आमच्या एरियात तीन जिवलग मित्र होते इतके की कधी पण पहा यांना एकमेकांशीवाय कधीच एकटे दिसत नसत व त्यांचे पान ही हालत नसे ,कधी ही बघा हे त्रिकुट एकत्र असायच, तुम्ही तिघे एकाच मुलीच्या प्रेमात पडलात तर कोण दोघ आपली कुर्बानी देईल एका साठी अस म्हणून आमच्या चाळीतिल बायका त्यांना हिणवत आणि हे सुधा मि मि मि करून त्यांना उत्तर देत.
अशी मैत्री मि आज पर्यन्त पाहिली नव्हती आणि पुढे पहाणार पण नाही.तिघाना पत्ते आणि क्यारम खेळण्याच भारी छंद, पट्ठे कुठे कार्यक्रमात वा लग्नाला गेले तर एकाच ताटात जेवायचे,जर कोणी या पैकि कोणाला पण नडत तर बाकीचे दोघे त्याचा चांगला समाचार घेत,एकाच वर्गात एकाच शाळा कॉलेजात शिकुन ही मूल मोठी झाली आता नोकरी साठी वेगळे होण्याची वेळ आली होती पण एकमेकांना क्षणभर वेगळ होउ न देणारी ही मुले ह्यावर सुद्धा त्यांनी एक उपाय शोधून काढला त्यांनी मिळून भुर्जी पाव ची गाडी सुरु केली,
पोरांच्या बोलघेवडया स्वभावा मुळे आणि मेहनती ने धंदयास चांगली बरकत आली होती, मैत्री साठी जीव टाकतील तर कोणाचा जीव ही घेतिल अशी ही पोर सर्वांच्या आवडीची होती .
चाळीत तिघे ही मोठयानचा मान राखनारे कोणाचेही मदतीला धाउन जाणारे असल्याने चाळीतिल लोकांना त्यांचा आधार होता,सगळ गुण्यागोविंदा ने दिस सरत होते पण का कुणास ठाउक बिचार्यांच्या मैत्रिला कुणाची तरी नज़र लागली आणि त्या तिघान पैकी एकाचा दुर्धर आजाराने मृत्यु झाला,
सर्वत्र एरियात शोककळा पसरली. बाकीचे दोघ तर ह्या धककयाने सावरत नव्हती .दोघांनी एकाच खोलीत स्वतः ला कोडुंन ठेवले होते तेही तब्बल पाच दिवस पण सहाव्या दिवशी ही दोघ एकदम हसत खेळत बाहेर आली जस की काहीच झाल नाही ह्या अविर्भवात.
सगळे आ वासून त्या दोघां कड़े पहात होते आणि हे दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून बाहेर आले पण त्यातील एकाचा अजुन एक हाथ अधान्तरी होता जस की त्याने ही कोणाच्या खांद्यावर हाथ ठेवला आहे असे पहाणार्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होते आणि हे दोघे कुणा तिसऱ्या व्यक्तिशी बोलत बोलत बाहेर आले पुन्हा सर्वंशी नॉर्मली पहिल्या सारखे वागत होते, पत्ते खेळताना तीन जनात वाटले जाउ लागले,क्यारम खेळत असताना चार जण लागतात त्यापैकि है दोघ आणि फक्त एक जन घेत,परत पहिल्या प्रमाणे एक च जेवनाच ताट वगैरे...
पण आता ह्या दोघांमधे बरोबर एक अदृश्य शक्ति वास करत होती........... जो गेला होता तो फक्त ह्या दोघांना च दिसत होता,पण खरच तो दिसतोय का ह्या दोघांचा भ्रम आहे ते काही कळेना.
पण हे दोघ सतत त्या न दिसणार्या व्यक्तिशी म्हणजेच त्यांच्या जिवलग मित्राशी बोलत असायचे.मित्राच्या जाण्याने ह्या दोघांच्या डोक्यावर परिणाम तर झाला नाही न अशी शंका येण स्वाभाविक होत.
तसे उपचार ही चालू होते पण बाकी ते व्यवस्थित वागायचे, बोलायचे त्यामुळे घरच्यानी पण लक्ष देण सोडून दिल.एक दिवस हे दोघ एका टापरी वर चहा प्यायला गेले असता त्यांनी तीन कटिंग ची ऑर्डर दिली पण ह्या दोघांना पाहुन टपरी वाल्याने दोनच कटिंग पोर्या कड़े देऊन पाठवल.
