#historical
#कथेचे_नाव_अकल्पिता....एक शापित रहस्य....!!!
#भाग_१
#भाग_१
अकल्पिता.... एक शापित रहस्य....!!! - By दिपशेखर..
तुझ्या माझ्या नात्याला
मी नाव काय देऊ,
तूच सांग सख्या मला
मी कोणता आधार घेऊ...
मी नाव काय देऊ,
तूच सांग सख्या मला
मी कोणता आधार घेऊ...
स्वप्न म्हणू कि सत्य
काय अर्थ मी लाऊ,
अशी कितीवेळ तुझ्या
प्रेमात मी वाहत जाऊ.....
काय अर्थ मी लाऊ,
अशी कितीवेळ तुझ्या
प्रेमात मी वाहत जाऊ.....
"शीट यार पुढे काय लिहावं तेच सुचत नाहीये.. किती छान ओळी सुचल्या होत्या मगाशी गाडीवर होते तेव्हा.. आणि आत्ताच काय झालं समजेना.. " स्वतःशीच तेजस्विनी बोलत होती.
आज सकाळी जेव्हा ती कॉलेज मधून बाहेर पडली तेव्हा तिच्या मनात हि कविता रेंगाळत होती. आजवर अनेक लिहिणारी हि मुलगी आज का कुणास ठाऊक पण अडखळत होती. त्यामुळे तिला स्वतःलाच विचित्र वाटू लागलं होत. आणि म्हणूनच ती स्वतःलाच समजावत होती. बी. कॉम. च्या लास्ट यीअरला असलेली तेजस्वनी. दिसायला एकदम सुंदर आणि तितकीच सालस. तेजस्विनी प्रकाश सूर्यवंशी असं तीच पूर्ण नाव. नावातच सर्व काही होत तिच्या. तेज, प्रकाश आणि सूर्य या तिन्हींचा अनोखा संगम म्हणजे तेजस्विनी. अगदी लहानपणासूनच हुशार, सुंदर, गॉड, चपळ अगदी सर्व काही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संस्कार. ते तर अगदी ठासून भरले होते तिच्यात. अभ्यासात हुशार असणारी हि मुलगी कविता खूप करायची. वेडच तिला या कवितांचं होत. जरा मोकळी झाली कि हिच्या हातात ते पेन आणि ती वही आलेच समजा. लिहायची आणि ती वही तशीच पर्स मध्ये गायब करायची. कधी कोणाला वही दाखवली नाही आणि कविता हि नाही.
"तेजा..." (तिच्या घराचे तिला प्रेमाने तेजा म्हणत) आईचा किचन मधून आवाज आला आणि तेजाची तंद्री भंग पावली. "तुझी नसती उठाठेव झाली असेल तर जेवायला ये" आई.. ती कधी प्रेमाने बोलावेल तर कधी रागाने. पण तिचा आवाज आला कि तेजा हातातल सर्व काही तितेच सोडून पळतच हजर राहायची. कारण तिची आई शिस्तप्रिय होती. आणि सर्व काही वेळेत असावं असं तीच मत. आणि त्याप्रमाणेच सर्व घर चालायचं. तेजा किचन मध्ये आली.
तेजा : अरे वाह आज स्पेशल मेनू दिसतोय जेवणात..
आई : हो आहे ना. वांग्याचं भरीत आणि भाकरी आहे. तुझ्या आवडीचं
तेजा : काय आई.. कालही वांग आणि आज परत (नाक मुरडतच)
आई : रोज रोज काय नवीन बनवू मी. जे आहे ते बनवते. उगाच नाटकी नको करू जेवून घे.
तेजा : नाटकी.. बर.

दोघी माया लेकी बसून जेवल्या आणि किचन आवरून अराम करायला गेल्या. सायंकाळचे चार वाजले आणि तेजाच्या आईने परत हाक दिली.
"तेजा जरा खाली ये. ती अडगळीची खोली आज साफ करायची आहे. खूप दिवस झाले तिकडे कोणी फिरकले नाही."
"अडगळीची खोली.. ईईईई.. आई तू आज काय हे काम काढलं आहेस."
