🌕भाग::- एक🌕
शारदा ताई पाच दिवसापासून अगदी बैचेनीनं वावरत होत्या. हे पाच दिवस खुपच खडतर गेले होते व पुढे अजुन काय वाढुन ठेवलंय हे आजमितीला काहीच कळत नव्हतं. कश्मिराला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं व ती रुबी हाँलच्या आयसीयुमध्ये शांत पहुडली होती.पण ती शुद्धीवर आल्यावर काय वादळ निर्माण होईल याच विवंचनेत शारदा ताई होत्या.
पंधरा दिवसापुर्वी मनाली ट्रीपवर निघतांना कश्मिरा किती खुश होती.निलेशला आपण एकवेळ नजरेखालुन घालावं व निर्णय द्यावा म्हणुन किती खटपट करीत होती.एवढ्या भल्या पहाटे सहलीला जाणाऱ्या लक्झरीपर्यत मोपेडनं घेऊन गेली व लांबुनच दाखवत ,"ताई,तुला आवडत असेल तर सांग!म्हणजे मग मी त्याला प्रपोज करेल."."अगं पण त्याच्याशी मला बोलू तर दे.कोण कुठला?निदान इतकं तरी विचारू दे,असल्या गोष्टी अशा उभ्या उभ्यानं रस्त्यानं होत नसतात".ताईनं धुरकट उजेडात त्या मुलाला पाहत शेरा मारला.
"ते काही नाही ताई तुला पसंद आहे का ते सांग फक्त,नी बोलायला मीच त्याला अजुन कुठं काही विचारलंय.फक्त तुझं मत सांग आधी मग या दहा दिवसाच्या सहलीत करते मग प्रपोज."
"काय वेंधळी आहेस तु!नाकी डोळ्यानं ठिक आहे,नजर तर तुझ्यासारखीच निळी आहे, पण कुटुंब,गाव,जा....काय हे तर कळू दे आधी"ताई इतकं उच्चारताच"ताई बाकी ते मी पाहते असं म्हणत ती घाई घाईनं लक्झरीत बसली. ताईनं तिला प्रवासात काळजी घे,तब्येतीला जप व दररोज काँल कर अशा सुचना दिल्या.सुरत,उदेपुर,जयपुर दिल्ली चंदीगड,अंबाला,अमृतसर वाघा बाॅर्डर,मनाली करत करत आठ दिवस झाले .दररोज फोन यायचा.किती भरभरून बोलायची करिश्मा.नी परतीचा प्रवास सुरु झाला. बरोबर दुपारी बारा फोन आला,नी ती बातमी ऐकुन आपल्या पायाखालची जमीनच जणु सरकली.पुढच सारं सुन्न करणारं.गुजरात मधुन सापुतारा व्हाया नाशिक येत असतांनाच अहवा डांगच्या जंगलात धबधब्या जवळ फोटोसेशन करता करता दरड काय कोसळावी व नेमक्यादोनशे-अडिचशे मुलात करिश्मा व निलेश परमारच सापडावा.वरुन दगडाचा मारा अंगावर घेत निलेश नं करिश्माला बाजुला ढकललं .ती दरीत कोसळली व आदळत आदळत एका झाडावर अडकली पण निलेश दरडीचा दगड मातीचा पुरा खच अंगावर घेत दरीत खोल खोल गेला. साऱ्या मुलाच्या आरोळ्या व कोलाहलानं एकच आक्रोश माजला.स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीनं लगेच शोधकार्य आरंभलं व अवघ्या दोन तासात दोघांना बाहेर काढलं व तेथुन नाशिक ला दवाखान्यात व तेथुन लगेच इथं आणलं.काय होतयं काहीच कळत नव्हतं.घटनेला चोविस तास उलटुनही महाविद्यालयानं संपर्क करुनही निलेशच्या घरचे कुणीच आलं नाही. डाँक्टरांनी तर स्पष्ट शब्दात सांगुन टाकलं कि मुलाच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यानं तो कोमात गेलाय.पुढचा निर्णय तात्काळ घेऊनन मुंबई दिल्लीला रेफर केलं पण तरीही उपयोग होईलच असं काहीच सांगता येत नाही. करिश्मा बाबत मात्र धोका नसल्याच सांगताच आपणास किती हायसं वाटलं.काॅलेज नं वारंवार संपर्क केल्यावर निलेश च्या घरची मंडळी आली.वडील , काका व इतर ताफा आला.