नूरमंजिल कॉलनी
नूरमंजिल कॉलनी- A Real Horror Series |
त्या दिवशी फोन सतत ट्रिंग , ट्रिंग, वाजत होता त्यात मधेच कुत्र्याचा भो भो ओरडणं त्यात दारावर पडणारी टप , टप , आणि त्यात हजारो बायकांचा प्रचंड आक्रोश.सगळे आवाज एकमेकांत मिसळत माझा पाठलाग करत होते .आणि मी जीवाच्या आकांतानं त्या सगळ्यांतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होतो पण माझे सगळे प्रयत्न निष्फळ ठरत होते . माझे हात पाय एकदम सुन्न झाले होते.असं वाटतं होतं की मला कुणीतरी घट्ट बांधून ठेवलंय.माझं शरीर फिट आलेल्या माणसासारख एकदम ताठ झालं होतं.आणि ते सगळे आवाज एकामागोमाग एक माझ्या कानात आदळत होते.असं वाटतं होतं की ते सगळे आवाज एकत्र मिळून मला खोल काळोख असलेल्या दरीत ढकलणार आहेत.या जाणिवेने मी माझी सगळी शक्ती एकवटून एक मोठी किंकाळी मारत त्या सगळ्यांतून मुक्त झालो....
फोन अजूनही सतत ट्रिंग ट्रिंग वाजत होता, बाहेरून कुणीतरी टप टप दरवाजा बडवत होतं आणि माझा टॉमी दरवाजाकडे बघत भो भो भुंकत होता.माझं डोकं एकदम सुन्न झालं होतं सगळं शरीर घामाने भिजले होते आणि मी बेडवर बसून काय स्वप्न होतं ते आठवायचा प्रयत्न करत होतो.पण काहीच आठवत नव्हतं .मी तडक उठून दरवाजा उघडला तर समोर जोसेफ .जोसेफला पाहताच टॉमी शांत झाला
जोसेफ -अरे किती वेळ झाला दरवाजा ठोकतोय.एवढ्या वेळ झोपतात का कोण.चल लौकर तैयार हो आपल्याला जायचंय
मी -कुठे
जोसेफ -कुठे म्हंजे काय? तू पत्रकार आहेस हे तरी तुला माहितेय ना.अरे काल काल रात्री मुंबई सेंट्रलला नूरमंजिल कॉलनी जाळून टाकली
मी-काय ?

जोसेफ -होय , तेच cover करायला आपल्याला जायचंय.oh god ही दंगल कधी थांबणार आहे कुणास ठाऊक .दिवसेंदिवस माणूस devil बनत चाललाय .रामायण सिरीयल संपली त्यातला रावणाचा वध ही झाला .पण तोच रावण आता जय श्री राम म्हणत अमानुषतेची परिसीमा गाठतोय ...अरे त्या कॉलनीत कमीत कमी पाचशे कुटुंब तरी राहत होते असतील आणि ते सगळे च्या सगळे त्या आगीत .....oh god विचार ही करू शकत नाही .
जोसेफच म्हणणं अगदी योग्यच होतं त्यावेळी माणसातला सैतान , राक्षस रावण जागा होऊन अमानुषतेची परिसीमा गाठत होता .तो प्रत्येकात वावरत होता कधी तो जय श्री राम चा नारा देत होता तर कधी अल्लाह हू अकबर . आणि अश्या वेळी मी मुंबईत नुकताच पत्रकार म्हणून रुजू झालो होतो .नव्वदच्या दशकात भारत आधुनिक जगात अडखळत पाऊल टाकत होता तर दुसरीकडे मी स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी समाजाने आखून दिलेल्या आणि पिढ्यांन पिढ्या चालत आलेल्या अर्थाजनाच्या म्हणजे पैसे कमवीन्याच्या प्रक्रियेचा भाग झालो .आणि अशातच मला दूरदर्शन केंद्रात बातमी प्रसारण केंद्रात नोकरी मिळाली .
