मी ऐकलेल्या भुतांच्या गोष्टी खऱ्या की खोटय़ा ते माहीत नाही पण तरी ऐकलेल्या आहेत कारण मला भुतांच्या गोष्टी ऐकायला आवडतात .आणि हा ग्रूप खास भूतकथा साठी आहे.ज्यांना भूतकथा आवडतात तेच या ग्रुप मधे आहेत म्हणून ज्या कथा मी ऐकल्या आहेत त्यातली ही एक.. जी मी माझ्या ओळखीच्या काकूंनकडून ऐकली तिचं कथा मी लिहीण्यचा प्रयत्न करतं आहे ..ऐका तर मग ..
" विनोद एक साधारण 25 वर्षांचा तरुण ..व्यवसायाने ड्राईव्हर होता . लांब लांब ची भाडी घेऊन त्याचा उदरनिर्वाह करायचा . अशीच एक रात्र होती ...आमावस्या नव्हती तरी ती रात्र अंधारी होती .पाऊस मुसळधार होता . अशातच त्याच्या मित्रांना रात्रीची छोटीशी पिकनिक करायचा मोह झाला . त्या रात्री भाडं नव्हतं त्या मुळे विनोद ही तयार झाला. लग्न झालेली नसल्यामुळे बेफिकीर होते सर्व ..रात्री 9:30 च्या सुमारास ते घरून निघाले . मद्यपान धूम्रपान या दोन्ही पानांचा वापर सुरू झाला होता . पण जेवणाची सोय नव्हतीच . कोणतातरी ढाबा बघून जेवावे हाच विचार होता त्यांचा ..तसे खुप ढाबे आले आणि गेले . मुसळधार पाऊस आणि त्यात दोन दिवस लागून आलेल्या सुट्टया कदाचित याच कारणांमुळे सर्व ढाबे फुल झाले होते त्या रस्त्यावरचे ..एवढ थंड वातावरण आणि त्यात संध्याकाळ पासून काही खाल्लं नव्हतं कोणीच़ ..भूक तर लागणार नां ..चिप्सने अजून किती पोट भरणार ..त्यातच त्यांनी ठरवलं पार्सल घेऊ आणि कुठेतरी बसून निवांत खाऊ ..मग झालं त्यांनी एका ढाब्यामधून पार्सल घेतलं ..चिकन मटन जे काही घेतलं सर्व नॉन वेज पदार्थ ते घेऊन सर्व गाडीत बसले ..पाऊस अजून ही सुरू होता पण फक्त रिप रिप होती ..मुसळधार नव्हता ..कार मधून जाता जाता ते शांत पणे बसून जेवता येईल अशी जागा शोधू लागले आणि जागा नाहीच मिळाली तर कार मधेच जेवणार हे ही ठरलं .
विनोद व्यसनी नव्हता आणि असता तरी त्याला व्यसन करून चालणारं नव्हत. कारण तो गाडी चालवत होता .त्याने पेप्सी पियुन आपलं मनं भरलं होतं आणि तेच त्याच्यासाठी चांगलं होतं.आणि त्याची ही काही हरकत नव्हती कारण त्याला मद्यपानाची आवड नव्हती .त्या सर्वांमध्ये विनोद खुप जबबदारीने वागायचा .असो ..
