गंमत अशी ही जीवघेणी...
(संध्याकाळचे ८ - साडे ८ वाजले आहेत. घरात १६ - १७ वर्षांची सायली, तिच्या पेक्षा ४-५ वर्षांनी मोठा असणारा तिचा दादा... असे दोघेच आहेत.
सायली स्वयंपाकघरात जाते. नेमकी त्याचवेळी लाईट जातात. सर्वत्र गुडूप अंधार होतो... डोळ्यात बोट घातलं तरी समजणार नाही असा... अचानक... सायली ओरडते...)

*सायली* - दादा ऽऽऽ... दादा ऽऽऽ... पकड त्या माणसाला... तो बघ पळाला... पकड त्याला... बहुतेक चोर असावा... सोडू नकोस त्याला...
(सायलीच ओरडणं ऐकुन दादा गोंधळतो. कोण पळतोय.?... कोणाला पकडायच.?... त्या घनदाट अंधारात तर त्याला दिशाही कळत नाही. तो नुसताच उभा राहतो. त्याच वेळी लाईट येतात आणि सायलीही हॉल मध्ये येते.)

*सायली* - कुठे गेला तो माणूस.? तू पकडल कस नाहीस त्याला.?
(ती त्रागा करत हॉल मध्ये चौफेर नजर फिरवते)
हे काय !... सर्व दरवाजे खिडक्या तर आतून बंद आहेत... म्हणजे ती व्यक्ती अजून घरातच असली पाहिजे... बेडरूम मध्ये असेल...
(दादा आणि ती बेडरूम मध्ये जातात. पण... कोणी नाही... ते घराचा कोपरा न् कोपरा पुन्हा पुन्हा तपासतात. पण छे.! कोणीच नाही सापडत... त्यात घराचा प्रत्येक दरवाजा... प्रत्येक खिडकी आतून बंद...)

*सायली* - खरच दादा ! कोणीतरी होत. हे बघ मी तुला सगळ नीट सांगते, काय घडलं ते.!
(सायली भिंतीला टेकून उभी राहते. एक दीर्घ श्वास घेत ती पुन्हा एकदा दादा कडे बघते. तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याच कडे पाहत उभा असतो.)
मी स्वयंपाघरात असताना अचानक लाईट गेली. मला क्षणभर काय करावं.? सुचेना... पण तेवढ्यात मला आठवल की फ्रीजवर बॅटरी ठेवलेली असते... मग मी अंधारातच चाचपडत फ्रीज कडे निघाले... अन् एकदम मी कोणावर तरी आदळले... मला वाटल तू सुध्दा बॅटरी घ्यायला आला असशील... त्यामुळे माझी थोडी भीती चेपली... आणि मी तू समजून त्या व्यक्तीचा हत पकडला... तसा तो व्यक्ती सुटण्याचा प्रयत्न करायला लागला... तेंव्हा मला जाणवलं की तो व्यक्ती तू नाहीस... मग... नक्कीच तो चोर असणार... म्हणून मी त्याला घट्ट धरून ठेवायचा प्रयत्न करू लागले... तसा तो सुटण्याची जास्त धडपड करायला लागला... त्याच्या ताकदी पुढे माझा जोर किती लागणार.!!.. त्यामुळे तो हातातून निसटला... पण... त्याच्या शर्ट चा तुकडा माझ्या हातात...
(सायली बोलता बोलता थांबली. तिच्या हातात शर्ट चा तुकडा होता... सायली घाबरली... पण क्षणभरच... लगेच तिच्या डोक्यात एक शंका आली की आपल्याला घाबरवण्यासाठी तर दादाने ही गंमत केली नसेल.?... कारण बंद घरातून ती व्यक्ती जाईल कुठे.? तिने संशयाने दादा कडे बघितले... तो अजुनही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह धारण करून तिच्या कडे पाहत उभा होता... सायलीच लक्ष त्याने घातलेल्या टी शर्ट कडे गेलं... तिने पुन्हा हातातला शर्ट चा तुकडा निरखून बघितला... त्या तुकड्या सारखा एकही शर्ट दादा कडे नाही, याची तिला खात्री होती आणि जरी असला तरी एवढ्या अंधारात आणि कमी वेळात तो बेडरूम मध्ये जावून दोनदा कपडे बदलून येणं शक्यच नव्हत... विचारासरशी सायली दचकली...)
*सायली* - हे बघितलं का, दादा... त्या व्यक्तीच्या शर्टचा तुकडा... पण... घराचे सगळे दरवाजे... खिडक्या आतून बंद आहेत... मग ती व्यक्ती गेली कुठे.?... आणि मुख्य म्हणजे बंद घरात आली कुठून.?... कोण असेल ती व्यक्ती.?
( सायली दादाला विचारत होती. पण ह्या प्रश्नाला दादाकडे उत्तर नव्हत...)