संपूर्ण मुंबई दंगलीत उध्वस्त झाली होती .जागो जागी जळणार्या गाड्या , जीव वाचवत पळणारी लोकं बघत बघत आम्ही मुंबई सेंट्रलच्या नूरमंजिल कॉलनीच्या गेटवर येऊन पोचलो.
संध्याकाळचे पाच वाजले होते.जानेवारीचा थंड वारा अंगाला झोंबत होता पण त्यात संध्याकाळचे कोवळं ऊन शरीराला दिलासा देतं होतं .नूरमंजिल कॉलनीचा गेट जळून वितळला होता.गेटच्या आत आणि गेटच्या बाहेरील फरक ठळकपणे दिसत होता .म्हणजे गेटच्या बाहेर दिवस आणि गेटच्या आत एखादया मृतदेहावर टाकलेल्या सफेद चादरी सारखी काळी छाया पसरली होती .जसं जसं आम्ही आत जात होतो तसं तसं ह्या अग्नीतांडवाची दाहकता जाणवत होती.सगळा परिसर जळून बेचिराख झाला होता एखादया अडगळीच्या जागेत भंगार टाकावं तसं पत्र्याची घरं, दुकानं , झोपडी , दुमजली इमारतींचा खच्च पडला होता .चालायला रस्ताच मोकळा नव्हता सगळीकडे ढिगारा पसरला होता .मी सगळं कँमेरात शूट करत होतो .दुसऱ्या महायुध्दात जपान , जर्मनी जेवढं उद्ध्वस्त झाले नसेल त्यापेक्षा जास्त आहाकार माजलेला दिसत होता .अणुबॉम्ब हल्यात वितळून गेलेल्या जपान सारखी परिस्तिथी त्या कॉलनीत दिसत होती .कॉलनीचा प्रत्येक कोनान कोना जळून काळवंडून गेला होता .मग माणसांचं काय झालं असेल ?या विचारांनी मला धडकी भरली .कॉलनीत जवळ जवळ पाचशे कुटुंब वास्तव्यास होती म्हणजे जर त्यांची मुलं, बाळ गृहीत धरली तर आकडा हजार.......बाप रे काय झालं असेल ?मी जोसेफला विचारलं पण त्याच लक्षच नव्हतं तो यंत्रासारखा पुढे त्या अडगळीतून सहज चालत होता आणि अचानक तो थांबला .......मी त्याला विचारलं काय झालं ?त्याने डावीकडील इमारतीकडे बोट दाखवल आणि बघतो तर ....त्या इमारतीच्या खांबाखाली एक लहान मुलगा चिरडला होता.त्याचा संपूर्ण चेहरा जळाला होता पण त्याचे डोळे सताड उघडे होते त्यातली बुबुळ बाहेर आली होती आणि ती माझ्याकडेच रोखून पाहत होती .मी आत्तापर्यंत बरेच क्राइम सीन आणि विद्रूप मृतदेह क्लिक केले होते पण मला कधी त्यांची घृणा , किळस , भीती कधीच वाटली नव्हती .पण त्या लहान मुलाला पाहून माझा थरकापच उडाला.त्याची ती बाहेर आलेली डोळ्यांची बुबुळ पाहून तर मला पोटात मळमळ होऊ लागली आणि जोसेफ मात्र त्या मुलाकडे बघत शांतपणे प्रार्थना करत होता.जोसेफच वागणं मला थोडं विचित्रच वाटतं होतं म्हणजे तो असे विद्रूप मृतदेह बघितले की खूप घाबरायचा.पण त्यावेळी त्याचा चेहरा एकदम शांत होता म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर भीती , किळस असे कोणतेच भाव नव्हते.मला मात्र पोटातलली मळमळ असह्य झाली तसा मी तिथे ओकारी करू लागलो.
