शरणपूरमध्ये त्या भयानक संकटाला सुरुवात झाली होती.हळूहळू ते संकट एका एका घरापर्यंत पोहोचत होते. मृतदेहांचे आकडे दिवसागणिक वाढत होते. दिवस ओलांडून रात्र झाली की, शरणपूर मधील प्रत्येक व्यक्ती मृत्युच्या सावटाखाली येत होता. कधी कोणाचा मृत्यू होईल, याचा अंदाज येत नव्हता. कितीही संरक्षण घेतले तरी, ते भेदून एकेकाला मृत्यु गाठत होता. मृत्यु तरी कसा? जाग्यावर रक्त गोठवणारा.एकदम रक्तलांच्छित. सगळा लाललाल.
मृत्यू साधा सरळ झाला तर, मरणाची भीती कमी वाटते. नैसर्गिक मृत्यूचा शोक साधा सरळ करता येतो. पण जर तो मृत्यू नैसर्गिक नसेल तर? तो अनैसर्गिक किंवा अमानवीय असेल तर? आणि याच अमानवी मृत्युंनी शरणपूर हादरले होते. साध्या सरळ मृत्युची कल्पना येथे कधीच तोकडी पडली होती.
एखाद्याचा मृत्यु झाला तेव्हा, त्याचे शरीर असंख्य जखमांनी भरलेले असे. आतील सगळे रक्ताळेल आतडे बाहेर लोंबत असे. पोट, पाठ, तोंड, मांडी, डोकं अक्षरशा: फाडलेले असे. पोटातील मोठे आतडे रस्त्यावर पांगलेले दिसायचे. शरीराचा एक एक अवयव तोडलेला असायचा. ते सगळे मृत शरीर बीभत्स दिसायचे. मृत्यूनंतर सगळ्या शरीराची विडंबना झालेली असायची. एवढे क्रौर्य रात्री अवतीभोवती चालायचे. प्रत्येक मृत झालेल्या व्यक्तीच्या, त्या निर्जीव चेहऱ्यावर प्रचंड भीती दिसायची. जसे काही मरणाअगोदर त्याने काहीतरी भयंकर पाहिले असावे.
एवढा सगळा तो रक्ताचा भयंकर पट पाहून, शरणपूर मूळापासून हादरले होते. मृत्यू का होतो? नेमका कुठे होतो? कसा होतो? कोण करतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित होती. अंधारातून वेगाने एखादा तीर यावा, तो छातीत घुसावा, आणि जाग्यावर कंठस्नान व्हावे. तसा काहीसा हा प्रकार घडत होता. अचानक कुठूनतरी मृत्यू वेगाने यायचा, आणि एखाद्याचा जीव घेऊन पुन्हा गायब व्हायचा. घनदाट अंधाराने, सगळा परिसर निपचीप पडलेला असायचा. शरणपूर झोपीच्या अधीन असायचे. झोप कसली? मुटकुळे मारून, माणसे मलूल होऊन पडलेली असायची. हळूहळू घनघोर अंधार हातपाय पसरून वाढायचा.आजूबाजूची भेसूरता वाढायची. रातकिड्यांचा,सरपटणाऱ्या प्राण्यांचा,बाजूच्या जंगलातील श्वापदांचा आवाज अचानक टिपेला पोहोचायचा. रस्त्यावर उभे असणारे लोखंडी खंबे आणि त्यावरचे ते मलूल पिवळे दिवे, अचानक विझायचे. सगळा अवतीभोवतीचा परिसर नीपचीप व्हायचा. एक घनघोर स्मशान शांतता सगळीकडे पसरायची. शांतता क्षणाक्षणाने वाढायची. आणि तो क्षण जवळ यायचा. सगळा परिसर त्याच्या स्वागताला तयार व्हायचा. सगळे वातावरण हळूहळू अनैसर्गिक, अमानवी, बनायचे. सगळे शरणपूर त्याला अनुकूल व्हायचे. आणि मग तो यायचा. संथ पावले टाकत. आपला एक लंगडा पाय, जमिनीवर खरडत खरडत तो यायचा. सगळा गाव त्या दुडक्या चालीत फिरून बघायचा. आणि आपले सावज शोधायचा.
