कथेचे नाव : HAUNTED COLLEGE
लेखन : अभिषेक शेलार#MBKG_summer
भाग 1 :-
टीप : या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे असून, कोणतीही अफ़वा किंवा अंधश्रद्धा पसरविणे हा या कथेचा हेतू नाही. तसेच कथेचे एकूण 3 भाग असतील याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.
नमस्कार मित्र मैत्रिणींनो !! मी अभिषेक शेलार, आज पहिल्यांदाच तुमच्यासमोर एक काल्पनिक कथा मांडत आहे.
शिवम लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता. अभ्यासासोबतच त्याला इतर गोष्टींचीसुद्धा आवड होती. कॉलेजच्या प्रत्येक Event किंवा Competitions मध्ये तो आवडीने सहभाग घेत असे. यंदा तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता.
डिसेंबरचा महिना होता, त्याच्या कॉलेजमध्ये “Winter Festival “ चे आयोजन करण्यात आले होते व त्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले होते. त्या Festival साठीची जी काही तयारी होती ती दरवर्षीप्रमाणे कॉलेजचे विद्यार्थीच करणार होते आणि त्याचकरिता “Fine Arts Committee” ची आज बैठक होती. त्या बैठकीत Committee चे Members तसेच काही शिक्षकदेखील हजर होते. Committee मध्ये एकूण 170 विद्यार्थी होते.
तर ठरल्याप्रमाणे त्यांची Meeting पार पडली आणि त्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे 4 वेगवेगळे ग्रुप केले. प्रत्येक ग्रुपला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करायचे होते. एका ग्रुपमध्ये अंदाजे 40 - 45 विद्यार्थी होते.
शिवमने यापूर्वी कॉलेजच्या अशा अनेक प्रोजेक्ट्सवर उत्तम कामगिरी केली असल्याने, शिक्षकांनी त्यालाच त्याच्या ग्रुपच्या मॉनिटर पदाची जबाबदारी दिली. त्याच्या ग्रुपमध्ये 30 ते 32 मुले तर 7 ते 8 मुली होत्या. शिवमच्या ग्रुपला कॉलेजची Building आणि त्याच्या आसपासच्या परिसरात fest साठीचे Flex व Banners लावण्याची जबाबदारी दिली होती. त्याचे कॉलेज एकूण 5 floors चे होते आणि कॉलेजच्या आसपासचा आवार देखील खूप मोठा होता. त्यामुळे खूप कमी दिवसात त्यांना जास्त काम करायचे होते.
त्याचदिवशी त्याने त्याच्या ग्रुपसोबत एक “Discussion Session “ arrange केले व त्यात त्याने प्रत्येकाला आपापली कामे नेमून दिली.
दुसया दिवसापासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली, कारण fest साठी अवघे 5 दिवसच शिल्लक होते. प्रत्येक ग्रुपसाठी कॉलेजचे वेगवेगळे floors देण्यात आले होते. जसे की, Dance व नाटक बसवणाऱ्या ग्रुपसाठी
groundfloor वरील दोन hall देण्यात आले होते. Singing ग्रुपसाठी 1st तर शिवमच्या ग्रुपला 2nd floor दिला होता. प्रत्येकजण आपापल्या परीने खूप मेहनत घेत होता. शिवम व त्याचे colleagues देखील त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करत होते. दिवसा Office असल्याने सकाळी office च्या वेळेहुन थोडे लवकर येऊन ते काम करत असे. परंतु वेळेच्या बंधनामुळे त्यांना म्हणावा तितका वेळ त्यावर देता येत नव्हता.
असेच करत करत आता त्यांच्याकडे फक्त दोनच दिवस राहिले होते, परंतु त्यातही जमेची बाजू म्हणजे त्यातील एक दिवस हा रविवारचा होता. त्यामुळे त्यांनी ते दोन्ही दिवस थोडे उशिरापर्यंत थांबून काम करण्याचा निर्णय घेतला.
ठरल्याप्रमाणे सर्वजण शनिवारी office मधून सुटल्यावर कॉलेजमध्ये भेटले. शिवम व त्याच्या काही मित्रांनी येताना सर्वांसाठी नाश्ता आणला होता. थोडावेळ गप्पागोष्टी करत करत नाश्ता संपवून पुन्हा ते आपापल्या कामाला लागले. बाकीचे ग्रुप्स दिवसाच थोडावेळ येऊन Practice करत असल्याने, आता संपूर्ण कॉलेजमध्ये फक्त शिवमचाच ग्रुप होता.
बाकीचे कोणतेही ग्रुप्स नसल्याने त्यांनी Ground Floor वरील हॉलमध्येच काम करण्याचा निर्णय घेतला. आज काहीही करून त्यांना कॉलेजच्या Building ला लावण्याचा एक मोठा Flex पूर्ण करायचाच होता.
रात्रीचे 9 वाजून गेले असतील, सर्वांनाच खूप भूक लागली होती. त्यांच्या कॉलेजबाहेरच एक प्रसिद्ध हॉटेल होते, तिथेच जेवण करून पुन्हा कॉलेजमध्ये येऊ असे त्यांचे ठरले. त्यांचे कॉलेज मुख्य रस्त्यापासून थोडे आत असल्याने अंतर थोडे जास्तच होते, परंतु ग्रुपमधील बऱ्याच जणांकडे Bikes असल्याने त्यांना हॉटेल पर्यंत जाण्यास काही अडचण आली नाही.
जेवण वैगेरे झाल्यानंतर थोडावेळ तिथेच गप्पागोष्टी करून पुन्हा ते सर्व कॉलेजमध्ये आले व fresh होऊन पुन्हा कामाला लागले.
