जत्रा - एक भयकथा
Written By - Shrikant Sabale
वैभव खूप दिवसांनी आपल्या मूळ गावी आला होता . उन्हाळ्याचा सुट्ट्या लागल्यामुळे त्याचे बाबा दोन दिवसापूर्वी त्याला आजी आजोबांकडे सोडून निघून गेले होते . तो खूप खुश होता कारण गावदेवाची जत्रा अजून ८ दिवसांवर होती .. लोक म्हणतात ह्या दिवसात देव बाहेर गेलेला असतो जत्रा भारवली कि तो परत गावात येतो ... गावाला त्याचे आज्जी आजोबा , मोठे चुलते व त्यांचं कुटुंब असे राहत होते . तो चुलते आणि चुलती ला नाना - नानी म्हणत असे .. आजोबा तसे एकदम म्हातारे झाले होते . पण फार पूर्वीचा काली ते गावातील भगतबाबा होते . म्हणजे ते भूत वैगरे उतरवतात तसे ! गावच ग्रामदैवत- वाघ्यादेवाची पूजा सुद्धा आजोबा करत असे .. पण आता पुजारी दुसऱ्या कुटुंबाचा होता .. त्यांचं ते गावच घर गावाचा बाहेरच होत! म्हणजे वस्तीला घर होत .. मग घराचा मागे एक पायवाट होती ती खाली खाली उताराला जात होती .. आणि मग त्यांचं शेत होत तिथे . शेताचा बांधला मग आंब्याचे झाड .. जांभळाची झाड .. आळीव .. पपई .. पेरू असं खूप काही होत .. मग परत खाली उताराला गेलं कि बांध होता त्या बांधावर छोट्या छोट्या झुडूप होते तिथे सुरज परसाला यायचा .. करवंदं आणि टणटनी चे झाड ... मग त्या बांधा खाली अजून एक शेत आणि मग शेवटी एक बंधारा होता .. तिथे त्यांची विहीर पण होती ...
त्याला २ चुलत भाऊ होते . एक मोठा होता संकेत तर दुसरा त्याचाच वयाचा- सुरज .. .. दोघांनी पण ७ विची परीक्षा दिली होती ..अगदी दोघांमध्ये १०-१२ दिवसांचं अंतर ... त्यामुळे दोघांमध्ये चांगली गट्टी होती . वैभव शहरातला असल्याने त्याला ह्यांचं जीवन खूप छान वाटायचं .. त्याला ह्या दोघांचा खूप हेवा वाटायचं . संकेत त्याची काळजी घ्यायचा . त्याला आंबे आणायचा . कधी कधी तो झाडावर चढून मधमाशांचं पोळ वैगरे काढायचा आणि वैभव ला खायला द्यायचा .. पण तो त्याला कधीच झाडावर चढून देत नसे . कायम त्याच्यावर लक्ष देत असे . या उलट सुरज आणि वैभव ची छान गट्टी जमायची . सुरज त्याला झाडावर चढायला शिकवायचा . किंवा मग कधी कधी ते दोघे बंधाऱ्यात पोहायला जायचे .. ह्यावर्षी संकेत चे १२ वि चे पेपर असल्याने तो घरीच अभ्यास करत बसायचा . मग गुरं-ढोरं चरायला , किंवा छोटे छोटे काम करायला सुरज होताच . आता सुरज सोबत वैभव पण जात असे . त्याला खूप मजा येत असे . सुरज कसा ह्या गुरांना कंट्रोल करतो..! कसे वेगवेगळे आवाज काढतो .. ! तो झाडावर पण कसा सरसर चढतो ..! याच त्याला नेहमी अप्रूप वाटे ..! त्याचाच वयाचा असल्या कारणाने तो पण हौसेने त्याला सगळं विचारी ..आणि तो पण सांगत असे .. वैभव ला गावाकडे आल्यावर खरंच खूप छान वाटत असे .. त्याला गावाचा प्रत्येक गोष्टीच अप्रूप वाटत असे .. ते वायाच असत मुलांचं कि त्यांना सगळं नवीन नवीन वाटत असत ..