ओकारी झाल्यावर एकदम मोकळं वाटलं पण बाजूला पाहतो तर जोसेफ आसपास कुठेच नव्हता.मी जोसेफला हाक मारू लागलो पण कसलाच प्रतिसाद नाही .मी मनगटातील घड्याळात पाहिलं.आणि पाहतो तर रात्रीचे बारा वाजले होते.म्हणजे इथे येऊन मला सात तास झाले होते ?कसं शक्य आहे ?आम्ही तर पाचला इथे आलो होतो. जास्तीत एक तास झाला असेल पण नाही खरंच खूप रात्र झाली होती .रस्त्यावरचा विजेच्या खांब आणि त्याचा पिवळसर प्रकाश सर्वभर पसरला होता आणि मी, त्या ढिगाऱ्यावर अस्ताव्यस्त विस्कटलेल्या मनस्थितीत उभा होतो.....भयाण शांतता पसरली होती.थंडगार वारा सुटला होता त्या वाऱ्याचा आवाज स्पष्टपणे ऎकू येत होता.बाजूला पडलेला पत्रा कडकड वाजत वाऱ्याने हलत होता .बघता बघता तो पत्रा वाऱ्याच्या वेगाने पलटी झाला आणि पाहतो तर काय ?त्या पत्र्याखाली दाटीवाटीनं वीसपंचवीस जळालेले मृतदेह होते .माझी तर बोबडीच वळली कँमेरा ऑनच होता मी घाबरत घाबरत शूट करू लागलो.तेव्हढ्यात कानठळ्या वाजविणारी फोनची रिंग वाजू लागली.मी गोंधळून आजूबाजूला पाहू लागलो सर्वत्र जळुन मोडकडून पडलेली दुकानं , इमारती, झोपड्या दिसत होत्या मग हा फोनचा आवाज ? आणि माझ्या मागेच काही अंतरावर एक फोनबूथ होता.फोनबूथ च्या आत लाईट चालूच होती.त्या लाईटच्या प्रकाशात आत असलेला तो फोन मला स्पष्ट दिसत होता .मी त्या फोनबूथ कडे जावू लागलो .माझ्या पावलागणिक त्या फोनची रिंग वाढत होती.त्या थंड शांततेत फोनचा प्रचंड आवाज घुमत होता.असं वाटतं होत तो फोन माझ्यासाठीच आहे .मी दरवाजा उघडून फोन उचलणार इतक्यात मला जोसेफची हाक ऎकू आली.पण त्या हाकेत एक भीती होती .तो भयग्रस्त होऊन मोठ्याने मला हाका मारत होता.

माझ्यासमोर एक निमुळती पायवाट होती आणि ती डावीकडे वळत होती आणि जोसेफचा आवाज तिथूनच येत होता.मी तडक आवाजाच्या दिशेनं धावत सुटलो आणि पाहतो तर जोसेफ पाठमोरा उभा होता आणि मला हाका मारत होता .मी जोसेफ अशी मोठ्याने हाक मारली तसा तो मागे वळला.त्याच्या आवजात जी भीती होती ती त्याच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हती .
मी -अरे जोसेफ कुठे गायब झाला होतास ?
जोसेफ -what happened ?घाबरलास ?त्याने अगदी सहज विचारलं आणि मागे वळत यंत्रासारखा सरळ रेषेत चालू लागला .मी त्याला हाक मारत होतो पण त्याचा काही प्रभाव पडत नव्हता.तसं मी त्याच्यामागे धावू लागलो.
पायवाटेच्या दोन्ही बाजूला जळून काळी पडलेली दुकानं , इमारती आणि विजेच्या खांबा चा पायवाटेवर पसरलेला पिवळसर प्रकाशात मी त्याच्या मागे धावत होतो.त्या भयाण परिसरात रात्री बारा वाजता आम्ही दोघंच होतो.बघता बघता जोसेफ कर्कश किंकाळ्या मारत धावू लागला.त्याच्या धावण्यात पण एक यांत्रिकता होती .एकदम सरळ रेषेत आणि वेगात .त्याच्या किंकाळीने माझ्या अंगात काटाच उभा राहिला मी जागच्या जागी थांबलो .काय होतंय ते कळतंच नव्हतं.समोर एक मध्यम उंचीची टेकडी होती आणि जोसेफ त्या टेकडीवर धावत धावतच अगदी सहज सरळ रेषेत चढत होता.मी फक्त भांबावुन ते पाहत होतो.
