कथेचे नाव - अकल्पिता.. एक शापित रहस्य- भाग 3 -By दीपशेखर
योगी महाराज चंदननगर राज्यातून बाहेर पडले ते अकल्पिताच्या शोधातच. कारण सध्या घडत असलेल्या घडामोडी आणि चंदननगर राज्यावर आलेले घोर संकट त्यांनी हेरले होते. परिणामी अकल्पिता चा शोध घेणे हा एकच काय तो मार्ग उरला होता. त्यामुळे मजल दरमजल करत योगी महाराज महाराष्ट्र भूमीत दाखल झाले. एकूण ग्रहमान दिशा पाहता अकल्पिता याच भूमीत आपल्याला मिळेल हा अंदाज योगी महाराजांना एव्हाना आला होता. ते योग्य त्या ठिकाणाचा शोध घेत आणि ग्रहमान पाहत सरतेशेवटी पुणे या शहरात दाखल झालेच. पौर्णिमा खूपच जवळ अली होती. आणि अकल्पिता याच पौर्णिमेला तीच अस्तित्व सिद्ध करेल हे योगी महाराजांना माहिती होते. दुपारची वेळ होती. ते रस्त्याने चालले होते त्याच वेळी त्यांना एका ठिकाणी काहीतर वेगळे घडत असल्याचा भास झाला. हीच ते वेळ असं एका क्षणात त्यांच्या मनात येऊन गेलं. ते पटापट त्या दिशेने चालू लागले. जस जसे जवळ जात होते तस तसे त्यांना अकल्पिता चा आभास होऊ लागला. एका घराच्या समोर शेवटी ते थांबले. त्यांनी पाहिलं कि एक मुलगी भरधाव वेगाने गाडी चालवत आली आणि त्या घराचे गेट ओपन करून आतमध्ये गेली. गाडी तिने वाटेत तशीच लावली. तिच्या चेहर्यावरच तेज त्यांना जाणवत होत. त्यांनी फक्त त्या मुलीचे निरीक्षण केले आणि एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवला. थोडा वेळ ते तिथेच थांबले आणि तिथून थोड्याच अंतरावर असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात ते आले. पुन्हा एकदा सर्व ग्रहमान त्यांनी नीट तपासून पहिले. आजचा दिवस पौर्णिमेचा. एकूण परिस्थिती मिळती जुळती निघाली. मनोमन त्यांनी उद्गार काढले. "शेवटी चंदननगर राज्याची महाराणी अकल्पिता मिळली. हीच ती कन्या आहे जी महाराणी होती. फक्त आता गरज होती ती म्हणजे त्या कन्येला याची माहिती देणे. आणि ते कसे करायचे हे त्यांना माहिती होते. पण नियतीचा मार्ग मात्र वेगळाच
योगी महाराज चंदननगर राज्यामधून बाहेर पडलेल्या दिवसापासून पुढील १५ दिवस तेजाने खूप काही अनुभवले होते आणि अकल्पिताचा भास हि तिने अनुभवला होता. हे आपल्याच बाबतीत का घडते आहे हे तेजाला अजून समजले न्हवते. ती तिच्या खोलीत शांतपणे पहुडली होती. विचार करणे याशिवाय काहीच मार्ग तिच्याकडे शिल्लक न्हवता कदाचित आज. विचार करता करता कधी झोप लागली हे तिलाच कळले नाही. अचानक एक आवाज आला आणि तेजा जागी झाली. हा तोच आवाज आहे जो मी काल ऐकला होता. "तेजस्विनी. तेजसिवनी... मी कोण याचा जास्त विचार तू करू नकोस.. तुला या प्रश्नाच उत्तर हवं आहे ना. मग मी सांगते ते कर." तेजाला हा आवाज ऐकून आठवलं. अरे हा.. हा तर त्याच मुलीचा आवाज आहे.. कोण... ती अकल्पिता... आता मात्र खूप झालं. तेजा थोडी रागातच पण सावधानतेने त्या आवाजाच्या दिशेनं चालू लागली. बाहेर असणाऱ्या बाल्कनीत लख्ख प्रकाश पडलेला होता. पौर्णिमेचा चंद्र निखळपाने आपला प्रकाश पसरून आकाशात विराजमान झाला होता. त्या उजेडात एक मोहक आकृती उभी होती जी तेजाला अस्पष्ट दिसत होती. तेजा बाल्कनीत पुढे आली आणि तिने धाडस करून आवाज दिलाच. "कोण आहेस तू? आणि का मला असा त्रास देत आहेस? मी काय बिघडलं आहे तुज?" तिचे हे सर्व प्रश्न ऐकताच ती आकृती हसली आणि थोडी पुढे सरसावली. तशी तेजा थोडी घाबरली.
