जळगाव रेल्वे स्टेशनमधून रात्रीच्या साडेआठच्या सुमारास आश्लोक व आलोक बाहेर पडले व बऱ्हाणपूर रस्त्याला पायी चालू लागले. आश्लोकनं मनात विचार केला नऊची सरसोलीची बस राहिलीच असेल पण रेल्वेत त्यानं खिसे चाचपून पाहिले होते त्याच्यात त्याला गांधीबाबाछाप दहाच्या दोनच नोटा दिसल्या होत्या. म्हणजे गावाचं दोघांचं तिकीट काढण्याइतपत ते खचितच नव्हते. त्यानं आलोक दादास खाद्यांचा आधार देत हळूहळू बऱ्हाणपूर रस्ता पकडला. कारण त्याला माहीत होतं रात्रीच्या अकरा पर्यंत केळीच्या ट्र्क सरसोलीला चालतात. एखादीला हात देऊ पैसे लागणार नाही वा अनोळखी ड्रायव्हर असला तरी वीस रुपयात तो घेऊनच जाईन.
आज ते महिन्यानंतर सरसोलीला परतत होते. या एका महिन्यात मुंबईलाच आलोकवर उपचार चालत होते. काल रात्रीच डिस्चार्ज मिळाला. रात्रभर तिथंच थांबत सकाळी लगेच रेल्वे पकडली. पण मध्येच गाडी तीन चार तास पडली म्हणुन उशीर झाला. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. कारण इच्छा असुनही पैशाअभावी नाईलाज होता. आश्लोकला आपल्या भुकेपेक्षा आलोकची जास्त काळजी वाटत होती. नुकताच सावरू पाहत होता तो. त्याला काहीही करून खायला द्यायलाच हवं. याचाच विचार करत तो दादाला सांभाळत रस्ता कापत होता. आता दहा - पंधरा मिनीटाचाच रस्ता बाकी होता. तितक्यात आश्लोकला रस्त्याच्या बाजूला श्री जी लाॅनजवळ गर्दी दिसली. त्याच्या डोळ्यात चमक आली. त्यानं आलोक दादाला रस्त्याच्या कडेला चिंचेच्या झाडाखाली बांधलेल्या कट्ट्यावर"मी आलोच", सांगत बसवलं. तो लाॅनकडं वळला. आलोकला चालन्यानं व पोटात काहीच नसल्यानं भोवळच येत होती. तो कट्ट्यावरच लवंडला.
लाॅनच्या दक्षिणेकडील गेटवर केटर्सवाले रिसेप्शनचं उरलेलं अन्न वाटत होते. झोपडपट्टीतील गर्दी उसळली होती तर उत्तरेकडील गेटवर नवपरिणीत जोडप्यात साठी गाडी सजली होती.
आश्लोकला काय करावं समजेना. गर्दीत घुसावं की नाही? नाही घुसलं तर आपलं ठिक पण दादाला तर जेवणाची गरज. गावाला जाऊन लगेच मिळेल याची शाश्वती नाही. उलट काय राडा होतो, काय वाढून ठेवलंय माहीत नाही. त्याला आपल्या परिस्थितीची लाज व कीव वाटू लागली. तो तसाच गर्दीत घुसला. माणसाकडनं पान घेतलं व एकेक पदार्थ घेऊ लागला. पान घेऊन तो चिंचेजवळ आला. व दादाला जेवणाला बसवलं. आलोक मात्र त्याला कुठून व कसं आणलं? काहीच न विचारता खाऊ लागला. आता आश्लोकची भूक ही बळावली. तो पुन्हा गेला व एक पान स्वतःसाठी घेऊन कोपरा पकडून बसला. घास घेणार तोच पुढ्यातलं पान लाथाळलं गेलं. त्यानं वर पाहिलं नी तो अवाक झाला. बिंद्रन पहेलवानानं त्याची गच्ची पकडली होती व कानफटात पेकाटात मारत त्याला शिवीगाळ करत उत्तरेच्या गेटकडे ओढत होता. गलका वाढला. आश्लोक मात्र महिन्यानंतर गावात परतत आहोत उगाच राडा नको म्हणून मार खात मानगुट सोडुन घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होता. सरसोलीचे बरेच लोक रिसेप्शनात आमंत्रित होते. ते ही गर्दीत जमा होऊ लागले. त्यांना पाहताच आश्लोकनं मान खाली घालत मार खाऊ लागला. हा तमाशा गाडीत निघायच्या तयारीत असणाऱ्या नव्या नवरदेव मुलाने पाहिला. इकडं आलोकही काय गरबड झाली आश्लोक कुठंय म्हणून तो ही गेटकडं निघाला. त्याला बिंद्रन दिसताच हा इथं कसा? आणि भावाला मारतोय हे दिसताच दम लागल्या अवस्थेत तो मध्ये पडला व सोडवू लागला. आलोकला पाहताच "साले कुत्र्यांनो इतकं होऊनही तुमची खाज गेलीच नाही. खिरीत मुळा घालायला इथंही टपकलेच! थांबा दोघांचं कांडच करतो" म्हणत बिंद्रन खोंडागत डिरक्या फोडत काही हाताला लागतं हे पाहू लागला. तोच त्याच्या हातात लोखंडी घन लागला. आलोक व आश्लोक धडपडत उठत निघू लागले तोच तो धावत येऊ लागला. आता हा घन टाकणारच हे ओळखून आश्लोकनं आपलं खरं रूप धारण करत आरोळी ठोकत तिथंच पडलेला दुसरा घन उचलला. आणि बिंद्रनच्या पायात मारला. बिंद्रन कोसळला. हे पाहून नवरा मुलगा अथर्व खवळला. त्याला वाटलं झोपडपट्टीतले गुंड असतील व आपल्या नविन मेव्हण्यांना मारत आहेत. त्याचे ही डोळे आधीच तांबारलेले होतेच. तो तसाच धावत गेला व आश्लोक समोर होता त्याला मारत"साले भिकारडे फुकटाचं खायला आले नी वरुन माततात!" म्हणत गरजू लागला. आश्लोकनं त्याच्या पायाला बिलगत
"साहेब गलती झाली पण त्याची इतकी सजा नको हो. जातो आम्ही याला आवरा फक्त",
म्हणत तो परतू लागला. पण अथर्वने मागुन आश्लोकला लाथ घातली. तोच आलोक त्याच्याकडं पलटला. अथर्वने त्याला मारण्यासाठी हात हवेत उगारला पण मागून त्याचा हात कुणी तरी धरला. अथर्व मागे पाहु लागला. नवी नवरी विधीनं त्याचा हात घट्ट पकडला होता. निटीलापर्यंत ढळलेला शालू व नजर ही खाली झुकलेली पण हात इतक्या ताकदीनं पकडलेला होता की तशी ताकद अथर्वने आजपर्यंत अनुभवलेली नव्हती. खालची नजर वर न करत तीन हात सोडला पण झाल्या प्रकारानं जमलेल्या दोन्ही कडच्या पाहुण्यांना धक्का बसला. आलोकनं वळून पाहिलं नी त्याला भोवळ यायला लागली. तोच सदा अण्णा धावत तेथे आले. त्यांनी सरसोलीच्या लोकांना दटावत पांगवलं व दुसऱ्या पाहुण्यांना हात जोडत लाॅन मध्ये परतवलं. नी तसाच दोघांना बाहेर आणून गाडीतूनच सरसोलीला न्यायला ड्रायव्हरला सांगू लागले. पण अथर्वला कळेना की झोपडपट्टीतल्या भिकाऱ्यासाठी विधीनं आपला हात पकडावा¿ तितक्यात त्याला कोल्हापूरचा काॅल आला त्यामुळं तो पंधराएक मिनीटं कोपऱ्यात बोलत राहिला. इकडं बिंद्रनला चिंधू अण्णा 'प्रकरण उगाच का वाढवलं' म्हणून खाऊ की गिळू करत होते. बिंद्रन खालमानेने निघून गेला. पण विधी....
अडखळत कोलमडत चालणाऱ्या आलोककडं सागर उसळलेल्या नयनांनी महिन्यानंतर प्रथमच पाहत होती. ते ही डबडबल्या नेत्रांनी पाहणंही जमत नव्हतं.

क्रमशः.....
✒वासुदेव पाटील.
✒वासुदेव पाटील.
__________________________________________________________________________
🙏भिज ओल 🙏
भाग::-- दुसरा
"दादा मी तुला सकाळीच सांगत होतो, की सरसोलीत आता परतायचं नाही, पण तू ऐकलं नाही माझं! बघ चटके बसायला लागलेत. अजुन तर गावात काय वाढून ठेवलंय काय माहीत! माझं ऐक, चल माघारी ". आश्लोक आलोकला विनवू लागला.
