स्त्रियांचे हस्तमैथुन -
स्त्रिया हस्तमैथुन करतात का? पुरुषांनी स्त्रीच्या हस्तमैथुनाविषयी वेगवेगळे अनुमान बांधले आहेत. त्यात कितपत तथ्य आहे? याविषयी वैज्ञानिक माहिती जाणून घेण्यासाठी किन्से व हाईट रिपोर्टसचे निष्कर्ष पाहिले पाहिजेत.
किन्सेने आठ हजार स्त्रियांची पाहणी केली. तो लिहितो की, स्त्रीची हस्तमैथुनाद्वारे कामपूर्ती जितक्या लवकर व जितकी परिपूर्ण होते तितकी ती संभोगाद्वारे होत नाही; कारण योनीत कामसंवेदना ग्रहण करणाऱ्या पेशी नसतात. शिश्निका हा स्त्रीचा महत्त्वाचा कामउद्दीपक अवयव असतो.
संभोगात या अवयवाशी संबंध येत नाही.
शिश्निकेच्या उद्दीपनाने स्त्री हस्तमैथुन करते. योनीच्या उद्दीपनाने स्त्रीची कामपूर्ती होत नाही. संभोगात स्त्री आपल्या प्रिय व्यक्तीशी जवळीक साधत असल्यामुळे तिला संभोगाचे महत्त्व वाटते; परंतु संभोगात तिची कामपूर्ती होईलच असे नाही.
स्त्रिया हस्तमैथुन करीत असल्या व त्यांची हस्तमैथुनाद्वारे उत्तम प्रकारची कामपूर्ती होत असली तरी स्त्रियांतील हस्तमैथुनाचे प्रमाण पुरुषांइतके नाही. याचे कारण म्हणजे टेस्टोस्टेरॉन या कामउद्दीपक संप्रेरकाचे प्रमाण पुरुषांत जितके असते तितके ते स्त्रियामध्ये असत नाही.
पुरुषापेक्षा स्त्रीला प्रेम व प्रणय यात अधिक रस असल्यामुळे तिला एकटीने केलेले मैथुन (म्हणजे हस्तमैथुन) तितकेसे पसंत नसते.
मासिक पाळीपूर्वी स्त्रीच्या जननेंद्रियाकडील रक्तसंचय वाढतो. इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण वाढते. हस्तमैथुन केल्यावर रक्तसंचय कमी होतो.
जननेंद्रियात निर्माण होणारा ताण मोकळा व्हावा यासाठीही ती हस्तमैथुन करते; संभोगासाठी पर्याय म्हणून नव्हे. स्त्री-पुरुषातील हा एक महत्त्वाचा फरक होय.
सुमारे 92 टक्के पुरुष हस्तमैथुन करतात, तर सुमारे 62 टक्के स्त्रिया हस्तमैथुन करतात. पुरुष कामपूर्तीसाठी हस्तमैथुन करतो तसे स्त्री कामपूर्तीसाठी हस्तमैथुन करीलच असे नाही. बरेचदा हस्तमैथुनात किंवा संभोगात कामपूर्ती झाली नाही तरी ती तृप्त असते. पुरुष वयाच्या विशीपूर्वीच कामपूर्ती अनुभवतो.
स्त्री वयाची विशी ओलांडल्यानंतर कामपूर्ती अनुभवते. हस्तमैथुनाविषयीची माहिती पुरुषाला आपल्या मित्रांकडून किंवा त्याच्या वाचनातून कळते. स्त्री कामजीवनाविषयी इतरांशी फारसे बोलत नाही. ओघाओघाने केलेल्या स्वत:च्या शरीराच्या सुखद स्पर्शातून तिला हस्तमैथुनाची अनुभूती मिळत असते. वयानुसार पुरुषांतील हस्तमैथुनाचे प्रमाण कमी होत असते. तरीही पुरुषांहून स्त्रियांत हस्तमैथुनाचे प्रमाण खूप कमी असते. पुरुषांतील हस्तमैथुनाचे सर्वसाधारण प्रमाण आठवड्यातून दोन वेळा असले तर स्त्रियांतील हे प्रमाण तीन आठवड्यांतून एकदा, इतके कमी आढळते. पुरुषांप्रमाणे स्त्रियांतही हस्तमैथुनाविषयी भीती आढळते; पण भीतीचे प्रमाण कमी असते व कारणेही भिन्न असतात.
