गेस्टहाऊस,,,!
अजून खूपच प्रवास बाकी होता,,,,,,घरून सकाळी दहा वाजता निघालो होतो,,,, मात्र गाडीची तक्रार झाल्याने मला पोहचायला उशीर होणार होता,,,,,,! खूपच दिवसांनी कंपनीतून सुट्टी मिळाली होती म्हणून लहान धाकट्या बहिणीला भेटायला जायचे ठरवले होते,,,,,,,! पूर्वी ती आणि तिचे सासरचे लोक माझ्या जवळपास राहत असे,मात्र तिचा पती सैन्यात असल्याने खूप दूर त्याची बदली झाली होती,,,,आणि सर्व परिवार घेऊन तो तिकडे स्थायिक झाला होता,,,,,!
आज मी तिच्याकडेच निघालो होतो,,,,चांगली पंधरा दिवस सुट्टी मिळाली होती,,,,,,मी खुश होतो!
आई बाबा आम्ही लहान असताना गेले,,,,बहिणीला तर कळत सुद्धा नव्हते,,,तिच्या आई वडिलांची जबाबदारी मीच पार पाडली,,,,, तिचे लग्न लावले,ह्या सर्वात मला माझ्या काकांची खूपच साथ मिळाली.सर्व गोष्टी ठीक होत्या!
बहिणीला न कळवता मी निघालो होतो,,,,,!
गाडी वेगात होती,,,,मात्र रात्र खूपच झाली होती,,,आणि माझा डोळा ही लागत होता,,,,आजूबाजूला एकही ढाबा किंवा रात्र काढण्यासाठी मला निवारा दिसत नव्हता,,,,इतकेच काय पण माझ्या व्यतिरिक्त मला दुसऱ्या गाड्या ही रस्त्यावर दिसत नव्हत्या! बहीण दूर गेल्यापासून मी पहिल्यांदा तिच्याकडे जात होतो,,,,,!ह्या मार्गावरून मी पहिल्यांदा जरी जात असलो तरी मार्ग माझा योग्य होता,,,,,!शंका नाही!
रस्त्याच्या दोही बाजूला केवळ झाडेच झाडे आणि उंचच उंच डोंगर होते,,,,,! मला कोठेतरी रात्र घालवावीच लागणार होती,,,,मात्र निवारा कोठे दिसत नव्हता,,,,,! थोडं पुढे गेल्यावर मला एक घाट लागला,,,,तो घाट उतरून झाल्यावर मी लघुशंके साठी गाडी थांबवली,,,,! मला एका ठिकाणी थोडासा उजेड दिसला,,,,थोडं बर वाटलं,,, मी गाडी त्या दिशेने नेली,,,,, ते एक गेस्टहाऊस होते,,,,,, छोटंसं जरी असलं तरी माझ्या रात्रीची जेवणाची आणि झोपण्याची सोय झाली होती.