त्याच नाव दंडक. मानव योनी बाहेरील राक्षस. त्याचा सगळा अवतार घृणास्पद.एकदम बीभत्स.टोकाचा क्रूर.उंची सामान्य माणसापेक्षा कितीतरी जास्त. जवळजवळ सात फूट उंचीचा. या जगातील येवढ्या उंचीचा तो नव्हताच. तो मानवच नव्हता. शरीर बलदंड. शक्तीने परिपूर्ण.पण त्या शरीराचे आकृतीमान मात्र वेडेवाकडे. त्याचे बोटे लांबच लांब. त्या बोटांवरच्या नखांचा आकार अणकुचीदार.त्या लांब नखांनी ,एखाद्या श्वापदाचे मुंडके सहज बाजूला झाले असते. ते नखे एवढे टणक होते की ,त्यांच्या एका वारामध्ये ,एखाद्या माणसाचे सगळे शरीर फाटेल. कदाचित शरणपूर मधील,हे सगळे मृत्यू याच नखांनी झालेले असावेत. शरीरभर जागोजागी काळे केस. वर डोक्यापासून ते खाली पायापर्यंत त्याला सगळ्या केसांचे आवरण प्राप्त झाले होते. अस्वलासारखी त्याची त्वचा काळीभिन्न. अस्वल शिकारीला निघाला आहे असे वाटायचे. तोंडातून सारखा घरघर आवाज यायचा. डोळ्यातील लालबुंद क्रोध, तोंडातला दातावर दात आपटल्याचा आवाज, त्याला अजूनच भयानक बनवत होता. आणि या सगळ्यांच्या वर, सर्वात भयानक जाणवायची त्याची ती, खरडत खरडत चालण्याची चाल. तो एका पायाने लंगडा होता. खरडत खरडत चालायचा.पण तो तसा चालायचा, तेव्हा त्याच्या चालण्यात एक क्रूरता जाणवायची. एक भयानकता जाणवायची. त्या चालीतून भीतीचे संकेत आजूबाजूला पसरायचे. आणि त्या भीतीचा संसर्ग सगळीकडे पसरायचा. हळूहळू ती भीती सगळ्यांचे रक्त गोठून टाकायची. तो एकटाच असायचा. हातात कोणतेही शस्त्र नव्हते. ना कोणती सामग्री. बोटावरचे नखे आणि तोंडातील मोठाले सुळे हेच त्याचे शस्त्र. त्याला मरण नव्हते. ना भविष्यात कोणता मृत्यू. तो अमर होता. तो दोन दशकांपासून बंदिस्त होता. तो बंदिस्त होता, तेव्हा सगळे सुखी होते. पण आता तो जागृत झाला होता. त्याला कोणीतरी जागृत केले होते. शरणपूरवर त्याला काळ बनुन सोडले होते. तो आता हळूहळू सगळा गाव गिळंकृत करणार. पुढचे सगळे नाट्य महाभयंकर होते. साक्षात मृत्यूचा तांडव शरणपूरमध्ये घडणार होता.
तो डाकबंगल्यातून मुक्त झाला होता. म्हणजे तो आता स्वतंत्र होता. येवढ्या दिवसाचे त्याचे बंदिस्त जीवन आता खुले होते. तो का बंद होता? तो कसा सुटला? आता पुढे तो काय करेल? हे सगळे अजून अनुत्तरित होते. परंतु ते नेहमीच अनुत्तरीत राहणार नव्हते. हळूहळू त्या सगळ्यांचे उत्तरे मिळणार होते. अगदी समर्पक उत्तरे! कोण कोणाला मारणार? कोण जिंकणार? कोण हरणार? शरणपूर वाचेल का? नायक खलनायकाचा पराभव करील का? या सगळ्यांच्या कोडे सुटणार होते. हळूहळू या सगळ्याचा इतिवृत्त समोर येणार होता.

