भाग अकरावा.
बकुळाचा मृतदेह पाहून विश्वासला त्याच्या डोळ्यांवरती भरवसाच बसत नव्हता. अस वाटू लागल होत कि हे स्वप्न असाव आणि आत्ताच जाग यावी. परंतु जे पाहिलं ते वास्तव होत सत्य होत आणि न नाकारण्यासारख विश्वासच्या मनात सलग एकापाठोपाठ एक प्रश्न येऊ लागले... “आता हे संध्याला कसे सांगणार ? तिला काय वाटेल ? आधीच तिची अशी अवस्था इथे येऊन तिला थोड बर हि वाटल होत पण अचानक हे विश्वासलादेखील जोरदार धक्का बसला होता. बकुळाच्या मागेपुढेहि कुणी नव्हत...विश्वासच्या घरीच काम करून तिने दिवस काढले होते. अनुशी तिचा लगाव होता...विश्वासने ठरवले कि संध्याला या बाबतीत काही एक कळू द्यायचं नाही... “सखामामा...हे प्रेत काढून याचा अंतिमसंस्कार करायला हवाय...” विश्वास सदृढ सुसज्ज आणि समंजस होता परिस्थितीला कसे हाताळायचे हे त्याला चांगलेच ठाऊक होते म्हणून तिथे त्याने एक योजना आखली...सखाराम मामाला विश्वासने झाडावरील ते प्रेत खाली आणावंयास सांगितले... पण सखाराम ते पाहून अगदी स्तब्ध पुतळा बनून त्या प्रेताकडे पाहत उभा राहिला होता.विश्वासने सखारामच्या खांद्यावर हात ठेवत त्याला हलवून त्याच भान जागेवर आणल....“ जस....तुम्ही म्हणता जावइं बापू...” एवढ बोलून सखाराम ने सोबत आणलेल्या दोघांना झाडावर चढून ते प्रेत खाली घ्यायला सांगितले पण...विश्वासने मागे वळून पाहिले तर त्या चौघांचेहि पाय पुढे यायला डगमगत होते त्यांच्याहि चेहऱ्यावर एक भीतीच सावट पसरल होत. का नाही पसरणार ? मृत्यूचा देखावा डोळ्यांनी पाहत होते ते मरण किती भयंकर असू शकत आणि ते मरण देणारा ‘तो’देखील. विश्वास त्यांना पुढे या पुढे या म्हणत ओरडत होता पण कुणीच त्यांच्यापैकी पुढे येईना... “नाय नाय...आव साहेब...त्याची शिकार हाय ती..तुम्ही त्याच्याच इलाक्यात येऊन त्याच्या शिकारीला हात लावायला बघताय..आमच्यापैकी कुणीबी हात लावला तर...त्यो...नाय नाय आम्ही हात लावणार नाय....” ते लोक साफ नकार देऊ लागले तसे विश्वासने एकाच्या कंबरेला कुऱ्हाड लटकताना पाहिली... “ तुम्हाला अडचण फक्त त्या प्रेताला हात लावल्यावरच होईल न ?” विश्वासने त्यांना एकदा विचारणी केली... “होय साहेब” त्यांच्यापैकी एकजण म्हणाला.. “अडचण त्या प्रेताला स्पर्श केल्यावर होईल...पण त्या फांदीला स्पर्श केल्यावर नाही होणार...” विश्वास उद्गारला अगदी समंजस आणि हुशार विचारशक्ती होती त्याची. तिथे उभ्या सर्वांनी एकमेकांकडे पाहिले. जखोबा आणि सखामामा मात्र विश्वासच्या निर्णयास थक्कच झाले. “ झाडावर चढून तुम्ही फक्त ती फांदी कुऱ्हाडीने घाव घालून खाली पाडा...बाकीच नंतर बघू... “ विश्वासराव...पोरीला कळवायच का हे ?” सखाने विश्वासकडे पाहत विचारले... “ नाही नाही....संध्याला या बाबतीत कानोकान खबर होता कामा नये...मी तिला....सांगेन तिला काहीतरी..पण आत्ताच हे सांगणे योग्य नाहीये...”