वणवण करता करता ते बरेच दूरवर आले .. त्यांना एक जागा दिसली .एक पडीक बंद घरं होतं ..आजूबाजूला कसलीच वस्ती नव्हती ..शांत होतं वातावरण ..रातकिडे आणि वारा ...याशिवाय पावसाच्या रिप रिप चा आवाज येतं होता बाकी पूर्ण सन्नाटा . गाडी तिथेच पार्क करून त्या पडीक घराच्या आडोशाला ते पाच जणं जेवायला बसले . रस्त्यावरचे दिवे होते त्या मुळे इतका अंधार नव्हता . त्या विनोद च्या मित्रानं पैकी निनाद नावाचा त्याचा मित्र याला लघुशंके ला जायच होतं त्या मुळे तो त्या घराच्या मागे गेला .बाकी सर्व जेवण्यात मग्न होते .निनाद त्याचं काम आटोपून त्याच्या मित्रांच्या दिशेने जातच होता तोच कोणाचा तरी गुरगुरंण्याचा आवाज आला .त्याला वाटलं असेल एखादं कुत्रं पण नाही तो आवाज त्याचं ठिकाणी असलेल्या झाडाच्या मागून येतं होता हे त्याला जाणवलं ..पण त्याने ते दुर्लक्ष केल आणि मित्रानमधे येऊन जेवू लागला ...तोच पुन्हा गुरगुरण्याचा आवाज आला ..खुप भयंकर असा त्या आवाजाने पार्टी आणि पिकनिक च़ वातावरण क्षणांतच भेसूर झालं.. जेवण तसंच़ ठेऊन ते सर्व आजूबाजूला पाहू लागले ..पण आवाज ऐकू येतं होता कोणी दिसतं मात्र नव्हतं ..विनोद म्हणाला सर्वांना आपण जाऊ इथून कारण तोच एकटा शुद्धीत होता बाकी सर्व पियुन एकदम हलत डुलत होते ..थोडक्यात नशेत होते ..सर्व मित्र म्हणाले जेवून निघू असेल एखादं कुत्रं असं त्यांना वाटतं होतं कदाचित ..पण विनोद ला एक वेगळीच भीती वाटतं होती ..कारण ते ठिकाण निर्जन होत .आजूबाजूला झाडीच़ झाडी दूरदूर वर कोणीच दिसतं नव्हतं आणि त्या मुळेच तो त्याच्या मित्रांना तिथून निघायला सांगत होता ..त्यामुळे त्यांची भांडण झाली ..निनाद तापट स्वभावाचा असल्यामुळे बाजूला पडलेली काठी उचलून तो त्या आवाजाच्या दिशेने शिव्या घालत गेला ..आणि थोड्याच वेळात तो त्या घराच्या मागून मित्रांच्या दिशेने धावत आला व त्याच्या तोंडून " इथून पळा ..विनोद गाडी काढ " हेच शब्द बाहेर आले तो घाबरून थरथरत होता ..कोणाला काहीच कळलं नाही ..विनोद ने क्षणाचाही वीलम्ब न करता गाडी सुरू केली ..सर्व गाडीत बसणार तोच त्यांच्या दिशेने एक भयंकर.. केस लांब असलेला जवळपास सात फूट उंचीचा ..मळलेले घाण कपडे घातलेला आणि खुप विचित्र भयानक माणूस एखाद्या जनावरासारखा गुरंगुरंत धावत आला पण तिथं पर्यंत ते सर्व गाडीत बसले होते आणि त्यांच्या जेवणाने त्यांचा जीव वाचवला होता .कारण तो माणूस आला तर होता त्यांच्या मागे पण वाटेत ते त्यांच नॉन वेज जेवण पाहून एखाद्या प्राण्यांसारखा तो त्या जेवणावर तुटून पडून जेवत होता ..तिथपर्यंत विनोद ने सर्वांना घेऊन ते ठिकाण सोडलं होतं .विनोद ने सर्वांना सुखरूप घरी आणल होत . निनाद सारखा बॉडी बिल्डर त्या माणसाला घाबरला कारण कदाचित तो माणूस होता की अजून काही ..देव जाणे... पण त्या माणसाचे मोठे दात मोठी नख आणि विद्रूप चेहरा मजबूत शरीरयष्टी कोणीच विसरलं नाही .
काहीही असो तो माणूस होता की सैतान हे अनुतरित आहे ..त्या मुळे आडमार्गावर जाताना थोडा जपूनच जा ....
ही कथा मी माझ्या परीने जितकं चांगलं लिहिता येईल तितकं चांगलं लिहिण्याचा प्रयत्न केलाय ..बाकी तुम्हीच ठरवा कथा चांगली लिहिली गेली आहे की नाही .धन्यवाद .शुभ रात्री .