टेकडीच्या पलीकडे मोठा उजेड दिसत होता.शेकोटी पेटवल्यावर उजेड दिसतो तसा .
जोसेफ टेकडीच्या टोकावरून मला हाका मारत होता
hey तिकडे काय करतोयस come on hurry दमलास एवढ्या लवकर ?
जोसेफची ही प्रतिक्रिया अनपेक्षितच होती मी काहीच प्रतिसाद दिला नाही पण मी टेकडीकडे जावू लागलो .
टेकडी तशी उंच नव्हती पण कँमेरा सांभाळत हळू हळू टेकडी चढू लागलो.टेकडी चढताना मला दम लागत होता .कळत नव्हतं हा जोसेफ इतक्या सहज धावत वर कसा गेला.जोसेफ वरून मला आवाज देत होता .त्याचा आवाज एकदम खोल वाटत होता विहिरीतून येतो तसा .दमलास का रे ?अजुन लग्न व्हायचंय तुझं.दमून कसं चालेल .बायको माझ्याबरोबर पळून जाईल असा दमलास तर haaa haaaaaaa त्याच्या हसण्यात खिन्नता होती.मी टेकडी चढून वर गेलो आणि पाहतो तर जोसेफ वर नव्हता.टेकडीच्या पलीकडं मोठं मैदान होतं.आणि त्या मैदानाच्या मधोमध एक मोठी शेकोटी जळत होती.आश्चर्य म्हंजे तिथं हजारो बुरखाधारी स्त्रिया दाटीवाटीनं बसल्या होत्या.मी खाली उतरलो आणि शूट करू लागलो.त्या काहीच हालचाल करत नव्हत्या फक्त एकाजागी शांत बसल्या होत्या .आणि अचानक पाठीमागून माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला तसा मी एकदम दचकलोच.माझी मागे वळून पाहण्याची हिंमत होत नव्हती.मी तसाच स्तब्ध उभा राहून त्या बुरखाधारी बायकांकडे पाहत होतो.त्या तशाच दाटीवाटीनं शांत बसल्या होत्या.मी धाडस करून हळूहळू मागे पाहिलं तर तो जोसेफ होता
haaaaaaa haaaaaaa haaaaa घाबरलास ?तुला काही प्रश्ण विचारायचे आहेत?अरे मग विचार ना ....काय झालं भीती वाटते ?ok मग मी विचारतो.मला काहीच सुचत नव्हतं कारण जोसेफ एखादया ठार वेड्या सारखा बडबडत होता.आणि तो सरळ त्या बुरखाधारी स्त्रियांना असंबद्ध प्रश्ण विचारू लागला.
आप सब इतने शांत क्यों है ?
क्या हुआ है आपके साथ ?
आपके घरों को किसने जलाया ?
त्या स्त्रिया काहीच बोलत नव्हत्या त्या तशाच मान खाली घालून शांत बसल्या होत्या
मुझे पता है किसने जलाया है, किसने आग लगाई है.उन हिंदूओ ने और" ये उनका भाई है " म्हणताच त्या शेकडो स्त्रिया माझ्याकडे पाहू लागल्या.माझ्या पायाखालची जमीनच सरकली.काय करावं कळेना .त्यांचे चेहरे माझ्याकडेच रोखून पाहत होते .त्या हजारो स्त्रिया उभ्या राहिल्या आणि जोसेफ मोठ्यानं ओरडला "काफिर है ये" "तसं त्या हजारो स्त्रिया काफिर , काफिर म्हणत जवळ येऊ लागल्या .त्याच्या आवजात एक चीड होती.द्वेष होता आणि ती चीड तो द्वेष माझ्या अंगावर काटा आणत होता.तिथं थांबण्यात काही अर्थ नव्हता.मी जीव वाचविण्यासाठी तिथून धडपडत पळू लागलो.पळत पळत टेकडीवर पोचलो आणि घसरत खाली आलो.