"बाळा मला हौस नाही आली आज. आग खूप दिवस झाले विचार करते आहे मी. आज वेळ आहेच तर करूयात साफ म्हटलं. आणि हो त्या खोलीत तुला आवडतील अशाच वस्तू आहेत. तुझं बालपण आणि गावाकडील काही आठवणी."
"गावाकडील.. मग तर लगेच चल मला पाहायचं आहे काय काय आहे त्यात."

तेजा आणि आई अडगळीच्या खोलीकडे आले आणि स्वच्छता सुरु झाली. एक एक वस्तू बाहेर काढत असतानाच आई तेजाला प्रत्येक वस्तू बदल माहिती देत होती. "हि तुझी पहिली सायकल.." "हा तुझा पहिला पाळणा.." "हा बाबानी आणलेला त्यावेळचा रेडिओ" अशा खूप काही वस्तू त्या खोलीतून निघत होत्या आणि तेजा त्या वस्तू पाहून खुश होत होती. कारण जून ते सोन असं तीच मत होत. आणि त्या वस्तू आजही किती छान आहेत हे ती पाहत होती. अगदीच मनापासून त्या दोघीनी ती खोली स्वच्छ केली. सर्व खोली कशी एकदम चकाचक केली. अचानक तेजाच लक्ष एके ठिकाणी गेले आणि ती दचकली.
"ये आई हि पेटी कसली आहे ग? आणि तू हि पेटी पुसली पण नाहीस."
"तेजा....." आई जोरात ओरडली. "तू त्या पेटी पासून लांब राहा. हात नको लावूस तिला" आईचा चेहरा भीतीग्रस्त दिसत होता यावेळी.
"का? हात का नाही लावायचा. आग आई तो फक्त एक पेटी तर आहे" असं म्हणत तेजा पेटी हातात घेण्यास पुढे झाली. विजेच्या चपळाईने आई पुढे झाली आणि तेजाला एक हाताने धरून मागे खेचू लागली.
"तेजा काही गोष्टी ऐकत जा. नको करू हा आगाऊपणा. चल इथून. आपलं काम झालं आहे."
आईचा तो पवित्रा पाहून तेजा गप्प बसली.
"ठीक आहे आई. एवढी चिडू नकोस. मी नाही हात लावत त्या पेटीला. आणि चल जाऊया आपण."
त्या दोघी तिथून बाहेर पडू लागल्या. जाता जाता तेजाने त्या पेटीकडे एक कटाक्ष टाकला. तिला त्या पेटीवर काहीतरी लिहाल आहे असं दिसलं. तिने डोळे बारीक करूनच ते शब्द वाचायचा प्रयत्न केला. त्या पेटवीर लिहाल होत. "अकल्पिता.."
ते नाव मनात घोळतच तेजा आणि आई अडगळीच्या खोलीतून बाहेर पडल्या...

चोहोबाजुला घनदाट काळोख पसरला होता. तो काळोख इतका गडद होता की अगदी डोळ्यासमोर काय आहे ते ही दिसत न्हवत. अशा दाट काळोखात तेजा एकटीच होती. तिला काहिच दिसत न्हवत. काय होत आहे आणि आपण कुठे आहोत हा एकच प्रश्न तिला पडला होता. ती एका पलंगावर झोपलेली होती. तिला लोक विव्हळत असलेले आवाज येत होते. कोणती तरी मोठी यातना त्या लोकाना होत होती आणि त्या यातनेने ते जोर जोरात विव्हळत होते. तो आवाज तेजाला असह्य होत होता. पण चोहो बाजुला असलेला तो घनदाट काळोख तिला थोडा भितीदायक वाटत होता. मधेच अचानक एक गडगडाटी राक्षसी हसण्याचा आवाज तिला आला आणि त्या आवाजाने ती पुर्ण जागी झाली. आता मात्र तो विव्हळण्याचा आवाज खुपच येऊ लागला. त्यामूळे तेजाने उठायच ठरवल आणि तिने आपली सर्व ताकद आणि हिम्मत एकवटून ती उठली. त्या आवाजाचा कानोसा घेत ती पुढे पुढे आली तेव्हा तिला जाणवल की ती एका तो आवाज ती जिथे आहे त्या खोलीला असणार्या खिडकीतून येत आहे. त्या आवाजाचा कानोसा घेत चाचपडत ती त्या खिडकीपाशी आली. तिने बाहेर डोकावून पाहिल तर बाहेर खुप घनदाट अशी झाडी होती आणि त्या झाडीच्या पलीकडे असणार्या टेकडीवर तिला खुप मोठा अग्नी पेटलेला दिसत होता. आणि तो विव्हळण्याचा आवाज तिकडूनच येत होता. तेजाला तो आवाज ऐकून आपण तिकडे खेचले जात आहोत असे वाटू लागले. काय कराव हा विचार करित असतानाच अचानक कर्रकर्रकर्र.. असा आवाज झाला आणि खिडकीतून बाहेर पाहत असणारी तेजा भितीने थरकापली. तिने वळून पाहिले तर दरवाजा उघडून कोणी तरी आत आले होते. तेजा काही बोलणार ईतक्यात ती आत आलेली व्यक्ती बोलू लागली.