एके दिवशी असच सुरज बोलला कि आपण दोघे जाऊ दुसऱ्या गावात गुर घेऊन ... मग त्या दिवशी सकाळीच ते उठले .. त्यांचा घरी टॉयलेट बनवला होत पण सुरज ला सवयच होती कि तो परसाला च जायचा .. आणि सुरज मुळे वैभव पण आजकाल बाहेरच जाऊ लागला .. मग दोघे हातात डब्बे घेऊन खाली गेले आणि घरामागच्या खालचा बांधला जाऊन बसले ..
"वैभ्या उरक लवकर .. आपल्याला निघायचा हाय ..!" सुरज पॅन्ट वरती घेत बोलला ..
"हा चल चल.. पुढे चल आलोच मी .." वैभव बोलला ..
अचानक समोरचा झुडपातून पालापाचोळा चुरगळयाचा आवाज आला .. वैभव सावध झाला ..
मग सुरज पुढे निघून गेला होता .. एकदा असाच दोघे तिथे बसले होते आणि मग त्यांनी साप पहिला होता .. म्हणून वैभव सावध झाला .. कदाचित साप असेल म्हणून आपला प्रातर्विधी उरकू लागला ... त्यानं घाई घाईत पॅन्ट वर सरकवली .. परत आवाज आला .. त्याच लक्ष त्या झुडुपात गेलं .. त्याला भीती वाटली कारण ह्या भागात वाघ पण असतात ..आणि अचानक त्या झुडुपातून सूरज पळत आला .. "साप... साप ..." आणि हसू लागला ...!
मग दोघे घरी आले . दोघांनी छान नास्ता केला .. नाश्ता कसलं जेवणच म्हणा .. ३ चपात्या आणि वावरातली ताजी मेथी ची भाजी केली होती नानी ने .. मग त्या दोघांना तिने एका कापडात चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी बांधून दिली .. शहरातील वैभव ला खूप मस्त वाटत होत .. सुरज साठी हे नेहमीचंच होत .. नानींनी त्याला सांगितलं कि वैभव ला नीट ने .. जास्त मस्ती करू नका .. मग दोघे निघाले.. गाय वासरं , म्हैस सगळे पुढे चालले होते आणि हे दोघे मागे टिंगल टवाळी करत चालले होते ... भाजलेले शेंगदाणे दोघांचा पण खिशात होते .. मस्त खात खात ते चालले होते.. वैभव त्याला शहरातील गमतीजमती सांगत होता .. कि शहरात त्याने कसे तबल्याचे क्लास लावले आहेत .. आणि आता त्याला मस्त तबला वाजवायला येतोय ..सुरज ला पण त्याचा हेवा वाटायचं .. हे सगळ्यांचं असाच असत ..! प्रत्येकाला दुसऱ्याचा आयुष्याचा हेवा वाटतोच ...!
दोघे मग चालत चालत खूप लांब गेले कदाचित २ टेकड्या ओलांडून गेले .. मध खूप सारे झुडूप त्यांना लागले मग मध्ये एक ओढा लागला .. पण उन्हाळ्यामुळे त्या ओढ्याला पाणी नव्हते.. थोडे थोडे पाण्याचे डबके होते ... मग सुरज ने गुरांना तिकडेच पाणी प्यायला सोडलं .. गुर ढोर आपले आपले जिभल्या चाटत पाणी पिऊ लागले .. वैभव ला हे सगळं बघून फार गम्मत वाटत होती .. तो एका वासरु जवळ गेला आणि त्याचा तोंडावर हात फिरवून त्याला गोंजारु लागला ...
"हि आपल्या गावाची वेस .. इथून पुढे बैतुलवाडी ..! हा ओढा आपली वेस हाय " सुरज बोलला ..
वैभव मनातल्या मनात विचार करत होता कि तो आता दुसऱ्या गावात आहे .. आयुष्यात स्वतःहून तो दुसऱ्या गावात आला .. तो त्या वासराला गोंजारातच होता .. त्याचे ते गोंडस डोळे खूप सुंदर वाटत होते .. अचानक त्याचे ते काळेभोर डोळे सफेद होऊ लागले .. त्याचे बुबुळ गायब झाले ... वासरू पाणी प्यायचं थांबलं.. आणि त्या पांढऱ्या फटक डोळ्यांनी ते वैभव कड पाहू लागलं .. वैभव चा मनात भीतीची पाल चुकचुकली .. कायतरी अघटित घडतंय असं त्याला वाटलं ... !
