Hot Indian Desi Girl,hot indian(desi) babies,mobile girls chat,sexy single girls from India,My name is NEHA and Seeking Men,A 100% free dating site for India
मैत्री -A Freind Story
सकाळी सहा वाजता टेबलावर ठेवलेला मोबाईल खणाणला आणि त्या आवाजाने खुर्चीत अवघडून झोपलेल्या अरविंदला जाग आली.जवळच झोपलेल्या मेघनाला त्या आवाजाने जाग येऊ नये म्हणून त्याने लगबगीने उठून फोन उचलला. त्याची बायको अनघाचा फोन होता.
“हॅलो.....”
“ अरविंद अरे कुठे आहेस तू? आठ दिवस झाले घरी आलेला नाहीस. तुझा फोन लागत नाही, लागला तर तू उचलत नाहीस,माझी काही काळजी आहे की नाही तुला,की घरी न येण्याचेच ठरवले आहेस तू?”
अनघाने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. बोलण्यामुळे मेघनाची झोप मोडू नये म्हणून अरविंद उठून गॅलरीत आला.
“ अनघा.... मी, मी येतो ना घरी आज, मी ठीक आहे काळजी करू नकोस”तो हळू आवाजात बोलला.
“ अरे पण आहेस कुठे तू? आठ दिवसांपूर्वी महत्वाच्या कामाला चाललोय असे सांगून बॅग भरून निघून गेलास. अरे संसारी माणूस आहेस हे विसरलास का तू?” अनघा चिडून बोलली.
“ हे बघ अनघा, चिडू नकोस प्लीज. मी दुपारपर्यंत घरी येतोय. आलो की तुला सगळं सांगतो, ठीक आहे?” अरविंदने समजावणीच्या सुरात म्हटले.
“ ठीक आहे, पण नक्की ये नाहीतर पुन्हा काहीतरी कारण काढशील.” अनघा बोलली.
“ येतो गं, चल बाय मी ठेवतो फोन.” असे म्हणून अरविंदने फोन ठेवला.
फोन ठेवून तो आत आला. मेघना अजूनही झोपलेलीच होती. अरविंदने तिच्या कपाळाला हात लावून पाहिला. ताप उतरला होता पूर्णपणे, पण तिचा चेहरा अजूनही जरा निस्तेज दिसत होता. डॉक्टर म्हणालेच होते ताप उतरल्यावरही काही दिवस अशक्तपणा राहीलच, औषधे सुरु ठेवा. अरविंदने डाव्या बाजूच्या टेबलाचा खण उघडला. पंधरा दिवसांपर्यंत पुरतील इतकी औषधे आहेत की नाही याची त्याने खात्री करून घेतली. त्याच खणातून त्याने कागद आणि एक पाकीट काढले. जवळ असलेली खुर्ची ओढली आणि तो लिहू लागला. जवळ जवळ पंधरा ते वीस मिनिट त्याचे लिहिणे सुरु होते. मध्येच तो मेघनाकडे पाहून सगळं काही व्यवस्थित असल्याची खात्री करून घायचा. लिहिणे पूर्ण झाले आणि त्याने कागद पाकिटात टाकुन ते मेघनाच्या उशीखाली ठेऊन दिले. मेघना अजूनही झोपलेली होती. अरविंद पुन्हा गॅलरीत आला आणि उगवत्या सूर्याकडे बघत बसला विचार करत. अशा विचारा विचारांतच किती वेळ गेला कोण जाणे. बेल वाजली म्हणून त्याने खोली बाहेर येऊन दार उघडले. मेघनाचे आई-बाबा आले होते. दारात पाय ठेवताच त्यांनी अरविंदला विचारले.
“ अरु, कशी आहे मेघना, गेला का ताप? काय म्हणतात डॉक्टर? किती दिवसांची औषधं दिली आहेत?” मेघनाच्या काळजीचे त्यांना ग्रासून टाकले होते.
“ काका-काकू, तुम्ही आधी शांत व्हा.... आताच आला आहात जरा बसा.” अरविंद त्यांना शांत करीत बोलला. हॉलच्या सोफ्यावर दोघंही बसले. अरविंद त्यांच्या समोर बसत म्हणाला.