पोस्टमन म्हणून राघवची पहिलीच नियुक्ती शरणपूरला झाली. पहिलीच नियुक्ती शरणपूरसारख्या पर्वती भागात असल्यामुळे त्याचा निरुत्साह झाला.पण पहिलीच नियुक्ती होती, त्यामुळे तिच्यात तडजोड करून चालणार नव्हते. आहे तिथे जावेच लागणार होते. शेवटी नोकरी महत्त्वाची होती. एका आठवड्यात त्याला तेथे हजर व्हावे लागणार होते. त्याने त्याची जायची तयारी सुरू केली. अगोदर शरणपूरची जुजबी माहिती करून घेण्याचा त्याने विचार केला. त्याने ऍटलस समोर ठेवला. मध्यप्रदेशातील विंध्य पर्वताच्या बाजूला शरणपूरचे स्थान होते. सगळा परिसर विंध्य पर्वताने वेढलेला होता.भरपूर पाऊस, नेहमी वातावरणात राहणारी आद्रता, आजूबाजूचा सगळा सदाहरित भाग, अचानक धो-धो कोसळणारा पाऊस या विविध घटकांनी शरणपूर नटलेले होते. शरणपूरच्या अगदी जवळच घनदाट अरण्य होते. त्याच्या अगदी वेशीपासून जंगलाचा परिसर सुरू होत असे. एकंदरीत शरणपूरचा सगळा सभोवताल निसर्गाच्या विविध रूपांनी नटलेला होता. राघव थोडा चिंतेत पडला. एवढ्या दूर अशा पर्वती भागात, आपण अनुकूल होऊ का? हा प्रश्न त्याला पडला. परंतु त्याला काही इलाज होता का? जावे तर लागणारच होते. पण रखरखत्या उन्हापेक्षा हा प्रदेश बरा. थोडे दिवस तेथील वातावरण आपल्याला प्रतिकूल वाटेल. परंतु हळूहळू शरीराला सवय झाली की, आपण तेथे नक्कीच अनुकूल होवू. असा सकारात्मक विचार त्याने केला. हळूहळू त्याची चिंता कमी झाली. आणि त्याने उत्साहाने शरणपूरकडे प्रस्थान करण्याची तयारी केली. पण काही गोष्टी आधी आनंदी वाटतात. त्याची गंभीरता, स्वतःच्या वाट्याला आल्याशिवाय कळणार नसते. त्यांची प्रत्यक्ष मुलाखत झाल्यावरच त्यांचे अस्तित्व कळते. पुढे घडणाऱ्या महानाट्याची त्याला कल्पनाच नव्हती.
ट्रेन त्या पर्वतीय भागातून धकधक करत जात होती. लांबचा पल्ला होता. महाराष्ट्राची सीमा कधीच मागे पडली होती. दिल्लीला सरळ जाणारी ती पॅसेंजर, शरणपूर स्टेशनवर अजून जवळपास तीनचार तासात पोहोचेल, असा अंदाज त्याने लावला. आजूबाजूचा सगळा परिसर हिरवाईने नटलेला होता. खिडकीतून दिसणारे ते विलोभनीय दृश्य पाहून, त्याला बरं वाटलं. एका गोष्टीचे मनातल्या मनात त्याने गणित केले. महाराष्ट्रातील सह्याद्री, महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील सातपुडा, आणि हा मध्यप्रदेशात असलेला विंध्य पर्वत. या तिन्ही पर्वताच्या सानिध्यातील वातावरणात काहीसे वेगळेपण होते. तिन्ही पर्वताच्या परिसरात काहीसा फरक होता. सह्याद्री तो सह्याद्री! त्याला कशाचीच तोड नाही. सह्याद्रीच्या कुशीत एक आपलेपणा आहे. एक मायेची उब आहे. त्याच्या अंगाखांद्यावरुन फिरताना एक पवित्र अनुभूती येते. त्याच्या उंच पहाडावर चढून, मोठा मोकळा श्वास घेतला की, शरीराला एक आत्मिक ऊर्जा मिळते. त्यावरील