"माफी असावी राणी सरकार.. अस अचानक येणे केल.. पण वेळच तशी आहे की आपणास तसदी द्यावी लागली.."
तेजाला काहिच समजले नाही. ती गोंधळली होती. ती काही बोलणार तोच त्या खोलीत दिवे पेटवले आणि सर्वत्र उजेड पसरला. तस तेजाला समोर सर्व काही दिसू लागल. समोरच द्रुश्य पाहताच तेजा पुर्णच गोंधळली आणि तिला समोर जे दिसत आहे त्यावर विश्वास बसेना. ती एका मोठ्या दालनात उभी होती आणि बहुतेक ते दालन ती जिथे होती त्या महलचा एक भाग होता. समोर असणार्या प्रशस्त अशा पलंगावर एक सुंदर लावण्यवती पहुडली होती. तिच सौंदर्य म्हणजे जणु स्वर्गातली अप्सराच. आता तेजाला जाणवल की ती चक्क एका राज महाल मधे आहे आणि ती ही राणीच्या दालनात. 'अरे बापरे.. मी इथे कशी आणि हे नेमके अहेआहे तरी काय' तेजाच्या मनात तो विचार घोळत होता तोच ती सुंदर तरुणी जागी झाली आणि बोलू लागली..
"असे कोण काम येऊन पडले की मज पर्यंत आपणास यावे लागले. कोणी संकट तर नाही ना आले.?"
"नाही राणी सरकार.. संकट असे काहिच नाही."
"नाही राणी सरकार.. संकट असे काहिच नाही."
बहुतेक हा द्वारपाल असावा. तेजाने तिचा अंदाज बांधला.
"मग काय काम आहे सेवक.. तुम्ही मला इतक्या रात्री का उठवत आहे" ती तरुणी बोलली.
"राणी सरकार.. आज पुन्हा ते विचित्र आवाज येत आहेत. त्यामूळे राज्यात बाहेर सर्वत्र भितीग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे."
"वाटलच होत आम्हाला. तो आवाज आम्ही ही ऐकतो आहोत. पण सेवक त्या तिकडे जाण्याची बंदी आहे आपणास. तसे राज्यगुरुनी फर्मान केले आहे. तुर्तास तरी आम्ही बाहेर येऊन प्रजेला काय ते सांगू. तुम्ही चला पुढे मी आलेच.."

मुजरा करित तो सेवक निघून गेला. तशी ती तरुणी लगबगीने उठली आणि त्या खिडकीजवळ आली. त्या पेटत्या अग्नीकडे पाहत ती थोडी हळहळली.
"कोण संकट आहे हे माहीत नाही. पण यावरती मार्ग शोधायला हवा. तोही लवकरात लवकर.."स्वताशीच ती तरुणी बोलत होती. तिने आपला पेहराव नीट केला आणि झपझप पावले टाकत ती दालनातून बाहेर पडली.