“ काही काळजी करू नका. मेघना आता बरी आहे, झोपली आहे अजूनही पण ताप उतरलाय पूर्णपणे. डॉक्टर दर तीन दिवसांनी येऊन जातात. उद्या परत येतील. म्हणाले ताप उतरल्यावरही जरा अशक्तपणा राहील. त्याची काळजी करायचे कारण नाही फक्त खाणे-पिणे व्यवस्थित सुरु ठेवा. महिनाभर सक्तीचा आराम सांगितला आहे. जास्त बोलायचे नाही, ताजे आणि सकस अन्न खायचे भरपूर आराम करायचं, म्हणजे महिनाभरात पूर्ववत होईल. तापामुळे आलेला अशक्तपणाही भरून निघेल महिनाभर आराम झाला की. तुमची स्वैपाकीण बाईही समजूतदार आहे. मेघनाला ताप आहे म्हटल्यावर तिने एकही दिवस खाडा केला नाही, रोज येत होती.” अरविंदने धडाधडा सांगून टाकले.
“ आणि तू...?” मेघनाच्या बाबांनी विचारले.
“मी आठ दिवस इथेच आहे. एकही क्षण मी मेघनाला एकटे सोडलेले नाही.” अरविंदने कबुल केले.
“ काय?” मेघनाचे बाबा चकित झाले. “ अरे पण अरु तू घरी गेला नाहीस आठ दिवस? तू लग्न झालेला संसारी माणूस आहेस. अनघाला काय वाटत असेल कुठे गेलाय आपला नवरा?”
“ काका.... तिला मी इथे आहे हे माहित नाही. आणि तुम्हाला काय म्हणायचंय हे लक्षात येतंय माझ्या. मी आणि मेघना वरून अनघाला संशय येऊ शकतो असंच ना?” अरविंद बोलला.
“ हो... तुझं घर बायको, ऑफिस हे सगळं सोडून तू आठ दिवस इथे रहातोयस. अनघाला काय वाटेल?” मेघनाचे बाबा म्हणाले.
“ ऑफिस मध्ये मी तुमचा फोन आला तेव्हाच वैयक्तिक कामासाठी सुट्टी घेत आहे असा अर्ज दिला होता, त्यामुळे तो प्रश्न निकालात निघाला आणि अनघाचं म्हणाल तर माझ्या बायकोचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मेघना खडखडीत बरी झाली की मी स्वतः तिला इथे घेऊन येणार आहे मेघनाच्या भेटीसाठी.” अरविंद बोलला.
“ अरु, तू खरंच खूप चांगला आहेस रे, आम्ही तिकडे गावात खूप चिंतेत होतो.” मेघनाची आई हळवेपणाने म्हणाली. “ पण हेच म्हणाले अरुला फोन करतो, बघू काही सोय होतेय का? आणि तू केलेली मदत फार फार मोठी आहे रे.”
“ काकू.... कशाला मला लाजवताय. असं काही नाही, मी माझं काम केलं. पण आता मात्र तुम्ही आला आहात. मेघनाची काळजी घ्या. काही मदत लागली तर मला बोलवा, मी येईनच. चला मी निघतो आता.” अरविंद उठला, दारापर्यंत आला आणि वळून म्हणाला.
“ काका.... मी मेघनाच्या उशीखाली एक चिट्ठी ठेवली आहे. मेघना जागी झाली की ती वाचायची तिला आठवण करून द्या प्लीज.”
मेघनाच्या बाबांनी होकारार्थी मान डोलावलेली पाहून तो निघाला. सकाळचे साडेसातच वाजले होते. त्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. जोरदार पाऊस कोसळत होता म्हणून तो काळजीपूर्वक बाईक चालवत घरी आला. दाराच्या आत पाय टाकताच तो धडकन सोफ्यावर बसला मात्र अनघाने त्याला विचारले.
“ कुठे होतास अरविंद आठ दिवस? मी तुझी बायको आहे हे विसरलास का? ही काय पद्दत आहे वागायची?”