तेव्हा तीन कटिंग सांगून दोन का घेऊन आला म्हणून त्या पोराशी ते हुज्जत घालु लागले.शेवटी प्रकरण तापतय हे लक्षात आल्यावर त्या टपरी वाल्याने एक कटिंग भरून आणून मध्यस्थि केली तेव्हा त्यांनी तुझ्या टेबला पाशी असलेल्या क्रीम रोल च्या बरणी शेजारी ठेव आणि एक क्रीम रोल पण काढून ठेव तो धार मारायला गेलाय अस सांगून पाठवले थोड्याच वेळात ते दोघ चहाचे व क्रीम रोल चे पैसे द्यायला आले पैसे देताना त्यांनी तीन कटिंग आणि क्रीम रोल चे दिले आणि जाऊ लागले असता त्या टपरी वाल्याने मागून ओ भाऊ हयो चाय ........अस म्हणून कटिंग च्या कप कड़े नजर फिरवली तर पाहतो काय.... त्यातील चहा सम्पलेला आणि कपावर ठेवलेला क्रीम रोल ही नव्हता .
आधी त्याने स्वतःशी ह्याच दोघां पैकी कोणी तरी किवा दूसर फुकट गिरहाइक पिऊन गेल असेल अशी समजूत करून घेतली .
वास्तविक ती समजूत खोटी होती हे त्यालाही माहीत होत पण घड़लेल्या प्रकाराबद्दल तो घाबरून गेला होता.हळू हळू एरियात ही या प्रकरणाची कुज बुज चालू झाली होती.
ते दोघ जेव्हा आपापल्या घरी जायचे तेव्हा घरच्याना सुद्धा कोणी एक अजुन व्यक्ति आपल्या घरात असल्याचा प्रकर्षाने भास होत असे.
कारण जो गेला होता त्याला एक विशिष्ठ पणे हसायची व हसताना जोरात टाळ्या मारायची सवय होती आणि सेम त्या हसन्याचा व हसताना टाळी मारतानाचा आवाज वारंवार अनुभवास येत होता.
घरात तो जीवंत नसून सुद्धा जीवंत पणे वावरत होता .शेवटी कितीही जीवाभावाच माणूस गेल तरी त्या रात्रि त्याच्या रूम मध्ये जायची सुद्धा भिति वाटतेच न.
इथे हे भास वाढत चालले होते. असच काही दिवस जात राहीले पण तो असल्याचा भास वेळोवेळी जाणवून देत होता.
एक दिवस हे दोघ विचित्र काही तरी बोलायला लागले की मंग्या ( मृत पावलेला मित्र) आम्हाला बोलवतोय , तो तिकड एकटा पडलाय कंटाळलाय, अमच्याविना त्याच मन नाही रमत आम्ही पन जानार अस काहीबही बोलत असायचे.
पुढे एक दिवस त्यांनी ट्रेकिंग ला जायचा प्लान आखला घरात सर्व जरा खुश होते, कारण बरेच दिवसांनी काहीतरी नवीन बदल करण्याचा विचार केला होता निदान ट्रेकिंग ला जाऊन येताना फ्रेश माइंड ने येतील आणि नव्या उमेदिने परत भुर्जी पाव ची गाड़ी सुरु करतील....
जाता जाता हे दोघ एरियातील पोरांना मिठ्या-बीठया मारत (जस काय आता पुनः भेट नाही या अविर्भवात)त्या टपरी वाल्या कड़े आले आता ह्या वेळी त्यांनी दोन कटिंग ची ऑर्डर दिली सर्वाना वाटले आता नक्की हे सुधारले.
निघताना त्यांनी टपरीवाल्याला ये लास्ट कटिंग म्हणत जोरजोरात शिट्या वाजवत त्यांनी बाईक सुसाट पळवली ती डोंगराच्या दिशेने....दोन दिवसांनी बातमी आली की दरीत कोसळून त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यु झाला.शेवटी त्याने ह्यांना त्याच्या विश्वात बोलवून घेतले आणि हे दोघे ही आनंदाने गेले परत कधीच न येण्यासाठी............
प्रथम वाडकर