पलीकडून त्या शेकडो स्त्रियांचा आवाज येत होता.त्या टेकडी चढून येत होत्या.फोन ची रिंग अजुन वाजतच होती.का कुणास ठाऊक पण मला तो फोन रिसीव्ह करायचा होता .असं वाटत होत तो फोन माझ्यासाठीच होता.मी धावत जावून फोनबूथ जवळ पोचलो आणि माझ्या मागे हजारो स्त्रिया ओरडत येत होत्या.मी फोनबूथ च्या आत गेलो आणि दरवाजा बंद केला आणि त्या निमुळत्या रस्त्याकडे बघतो तर त्या हजारो बुरखाधारी स्त्रिया त्या निमुळत्या पायवाटेने त्वेषाने माझ्याकडे येत होत्या आणि कानठळ्या करणारी फोनची रिंग सतत वाजतच होती.पण तो फोन रिसीव्ह करायची हिंमत होत नव्हती .काहीच कळत नव्हतं.त्या हजारो बुरखाधारी स्त्रियांनी फोनबूथला घेराव केला होता.त्या शांतपणे माझ्याकडे पाहत होत्या.फोन वाजतच होता त्याचा तो ट्रिंग ट्रिंग आवाज रात्रीची शांतता चिरत होता.आणि त्या बुरखाधारी स्त्रिया एखादया स्तब्ध पुतळ्याप्रमाणे शांत उभं राहून फक्त माझ्याकडेच पाहत होत्या.त्या हजारो बुरखाधारी स्त्रिया बाजूला सरकत कुणालातरी वाट देऊ लागल्या आणि पाहतो तर मधून जोसेफ तणतणत चालत येत होता त्याची नजर माझ्यावर रोखलेली आणि तो फोनबूथ जवळ येऊन थांबला.बराच वेळ आम्ही दोघं एकमेकांकडे पाहू लागलो.जोसेफच्या डोळ्यांची पापणी हलत नव्हती.फोनची ट्रिंग ट्रिंग ही थांबली होती.आणि अचानक कुत्र्याचं भुंकणं ऎकू आलं.तो जोरजोरात भुंकत होता.कळत नव्हतं आवाज कुठून येतोय आणि बाहेर दिसतही नव्हतं कारण बाहेर हजारो बुरखाधारी स्त्रियांचा गराडा होता.फोनबूथ तसा उंच होता.मी जागेवर हलकी उडी मारून पाहिलं तर गेटजवळ टॉमी दिसला.तो तिथेच उभा राहून भुंकत होता.आणि अचानक फोनबूथच्या काचेवर एक थाप पडली.जोसेफ माझ्याकडे बघत खिदळत होता.फोनची रिंग पुन्हा वाजू लागली.जोसेफ जोरजोरात काचेवर हात मारू लागला. टप , टप टप , त्या बुरखाधारी स्त्रियाही मोठ्यानं आक्रोश करू लागल्या आणि माझा टॉमी गेटजवळ उभा राहूनच कर्कश भुंकत होता.त्या फोनबूथ मधे ते सगळे आवाज माझं रक्त, श्वास शोषून घेत होते . माझं संपूर्ण शरीर फिट आलेल्या माणसासारखे ताठ झालं होतं .असं वाटतं होतं ते सगळे आवाज मला कुठल्यातरी खोल काळोख असलेल्या दरीत ढकलतील आणि माझं डोकं फुटून मेंदूचे तुकडे तुकडे ........
डोक्यात हातोडाचा घाव बसावा तशी फोनची रिंग अखंड वाजत होती.माझ्या हातापायाच्या शिरा ताणले होते.लकवा मारावा तसं हातपाय सुन्न झालं होते.जोसेफ जोरजोरात काचेवर हात मारत होता, त्या बुरखाधारी स्त्रिया आक्रोश करत होत्या , माझा टॉमी गेटजवळच बाहेर उभा राहून पोटातील आतडी पिळवटून जाईल इतकं भुंकत होता आणि हा फोन ....
