मनोरमा ......... - Marathi new stories from Marathi writers
माझ्या मामाचे गाव पुणे जिल्ह्यातील एक छोटेसे गाव ..
कुणाच्या झाडावरील आंबे, तर कुठे आवळे,चिंचा,बोरे..
आणि सगळ्यात आवडते म्हणजे पोहायला जाणे ..
त्यावेळी मामाच्या गावाला फक्त पिण्यापुरतेच पाणी नळाला यायचे,म्हणजे कपडे वैगेरे नदिलाच धुतली जायची ..म्हणजे तो काळ की शौचास सुधा चिम्पाट घेऊन जायचो
एकंदरीतच आयुष्यातला चांगला काळ..उन्हाळ्याची सुट्टी लागली की गावी प्रत्येक घरात पाहुणयांची वर्दळ असायची..माझ्या मावश्यांची मुले,मामाची मुले आणि आम्ही तिन भावंडे असा सुमारे 8-10जणांचा लवाजमा ..
एकदा आम्ही सकाळी मामीसोबत नदीवर गेलो,मामी सगळ्यांची कपडे धुत होती..आणि आम्ही पाण्यात उड्या देखील मारल्या .. मग सगळ्या भावंडांची पोहायची शर्यत लागली ..बघता बघता आम्ही मामी पासून बरेच दूर आलेलो..आम्हाला पाहून काही लोक इशारे करुण परत या परत या असे ओरडत होते..
बाहेर आल्यावर एक म्हातारी तर माझ्या भावावर तर खेकचलीच
आणि म्हणाली मनोरमा एकदा झपाटली की मग समजेल !!
घाई घाई आम्ही तेथुन बाहेर पडलो ,व रात्री झोपताना आजीला सगळी हकीकत सांगितली..मग आज्जीने सगळी हकीकत सांगितली..
मनोरमा नावाची एक ऐन तारुण्यातली मुलगी,कपडे धुवायला आली असता पाय घसरून नदीत पडली,नदीला पाणी सोडल्या कारणाने पाण्याचा प्रवाह जास्त होता,खुप उशीराने मनोरमाचे प्रेत एका कपारीजवळ आढळले हीच होती ती जागा ..मनोरमा एका विशिष्ट वेळेत तिचा आभास करुण द्यायची ..
गावातल्या पोलिस पाटलाच्या घरी लग्न होते,भरपुर पाहुणे आलेले होते..त्यांच्या दूरच्या नात्यातली संगीता घरकामासाठी खास बोलवली होती ..कमी वयात लग्न झाल्या कारणाने संगीताची मुलगी माया लवकरच तीच्या हाताखाली आलेली ..म्हणजे माया 18 तर संगीता 38 वयाची असावी ..
एकदा दोघी मायलेकि कपडे घेऊन नदीवर गेल्या आणि योगायोगाने मनोरमाच्याच पॉइंट वर गेल्या..कपडे धुवु लागल्या तर तितक्यात कुणीतरी जोरात आवाज दिला "अग ये बाई !मरायचय का तुला ??उठ आधी तिथुन !!!
गडबडलेली संगीता तशीच घाबरून उठली,काही समजायच्या आत मायाने तिच्या डोक्यावर धुनं ठेवले आणि दोघी मायलेकि गडबडीने निघाल्या ..
तितक्याच संगीताचा तोल गेला आणि त्याच जाग्यावर संगीता जोरात आपटली,बिचारीच्या डोक्याला आणि पायाला बराच मार लागला होता ..कशी बशी लंघडत बिचारी घरी पोहोचली ,आणि रात्री तापाने फनफनली.जास्त तापाने काहीही बडबडू लागली..मग आजूबाजूचे म्हणु लागले मनोरमा झपाटली ...
काही केल्या ताप कमी होईना..संगीता तापामधे बरळु लागली.."मी इला नेणार,येत्या अमवसेला इला नेणार "
आजु बाजुची लोक सुधा शंका कुशंका काढु लागलेली ..
अशातच पोलिस पाटलाने तिला पुण्याच्या मोठ्या सरकारी इस्पितळात दाखल केले..बिचारी संगीता पूर्ण पिवळी पडलेली ,देवलशाच्या अंगारयाणे थोड़ा फरक पडलेला आता ती खाऊ-पिऊ लागलेली ..
पाटलाच्या मुलीचे पण लग्न झाले..मग संगीता तिची मुलगी मायाला विचारु लागली..
दुसऱ्याच दिवशी पाटिल सपत्नीक मायाला घेऊन इस्पितळात गेला,आणि तब्येतीची विचारपुस करू लागला ..पण आता माया,संगीताची मुलगी मात्र काहीशी विचित्र वागु लागली ..बाजुला असलेली पाण्याची बाटली तिने घेतली आणि आपल्या आईचे पाय धुतले ...कपड्याच्या पुरचुंडित बांधून आणलेले हळद -कुंकु आपल्या आईच्या पायाला लावले आणि हसत म्हणाली सोमवारी अमावस्या आहे तुला घेऊन जाणार म्हणजे जाणारच !!!!
आजूबाजूचे सर्व घाबरून हा प्रकार पाहत होते ..अशातच संगीताची प्रकृति खालावली..बिचारि धाप लागुन सोमवारच्या अमावसेला गेली..आणि तिच्या मृत्यूची खबर ऐकून मायाने सुधा त्याच ठिकाणी जीव दिला जिथे मनोरमा गेलेली !!!
@सत्यकथा
लेखक प्रसाद हांडे