‘नैतिकदृष्ट्या हस्तमैथुन करणे योग्य नाही, हस्तमैथुनामुळे शारीरिक अपाय होतो,’ ही स्त्रियांची भीती असते.
हस्तमैथुन करण्याच्या पद्धतीत स्त्रीत जितकी विविधता आढळते तितकी ती पुरुषात आढळत नाही. स्त्रीची शिश्निका व लघुभगोष्ठाची आतली बाजू यावर कामसंवेदन ग्रहण करणाऱ्या पेशी असतात. या भागावर ती आपल्या हाताच्या बोटांनी तालबद्ध दाब देते आणि स्पर्शाने कुरवाळते. स्त्रीच्या योनिद्वाराव्यतिरिक्त योनिमार्ग कामसंवेदक नसतो. म्हणून स्त्री कोणतीही वस्तू किंवा आपले बोट योनिमार्गात घालून हस्तमैथुन करीत नाही. ‘स्त्री डिल्डो (योनीत घालण्यासाठी शिश्नाच्या आकाराची लांब वस्तू) वापरून हस्तमैथुन करते, तिची कामेच्छा पुरुषाच्या कामेच्छेहून खूप अधिक असते, ती वारंवार हस्तमैथुन करते,’ असा हा पुरुषाचा कल्पनाविलास असतो, यात अजिबात तथ्य नसते.
स्त्रीचे मोठे भगोष्ठ कामसंवदेक नसतात म्हणून मोठ्या भगोष्ठांचा समावेश हस्तमैथुनात होत नाही.
स्त्रीच्या हस्तमैथुनाच्या आणखी काही पद्धती म्हणजे खुर्चीवर बसून मांडीवर मांडी घालून पाय हलवणे, पोटावर झोपून शिश्निकेचे घर्षण गादीवर करणे, एका हाताने शिश्निकेवर दाब देताना दुसऱ्या हाताने स्तनाग्र कुरवाळणे, नळाखाली बसून शिश्निकेवर पाण्याची धार सोडणे वगैरे.
स्त्री व पुरुषाच्या जननेंद्रियांची रचना भिन्न असली तरी त्यांच्या चेतासंस्था व रक्ताभिसरणसंस्था समान असतात. त्यामुळे हस्तमैथुनात पुरुषाची कामपूर्ती दोन ते तीन मिनिटांत होते तशी स्त्रीची कामपूर्तीही दोन ते तीन मिनिटांत होते. मात्र संभोगादरम्यान स्त्रीच्या उद्दीपनाला व कामपूर्तीला पुरुषापेक्षा जास्त अवधी लागतो, याचे कारण पुरुष शिश्निकेकडे दुर्लक्ष करतो व आपले सर्व लक्ष योनीवर केंद्रित करतो.
योनी हे स्त्रीचे कामउद्दीपक इंद्रिय नसल्यामुळे स्त्रीची कामपूर्ती संभोगादरम्यान लवकर होत नाही किंवा अजिबात होत नाही.
पुरुषांप्रमाणेच स्त्रीलाही हस्तमैथुनामुळे कोणतीही शारीरिक किंवा मानसिक व्याधी उद्भवत नाही. शेरी हाईट आपल्या हाईट रिपोर्टमध्ये लिहिते की, संभोगात स्त्रीची कामपूर्ती होईलच असे
नाही; परंतु शिश्निकेच्या उद्दीपनाने केलेल्या हस्तमैथुनात स्त्रीची निश्चित कामपूर्ती होते.