फोनबूथच्या काचेवर थाप मारून संपूर्ण तडा पडला होता आता ती माझं जास्त वेळ संरक्षण करू शकणार नव्हती.आणि बघता बघता जोसेफचा हात काचेवर पडला तसा मी सर्व शक्ती एकवटून हात फोनकडे नेत शेवटी फोन उचलला......hello
आपण किनाऱ्यावर उभं राहून समोरून येणाऱ्या अजस्र लाटांना पाहत असतो आणि बघता बघता त्या लाटा आपल्या पायाला स्पर्श न करताच तडक मागे सरकून लुप्त होतात.आणि आपल्या पायाखाली असते ती फक्त वाळू ..
मी घरातच होतो.झोपेतून धडपडत फोन रिसीव्ह करताना टेबलावरचा काचेचा ग्लास खाली पडला होता.त्याचे दोन तुकडे झाले होते, माझा टॉमी जोरजोरात भुंकत होता कारण बाहेरून कुणीतरी दरवाजा बडवत होतं.आणि मी ...विस्कटलेल्या मनस्थितीत फोनवर जोसेफशी बोलत होतो ........
जोसेफ- अरे कधीपासून call करतोय तुला.झोपलेलास का अरे बोलत का नाहियेस.लकवा मारला का तुला.अरे हूं हूं काय करतोयस.चल लौकर तयार हो आणि मुंबई सेंट्रल ये

मी -मुंबई सेंट्रल ?
जोसेफ -येस मुंबई सेंट्रल.अरे काल रात्री कॉलनी जाळून टाकलीय
मी -कोणती कॉलनी ?
जोसेफ -नूरमंजिल कॉलनी .....काय झालं गप्प का झालास?चल लौकर तयार हो आपल्याला news cover करायला जायचंय.आणि हा टॉमी इतकं का भुंकतोय.आवाज इतपर्यंत ऎकू येतोय.
मी -अरे बाहेरून कुणीतरी दार बडवतोय म्हणून
जोसेफ -अरे तो आपला ड्राइवर असेल संतोष .त्याला सांग नूरमंजिल जवळ यायला नाहीतर तो तुला माझ्या घरी घेऊन येईल.मी इथेच तुझी वाट पाहतोय

मी -हो
जोसेफ -मगापासून एवढं गोंधळल्या सारखं का बोलतोयस?झोप पुर्ण झाली नाही का ?का कुठलं स्वप्न पडलं होतं.अरे काही काही स्वप्न अशीच असतात कितीही आठवण्याचा प्रयत्न केला तरी आठवत नाहीत.आता जास्त विचार करू नकोस.जा पहिलं दार उघड.
मी फोन ठेवला आणि दरवाजा उघडला
संतोष -साहब वो जोसेफ .....

मी -(त्याला मधेच तोडत )हा हा पता है मुझे .तुम रुको गाडी में. में , दस मिनिट में आता हूँ.और हा, जोसेफ के घर नही जाना है.सीधे मुंबई सेंट्रल नूरमंजिल कॉलनी
संतोष -जी साहब
संतोष -जी साहब
संध्याकाळी पाच वाजता आम्ही मुंबई सेंट्रल पोचलो .
रस्त्यावर कुणीच नव्हतं समोर एक पोलिस van जळत होती.
संतोष-साहब ये रस्ता तो बंद है लेकिन इस गल्लीसे right मारोगे तो नूरमंजिल कॉलनी बगल में ही है .

मी -kk ठीक है .तुम यहीं रुको में आता हूँ जाकर.
मी त्या गल्लीतून right मारत पाच मिनिटांत नूरमंजिल जवळ पोचलो.संपूर्ण परिसरात बर्फासारखी थंड शांतता पसरली होती.आसपास कुणीच नव्हतं.बेचिराख झालेली कॉलनी मी गेटच्या बाहेरून पाहत होतो.तेव्हढ्यात माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला तसं मी थोडं दचकलो आणि एखादया खोल विहिरीतून येणाऱ्या आवजात जोसेफ बोलला
जोसेफ -U never understand what happened here ....त्यासाठी तुला आत यावं लागेल.चल जावू आत .
मी -हो चल
माझ्या लक्षात आलं मी कँमेरा घेतला नाहिये.
मी -अरे जोसेफ मी कँमेरा गाडीतच विसरलो .थांब घेऊन आलो .