गेटपाशी गेलो तर तेथे एक चौकीदार बसला होता,,,,तो जाग्यावरून उठला तर नाहीच मात्र भलतीकडेच पाहत होता,,,,,,,मी दस्तक दिली,,,,,त्याने हलकेच माझ्याकडे मान वळवली आणि बोलला,,,,काय पाहिजे? मी म्हणालो मला आजची रात्र काढायची आहे,,,पहाटेच मी निघून जाईल,,,! तो जास्त काही बोलला नाही,,,फक्त गेट उघडे करून दिले,,,,,,! बापरे! काय भयंकर आवाज केला होता त्या गेटने,,,,,,रात्रीची शांतता भंग झाली!मी चालत जात होतो,,,,आजूबाजूला पाहिलं असता मला खूपच जुन्या गाड्या निदर्शनास आल्या,,,,थोडं भयंकर वाटलं मला हे,,,,,,! गेस्टहाऊस च्या बाहेर केवळ एकच पिवळा बल्फ होता,,,,तो ही अधून मधून बंद चालू होत होता,,,,,मी दारापर्यंत आलो,,, मी दार वाजवू पर्यंत झापकन दार उघडलं,,,मी दचकलो,,,,,,समोर एक म्हातारा उभा होता,,,जसा तो माझीच वाट पाहत होता,,,,,,माझ्याकडे एकटक पाहत होता,,,,चेहऱ्यावर गंभीरते शिवाय एकही भाव नाही! मी बळेच त्याच्याकडे पाहून स्मित केलं,,,,काहीच प्रतिसाद नाही,,,,,,!त्यानं हातवारे करून मला आत बोलावलं,,,,,,कदाचित तो मुका असावा असं मला वाटलं,,,,,,! मी आत गेलो,,,,त्यानं माझी कपड्याची बॅग उचलली,,,,आणि कोपऱ्यात ठेवली,,,,,,पुन्हा हातवारे करून म्हणाला की जेवायची व्यवस्था करतो,,,आणि लंगडत लंगडत तो एका काळोख्या खोलीच्या दिशेने गेला!मी सगळीकडे नजर फिरवली,,,,,,आणि एका खुर्चीवर बसलो,,,,,!मला कसला तरी कुजट वास येत होता,,,,,, मात्र मी फार लक्ष न देता डोकं शांत करू लागलो,,,,,,!माझ्या समोर एक जिना होता,,,,त्या जिन्यातून एक लहान मुलगी पळताना मला दिसली,,,,,!कोणीही असेल म्हणून मी पुन्हा दुर्लक्ष केलं!मात्र माझ्या मनाची अशी खात्री होत चालली होती की नक्कीच काहीतरी भयंकर ठिकाणी आपण आहोत! मी जाग्यावरून उठलो आणि इकडे तिकडे फिरू लागलो,,,,,,माझं लक्ष भिंतीवर असलेल्या कॅलेंडर कडे गेलं,,,,,,तर मला थोडं विचित्र वाटलं,,,,,ते कॅलेंडर खूपच वर्षे जुनं होतं!आपण कोणत्या संकटात तर पडलो नाहीत ना असं सारखं वाटू लागलं,,,,,,! इतक्यात त्या अंधाऱ्या खोलीतून मला मोठमोठ्याने श्वास घेतल्याचा आवाज येऊ लागला,,,,,,तो लंगडा व्यक्ती त्याच खोलीत गेला होता,,,,,,,! मी विचार केला की त्याला काही त्रास होत असेल का?कारण आवाजच तसा भयावह होता,,,,मी हळूहळू त्या खोलीच्या दिशेने गेलो,,,,,,दाट काळोख होता,,,,,मी माझा फोन काढून प्रकाश केला असता समोरील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली,,,,,,,,,! तो लंगडा माणूस फासावर लटकलेला होता,,,,,,त्याच्या मुखातून रक्ताची धार पडत होती,,,,,!कसलाही विचार न करता मी मागे फिरलो,,,,,,,तडक तेथून बाहेर पडलो,,,,,,मुख्य गेटच्या दिशेने झपाट्याने चालू लागलो,,,,,,मागे वळून पाहिलं तर एक बाई माझ्या मागेच येतेय असं दिसलं,,,,तिचा चेहरा पूर्ण केसाने झाकोळला होता,,,,,,,! उजव्या दिशेकडून कर्रर्रर्रर्रर्र, कर्रर्रर्रर्रर्र आवाज आला,,,,तिकडे पाहिलं तर झोक्यावर एक मुलगा जोरजोरात झोके घेत होता,,,,,त्याची भेदरी नजर माझ्याकडेच होती,,,,,,!