गडकोट, किल्ले, बुरुजे, गुंफा, लेण्या डोळे भरून पाहिल्यावर, डोळे तत्कालीन इतिहासाचे साक्षीदार होतात. तेथील थंडी, तो अंगाला झोंबणारा गार वारा अंगात नवे चैतन्य निर्माण करतो. जसे जसे उत्तरेकडील या पर्वताच्या भागात यावे,तशी तशी ती अनुभूती कमी होत जाते. आता विंध्यया पर्वताकडे पाहिल्यावर, एखाद्या अपरिचित व्यक्तिला पहात आहोत, असा भास होत होता, शेवटी आपल्याला हा सगळा परिसर अपरिचित असल्याने, असे वाटत असेल. असे स्वतःशीच म्हणत त्याने मनातील सगळे विचार झटकून टाकले. हळूहळू एकेक स्टेशन मागे पडत होते. वेळेचा काटा पुढे सरकत होता. शरणपूर जवळ येत होते. त्याच्या मनात उत्सुकता, जिज्ञासा,भीती, दुःख, आनंद या सगळ्या भावनांनी गर्दी केली. तो शरणपूर येण्याची वाट बघु लागला. त्याने मनगटावरच्या घडीकडे नजर टाकली. अजून तासभरात शरणपूर येईल, अशे स्वतःचीच म्हणत, त्याने डोळे मिटले.
गाडीचा मोठा भोंगा वाजला. गाडीचा वेग हळूहळू कमी होऊ लागला. तो डोळे चोळत उठला. खिडकीतून बाहेर नजर टाकली.स्टेशन आले होते. स्टेशनवरच्या पिवळ्या पाटीवर काळ्या ठळक अक्षरात 'शरणपूर' असे लिहिलेले होते. त्याने दोन्ही पिशव्या हातात घेतल्या. हळूहळू होत गाडी जाग्यावर थांबली. तो गाडीबाहेर उतरला. इकडे तिकडे पाहून पुढे चालू लागला. गाडी हळूहळू जाग्यावरुन हलली, आणि स्टेशन ओलांडून पुढे निघून गेली, स्टेशनवर आता केवळ तो आणि इतर निर्जीव वस्तूच उरल्या होत्या. सायंकाळचा सुमार असल्याने स्टेशन सामसूम होते. त्याने पिशव्या खांद्याला अडकवल्या. तसाच चालत स्टेशनच्या कार्यालयाकडे गेला. सगळे स्टेशन रिकामे दिसत होते. एखाद्या खितपत पडलेल्या वाड्यासारखा तो स्टेशनचा परिसर दिसत होता. बरेच पुढे गेल्यावर एका खोलीत स्टेशन मास्तरचे कार्यालय होते. ते बंद होते.तिथे कोणीच उपस्थित नव्हते. तो आता बुचकाळ्यात पडला. इथे तर सगळे सामसूम दिसत आहे. स्टेशनपासून शरणपूर किती दूर आहे हे कळायला काहीच मार्ग नव्हता. तो बुचकळ्यात पडला. स्टेशनवर एकही माणूस नसावा, याचे त्याला आश्चर्य वाटले. आता काय करावे? तो विचारमग्न झाला. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली. स्टेशनपासून दोन तीनशे मीटरवर दक्षिणेला, त्याला काही गुरे चालताना दिसले. आणि त्यांच्या पाठीमागे काठी हातात घेतलेला एक इसम दिसला. त्याला हायसं वाटलं. चला कोणाची तरी सोबत मिळाली याचा आनंद झाला.त्याने खांद्यावरच्या पिशव्या पुन्हा एकदा नीट सरळ केल्या. जरा वेगाने पावले उचलत तो त्याच्याकडे निघाला. सायंकाळ वर जात होती.हळूहळू अंधार दाटून येत होता. वातावरणात थंडी जाणवू लागली. पर्वती भाग असल्याने थंडीची तीव्रता जरा जास्तच होती. शरीरावर काटे उभे राहत होते. पाच-दहा मिनिटांच्या धावपळीने तो त्या गुरख्याजवळ पोहोचला.
"शरणपूरला कोणता रस्ता जातो?
" त्याने गुराख्याला विचारले.
" हे सगळे गुरे शरणपूरलाच जात आहेत. मीही शरणपुरचाच आहे. गुरे चारायला इकडे आलो होतो."
तो गुराखी त्याच्याकडे नवलाईने पाहत उत्तरला.
"चला! म्हणजे मला सोबत मिळाली."
स्वतःशीच असे पुटपुटत,तो त्या गुराख्याच्या पाठीमागे निघाला.
खाली रुळलेली पाऊलवाट होती. परंतु पाऊस सतत असल्याने, ती ओली झाली होती. त्यावर चिखल झालेला होता. चालताना त्रास होत होता.दोन पिशव्या खांद्यावर असल्याने, खाली त्या ओल्या जमिनीत पाय आतपर्यंत जात होता. आजूबाजूचा सगळा परिसर गवत, खुरटी झुडपे, डेरेदार वृक्ष, हिरवाई यांनी नटलेला होता. नेमकाच पाऊस उघडल्यामुळे, वातावरण आल्हाददायक झाले होते. गुराखी मजेत गाणे गुणगुणत, काठी फिरवत पुढे चालत होता.आम्ही शरणपूर मध्ये पोहोचलो.गाव तसा जुन्याच वळणाचा होता.सर्व बाजूंनी पहाडी प्रदेश, एका बाजूने पांढरी फेसाळ वाहणारी ,एक स्थानिक नदी आणि एका बाजूचे लांब पसरत गेलेले जंगल, या घटकांनी सगळा गाव मजेदार दिसत होता. गावात मध्यम स्वरूपाचे कौलारू घरे, वाडे, झोपड्या वसलेल्या होत्या. काही टोलेजंग वाडे उभे होते. मोठ्या शहरापासून गाव थोडा दूर असल्याने, पाहिजे तेवढ्या भौतिक सुविधा गावात दिसत नव्हत्या. रात्र झाली होती. गुराखी तसाच पुढे निघून गेला. गावातील पोस्ट ऑफिस कुठे आहे, हे त्याने लांबूनच दाखवले. हा पिशव्या खांद्यावर घेऊन पोस्ट ऑफिसच्या दिशेने चालू लागला. ऑफिसला फक्त कडीच लावलेली होती. त्याने ती कडी काढली. दोन खोल्यांचे ते ऑफिस, जुन्या पद्धतीचे होते. तो आत गेला. पिशव्या बाजूला ठेवल्या. आजची रात्र इथेच काढावी लागेल. रात्र झालेली आहे. गावात कोणाच्या घरी जातापण येणार नाही. जुन्या पोस्टमनचे घर पण आपल्याला माहित नाही. उद्या कुठेतरी खोली पाहू. जुन्या पोस्टमनकडून चार्ज घेतल्यावर, मग पुढची काहीतरी व्यवस्था करू. असा विचार करून त्याने, बॅगेतून जेवणाचा डबा,अंथरून पांघरून बाहेर काढले. जेवण केले. थोडी जागा स्वच्छ करून, तेथेच अंथरून टाकून तो झोपी गेला. दिवसभराच्या ट्रेनच्या प्रवासाने तो थकला होता. शरीर दमले होते. त्यामुळे त्याला अंथरुणात अंग टाकल्या टाकल्या झोप लागली.

दुसऱ्या दिवशीची सकाळ प्रसन्न करणारी होती. आजूबाजूचे वातावरण हिरवेगार झाले होते. शहरी गजबजाटासून गाव दूर असल्याने ,तिकडे असणारी भाऊगर्दी इथे अजिबात जाणवत नव्हती.सगळे कसे उत्तम आणि अल्हाददायक होते.