निलेशला आय सीयुमध्ये लांबुनच पाहताच हंबरडा फोडला. भर ओसरल्यावर डाॅक्टरांना भेटले.डाॅक्टरांनी पेशंट पुर्णता कोमात गेलाय उपचार करुन किती जगेल काहीच सांगता येत नाही.एकवर्ष, दहावर्ष, तीस वर्ष काहीही सांगता येणार नाही व जगला तरी चालणं बोलणं फिरणं काहीही शक्य नाही.हे ऐकुन साऱ्यांचाच धीर खचला.नेमकं काय घडलय हे जाणून घेतांना सहलीत दरड कोसळली सर्व मुले पास झाली पण निलेश व एक मुलगी नेमके मागे असल्यानं हेच त्यात आली.हे कळल्यावर जातांना वडील करिश्माला पाहण्यासाठी आले.लाबुनच झोपलेली पाहुन परत निघाले .आणि बाजुला उभं राहुन पाहताच आपल्याला एकदम धक्काच बसला.व आपण सर्र्कन त्यांना दिसणार नाही अशा आडोशाला सरकलो व पुन्हा तीस पस्तीस वर्षाचा काळ आठवला.
सिदाजी परमार हे निलेशचे वडिल! पिलाणीचे सिदाजी परमार.त्या प्रसंगातही करुणेची जागा संतापानं घेतली व सारं अंग थरथरू लागलं.
नर्मदेकाठावर जनाजी परमाराची गढी म्हणजे सातपुड्यातील वाघाची जाळीच.सिदाजी व उदाजी आपल्या आत्याची मुलं.आपली परिस्थिती बेताची असल्याने व आईविना पोरकी पोरं वडिलांनी बहिणीकडं म्हणजे जनाजीरावाकडंच ठेवली.आत्याकडं ढोर मेहनत करत करत ,मोठं होत होत शिक्षण होऊ लागलं.सिदाजीराव आपल्यापेक्षा चार वर्षांनी थोर. वयात येतांना सिदाजी रावांनी आपल्याला केव्हा कह्यात घेतलं हे आपल्यालाच काय पण आत्याला व खुद सिदाजी रावांनाही कळालं नाही.गरीब स्वभावाच्या आत्यानं भावामार्फत जनाजीरावाच्या कानावर घातलं.पण घराण्याच्या,इभ्रतीच्या,पैशाच्या उन्मादात व आढ्यतेत वडिलांना"आमच्या सिदाजीरावांना जावई करण्याची तुझी लायकी तरी आहे का?आमच्या उष्ट्या पत्रावळीवर वाढणारेतुम्ही!"असं धमकावत गढीचा दरवाजा कायमचाच बंद केला.गढी उतरतांना आपण मुक्या गाईगत सिदाजीरावाकडं आशेनं पाहत होतो.पण सिदाजी रावाच्या डोळ्यात खानदानी आढ्यता भोगवादी वृत्तीखेरीज काहीच दिसलं नाही.बापानं रडत रडत भावास व आपणास लासुरास आणलं.पण या धक्क्यातुन बाप सावरलाच नाही.जो अंथरुणास खिळला तो कायमचाच.बापानंतर भावानं मोठ्या हिकमतीनं घर तर सांभाळलंच पण आपणास जळगाव ला मराठा काॅलेजही केलं.व आपणही ढेच लागल्यानं शिक्षण पुर्ण करून पुण्याला इनामदार कॅम्पसला बॅंकेत नोकरीही पटकावली.पण नियतीनं आपल्यापुढं वेगळच वाढुन ठेवलं होतं.सिदाजीरावानंतर लग्न करावं हि इच्छाच मेल्यानं व शिक्षणाकरिता लग्नास तुर्त नकार दिल्यानं भावाचं लग्न आधी उरकलं.पण करिश्मा एक वर्षाची होत नाही तोच भाऊ व वहिणी अपघातात गेले.करिश्माचं दैव बलवत्तर म्हणुन ती वाचली.व हिच करिश्मा आज आपली आधार बनलीय.आपण ही तिला भावाची मुलगी न मानता आपलीच मुलगी मानली .आपल्याला आपली आत्या झाली नाही पण आपण आत्याचं कर्तव्य करुन दाखवू या विचारानं पुरं आयुष्य अविवाहित काढलं.त्याच करिश्मानं जोडीदार जो निवडलाय तो सिदाजीचा मुलगा! नाही ,काहीही झालं तरी ज्यानं आपल्याला धोका दिलाय,त्याच्याच घरात करिश्माला जाऊ द्यायचं नाही.शिवाय निलेशही पुरता कोमात गेलाय.त्याचा जगण्याचा काहीच भरोसा नाही.व आता तर ते दिल्लीला घेऊन जाताहेत.हिच संधी आहे.
