आज माझ्या मैत्रिणी चा फोन आला तिच्याशी खुप वेळ गप्पा मारल्या ..पण मग बोलता बोलता तिने मला तिच्या सोबत घडलेल्या एक विचित्र घटने बद्दल संगितले ..तीचा अनुभव मी माझ्या शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न करते ...ऐका मग ....
"काल एक थोडी विचित्र घटना घडली ..काल खुप पाऊस होता आजही आहे . शनिवार असल्याने आरामशिर होतं सर्व झोपण्याची घाई आजिबात नव्हती . तरीही रात्री एक च्या सुमारास मी झोपले .जाग आली ती कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने ...इतके भूकंत होते..मला वाटलं आता शांत होतील मग शांत होतील ..पण नाहीच ..शेवटी बेडरूम च्या खिडकीतून खाली वाकून पाहिल ...पाऊस धो धो पडतं होता ...गार वाऱ्याने अंगावर शहरा येतं होता ..मी रागाने कुत्र्यानां शिव्या घालत होते कारण माझ्या झोपेचं खोबरं झाल होत. खुप कुत्रे होते पण ते नेमके कोणाकडे पाहतं भुंकत होते तेच कळतं नव्हतं . शेवटी सर्व कुत्र्यानी जोरदार भुंकायला सुरूवात केली मी आपलं सहज पहिलं तर एक काळी आक्रुती होती तिच्या मागे ती सर्व कुत्री भुंकत होती ..पण ती आक्रुती हालत नव्हती की डुलत नव्हती..स्तभ्द तशीच उभी ..मी डोळे चोळून पुन्हा पाहिलं तरी तशीच शांत उभी ..मग काही वेळाने तिने हालचाल केली पण ती उलट्या पावलाने भयानक वेगाने धावत निघून गेली ..आणि कुत्री आपली भुंकत काहीशी घाबरत सैरावैरा पळत तिथेच घुटमळत राहिली . ती आक्रुती कोणं ? हा प्रश्न अजून प्रश्नच़ राहिलाय कारण मला ही माहीत नाही की ती कोणं होती आणि उलटी का धावत गेली ...त्या आक्रुतीला उलट धावताना पाहून माझा भयंकर थरकाप उडाला...कारण ती ज्या वेगाने धावली त्या वेगाने साधारण माणूस धावू नाही शकतं ..पण अजून ही प्रश्न अनुतरित आहे .".
असो तिने जसा सांगितला तसं मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय . हा ...अपुरी आहे ही गोष्ट मान्य आहे .
पण एक सांगू " खरे आलेले भुताचे अनुभव हें अपुरे असतात ..शेवट फक्त काल्पनिक कथा मधेच होतो" ..बरोबर नां ?????
----मानसी