नऊच्या सुमारास जुना पोस्टमन ऑफिसमध्ये आला. जुना पोस्टमन दिलदार माणूस होता. केशव म्हात्रे त्याचे नाव. दोघांची जुजबी विचारपूस झाली. सगळे जुने रेकॉर्ड त्याने राघवच्या हवाली केले. सगळे सोपस्कार पार पडले.
" केशव, मला गावाची जरा माहिती सांग, म्हणजे एकंदरीत गाव कसा आहे समजेल. थोडी गावाविषयी कल्पना असलेली बरी."
राघव त्याच्या कडे पहात म्हणाला.
" गाव तसा चांगला आहे. जुन्या वळणाचा आहे. सगळी भोळीभाबडी, गरीब माणसे आहेत. काही वाईट प्रवृत्तीचीही आहेत. पण ते मोजकेच आहेत. परिस्थितीने साधारण आहेत सगळे. पंधरा वीस घरे सोडली तर सगळे शेती करणारे आहेत. गावात छोटे व्यापारी आहेत. दुकानदार आहेत. लोहार,सुतार, न्हावी, सोनार ,वाणी अशा वेगवेगळ्या जातीत माणसे विखुरलेली आहेत. गावात काही सावकारांचे घरे आहेत. त्यातील रमण सावकार ही मोठी असामी. मोठा मग्रूर माणूस. काम काढून घेण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सगळ्या मार्गांचा वापर करणारा. त्याच्यासारखीच, त्याच वळणाची पुन्हा दहा पंधरा लोक गावात आहेत. राधेश्याम मारवाडी, लाकडांचा व्यापार करणारा अंबर खोत, डॉक्टर शिवराज शर्मा, आश्रमातील मोठे महाराज महंत गोपालदास, अजून बरेच आहेत. यांच्यापासून जेवढे दूर राहता येईल तेवढे दूर राहा. सगळा गाव यांना दबून असतो. एकंदरीत मध्यम स्वरूपाचा गाव आहे.जरा शहरापासून लांब असल्याने, थोडा अडगळीत असल्यासारखा जाणवतो. थोडे भौतिक साधनेही कमी आहेत. थोडा जंगलाचा जास्त भाग असल्याचा तो परिणाम आहे. रस्ताही कच्चा आहे. दिवसातून एक बस गावात येते. तीच काय ती शरणपूरला, बाहेरच्या गावांशी जोडणारा दुवा."
केशव पोस्टमन सगळ्या गावाचे वर्णन सांगत होता. "राहण्याची व्यवस्था कुठे होईल? किंवा मग आपले सरकारी राहण्याचे ठिकाण असेल ना?"
राघवने त्याला पुन्हा प्रश्न केला.
"गावात काही ठिकाणी खोल्या मिळतील भाड्याने."
केशव जरा चाचपडत म्हणाला.
राघव विचारलेल्या, सरकारी राहण्याच्या ठिकाणाच्या प्रश्नाचे, उत्तर त्याने देण्याचे त्याने टाळले होते. हे राघवच्या लक्षात आले. त्याला नवल वाटल. राघव बुचकळ्यात पडला. आणि थोड्या वेळाने त्याने पुन्हा तोच प्रश्न केला.
"राहण्यासाठी काही सरकारी व्यवस्था असेल ना? एखादे घर, इमारत, बंगला काहीतरी असायला हवे. आपण सरकारी नोकर आहोत."
राघवच्या त्या प्रश्नाने तो गोंधळात पडल्यासारखा वाटला. कदाचित त्याला त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे जीवावर आले असावे.
" व्यवस्था आहे.गावाच्या बाहेर, थोड्या अंतरावर एक डाकबंगला आहे. पोस्टमास्तर आणि पोस्टमन यांना राहण्यासाठी तो बांधलेला आहे. इंग्रजांच्या काळात तो बांधला होता. पण खूप वर्षांपासून तेथे कोणी राहत नाही. आपले पोस्टमास्तरही इथे राहत नाहीत. ते शहरात राहतात. इथले सगळे काम पोस्टमन म्हणून मीच करत होतो. पण मीही त्या डाक बंगल्यात कधी राहिलो नाही."
