तिढा भाग 5
तिढा भाग ५
वास्तू माणसाचे वय सांगू शकत असावी का ?
तसं असेल तर कमलाकर दीक्षित नावाचा माणूस ऐतिहासिक काळापासून अस्तित्वात आहे हे मान्य करावे लागणार होते. त्यांची खोली असलेला तो वाडा तिथल्या रहिवाशांचे ठळक प्रतिनिधित्व करणारा होता. त्याचे जुनाटपण... ते नजरेला खटकणारे असले तरी मनावर प्रतिकूल परिणाम करणारे खासच नव्हते.
मी दाराला अडकवलेली जाडसर पितळी कडी वाजवली. एकदा, दोनदा....
दार उघडेच आहे, आत या ! एक अनुनासिक स्वर कानावर आला.
समोरच्या गादीवर कुंडल्या, पंचांगे, पुस्तके यांच्या ढिगाऱ्यात अख्खा माणूस शोधायला मला काही क्षण लागले.
किडकिडीत देहयष्टीचा माणूस, केवळ धोतर लावून तिथे बसला होता. हातात भिंग घेऊन एका कागदावर काहीतरी तपासण्याचे काम सुरु होते. त्यांच्यापासून काही हातावर दोन माणसे कागदांचा ढीग उपसत बसली होती. क्षणभर पंडितांच्या खोलीऐवजी आपण रद्दीच्या दुकानात तर शिरलो नाही अशी शंका मला चाटून गेली.
बोला, काय काम काढलेत ? त्याने कागदावरची नजर न हटवता मला विचारले.
मी सासऱ्यांचे नाव सांगताच त्याचा नूर पालटला. कपाळावर आठ्यांचे जाळे जमा झाले.
तुम्ही कोण ? त्याने सचिंत चेहऱ्याने विचारले.
त्याला काही सांगण्याऐवजी मी सासऱ्यांनी मला पाठवलेले पत्रच त्यांच्या हाती दिले.
पत्रातला मजकूर वाचतांना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव भराभर बदलत होते. कपाळावर घाम दाटू लागला. शरीराला सूक्ष्म कंप सुटला.
पत्र वाचून झाल्यावर त्यांनी खाली ठेवले. दीर्घ श्वास घेऊन डोळे काही क्षण बंद केले.
ते कसल्यातरी गहन विचारात बुडाले होते.
काहीतरी निश्चय केल्याप्रमाणे त्यांनी मुद्रा कठोर केली. हाताच्या खुणेने त्या खोलीतल्या दोघांना जाण्याचा इशारा केला.
ते दोघेही खोलीबाहेर पडताच त्यांनी दार बंद केले.
मी काही बोलणार तोच मला गप्प राहण्याची खूण करून ते जमिनीवर बसले.
पद्मासनात बसलेल्या दीक्षितांनी इशारा करताच मी त्यांच्यासमोर जाऊन बसलो.
त्यांनी दोन्ही हातांच्या करंगळ्यानी माझे कान बंद केले. तोंडाने अगम्य मंत्रोच्चार करू लागले.
ते शब्द... काहीच अर्थबोध न होणारे तरीही विलक्षण प्रभावी भासणारे ! विशिष्ट शब्द एका लयीत सांधून त्यांनी सुरेल मालिका साकारली.
त्या खोलीतले वातावरण बदलू लागले होते. माझे स्थळकाळाचे भान मात्र हरवले होते.
हे जे काही चाललेय, ते ऐकणारे माझे स्वतःचे मन नव्हतेच जणू !
एका नव्या मनाने जन्म घेतला होता. कोरे करकरीत... स्वच्छ, पूर्वग्रहरहित.. निष्कपट !
त्या खोलीत आता दीक्षितांचा धीरगंभीर स्वर घुमत होता.

या खोलीत मी दिशाबंधनाचा प्रयोग केलाय. आपल्या भोवती आता कोणत्याही दिशा नाहीत. बाहेरील कोणीही आपल्या मनात डोकावू शकत नाही. तुझी जाणीवही मी बांधली आहे. तुझा जन्म झाला, त्या क्षणातली एक निरागस स्मृती निवडून मी तुझी नवी नेणीव तयार केली आहे. या नेणिवेत फक्त माझे शब्द उमटतील. अन्य कशाचीही स्मृती तुला उरणार नाही. तू डोळे उघडशील तरीही तुला मी दिसणार नाही. आपला संवाद केवळ शब्दांच्या माध्यमातून चालणार आहे हे लक्षात ठेव !
यथावकाश मी डोळे उघडले. तो अवकाश पूर्णतः रिता झालेला होता. एका निर्वात पोकळीत मी बसलो होतो. काही वेळाने कानावर शब्द पडले.