पण त्याला सदा अण्णाच्या गाडीत बसवत " भावा एवढ्या दुनियेत दोघांचं पोट सहज भरेल इतकं कमावण्याची ताकद व हुनर या तुझ्या दादात नक्कीच आहे रे. तो प्रश्न नाही. पण खरा सवाल वयाच्या नवव्या वर्षापासून ज्या मायमाती पंढरीनं, लोकांनी आसरा दिला आपला पिंड पोसला-त्या मायमाती, लोकांना इतक्या सहजा सहजी सोडायचं? आणि तेही ललाटावर हा बदनामीचा दाग घेऊन? कदापि नाही. हे गाव तर आपण कधीना कधी सोडूच पण इज्जतीनं, इमानाने व छातीठोकपणे सोडू" आलोकनं त्याला समजावलं.
" पण दादा गावात आणखी तसाच प्रसंग उद्भवला तर? "
" अरे आपण अपराधी नाहीतच तर कशाला घाबरतो? त्या वेळेचा प्रसंग वेगळा. विधीचा इज्जतीचा प्रश्न होता, चिंधू अण्णा सदा अण्णा ही देव माणसं. त्यांनीच तर आपल्याला वाढवलं. ही माणसं दूर करणार नाहीत आपल्याला. असेल गैरसमज तर दूर करू मगच गाव सोडू.
रात्री खळ्यात मुक्काम केला. खळ्यातला, गोठ्यातला त्यांचा छोटा संसार, क्लासमधलं सामान साऱ्यांचीच महिन्यापूर्वीच्या त्या दंग्यानं मोडतोड झाली होती. रात्रभर गोठ्यात ते तसेच पडले.
सकाळी उठले. तोच सावित्री माय ड्रायव्हरनं सांगितलं असावं म्हणून धावत पळतच सदाअण्णाला सोबत घेऊन खळ्यात आली.आलोकला पोटाशी लावत रडू लागली.
दोघांना घरी नेलं अंघोळ व जेवू खाऊ घातलं.व त्या दिवसापासून त्यांना घरीच रहायची सोय केली. खळ्यातला मुक्काम आवरला. गावातले काही लोक संशयानं पाहत असले तरी अनेक लोक आलोक ला पहायला आलेत व धीर देत जे झालं त्यात तुझी चूक नव्हती सांगू लागले. त्यात सरू मामीही आली व रडू लागली.
आठ दिवसानंतर आलोक पुन्हा कामाला लागला. सदा अण्णाच्या खळ्यातला मळ्यातलं काम पाहू लागला. पुन्हा खळ्यातल्या गोडाऊन मध्ये त्यानं स्पर्धा परीक्षा क्लास, इतर क्लास सुरू केले. पण लोक मुलींना पाठवायला आता चाचरू लागले. पण मुलं मुली स्वतःहून एक एक करत येऊ लागले व पंधरा दिवसात वातावरण व काम पुर्ववत सुरू झालं. कारण लोकांना दोन्ही भावाची वागणूक माहीत होती व ज्या अर्थी सदा अण्णानं त्यांना दूर लोटलंच नाही म्हणजेआलोक निर्दोष आहे व यात बिंद्रनचीच चूक हे लोकांना कळून चुकलं.
आश्लोकही सर्व कामं सांभाळत बी.ए. चे शेवटचं सत्र पूर्ण करू लागला. आलोकचंही सर्वातून सवड काढत तालुक्याला एम. एड चालूच होतं. गावातली बरीच मुलं त्याच्या मार्गदर्शनाने स्पर्धा परीक्षेत बाजी मारू लागले कुणी पोलीस, आर्मीत भरती होऊ लागले तर कुणी इतर क्षेत्रात.
पण तरी आलोकला खंत होती ती वेगळीच. ती त्याचा जीव कुरतडत होती. चिंधू अण्णा दररोज भेटत होते पण बोलणं बंद होतं तेच त्याला खात होतं. एके दिवशी संध्याकाळी खळ्यातला क्लास सोडून तो गोठ्यातल्या गुरांचं काम आटोपत होता तोच त्याला चिंधू अण्णा येतांना दिसला. आज काहीही करून बोलायचेच असं ठरवत तो बाहेर आला.
"अण्णा!"
अण्णांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं व चालत राहिले.
आलोक ही मागं मागं चालत त्यांच्या खळ्यातल्या घरापर्यंत गेला. खळ्यात पाय ठेवणार तोच अण्णा गरजले"खबरदार! याद राख माझ्या जागेत पाय ठेवला तर! खांडोळीच करीन. माघारी फिर".