“विश्वासराव तुम्ही याची काळजी करू नका...तुम्ही तिकड बाईसाहेब कड जा...आम्ही हे गावच्या स्मशानात नेऊन याचा अंतिमसंस्कार करतो आणि....विश्वासरावsss...बाजूला सरकाsss...” असे ओरडतच जखोबाने विश्वासला हाताला धरून मागे ओढून घेतले. विश्वासजसा मागे झाला तसे धाडकन त्याच्या पुढ्यात अगदी पायाजवळच त्या झाडाची फांदी आणि त्यावर लटकत असलेल बकुळाच प्रेत येऊन पडल...विश्वास हादरलाच होता. ऐनवेळी जखोबाने त्याला मागे ओढून घेतले नाहीतर ती जाडजाड फांदी तुटून थेट विश्वासच्या माथ्यावर आदळणार होती... “मी ठीके...” विश्वास जखोबापासून आपला हात सोडवत म्हणाला... “ आर ये सुतकाळच्या....खाली बघता आल नाय व्ह्य र तुला ?” जखोबा त्या वरच्या माणसाला पाहून ओरडला... “ नाय मालक चुकी झाली माफी करा...हातातून निसटली साल अन ते खाली आल...” बकुळाच पूर्ण प्रेत पाहूनतर विश्वासने आपली नजर गच्च बंद करून फिरवली... “ तुम्ही जा...पोरीकडे विश्वासराव...मी जखोबा संग जातो....व्हा तुम्ही आम्ही हे मार्गी लावून येतो...” विश्वास निघालाच होता कि जखोबा त्याला म्हणाला... “ विश्वासराव आजच्या रात्रीला सरपंचाच्या घरापलिकड देवाच्या मंदिरात गाऱ्हान हाय...बाईसाहेब अन अनु ला घेऊन तुम्ही बी या मनाला शांती भेटल..सखा आता आमच्याच संग येईल...”
“ ठीक आहे आम्ही येऊ....”विश्वासच्या मनात नव्हत परंतु संध्या आणि अनु दोघींना या पासून तिला दूर ठेवायचं होत त्यासाठी तो तयार झाला...जंगलातूनच आलेल्या वाटेने विश्वास बाहेर निघाला...संध्याने दुरूनच पाहिले कि विश्वास त्या विहिरीच्या पलीकडे येऊन उभा होता व आपले अंग झटकत होता. संध्याने खाली अनुला दाखवले कि “ते बघ बाळा...पप्पा आले..” विश्वासने विहिरीच्या पलीकडेच उभे राहुंन संध्याला हात दाखवला...संध्या त्याला पाहतच होती कि तिने पाहिलं कि विश्वासच्या पाठीमागे अगदीच पाठी मागे खालून काहीतरी वरती येत उभ राहील होत. संध्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले ती थोड पुढे आली आणि तिने विश्वासला इशारा केला कि “ विश्वास...तुझ्या मागे...तुझ्या मागे काहीतरी आहे विश्वास...”संध्या पुढे काही बोलणार तेवढ्यात विश्वासच्या मागे उभ्या जो कोणी होता त्याने विश्वासला जोरात धक्का दिला विहिरीच्या कडा अगदी गुडघ्याच्या खाली होत्या संध्या विश्वासच्या दिशेनी निघाली होतीच कि तिच्या डोळ्याच्या समोर विश्वास त्या कोष्टीनी भरलेल्या कोरड्या विहिरीत कोसळला... संध्याने पाहिले कि विश्वासला धक्का देताच क्षणी एक काळभोर आकृती अगदी धुराच वलय होऊन तिथून नाहीशी झाली... “ विश्वाsssसsss..!” संध्या जागीच उभी... किंचाळली...अन तितक्यात इकडे झुडुपातून काहीतरी हालचाल झाली आणि कोणीतरी बाहेर पडल...त्याला पाहून मात्र संध्या थक्कच झाली कारण काही मोजक्याच क्षणांपूर्वी तिने विश्वासला आपल्या डोळ्यांनी त्या विहिरीत पडताना पाहिलं होत आणि आता तो तिच्या समोर येऊन उभा होता.... “संध्या? ए संध्या ? अग काय झाल असे किंचाळलीस का ?” संध्याचे ओठ थरथरत होते. ती विश्वासला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतच होती पण तिचे ओठ उघडत नव्हते. तिला शब्द फुटत नव्हते... “ संध्या ? काय झाले ?” तसे संध्या बोलू लागली.. “ आधी तू इथून चल..