निरंत (काल्पनिक भयकथा)
साहिल त्याच्या छोट्या छोट्या हातानी दरवाजावर बुकक्या मारत रडत दरवाजा उघडायला सांगत होता.
पण त्याच कोणीच ऐकत नव्हते. त्याची आई परिधी वारल्या पासून त्याच्याशी आपुलकीने वागणारे लोक, एकाएकी त्याला परिधी आरशात दिसते असे त्यानी सांगीतल्यावर त्याकडे विचित्र नजरेनी पाहू लागले होते..
आईच्या जाण्याचे दुःख झाले आहे की ह्यांच्या पण....
परिधी सारखा डोक्यावर परिणाम झाला आहे हे त्यांना कळत नव्हते..
त्यासाठी मानस म्हणजे साहिलचे पप्पा यांनी त्यांच्या ओळखीच्या एका Dr ना या साठी बोलावले होते..
त्याच्याशी 2 तास गप्पा मारायला आलेले Dr काका अचानकच रूम च्या बाहेर पळून येताना सगळ्यांना दिसले...
साहिल दरवाजा जवळ बसून तो उघडायची वाट बघत होता..त्याला समजतच नव्हते घरचे असे काय वागत होते त्या सोबत? चक्क आज तर कोंडून ठेवल होत त्याला..
काकू तर सारख येता जाता त्याच्या आईला बर झाली मेली वेडी. अस काय काय कुजबुजत्या आवाजात बोलत होती.
मनाशीच् विचार करत करत त्याची नजर समोर आरशात गेली.. तिथ अजुन एक साहिल उभा होता. ख़ुनाउन तो त्याला जवळ बोलावत होता. तो सगळ्यांना सांगून सांगून दमला होता की त्याला त्याच्या सारखाच एक मुलगा दिसतो म्हणून. पण कोणी त्यावर विश्वासच ठेवला नाही.
आई गेल्या पासून तो खुप एकटा पडला होता. कधी मधी अचानक शाळा लवकर सुटुन तो घरी यायचा, तेव्हा त्याला आई पण अशीच आरशा जवळ थांबून बडबड करताना दिसे. तेव्हाची आई त्याला एकदम वेगळीच् वाटत असे. सगळे म्हणतात त्याच्या आईला हे भास लग्नाआधीपासुंन होत होते. ती थोडिशी वेडसर होती का? पण काय खर होत ते देवास माहित.
त्याच्या बाबांनी बोलावलेले नवीन डॉक्टर काका पण
त्याला परवा समजावत होते की आरशात वगैरे मुलगा तस काही नसतं, हे सगळ मनाचा भास असतो.
मला ते पटाव म्हणून ते तसच मला आरशा जवळ घेऊन गेले. पण समोर आरशात त्यांची एकटयाची प्रतिमा बघुन घाबरून जे पळाले हे पाहुन आरशातील आई आणि आरशातील साहिल खुप वेळ हसत होते.
तेव्हा पासून तो असा खोलीत बंद होता.
मानस हतबल होऊन रूम मध्ये कोंडलेल्या साहिलचा विचार करू लागला...
साहिल असा का बर वागत असेल? त्याला खरच परिधी दिसत असेल का? परिधी पण शेवट शेवट दुहेरी व्यक्तिमत्वाच्या आजाराची रुग्ण झाली होती असे सगळे म्हणत..आणि सगळ्यांमध्ये आता साहिल ही त्याच वाटेवर होता...
अगदी कालपरवा सारखी गोष्ट वाटत होती.
परिधी...त्याची सुंदर, हसरी, खेळकर बायको..एक आदर्श गृहिणी..एक परिपूर्ण आई...सगळ्या भूमिका ती यशस्वीरित्या ती जगली होती.. आणि अचानकच वेड्या सारख वागू लागली होती... मला चांगला आठवतोय तो दिवस. ज्या दिवशी ती ऑफिस मधून आली होती तेव्हाच तिच्यात काहीतरी बदल झाला होता.. चमत्कारिक वागू लागली होती ती.. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता सारखी म्हणायची..माझ्या अंगात साधू आहे..अघोरी साधू...आणि तो मला सोबत घेऊन जाणार...
तिला मी स्वतः त्यानंतर कितीतरी वेळा आरशात बघुन हातवारे करून बोलताना पाहिल होत. आधी मला वाटले ऑफिसचे असेल काही टेंशन होईल नंतर सर्व ठीक..पण माझी ही आशा पण फोल ठरली..
तिच्या ऑफिस मध्ये जाऊंन पण चौकशी केली होती..की कोण साधू आणि हिची भेट झाली होती का म्हणून..पण कुठुनच काहीच कळत नव्हतं...
या सगळ्याचा परिणाम साहिल वर होउ लागला होता..
आणि अशातच एक दिवस या सगळ्याला कंटाळून फाशी घेऊन तिने आपले आयुष्य संपवले होते..
