ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे
पांडबाने आख्खा गाव पालथा घातला ,गावातली सगळी हॉटेलं, किराणा दुकानं ,खेळण्याची दुकानं सगळं सगळं बघून झालं होतं. पण राम्या काय दिसला नाही
राम्या साधारण 7 वर्षांचा त्याच्या आई वडिलांसोबत ऊसतोडणीसाठी त्याचा गावापासून खूप लांब आला होता आणि एक दिवस तो कुठेच दिसेना म्हणून त्याला सगळे शोधत होते
त्याची आईने रखमा तर भानावरच नव्हती तिची तहान भूक विसरून ती राम्या च्या वाटेकडे डोळे लाऊन बसली होती वडील पांडबा त्याला शोधायला गावात गेले होते
आणि त्याला आठवले की राम्याने काल आंब्यांसाठी हट्ट केला होता पण जवळपास कुठे आंब्याचे झाड नव्हते त्यामुळे त्याला आंबे मिळाले नाहीत त्यामुळे तो थोडा नाराज होता पांडबा
म्हणला आंबे असले तर बघू राम्या खाईल लई
धसका घेतला व्हता पोरानं म्हणुन तो आंब्याच्या झाडा जवळ जाऊ लागला जसा जसा तो झाडा जवळ जात गेला त्याला दिसले की ते झाड खूपच विदृप आणि विचित्र होते आकारहिन फांद्या एकाबाजूला मोठ्ठं आग्यामव्हाळ आणि दुसऱ्या बाजूला घुबड हे सगळं कमी होत की काय म्हणून त्या झाडाखाली कुत्रे रडत होते
त्याला तिथे एक विचित्र गोष्ट दिसली खूप सारे कावळे तिथे घोळका करून उडत होते हा काय प्रकार आहे हे पाहण्या साठी तो थोडा पुढे आला त्या परिसरात एक वेगळाच गारवा होता
अचानक त्याच्या नाकात एक तीव्र दर्प गेला
तसा त्याने गळ्यातला गमजा नाकावर धरला
आणि पाहतो तर काय एक कुत्रा मरून पडलेला आणि त्याच्या भवती कावळे चोच मारून मारून त्याचे मास खात होते रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो श्वान आणि अर्धवट खाल्लेलं त्याचं शरीर
हे सगळं चित्तथराक दृश्य पाहून पांडबा खूप घाबरला त्याला काही सूचना तो जीवाच्या आकांताने पळण्याच्या प्रयत्न करत होता पण सगळं निरर्थक होतं एक अदृश्य शक्ती त्याला मागे खेचत होती . त्याला अशक्तपणा जाणवु लागला, अचानक त्याच्या खांद्यावर त्याला काहीतरी जाणवले मागे बघतो तर काय एक विचित्र हात त्याच्या खांद्यावर होता तो हात ही त्या श्र्वानाप्रमाणे होता अर्धवट खल्लेला ते भूत होता की कावळ्यांनी इजा केलेला माणूस काही कळत नव्हतं
त्याचं सगळं शरीर सडलेले होते. चेहरा ठीक ठिकाणी सडलेला त्यातून रक्त वाहत होते. सगळे कावळे त्याच्या भोवती गिरक्या घेत होते कधी त्याला चोच मारायचे तर कधी त्याला पंजाने (पायाने) मारायचे
आणि विशेष म्हणजे ती जखम लगेच बरी व्हायची
मघाशीचा तो दर्प यचाच होता
पांडबाला काही कळेना काय होतय तो स्तब्ध होऊन फक्त बघू शकत होता
कावळे आता पांडू कडे येत होते कावळे त्याला चोच मारणार इतक्यात तो मनुष्य, भूत की आणखी काही
म्हणाला थांबा ...
आणि काय आश्चर्य सगळे कावळे झाडावर जावून बसले पांडबा गोंधळात पडला त्याला काही कळेना काय होतंय
तरीही त्याने भीतीचा आवंढा गिळत विचारलं कोण तुम्ही ,
मी रामराव हा घे तुझा मुलगा आता पर्यंत ती आकृती जरा माणसात येत होती जखमा आपोआप भारत होत्या हात ही व्यवस्थित झाला होता
इथे आंबे खायला आला होता मी आजपर्यंत कोणालाही जिवंत सोडले नाही जो माझ्या हद्दीत आला त्याचा शेवट झाला हे नक्की होतं पण का कुणास ठाऊक मला याला काही इजा करावीशी वाटली नाही मला हा खुप जवळचा वाटला जसा माझा मुलगाच आहे असं मला वाटलं माझा विचार बदलण्याच्या आधी निघून जा इथून ... जा ..