इथे थांबू नकोस...या विहिरीजवळ चल..इथून लवकर...” संध्या थरथरत बोलत होती तिच्या शब्दांना कंप सुटला होता. तिने भीती पोटी सर्वप्रथम आधी विश्वासला त्या भयानक जीवघेण्या विहिरीपासून दूर आणले...तशी छोटी अनु आपल्या पप्पाला येऊन बिलगली.... आणि इवलुशी अनु स्वतः आपल्या बाबाना बिलगून म्हणाली... “पप्पा....तू .....त्या राउंड राउंड मध्ये पडला आणि मम्मा तुला पाहून ओरलडली...” अनुचे शब्द ऐकत विश्वासने संध्याचा पांढरा पडलेला चेहरा पाहिला... “ काय झाले संध्या ? तू...तू आधी बस इथे आणि मग सांग...” विश्वासने अनु आणि संध्या दोघींना वाड्याच्या पायरीवरती बसवले आणि स्वतः तिच्या समोर बसला... “विश्वास...मी पाहिलं कि...तू त्या झुडुपातून बाहेर आला आणि त्या विहिरीजवळ उभा राहिला..तेव्हा...तेव्हा..”
“ तेव्हा काय संध्या ?” “तेव्हा..कुणीतरी मागून येऊन तुला धक्का दिला...आणि तू त्या विहिरीत कोसळलास...आणि तिथे काहीतरी उभ होत..” संध्याने त्या विहिरीच्या दिशेने बोट दाखवत सांगितले... “ तिथे ? तिथे तर कोणीच दिसत नाहीये...आणि संध्या मी तर तुझ्यासमोर आहे न..मला बघ मला काही झालय का ? मी इथेच आहे तुझ्यासमोर...” विश्वास विचारात पडला... “संध्याला आधी तर स्वप्न पडायचे आणि आता असे भास हि व्हायला लागले...पण अनुला कस काय दिसू शकत अनुला तर भास नाही झाला मग याचा अर्थ संध्या खर तर बोलत नाहीये..”
“तू इथे आहेस विश्वास.... तर मी..... मघाशी कुणाला पाहिलं...? काय होत ते ?”संध्याचे डोळे एका अनामिक भयभीत करून टाकणाऱ्या विचाराने विस्फारून गेले. पण सुख हे होते कि विश्वास जिवंत तिच्याजवळ होता. “तो माणूस कुठे गेला ?इथे उभा होता तो ?”
“ तो तर...इथेच होता थोड्या वेळा पूर्वी..मला म्हणाला कि तो बकुळाला इकडे गावच्या रस्त्यावर शोधून येतो..आणि त्या नंतर तो काही...परत आलाच नाही...इथे उभ राहून तो वाड्याला आणि त्या...त्या विहिरीकड तो सारख सारख पाहत होता.” संध्या म्हणाली...विश्वासने त्या विहिरीवरती एक नजर फिरवली... “बकुळा मावशी अजून भेटल्या नाहीत पण...सखामामा आणि जखोबा दोघे तिच्या शोधात गेले आहेत लवकरच काही न काही बातमी मिळेल...आणि आता इकडे तिकडे लक्ष नकोस देऊ...आज संध्याकाळी जखोबाने देवळात बोलवलय म्हणे कसले गाऱ्हाणे ठेवले आहे त्यांनी. देवळात जाऊन तुला जरा शांत वाटेल... “ हो न अनु ? देवबाप्पा बघायला येणार न ?”
“हो पप्पा...” असे म्हणत अनुने विश्वासच्या मिठीत झेप झेप घेतली... “ चल आतमध्ये संध्या...” विश्वासने अनु आणि संध्या दोघींना वाड्यात आतमध्ये नेले... “ विश्वास मी खरच तुला तिथे पाहिलं त्या विहिरीमध्ये कोसळताना...तुला खर का वाटत नाहीये...आणि मघाशी तू तू माझ्या सोबत त्या वेड्याच बरळन ऐकलस ना ? कि तो काय म्हणाला ते..?”