त्याने दुर्लक्ष केलं मग तो त्याओढा चा पलीकडे गेला आणि गम्मत म्हणून तिथली माती त्याचा खिशात घातली ... त्याला अप्रूपच वाटत होत कि तो दुसऱ्या गावात पायीपायी गेला होता .. मग दोघे तिथे दगडावर जेवायला बसणारच पण तेवढ्यात तिथे शेजारी राख आणि जळकी लाकडे दिसली तस सुरज बोलला "आपण दुसरीकडे जाऊन जेवू..! इथ नको ..!"
'का रे काय झालं ?" वैभव ने विचारलं..
"अरे इथं मानस जाळत्यात.. मेलेली मानस .. ह्या गावाची जाळायची जागा आहे वाटत ...!" सुरज बोलला ..
वैभव मनोमन घाबरला पण मग सुरज निवांत होता म्हणून त्याला देखील काय वाटलं नाही .. दोघे पण मग मागे फिरले पुढे एका टेकडीवर दोघे गेले .. तिथे एका आंब्याचा झाडाखाली ते दोघे बसले ..मग त्यांनी ते फडकं काढलं आणि निवांत जेवू लागले .. समोरच माळरानात गुर चरत होती आणि दोघे निवांत मिटक्या मारत चटणी आणि चपातीवर ताव मारत होते .. वैभव ला खूप च मस्त वाटत होत .. एखादी गाय इकडे तिकडे गेली कि सुरज आवाज काढायचा " हुरररे .. हुर्रर्रर्र " मग ती गाय आपसूकच परत यायची .. मग वैभव पण तस करू लागला .. एक वासरू तिकडे जाऊ लागलं तर वैभव ने पण त्याला "हुर्रेय" केलं .. तस ते वासरू वैभव कडे पाहू लागलं .. तेच वासरू होत मघाशी .. त्याचे पांढरे डोळे, त्यात बुबुळ नव्हतेच वैभव कडेच पाहत होते ... वैभव हादरून गेला त्याने सुरज ला विचारले
"ए सुरज्या त्या वासराचे डोळे बघ .. कसे आहेत ..!" वैभव वासराकडे बोट दाखवत बोलला ...
" कशे म्हंजी ?? काळे काळे आहेत .. तुला कशे दिसतात ??" सुरज ने विचारलं
"मला तर पांढरे दिसतंय .." वैभव बोलला ..
"यडा आहे मग तू ... ! चल जरा चिंच खाऊ ..!" असं बोलून सुरज सरसर शेजारचा चिंचेचा झाडावर चढला ... त्याने २-३ चिंचा खाली फेकल्या ... "कॅच घे कॅच ...!" सुरज बोलत होता ...
पण वैभव च लक्ष त्या वासराकडेच होत.. "ए वैभ्या कॅच घे रे .." सुरज वरतून ओरडत होता .. त्याने वरती पाहिलं .. सुरज चा मागे कोणीतरी पांढरी साडी नेसलेली बाई होती .. विचित्र असा आकार होता .. एक आकृतीचा होती .. तीच चेहरा काय दिसत नव्हता पण ती विचित्र हसत होती .. ती तरंगलेली होती कि एखाद्या फांदीवर बसलेली होती ते काळात नव्हतं .. वैभव डोळे विस्फारून पाहत होता .. आणि ती सुरज चा मागून वैभव कडे बघून हसत होती.. समोर सुरज चिंचा पुढे करून " ए कॅच घे रे ..!" असं बोलत होता ..
वैभव तेव्हड्यात बोलला "सुरज्या....." अचानक झाडाची फांदी तुटली आणि सुरज खाली पडला .. वैभव ने एकवार वरती पाहिलं वरती कोणच नव्हतं .. सूरज ला काहीच झालं नव्हतं . फक्त पायाला थोडस खरचटलं होत .. वैभव बोलला
"अरे तुझ्यामागे एक बाई उभी होती .. मी पाहिलंय .. मला भीती वाटतीय रे ..! तिने तुला खाली ढकलल..!" वैभव बोलला ..
"अरे येड्या माझी फांदी तुटली म्हणून पडलो मी .. हे घे चिंचा .. खात बस्स ..!" चिंचा समोर करत सुरज बोलला .. मग वैभव ला पण वाटलं काहीतरी भास झाला असेल म्हणून त्याने विषय सोडून दिला .. मग दोघे घरी जायला लागले .. २ टेकड्या पार करून मग दोघे डांबरी ला लागले ..! दुपारचे ३-४ वाजले असतील ..!