“ अनघा... सगळं सांगतो, आधी प्लीज मला एक कप कॉफी करून दे, डोकं जड झालंय.” अरविंद बोलला.
oo KOji poअनघा रागातच उठली आणि किचन मध्ये गेली. जरा वेळातच तिने अरविंद करिता आणि स्वतःकरिता कॉफीचे मग भरून आणले. अरविंदने पावसात ओले झालेले कपडे बदले आणि तो परत बाहेर सोफ्यावर येऊन बसला. दोन घोट गरम कॉफी पोटात जाताच त्याला जरा बरे वाटले आणि तो समोर बसलेल्या अनाघाकडे बसून बोलला.
“ बोल... काय काय सांगू?”
“ कुठे होतास आठ दिवस.....?” अनघाने विचारले.
“ कुठे....? कुठे विचारशील तर.... मी मेघनाकडे होतो.” अरविंदने काहीही न लपवता अगदी सहजपणे सांगून टाकले.
“ मेघना....? कोण ही मेघना?” अनघाने शंकेच्या सुरात विचारले.
“मेघना माझी जुनी मैत्रीण, प्रेयसी, असं काहीही म्हण. पण मला तिच्याकडे जाणं भाग होतं.”
“ काय? अरविंद लाज नाही वाटत का तुला? तू मला, तुझ्या बायकोला सांगतोयस की तू आठ दिवस तुझ्या प्रेयसी बरोबर,मैत्रिणीबरोबर होतास.” अनघा करवादली.
“ अनघा गैरसमज करून घेऊ नकोस. मेघना आजारी होती. मदतीला कुणी नव्हते, म्हणून मग मला जाणे भाग पडले.”
“ पण अरविंद आपलं लग्न होऊन वर्ष झालंय. आणि तू आता जर मला हे असलं काही सांगत असशील तर मी कसा गैरसमज करून घ्यायला नको.?” अनघा म्हणाली.
“ अनू, मेघनाचे आई वडील काही कामानिमित्त त्यांच्या गावी गेले होते. घरी मेघना एकटीच होती. त्यात तिला ताप आला आणि ती अंथरुणावर पडली. पाउस इतका होता कि रेल्वे, बस, गाड्या सगळं काही बंद होतं. काकांनी मग मला फोन केला आणि मी ताबडतोब म्हणालो काही काळजी करू नका मी घेईन तिची काळजी. आठ दिवस मी तिच्या सोबतच होतो.” अरविंदने कबुल केले.
अरविंदचे बोलणे संपले तरी अनघा त्याच्यासमोर चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह घेऊन बघत राहिली.
“ अनू, मेघनाचे आणि माझे अनैतिक संबंध आहे हा विचारही मनात आणू नकोस. मान्य करतो की ती माझी लग्नाआधीची प्रेयसी होती. पण काही कारणाने आमचं नातं पुढे सरकू शकलं नाही. मेघना नेहमी म्हणायची अरु आपलं नातं तयार होणार नसलं तरी आपली मैत्री, आपली निर्मळ, निस्वार्थ मैत्री तुटू देऊ नकोस. आधी मला तिच्या बोलण्याचा राग यायचा. मी म्हणायचो जर नातं पुढे नेऊ शकत नव्हतीस तर जोडलंसंच का?लायकी आहे का तुझी माझ्याशी नातं ठेवायची, असं काही बाही नको नको ते मी तिला बोलायचो. माझ्या बोलण्याने तिला त्रास व्हायचा, अपमानित व्हायची ती पण तरीही आमची मैत्री तिने तुटू दिली नाही. ती स्वतःहून माझ्या संपर्कात रहायची. हळूहळू मी ही सावरलो. शरीरानेच काय पण मनानेही आम्ही जवळ येऊ शकलो नाही. नशिबात नाही ते मिळवण्याचा अट्टाहास करायचा नसतो हे मला कळलं. पण मी बोलून गेलेल्या शब्दांची, तिच्या केलेल्या अपमानाची, हेटाळणीची सल बोचत रहायची कायम. पश्चाताप व्हायचा, का? का? मी असं बोललो. मनातल्या मनात हजार वेळा तिची माफी मागायचो. कारण ऑफिसच्या व्यस्ततेमुळे प्रत्यक्ष भेट शक्य नव्हती. पुढे आमचा संपर्क जरा कमी झाला. आपले लग्न झाले, सगळे सुरळीत सुरु झाले.” अरविंद भान हरपून बोलत होता.