पांडबाने राम्याला जवळ घेतले आणि त्याला कवटाळुन घेत तो म्हणाला आता कुट हाय तुमचा मुलगा
तुला काय करायचं त्याचं तुला जीव प्यारा असेल तर निघ लवकर मी या कावळ्यांना जास्त वेळ थांबवून नाही ठेऊ शकत
तुम्हाला या लेकराची आन हाय सांगा
पांडबाच्या या वाक्यावर रामराव काही बोलू शकले नाहीत
सांगतो
ही घटना 80 वर्षा पूर्वीची आहे मी माझ्या कुटुंबा सोबत या गावात राहत होतो.
सुंदर सुशील पत्नी आणि एक गोंडस मुलगा असं आमचं त्रिकोणी कुटुंब सगळं काही सुरळीत चालू होत पण नियती च्या मनात काही तरी वेगळंच होतं. मला एक मांत्रिक भेटला त्याने मला गुप्त धना बद्दल सांगितलं थोडक्यात मांत्रिकाने गुप्त धनाच्या नादाला लावले
मी नेहमी त्याच्या सोबत राहू लागलो संसारावर तर जणू तुळसी पत्रच ठेवलं होतं .मी रात्र रात्र घरा बाहेर राहायचो . माझा त्याच्यावर आंधळाविश्वास बसला होता.
एक दिवस अमावस्येच्या रात्र पाहून त्याने मला गावाबाहेरील आंब्याच्या झाडाजवळ बोलावले
तो मला म्हणाला आज आपल्याला एक विधी करायचा आहे त्याने माझ्या पाठीला वरून खाली एक टिळा लावला मी त्याला विचारले पाठीला टिळा का लावतोस आणि तो ही वरून खाली टिळा नेहमी कपाळावर लावतात आणि तो पण खालून वर
तर तो म्हणाला मी कोणी साधू वगेरे नाही मांत्रिक आहे मांत्रिक सैतानाला अशीच पूजा असते.
मी म्हणालो ठीक आहे मी जास्त विचार नाही केला कारण गुप्त धनाच्या लालसे पायी मी आंधळा झालो होतो. त्याने कसलं तरी पाणी माझ्यावर शिंपाडले त्यानंतर मी वेगळ्याच ग्लानीत होती आणि पुढे किती वेळ त्याची पूजा चालू होती काही कळलं नाही अचानक माझ्या पायाला तिथे ठेवलेल्या उदबत्तीचा चटका बसला आणि मी शुद्धीवर आलो आणि पाहतो तर काय माझ्या गळ्यात कवट्यांचा हार होता त्या सात कवट्या होत्या माझ्या लक्षात आलं की हा विधी बळी चा आहे आणि हा माझा बळी देणार आहे . त्याच्या बोलण्यावरून कळत होतं की 8 बळी दिल्यावर सैतान त्याला धन देणार आणि मग 9 वा बळी सोळा वर्षाच्या कुमरिकेचा दिला की ती अमर होणार .
मी शुद्धीवर आलोय हे त्याला कळलं नव्हत त्याच्या हातात मोठी तलवार होती त्याने ती माझ्या माने वर ठेवली उचलली पुन्हा ठेवली तो असं सात वेळा करून आठव्या वेळेला माझा शिरच्छेद करणार होता मी माझ्या कडे असलेला धार दार चाकू काढला आणि आधी स्वतः चं एक बोट कापलं आणि त्याच्यावर वार करणार इतक्यात माझ्या मानेवर मला काहीतरी गार स्पर्श जाणवला आणि माझ मस्तक त्या कुंडात पडलं
मी मारायच्या आधी माझं एक बोट कापून वेगळं केलं होतं त्यामुळे माझा बळी यशस्वी झाला नाही बळीचा देण्याचा एक नियम आहे की तुम्ही ज्या जीवाचा बळी देणार आहात त्या जीवाच्या शरीरावर साधा ओरखडा पण चालत नाही शरीर पूर्ण तंदुरुस्त हवे मी केलेला हा प्रकार पाहून मांत्रिक खूप चिडला आणि त्याने मला श्राप दिला की ज्या बळीला तू अडथळा आनलास तुला आता वर्षानुवर्ष या झाडाखाली निष्पाप लोकांचे बळी घ्यावे लागतील
माझ्या मृत्यू नंतर त्याने अजून एका सोळा वर्षाच्या मुलीला बळी देण्यासाठी आणल होतं पण यावेळी तो पाकडला गेला आणि गावकऱ्यांनी त्याला ठेचून ठेचून मारला. तो तर गेला पण मी इथे भटकत राहिलो वाडवडिलांची सगळी संपत्ती सोडून माझ्या कुटुंबाला हे गाव सोडून जावं लागलं
