ब्लडी मेरी-भाग 1
मी, माझी लाडकी बायको व माझी क्युटशी मुलगी ... असे आमचे छोटेशे कुटुंब.. मुंबईसारख्या शहरात स्वतःचे घर आणि एका चांगल्या कंपनीत जाॕब.. एवढं असल्यावर मला आणखी काही नको होतं.. लाईफ एकदम मजेत जात होती..
एवढ सर्व असल्यावरही कुठेतरी मनात काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं.. माझी नजर नेहमीच काहीतरी शोधण्याच्या प्रयत्नात असायची.. आयुष्यात कशाची तरी कमी असल्यासारखी फिल यायची.. पण नेमकं काय हरवलं होत? मला कशाची उणीव भासायची? मला समाधान का लाभत नव्हतं? ह्या विचारांनी मी अस्वस्थ राहायला लागलो होतो..
त्या रात्री मी एकटाच घरी होतो.. बायको मुलीला घेऊन माहेरी गेली होती.. रात्रीचे अकरा वाजले होते.. डिनर आटोपुन मी आपल्या घरच्या गैलरीत बसुन मोबाईलवर एफ एम वर जुन्या गाण्यांचा आनंद घेत होतो.. "खोया खोया चाँद.. खुला आँसमा..." हळुवार वाहणारा वारा मनाला गारवा देत होता. घरी माझ्या व्यतिरिक्त कुणीच नसल्याने घरात मन लागत नव्हते.. काही क्षणानंतर मोबाईलवरील एफ.एम. बंद करुन मी उठुन आत आलो.. मोबाईलला व्हायब्रेट मोडवर करीन तो बेड बाजुलाच असलेल्या ड्रेसिंग टेबलवर ठेवला आणि बेडवर अंग टाकुन झोपण्याचा प्रयत्न करु लागलो.. पण झोपेचा दुर दुर पर्यंत पता नव्हता.. शेवटी उठुन बसलो.. बसल्याबसल्याच ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला मोबाईल उचलुन वेळ बघितली.. 12.30 वाजले होते.. झोप लागत नसल्याने काय करावं आणि काय नको हे कळत नव्हते.. अचानक मला माझ्या अॉफिस बैगमध्ये असलेल्या पुस्तकाची आठवण झाली.. मी ताडकन बेडवरुन उठलो आणि बैगमधील एक पुस्तक बाहेर काढले.. "अर्बन लिजेंड-ब्लडी मैरी" शिर्षक असलेले हे पुस्तक युरोपातील सत्यघटनेवर आधारीत भयकथेचे असल्याबाबत अॉफिसमधील मित्राने सांगितले होते.. मी पुस्तक हाती घेत टाइमपास म्हणुन वाचायला सुरुवात केली...
भुतांखेतांवर विश्वास नसल्यामुळे असल्या कथा कहान्या मला थोड्या हास्यास्पद वाटायच्या.. त्यात मित्राचे हे पुस्तक आज चूकुन माझ्यासोबत आल्याने केवळ झोप यावी याकरीता टाऐमपास म्हणुन मी वाचत होतो.. कथेतील मेरी एक अशी शापित आत्मा होती, जी तिला बोलविणा-या व्यक्तीला हाल हाल करुन मारायची.. तिला बोलविण्याचीही पद्धत सोपी.. पहाटे 3 वाजता घरातील सर्व लाईट बंद करुन मेणबत्तीच्या प्रकाशात तीनदा टाळ्या वाजवुन
Bloody Mary
Bloody Mary
Bloody Mary
Bloody Mary
Bloody Mary
म्हटलं की, रक्ताने माखलेला आपला चेहरा घेऊन ती आपल्या समोर येते व नंतर आपल्याला तीच्यासह तिच्या पिशाच्च दुनियेत घेऊन जाते.. हे सर्व वाचुन खरंच मला हसु आले.. मी बेडवरुन उठत पुस्तक बाजुला ठेवले आणि किचनरुम मध्ये पाणी प्यायला गेलो.. किचनरुम मध्ये अंधार होता.. मी अंधारातच माग काढत आत गेलो.. फ्रिजजवळ जाऊन फ्रिजचे दार उघडले.. गार पाण्याची बॉटल काढली आणि दार बंद करुन आपल्या जागेवर