एक अनुभव :
(कथेतील व्यक्तींची नावे बदलली आहेत.)
गावातील जत्रा असो की शहरातील कार्यक्रम सर्वीकडे सोबत फिरणारे असे हे दोस्त,
नुकतेच पंचवटी बघून आपल्या गावी आले होते,
आद्याला कळलं की शेजारच्या गावात जत्रा आहे, आद्याच्या हो ला हो भेटला. दुसऱ्या रात्री निघायचा प्लॅन ठरला.
दुसरा दिवस आरामात पार पाडला आणि रात्री तिघे आद्या घरासमोर भेटले,
नितीन च्या बाईक वर तिघे निघाले ,
एकमेकांची थट्टा मस्करी करत प्रवास चालू होता.
काळोख असल्यामुळे बाईक ची हेडलाईट चालू होती.
सर्वात मागे बसणारा मन्या बोलू लागला : गाडी थांबवू नका बिबटया दिसला की लाईट बंद करा, तिघेही सावध होऊन त्या अंधारलेल्या शेत रस्त्यावरून निघत होते.
एकदाचे पोहोचलो बाबा जत्रेत.
जत्रेचा आनंद घेऊन परतीचा प्रवास चालु करणार तेवढ्यात बाईकच इंजिन बंद पडलं आहे, बाईक चालु होत नाही आहे,काय करायचं, त्या गावांत मन्या च्या ओळखीचे गॅरेज चे काम करणारे व्यक्ती कडे गेले पण ते घरी नसल्यामुळे तेही गॅरेज बंद होते.
त्यांनी बाईक मारुतीच्या मंदिरा जवळ ठेवून पायी आपल्या परतीचा प्रवास सुरु केला, गावाच्या हद्द संपली होती, आणि आता जर्द काळोखातून ते चालले होते. प्रवास लांबचा होता म्हणून विड्या पेटवत आणि टाकत , त्या अंधारात रात किड्यांचा आवाज दूर दूर पर्यंत ऐकू येत होता.
अर्धा रस्ता पार झाला होता,टिटव्या जणू त्यांना संकेत देत होत्या
अचानक नितिन थांबला , त्याला बघून दोघ पण उभ्या जागी थांबले , काय रे काय झालं,
नितिन थरथरत होता
ते बघा तिकडे पुढे जाऊ नका
थांबा.
काय झालं लवकर सांग.
नितीन बोबड्या स्वरात सांगत होता, तिकडे तिकडे
`काय ´
अरे त्या झाडापाशी बघा ना बायका झोके बांधताय, खेळताय
`तुला कुठं दिसतंय रे´
तुला भास झालाय चल, दोन दिवस सारखा प्रवास असल्यामुळे झालाय तुला चल.. असं म्हणत तिघे चालु लागले
थोड्या वेळा नंतर मन्या च्या लक्षात आलं की पांढरे कपडे घातलेल्या बायका त्यांच्या मागे हळूवारपणे येतायेत, काहीपण होउदे माग बघू नका अस म्हणत तिघेही जीव मुठीत धरून पळू लागले.
शेतातून पळता पळता गाव दिसू लागले गावाचा हद्दीत आल्यावर त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
कौस्तुभ