"घाबरू नकोस. मी कोणतंही भूत किंवा प्रेतात्मा नाहीये. मी अकल्पिता.. हे नाव मी तुला कालच स्वप्नात आणि तुज्या कवितेत सांगितले आहे. मी इथे आलेय कारण मला तुजी मदत हवी आहे."
"माझी मदत?" तेजा थोडी हैराण झाली. " मी तुला काय मदत करणार."
"तेजस्विनी तुझा जन्म झाला तो मुळात माझा पुनर्जन्म आहे. खूप खूप वर्षांपूर्वी माझा जन्म चंदननगर राज्यात झाला आणि तिथेच मी राणी म्हणून वाढले आणि पुढे त्याच राज्याची महाराणी झाले. खूप सुंदर आणि निसर्गाने नटलेलं माझं ते राज्य त्यावेळी एका विलक्षण संकटात सापडलं आणि त्या संकटाचा नायनाट करता करता मला माझे प्राण गमवावे लागले."
"असं काय संकट होते ते कि जिथे तुला तुझा जीव गमवावा लागला?"
"ते तुला नक्कीच समजेल. त्यासाठी तुला इथेच समोर असणाऱ्या शिवालयात आलेल्या योगी महाराजांची भेट घ्यावी लागेल. ते तुला तो पूर्ण इतिहास सांगतील."
"पण मग जर त्यावेळी ते संकट पूर्ण नष्ट झाले आहे तर आज परत तू का आली आहेस? मला काहीच समजत नाहीये?"
"मी परत आलेय कारण आता ते संकट पुन्हा एकदा आलेले आहे. आणि त्याचा नायनाट करणं हे फक्त मलाच म्हणजे माझा पुनर्जन्म घेतलेली तू.. तुलाच हे जमू शकत. बाकी कोणी काहीच करू शकत नाही. करशील ना तू या कामात माझी मदत."
"अरे काहीही काय बोलत आहेस तू. मी काय मदत करणार आहे. एवढी ताकद नाहीये माझ्यात. उगाच काहीही बोलू नको."
"ताकद खुप आहे तुझ्यात फक्त तुला तिची जणीव झालेली नाहीये अजून म्हणून तू असं बोलत आहेस. तू फक्त एक काम कर उद्या सकाळी शिवालयात असणाऱ्या योगी महाराजांना भेट आणि तुज्या उरलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे तिथे मिळतील. माझ्याकडे सध्या खूप कमी वेळ आहे. माझं काम इतकच होत कि तुला अकल्पिता ची जाणीव करून द्यायची बाकी सर्व कार्य आता योगी महाराज करतील. तुला यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. वेळ खूप कमी आहे. लवकर निर्णय घे. ती काळरात्र जवळ येत आहे. सर्व खुलासा योगी महाराज करतीलच."
एवढं बोलून अचानक ती आकृती त्या अंधाऱ्या रात्रीत नाहीशी होऊ लागली. तशी तेजा पुढे सरसावली.. "थांब मला पूर्ण काय ते सांग मग जा तू...." पण काहीच उपयोग झाला नाही. ती आकृती नाहीशी झाली होती. बाल्कनीत इजा एकटीच उभा होती. आकाशात असणाऱ्या चंद्राला पाहत ती शांत उभी होती.
योगी महाराज.... त्याना भेटायलाच लागेल. तेजाने मनात काहीस पक्के केलं आणि ती परत खोलीत आली.

इकडे योगी महाराज शिवालयात ध्यानस्थ होते. या कन्येला लवकरात लवकर चंदननगर ला घेऊन गेले पाहिजे अन्यथा खूप मोठा अनर्थ घडेल. हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे ते त्यांच्या कार्यास विलंब होऊ नये याचा जास्त विचार करत होते.