“ मग..... आता काय झालं अचानक...?” अनघाने विचारले.
“ आठ दिवसांपूर्वी मेघनाच्या बाबांचा फोन आला आणि मी मनात म्हटले, हीच संधी आहे, झालेल्या चुका सुधारण्याची,ही गमावून उपयोग नाही. मी तत्काळ होकार दिला. मेघनाच्या काळजीने मला इतके ग्रासून टाकले होते की मी तुला अर्धवट काहीतरी सांगून निघालो. ऑफिस मध्ये सुटीचा अर्जही मित्राकडून परस्पर पाठवला. त्यानंतर आठ दिवस मी तिथेच आहे. तिथे राहून तिची काळजी घेतलीय.”
“ अरविंद तुझ्या आणि तिच्यात तसले संबंध नाहीत असा विश्वास आहे माझ्या तुझ्यावर. आता कशी आहे मेघना?” अनघाने विचारले.
“ आता बरी आहे. ताप गेलाय पूर्ण, थोडा अशक्तपणा आहे. डॉक्टर म्हणतात जाईल तो ही हळू हळू. पुढील महिन्यापर्यंत बरी होऊन ती ऑफिसलाही जायला लागेल. चार महिन्यात लग्नही आहे तिचं”
“ अरविंद..... तू केलंस ते योग्यच आहे. एक खरा, निस्वार्थ मित्र जे करेल तेच तू केलं आहेस” अनघा त्याच्या जवळ येऊन बसत म्हणाली. “ माझी तुझ्याबद्दल काहीही तक्रार नाही, आणि मेघनाबद्दलही नाही.”
“थँक्स अनू. आज मला खऱ्या अर्थानी मी केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त केल्याचे समाधान वाटते आहे. मनावरचे एक खूप मोठे ओझे उतरल्या सारखे वाटते आहे.” असे म्हणून अरविंद अनघाच्या कुशीत शिरून मोकळेपणाने रडू लागला, आणि अनघा एखाद्या लहान बाळासारखे त्याला थोपटत, कुरवाळत राहिली.
इकडे दुपारी दीड वाजता मेघनाला जाग आली. आई-बाबा आले होते. अरविंद सकाळीच घरी गेला असे त्यांनी सांगितले. अरविंदने तिच्यासाठी चिट्ठी ठेवली आहे असे बाबा म्हणाले. मेघनाने उशीखालच्या पाकिटातून चिट्ठी काढून वाचायला सुरुवात केली.
प्रिय मैत्रीण मेघनास,
मला माहिती आहे मेघना तुला असंख्य प्रश्न पडले आहेत. आपले संबंध फारसे चांगले नसताना, माझे डोके कायम रागाने भरले असतानासुद्धा मी तुझ्या आजारपणात तुझी काळजी का घेतली? का रात्र-रात्र- जागून तुझी सेवा-शुश्रुषा केली? ज्या मुलीचे तोंडही बघायची मला इच्छा नव्हती तिची आठ दिवस अव्याहत काळजी मी का घेतली? असेच आणि हेच ते प्रश्न असणार.
मेघना मी तुझ्या आजारपणात तुझी केलेली सेवा म्हणजे माझ्या तुझ्याबद्धल केलेल्या सर्व चुकांचे, अपमानाचे, तुला नको नको त्या बोललेल्या शब्दांचे एक छोटेसे प्रायश्चित्त समज. एवढे करूनही माझे प्रायश्चित्त पूर्ण झाले आणि की नाही, माझ्या चुका मी सुधारू शकलो आहे की नाही हे मला माहिती नाही. पण एक वचन देतोतुला, यापुढेही जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मी धावून येईन, तुझी शक्य तेवढी मदत करेन. आणि हो ! तुझ्या इच्छेप्रमाणे आपली ही निर्मळ, निस्वार्थ मैत्री अखंड ठेवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन.
तुझा कायम मित्र
अरविंद
अरविंद
ती चिट्ठी वाचून संपली आणि मेघनाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू तरळले.
केतन शरद कुळकर्णी
९८९०१६९५४६
९८९०१६९५४६