अगदी पंधरा दिवसात सगळ होत्याच् नव्हतं झाल होत..
साहिलची केविलवानी हाक त्याच्या कानावर पडते..
बाबा ..बाबा. .. दार उघडा नाsss...
धडपडून तो साहिलला बाहेर काढण्यासाठी बेडरूमचा दरवाजा उघडायला धावला ... दार उघड़ताच साहिलने त्याच्या कडे झेप घेतली.. तेवढ्यात बेड जवळच्या ड्रेसिंग टेबल च्या आरशात त्याला काहीतरी धुरकट सरकल्या सारखे दिसले...काय होते ते..?? वारा ? धुकं? सावली? की..... परिधी???
क्षणात त्याच मन वेगवेगळे विचार करत धावू लागले...
पटकन साहिलला घेऊन तो रूमच्या बाहेर आला..
इकडे संध्या तिचा सुड पूर्ण झाल्यामुळे खुप आनंदित झाली होती. ती आधीपासुन परिधी वर खुप जळत असायची.
परिधीची ती मैत्रीण होती, पण ती नेहमीच परिधीवर जळायची. तीच सुख, तिचा नवरा, तिच घर सगळ बघुन तिच्या पोटात खोल खोल खड्डा पडायचा. मी पण या सगळ्यांसाठी Capable आहे. मग मला का नाही हे सगळ?? मला पण हव हे. आणि जर मला नाही मिळालं तर तिला पण नको हे.
अशात तिला एका अघोरी साधुचा पत्ता मिळाला, भीत भीतच ती त्या ठिकाणी गेली.
परिधीचे उत्तम गुण..छान स्वभाव..छान नोकरी..छान सुखी परिवार ह्या तिच्या सगळ्या गोष्टी संध्याचा जळफळाट होण्यास अजुन कारण ठरत होता..
तिचा हा द्वेषाचा प्रवास एका अघोरी साधू पर्यन्त येऊन पोहोचला होता.. त्या मागे तिच्या सुखी संसाराच काय होईल? तिच्या लहान मुलाच काय होईल? याची पर्वा ही तिने केली नाही...आणि एक अनुचित पाऊल उचलले...
नेहमी सारखी परिधी ऑफिसला आली होती.. आल्या आल्या तिची गरम कॉफी तिच्या डेस्क वर शिपायाने लगेच आणून ठेवली. परिधी तिची बॅग डेस्क वर ठेऊन फ्रेश होयला गेली.. तेव्हाच योग्य संधी साधुन अघोरी साधुने दिलेल भस्म आणि एक कसलासा केसांचा चामडी तुकडा तिने तिच्या बॅग मध्ये टाकून दिला..
कॉफी मध्ये भस्म टाकताना तिचा हात एक क्षण थरथरला..पण तिची विवेकबुद्धी त्वेषानी भरली होती..म्हणून तिने पूर्ण पुडी पटकन तिच्या कॉफी च्या मग मध्ये ओतली...
क्षणभर तिच्या डोळ्यासमोर त्या भयान साधू चे रूप तरळले..
ती त्या पत्त्यावर पोहोचली तेव्हा, जवळच एक चिता जळत होती. त्याच्या जवळच एक मोडक झोपड होत, त्यात तो साधू बसला होता. जवळच एक होमकुंड पेटले होते. त्याचा उजेड त्याच्या तोंडावर पडला होता. साधुच्या अंगा तोंडावर राख फासलेली होती. तांबरलेले डोळे, मोठे जटा असलेले केस, गळ्यात हाडा-कवट्याची माळ, कपाळावर काळा नाम. असे काहीसे उरात धडकी भरवणारे त्याचे ध्यान होते. ती त्याकडे पहात असतानाच बाहेर काहीतरी जोरात फट् करून फुटल्याचा आवाज आला.
आणि ती दचकली.
प्रेताची कवटी फुटली होती बहुदा...
...तेव्हाच साधूने डोळे उघडले.
त्याच्यापुढे तिने सगळी तिच्या मनातील गरळ ओकली..आणि त्या होम कुंडा पुढे 10000 रुपये ठेवले.
त्याच क्षणी त्याने त्याच्या जवळचे भस्म आणि कसलासा चामडी गुंतडा अभिमंत्रुन तिला दिला. आणि काय करायचे ते सांगितले.
कॉफी पिउन होताच परिधीला सुप्तशी काहीतरी जाणीव झाली. काहीतरी विचित्र झाल पण काय ते समजल नाही.
तिला अचानकच अस्वस्थ वाटू लागले..म्हणून ती Half Day टाकून घरी गेली. घरी ती Fresh होऊन आरशा जवळ जाताच तिला त्याबद्दल फार ओढ वाटू लागली.
जणू ती आकर्षित झाली होती.