नियतीची किमया अपरंपार.. तेजाला अकल्पिता बद्दलची ओढ वाढली होती आणि काळ रात्र आता जवळ येत होती.
अजून सूर्य उगवायचा होता तोवरच तेजा जागी झाली.. दिवस सोमवार होता.. साहजिकच तेजा आवराआवर करू लागली.. जरी जास्त शिकलेली असली तरी तेजा देवधर्म आणि परंपरा यावर विश्वास ठेवणारी होती.. तसे संस्कार तिच्या घरी रुजवले होते... तेजा गडबडीने आवरत होती.. तिची ती धांदल इतक्या वेगात चालू होती कि तिची आई त्यामुळे जागी झाली... आईने तेजाची चाललेली गडबड पहिली.. एका क्षणासाठी मनात आलं कि तिला विचारावं पण जाऊदे असेल काहीतरी गडबड आज तिची.. असा विचार करून आई पुन्हा झोपी गेली... सर्व काही आटोपून तेजा घराबाहेर पडली... मनात थोडी भीती होतीच.. पण जे काही घडत आहे.. ते कुठे तर जाऊन थांबलंच पाहिजे... हे तिलाही माहिती होत.. गेल्या काही दिवसात जे काही अनुभवलं आहे ते तिच्या विचारशक्तीच्या पलीकडचं होत आणि भयानक... अकल्पिता... कोण आहे आणि काय हे एकदाच समजलंच पाहिजे.. म्हणून ती बाहेर पडली होती.. आज काय तो विषय संपवायचाच... या विचारात चालत असताना कधी मंदिरात ती आली हे तिला कळलंच नाही..
"तेजस्विनी... ये मी तुझीच वाट पाहत होतो.. मला माहीत होत तू येशील.. " योगी महाराजांच्या त्या आवाजाने विचारात मग्न झालेली तेजा भानावर आली..
"मी येणार... हे तुम्हाला माहिती होत... म्हणजे मी काल रात्री जे काही अनुभवलं ते सत्य होत तर.. " तेजा..
"होत ते सत्यच होत आणि तुला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच मी येथवर आलो आहे.." योगी महाराज
"प्रश्न.. खरेच खूप प्रश्न पडले आहेत मला.. अकल्पिता... कोण आहे ही..? तिचा आणि माझा संबंध तरी काय आहे..? आणि मीच का? मला काहीच समजत नाहीये.. " तेजा..
"अकल्पिता.... मुली अकल्पिता ही महाराणी होती.. हिमालय पर्वत रांगेत वसलेल्या चंदननगर राज्याची महाराणी अकल्पिता.. खूप वर्षांपूर्वीची ही घटना आहे.. तेव्हा नुकतेच मुघल साम्राज्य संपलं होत आणि ब्रिटिश इंडिया कंपनी हळू हळू हिंदुस्थानवर आपली सत्ता स्थापन करत होती.. एक एक करत खूप संस्थाने आणि राज्ये इंग्रजांना बळी पडत होते आणि जो तो गुलामगिरी मध्ये अडकत चालला होता.. अशावेळी चंदननगर या सर्वापासून अलिप्त एका बाजूला आपला कारभार पाहत होते... निसर्गाने बहरलेल्या या साम्राज्यावर मुघलांची नजर खूप वेळा पडली होती पण इथे असणाऱ्या भयावह दाट जंगलांमुळे आणि जिगरबाज सैन्यामुळे मुघल हतबल झाले होते.. आणि त्यांनी तो प्रयास सोडून दिला.. पण प्रत्येक वेळ आपलीच असते असं नाही.. वेळ बदलते.. चंदननगरच्या बाबतीत ही तेच झाले... आजवर सुखाने चाललेलं हे साम्राज्य इंग्रजांनी मात्र एका वेगळ्याच पद्धतीने बळकवायचे ठरवले.. तेव्हा महाराणी अकल्पिता आणि हे साम्राज्य पूर्णपणे या प्रकारापासून अनभिज्ञ होत.... "
एक मोठा सुस्कारा सोडत योगी महाराज पुन्हा बोलू लागले..