करिश्मा पाच दिवसानंतर हळुहळु शुद्धीवर येत होती.डाॅक्टरांनी तिला स्पेशल रूम मध्ये शिफ्ट केली.इकडे शारदा ताईनं आपल्या ओळखीनं निलेश चं काॅलेजचं सारं रेकार्ड पत्ता वैगेरे गायब केलं.मोबाईल तर आधीच दरडीच्या ढिगाऱ्यात गेलाच होता दोघांचा.शारदा ताईनं मनोमन पुरता बेत केला.
सहाव्या दिवशी करिश्मा शुद्धीवर येताच ताईकडं पाहत "ताई, निलेश कुठंआहे?"म्हणुन चौकशी केली ताईनंही "अगं तो सुरक्षित आहे व दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट केलंय"अशी बतावणी केली.करिश्मानं त्याला भेटायचय मला असा आग्रह धरला तेव्हा तु आधी बरी हो घरी जाऊ मग आपण भेटू,अशी समजुत घातली.
दोन दिवसानंतर करिश्मा लाघरी आणलं .पण तिचा तोच पाढा कि मला निलेश शी भेटायचंय किंवा फोनवर बोलु तरी दे,म्हणुन आग्रह करू लागली.पण ताई नं "अगं तुमचे दोघांचे फोन दरड कोसळली तिथंच हरवले ना मग फोन कसा लागेल त्याला?
तु आधी बरी हो मग पाहु आपण.पण तिला चैन पडेना असं करत करत ताईनं घरी येऊन पाच सात दिवस जाऊ दिले .तिच्या तब्येतीत सुधार पडतोय हे पाहुन मग तिला शांत बसवत "करिश्मा मन घट्ट कर मी सांगतेय ते शांतपणे ऐक,निलेश......."डोळ्यात अश्रु आणणयाचा प्रयत्न करत पोरी Hi is no more.....त्याच दिवशी घटनास्थळी च त्याचा अंत झाला होता पण तुझीही परिस्थिती नाजुक असल्यानं मी दवाखान्यात तु शुद्धीवर आली तेव्हा खोटंच सांगितलं तुला पोरी"
पण पुढचे शब्द करिश्माला ऐकुच गेले नाही व तिनं सारा हाँल डोक्यावर घेत एकच आक्रोश केला"नाही माझा जीव वाचवुन तो जाऊच कसा शकतो!"ताई तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होती पण ती हातानं केस ओढत तर कधी भिंतीवर डोकं आपटत हंबरडा फोडत होती.ताईनं तिचा भर ओसरु दिला नी मग "पोरी नियती व प्रारब्धापुढं कुणाचं काहीच चालत नाही,तुला आता स्वतःला सावरावंच लागेल.तो तुझ्या जिवनात आलाच नाही असं समजुन झालं गेलं विसरुन आपल्या करिअरवर लक्ष दे." अशी बऱ्याच वेळ समजुत घातली.
