कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -5
कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन
लेखक :- मंदार साखरकर
भाग :- ५
गिरीजा बोलते सुरेखाला मी जरा घरी जाऊन येते ताईची आठवण येते आहे, तिला खूप दिवस झाले कंबरड्यावर लात मारली नाही आहे आज मारून येते.
.......
सूरेखा बोलते ये ती पण तुला खूप खूप मिस करते आहे. जा पण हळू मार लात सकाळी लवकर ये.
......
रात्री गिरीजा घरी येत बाबनच्या रूममध्ये जात बाबांना बघते आणि आपल्या रूममध्ये जाऊन रुपलीच्या कानांत बोलते मला खूप आठवण येते तूझी ताई बोलून एक लात मारते.
......
तशी रुपाली बेड वरून खाली पडत जोरात आई बोलते.
....
तसे बाबा धावत येत लाईट चालू करून बोलतात. रुपलीला बोलतात काय ग का ओरडलीस आणि खाली कशी पडलीस.
.....
रुपाली आजू बाजूला बघून घाबरत बाबांना बोलते. ती आली होती ती मला बोलली ताई मला खूप आठवण येते तुझी बोलून मला नेहमी प्रमाणे लात मारली.
......
बाबा बोलतात ती कशी येऊ शकते. तुला भास झाला असेल झोप आता. बाबा लाईट बंद करून आपल्या बेडरूम मध्ये जाऊन झोपतात.
......
रुपाली घाबरून परत झोपते, तसे तिला हसण्याचा आवाज येत गिरीजा बोलते. कशी बसली ताई मस्त ना. घाबरते कशाला मी आहे तुझी लाडकी बहीण गिरीजा चल उद्या येते परत.
.....
सकाळी ४.०० वाजता स्मशानभूमीत पोलीस रघुचा बॉडीचा पंचनामा करत इ. तेजस बोलतात हे कसे शक्य आहे. शरीरावर कुठले मारण्याचे निशाण नाही आहे. पण डोकं ठेचुन पूर्ण पणे फोडले आहे, बॉडी पाठवा फॉरेनसिक लॅबला.
......
सकाळी ८.०० वाजता प्रेम सुरेखाला येताना बघत कायाला बोलतो थांब जरा ही ची टेर उडवतो. प्रेम सुरेखाला बोलतो तूझी बर्थडे तारीख.
......
सुरेखा बोलते 4 ऑगेस्ट.
........
प्रेम बोलतो वर्ष.
.......
सूरेखा बोलते प्रत्येक वर्षी.
......
प्रेमवर सगळे हसायला लागतात.
......
सूरेखा त्याचा गळ्यात हात घालून बोलते माझ्या राजा तू किती पण प्रयत्न कर माझी खेचायची मीच तुझीच खेचनार आणि लेकेश कडे बघून बोलते हा माझा ग्रुप आहे. तुझा नाही समजले ओळख नीट करायची समजले का पांडू.
दियाला बोलते माझ्या मनात एकच आहे काय माहिती आहे ना कोण ते माझा फटाका. चला क्लासला असे बोलून निघून जाते.
........
दिया बोलते हे तर गिरीजाच बोलायची ह्याला.
......
लेकेश बोलतो कोण ग फटाका आणि ही कालच जॉईन झाली ना कॉलेज मग आणि ही गिरीजा कोण ग अवघड आहे.
.......
प्रेम सुरेखाला बोलतो थांब जरा. तू तर कालच कॉलेज जॉईन केलेसना मग हे सगळे तुला कसे माहिती.
......
सूरेखा बोलते अवघड तू खरच पिशाच्च आहेस. तू खरच माझे रक्त पिऊन मला ना हाडाचा सापळा करून सोडणार रे.
गाणे बोलत जाते "हर किसींको नही मिळता प्यार जिंदगी मे"
"प्यार होता हे बेवफासे, जिंदगी गुजारी जाती हे जिंदगी से, निभाया जाता हे अपने दिलबरसे. मरणे के बाद भी उसका साया बणके चलती हे" और
सूनने वाले बोलते हे लडकी पागल हे पागल हे हे.
पटकीच्या समजले तर समज.
....
प्रेम हळू आवाजात बोलतो गिरीजा.
......
काया बोलते काय बोललास आता तू .
........
प्रेम बोलतो कुठे काय चल कलासला.
........
कॉलेज सुटल्यावर सगळे टाईम पास करत असतात.
सुरेखा बोलते चल मी निघते घरी चल रे सोडायला.
......
मी नाही येत आज लेकेश बोलतो.
.....
सूरेखा बोलते तुला कोण बोलते रे सुकट. पहिली फुरसत मे निकाल चल.
ये फटाका चल का लाऊ माचीसची कांडी.
.....
प्रेम बोलतो हां चल पण लांब राहायचे समजले का नाही. पाली सारखी चिकट शील ओर पब्लिक बोलगी दिवारके साठ चल राही हे चिपकली समजी तो समाज पैचाना की नही.
.....