आता मी पळालोच,,,,, गेट गाठलं,,,,,,तो रखवालदार तिथं नव्हता,,,,,,गेट उघडलं,,,पुन्हा मागे पाहिले तर तो लंगडा व्यक्ती,ती स्त्री,ती मुलगी,मुलगा तिथे उभे राहून हातवारे करून मला बोलावत होते,,,,,,,!मात्र ते पुढे येत नव्हते,,,,,,, घामाने ओलाचिंब झालो होतो,,,,,,गाडीत बसलो,,,,,सामानही आतच सोडलं होतं,,,,,, गाडी सुरू केली,,,,,जसा गाडीचा प्रकाश पडला समोर चे दृश्य पाहून पुन्हा हादरा बसला,,,,,तो,,,,,,,,तो,,,,,
रखवालदार स्तब्ध उभा होता आणि त्याचे शरीर धगधगत्या आगीत जळत होते,,,,,,,,,!
मी वेगाने गाड़ी तेथून काढली,,,,थेट मुख्य मार्ग धरला,,,,,,! हे प्रभु,,,,,हे काय घडलं ? मी पुरता चक्रावलो!
बरेच पुढे आल्यावर थोड्या गाड्या ये जा करताना दिसू लागल्या,,,,,थोडा जीवात जीव आला,,,,,,,! आपल्यासोबत जी घटना घडली ती भुताटकी होती ह्याची खात्री झाली होती,,,,,,! प्रकरण काय होतं ते मात्र माहीत नव्हतं,,,,,,!
एक चहाची टपरी दिसली,,,,गाडी थांबवून मी तेथे गेलो,,,,,,एक म्हातारी होती तिथं,,,,,तिने मला तोंड धुण्यास पाणी दिलं,,,,,, चहा उकळत होता! बऱ्यापैकी उजडायला लागलं होतं,,,,,,!
मी माझ्यावर बेतलेला सर्व प्रसंग म्हातारीला सांगितला!
म्हातारी गंभीर झाली,,,,,तिनं सांगितलं,,,,खूप वर्षांपूर्वी तिथं एका रात्री एक परिवार थांबला होता,,,,,,,त्या परिवारातील मुख्य माणसाने सगळ्यांची हत्या केली होती,,,,त्या गेस्टहाऊस च्या रखवालदारला जिवंत जाळलं होतं,,,,, आणि शेवटी स्वतःह फासावर लटकला होता,,,,,!
ते हत्याकांड त्यानं का केलं हे रहस्य आज ही उलगडलं नाही,,,,,,,! तू जर आता पुन्हा मागे गेलास तर तुला ते गेस्टहाऊस ही दिसणार नाही,,,,,,ती घटना घडल्यावर ते तेव्हाच जमीनदोस्त करण्यात आलं होतं,,,,,,,!
मात्र ते आजही तिथं भटकत आहेत,,,,,,तुझे काही पुण्य तुझ्या कामाला आले आणि तू वाचलास,,,,,, जो कोणी तिथं थांबतो त्यालाच ह्या घटनेची प्रचिती येते,,,,,,,!
हातातील चहा थंड झाला होता,,,,कप तसाच खाली ठेवला,,,,,म्हातारीचे आभार मानले आणि मी निघालो,,,,,,,!
खूप वर्षांपूर्वी घडलेलं ते हत्याकांड रहस्यच बनून राहिलं होतं,,,,,! मी संकटातून वाचलो होतो,,,,,हळूहळू डोक्यातून ते विचार नष्ट करू लागलो,,,,,घडला प्रकार कोणालाही कधीच सांगायचा नाही हे ठरवलं,,,,,,बहिणीचे घर जवळ येत होते,,,,,,तिच्या भेटीची ओढ लागली होती,,,,,!
त्यानंतर बरीच वर्षे निघून गेली,,,,,,,,पुन्हा मी त्या मार्गाने आलो,गेलो,,,मात्र थांबलो नाही,किंवा काही दिसलं ही नाही,,,,,
मात्र ती भयंकर रात्र आज ही माझ्या मनात रहस्य म्हणून कैद आहेच.......!

गणेश कदम.