“ हो...हो संध्या हो शांत हो तू जरा..ऐकलय मी त्याच हि...”
विश्वास मनातल्या मनातच विचार करू लागला... “तो जो कोणी होता त्याच मला सर्व खर होताना दिसतय...त्या वेड्याच त्या विहिरी बद्दल बोलन बकुळाच तिथेच त्याच विहिरीजवळ प्रेत सापडणे..संध्याला हि आता तसेच काहीसे झाले तो आभास होता कि सत्य...एवढीशी अनु तिच्या नजरेच ती का खोट सांगेल...कुणी केल असेल हे ? बकुळाची अशी अवस्था..देवा विज्ञानाच्या या जगात मी आजवर नजरेच्या समोर उपस्थित हवा, द्रव आणि स्थिर यांनाच सत्य मानत आलोय...माझ्या मनाचा कौल जणू त्याहून पलीकडे झुकला जातोय...कुठे न कुठेतरी साखळी जुळेलच...”
“ जखोबा...! काय वाटत तुला ? कुणी केल असेल हे ?” सखाराम आणि जखोबा बकुळाच प्रेत घेऊन स्मशानाच्या दिशेने चालले होते. “ सखाभाऊ...सर्वात मोठी चूक केलीत तुम्ही सावित्रीच्या आतम्याच्या मुक्तीसाठी तुम्ही तिच्याच मुलीला यात ओढून घेतलस..कोण वाचवल पोरीला त्या...अजून किती बळी जातील...सखा लवकरात लवकर पोरीला खर काय ते सांगून टाक...धोका इथेच नाहीये हा सगळ्या जन्माला पुजलेला हाय तिच्या...तीन जिथ जाईल ते नाहीतर त्याचा अंश नक्कीच तिच्या मागावर जाईल...
“ मालक...जरा बिगी बिगीन चालायचं का ?” मागून चौघापैकी एक माणूस जखोबाला पाहत म्हणाला... “काय र ...? काय झाल ?” सखा म्हणाला... “ मालक संध्याकाळ होत आलीय...अन आज अमावास्या हाय मालक....” अमावस्याच नाव काढताच जखोबा अन सखाराम दोघ हि हादरून गेले.. “जखोबा...आजची रात्र त्याचीच हाय...आज रात्रीच्याला वाड्यात राहण म्हणजी...म्हणजी.... मरणाला आमंत्रण दिल्यासारख हाय...आज रात्रीच्याला नक्कीच काहीतरी त्याचा अघोरडाव साधणार हाय त्यो...कुणाचा तरी बळी जाणार काय तरी हालचाल होईल आज रात्री..”
“....घाई करा सखाभाऊ....आताच्या आत्ता निघा नाहीतर घोर अनर्थ होईल...आजची रात्र तो बळीच्या शोधात बाहेर पडेल...घाई करा...विश्वासराव अन दोघी संकटात आहेत....निघा निघा...लवकर...” जखोबा म्हणाला पण
रातकिड्यांची किरर्र किर्र हळू हळू व्हायला सरुवात झाली होती. विश्वास आणि संध्या दोघेहि वऱ्हांड्यात अनुला खेळताना पाहत बसले होते “ चला निघायला हवय आपण सरपंचाच्या वाड्यावर जाउयात आधी...तिथून देवळात... तोच संध्या अचानक दरवाजात पाहून ओरडली...
" विश्वास.... त्या पहा..! बकुळा मावशी आल्या "
" या ना बकुळा मावशी ....आतमध्ये या...."
संध्याचे शब्द ऐकूनमात्र विश्वासाच्या मानेवरन एक थंडगार बर्फ़ाची धार खाली पाठीकडे वाहत गेली..."
MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,
PART-1 , PART-2, PART-3 ,PART-4 , PART-5 , PART-6 , PART- 7, PART-8 ,PART-9
PART-10 ,PART-11 ,PART-12 ,PART-13,PART14,PART-15,PART-16, PART-17,END OF THE STORY -AGHOR-BHUTACHI GOSHT PART-18