जोसेफ -त्याची काही गरज नाहिये आपण दोघं असंच जावू
मी -अरे असं कसं म्हणतोयस कँमेरा नसेल तर आपण cover कसं करणार .तू थांब इथं , मी आलो लगेच
जोसेफ -kk पण लौकर ये, मी तुझी वाट पाहतोय .....
मी धावत धावत गाडीजवळ गेलो.संतोष गाडीचं बॉनेट उघडून काहीतरी काम करत होता.
मी -any problem संतोष ?
संतोष -कुछ नही साहब जरा चेक कर रहा हूँ
मी -kkkk.में कँमेरा यहाँ भूल गया हूँ.उसे लेने आया हूँ
मी कँमेरा घेतला आणि निघता निघता संतोषला सांगितलं की मी आणि जोसेफ लगेच जावून येतो.संतोष बॉनेटमधे बघत काहीतरी काम करत होता त्याने फक्त जी साहब म्हटलं आणि कामात गुंग झाला.मी कॉलनीच्या दिशेनं धावत जावू लागलो तेव्हा असं वाटलं संतोष मला आवाज देत होता.पण मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत गेटजवळ पोचलो.पाहतो तर जोसेफ तिथं नव्हता.तो मला म्हणाला होता."लौकर ये मी तुझी वाट पाहतोय".त्यामुळं तो एकटा आत जावू शकणार नाही.मग हा कुठं गेला असा विचार करत असतानाच माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला.मागे वळून पाहतो तर संतोष ......
मी-अरे संतोष तुम यहाँ पर any problem
संतोष -सर में तुम्हे आवाज दे रहा था लेकिन आप सुने ही नही.
मी -काय झालं तरी काय ?(वैतागुन )
संतोष -सर जोसेफ और आप?
मी -हो रे मी त्यालाच शोधतोय .इथेच थांबतो म्हणून बोलला आणि आता कुठे दिसत नाहिये
संतोष -सर लेकिन जोसेफ यहाँपर कैसे आ सकता है?
मी -काय बोलतोयस तू?काय म्हणायचंय काय तुला ?
संतोष-सर ......जोसेफ की तो .....कल रात ....इस कॉलनी में जलकर......मौत हुई है .......

संतोषचा प्रश्ण योग्यच होता.जोसेफ यहाँ पर कैसे आ सकता है?जोसेफच घर कॉलनीच्या मागच्या गल्लीत होत आणि त्या रात्री जेव्हा कॉलनी जळत होती तेव्हा जोसेफ मदतीसाठी तिथे गेला आणि दुर्दैवाने त्या आगीत सापडला.
पण तो आला होता.तो माझी वाट पाहत होता.त्याचे ते शेवटचे शब्द ...लौकर ये , मी तुझी वाट पाहतोय .......कित्येक दिवस मी झोपलो नव्हतो.सारखी भीती वाटायची.मी नोकरीसुद्धा सोडून दिली.औषधोपचार करून पूर्ववत व्हायला मला सात -आठ महिने तरी लागले.आणि मग एक दिवस ........झोप उडाली ती कायमची .........विश्वास बसणार नाही पण मी गेली पंचवीस वर्षे झोपलोच नाहीये.सतत एकच विचार....की हे कसं होऊ शकत?...काय आहे हे?...काय अर्थ आहे याचा?मी अजुन ही उत्तर शोधतोय...

आणि मग एक दिवस घराची साफसफाई करत असतांना कँमेरा हाती लागला.कँमेरातील रेकॉर्डेड बटण दाबलं.आणि त्यांत.......इमारतीच्या खांबाखाली चिरडलेला डोळ्यांची बुबुळ बाहेर आलेली तो लहान मुलगा , ते दाटीवाटीनं जळालेले पंचवीस मृतदेह, फोनबूथ, फोनची रिंग आणि त्या आक्रोश करणाऱ्या हजारो बुरखाधारी स्त्रिया......सगळं सगळं रेकॉर्ड झालं होतं...........
(कथेतील घटना,पात्र, आणि संदर्भ काल्पनिक आहेत.)
लेखन -K sawool