ताईनं पुढचे पंधरा दिवस रजा घेऊन तिला मुद्दाम हैद्राबाद, तिरुपती,उटी,रामेश्वर,कन्याकुमारी फिरायला घेऊन गेली.
पण करिश्मा एकदम अबोल झाली. शुन्यात पाहत ति तासनतास उभी राही तर कधी ताईचा मोबाईल घेऊन निलेशचा नंबर डायल करी.पण व्यर्थ नी मग पुन्हा ह्रदय पिळवटून टाकणारा टोहो फोडी.ताईला हे सारं समजे पण तिचा नाईलाज होता.
परत आल्यावर दिवसामागुन दिवस जाऊ लागले .ताईनं मग तिला काँलेजला पाठवायला सुरुवात केली.पण कालेजात गेल्यावर तिला कँटीन मध्ये निलेश व ती बसायचे तो टेबल दिसताच गरगरायला लागलं व आतुन एकदम उमाळा दाटला तशी ती गर्कन माघारी घरी परतली.घरात किती तरी वेळ तिनं स्वतःला कोंडुन घेतलं.निलेश!निलेश!का रे असं वागलास?मी पण तुझ्यासोबणच दरडीत सापडत असतांना मला दुर लोटत स्वतःच्या अंगावर दरड घेत का मला एकटीला टाकून गेलास?
कितीतरी वेळ ती रडत होती व निलेश आपल्या जिवनात कसा आला आठवत होती. आबेदा इनामदार कँपसला एमबीबीएस ला प्रवेश घेतला .काँलेज अभ्यास प्रँक्टिकल सारं कसं सुरळीत सुरु होतं.पहिलं वर्ष संपलं.
आपल्या काँलेजच्या प्रशस्त इमारतीला लागुनच बी.टेक चं कालेज.दोन्ही इमारती विशीष्ट कोन साधत उभ्या व यांना दोघांना सांधत मध्ये कँटीन.समोर भव्य लाँन.नंतर मग इतर सर्व फँकल्टीज,ताईची बँक.
एकला दररोज कँटीन मध्ये जाणं व्हायचं पण ताईची ताकीद म्हणुन आपण कधीच मित्र मैत्रिणी जमवल्या नाहीत. आपण भलं व आपला अभ्यास भला. कँटीनमध्ये चहाचे घोट घेत असतांना समोरच्या टेबलवर बसलेल्या मुलाच्या डोळ्यावर लक्ष जाताच आपल्याला धक्का बसला.कारण जसे आपले डोळे जन्मापासून निळे होते अगदी त्याचे डोळेही तसेच निळे.आपण ते डोळे एकसारखे पाहतच होतो. त्या मुलाचं कदाचित लक्ष नसावं.तो निघुनही गेला.
दोन तीन दिवसांनी पुन्हा कँटीनमध्ये तो समोरच बसलेला.व आज त्याचंच लक्ष गेलं असावं त्यालाही तसाच धक्का बसला कि काय तोही टक लावून पाहत होता.काही क्षणासाठी नजरानजर होताच आपण कपाळावर जबरदस्तीनं आठ्या आणत नजर खाली घातली व चहा पिऊ लागलो.तितक्यात तो चालला गेला व आपण उगाच खाली मान घातली याची रुखरुख वाटली.दोघांचे डोळे अगदी सारखेच निळे.आपल्याला लहाणपणी कुणीही सहज उचलुन घेत डोळ्यातली निळी निळाई पाहत तासनतास खेळवत,असं ताई नेहमी सांगे पण दर्पणाशिवाय हवी तेव्हा ती जादुई नजर आपल्याजवळ असुनही आपल्याला पाहता येत नसे.आपल्या पणजोबाचे डोळे ही असेच निळे होते व अनुवंशिक तेने ती देणगी आपल्याला मिळाली असावी.पण या मुलाचे ही अगदी तसेच आहेत व पाहतच रहावेशे वाटतात.