" त्यावेळी सरळ मार्गाने हे राज्य मिळत नाहीये पाहून इंग्रजांनी एक भयानक मार्ग निवडला जो त्या साम्राज्यासाठी खूपच भयानक ठरला आणि घातक ही.. पण महाराणी अकल्पितानी शेवटच्या श्वासा पर्यंत लढा देत ते संकट ही परतवले पण त्यात त्यांना मृत्यू आला.. "
"असा काय प्रकार होता तो.. ज्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले..? " तेजाने मधेच प्रश्न केला..
"चंदननगर राज्यात एक अशी जागा होती जी काळ्या जादूने मंतरलेली होती आणि पूर्वजांनी ती जागा मोठा यज्ञ करून बंदिस्त करून ठेवली होती.. त्या शक्तीचा नायनाट करण शक्य नसल्याने त्या बंदिस्त करण्यात आल्या होत्या.. ही गोष्ट महाराणी अकल्पिता आणि त्यांचे सावत्र बंधुराज वीर्यसेन या दोघांनाच माहितज होती.. महाराजांच्या मृत्यूनंतर साम्राज्याचा सर्व कारभार महाराणी कडे आला करण वीर्यसेन तितके पात्र न्हवते.. आणि प्रजेची निवड ही महाराणीना होती... पण नेमकी हीच सूडभावना मनात ठेवून वीर्यसेन मनात राग धरून होते.. आणि याचाच फायदा इंग्रजांनी घेतला.. वीर्यसेनना गादीचे लालच देऊन हे साम्राज्य आपल्या ताब्यात करण्याचा कट इंग्रजांनी केला.. युद्ध हा मार्ग नाही हे त्यांना लक्षात आलं होत.. इंग्रजांच्या या खोट्या अमिषाला बळी पडूनच वीर्यसेनने एक भयानक निर्णय घेतला... तो म्हणजे त्या काळ्या जादूला मुक्त करण्याचा निर्णय.. त्याशिवाय अकल्पिताचा अंत होणे नाही हे त्यांना माहिती होते.. आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी ते भयानक पाऊल उचलले.. "

"ती रात्र अमावस्येची होती.. महाराणी त्यांच्या दालनात आराम करत होत्या.. वीर्यसेन आपल्या सोबतीला काही साथीदार घेऊन त्या जागी पोहचले.. त्याअगोदर महाराणीना याबद्दल काहीच कळू नये यासाठीची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती.. तिथे पोहचताच वीर्यसेनने ती मंतरलेली जागा मोकळी करण्यास सुरवात केली.. मंतरलेले सर्व धागे आता हळू हळू सोडून टाकले गेले आणि त्या खोलीचा तो दरवाजा मुक्त झाला.. अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाला.. वीजा कडकडू लागल्या.. चित्रविचत्र आवाज येऊ लागले.. वीर्यसेन थोडा वेळ घाबरला.. पण धाडस करून त्याने तो दरवाजा लोटला.. तसा एक महाभयानक आवाज झाला आणि त्या शक्ती जागृत झाल्या.. त्या महाभयानक आवाजाने अकल्पिताला जाग आली.. त्यांच्या लक्षात आलं कि काहीतरी भयानक होत आहे..
त्या शक्तींनी बाहेर पडताच आपला विनाशकारी अवतार दाखवायला सुरवात केली. त्या भयानक चित्काराने अर्धमेली झालेली विरसन आणि त्याचे साथीदार थोडेसे सावध झाले. कारण आता काहीतरी भयानक होणार हे त्यांना जाणवू लागले. आपण काही चुकी तर केली नाही ना असा प्रश्न हि त्यांना पडला होता. पण आता काहीच उपयोग न्हवता कारण वेळ निघून गेली होती. सर्वात शेवटी उभा असणारा एक सैनिक काहीतरी जाणवले म्हणून मागे पाहू लागला तोच त्याच्या मस्तकावर एक जोरदार प्रहार झाला आणि त्याच मस्तक धडापासून वेगळं झाले. ते मस्तक उडून त्या दरवाजा वर पडले तसे त्या दरवाजावर मस्तकाचे रक्त वाहू लागेल. पाहता पाहता तो दरवाजा रक्ताने माखला गेला