तो चेहरा लपवत राघवला म्हणाला.
" एवढा मोठा डाकबंगला राहण्यासाठी असताना, तिथे कोणी राहत का नाही?"
राघवणे भाबडेपणाने त्याला प्रश्न केला.
केशवच्या नजरेत जरा भय दाटून आले.
तो आता निर्वाणीच्या स्वरात, राघवच्या डोळ्यात बघून त्याला म्हणाला,
" राघव, हे बघ! अनेक वर्षांपासून त्या बंगल्यात कोणीच राहत नाही. तो का बंद आहे? तेथे कोणी का राहत नाही? या प्रश्नांची उत्तरे मला माहीत नाहीत. पण तेथे कोणीही राहत नाही, म्हणजे नक्कीच तो डाकबंगला राहण्याच्या लायकीचा नसेल. काही प्रमाद हे समाजाच्या भल्यासाठी तयार केलेले असतात.ते मुद्दाम बनवलेले असतात. ते कोणी डावलत नाहीत. मग त्यांना डावलण्याची चूक आपण का करावी? गावात कोठेतरी खोली बघ आणि तेथे रहा"
केशवच्या या विवादावर राघवच्या मनात संभ्रम निर्माण झाला. पण डाकबंगल्याबद्दल मात्र त्याच्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली. एवढा मोठा बंगला असताना, एखाद्या अडगळीच्या खोलीत का राहावे? त्याच बंगल्यात मस्तपैकी ऐसपैस राहावे, हा विचार त्याच्या मनात येऊन गेला.
पोस्टमनचा अधिकृत चार्ज राघवणे घेतला. गाव दाखविण्यासाठी केशव राघवला घेऊन गावात फेरफटका मारायला निघाला.गावात मध्यभागी एक महादेवाचे मंदिर होते.केशवच मंदिराजवळ थांबला. मंदिराजवळ गावातील बरेच लोक आरामशीर बसलेले होते. लहान मुले, तरुण, म्हातारे सगळे माणसे मंदिराच्या आसपास होते. केशवने सगळ्यांसोबत राघवची ओळख करून दिली.
" हा आपल्या गावातील नवीन पोस्टमन. राघव देशमुख. नवीन नियुक्ती होऊन गावात आला आहे. माझी बदली आता दुसरीकडे झाली असल्याने, आता आपल्या गावातील पोस्टाचा कारभार हाच पाहील. सगळ्या गावकऱ्यांनी राघवशी ओळख करून घेतली. थोड्याफार प्रमाणात गावाचा परिसर त्याने समजून घेतला. हळूहळू गाव परिचयाचा करायचा होता.गाव समजून घ्यायचा होता. आता इथून पुढे कितीतरी वर्षे याच गावात काढायचे होते.
तो दिवस असा धावपळीत सरला. पुन्हा अंधार दाटून आला. आजपण त्याला पोस्ट ऑफिसमध्येच झोपावे लागनार होते. दिवसभराच्या सगळ्या कामात कुठे राहायचे? हा विचार मागे पडला होता. रात्री अंथरूणात पाठ टेकल्यावर, त्याने तो निर्णय घेतला. राहण्याचे ठिकाण राघवणे पक्के केले. तो त्या बंगल्यात राहणार होता. हो त्याच बंगल्यात! डाकबंगल्यात!! कितीतरी वर्षांपासून तो बंद होता. आता तो त्याला खोलनार होता. त्याला नीटनेटका करून, तिथे तो वास्तव्य करणार होता.
त्याला माहित होते गावातील लोक विरोध करतील. पण त्यांचे ऐकणार कोण? शेवटी काहीही झाले तरी, तो सरकारी बंगला होता.तिथे त्याचेच चालणार होते.