आता मात्र एक वाजले कि आपोआप कँटीनमध्ये जावेशे वाटे.आजही आपण गेल्याबरोबर तो आला पण त्याला जागा समोर भेटली नाही .तो मागच्या बाजुला बसला.मागे वळुन पहावं पण पुन्हा पुन्हा भिती वाटु लागली.तरी चोरटा कटाक्ष टाकला तर तोही आपल्याकडच पाहत होता.मग चहा घेऊन आपणच तडक बाहेर पडलो.कोण असावा हा ?आपल्या मेडीकल शाखेत तर निश्चीतच नाही. तदनंतर तीन दिवस तो दिसलाच नाही. आपण पुन्हा पुन्हा अख्खी कँटीन निळ्या नजरेनं शोधत होतो पण ते निळे डोळे दिसेतना.नुसती तगमग.त्यानंतर मात्र तो टेबलावर बसलेला दिसताच मनातुन आपणास उकळ्या फुटू लागल्या.जागा मिळताच तोच खेळ सुरु झाला.ते निळे डोळे आपणास काहीच सुधरू देईनात.अगदी अधाशासारखं पाहतच असतांना तो अचानक उठला व तडक निघुन गेला.त्यानंतर दिड महिने तो दिसलाच नाही. कदाचित सुट्या लागल्या असाव्यात. आपणास मात्र ती निळी निळाई घनघोर नजर केव्हाही दिसतच असे.
सुट्या संपुन तो आला .कँटीनमध्ये दिसताच पुन्हा स्वर्गीय आनंद झाला.आता मात्र तो ही आपल्याला त्याच तगमगीनं पाहतोय हे जाणवायला लागलं.पण जवळ येऊन बोलायची ना तो हिम्मत दाखवी ना आपण.मात्र त्याच्या हातात असलेल्या पुस्तकावरून तो बी.टेकला असावं हे आपणास कळलं होतं व तो ही आपल्यासारखाच एकलकोंडा असावा कारण सोबत कधीच मित्र दिसत नसत.त्यानंतर आपणास सुट्या लागल्या व ताईचं गोव्याला प्रमोशनचं प्रशिक्षण लागल्यानं पुढचा एक महिना ताईसोबत गोव्यातच काढला.पण त्या नजरेची तगमग दिलात खोल खोल हुक उठवीच.
एकदाचं कालेज सुरु झालं.एक वाजताच कँटिनमध्ये हजर.बावरल्यागत शोधाशोध सुरु झाली.त्याला दिसताच तो सरळ समोर बसला व एकसारखा पाहू लागला.दोघांचा चहा संपला तरी तो ही उठेना .वेटर आपल्याकडं पाहतोय हे लक्षात येताच इच्छा नसतांना उठावं लागलं.चालू लागताच तोही मागे मागे येऊ लागला.बरोबर लिफ्टमध्ये त्यानं गाठलं.दोघांशिवाय लिफ्टमध्ये कुणीच नव्हतं.धकधक,धडधड नुसती.तिसरा मजला आला पण न उतरताच पुन्हा खाली. हळूच त्याचे बोल उमटले,"संध्याकाळी सात वाजता सारसबागेत भेट."
"का?,आणि शक्य नाही कारण सहाला ताईसोबतच घरी जाते"
"मला माहित नाही ,मि सातला सारसबागेत वाट पाहतोय"
असं म्हणत तो लिफ्ट थांबताच निघुन गेला.
संध्याकाळी बाहेर कुठं निघणं शक्यच नव्हतं कारण मैत्रिणीही सहसा नसल्यानं कारण सांगुणही शक्य नव्हतं. व इतर सबब सांगितली तर ताई सोबत यायची.
म्हणुन तो जरी गेला तरी आपण नाही जाऊ शकत .पण सहा-साडेसहाला घरी परतताच तगमग वाढु लागली.फ्रेश झाल्यावर अचानक "ताई मला आज सारसबागेत जायचंय गं"तोंडातून निघालं.ताईनीही विशेष म्हणजे का कु न करता वा मी पण येते असं न म्हणता "जा पण लवकर ये"म्हणत परवानगी दिली.
सात ते आठ बागेत नुसतं एकमेकांना पाहत घालवला व तसच परत.काहीच न बोलता,विचारता परत.

क्रमशः
🙏🙏 VSDV🙏🙏