असे हस्तमैथुन तिला शरीरसुख देते खरे; पण त्यातून तिला मानसिक सौख्य प्राप्त होत नाही. यात तिला एकटेपणा जाणवतो. मानसिक सुखासाठी स्त्रीला प्रेम, प्रणय, जवळीक साधणारा आपला माणूस हवा असतो म्हणून ती हस्तमैथुनात गुंतून राहत नाही. पुरुषाच्या शरीराचा स्पर्श व ऊब तिला अधिक मानसिक सौख्य देते. पुरुषाने केलेला तिच्या सर्व शरीराचा स्पर्श तिला आवडतो. स्त्रियांच्या हस्तमैथुनाच्या विविध पद्धतीवर शेरी हाईटने अधिक प्रकाश टाकला आहे. तिच्या पाहणीनुसार स्त्रियांच्या हस्तमैथुनाच्या पद्धती व टक्केवारी पुढीलप्रमाणे आहेत :
1.उताणे झोपून आपल्या हाताच्या बोटांनी शिश्निकेचे /भगप्रदेशाचे उद्दीपन करणे 73 टक्के
2. पालथे झोपून आपल्या हाताच्या बोटांनी शिश्निकेचे भगप्रदेशाचे उद्दीपन करणे... 55 टक्के
3. शिश्निका उशी किंवा मऊ वस्तूला घासणे 4 टक्के
4. दोन्ही मांड्या एकमेकांजवळ आणून स्नायूंचे तालबद्ध आकुंचन करणे. 3 टक्के
5. पाण्याची धार शिश्निकेवर सोडणे.. 2 टक्के
6. योनीत आपले बोट घालणे व एखादी लांब वस्तू घालणे... 1.5 टक्के
7. वरीलपैकी एकाहून अधिक पद्धतीने हस्तमैथुन करणे... 11 टक्के
स्त्री-पुरुष दोघेही हस्तमैथुन करतात असे आढळून आले आहे, तरी त्यांच्यातील फरक लक्षात ठेवण्यासारखा आहे. पुरुषात जवळजवळ सर्व पुरुष हस्तमैथुन करतात; तर स्त्रियांतील प्रत्येक स्त्री हस्तमैथुन करतेच असे नाही. पुरुष जितका वारंवार हस्तमैथुन करतो त्याप्रमाणात स्त्री हस्तमैथुन करीत नाही. पुरुषापेक्षाही स्त्रीच्या हस्तमैथुनात विविधता आढळते. योनीत वस्तू घालून हस्तमैथुन करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. पुरुषाला हस्तमैथुनापेक्षा संभोगात उच्चतम प्रकारची कामपूर्ती होते, तर स्त्रियांच्या बाबतीत संभोगापेक्षा हस्तमैथुनाने नक्कीच व लवकर कामपूर्ती होते. असे असूनही स्त्रियांत संभोगापेक्षा हस्तमैथुनाचे प्रमाण कमी असते, कारण स्त्रीला निव्वळ कामपूर्तीपेक्षा सहवास, प्रेम, स्पर्श, शृंगार अधिक प्रिय वाटतो. हस्तमैथुनावेळी पुरुष संभोगाचे चित्र रेखाटतो तसे स्त्री करीत नाही.
हस्तमैथुनाची एकदा चटक लागली की, विवाहानंतरही संभोगाऐवजी स्त्री-पुरुष हस्तमैथुनातच गुंतून राहतील अशी भीती व्यक्त केली जात असे; परंतु किन्से व हाईटच्या पाहणीत त्यांना असे घडल्याचे आढळले नाही. याचाच अर्थ असा की, संभोग प्राप्त होईपर्यंतच्या कालमर्यादेसाठी हस्तमैथुन हा एक पर्याय असतो.
वारंवार हस्तमैथुन केल्यामुळे हस्तमैथुनाची कोणतीही खूण शिल्लक राहत नाही. शिश्न बारीक व लहान होते किंवा शिश्निका वाढते, या कल्पना म्हणजे निव्वळ गैरसमज होत. असे असते तर अधिक बोलणाऱ्यांची जीभ झिजली असती किंवा लेखन करणाऱ्यांची बोटे जाड झाली असती; वास्तवात तसे होत नाही.