तिला आरशात अचानक तिच्या प्रतिबिंबा ऐवजी एक राख फासलेला साधू दिसला.. एखाद्या खेळण्यातले सेल संपायला आल्यावर कसा गेंगाना आवाज येतो...तसा त्याचा आवाज येत होता. तो काहीतरी मंत्र म्हणत होता.
परिधी भारल्यासारखी त्याकडे घाबरुंन बघत होती.
पुढे जाऊन तिचा हा चाळाच होऊन जातो..घरी पण ती लक्ष देत नसे..सारख आरशा पुढे जाऊंन उभी राहात असे. ऑफिस मध्ये ही तेच प्रकार होउ लागले.
तहानभूक हरपूण ती आरशावर रेघोट्या ओढ़त राही..
साहिलला हे सगळ चमत्कारिक वाटे..तिला कशाची शुद्धच् राहिली नव्हती.
संध्याची एवढीच इच्छा होती की परिधीला जॉब वरून काढून टाकावे...मानस ने तिचा तिरस्कार करावा...तिला त्याच्या आयुष्यातुन काढून टाकावे..पण अघोरी साधुच्या वाईट उपायांनी कंटाळून ती आपले आयुष्यच संपवते.
शेवटच्या काळात वाईट शक्तीच्या अंमलाखाली राहिल्याने तिचा आत्मा ही वाईट होतो. आणि आरशात कैद होतो...
काही दिवसांनी संध्याला आशा वाटते की आता तरी परिधीच्या जागी तिचे प्रमोशन होईल. अशात तिला कुठून तरी कळते की तिचे बॉस याच विचारात आहेत. ती खुप खुश होते.
रात्री ती प्रमोशनचे स्वप्न पहात झोपली असता.. तिला अचानक जाग येते...ती उठण्यासाठी वळते तोच तिला तिच्या बेड भोवती.. कुणीतरी खुरडत फिरताना दिसतं...तिचा श्वासच आडकतो...
ती परिधी असते..अस्ताव्यस्त केस...पूर्ण काळे डोळे..
लांब गाऊन. डाव्या कानापासून ते उजव्या कानापर्यन्त फाटलेला जबडा..
आणि त्यात ते चेहऱ्यावर समोरच्याचे काळीज गोठवनारे
भेसुर हास्य...
पण तिच्या हातातून रक्त गळत असते. .
संध्याचे लक्ष तिकडे जाते..तिच्या हातात एक धारदार आरशाची काच असते. ती तिने अगदी करकचून धरली असते.
त्यामुळेच तिच्या हातात ते घुसून हातातून रक्त पडत असते...
परिधी फिरता फिरते थांबते...आणि वसकन् तिच्या अंगावर येत ओरडते...
काss? का?? अस का केलस तू संध्या..??
प प प परिधीधी...
पण तिला काही बोलण्याचा अवसरच न देता
परिधी तिच्या हातातली काच खस्सकन तिच्या गळ्यात आरपार खुपसते...
तिचा नाईट ड्रेस, उशी आणि मागची भिंत
तिच्या लाल रक्तात पूर्ण न्हाउन् निघते...
परिधीचा बदला पूर्ण झाला असतो.. तिला तिच्या जगात जायला हवं होत...पण तिच मन साहिल मधये गुंतलं असत...
त्यांच्या बेडरूम मध्ये साहिलला मानस कुशीत घेऊन झोपल्याचे बघताच ती थांबते...
ह्या दोघांना पण आपण आपल्या जगात घेऊन जाऊ आणि तिकडे राहु असा विचार ती करते..
शेवटी ती आता एक प्रेतात्मा असते..
मध्यरात्री मानसला जाग येते..
साहिल त्याच्या कुशीत मुसमुसत असतो...
मानस त्याला विचारतो काय झाल बेटा? का रडतोएस तू? भूक लागलिए का तुला?
साहिल हुंदके देत म्हणतो ..
बाबा...कोणीतरी बेडच्या खाली आहे..
मानस~ नाही बेटा, कोणी नाहिए तिकडे..तू रडू नकोस..झोप तू शांत.
साहिल~ नाही बाबा, तुम्ही बघा ना एकदा..
मानस~ अच्छा बाबा घाबरू नकोस तू..बघतो मी. Ok?
मानस हळूच बेड वरून खाली उतरतो आणि खाली बसून
बेडच्या आत वाकुन बघायला लागतो...
नाही म्हणायला त्याला ही भीती वाटत असते.
अचानक रूम चे तापमान वाढू लागते..
थरथरत्या हातानी तो चादर वर करतो आणि आत वाकुन बघू लागतो..
आत मधील दृश्य पाहुन त्याच्या अंगावर काटाच येतो...
बेडच्या खाली मधोमध साहिल घाबरूंन बसला असतो.
आणि तो म्हणत असतो..बाबा बेड वर बघा ना कोण झोपलयं....
क्रमशः
©Nandini Nitesh Rajapurkar