"अण्णा एकवेळ खांडोळीच केली तरी चालेल पण हा अबोला सोडा हो. कारण अख्खा गाव काय म्हणतोय याची मला मुळीच पडलेली नाही. पण आपला हा अबोला मला आरोपी सिद्ध करतोय. आणि ज्या वयात शिकवायच्या वयात आईवडील गेले. सख्ख्या मामीनं भर पावसाच्या झडीत ओट्यावर येणाऱ्या कुत्राला पेकाटात सोटा घालून हाकलावं तसं हाकललं. पण सदा अण्णा व आपल्या घरानं मायेनं गोंजारलं व संस्काराची शिदोरी दिली. त्या संस्कारांनी मला जिथं खायचं त्याच ताटात छेद करायचं कधीच शिकवलं नाही पण आज आपला अबोला मला..... "
" बऱ्या बोलानं माघारी जा. मला काही ऐकायचं नाही "चिंधू अण्णा जोरानं ओरडताच घरातून सारजा अक्का बाहेर आली.
" अहो मुकाट्यानं घरात या. झाला तो तमाशा पुरे आता. आणि पोरानं काही चूक केली असती तर डुकरासारखा मरणाचा मार खाऊन गावात आलाच नसता. तरी पोरगं तुमच्या पायरीला येऊन माफी मागतोय. पदरात घ्या म्हणून आणि तुमचं आपलं..."
"सारजे काय बोलतीय जिभेला हाड हाय का? तु विसरली असशील पर म्या नाय विसरलो माझ्या पोरीचा इज्जतीचा फालुदा"असं म्हणत चिंधू अण्णानं तिथनं काढता पाय घेतला.
" आलोक झालं ते वाईटच पोरा. यात तुझी चुक नाही त्या बिद्रनच किडे पाडलेत काहीतरी. पण पोरीच्या बदनामीनं ते बिथरले. होईल सगळं व्यवस्थित "सारजाईनं समजावत त्याला माघारी पाठवलं.
निदान सारजाईचा मनातला तरी मळ गेला यानं तो पुन्हा कामात गुंतला. सदा अण्णानंही नंतर चिंधू अण्णाला समजावलं. खरा प्रकार लक्षात आणून दिला.हळू हळू चिंधू अण्णा चा राग निवळायला लागला.
आश्लोकचं ग्रॅज्युएशन झालं. आलोकचं पण एम. एड झालं. गावाला ही कळालं की आलोक निर्दोष आहे. मग आता आलोकला पुढचे वेध लागले. आश्लोकला स्पर्धा परीक्षेकरता इथं आपण पुरे पडणार नाही. छोट्या परीक्षा ठिक पण मोठमोठ्या हुद्द्याच्या परीक्षेकरता बाहेर आता निघावं लागणार शिवाय आपल्याला ही काही तरी मार्ग शोधावा लागेल.
पण तितक्यात काही तरी गरबड झाली व विधी माहेरी आली. प्रत्येकाला वाटलं दोन चार दिवस माहेराला आली असेल. पण आठ दिवस झाले विधी परतायचं नावच घेईना. पण आलोकला याचं काही एक सोयर सुतक नव्हतं. एक दोन वेळा नजरा नजर झाली पण तो लगेच तिकडं दुर्लक्ष करी. विधीची तब्येत पूर्ण खालावली होती. एके दिवशी पहाटे तो खळ्यात म्हशीचे दुध काढायला आला. अंधाराचा फायदा घेत विधी थेट खळ्यातच आली.
"कोण?" त्यानं अंधारातच विचारलं.
"आलोक! आठ दिवसापासून पाहतेय साधं पहायला ,बोलायला पण राजी नाही"
..... विधी म्हणाली.
तोच त्यानं हातातली बादली खाली ठेवत माघारी फिरू लागला.
"अरे ऐक जाऊ नकोस मला काही तरी महत्वाचं सांगायचं आहे, निदान ऐकून तर घे आधी मग खुशाल जा" विधी काकुळतीने म्हणाली.
पण तो थांबलाच नाही.
दिवस भर त्यानं इतर नित्यनेमाची कामं बाजुला ठेवत जुजबी तयारी केली. व त्याच रात्री अकराच्या सुमारास केळीचा ट्रक पकडून आश्लोकला घेत तो जळगाव, चाळीसगाव, मनमाड करत पुण्याला रवाना झाला. पण तत्पूर्वी गावाच्या मायमाती पंढरीस "माते हा अनाथ पोरका आलोक तुझ्याच कुशीत वाढला. तु व ही माणसं नसती तर हा थंडी वाऱ्यात कुठच भुकेला गारठून मेला असता. पण तू या लेकरांचा सांभाळ केलास. तुझे पांग मी फेडल्याशिवाय राहणार नाही. पण आता मला जाऊ दे." असं म्हणत वंदन करत स्वतःच्या व भावाच्या निटिलावर माती लावली.