एव्हाना रात्रीचे 10 ते 10:15 वाजून गेले असतील, त्यांच्या ग्रुपमधील मुलींना घरून Calls येऊ लागले. तसेच काहीजण कॉलेजपासून लांब राहत असल्याने शिवम व इतर मुलांनी त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे काही मुले व मुली घरी निघून गेले.
आता त्यांच्या ग्रुपमध्ये फक्त 20 ते 25 जणच राहिले होते. मजा मस्ती करत काम करताना कधी 11:30 वाजून गेले ते त्यांच्याही लक्षात आले नाही. एव्हाना त्यांनी कॉलेजबाहेर लावण्याचा Flex बनवून पूर्ण केला. तो Flex त्यांना कॉलेजच्या गच्चीवरून खाली सोडायचा होता. तो Flex लावून उर्वरित काम उद्या करू असे त्यांचे decide झाले.
शिवम व ग्रुपमधील काहीजण तो Flex घेऊन गच्चीवर आले. सर्वत्र भयाण शांतता पसरली होती, रस्तेदेखील निर्मनुष्य झाले होते. Flex लावून ते सर्व खाली आले आणि सर्व आवरून घरी जाण्यास निघाले. इतक्यात शिवमच्या लक्षात आले की, सर्व Floors वरील lights चालूच राहिल्या आहेत. तिथे आसपास Security Guard
देखील दिसत नव्हते. त्यामुळे शिवमने ग्रुपमधील राहुल व अमितला सर्व lights off करून येण्यास सांगितले. सुरुवातीला त्यांनी कंटाळाच केला, परंतु शिवम व इतरांनी त्यांना जाण्यास भाग पाडले.
रात्रीचे जवळजवळ 12 वाजून गेले असतील, दिवसा गजबजलेले कॉलेज आता मात्र भयाण वाटत होते. त्या दोघांनीही पहिल्या Floor पासून Lights Off करण्यास सुरुवात केली. प्रत्येक Floor वर एकूण 10 वर्ग होते. जिना चढल्यानंतर डाव्या बाजूस 5 तर उजव्या बाजूस 5 वर्ग होते व त्यातील 5 वा वर्ग थोडा आतल्या बाजूस होता. त्या वर्गाच्या बाजूलाच Lights चे Switches होते.
त्यांनी पहिल्या 4 Floors वरील Lights पटापट बंद केले व ते आता पाचव्या Floor वरील Lights बंद करण्यासाठी निघाले. जिने चढता चढताच राहुल अमितला म्हणाला “अमित, तुला माहितीय? माझा एक मित्र मला सांगत होता, की आपल्या कॉलेजच्या 5 व्या Floor वर भूत आहे.” त्यावर अमित हसतच त्याला बोलला, “कशावरून?? तू कधी पाहिले किंवा अनुभवले आहेस का?? “त्यावर राहुलने नकारार्थी मान हलवली व बोलला “पण मग आपल्या कॉलेजचे Security Guard देखील संध्याकाळी 6:30 नंतर त्या Floor वरील वर्ग कोणालाच वापरू का देत नसतील??” त्यावर अमित त्याला म्हणाला “अरे वेड्या तिथे BMS चे lectures असतात आणि त्या सर्व वर्गात AC आहेत. ते वर्ग फक्त त्याच Students साठी आहेत, म्हणूनच ते कोणालाही वापरू देत नाही.” अमितच्या उत्तराने देखील राहुल काही समाधानी दिसत नव्हता, त्याच्या प्रश्नार्थक झालेल्या चेहऱ्यामुळे अमित त्याला बोलला “अरे भाई एवढा विचार करू नकोस, We are living in a modern world now, भूत वैगेरे असे काहीही नसते.” अशाप्रकारे debate करत ते 5 व्या Floor वर पोहोचणार इतक्यात, त्यांच्या समोरून काहीतरी खूप वेगाने गेल्याचे त्यांना जाणवले. ते पाहून राहुल घाबरतच अमितला म्हणाला, “बघ मी तुला म्हटले होते ना?? चल यार खाली जाऊ आणि Security Gurard लाच सांगू Lights Off करायला.” त्यावर अमित हसूनच बोलला, “अरे राहुल, तू किती डरपोक आहेस यार... मांजर वैगेरे असेल रे...चल पटकन Lights Off करून खाली जाऊ.” राहुल मनातून थोडा घाबरलाच होता, परंतु नाईलाजाने त्याला अमितसोबत जावेच लागले.
पाचव्या Floor वर पोहोचताच, अमित डावीकडील तर राहुल उजवीकडील Switches बंद करण्यास वळले. राहुलचा घाबरलेला चेहरा आठवून अमितला हसू आवरत नव्हते. हसत हसतच तो Lights Off करण्यास Switch च्या दिशेने पावले टाकू लागला व काही वेळातच कोपऱ्यातील त्या वर्गाजवळ येऊन पोहोचला. त्या वर्गाबाहेरील Light थोडी चमकतच होती. अचानक त्याला हवेत गारवा जाणवला व कुबटसा वास येऊ लागला, जसे की कोणतातरी प्राणी खूप दिवसांपासून मरून राहिला आहे.
पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत त्याने Lights Off करण्यासाठी Switch च्या दिशेने हात नेला, तोच त्याला कोणीतरी दरवाजा ठोकत असल्याचा आवाज आला. प्रथम त्याला तो त्याचा भास वाटला, परंतु नंतर तो आवाज त्याला स्पष्टपणे ऐकू येऊ लागला......
क्रमशा..... (उर्वरित कथा पुढील भागात)
लेखन : अभिषेक शेलार