एक पोस्ट वाचली म्हणुन माझ्यासोबत घडलेला किस्सा तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला म्हणून लगेच लिहीला काही गोष्टी आठवतात तर काही आठवत नाही जसे सुचले तसे लिहले काही चुकले तर मोठ्या मनाने माफ करा.
प्रत्येक गावात अशी एक जागा असतेच जिथे जायला आज पण भिती वाटते. मी लहान असताना आम्ही गावात राहायचो.आत्ता पण त्याच गावात राहतो पण गाव सोडून थोड लांब राहतो.आमच्या गावात जिथे आमची शाळा होती. तिथेच शाळेसमोर 150 वर्षापुर्वीचे पिंपळ अजून पण आहे.त्याभोवती गावकर्यांनी मोठा कट्टा बांधला आहे.
ते पिंपळाचे झाड जुने असल्यामुळे त्यांच्या फांद्या पण खुप पसरलेल्या होत्या.त्याच्या सावलीत मनमोकळे खेळायची आमची आवडती जागा.
अशीच शनिवारची आमची शाळा साडे दहा वाजता सुटली होती.
सगळी मुले घरी गेली होती. मी आणि माझा एक मित्र त्या पिंपळा खालच्या सावलीत बराच वेळ खेळत होतो.
आमच्या दोघांच्या डोक्यात काय आले काय माहीती. आम्ही दोघे पण त्या पिंपळाच्या झाडावरती चढलो नंतर काय झाले काय माहीती मी अचानक खाली पडलो. जिथून खाली पडलो ते आणि कट्ट्याचे अंतर तर खुप होते.
ऐवढ्या वरून खाली पडल्या पडल्या मी लगेच उठून बसलो. माझा मित्र घाबरला तो पटकन खाली उतरला त्याने मला कुठे लागलय का पहील पाहीले मला कुठेच साध खरचटल पण नव्हते. फक्त एका पायाचा तळभाग थोडा दुखायला लागला होता. मला माझ्या मित्राने उठून उभा केले.
आम्हाला मार खायला लागेल म्हणून घडलेली घटना आम्ही कोणाला सांगायची नाही हे पक्क ठरवून तसेच घरी गेलो.घरी कोणाला काहीच माहीती नव्हते संध्याकाळी तळपायावर खुप सुज चढली होती आणि पाय ठणकायला लागला होता.
पप्पा आल्यावर त्यांनी विचारल कुठे गेलता उद्योग करायला.
मी सांगितले शाळेतुन येताना काटा टोचला पायला त्यावेळेस आमच्या घरची परीस्थिती ऐवढी नव्हती की मला चप्पल घालायला मिळेल. त्यानंतर मग पप्पानी त्यावर कशाच्या तरी पानाचा लेप लावला.
तरीही मला रात्रभर कसलीच झोप लागली नव्हती. माझी आजी माझ्यासोबत जागी होती. मला खोदून खोदून विचारत होती.पण तिला काहीच नाही सांगितले.
दुसर्या दिवशी आज्जी माझ्या आई पप्पांना बोली मी ह्याला गावातल्या गुरवाकडे घेऊन जाते. मला ह्याच चरित्र काय बर वाटत नाही. मग आज्जी मला पाठीवर बसून त्या गुरवाच्या घरी घेऊन गेली.
मला त्या गुरवाच्या देव्हार्यासमोर बसवल त्यांनी देवासमोर हाथ जोडून काही तरी पुटपुटल आणि काही सेकंदानंतर माझ्यावर नजर फिरवली.
आणि रागात दिली ना मला एक ठेऊन आजी बोल्ली काय झाले का मारताय त्याला?
तुमच्या नातवालाच विचारा की त्याने काय पराक्रम केलाय तो?
मी खाली मान घालून मोठ मोठ्याने रडत होतो. आज्जी मला शांत करत होती.आणि विचारत होती नक्कीच तु काय तरी वेड वाकड केल असणार म्हणून त्यांनी तुला मारल असणार? सांग काय केलस ते तु? नाही सांगितले तर तुला इथेच बांधून टाकते, मग अजून खा मार.
मी आधीच खुप घाबरलो होतो आजी तशी म्हटल्यावर तर अजून घाबरलो..
मग मी माझ्या सोबत घडलेली घटना त्यांना खर खर सांगितली शाळेसमोरच्या पिंपळावर चढलो होतो.
आणि त्याच्यावरून पडलो म्हणून पायाला लागले.
माझ्या तोंडून हे ऐकून आज्जी खुप रागवली तीने पाठीवर धाडक्याने धपाटा टाकला मला तर काहीच सुचत नव्हते. उठून पळावे तर पाय सुजला होता.
मग आजीने त्या गुरवाने विचारले हा वरून खाली पडला म्हणतोय आणि ह्याच्या ऐकाच तळ पायाला कसे लागले?
तेव्हा त्या गुरूवानी मला विचारले त्या झाडाखालच्या सेंदूर लावलेल्या देवावर कोणता पाय देऊन वरती चढलास?
मी त्यांना माझा सुजलेला पाय दाखवला.
तसा आज्जीने परत एक धपाटा पाठीवर टाकला.
तुला काय डोक आहे का नाही देवावर पाय देऊन झाडावर चढलास आता देव तुझा पाय कापणार.
मी अजून घाबरून रडायला लागलो.
आजी माझी चुक झाली मी पुन्हा नाही जाणार त्याजागेत.
आज्जी म्हणाली देवा चुकल माझ पोरग त्याला माफ कर तो परत अशी चुक कधीच करणार नाही.
तसा तो गुरव बोल्ला देवाने फक्त तो पाय धरला जो देवाला लागला होता.नाही तर ऐवढ्या वरून पडून तुमचा नातू कसा वाचला असता.
मग त्यांनी आज्जीला त्यावर उपाय सांगितला.
तो करण्याआधी आजी मला तशीच पाठीवर घेऊन त्या झाडाखाली आली. तिने मला देवा पाशी जावून कान पकडून माफी मागायला लावली.
मी देवाची रडत माफी मागीतली नंतर आज्जीनी पप्पांना बोलवून घेतले.त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला पप्पा खुप ओरडले मला मी गप्प आपला आईला गच्च मिठी मारून बसलो होतो.
त्या रात्री पप्पांनी तो उपाय केला त्यानंतर मला थोडस बर वाटायला लागले त्या रात्री मला शांत झोप लागली सकाळीच जाग आली मी उठलो तसा पायाकडे लक्ष गेले निट पाहीले तर पायाची सुज कमी झाली होती.मी उठून उभा राहीलो हळू हळू चालत बाहेर आलो.त्यानंतर मी आजून पण त्या झाडाजवळ गलो नाही.
अजून पण तो पिंपळ पाहीला ना ती आठवण जस्सीच्या तस्सी आठवते त्याच बरोबर डोळ्यात आपोआप पाणी येते.
Miss You आज्जी
(आणखी एक माझ्या मित्राची उंची जास्त असल्याने त्याने देवावर पाय नव्हता ठेवला)