच राहील….
दोन दिवसात तीला डिस्चार्ज मिळाला पन तीच शरीर निस्तेज कृश होत चाललेली… एका असाध्या रोग्यासारख निस्तेज बनत चाललेल तीच शरिर पहावत नव्हत .. ती बरी झालेली पन कायमची नाही… तीला पुन्हा कधी त्रास सुरू होईल कोणीच सांगु शकत नव्हत… आणी आता तीला त्रास सुरू झाला तर तो सहन करण्याची शक्तिही तीच्या शरिरात राहीली नव्हती … तीचा अंत निश्चीत होता… पन हे का होतय.. उत्तर फक्त प्रियाच देऊ शकत होती… हो… याच उत्तर तीच देऊ शकत होती.. तीला मदत हवी होती आणी तीला अस तडफडताना मला पहावत नव्हत …
रात्री त्यांच्या घरी पोहोचलो.. दहा वाजले होते, सर्व जेवण आवरून गप्पा मारत बसले होत.. हाॅलमधे सोफ्यावर ती आणी तीचा भाऊ टीवी पहात होते, तर वडील बाजच्या खुर्चीवर सकाळच वर्तमान पत्र चाळत होते…
मला समोर पहाताच टीवीचा रिमोट भावाकड देत प्रिया काहीतरी निमीत्त काढुन आपल्या रुममधे गेली… माझ्या ‘प्रपोजचा परिणाम, राग शेवटी. जास्त काही न बोलता थेट मुद्द्याला हात घातला.
” आई …. एक विचारू का…?”
” हो विचार ना….”
मी काय विचारतोय हे सर्वच कुतूहलाने पाहु लागले..
” आई इतके मोठमोठे डॉक्टर पुण्या मुंबईत आहेत मग तुम्ही कोल्हापुरला कसे आलात…? कारण इकडे ‘निदान’ नाही झाल तर इथले लोक त्या मोठ्या शहरात जातात….”
माझ्या प्रश्नाने सर्वच स्तब्ध झाले… तीचा भावाने टीवीचा आवाज कमी करत माझ्याकडे पाहु लागला, सर्वांचा उडालेला गोंधळ मला त्यांच्या चेह-यावरून दिसत होत…
कोणी काहीच समजु देत नव्हत. कदाचीत त्यांना ही गोष्ट कुणाला सांगावी वाटत नव्हती…
“मला त्याची चाहुल जाणवली, ते जे कोणी प्रियाला त्रास देतय ते आहे…”
माझ्या या वाक्यान सर्वांच्याच चेह-यावर एक भीती झळकली. भिंतीकडेला उभी तीची आई मागे तोल गेल्यासारखी भींतीचा आधार घेत खाली बसली, वडीलांनी हातातल वर्तमानपत्र समोर टेबलवर ठेवत अस्वस्थपने माझ्याकडे पाहु लागले…मला पाहुन आपल्या रूममधे गेलेली प्रिया दरवाजा उघडुन बाहेर आली..
” काय पाहीलस तु…?”
प्रिया रागात आणी कुतूहलान विचारू लागली पन तीच्याही चेह-यावर भीती होतीच.
” एक विचीत्र आकृति. जी तुझ्या या अवस्थेला , वेदनांना कारणीभुत आहे…..”
माझ बोलण ऐकताच प्रियान आपल्या आई बाबांकडे पाहील…
“आता तरी विश्वास ठेवा माझ्यावर….” तीच्या डोळ्यात पाणी आल आणी बोलता बोलता रडत आपल्या आईजवळ बसली..
” तुम्ही सगळे मला वेड ठरवत होतात. पन मी खरच सांगतेय मी वेडी नाही हो…. ‘ते’ आहे …”
” काहीतरी बरळु नकोस…” बाबानी प्रियावर ओरडत माझ्याकड पाहील….
” काय पाहीलस… ? काय दिसल तुला..? प्रिया तुच सांगितल असशील याला…!”
” नाही…. तीने काही नाही सांगीतल आणी मी तेच समजुन घ्यायला आलोय….”
मी तीच्या बाबांना पहात म्हणालो….
” जेव्हा जेव्हा प्रियाला त्रास झालाय तेव्हा एक काळी सावली तीच्या आजुबाजूला होती.. याचा अर्थ ती फक्त प्रियालाच यातना देतेय…पन परवा त्या आकृतिन माझ्यावरही हल्ला केला.. प्रियाला तडफडताना पाहुन एक विलक्षण आनंद त्या आकृतिला होत असल्यासारख वाटत….”
सर्वच माझ्या बोलण्यान आवक झाले काही वेळ एक सर्वच गप्प होते.. अधुनमधून प्रियाच मुसमूसन तेवढच सुरू होत बाहेर रात्र गडद्द होत चाललेली आणी समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाचे टीक टीक करणारे काटे संथ गतीने पुढ सरकत होते…
” कदाचीत तुम्हाला वाटत असेल मी तुमच्या खाजगी आयुष्यात जास्तच रस घेतोय , पन प्रियाच्या वेदना पहावत नाहीत, रस्त्यात एखाद्या अनोळखी व्यक्तिचा अपघात झाला तरी पुढ जाऊन मदत करतो मग प्रिया तर …..” मी मागे दरवाजा कडे वळलो तसा मागुन आवाज आला…
” प्लीज थांब….” तीचा आवाज येताच मी मागे पाहील.. ती आपल्या आई बाबांकडे पहात बोलु लागली…
” आजवर सगळ्यांनी मला वेड ठरवल, हायएज्युकेटेड होते ना… ‘हैल्युसिनेशन’ ….. हो हाच आजार झालाय म्हणाले होते ना तुमचे मोठे भाऊ… आणी मला कोल्हापुरला उपचारासाठी नव्हे तर मिरजच्या मेंटल हॉस्पीटल मधे भरती करायला आलो आहोत ना आपन….? हो ना ग आई….”
बोलताना तीला भरुन आल होत….
मी घरी परतलो… ती थोड का असेना बोलली माझ्यासाेबत. लाईट बंद करत अंथरूणावर पडलो तोच व्हॉट्सअॅपवर मेसेज आला, प्रियाचा..
‘ उद्या मी तुला सांगेन सगळ , क्लास सुटल्यावर भेटू…’
तीचा मेसेज वाचुन थोड बर वाटल निदान ती या निमीत्ताने तर दोन शब्द बोलेल …
*****
क्रमश:
लेखक : संजय कांबळे