पुण्यात उतरताच त्यानं 'गरूड झेप 'क्लासचा पत्ता विचारत विचारत आॅफिस शोधलं.मि. माने त्यांना पाहत,
" कोण आपण? काय हवंय? "विचारते झाले.
" सर नाही ओळखलं? मी सरसोलीचा.... "
" अरे आलोक तू! आणि इथं कसा? कसं काय येणं केलत?" आश्चर्यानं मि. माने विचारते झाले.
"सर हे पोट माणसाला केव्हा नी कुठं घेऊन जाईल हे नाही सांगता येत" आलोक म्हणाला.
तितक्यात मध्येच त्यांनी त्यांचं बोलणं कापत दोघांना घरी नेलं व अंघोळ चहापान केलं. सारं विचारलं व नंतर जेवण करून आजच्या दिवस आराम करा मग पाहू काय करायचं ते?
मि. माने एकदा चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातुन जळगावात ग्रंथालयांच्या उद्घाटनाला आले होते तेव्हा सदा अण्णाच्या जावयासोबत सरसोलीत आले होते त्यावेळेस खळ्यातच आलोक क्लास घेत होता. आणि हे निवांत बसून ऐकत होते त्याची पद्धत व ज्ञान पाहून पाहून त्यांनी लगेच ओळखलं की हे पाणी वेगळं आहे. त्यावेळेस त्यांनी या पोराची सारी चौकशी केली. त्यांचा इतिहास व संघर्ष कळल्यावर त्यांनी आलोकला पुण्याला चल तुमचं भविष्य खुलवतो म्हणून सांगितलं होतं. पण त्यावेळेस आलोकनं "नंतर गरज पडली तर नक्कीच येऊ जी" सांगताच त्याला आपला पत्ता देत तू कधीही ये तुला सर्व मदत करीन असं आश्वासन मानेंनी दिलं होतं. तेच लक्षात ठेवत विधी पुन्हा जवळ येऊ पाहतेय,ती आपला पिच्छा सोडतच नाही. आता तर तिचा संसार.... हा सारा विचार व आश्लोक ची स्पर्धा परीक्षा तयारी नजरेसमोर ठेवत तडका फडकी निर्णय घेत कुणालाच न कळवता भावासहित आलोक आज पुण्यात आला होता. पण तत्पूर्वी त्यानं सदाअण्णासाठी चिठ्ठी लिहुन ठेवून आला होता.
मि. मानेंनी आलोकला आपल्या क्लासमध्येच शिकवायला नेमलं. व आश्लोक च्या स्पर्धा परीक्षा तयारी करीता नामांकित क्लास लावला. आलोकनं क्लास घेतच नेट सेटची तयारी करावी असं ठरलं. रहायचा प्रश्नही मानेंनी त्यांच्या मित्रामार्फत लवकरच निकालात काढला. एक मित्र फाॅरेनला होता व त्याचा फ्लॅट सुनाच पडला होता. त्या मित्रास भाड्यापेक्षा फ्लॅटची निगा ठेवणारा हवा होता. मानेंनी त्याच्याशी बोलणी करून नातेवाईक कडून किल्ली मिळवली. आलोक व आश्लोक तेथेच रहायला आले.
पुढचं सुरळीत सुरु झालं.
शेजारी दिनानाथ रावते म्हणून डिएसपी चा फ्लॅट होता. ते सतत बाहेर जिल्ह्यातच ड्युटीला असत. पंधरा-विस दिवसातून येत असावेत.त्यांची मिसेस अंजना रावते या पुण्यातच प्राचार्या होत्या. आलोक व आश्लोक यांचा बोलका व मदतीला धावून जाणारा स्वभाव यामुळं मॅडमशी आठच दिवसात परिचय झाला. त्याचं जाणं येणं वाढलं. पण मॅडमकडं पाहून का कुणास ठाऊक आलोकला सतत वाटे की त्या आतून कसल्या तरी काळजीत असाव्यात. त्याचा लाघवी स्वभाव मॅडमावर जादू करे व त्या त्याला पुत्रवत प्रेम करू लागल्या. आलोक व आश्लोकला ही त्याच्यात आपली आई नाही पण सावित्रीकाकू व सारजाई दिसू लागली. पण आलोकला जरी ठाऊक नव्हतं तरी नियतीला पक्कं ठाऊक होतं की त्या अंजना मॅडमच विधीच्या सासूबाई होत्या...
आणि लवकरच तेथेही विधी त्यांचा पाठलाग करत येणारच होती........

क्रमशः......
✒वासुदेव पाटील.