काया बोलते हा फक्त गिरीजाला असा बोलायचा.
......
सूरेखा बोलते चल नंतरचे नंतर बघू. असे बोलून दोघे निघतात. चालताना तिची मस्करी चालू होती.
ती बोलते चल ना तिथे बसूयाना जरा वेळ चल ना.
......
प्रेम बोलतो नाही बसणार मी. घरी चल गप्प चूप.
.....
सूरेखा त्याचा हात पकडून त्याला बसवत बोलते गप्प बस आणि त्याच्या खांद्यावर मान ठेवत बोलते आठवण नाही आली का.
.......
प्रेम बोलतो खूप आली आठवण गिरीजा आता पण येते आहे का सोडून गेलीस आम्हाला. तुला काय माहिती सगळे फक्त नावा पुरते हसतात आहे आतून किती दुःखी आहेत ते तुला नाही समजणार.
.......
गिरीजा त्याला मीठी मारून रडत बोलते मला वाटले तू मला नाही ओळखणार.
सगळ्यांना सांग मला पण खूप आठवण येते.
.......
प्रेम बोलतो ठीक आहे. सोड मला चल सोड ना अग शर्ट खराब हौइल. अग हडळ सोड.
......
गिरीजा प्रेमाने मारत बोलते हो का शर्ट खराब होईल का बोलून उठून जात.
.......
तेवढ्यात प्रेम तिचा हात पकडून आपल्या कडे खेचत मीठी मारत बोलतो.
"जीवनात हे सुख मिळवण्यासाठी खर प्रेम असावे लागते. प्रियकराच्या मिठीत राहण्यात आणि आईच्या कुशीत झोपण्यात जे सुख असते ते कुठे नसते"
....…
" गिरीजा बोलते बाबांचा मार खाण्यात पण. बहिणीचा मार वाचवण्यात पण सुख असते."
.......
प्रेम बोलतो सोड आता नाहीतर ही काय विचार करेल माझ्या बाबतीत आणि हिला मी आवडलो तर.
....
तशी सुरेखा सोडत बोलते. अरे ही मला मारून टाकले बाहेर ये अगोदर. ये किस वगैरे नाही केलेस ना.
अग भवाने तुला हे सगळे करायला नाही सांगितले होते ना.
......
प्रेम तिला बोलतो एक मिनिट मी काय बोलतो जरा एका.
....
सुरेखा बोलते जरा थांब रे हिला पहिली बघते मग तुला. गप्प उभी रहा आणि बोल काय तुझ्या प्रेमात मी याक स्वप्नात पण विचार नाही करणार.
......
प्रेम तिचा हात पकडून बोलतो ठीक आहे स्वप्नात नका विचार करू असा पण मी एकटा आहे माझी G F नाही राहिली तुम्ही चाललं मला.
......
सूरेखा बोलते सोड माझा हात. मेले दोघे सेम चल ग अरे सोड हात.
.....
प्रेम हात सोडत बोलतो परत कधी भेटणार ग सूरेखा. इकडे तिकडे बघत बोलतो ही कुठे ऊभी आहे.
......
सूरेखा बोलते ती तुझ्या बाजूला उभी राहून हसते आहे. लांब राहायचे समजले काय. लांब हो सांगितले ना आणि तू चल आता.
......
प्रेम बोलतो सोडायला येऊ ना.
....….
सूरेखा बोलते लांब म्हंटले. फ्लाइंग किस कोणाला देतो आहे. ती तुझ्या बाजूला उभी आहे तिकडे दे.
..
सूरेखा घरात येत बोलते बाहेर ये आता. मला आराम करायचा आहे. तसा सूरेखाला एक झटका लागतो तशी गिरीजा बाहेर येते.
...
गिरीजा बोलते आज अनिता आणि शालिनी.
...
सूरेखा बोलते ठीक आहे. कुठे आहेत माहिती आहे का.
...
गिरीजा बोलते नाही. तू ती विद्या वापरना.
....
सूरेखा बोलते प्रत्येक वेळा नाही वापरू शकत मी. माझ्या सारख्या कोण असेल तर तो लगेच त्याला समजेल.
....
गिरीजा बोलते मग कसे शोधायचे.
. ...
सुरेखा बोलते मला झोप येते आहे मी जरा झोपते आणि विचार पण करू नको बाहेर जायचे समजले का ११ दिवस.
...
संध्याकाळी ६.०० वाजता सूरेखा उठते तशी ओरडते.
...
गिरीजा बोलते काय झाले ओरडायला तुला.
...
सूरेखा तिला मारत बोलते. मेली मला पण मारायचा विचार आहे का. अशी कोण समोर बसतात का भुतासारखी.
....
गिरीजा हसत बोलते मी तर भूतच आहे ना ग.
...
सूरेखा बोलते हाड मेली. बाजूला हो फ्रेश होऊन येते मी आपल्याला पुण्याला जायचे आहे.
...
गिरीजा बोलते जिवंत असताना कधी गेली नाही मेल्यावर तरी मिळते आहे जायला चल. पण कशाला जायचे आहे.