यायला निघालो.. तितक्यात मला काहीतरी पडण्याचा आवाज आला.. एका क्षणासाठी वाटलं.. ब्लडी मेरी आली की काय? छे असलं काही नसेल.. आणि असलं तरी मी तिच्या स्वागतासाठी तयार होतोच... मी धावतच आवाजाच्या दिशेने गेलो.. आवाज आलेल्या ठिकाणी गेल्यावर लक्षात आले की, आंथरुणात शिरण्यापुर्वी ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला मोबाईल जमीनीवर पडलेला होता.. मी जवळ जाऊन मोबाईल हाती उचलला.. थैँक गॉड मोबाईल शाबुत होता.. मोबाईलवर कुणाचा तरी मिस्ड कॉल होता.. मी पाणी आणायला किचन रुममध्ये गेलो असताना कॉल आला असेल आणि मोबाईल व्हायब्रेटवर असल्याने तो व्हायब्रेट होऊन खाली पडला असावा, असा मनाशी अंदाज लावत मी मोबाईल मध्ये वेळ बघितली... सकाळचे 3 वाजणार होते.. मी मोबाईल ड्रेसिंग टेबलवर ठेवला.. तितक्यात मला ड्रेसींग टेबलवर ठेवलेली नवरत्न तेलची बॉटल दिसली.. डोक्याला तेल लावुन आपण थोडं डोकं थंड करुया.. निदान आपल्याला शांत झोप तरी लागेल.. हा विचार करत मी नवरत्न तेलाची बॉटल घेतली आणि त्यातील थोडं तेल हातावर घेतले आणि आरशासमोर उभा राहुन तेल लावायला लागलो.. तेल लावतांना अचानकच मला एक विचार आला.. मी तेलाच्या बॉटलला झाकन लावले आणि तसाच किचनरुममध्ये गेलो..
काही वेळातच किचनरुमधुन एक मेणबत्ती आणि माचिस आणत मी ड्रेसिंग टेबल समोर उभा होतो.. मी लगेच घरातील सर्व लाईट्स अॉफ केलीत.. आणि मेणबत्ती पेटवुन तो ड्रेसींग टेबलवर ठेवली.. आता आरशासमोर उभा राहत स्वतःच्या चेहऱ्याला गंभीर होऊन बघायला लागलो..
अख्ख्या बंगला काळोखाने न्हाऊन निघाला होता.. आणि मी अंधाऱ्या रात्री सकाळच्या तीन वाजता मेणबत्तीच्या प्रकाशात आरशासमोर उभा राहुन *ब्लडी मेरी* ला बोलविणार होतो..
"BLOODY MARY
BLOODY MARY
BLOODY MARY"
BLOODY MARY
BLOODY MARY"
असे शब्द मी तिनदा पुटपुटलो... अचानक एक थंड हवेची झुळुक आली.. आणि मेणबत्ती विझली.. कुणी तरी फुंकर घालुन ती मेणबत्ती विझवली की काय अशी शंका यायला लागली... सगळीकडे लख्ख काळोख पसरला होता.. वातावरणात वेगळीच गंध यायला लागली.. मी अंधारातच माचिस शोधायला लागलो.. अचानक डुअरबेल वाजली.. "टिंग टाँग टिंग टाँग"
एकीकडे अंधारात मी माचिस शोधत होतो आणि दुसरीकडे रात्रीच्या शांत वातावरणात डुअरबेलचा येणारा आवाज असह्य वाटत होता.. तितक्यात मोबाईल हाती लागला.. मी मोबाईलचा टॉर्च सुरु केला आणि दरवाज्याकडे वळलो.. अचानक त्या अंधारात मला जाणवलं की आरशाच्या आतुन एक काळी आकृती उभी राहुन मला बघत आहे.. मी मोबाईलचा टॉर्च आरशावर पाडला.. प्रकाशात बघितलं तर कुणीही नव्हते.. मला भास झाला असेल, असे मनातच पुटपुटत मी भिंतीजवळ जाऊन भिंतीवर असलेले लाईटाचे स्विच दाबले.. आता सगळीकडे प्रकाश झाला होता.. डुअरबेल अजुनही वाजत होती.. इतक्या रात्री कोण बोंबलायला आले.. असं मनाशीच बडबडत मी लगबगीने दार उघडले..
समोर "ती" उभी होती....
Next लवकरच...