डांबरी रस्त्यावर चालतं असताना गुरांचा पायाचा आवाज येत होता .. वैभव ला मजा येत होती .. अचानक एक छोटासा खडा त्याचा पाठीवर येऊन लागला .. त्याने दुर्लक्ष केलं.. परत एक खडा येऊन त्याला लागला ...
" ए सुरज्या कशाला खडे मारतोय रे ??" वैभव बोलला
"ए.. मी नाही मारल तुला .. गप चल " गुरांकडे लक्ष देत तो बोलला ..
सुरज त्याचा पुढे होता .. तरीसुद्धा एक छोटा खडा येऊन त्यांना लागला ... आता मात्र वैभव घाबरला आणि जोरात चालू लागला .. तसे अजून छोटे छोटे खडे येऊन त्याला लागू लागले ... त्याने सूरज ला सांगितलं .. सुरज बोलला "तुझा चपला ला चिटकून उडत असतील खडे ..!"
त्याने सुरज ला परत काही सांगितलं नाही .. पण मग तो एका वळणावर थांबला .. आणि त्याने मागे पाहिलं . आणि तिथे उभाच राहिला .. त्याने पाहिलं कि हवेतूनच छोटासा खडा तयार होतोय आणि त्याला लागतोय ...त्याला कळेना कि काय होत आहे .. त्याने एकवार आजूबाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं .. पण दूर टेकडीवर कोणीतरी बाई त्याच्याकडे बघत उभी होती ... पण त्याने सुरज ला काही सांगितलं नाही .. मग दोघे पुढे आल्यावर गावदेवाचं झाड आलं .. त्याझाडाखाली मंदिर होत .. आणि मग तिथून खडे पडायचं बंद झालं .. दोघे पण घरी आले .. आजी घरातील मांजरीला आवाज देत होती ... पण मांजर काही सापडत नव्हती .. वैभव आज दीवसभरचा विचार करत होता ...तेव्हड्यात त्याला आठवल कि त्याने त्या गावातली माती खिशात भरून आणली होती .. कदाचित त्यामुळेच हा प्रकार घडत असणार .. कदाचित त्या मातीमुळे कोणीतरी मागे लागलय असं त्याला वाटलं म्हणून त्याने बाहेर जाऊन ती माती फेकून दिली ...आणि त्याचा खिसा झटकून घेतला ...
दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठला .. पहाटेचीच वेळ होती .. तो बाहेर वॉशरूम चा कडे गेला तर कोणीतरी आत होत .. त्या कडी वाजवली .. तर संकेत आत होता ..मग तो घराचा मागे गेला .. तिथून डब्बा घेतला आणि तो खाली पायवाटेने गेला आणि बांधा ला जाऊन बसला .. करवंदीच्या झुडुपात ... त्याच लक्ष समोरचा आंब्याचा झाडावर गेलं .. कोणीतरी त्या झाडावर बसलेलं होत .. बाई होती एक .. ती फांदीवर बसून पाय हलवत बसली होती .. गावाकडे सकाळी सकाळी लोक पाड पडायला येतात .. ती बाई पण सकाळी सकाळी आंबे तोडायलाआली असेल असं त्याला वाटलं .. आणि त्याने थोडं दुर्लक्ष केलं .. आपलं प्रातःविधी आटपून तो परत घराचा दिशेने जाऊ लागला .. अचानक ती बाई हसू लागली ...त्याने तिच्याकडे पाहिलं .. तीच धड त्याचा दिशेने होत तर पाय मागचा साईड ला होते .. आणि ती मोठ्याने गाणं म्हणत होती ..."पाडाला पिकलाय आंबा .....!"... आणि तिचा हातात त्यांचा घरातील मांजर होत .. त्या बाई च तोंड रक्ताने माखलेलं होत ... आणि त्या मांजरीचं अर्ध शरीर तिचा हातात होत ... समोरच दृश्य पाहून वैभव ची बोबडी वळली .. तो पळत घराकडे आला .. तेवढ्यात समोर संकेत दिसला ..
"काय झालं रे .. एवढा काय घाबरलाय .." संकेत ला वाटलं त्याला साप नाहीतर वाघ दिसला कि काय ?