..
सूरेखा बोलते रक्त पियाला आलीच मी तयार होऊन.
सूरेखा फ्रेश होऊन येत बोलते चल जाऊया पुण्यात.
रात्री १०.०० च्या सुमारास दोघी पुण्यात येतात. तशी सूरेखा बोलते तयार आहेस ना अनिता आणि शालिनीला संपवायला.
....
गिरीजा बोलते कधी पासून मला सांग तू तर ती विद्या तर वापरणार नव्हती ना मग.
.........
सूरेखा बोलते हो बराबर ह्या टाईमला ** नीळवंती** वापरली. ह्या मध्ये मी प्राण्यांशी बोलून तिचा अँड्रेस शोधला.
...
गिरीजा बोलते होका असे बोलून ती सूरेखाच्या अंगात प्रवेश करते.
....
सूरेखा अनिताचा दरवाजा नॉक करते.
...
अनिता दरवाजा उघडत बोलते कोण आपण.
...
सूरेखा बोलते मी बदलापूर वरून आली आहे.
...
ते ऐकताच अनिता, सुरेखाला आत येण्यास सांगते.
...
सूरेखा घरात प्रवेश करते तशी घरची लाईट जाते. सूरेखा दरवाजा बंद करते.
...
अनिता मोबाइलची लाईट चालू करून बोलते बसा सोफ्यावर मी आलीच मेणबत्ती घेऊन.
....
गिरीजा बोलते हो घेऊन ये मेनबती.
....
अनिताला तो आवाज ओळखीचा वाटतो म्हणून ती बोलते कोण तुम्ही.
....
गिरीजा बोलते जा पहिली मेणबत्ती तर पेटव मग समजेल कोणाचा आवाज आहे ते.
....
अनिता मेणबत्ती पेटवत बाहेर येते तर हॉल मध्ये कोणीच नसते. ती स्वतःला बोलते भास झाला असेल, भास कसा हौईल ती मुलगी तर आत आली होती भास कसा होईल.
....
तेवड्यात तिला हसण्याचा आवाज येतो. अग किती विचार करते ग. मी इथेच आहे सोफ्यावर बघ जरा. बाय द वे मी सूरेखा, तू अनिता कॉफी इन मध्ये काम करायची ना तू.
.....
अनिता बोलते हो हो घाबरत बोलते. तुम्हाला कसे माहिती.
....
सूरेखा बोलते अग मला सगळे माहिती आहे. तू आणि तुझ्या मित्रांनी काय केलेस गिरीजा बरोबर.
...
अनिता बोलते तुम्ही काय बोलतात आहेत मला काही समजत नाही आहे कोण गिरीजा.
......
सूरेखा बोलते हो का कोण गिरीजा मग ती कोण आहे. बघ तुझ्या पाठी मागे वळून बघ मग आठवेल कोण गिरीजा ते.
....
अनिता घाबरत पाठी वळून बघते तर गिरीजा रक्तने माखलेली दिसली ती तशीच पाठी जात बोलते तू तू इथे कशी तू तर बोलणार तशीच.
....
गिरीजा तिची गळा पकडून तिला बोलते आठवले का काही बोलून तिला फेकते. असेच मला तू आणि शालिनीने फेकले होते ना मला. त्या मुळे माझा पाठी खूप मोठा मार बसला होता. मला सरकता पण येत नव्हते आणि उठता पण येत नव्हते. रघु तुमची वर वाट बघतो आहे.
...
अनिता हात जोडत बोलते मला माफ कर मी त्याच्या बोलण्यात आली.
...
गिरीजा बोलते हो का. काय बोललीस होती आजून वेळ कुठे गेली आहे ना. मग मला बोल मग त्याच्या बोलण्यात कशी आली तू.
मी पण हात जोडून बोलत होती ना सोडा मला. पण शालिनी आणि तू काय केले. माझ्या छातीवर पाय देत बोलत होते. तुला कोणी मध्ये येण्यास सांगितले गप्प आपले काम करायचे सोडून आमच्या कामा मध्ये आलीस बोलून माझ्या पोटात लाता मारल्यात कसे सहन केले मी मलाच माहिती बोलून अनिताच्या पोटात लात मारायला सुरुवात करत नाहीशी होते.
....
अनिता आपले पोट पकडून ते दुखणे सहन करत आजू बाजूला बघत उठण्याचा प्रयत्न करत असते.
......
तेवढ्यात गिरीजा, अनिताच्या अंगात प्रवेश करत खिडकीकडे धाव घेत खिडकी तुन उडी मारते.
......
सूरेखा उठून दरवाजा उघडून बाहेर येऊन आपल्या गाडीत बसून बोलते. रात्रीचे २.०० वाजले आताच मारायचे शालिनीला की उद्या बोल. अग तु किती सहन केले ग. मी असती तर कधीच गेली असती.
.....
गिरीजा बोलते ताई मला कसे तरी वाटते आहे. असे वाटते आहे माझे हृदय धडकते आहे.
क्रमश