माझी बायको आणि मुलगा हे गाव सोडून तिच्या माहेरी गेली आणि तेव्हा पासून मी त्यांची वाट पाहत इथे भटकतोय माझा बळी एका निच कार्या साठी गेला त्यामुळे माझ्या भोवती हे कावळ्यांचे वलय आलं
तेव्हापासून हा खेळ बरेच वर्ष हा खेळ चालू होता एक दिवस एक सिधपुरुरूष मला भेटले मी त्यांनाही मारण्याच्या प्रयत्न केला पण त्यांच्या अथांग शक्ती पुढे माझा निभाव लागला नाही मी शेवटी हार स्वीकारून त्यांना मुक्तीचा मार्ग विचारला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुझा अंत्यविधी झालेला नाही आणि त्यात त्या दृष्ट मांत्रिकाचा श्राप यामुळे तू आडकुन पडला आहेस आज पासुन काही वर्षांनी तुझा एक वंशज येईल आणि तुला मुक्त करेल
पांडबा थोड्याशा भरलेल्या आवाजात हुंदका आवरत म्हणाला
तुमच्या मुलाचे नाव काय होते ज्ञानबा आणि हे ऐकताच पांडूने हंबरडा फोडला ते माझे आजोबा होते ज्ञानबा रामराव पाटील त्यांचं नाव म्हणजे तुम्ही माझे पणजोबा आहात त्या मुळेच तुम्ही माझ्या मुलाला काही इजा केली नाही माझ्या राम्याचं नाव तुमच्या नावावरच ठेवलं होतं माझ्या आज्यानं,
काय ?
तू खोटं तर बोलत नाही ना हे बघ मी तुला अभय दिलंय त्या मुळे माझ्या पासून वाचाण्यासाठी तू खोटं बोलत असशिल तर खबरदार ....
रामराव गरजले आणि पांडबा दूर उडून पडला.
तो उठत म्हणाला
नाही म्या खोटं नाही बोलत मी तुमच्या बायकोचं म्हंजी माझ्या पणजी च गाव सांगतो मंग तुमचा इश्र्वास बसल आडगाव ( काल्पनिक ) मुक्काम पोस्ट बीड , तालुका , जिल्हा बीड
खरंच तू माझा वंशज आहेस मला किती आनंद होतोय मी शब्दात नाही सांगू शकत आता मला मुक्ती मिळणार
खूप वाट पाहायला लावलीस लेकरा
सांगा मी काय करू मी काय बी करायला तयार हाय
ऐक तर मग गावच्या दक्षिण दिशेला एक जंगल आहे त्या जंगलात जा तिथं तीन लिंबाचे झाड एका ओळीत असतील तिसऱ्या झाडा खाली माझं धड पुरलं आहे आणि दुसऱ्या झाडा खाली शिर ते घेऊन ये आणि एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं ती मागं वळून बघू नकोस तिथे मांत्रिकाने बंदोबस्त केलेला आहे त्या मुळे ती जागा खूप धोकादायक आहे . त्या जागेत खूप साऱ्या वाईट शक्तींचा वास आहे
त्या मुळे ती जागा खूप धोकादायक आहे
तुझ्या मुलाला इथेच ठेव त्याच्या साठी ती जागा सुरक्षित नाही .
जायच्या आधी या अंब्या जवळ थोड खन तिथे तुला एक दिव्य त्रिशूळ मिळेल .साधू महाराजांनी तो तिथे ठेवला होता. तो तुझ्या कामी येईल
जा तुझं कल्याण होईल
पांडबा खड्डा खणू लागला त्याला थोडे खनल्यावर काही तरी चमकत होतं त्यानं त्यावरची माती काढली तो त्रिशूळ रात्रीच्या अंधारात पण चमकत होतं त्या मध्ये एक तेज होते पांडबाने तो दिव्य त्रिशूळ कपाळी लावला आणि त्याचं दर्शन घेतलं आणि जंगला कडे निघाला जंगलात जन्या साठी त्याला गाव ओलांडून जावे लागणार होते त्याला थोडं पुढे गेल्यावर रखमा दिसली रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते . ती त्याला पाहताच पळत त्याच्या कडे आली आणि ती काही बोलणार त्या आधी पांडबा म्हणाला राम्या गावा बाहेर आंब्याच्या झाडाजवळ हाय म्या एक काम करून सकाळ पस्तोर घरला इन एका दमात त्याने सगळं सांगितलं.