आणि दरवाजातून एक आवाज आला. खूप दिवस वाट पहिली मी या क्षणाची. आज किती दिवसांनी हा काळोख संपतो आहे. तो आवाज खूपच भयानक होता आणि क्रूर होता. त्या आवाजातला तो क्रूरपणा तिथे असणाऱ्या सर्वाना घामाघूम करून गेला. आता आपण इथून पळून गेलेलं चांगलं आहे हे लक्षात येताच जो तो सैरावैरा धावू लागला. त्या शक्तींनी आता एक एक सावज हेरून त्यास मारायला सुरवात केली. धावत असताना काही अचानक हवेत भिरकावले गेले आणि हवेतच त्यांच्या शरीराचे हजारो तुकडे झाले. नजरेसमोर फक्त रक्ताचं आणि त्या शरीरांच्या तुकड्यांचा खच लागलं. ववीरसेन पुरता घाबरून गेला. आपण खूप मोठी चूक केली हे त्याच्या लक्षात आलं. आता तो आणि त्याचा एक साथीदार फक्त उरले होते. त्याचा साथीदार थरथर कापत होता. अचानक वीरसेनचा पाय खेचला गेला आणि तो झाडाला उलट लटकला गेला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा साथीदार समोर गेला तोच एक मोठी सावली समोर आली. तीच ते अक्राळ विक्राळ रूप पाहताच तो जागच्या जागी थांबला. भूत म्हणावं कि कोणी राक्षस. मोठेच्या मोठे रानटी केस, कान एकदम मोठे, डोक्यावर एकच मदोमध शिंग, डोळे आग ओकत होते, हाताच्या नख्या खूप मोठ्या होत्या, रक्ताने माखलेले तोंड.. असा तो भयानक अवतार पाहताच तो साथीदार जागीच बेशुद्ध झाला. वीरसेन हि ते रूप पाहून खूप घाबरला होता. त्या राक्षसी माणसाने आपल्या हाताच्या नख्यानि त्या साथीदाराचे शरीर फाडले आणि रक्त पिऊ लागला. त्याच ते भयानक रूप आणि रक्त पिताना पाहून विरसेन कधी बेशुद्ध झाला हे त्यालाच कळलं नाही.
इकडे राजवाड्यात....
"कशाचा असेल हा आवाज. काहीतरी भयानक नक्कीच घडले आहे." अकल्पिता मनातल्या मनात बोलली. त्यांचं लक्ष समोर असणाऱ्या मंदिरात गेल आणि त्यांनी मनोमन प्रार्थना केली "हे वैष्णोदेवी आम्हा सर्वांचं रक्षण कर."
वीरसेनाने त्या बंदिस्त खोल्यांचे दरवाजे उघडून राक्षसी शक्तींना मोकळीक दिली होती आणि हे अकल्पिताच्या लक्षात लगेच आले होते कारण दूर बंदिस्त असणारी ती जागा आज प्रकाशनाने लख्ख दिसत होती. याचा अर्थ तिथे कोणीतरी आहे. सरसेनापतींना लगेच निरोप पाठवला गेला त्वरित राणीसाहेबांना भेटायला यावे" राणीसाहेबांचा निरोप आहे म्हणजे काही विपरीत घडले असणार हे सरसेनापती ना लक्षात आले त्यामुळे ते त्वरित रवाना झाले. अकल्पिता आणि सरसेनापती दोघेही काही सैनिकांना घेऊन त्या बंदिस्त जागेकडे निघाले. जस जसे पुढे जल तसतसे त्या भयानक शक्तींचा सहवास अकल्पिताला जाणवू लागला. त्या जागेवर पोहचताच त्यांनी पहिले कि वीरसेन तिकडूनच येत आहे.
"वीरसेन" अकल्पिता त्याला पाहून थोडी हैराण झाली. "तुम्ही इकडे काय करत आहे? आणि इतके घाबरला का आहेत?"
"राणीसाहेब काहीतरी भयानक झाले असावे असे मला वाटले म्हणून मी इकडे पाहायला आलो होतो." असं बोलत त्या भयानक घटनेचा सर्व वृत्तांत त्यांनी राणीसाहेबाना सांगितला. पण ते दरवाजे त्यांनी स्वतः उघडले आहेत हे मात्र सांगितले नाही.

ती सर्व घटना ऐकताच राणीसाहेब खूप काळजीत पडल्या आणि त्यांनी तातडीने योगी महाराजांना बोलावण्याचे फर्मान सोडले. सर्वजण परत राजवाड्याकडे आले.
क्रमशः