"कोण संकट आहे हे माहीत नाही. पण यावरती मार्ग शोधायला हवा. तोही लवकरात लवकर.."स्वताशीच ती तरुणी बोलत होती. तिने आपला पेहराव नीट केला आणि झपझप पावले टाकत ती दालनातून बाहेर पडली.
अरे बापरे मी ही कुठे आली आहे आणि हा सर्व काय प्रकार आहे. काहिच समजत नाहीये. तेजा मनातच बोलत होती. ती आता त्या दालनात एकटीच होती. ती इकडे तिकडे फिरु लागली आणि त्या दालनाचा अंदाज घेऊ लागली. तिथे असणारी बहुतेक भांडी ही सोन्याची होती. भिंतीवर तलवारी आडकवून ठेवल्या होत्या. तिथे असणारी प्रत्येक गोष्ट आणि वस्तू एकदम स्वच्छ आणि टापटीप होत्या. ते दालन खुपच मोठ होत. इतक मोठ की अगदी तेजाच पुर्ण घर त्या एका दालनात बसेल. म्हणजे 1bhk फ्लैटच. पण त्या दालनची सजावट आणि नीटनेटकेपणा अगदीच मस्त होता. तेजा पुर्ण दालन फिरत होती. तिथे असणारी प्रतेक गोष्ट ती निरखून पाहत होती. अचानक तिची नजर एका वस्तूवर स्थिर झाली. तिला जाणवल की ही वस्तू तिने कुठे तरी पाहिली आहे. पण कुठे ते आठवेना. ती एक सारखी त्या वस्तूला पाहत होती.
"अरे हा.. ही तर तिच पेटी आहे.. जी मी आज अडगळीच्या खोलीत पाहिली.." पण ही इथे कशी काय?"
ती पुर्ण गोंधळली होती. तिने मागचा पुढचा विचार न करता त्या पेटीला हात लावला तोच मागुन एक आवाज आला.
"थांबा.. जिथे आहात तिथेच थांबा.. त्या पेटीला चुकूनसुधा उघडण्याचा प्रयत्न करु नका.."
त्या आवाजाने आता मात्र तेजा घाबरली. ती तिथेच गप्प उभा राहिली.
"तुम्ही आमच्या दालनात काय करत आहात? आणि कोण आहात तुम्ही? नक्किच शत्रुने तुम्हास इथे धाडले असणार."
तो आवाज त्या तरुणीचा होता. तशी तेजा मागे वळली. ती काही बोलणार इतक्यात त्या तरुणीने भिंतीवरिल तलवार उपसली आणि एक वार केला....
****/*****÷÷****××

"आईईई...." जोरात ओरडत तेजा झोपेतून जागी झाली. तिचे आई बाबा त्या आवाजाने जागे झाले आणि धावतच तेजाच्या खोलीत आले. तेजा भितीने लटलट कापत होती आणि घामाने चिप्प भिजली होती.
"मम्ममम्म.. मी इथे कशी आले मला नाही माहीत..."इतकच काय ते ती बडबडत होती. तेजाच्या आईने तेजाला जवळ घेतले.
"तेजा.. अग तेजा काय झाले.. अग तुज्या खोलीतच आहेस ग तू... ये बाळ.."
त्या स्पर्शाने आणि आवाजाने तेजा भानावर आली.
"आई.. आई... अग मी खुप भयानक स्वप्न पाहिल.. "
"हो बाळ.. स्वप्नच होत ते. तू घरीच आहेस. हे घे पाणी पी.. बर वाटेल तुला.."
तेजा पाणी पिली. तिला जाणवल की ते एक स्वप्न होत. तिला आता थोड बर वाटू लागल. तिन आई बाबाना सांगितल की ती आता ठिक आहे. तेव्हा तिचे आई बाबा परत झोपायला गेले.

स्वताशीच हसत तेजाही झोपायला गेली तोच तिची नजर त्या अडगळीच्या खोलीकडे गेली. तिथे तिला ती पेटी दिसली जी खुपच प्रकाशमान झाली होती. ती क्षणभर तिथेच थांबली पण जाऊदे म्हणत ती झोपी गेली...
क्रमशः...