स्मिता, ती कुणी सामान्य मानव नाही. अगदी दुर्मिळ पण तितक्याच भयंकर कुयोगावर तिचा जन्म झाला आहे. एका अमानवी शक्तीचे प्रचंड संहारक तत्व जन्मतः तिच्यात सामावले गेलेय. प्रत्येक शक्तीला स्वतःच्या सामर्थ्याची ओळख व्हायला एक संधी लाभावी लागते. ती मिळेपर्यंत स्मिताचा कोणालाच उपद्रव होणार नव्हता. पण लहानसहान प्रसंगातून स्मिता त्या शक्तीची अल्पस्वल्प जाणीव मात्र करून देत होती.
ती संधी तिला कशी मिळाली ? आणि तुमचा त्यात काय संबंध !... मी विचारले.
स्मिताची कुंडली तयार करण्यासाठी तिचे वडील माझी पायरी चढले आणि एका भयंकर संकटाची मला चाहूल लागली. तिच्या सुप्त शक्ती जागृत होण्याची संधी मिळू देऊ नये इतकेच आमच्या हाती होते.
ती संधी ? मी विचारले.
ती संधी म्हणजे तू ! विशिष्ट नक्षत्रावर जन्मलेला, विधुर आणि कन्या पदरी असलेल्या व्यक्तीशी तिचा संबंध जुळला की ती अघोरी शक्ती पूर्ण क्षमतेने उफाळून येणार होती. म्हणून मी तिच्या वडिलांना अशा कोणत्याही व्यक्तीपासून दूर ठेवण्याची ताकीद दिली.
पण आमच्या प्रयत्नांपॆक्षा दैवयोग अधिक बळकट ठरला. तुझ्याशी तिची गाठ पडली. तिच्यातल्या अमानवी तत्वाने उचल खाल्ली. तू केवळ निमित्त ठरलास. तिच्या आईवडिलांनी, भावाने खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिला हवी ती संधी मिळाली होती. त्यातच तिच्या भावाने तुला मारहाण करण्याचे अतिरेकी पाऊल उचलले. बस्स... त्या अमानुष शक्तीला लक्ष्य आणि भक्ष्य दोन्ही मिळाले. स्वतःच्या भावाला हालहाल करून तिने नाहीसे केले.
या घटनेनंतर तिचे वडील मला भेटले. पण तोपर्यन्त ती तुझ्या संसारात प्रवेशली होती. सर्व उपाय खुंटलेत. एकच बरे की, हे सर्व थांबावे असं तुला मनापासून वाटतेय. तोच एकमेव आशेचा किरण आहे.
पण स्वतःच्या आईवडिलांचा जीव घेईपर्यंत ? मी बोललो.
ती ज्या मितीतून आलीय, ती सर्व नात्यांपासून मुक्त आहे. तिथे महत्व असते ते केवळ अस्तित्वाला आणि स्वतःची शक्ती सिद्ध करण्याला ! बाकी नातिबंध केवळ आपल्यासारख्या मर्त्य मानवांसाठी !
मग मी आणि माझी मुलगी ? त्यांचं काय, आम्हाला तर कधीही धोका होऊ शकतो ! मी विचारले.
दीक्षित किंचित हसले असावेत...
नाही. तू, तुझी मुलगी आणि स्मिता.. तुम्ही तिघेही एका दुष्ट परंतु अत्यंत बलिष्ठ चक्राचा भाग आहेत. एकमेकांवर अवलंबुन असलेला तुमचा तिढा तोडण्याइतकी ती मूर्ख नाही. ज्याक्षणी तो तुटेल, त्याक्षणी ती शक्ती स्वतःचा घात करून घेईल. ती ताकद अफाट पण दिशाहीन होईल. त्या नादात आत्मघात ठरलेला असतो. म्हणून तुला आणि तुझ्या मुलीला कोणताच धोका नाही.
पण मग या सर्वातून सुटका कशी होणार ? माझी चिंता वाढली होती.
आहे.. मार्ग आहे. पण तो तुझ्यासारख्या मर्त्य, अशक्त मनाच्या माणसाकडून पूर्ण होणे महाकठीण आहे.
तुम्ही सांगा..मी नक्की प्रयत्न करीन ! मी कसाबसा बोललो. नाहीतरी माझ्याकडे पर्याय नव्हताच !
चार महिन्यांनी येणाऱ्या अमावस्येला तिच्या जन्मवेळचा कुयोग पुन्हा साधला जाणार आहे. या घटनाक्रमाला जिथून सुरवात झाली, त्या स्थानी तुम्ही तिघेही उपस्थित राहिलात तर काही क्रिया करून मी हे संकट निवारण्याचा प्रयत्न करू शकेल. आपल्या हाती तेव्हढेच आहे.
मी तातडीने होकार दिला.
पण हे चार महिने तू या गावात काढू नकोस ! योग्य वेळ येताच मी संदेश पाठवेन... जा तू आता !
एक गरम हवेचा झोत माझ्या चेहऱ्यावर पडला तसा मी भानावर आलो.
समोर कोणीच नव्हते. मी रस्त्यावर उभा होतो.
एक अंधुकशी आठवण ! बस्स त्याशिवाय काहीच नाही....

घरी पोहचलो तोवर दिवेलागण झालेली होती.
घराच्या पायरीवर राणी स्फुंदत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती दाटली होती.
मी तिला कुशीत घेऊन विचारले,
राणी, काय झाले ?
ती..ती आई बघा ना काहीतरीच झालीये तिकडे.... ती चाचरत उत्तरली.
दार उघडून मी आत गेलो.
स्मिता...
पलंगावर दोन्ही पाय छातीशी घेऊन बसली होती. अंगात नवीकोरी साडी होती. केस मोकळे.. मान गुढघ्यात दडवलेली !
स्मिता... मी ओरडलो.
तिने वर पाहिले..
तिच्या ओठांवर भयावह हास्य होते.. आणि ...
चेहऱ्यावर ठिकठिकाणी गोंदणखुणा उमटल्या होत्या...