दुसऱ्या दिवशी राघवणे केशवला,आपण त्या बंगल्यात राहणार आहोत, हे सांगितले.त्याच्या या निर्णयाने केशव तर अवाकच झाला. त्याने त्याला खुप समजुन सांगितले, पण राघवने काहीच ऎकले नाही.तो आपल्याला निर्णयावर ठाम राहील.केशवचा नाइलाज झाला.
दोन मजूर घेऊन राघव डागबंगल्याकडे निघाला. आज बंगला काहीही होऊन साफ करावा लागणार होता. मजूर डागबंगल्याचे नाव काढताच नकारार्थी मान हलवु लागले.
" साहेब, त्या बंगल्याकडे आम्ही येणार नाही.आम्हीच काय! पण गावातील कोणताच मजूर तिकडे येणार नाही. आणि हुशार असाल तर, तुम्हीही तिकडे राहायला जाऊ नका. तो बंगला चांगला नाही. चांगला असता तर कोणीतरी आधी तिथे वास्तव्यास नसते का? गावातील माणसेही तिकडे फिरकत नाहीत. मग तुम्ही तरी कशाला तिथे राहण्याचा हट्ट करत आहात."
ते असेच काहीतरी सांगत होते. तिथे गावातील काही माणसे आले. तेही राघवला हेच सांगू लागले. गावातील प्रौढ फकीर, रहीम चाचा त्याला हात जोडून सांगू लागले,
" पोस्टमन साहेब, कशाला विषाची परीक्षा घेत आहात.मला सत्तर वर्षे झालेत. या सत्तर वर्षात कोणीही त्या बंगल्यात राहायला गेले नाही. एवढेच काय, तर बंगल्याच्या आसपासही कोणी फिरायला जात नाही. गेल्या दोन दशकांत तिथे तिथे काहीतरी विचित्र प्रकट झालेले आहे. आता तिकडे जायला कोणाची हिम्मत होत नाही.आणि तुम्हीच का तिकडे राहण्याचा हट्ट करत आहात? काही गोष्टी थोरामोठ्यांच्या ऐकायच्या असतात. देवावर विश्वास आहे ना तुमचा? मग देवाच्या विरोधी शक्तीवरही विश्वास असणारच. अशीच कुठलीतरी, देवाच्या विरोधी शक्ती तिथे वास करत आहे. तिला तशीच बंदिस्त राहू द्या! त्यातच सगळ्यांचे भले आहे. तो निवास माणसाचा नाही. तिथे फक्त तोच राहू शकतो. हो तोच. दंडक! गेले दोन दशक तो तेथे झोपला आहे. अगदी बिणघोर! मानवी योनीच्या बाहेर असणारा राक्षस! दंडक!! तुम्ही स्वतः संकटात सापडाल, आणि सोबतच सगळ्या गावाला संकटात टाकाल. ऐका माझं. गावात एखादी चांगली खोली पाहून तिथे रहा. असेच फिरा माघारी!"
त्यांचे ते सगळे संभाषण ऐकून राघव हसायला लागला. जग वेगाने पुढे जात आहे. आणि हे भुताखेतांच्या गोष्टी करत आहेत. त्याने ते सगळे उडवून लावले. सरकारी जागेत राहण्याचा सरकारी माणसाला अधिकार आहे. त्यात कोणी हस्तक्षेप केला तर, त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. असा सज्जड दम त्याने त्यांना दिला. मी तिथेच राहणार, असे त्याने सगळ्यांना निष्ठून सांगितल्यावर, गावकऱ्यांचा नाईलाज झाला. ते माघारी फिरले. गावातील त्या दोन मजुरांना दुप्पट मजुरी देण्याचे आश्वासन दिल्यावर ते बंगल्यातील साफसफाई करायला तयार झाले. पण एकाच अटीवर, सायंकाळ होण्याच्या अगोदर ते, त्या बंगल्यातून जाणार. त्या बंगल्याच्या आवारात सूर्यास्तानंतर क्षभरही ते थांबणार नाहीत.

(क्रमशः)
अभिप्राय नक्की सांगा.
वैभव नामदेव देशमुख.