आवं पर ?
काय बी इचारू नगस तुला आल्या वार सांगतो समद.
तिचे वाक्य तोडत पांडबा म्हणाला आणि तो पुढे निघाला जंगल खूप घनदाट होतं दी अखेर लिंबाच्या झाडाजवळ आला आणि खणायला सुरुवात केली त्याला तिथे एक शिर नसलेला सांगाडा भेटला त्याने तो सोबत आणलेल्या पिशवीत ठेवला आणि दुसऱ्या झाडा जवळ गेला तिथे त्याला शिर (कवटी) भेटले त्याने तिसऱ्या झाडाखाली खणताना त्याला कसल्या तरी भांड्याचा आवाज आला . त्याने अजून खणल तेव्हा त्याला एक हंडा दिसला त्यावर काळा कपडा बांधला होता
त्याने तो कपडा बाजूला काढला त्यात एक कवटी
होती
ही कुणाची असेल असा ती विचार करत होता अचानक ती कवटी खूप गरम होऊ लागली ,इतकी गरम की ती हातात धरू शकत नव्हता त्याने पटकन कवटी खाली टाकली आणि बाजूला थांबला त्यातून आग बाहेर येत होती तो घाबरून पाळला थोडं पुढं गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याची पिशवी विसरली त्याने हातातला त्रिशूळ घट्टा पकडला आणि परत त्या झाडाकडे धावला तिथे त्याला एक विचित्र प्राणी वजा माणूस दिसला ,तो जळत होता .त्याचा चेहरा तर खूपच भेसूर होता एक डोळा बाहेर खोबलितून बाहेर लटकत होता दुसरा तर नव्हताच त्याच्या चेहऱ्याची अर्धी बाजू पूर्ण जाळली होती , तो हळू हळू पांडबाकडे येत होता .
तो घाबरून पळू लागला पांडबा पुढे आणि तो मागे थोडं पुढे गेल्यावर पांडबा पायात पाय अडकून पडला तो विचित्र आकार त्याच्या कडे येऊ लागला
पांडबाने त्याचा कडे त्रिशूळ भिरकावला त्रिशूळ त्याच्या छाती मध्ये शिरला तसा तो हात पाय खोडात जमिनीवर पडला आणि एका मोठ्या भेसूर किंकाळी सोबत क्षणार्धात त्याची राख झाली.
पांडबाने तो त्रिशूळ आपल्या सोबत घेतला आणि गावाबाहेरील आंब्याच्या झाडाजवळ जाऊ लागला .
इथे रखमा राम्याला कुशीत घेऊन बसली होती आत्ता पर्यंतची सगळी कहाणी तिला रामरावांनी सांगितली होती.
सगळं कळल्या पासून रखमाची आसवं थांबत नव्हती.
रात्र सरून दिवस उगवायला आता सुरुवात झाली होती.
पांडबा झाडा जवळ आला आणि त्याने येताना काही लाकडं आणली होती त्याने जराही वेळ वाया न घालवता सोबत आणलेला सांगाडा आणि कवटी समोर ठेवली आणि त्याला अग्नी दिला .
रामराव हळू हळू धूसर होत होते त्यांनी जाताना त्यांनी सांगितलं हा त्रिशूळ खूप दैविय आहे याची व्यवस्थित काळजी घ्या हा तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही. या झाडाच्या खोडामध्ये जी पोकळ जागा आहे तिथे तुमच्या साठी काही वस्तू ठेवल्या आहेत.
मी गेल्यानंतर त्या काढून घ्या आणि तुमच्या पाशी राहू द्या त्याचा उपयोग करा.
रामराव पंचमहाभूता मध्ये विलीन झाले .
पांडबाने झाडाच्या खोडा मध्ये डोकावून पाहिले तर त्यात एक माध्यम आकाराचा संदुक होता त्या बरेच दागिने, रत्ने, सोन्याचे नाणे वगेरे होते वगेरे होते त्यांनी तो संदूक घेऊन घरी निघाले, हे तेच गुप्तधन होते ज्यासाठी रामराव बळी गेले होते.
समाप्त ...
लेखक;
:- ओंकार कुलकर्णी