(तेवढ्यात पुन्हा लाईट गेली...)
*सायली* - दादा, पुन्हा लाईट गेली रे...
(सायली दादाला घट्ट बिलगली... तेंव्हाच...)

*सायली* - दादाऽऽ... दादा... बघ परत कोणीतरी मला धक्का देवून गेलं... दादाऽ... तुला नाही का रे जाणवत... कोणाचं अस्तित्त्व.???
(तिने दादाला हलवत विचारलं... तेंव्हाच लाईट परत आली. तिने दादा कडे बघतले...)
दादा, खरच तुला कोणाचही अस्तित्त्व नाही जाणवलं का रे.?

(त्याने एकवार तिच्या चेहऱ्याकडे बघितल... तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती... त्याने नाईलाजाने नकारार्थी मान हलवली... त्यामुळे सायली जास्तच घाबरली...)
*सायली* - म्हणजे... म्हणजे दादा... ती व्यक्ती... मलाच जाणवतेय का.?... फक्त मलाच...!!!... का.?... दादा, अस का.?... मलाच का जाणवतेय.???... दादाऽऽऽ... दादा, मला चक्कर येतेय... दादाऽऽऽ... दादाऽऽऽ...
(दादाने सायलीला सावरलं... भीतीमुळे तिची शुद्ध हरपली...)

(दादाने तिला नीट बेड वर झोपवल... आणि तो तिच्या पायाशी बसून राहिला... थोड्यावेळाने तो उठला... त्याने आवाज न करता हलक्या हाताने कपटाच दार उघडलं... आतून त्याचा मित्र हसत बाहेर पडला... दोघांनी एकमेकांना टाळ्या दिल्या...)
*दादा* - काय गंमत केली ना आपण तिची...! काय जाम घाबरली बघ ती...! आता मात्र बस्स झाल... ती शुद्धीवर आली की आधी तिला सगळ सांगून कान पकडू...
(अस म्हणत दादा तिच्याजवळ बसला... आता शुद्धीवर येईल... आता येईल... करत बराच वेळ झाला... तिची ती गाढ झोप बघून दादा घाबरला... त्याने तिचा हात हातात घेतला... आणि... आणि त्याला शॉक बसला...)

*दादा* - अरे... अरे... ही तर... ही तर... आपल्याला सोडून गेली... सायली ऽऽऽ
(दादाने हंबरडा फोडला...)
सायली... सायली उठ ना... अग.!... अग !... आम्ही तर नुसती गंमत करत होतो ग... तुला घाबरविण्यासाठी... Sorry ग... तुला मनात येईल ती शिक्षा दे मला... पण... पण... ही असली नको... सायलीऽ... सायलीऽ... उठ ना...
(दादा तिला हलवत होता... पण ती... ती निपचीत पडून होती...)

(तेवढ्यात... पुन्हा लाईट गेली... आणि ...)
*दादा* - कोण ?... कोण आहे तिकडे.?... सायलीऽ... सायली तू तर नाही...!!!
(दादा हॉल च्या दिशेने धावला... तोपर्यंत लाईट आली... त्याने चौफेर नजर फिरवली... पण... कोणीच नव्हतं... तो पुन्हा बेडरूममध्ये आला... सायली जवळ बसला...)

*दादा* - सायलीऽऽ... सायलीऽऽ...
(तो ओंजळीत चेहरा झाकून रडायला लागला ...)

© प्रतिभा वडनेरे