"दादा आपल्या आंब्याचा झाडावर कोणतरी बाई बसली आहे ..." वैभव घाबरत घाबरत बोलला ...
" चल बर, बघू आपण ..!" संकेत बोलला
दोघे परत खाली गेले पण त्यांना कोणीच दिसल नाही .. मग संकेत दादा ने त्याचसाठी २-३ आंबे काढून दिले .. थोडी हुशारी आल्यावर त्याने सगळं संकेत ला सांगितलं .. कालपासून काय काय घडल ते विस्तृत करून सांगितलं .. संकेत ने त्याला धीर दिला कि "असं काही नसत !"... पण संकेत मनातून हादरून गेला ... मग दोघे वरती आले ...
संकेत ची आजूबाजूचा गावात भरपूर मित्र होते .. बैतूलवाडी चा नाम्याने त्याला सांगितलं होत कि मागचा महिन्यात त्यांचा गावात एका बाई ला मारून टाकलं लोकांनी .. ती काळी जादू वैगरे करते असे लोकांना कळले .. म्हणून मग तिला लोकांनी अंगावर राकेल टाकून जाळून टाकला होत .. नंतर तिचा अर्ध्या जळालेल्या शरीराला ओढ्याला नेऊन जाळलं होत .. आणि काल वैभव तिकडे गेला कदाचित तिथेच कायतरी झालेलं असाव असं संकेत ला वाटलं .. त्याने मग आजोबांना हि गोस्ट सांगितली ...
मग आजोबांनी वैभव ला एक धागा दिला .. तो त्याचा हातावर बांधला ... आणि त्याला सांगितलं कि गावाची जत्रा होईपर्यंत तू घराततच राहा .. कारण देव त्याचा घरी गेला आहे .. आपल्या गावाची जत्रा आपण देवाला बोलावण्यासाठी करतो ..
मग २-३ दिवसांनी गावाची जत्रा आली .. मग नानांनी बोकड कापला .. देवाला नैवद्य दाखवला .. गावाचा ग्रामदैवत वाघ्या ... ढोल ताशे वाजत होते ... लोक नाचत होते .. देवाची पालखी निघाली .. गावातून खाली वाघ्यादेवाचा झाडाकडे लोक नाचत निघाले .. भंडारा उडवत सगळे चालले होते ... त्या ढोल ताशांचा गजरात काही लोकांचा अंगात येऊन लोक डुलत होते.. वेडीवाकडी आवाज काढत होते .. लहान मुलं सगळी मजा बघत होते .. संकेत वैभव आणि सुरज ला घेऊन उभा होता ... अचानक वैभव सुद्धा डुलु लागला .. जीभ बाहेर काढून नाचू लागला.. संकेत त्याला आवरू लागला पण वैभव नाचतच होता .. कदाचित कोणतीतरी शैतानी शक्ती त्या लहान मुलाकडून काहीतरी करून घेत होती ... त्याने एकदा देवाचा पालखीकडे पाहिलं .. तो रागात दिसत होता .. त्याने देवाची पालखी उधळून दिली .. आणि जोरजोरात हसू लागला ... सर्व लोक अचंबित झाले .. अचानक तो पळू लागला .. कदाचित कोणीतरी त्याचा मागे लागलय .. तो आता घाबरून पळू लागला .. त्याचा चेहरा घाबरलेला दिसत होता .. त्याच्यामागे नाना , संकेत , सुरज अन गावातले काही लोक पळू लागले ... सर्व त्याच रूप पाहून अचंबित झाले .. लहान १३-१४ वर्षाचा मुलगा असं वागत होता .. तो पळतच होता .. .. पळत पळत तो त्या ठिकाणी आला ..जिथे ३ दिवसांपूर्वी आला होता .. त्या ओढ्यावर ... आणि अचानक शांत झाला .. सगळे लोक मागून बघत होते .. त्याचा शरीरातून कोणतरी निघत होत ते ओढ्याचा पलीकडे हवेतून गेलं ... ती रागाने बघत होती .. चीडचीड करत होती ... वैभव उभा होता त्याच्यामागे वाघावर स्वार झालेला वाघ्या देव उभा होता ... सर्व लोक हे बघून अचंबित झाले होते ... देव आला होता त्याचा भक्तांची रक्षा करायला ...!!